५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .
मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"
तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."
परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .
आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?
माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .
बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .
सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .
भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .
इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .
आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .
इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .
पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .
हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .
भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .
लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .
प्रतिक्रिया
19 Aug 2014 - 4:54 pm | प्रमोद देर्देकर
हायला हा धागा पंचशतक करणार.
19 Aug 2014 - 6:45 pm | नानासाहेब नेफळे
--ज्या धाग्यात गांधी सावरकर ब्राह्मण वेद बुप्रा गांधीवध गोडसे ५५ कोटी आसिँधुसिंधु संस्कृतभाषा आर्य अनार्य द्रविड हिरवे भगवे लाल निळ्या क्रांत्या इत्यादी शब्द/विषय येत नाहीत तो धागा पंचशतकी होत नाही-- ,
..नानामृतातून साभार!
20 Aug 2014 - 12:06 am | विनोद१८
..नाना तुझे या चर्चेत स्वागत असो.......
आता तु तुझे अमृत इथे सांडलेच आहेस तर मी खात्रीने सांगतो हा धागा नक्कीच पंचशतकी होइल, यात काय शंका ..?? कारण फक्त तुझीच उणीव या चर्चेत भासत होती, आता तु इथे उगवला आहेस तर हे तमाम 'मिपामंडळ' तुझ्या दिव्य ज्ञानप्रकाशात न्हाउन निघो व उत्तरोउत्तर वर्धिष्णु होवो.......!!!!!! अशी आशा करतो.
(नान्या नेफळाप्रेमी) विनोद१८
19 Aug 2014 - 7:43 pm | सुबोध खरे
http://www.psychologytoday.com/blog/how-we-do-it/201310/kamikaze-sperms-...
अदिती ताई
एक विदा देत आहे. बर्याच आहेत. मुळात कामिकाझे शुक्राणू असते तर शुक्राणू पेढीत मिश्रण केलेले शुक्राणू(POOLED) वापरता आलेच नसते.
पहा पटले तर नाही तर सोडून द्या
मानस शास्त्रज्ञ हा शब्द चुकून वापरला त्याऐवजी मानस शास्त्र असे वाचावे. आणी मी लिहिले आहे याचे महत्त्वाचे कारण मानवी मनावर अभ्यास करता येईल असा कोणताही प्राण्याचाआदर्श किंवा नमुना( ANIMAL MODEL) मानवी मेंदूच्या जवळपासही येत नाही. यामुळेच फ्रोईड पासून अनेक शास्त्रज्ञानी आपल्या अनुभवातून मांडलेल्या उपपत्त्ती नन्तर त्याज्य ठरवल्या गेल्या. यात मानस शास्त्र किंवा मानस शास्त्रज्ञ यांची चूक नाही.
मोठे मोठे शब्द मला वापरता येत नाहीत पण मानस शास्त्राचा आपला अभ्यास असावा असा कयास आहे. अजाणतेपणे आपल्या वर्मावर बोट ठेवले गेले असेल तर क्षमस्व.
20 Aug 2014 - 8:15 am | विलासराव
कल्पना विलास.
ही कल्पना कोण ते मला आइशप्प्थ माहीती नाही ओ.
`वन नाइट स्टँड' पेक्षा मला "७० डे नाईट स्टँड्" भावले. मी आधी कुठलाही धागा न काढ्ता जाउन आलो.
आन मग स्वतःच गावभर बोंब ठोकली.
पहा आमची पहीली परदेशवारी!!! नशीबाने कोणीतरी भक्ताने ती अलीकडेच वरती आणलीय, फक्त वाचल्यावर कोणताही स्टँड घ्या किंवा घेउ नका. आपल्या जबाबदारीवर करा म्हणजे झालं.
लोक काहीबी बोलत्यात पण मी सांगतो आपला या कल्पनाशी काहीही संबंध नाही हो. पण कुरुक्षेत्र ब्राझील असल्याने
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल . असं काही मनाला शिवलेसुद्धा नाही बॉ.
20 Aug 2014 - 10:23 am | संजय क्षीरसागर
हा प्रश्न मुख्यत्वे विवाहितांना अॅप्लिकेबल आहे. अविवाहितांना एक्स्प्लोरेशनच्या सबबीवर बर्यापैकी मोकळीक आहे. म्हणजे लफडेबाज आहे इतपत बदनामी होऊ शकते, पण संसाराचा राडा होण्याची शक्यता नाही.
तस्मात, तुमचं "असं काही मनाला शिवलेसुद्धा नाही बॉ" म्हणणं सहाजिक आहे.
