===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
...जेराशमध्ये फिरताना देहभान विसरायला झाले. पण तरीही उन्हे उतरू लागली आणि थकलेले पाय हॉटेलवर परतण्यासाठी गाडीकडे निघाले.
तिसरा दिवस जरा लवकरच उजाडला. कारण आज अम्मान सोडून दक्षिणेच्या दिशेने चारचाकीचा ३००-३५० किमी प्रवास करायचा होता आणि तेही वाटेतली पर्यटक ठिकाणे पाहत पाहत. अर्थातच सगळ्यांनी भरपेट न्याहारी केली आणि बाहेर पडलो.
जॉर्डनमधिल जमीन बहुतांशी वाळवंटी असली तरी आजच्या आमच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऑलिव्हची लागवड दिसत होती...
ऑलिव्हची शेती : ०१
.
ऑलिव्हची शेती : ०२
हा भाग त्याच्या ऑलिव्ह आणि ऑलिव्ह तेलासाठी प्रसिद्ध आहे. या जॉर्डनच्या नगदी पिकांमुळे (कॅश क्रॉप) तेथे आलेल्या समृद्धीची जाहिरात रस्ताभर विखुरलेली सधन शेतकर्यांची घरे करत होती...
ऑलिव्ह शेती करणार्या सधन शेतकर्याचे घर : ०१
.
ऑलिव्ह शेती करणार्या सधन शेतकर्याचे घर : ०२
मात्र काही वेळातच गाडी नेबो पर्वताच्या डोंगराळ भागात शिरली आणि नजरेच्या टप्प्याच्या पलिकडेपर्यंत दूरवर पसरलेला वाळवंटी भाग दिसू लागला...
नेबो पर्ततावरून दिसणारा वाळवंटी परिसर
नेबो पर्वत (Mount Nebo)
तसं पाहिलं तर नेबो हा काही फार उंच पर्वत नाही. पण ८१७ मीटर उंचीच्या या पर्वताला त्याच्या धार्मिक आणि ऐतिहासिक भूतकाळामुळे अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. हाच तो पर्वत ज्याच्यावरून मोझेसला शब्द दिलेली पवित्र जमीन (प्रॉमिस्ड होली लँड, ज्याला सर्वसाधारणपणे आधुनिक इझ्रेल असे संबोधले जाते) दाखवली गेली असा बायबलमध्ये उल्लेख आहे. या पर्वतावरून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दर्शन होते. त्यात पवित्र जमिनीबरोबरच, उत्तरेकडील जॉर्डन नदीच्या खोर्याचा काही भाग, इझ्रेलमधिल जेरिको शहर आणि जर आकाश निरभ्र असले तर जेरुसलेम शहराचेही दर्शन होते.
जेरिको शहर इझ्रेलमध्ये असल्याने त्याला जरी आपण भेट देणार नसलो तरी त्या शहराची काही वैशिष्ट्ये जाणून घेणे मनोरंजक ठरेल
१. हे शहर समुद्रसपाटीपेक्षा २५० मीटर खाली आहे. या प्रकारे हे जगात सर्वात खालच्या स्तरावर वसलेले शहर आहे.
२. १०,००० वर्षांपूर्वीचे मानवी वस्तीचे अवशेष सापडल्यामुळे हे जगातील सर्वात जुने शहर समजले जाते.
३. तेथे असलेल्या अनेक प्राचीन आणि धार्मिक अवशेषांमुळे ते एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. त्यातली काही महत्त्वाची अशी आहेत जिझस ख्राईस्टचा बॅप्टिझम जेथे केला गेला तो जॉर्डन नदीचा भाग, टेम्प्टेशन पर्वत, एलिशा झरा, सायक्यामोअर वृक्ष, सेंट जॉर्जचे थडगे, इ.
