१. "मिपा" हे नाव झणझणीत पणा मुळे पडले आणि मिसळ व पाव एकञ येउन " मिसळपाव".
२. काथ्याकूट हा खेळ मिपावर उदयास आला.
३. कोडाईकनाल, कृष्णमूर्ती आणि गरम पाण्याचे कुंड हे मिसळपाव वरील 'जे न देखे रवि' ह्या काव्य विभागात निर्माण झाले.
४. 'टेम्पोत बसवणे, चपला घालणे' वगैरे वाक्प्रचार मिसळपाव वर सुरु झाले.
५. जगातलं पहिलं धागा विश्लेषण वर मिसळपाव वर सुरु झालं. ४३४ प्रतिसादांच्या एका धाग्यापासुन आदूबाळ ह्यांनी त्याचं विश्लेषण केलं गेलं.
६. आजची खादाडी हा खेळ श्री विसोबा खेचर (तात्या) यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव आजची बायडी आहे. त्यामध्ये खादाडीचा उपयोग केलातर पोटोबाचे समाधान होत असे असा समज असे. बाकीचे इतर वेगळे गैरसमज असत.
७. जगामधले सर्वात तज्ज्ञ लोकांचे व्यासपीठ मिसळपाव येथे आहे. ते प्रत्येकाच्या तळपायाच्या सपाटि करुन ३५९ ते ४५९ मिमी एवढ्या उंचीवर आहे.
८. २००७ साली मिपा सुरु झाले. हे जगातील सर्वात मोठे ड्यु आयडी केंद्र असल्याचा दावा ड्यु आयडींच्या ड्यु आयडींकडून केला जातो.
९. कंपूबाजी आणि फाट्यावर मारणे ह्या कला मिपावरच जन्माला आली.
१०. २००७ ते आजतागायत हा मिपा हे एकमेव संस्थळ आहे जिथे की जिथे वेगवेगळे 'हिरे, मोती, माणकं' सापडतात.
(खाणीत आहेत, शोधावे लागतील)
प्रतिक्रिया
16 Aug 2014 - 10:07 pm | एकुलता एक डॉन
टिकलेले आनि व्यवसथित चालु असे एकमेव हे एकाच आहे
16 Aug 2014 - 10:22 pm | आदूबाळ
०. मिपावर मोजी लिहितात
16 Aug 2014 - 10:48 pm | पोटे
मिपा सुंदर आहे
16 Aug 2014 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा
खच्चून विडंबन पडणे..हे ही १ मि.पा.चे(च ;) ) वैशेष्ठ्य आहे!
18 Aug 2014 - 3:17 pm | प्रभाकर पेठकर
' वैशेष्ठ्य' हा विशिष्ट नविन शब्द आवडला.
16 Aug 2014 - 11:32 pm | मुक्त विहारि
मिपा नं.१
17 Aug 2014 - 1:32 am | प्रभाकर पेठकर
विडंबन आवडले.
17 Aug 2014 - 1:46 am | सोत्रि
फक्त १०?
यो तो बहुत नाइन्साफी हय!
-(इन्साफपसंद) सोकाजी
17 Aug 2014 - 4:20 pm | प्यारे१
आमची पेरणा
http://misalpav.com/node/28542
17 Aug 2014 - 4:15 am | खटपट्या
"मी पयला" हा प्रकार मिपावर सुरु झालाय.
17 Aug 2014 - 8:00 am | स्पंदना
मी"पयला" हा प्रकार मिपावर पयला सुरु झाला!!
17 Aug 2014 - 10:52 am | खटपट्या
बरोबर !!!!
17 Aug 2014 - 8:02 am | स्पंदना
चोप्य पेस्त, रच्यकन, कृ.ह.घे.
हे अन असे बरेच शब्द ही मिपाची देण आहे.
सतिश भौंची कविता ही मिपाची नवकाव्याची पायाभुत देणगी आहे.
18 Aug 2014 - 3:01 pm | सूड
चोप्य्-पस्ते हो...
17 Aug 2014 - 8:14 am | अजया
नुसते पाकृृचे फोटू पाहुन वारणारे,खपणारे मिपाकर आणि तसल्या कातिल पाकृृ देणारे अट्टल शेफही मिपाकर!
17 Aug 2014 - 9:24 am | चौकटराजा
१. मिसळपावाकडे बघताना कधी एकदा पावाचा पहिला तुकडा रश्श्यात बुडवून तोंडात भरतो असे होते.
२.मिसळ पावात उसळ कोणती असेल मटकीची वाटण्याची की बिरड्याची याची एका नजरेत खात्री होते.