सामान्यतः तुमच्या जागी कुणीही असता तरी नैतिकचा किंवा संस्कृतीचा प्रश्न उद्भवला नसता.
20 Aug 2014 - 11:20 am | विलासराव
>>>>>हा प्रश्न मुख्यत्वे विवाहितांना अॅप्लिकेबल आहे. अविवाहितांना एक्स्प्लोरेशनच्या सबबीवर बर्यापैकी मोकळीक आहे. म्हणजे लफडेबाज आहे इतपत बदनामी होऊ शकते, पण संसाराचा राडा होण्याची शक्यता नाही.
तस्मात, तुमचं "असं काही मनाला शिवलेसुद्धा नाही बॉ" म्हणणं सहाजिक आहे.
सामान्यतः तुमच्या जागी कुणीही असता तरी नैतिकचा किंवा संस्कृतीचा प्रश्न उद्भवला नसता
म्हण्जे नैतीकता आणी संस्कृती या विवाहोत्तर गोष्टी आहेत काय?
विहाहपुर्व नाहीत बरोबर का?
की काही प्रमाण कमी जास्त अस्ते दोन्हीत विवाहोत्तर किंवा विहाहपुर्व.
उत्तर द्या किंवा देउ नका.
माझा पास.
20 Aug 2014 - 11:40 am | संजय क्षीरसागर
विवाहपूर्वकालात, जिथे विवाहाचा शब्द दिलेला नाही किंवा ते प्रयोजनच नाही तिथे नैतिकता कुठे येते? दोघांना मजा करायचीये, दोघंही राजी आहेत, समाज गेला फाट्यावर.
पण विवाहितांना असं करता येणं शक्य नाही. मग संस्कृती पौर्वात्य असो की पाश्चिमात्य, माणूस इथून तिथून सारखाच आहे. एकदा लपवाछपवी सुरु झाली की नात्याची वाट लागलीच म्हणून समजा!
20 Aug 2014 - 10:35 am | सुबोध खरे
विलासराव
ज्या मुलीचे सत्तर डे स्टेन्ड आहेत अशी मुलगी आपल्याला किंवा आपल्या भावाला सांगून आली तर आपण तिच्याशी लग्न कराल काय?
हा प्रश्न एक प्रातिनिधिक आहे विलासराव या व्यक्तीला नाही. यावरून समाजमनाची काय स्थिती आहे ते कळेल.
हाच प्रश्न एखाद्या मुलीच्या बापाला विचारता येईल कि ज्या इसमाचे ७० डे स्टेन्ड आहेत अशा माणसाशी आपण आपल्या मुलीचे लग्न करून द्याल का ?
शेवटी ज्या गोष्टीत आपल्याला लपवाछपवी करावी लागते अशी गोष्ट आपण करावी का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संस्कृती पावित्र्य इ इ मोठे मोठे शब्द आहेत.( मला न समजणारे).
20 Aug 2014 - 10:56 am | संजय क्षीरसागर
अर्थात, तुम्ही हे माझ्या पेक्षाही सोपं आणि सरळ केलंय :
सलाम!
20 Aug 2014 - 11:10 am | विलासराव
>>>विलासराव
ज्या मुलीचे सत्तर डे स्टेन्ड आहेत अशी मुलगी आपल्याला किंवा आपल्या भावाला सांगून आली तर आपण तिच्याशी लग्न कराल काय?
हा प्रश्न एक प्रातिनिधिक आहे विलासराव या व्यक्तीला नाही. यावरून समाजमनाची काय स्थिती आहे ते कळेल.
भावाला सांगुन आली तर त्याने निर्ण्य घ्यायचाय मी नाही.
हा प्रश्न एक प्रातिनिधिक आहे विलासराव या व्यक्तीला नाही. त्यामुळे पास.
यावरून समाजमनाची काय स्थिती आहे ते कळेल. हा विचार मी माझ्या स्वार्थातुन करतो. फार नूकसान तेही मानसीक/शारिरिक /आर्थीक मला झेपणार असेल तर करतो. नसेल तर नाही करत.कारण हेच शेवटी ज्या गोष्टीत संस्कृती पावित्र्य इ इ मोठे मोठे शब्द आहेत.( मला न समजणारे). त्या मी सोडुन देतो.
20 Aug 2014 - 11:51 am | विश्वनाथ मेहेंदळे
चुकीच्या माणसाला प्रश्न विचारलात :-)
20 Aug 2014 - 8:36 am | पिंपातला उंदीर
ऐसी अक्षरे या संकेत स्थळावर धाग्याच्या अनुषंगाने एक पोल सुरु झाला आहे . लोकांनी तिथे जाऊन मत नोंदवले तर आंतरजालावरील लोकांच्या मनाचा कल काय आहे याचा अंदाज येईल . धाग्याची लिंक देत आहे - http://www.aisiakshare.com/node/3170
असा पोल इथे सुरु करता येऊ शकतो का ?