Book of Deuteronomy प्रमाणे मोझेसने नेबो पर्वतावरून इझ्रेलचे दर्शन घेतले पण त्याचे पाय त्या जमिनीला लागू शकले नाहीत. तेथे जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या पुस्तकाप्रमाणे तेथून जवळच मोआबच्या दरीत त्याचे दफन केले गेले. दोन वेगवेगळ्या जागांवर त्याचे थडगे असल्याचे दावे आहेत, पण नक्की सत्य काय ते कोणालाच माहीत नाही. काही विद्वानांच्या मते तर हा पर्वत Deuteronomy मध्ये उल्लेखलेला नेबो पर्वत नाही.
चला तर अश्या काहीश्या वादग्रस्त पण तरीही बरेचसे प्राचीन आणि धार्मिक महत्त्व असलेल्या नेबो पर्वतावर. हे पवित्र स्थान असल्याने, गाडी धार्मिक आवाराच्या बाहेर उभी करून अर्धा अधिक डोंगर पायी चढून जावा लागतो.
चढण पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पोप जॉन पॉल दुसरा याच्या इ स २००० मधील भेटीच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा दिसते...
पोप जॉन पॉल दुसरा याच्या भेटीच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा
त्यानंतर इ स २००९ मध्ये पोप बेनेडिक्ट सोळावा यानेही या जागेला भेट देऊन तेथे एक भाषण केले होते.
थोडे पुढे गेल्यावर मोझेसच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा दिसते...
मोझेसच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा
इ स १९३३ मध्ये पर्वतमाथ्यावर एका बायझांटाईन चर्च आणि मोनास्टरीचे अवशेष सापडले. हे चर्च सर्वप्रथम चवथ्या शतकाच्या उत्तरार्धात मोझेसच्या मृत्यूच्या जागेवरचे स्मारक म्हणून बांधले गेले. त्याचा पाचव्या आणि परत सहाव्या शतकात विस्तार केला गेला. सद्याच्या चर्चची नवीन इमारत जुन्या अवशेषांचे संरक्षण होईल अश्या रितीने नव्याने बांधलेली आहे.
बायझांटाईन चर्च
.
उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून बनवलेली बायझांटाईन चर्चची प्रतिमा
या चर्चची खासियत तेथे असलेल्या कलापूर्ण प्राचीन मोझेईक कलाकृतींचे अवशेष आहेत...
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०१
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०२
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०३
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०४
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०५
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०६
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०७ : लेख
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०८ : लेख
.
बायझांटाईन चर्च : ०९ : प्राचीन काळातील मातीची भांडी
.
बायझांटाईन चर्च : १० : प्राचीन काळातील मातीची भांडी
.
चर्चला वळसा घालून पलीकडे गेल्यावर आपण परिसराचे दर्शन घेण्यासाठी बनवलेल्या एका सापटीवर जातो. तेथे गिओवान्नी फान्तोनी (Giovanni Fantoni) नावाच्या इटालियन कलाकाराने बनवलेले Brazen Serpent Monument नावाचे आधुनिक शिल्प आहे. या शिल्पात कलाकाराने मोझेसने चमत्काराने निर्माण केलेल्या सापाचा आणि जिझसच्या क्रुसाचा प्रतिकात्मक उपयोग केलेला आहे...
Brazen Serpent Monument
.
आम्ही गेलो तेव्हा (सप्टेंबर २०१०) तेथे सापडलेल्या अवशेषांसाठी पर्वतमाथ्याच्या एका टोकावर भलेमोठे संग्रहालय बांधले जात होते. आतापर्यंत कदाचित ते पूर्णही झाले असेल...
मध्यपूर्वेत स्थापना झालेल्या दोन मोठ्या धर्मांच्या सुरुवातीच्या काळाशी संबद्ध असल्याचा दावा असलेल्या ठिकाणाची आणि तेथील अवशेषांची ओळख बरोबर घेऊन आमचा प्रवास पुढच्या आकर्षणाच्या दिशेने सुरू झाला.
(क्रमशः )
===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
14 Aug 2014 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा
रोचक..रोचक..सुंदर..सुंदर..!
14 Aug 2014 - 11:34 pm | राघवेंद्र
सुंदर आणि माहिती पुर्ण ओळ्ख. धन्यवाद.
15 Aug 2014 - 2:48 am | खटपट्या
सर्व चित्रे खूप छान.