३.काही वेळेस तर्रीचा तवंग यकदम मखमाली दिसला तरी रश्यात थोडासा गूळ घातला असेल तर " आरतिच्यायला , बामणी मिसळ दिसतीय " असा प्रेमभंग झालेला दिसतो.
४. मिसळपावात शीत सम व उष्ण रंगस़ंगति दिसते तवंग, पावाचा करपलेला भाग ही उष्ण तर शेव फरसाण ई सम तर कोथिंबीर शीत रंगसंगति दर्शविते.
५.मिसळ पाव हा आनंदाचा ठेवा असला तरी काही लोकाना कोल्हापुरी मिसळ हा कोठ्स्तापाचा ( मनस्ताप या धर्तीवर ) विषय होउन शकतो.
६.मिसळपाव खाण्यास जर चार पाच जण जमले व त्यातले काही अध्यात्मवादी असले तर पुणेरी, कोल्हापुरी, पनवेल कुठली मिसळ बेस्ट व कुठली केवळ वेस्ट यावर हमरीतुमरीने वाद होतात.इतके की एखादा म्हणतो " गाढवाला मिसळीची चव काय ? तुम्हाला काय कळते मिसळीतले ई. ई
७.काही लोकं विदा देण्यात पटाईत ( सराईत ???) असतात. ते निरनिराळ्या ठिकाणच्या मिसळीतील पदार्थांचे विश्लेषण ग्राफ टाकून करतात.काही मिसळीच्या खपाचे आकडे एक्सेल वापरून देतात.
८. काही लोकाना मिसळीच्या इतिहासात रस असतो. सातवाहन काळातील एखादी दगडी बशी आढळली तर हे लोक त्यावेळी त्यावरून त्याकाळी मिसळीत चिकनचे तुकडे टाकीत असावेत की नाही यावर अचूक अंदाज व्यक्त करतात.तर्दुअरे तर कंबोडियात आजही एका वेगळया प्रकारची मांसाहारी मिसळ मिळते अशी म्हाईती देतात.
९.मिसळीचा रस्सा तयार करायचा गॅस काही कारणाने संपला तर दरम्यान मिसळीचे शौकिन तात्पुरता वडा पाव खातात. ( बाहेर जाउन )पण जरा अस्वस्थतेच. कारण मिसळवाला जादा बसायला वेळ देतो तसे वडवाला देईलच असे नाही.
१०.कप बशांचे आवाज , चर्चांचे आवाज सारे काहीसे गोंगाटाचे असले तरी तर्रीचा मोह काही संपत नाही पाय पुनपुन्हा हाटेलाकडे वळतात. कधी स्वत: चे पैसे खर्च करून तर कधी हपिसातील व्हाव्हचर चोरून वापरून .
17 Aug 2014 - 4:10 pm | कलंत्री
मराठी भाषेतील आदराचे आणि आवडीचे असलेले संस्थळ म्हणूनच मिपाचा उल्लेख करावा लागेल. पूर्वी मी बर्यापैकी मिपावर असे. अनेक विषय, चर्चा आणि वाद-संवाद मिपावर झडताना पाहिले. वार-प्रहार आणि हार याचाही आनंद घेतला. कधीकधी मुखवटेही वापरले. मिपाला माझ्या भावविश्वात एक वेगळेच स्थान आहे.
आता जेंव्हाही वेळ मिळतो किंवा मिळवतो तेंव्हा मिपावर यावेसे वाटतेच वाटते.
तात्या आणि निलकांत यांनी मिपा निर्माण केले आणि वाढवले असे म्हणता येइल.
17 Aug 2014 - 7:26 pm | अविनाशकुलकर्णी
ज्या समुहात आपल्या पोस्ट्स व लाईकक्स ला सकारात्मक प्रतिसाद मिळतो त्या समुहात सभासद रमतो...
मिसळपाव ची एक खास खासियत आहे...
माझे अनेक धागे उडवले जातात.. तरी मला मी.पा समुह आवडतो..
प्रेम तु़झ्यावर करतो मी रे..लव्ह यु
इथे हिरे व हिराबाई दोनहि आहेत
17 Aug 2014 - 11:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>>माझे अनेक धागे उडवले जातात.. तरी मला मी.पा समुह आवडतो..
प्रेम तु़झ्यावर करतो मी रे..लव्ह यु
हाहा हे आवडलं ! :)
-दिलीप बिरुटे
18 Aug 2014 - 10:33 am | सस्नेह
लेखाइतकेच कधीकधी लेखापेक्षाही ,प्रतिसाद जास्त अभ्यासपूर्ण अन वाचनीय असतात.