20 Aug 2014 - 11:10 am | संजय क्षीरसागर
पोल घेवून काय घंटा साध्य होतं? नुसता (बदाबदा) विदा जमतो. असला फालतू विदा, तोही आयडेंटिटी दडवून जमा केलेला काय कामाचा?
असले पोल बघून निर्णय घेणारे आणि स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवणारे शुद्ध बावळट असतात. कारण त्यांना स्वतःचं मतच नसतं! काही झालं की बघा डेटा, म्हणजे पब्लिक काय करतंय यावर यांचा निर्णय!
आणि समजा आला पोल वन नाईट स्टँडच्या फेवरमधे, तर हे काय गळ्यात पाटी अडकवून फिरणार का, `आय एम रेडी फॉर वन नाईट स्टँड' (आणि का तर म्हणे `आय हॅव अ फेवरेबल डेटा!)
20 Aug 2014 - 11:43 am | विलासराव
जोरदार टाळ्या.
जाम हसतोय हो संक्षी.
हे लोक हनीमुनलाही विदा घेउन बसतील्/मागतील.
तहान लागलीय तर सरळ पानी नाही पिणार त्या पाण्याचं विश्लेषन करणार.
विदा मागणे काही ठीकाणी बरोबर असेल कदाचीत पण प्रत्येक गोष्टीत नसावे.
कुठल्याशा सिनेमामधे:
जॉनी लीव्हर नाव कसे कमवावे हे कोणाला तरी विचारतो. तो मनुष्य सांगतो गावात एक वृद्ध महीला मरन पावली. मी तिथे जाउन असे बोललो की ही फक्त या व्यक्तीची आई नव्ह्ती तर माझी आई होती, सोम्याची आई होती, गोम्याची आई होती सगळ्या गावाची आई होती.
हा ते लक्षात ठेवतो आनी संधीच्या शोधात असतो. लवकरच ती संधी त्याला मीळतेही, गावातील कोणाचीतरी तरुण बायको मरण पावते हा तिथे जाउन भाषण ठोकतो की ही फक्त या व्यक्तीची बायको नव्ह्ती तर माझी बायको होती, सोम्याची बायको होती, गोम्याची बायको होती सगळ्या गावाची बायको होती. आनी भरपुर नाव कमावतो.
आता यानंतर काय झाले याचा विदा मागु नका म्हणजे मिळवली. तरीही माझ्याकडे काहीही विदा नाही हे मी सांगुन ठेवतो.
20 Aug 2014 - 12:06 pm | असंका
कुठल्याशा का हो? चांगला हिट पिक्चर होता "अनाडी"! मद्राशी हिरो "व्यंकटेश"चा.
20 Aug 2014 - 12:44 pm | पैसा
काय आठवण काढलीत! अनाडी पिक्चर बकवास होता. पण वेंकटेश आमचा आवडता. त्याचा भानुप्रियाबरोबरचा स्वर्णकमलम कोण विसरेल?
20 Aug 2014 - 12:28 pm | बाळ सप्रे
पोलचे पर्याय फारच कन्फ्युजिंग आहेत
उदा. 'निश्चित नाही' म्हणजे - 'वन नाईट स्टँड निश्चितच घेणार नाही'
आणि 'वन नाईट स्टँड घेणार की नाही हे अजुन निश्चित नाही' कसाही अर्थ निघु शकतो..
नक्की काय समजायच??
त्यावर अभिप्रेत प्रश्न आणि आणखी पर्याय देउन संभ्रम खूपच वाढवलाय असं वाटतं.
20 Aug 2014 - 1:38 pm | कवितानागेश
पोल थोडा गोंधळाच वाटतोय. आणि तिथे एकापेक्षा जास्त पर्याय निवडाय्चे असतील तर गोन्धळ अजून वाढेल.
20 Aug 2014 - 1:37 pm | पुण्याचे वटवाघूळ
जगात फार कॉन्झर्व्हेटिव्ह लोक असतात (उदाहरणार्थ मुलामुलींनी बोलले तरी संस्कृती बुडते अशी ओरड करणारे) आणि दुसर्या टोकाला अती लिबरल लोक असतात (उदाहरणार्थ या लेखावर प्रतिक्रिया देणारे काही). माझा या दोघांनाही अगदी टोकाचा विरोध आहे. तरीही त्यातल्यात्यात हे अती लिबरल लोक जास्त डेंजरस असतात. असले लिबरल लोक म्हणजे दुसर्या टोकाची खाप पंचायतच आहे.