Brazen Serpent Monument हे सद्याच्या एम बी बी एस डॉक्टरांच्या लोगो सारखे वाटतेय
15 Aug 2014 - 9:33 am | प्रचेतस
हा भागही मस्तच.
मोझेसच्या स्मरणार्थ चर्च ही संकल्पना समजली नाही. मोझेस हा मुख्यतः ज्यूंचा प्रेषित ना? मग सिनेगॉग का नाही?
मोझेस हा तिन्ही ग्रांथिक धर्मांमध्ये पूर्व प्रेषित म्हणून मानला जातो पण क्रिस्टियनांमध्ये त्याचे इतके स्थान असेल हे माहित नव्हते.
15 Aug 2014 - 2:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
अॅडम, अब्राहम आणि मोझेस या तिघांना ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांत मानले जाते. मध्य्पूर्वेत उगम पावलेले हे तीन धर्म अब्राहामीक धर्म समजले जातात.
अजून काही रोचक माहिती :
OLD TESTAMENT GENERATIONS LISTED ADAM TO MOSES
Pentateuch Charts List : The Generations before Moses
Adam : lived 930 years, died 216 yrs. before the birth of Noah
Seth : Adam's 3rd son, lived 912 years. Seth knew Noah for 34 years before he died
Methuselah : 4th great grandson of Seth, lived 969 years, Methuselah knew Adam 243 years*, Methuselah knew Seth 355 years
Lemech : son of Methuselah, lived 777 years (died before his father), he is the father of Noah, died 5 years before the flood
Noah : lived 950 years
Methuselah : knew Noah 600 years and died the year of the flood; Talked with his father, Lemech 595 years
Shem : son of Noah (father of all Semites), lived 600 years, talked with Methuselah 98 years*, lived after the flood 502 years
Eber or Heber : great-grandson of Shem, lived 464 years, knew both Noah and Shem
Terah : 3 x great grandson of Eber, lived 205 years, 130 yrs old when Abraham is born, talked with both Noah and Shem
Abraham (Abram son of Terah) : lived 175 years, Abraham knew Shem son of Noah 150 years
Noah : died 2 yrs. before Abraham was born
Heber : outlives Abraham by 4 years
Isaac (son of Abraham and Sarah) : lived 180 years, knew Shem (son of Noah) 50 years*
Jacob (called Israel and son of Isaac and father of the 12 tribes) : lived 147 years
knew Abraham 20 years
Levi (3rd oldest son of Israel – Jacob) : knew Isaac about 45 years*, knew Amran father of Moses who was his grandson*, great grandfather of Moses
Levi : passed on the oral history to his grandson Amran*
Moses (son of Amran son of Kohath son of Levi) : Lived 120 years, brother of Aaron who knew their father approx. 65 years*, Moses receives the Oral Tradition from God and is commanded to write the first 5 books of the Old Testament.
(Michal Hunt Copyright © 1991 Agape Bible Study. Permissions All Rights Reserved.)
15 Aug 2014 - 2:53 pm | शिद
रोचक माहीती. ख्रिश्चनांच्या ह्या पुरातन वास्तू (खुणा) जॉर्डनसारख्या मुस्लिम देशात अजुन टिकून कश्या आहेत ह्याचं राहून राहून आश्चर्य वाटतंय. मागच्या भागातील ग्रीक्/रोमन वास्तूबद्दल देखील तेच.
+१
15 Aug 2014 - 5:01 pm | पालव
माहिती पुर्ण ओळ्ख. धन्यवाद.....
15 Aug 2014 - 9:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
अत्रुप्त आत्मा, राघव८२, खटपट्या, शिद आणि पालव : अनेक धन्यवाद !
16 Aug 2014 - 9:47 am | नेत्रेश
सुंदर छायाचित्रे आणी मस्तच प्रवास वर्णन.
>> चलनी शेतकी उत्पादनामुळे (कॅश क्रॉप)
कॅश क्रॉप = नगदी पीके
16 Aug 2014 - 11:28 am | डॉ सुहास म्हात्रे
खरंच की ! नगदी पिके हा नेहमीचा शब्दप्रयोग पटकन आठवला नाही. दुरुस्ती केली आहे.