18 Aug 2014 - 11:05 am | सुहास..
आणि सल्लापुर्ण ही ;)
18 Aug 2014 - 12:18 pm | प्यारे१
आणि मापं काढणारे ही!
18 Aug 2014 - 12:19 pm | सुहास..
आणि विशेष टिप्पणी करणारे ही ;)
18 Aug 2014 - 2:02 pm | स्पंदना
आणि खरडुन खरुज काढणारेही :)
18 Aug 2014 - 8:13 pm | सुहास..
आणि पुरुषांच्या मंगळागौरपुर्ती सकट संपादकीय दडपशाहीपुर्ती करणारे ही ;)
18 Aug 2014 - 2:13 pm | पैसा
प्यारेबुवा, एक विसरलात. ज्यांना मिपा अधिकृतपणे आवडत नै त्यांच्या ल्यापटोपावर पण सबंध दिवस मिपा उघडून ठेवलेलं असतं आणि मिपा बंद पडतं तेव्हा ही मंडळी सगळ्यात जास्त अस्वस्थ होतात.
18 Aug 2014 - 2:22 pm | प्यारे१
आमचा तेवडा आब्ब्यास नाई. ;)
18 Aug 2014 - 3:03 pm | सूड
मिपावर ह भ प प्यारेमहाराज वाईकर आहेत!!
18 Aug 2014 - 3:12 pm | गवि
त्या देवमाणूस प्यारेला किती शिव्या देशील मेल्या ..?!
18 Aug 2014 - 6:14 pm | सूड
देवमाणूस वाचूनच चचल्या गेले आहे. ;)
18 Aug 2014 - 6:30 pm | प्यारे१
वशाड मेलो.
कधी नाय ते कोण तरी कवतुक करतंय तर पोटात दुखलं मेल्याच्या. ;)
म्हणा हो गवि तुम्ही. =))
18 Aug 2014 - 6:30 pm | स्पंदना
मरलस मेल्या???
*biggrin*
18 Aug 2014 - 9:36 pm | सस्नेह
आणि इथे सगळे 'मेले' पुन्हा पुन्हा मरत असतात...
18 Aug 2014 - 9:36 pm | सस्नेह
आणि इथे सगळे 'मेले' पुन्हा पुन्हा मरत असतात...
18 Aug 2014 - 3:12 pm | प्यारे१
http://misalpav.com/comment/603669#comment-603669
18 Aug 2014 - 3:16 pm | कैलासवासी सोन्याबापु
नवीनच झालोय अॅक्टीव इथे!!! बरंय रेडी रेकनर हाताशीच सापडला :biggrin:
18 Aug 2014 - 3:47 pm | आदूबाळ
रेडी रेकनर? फायनान्समधले काहो तुम्ही बापूसाहेब?
18 Aug 2014 - 3:59 pm | कैलासवासी सोन्याबापु
नाही सरकार, मी केंद्रसरकारात बाबुगिरी करतो, "लायझन ऑफिसर " असे दणदणीत नाव धारण करुन शेवटी खर्डेघाशी!!!! (आपण वझ्याचे बैल आहोत हे कबुल करुन टाकावे कसे:) )
18 Aug 2014 - 5:46 pm | भाते
मिपा कट्टा! कुठल्याही वेळी / ठिकाणी होणारे, कितीही वेळ चालणारे मिपाकरांचे कट्टे आणि त्यानंतर त्याचा सचित्र वृत्तांत. खादाडीचे फोटो अत्यावश्यक!
भटकंती! एक्का काका आणि 'इतर' यांच्याकडुन टाकलेल्या जग सफरीची सचित्र माहिती.
पाककृती! विकांताला स्वत: च्या घरी प्रयोग करून सोमवारी सकाळी टाकण्यात येणारे पाकृचे सचित्र धागे!
18 Aug 2014 - 6:03 pm | स्पंदना
आणि एक च्या पासन शेंबडा पत्तोर कुटल्याबी इशयावर हित्त घसरुन पडेस्तोवर कुटाकुट चालती.
आणि आणि येक...बॅचलर पाकृ नावाचा नवा परकार हित्त जनमला आणि खपला बी.
(आता हे "खपला" ...आणि ओंकारेश्वरी तिचे दहन झाले....च्या तालात वाचा न्हायतर ....चालुन जातो.... अस्स वाचा. आमची कायबी हरकत न्हाय)
18 Aug 2014 - 8:21 pm | माम्लेदारचा पन्खा
कधी कधी असं वाटतं की खरच ह्यांना काही दुसरा पोटापाण्याचा उद्योग नसावा… (ह. घ्या)