(संपादित)
20 Aug 2014 - 1:51 pm | प्रभाकर पेठकर
वैयक्तिक जीवनात ज्या मुलीवर प्रेम केले तिच्याशीच विवाह केला. ७८ ते ८१ ह्या विवाहपूर्व काळात संधी असूनही दोघांनीही कधी मर्यादा ओलांडली नाही.
विवाहोत्तर अशी संधी (लेखात अपेक्षित असलेली) कधी आली नाही. आली असती तरी पत्नीचा आणि मुलाचा विचार करून असा प्रसंग टाळलाच असता. लहानपणापासून आई-वडीलांचे, शिक्षकांचे, वाचलेल्या साहित्याचे आणि संगतीचे संस्कार चांगलेच होते त्यामुळे मनाची कधी द्विधा अवस्था झाली नाही. मला वाटतं, आपल्या समाजात, माझ्यासारखे बहुसंख्य आहेत.
20 Aug 2014 - 3:15 pm | चौकटराजा
जिच्यावर प्रेम केले तिचाशीच लग्न केले हे वाक्य टाकून पेठकर काका काय साधलंत ? अहो अनेक दु: खी जिवांच्या भूतकाळातील जखमेची खपली.......वगैरे वगैरे..... बाकी ७८ ते ८१ पुण्यात होतात की ममईत...? कारण ममईत " संधी"
मुंबईचा जावई चा काळात देखील नव्हती मग ७८ ला कुठून ???
20 Aug 2014 - 3:55 pm | प्रभाकर पेठकर
>>>>जिच्यावर प्रेम केले तिचाशीच लग्न केले हे वाक्य टाकून पेठकर काका काय साधलंत ?
मिपावर वैयक्तिक जीवन जास्त उघड करू नये एव्हढेच.
20 Aug 2014 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले
One Night Stand >>>
हायला ह्या असल्या सगळ्या गोष्टी आम्हाला कशा पहायला मिळत नाहीत देव जाणे ... आमचे मित्र तर भरभरुन चर्चा करत असतात अन एन्जोयही !!
बहुतेक आम्हीच लई शामळु असल्याने किंव्वा खयाली पुलाव करत बसतो !!
20 Aug 2014 - 3:00 pm | सूड
>>आमचे मित्र तर भरभरुन चर्चा करत असतात अन एन्जोयही !!
लेखकानं काय वेगळं केलंय!! केलं कोणी, त्याची चर्चा इथे!! आपल्याला काय करायचंय हे ज्याचं त्याने आपापल्या जबाबदारीवर ठरवावं. अमक्या तमक्याने काय केलं त्याचा इथे काथ्याकूट करत बसण्यात काय हशील आहे.
20 Aug 2014 - 4:51 pm | प्रसाद गोडबोले
अमक्या तमक्याने काय केलं त्याचा इथे काथ्याकूट करत बसण्यात काय हशील आहे.
>>> शतप्रतिशत सहमत !
21 Aug 2014 - 12:38 pm | सुबोध खरे
जाता जाता --
एक पन्नाशीचा जाट डॉक्टरकडे आला आणि म्हणाला "डॉक्टर आजकाल कमजोरी लगती है".
डॉक्टर --"ताऊ, हट्टा कट्टा तो लग रहा है"
जाट --"नही, रात मे कमजोरी है. आजकाल हप्ते मे तीन बार हि सेक्स हो पाता है"
डॉक्टर "फिर क्या तकलीफ है"
जाट-- " मेरा पडोसी तो हप्ते मी ७ बार करता है ऐसे बोला "
डॉक्टर--" ताऊ, तुने देखा क्या?
जाट -- "नही, देखेगा कैसे"
डॉक्टर --"फिर तुभी बोल, मै हफ्ते मे १० बार करता हुं.
तात्पर्य
ओ एन एस बद्दल जितकी शेखी मिरवली जाते तितकी वस्तुस्थिती असत नाही.
दुसरी गोष्ट -- वैवाहिक संबंधात शरीर संबंधांचे प्रमाण हे नुसत्या/लीव्ह इन नात्यांच्या पेक्षा किती तरी जास्त असते. (sex is available on tap). सलमान खान ( इथे कोणताही नट किंवा कासानोव्हा घ्या) च्या १५ मैत्रिणी झाल्या असतील पण प्रत्यक्ष संबंध १०-१५% च्या वर जात नाही.
हि माहिती CARC ( center for AIDS Research and Control) के इ एम रुग्णालय बरोबर काम करताना मिळाली होती. (साल १९९४). आजही यात फार बदल झाला असेल असे वाटत नाही.
बाकी काथ्याकुट चालू द्या.
22 Aug 2014 - 11:22 pm | कवितानागेश
IIPS (इन्डियन इन्स्टित्युट ऑफ पॉप्युलेशन सायन्स) मध्ये काम करणार्या काहीजणांकडूनही अशीच 'आश्चर्यकारक' टक्केवारी ऐकायला मिळाली आहे.
22 Aug 2014 - 11:33 pm | प्यारे१
डॉ. साहेब, शरीरसंबंध येणं हे 'पुढचं पाऊल' नसतं काय? त्यातसुद्धा 'एक विशिष्ट क्रिया' झाली तरच संबंध आला अन्यथा नाही असं जे दुटप्पी धोरण आहे त्याला फारसा अर्थ उरु नये.
माझ्या मते बर्याचदा वैचारिक/ मानसिक पातळीवर झालेली गुंतवणूक जास्त 'व्यभिचारी' (धोकादायक)असते. शारीर पातळीवर त्याची फक्त अभिव्यक्ती होते. बर्याचदा वैचारिक उलाढालींनंतरच शारीर पातळीवर काही गोष्टी घडून येतात.
स्वतःशी प्रामाणिकपणा ठेवून विचार केला तर संबंधांशिवाय देखील तितकाच इंद्रियानंद हल्ली विविध माध्यमातून मिळवत आहेत लोक आणि त्याला खरंतर नाही ना काही केलं असं पांघरुण घालत आहेत.
(हे वन नाईट स्टॅण्डचं समर्थन नाही)
20 Aug 2014 - 3:11 pm | स्पा
लईच :-D
20 Aug 2014 - 3:49 pm | तुमचा अभिषेक
समूहावर कोणी वन नाईट स्टँडचा स्वानुभव असलेला असेल तर त्याचे मत वाचायला आवडेल !
जर तो पुरुष असेल तर एकदा हा अनुभव घेतल्यावर त्याची प्रत्येक स्त्रीकडे बघण्याची नजर बदलली आहे का?
20 Aug 2014 - 4:15 pm | टवाळ कार्टा
लोल...खुपच अपेक्शा ठेवता ;)
22 Aug 2014 - 12:48 pm | तुमचा अभिषेक
माझा अनुभव असता तर केला असता शेअर, पण साले आपल्या मराठी मिडलक्लास लोकांचे गटस इथेही कमी पडतात .. आपली धाव फ्लर्टींग पर्यंतच .. कुठलाही स्टँड घ्यायचा म्हटले की आपण मागे हटतो.
20 Aug 2014 - 6:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे
Quora.com वर विचारा.
22 Aug 2014 - 12:06 am | अविनाशकुलकर्णी
डोळे
लाजभरे,सलज्ज नेत्रपल्लवि विसरु लागले डोळे
का आता सावजे, हेरु लागले तुझे धिट डोळे
अंगभर पदर,किति गोड विनयी होति देहबोली
ढाळुन पदर,दाखवित उरोज,खुणवु लागले डोळे
तो भाव प्रेम समर्पणाचा,विसरले तुझे डोळे
सार शरीर आता ,ओरबाडु लागले तुझे डोळे
सात जन्माची सोबत कशी विसरले .तुझे डोळे
रात्र भर पुरे सोबत ,का म्हणु लागले तुझे डोळे
avinash
22 Aug 2014 - 12:39 pm | मदनबाण
नारायण ! नारायण ! घोर कलियुग आलयं हो ! असं म्हणुन मी माझे १८ शब्द संपवतो ! ;)
बाकी चालु ध्या.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis
23 Aug 2014 - 6:35 pm | धन्या
यावरून दैत्य जालंदर, त्याची पत्नी वृंदा, भगवान विष्णूंची "युक्ती", तुलसी विवाह असं बरंच काही वाचलेलं आठवलं.
22 Aug 2014 - 3:49 pm | पैसा
हुच्चभ्रू लोकांमधे हॉटेल्समधे एस्कॉर्ट्स, कॉल गर्ल्स यांना बोलावले जाते. त्याला बहुधा वन नाईट स्टँड म्हणतात. तसेच ट्रक ड्रायव्हर वेश्येकडे जातात, बलात्कारी लोक सावज हेरून बलात्कार करतात. हा पण वन नाईट स्टँड म्हणायचा का? त्यांच्यासाठी ती शारीरिक गरज असते. भावनिक गुंतवणूक शून्य. यातला एकजण पैसे देतो, दुसरा देत नाही. एवढाच फरक. कॉल गर्ल्स आणि रस्त्यावरच्या वेश्या यांच्यात तात्त्विकदृष्ट्या काय फरक आहे?
22 Aug 2014 - 4:50 pm | लंबूटांग
वेश्या आणि कॉलगर्ल्स या पैशाच्या बदल्यात तुम्हाला शरीरसुख देतात. त्यांना संभोगाची इच्छा नसली तरीही. त्यांच्यासाठी तो केवळ एक व्यवसायाचा भाग असतो. त्यातून त्यांना सुख मिळत नसावे. (मी कधी गेलेलो नाही पण काही डॉक्युमेन्ट्रीज आणि वाचनातून असे वाटते) One night stand मधे दोघांनाही शरीरसुख हवे आहे आणि ते राजीखुशीने एकमेकांना देतात. बळजबरी नसते.
पैसा नसला आणि कोणी राजी होत नसताना केलेला संभोग म्हणजे बलात्कार. या न्यायाने बर्याचदा लग्न झालेल्या जोडप्यांमधेही बलात्कार होतच असतात.
22 Aug 2014 - 5:53 pm | शिद
ज्या व्यक्तीला (स्त्री अथवा पुरूष) हे प्रकरण जमतं, झेपतं वा निस्तरता येतं त्यानं ते करावं.
बाकीच्यांनी ह्या फंदात पडू नये. सोप्पयं.
22 Aug 2014 - 5:59 pm | प्यारे१
७ 'दिवस' झाले, 'वन नाईट' स्टॅण्ड सुरु आहे....
करा, अजून चर्चा करा!
23 Aug 2014 - 10:59 am | संजय क्षीरसागर
धाग्याची वास्तुशांत झालेली दिसतेयं.
सं.मं.चे तहे-दिलसे आभार!
23 Aug 2014 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की.......
भारतीय समाजव्यवस्थेत अनेक गोष्टी आल्या आणि गेल्या ज्या उत्तम होत्या त्या टीकल्या आणि काही काळानंतर काही नवीन बदल झाले असतील जे टीकणारे नव्हते ते सर्व कालौघात विरुनही गेले. समाजात स्त्री-पुरुषाचे संबंध स्वेच्छाचाराचे आणि अनिर्बंध अशा स्वरुपाचे होते असे म्हणतात. वैदिक वाड्मयात असे उल्लेख नाही म्हणतात परंतु त्या पूर्वी असा समाज होता. अदिपर्वात ''पंडु राजा कुंतीला म्हणतो की पूर्वयुगात स्त्रीया कोणाच्या बंधनात नसत, त्या इच्छेला येईल त्याप्रमाणे वर्तन करत करीत, एका पुरुषाचा त्याग करुन दुसर्याच्या मागे जात आणि अशी स्थिती पंडूच्या वेळेला सुद्धा उत्तर कुरुक्षेत्रात होती'' म्हणजे असा समाज कधीतरी इथे होता. अशा समाजाला नियमने करण्याची कोणाला तरी गरज पडली त्यांनी कारण सांगतांना मनुष्याला 'देवप्रित्यर्थ यज्ञ' करता यावा आणि 'संतती उत्पत्तीसाठी' विवाह केला पाहिजे असे एक निमित्त केले आणि पुधे विवाह सुरु झाले. विवाहाचा हेतु सांगतांना धार्मिक कृत्य दोघांनी मिळुन केली पाहिजेत, असे नियम घातले हेतु एकच होता की पतीपत्नी यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांची सोबत करावी. पुढे विवाहाचे प्रकार सांगितले तो आपला विषय नाही. पण स्वैराचाराला नियमन आवश्यक म्हणुन समाजाने विवाह ही संस्था निर्माण केली.
वन नाइट स्टँडच्या बाबतीत फ्रॉइडच्या मनाच्या विश्लेषणाच्या विचार केला पाहिजे तो म्हणतो की 'मानवाच्या अतृप्त आशा आकांशा , वासना या अचेतन मनात सुस्थितीत असतात आणि संधी मिळताच त्या प्रकट होत असतात'' वन नाईट वाला मग 'तो' असो की 'ती' असो संधी मिळाली की ती प्रत्यक्ष येणारच. माणसाला संगीत आवडतं, चित्रपट पाहावे वाटतात प्रत्येकाची अभिरुची वेगवेगळी असते तेव्हा प्रत्येकच वन नाईट...ला जाणार नाही. पण समाजशास्त्राचा अभ्यासक स्ट्राँग असे म्हणतो की ''आवडी मधे सुखाची भावना असते व ती प्राप्त करण्यासाठी काहीतरी करण्याची गतिशील प्रवृत्ती असते'' अशी ही माणसं आपलं क्षणिक आवड जोपासण्यासाठी वन नाईटला सामोरं जातात.
काही प्रतिसादात उल्लेख आला तसं म्हणता येईल की आज वन नाईट स्टँडला विरोध करण्याचं कारण नाही असे म्हणु पण सुरक्षितता पाळुनही काही जोखीम उचलायची ठरली तर त्याचे परिणाम उचलण्याची क्षमता 'त्या' किंवा 'ती'मधे असते का, तर नसते असं मला वाटतं. आज लेखातली दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करुन राहिले आहेत पण चटक लागली तर आयुष्यात त्याचे परिणाम सध्याच्या समाजहिताच्या दृष्टीने व्यभिचाराचे असे ठरेल असे वाटते. आणि एकदा की एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयाची चटक लागली की मग त्यातुन सुटका नाही. उदा. म्हणुन ज्याने अगदी मद्याचा छोटा पहिला पेग रिचवला असेल आणि आज तो नियमित एक क्वॉर्टरवर आला असेल त्याला आज पिणं सोडायचं असेल तर तो ते सोडु शकत नाही. कमी करतो म्हणेल प्रमाण पण सोडतो असे होणार नाही, अर्थात अपवाद आहेतच. खुप घेत होता पण आज एक थेंब घेत नाही, ही उदाहरणे आपल्या आजुबाजुला असतात. वन नाईट वाल्यांनी भरपूर मजा करुन घेतल्यानंतर आयुष्यभर आपल्या सहकार्याशी ते एकनिष्ठ राहात असतील तर चांगलीच गोष्ट. पण सवयीला माणसाचा दुय्यम स्वभाव असे समजल्या जाते. ही सवय केव्हा वर उफाळुन येईल याची काही शाश्वती नसते. सवय माणसाच्या भल्याबुर्या वर्तनाला वळन देत असते आणि एकदा जडलेली सवय लवकर नष्ट होत नसते. माणुस सवयीचा गुलाम होऊन बसतो.
समाजशास्त्रात सामाजिक संस्थांच्या जवाबदारीत विवाहाबद्द्ल बरेच लिहिल्या गेले आहे. कोणत्याही समाजात स्त्री पुरुषांनी अविवाहित राहणे कमीपणाचे लक्षण मानले गेले आहे. आता त्या विषयात फारसा दम उरलेला नसला तरी विवाहबाह्य संबंधाने जन्माला आलेल्या संततीबाबत प्रत्येक समाज हा नाखूश दिसतो. आपल्याच समाजव्यवस्थेत समुह संबंध, समुह विवाह संबंध, नावाचा प्रकार पूर्वी होता. समूह विवाह प्रकारात स्त्रीयांचा एक समूह पुरुषांच्या दुसर्या समुहाशी विवाह करतो. या विवाह प्रकारात स्त्री-पुरुषात समूहातील कोणत्याही स्त्री पुरुषाबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची अनुमती असते. स्त्री समूहातील प्रत्येक स्त्री-पुरुष हे सर्वांचेच समाईक पती-पत्नी असतात. समाजशास्त्राचे अभ्यासक असे म्हणतात की या प्रकारात पालनपोषणाची जवाबदारी नव्हती आणि म्हणुनच एक एकविवाह पद्धतीत पुढे पत्नीबरोबरच्या संबंधात नुसते लैंगिक संबंध नव्हे तर तिच्यापासून होणा-या संततीची जवाबदारी स्वखुशीने व जाणीवपूर्वक स्वीकारली गेली. वन नाईट स्टँडनमधे अपघाताने निर्माण झालेली संततीची जवाबदारी कोणीच घेणार नाही.
शब्दप्रयोगाबद्द्ल मला क्षमा करा पण अशा स्त्रीयांना वेश्या का म्हणु नये. म्हणजे उच्चभ्रू वर्गातील असतील म्हणुन त्यांना काही म्हणायचे नाही. आणि इतर स्त्रीया लैंगिक संबंधाच्या बदल्यात मोबदला मिळवितात म्हणुन त्यांना तसा शब्द वापरला पाहिजे, असं काही असतं का..! म्हणजे पुरुष असे करत असतील तर त्यांनाही काही एक शब्द असायलाच हवा होता ज्यामुळे पुरुष नावाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असता, परंतु पुरुषसत्ताक पद्धतीने पुरुषांच्या प्रतिष्ठेला धक्का बसणारं काही आलं नाही. स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू म्हणुन तिच्याकडे पाहिलं गेलं तिला दुय्यम स्थान दिलं म्हणुन पुरुषांनी काही केलं तरी चालतं स्त्रीयांनी मात्र नियमने पाळली पाहिजेत असं ते झालं.
पारंपरिक समाजजीवनात विवाहाकडे बघण्याचा दृष्टीकोन पवित्र असा होता. अपरिचित दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र येतात म्हणजे परमेश्वराचा आशिर्वाद समजल्या जायचा. विवाह एक धार्मिक बंधन होते, असे हे धार्मिक बंधने तोडणे पाप होते. अर्थात आता पाप पुण्य, धार्मिक बंधन,परमेश्वराचा आशिर्वाद नसला तरी विवाहाच्या निमित्ताने एक सुरक्षितता स्त्रीला लाभत होती, समजल्या जात होती. अर्थात अशा विवाह झालेल्या स्त्री पुरुषांचे विवाह होऊनही सर्वच बाबतीत समाधान झाले असे म्हणता येणार नाही, ती काहींच्या बाबतीत अॅडजेसमेंट होती आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसेल म्हणुन अनेकांनी अनेक गोष्टी केवळ समाजातील नियमने म्हणुन सहन केल्या यात पुरुषाची आणि स्त्रीचीही ससेहोलपट झालीच झाली.
आधुनिक जीवनात स्त्री-पुरुष समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे आणि विविध सुख सवलतींमुळे स्त्री पुरुषांच्या बरोबरीने घराबाहेर पडली. शिक्षण,राजकारण,मनोरंजन, नोकरी, कार्यालये इथे काम करता करता कामाच्या ठिकाणी आणि इतरत्र सहकार्याबरोबर भेटण्याच्या प्रमाण वाढले. शब्दातून प्रेम व्यक्त होऊ लागले. चित्रपट, भेटीगाठी, पार्ट्या, सहली यामुळे स्त्री पुरुष जवळ येऊ लागल्याने त्यांच्यातला संकोच कमी झाला आणि आपला प्रवास वन नाईट स्टँडकडे सुरु झाला. विवाह बाह्य किंवा विवाह्पूर्व लैंगिक संबंध बरे किंवा वाईट याचा विचार करण्याची परिस्थिती संपल्यात जमा आहे. पुरुषाला जसे अनेक स्त्रीयांबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची अनुमती होती तशी स्त्रीलाही आता प्राप्त झाली आहे, नितीमत्ता, चारित्र्य, पाप-पुण्य चांगले वाईट ही सर्व मुल्य कोणी कोणाला सांगायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरुषांचा अहंभाव व वर्चस्व स्त्रीला असह्य झालं आणि ती मो़कळी झाली. पण परपुरुषाच्या संबंधाने निर्माण होणारी चिंता भिती ही आयुष्याच्या कोणत्याही क्षणी संघर्षाला कारणीभूत ठरणार आहे, याचाही विसर पडत चाललेला आहे. व्यक्तीगत जीवनावर होणारा परिणाम, कुटुंब विघटन, समाजात होणारी बदनामी. समाजाची अशा स्त्री-पुरुषांकडे पाहण्याची दृष्टी (आज पुरुषाला कोणी काही म्हणनार नाही) पण त्या स्त्रीकडे अनेकांच्या वळलेल्या नजरा, यामुळे ना ती कुटुंबात सुखी राहील ना वन नाईट मुळे सुखी राहील. समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या मतानुसार 'कुटुंबाचे अस्तित्व लवकरच संपुष्टात येईल तर काहींना वाटते की अपत्यप्रेमाची भावना स्त्री पुरुषात राहील तो पर्यंत कुटुंब नावाच्या व्यवस्थेला कोणताच धोका राहणार नाही. अर्थात आज ज्याची कुटुंबव्यवस्था स्थिर आहे त्यांच्या कुटुंबात अशी मुलं मुली असण्याची शक्यता कमीच, जिथे कोणाचं नियंत्रण नाही तिथे अशी शक्यता बळावेल असे वाटते. अर्थात जे येईल ते कसं असेल याची कल्पना आज तरी नाही, पण योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव त्याही पिढीला असावी, अशा अपेक्षेशिवाय आपण दुसरं तरी काय करु शकतो.
अधिक वाचनासाठी :
१) सामाजिक संस्था- डॉ.दा.धो.काचोळे. कैलाश पब्लिकेशन, औरंगपुरा औरंगाबाद.
२) सामाजिक समस्या आणि सामाजिक मानसशास्त्र -डॉ.दा.धो.काचोळे. कैलाश पब्लिकेशन, औरंगपुरा औरंगाबाद.
३) सामाजिक व्यवस्था व सामाजिक परिवर्तने- प्रा.जे.पी करवा. विद्या बुक्स पब्लिशर्स. औरंगाबाद.
-दिलीप बिरुटे
24 Aug 2014 - 9:39 am | पिंपातला उंदीर
@दिलीप बिरुटे प्रतिसाद आवडला