16 Aug 2014 - 12:55 pm | स्पंदना
मोझॅक आवडले. सुंदरच!!
16 Aug 2014 - 1:06 pm | प्यारे१
डिट्टो डिट्टो.
अल्जिरियामध्ये सुद्धा सगळं असंच नि हेच म्हणण्याइतपत आहे. मोझाईक मधली नक्षी, अवशेष असेच दिसतात.
मागच्या लेखात आपण म्हटल्याप्रमाणं रोमन साम्राज्य ह्या भागात होतंच.
वाखाणण्यासारखं 'निसर्गसौंदर्य' जॉर्डन मध्ये देखील असंच आहे का ते ठाऊक नाही. :)
16 Aug 2014 - 1:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरं तर आपण आपल्या अलिकडच्या जगाच्या आकलनामुळे युरोप आणि उत्तर अफ्रिकेला वेगळे समजतो. प्राचीन काळापासून भूमध्य समुद्राच्या युरोपियन आणि आफ्रिकन किनार्यांवर पसरलेली तीन मोठी साम्राज्ये होऊन गेली. त्यामुळे सहाजीकच सुपीक चंद्रकोर, युरोपचा दक्षिण किनारा आणि अफ्रिकेचा उत्तर किनारा त्या साम्राज्यांच्या (ग्रीको-रोमन) अवशेषांनी भरलेले आहेत.
त्या साम्राज्यांचा पसारा असलेले नकाशे पाहून नीट कल्पना येईल...
१. कार्थेज साम्राज्य (इ स पूर्व ६५० ते इ स पूर्व १४६)
.
२. (पश्चिम) रोमन साम्राज्य (इ स पूर्व २७ ते इ स ४७६)
.
३. बायझांटाईन (पूर्व रोमन) साम्राज्य (इ स ३३० ते इ स १४५३)
(सर्व नकाशे जालावरून साभार)
16 Aug 2014 - 1:52 pm | कवितानागेश
ते मोर काय सुंदर आहेत. :)
त्या भागात पूर्वी मोर होते का? अजूनही शिल्लक आहेत का?
17 Aug 2014 - 12:37 pm | उपाशी बोका
नेहमीप्रमाणेच सुरेख माहिती आणि फोटो. मोझेईक कलाकृती मस्तच आहे, विशेषतः मोराचे चित्र बघून आश्चर्य वाटले.
सुंदर लेख. अजून येऊ दे.
17 Aug 2014 - 7:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
aparna akshay, लीमाउजेट आणि उपाशी बोका : धन्यवाद !
@ लीमाउजेट आणि उपाशी बोका:
प्राचीन काळी येथिल भूभाग हिरवागार, समृद्ध आणि सुपीक होता आणि म्हणूनच तेथे प्रथम मानवी संस्कृती उदयाला आली असे समजले जाते. म्हणूनच त्याला "सुपीक चंद्रकोर (fertile crescent)" या नावाने ओळखले जाते.
केवळ मोरच नव्हे तर या पाणथळ आणि हिरव्यागार भूमीवर अनेक प्राणी, पक्षी आणि वनस्पती होत्या. माणसाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि सामरिक प्रगतीत उपयोगी आलेल्या (माणसाळवलेल्या) प्राणी व वनस्पतींच्या पूर्वज प्रजातींपैकी बहुसंख्य (जवळ जवळ ७५% पेक्षा जास्त) सुपीक चंद्रकोरीच्या भूभागात आस्तित्वात होत्या.
येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.
17 Aug 2014 - 9:06 pm | एस
वाट पाहत आहे. कुणीतरी कुठेतरी म्हटल्याचं आठवतंय, "आधी जंगले असतात. मग मानवी संस्कृती येते. शेवटी उरते वाळवंट."
23 Aug 2014 - 11:42 am | पैसा
एका नव्या जगाची ओळख करून देत आहात. समृद्ध इतिहास असला तरी हा सगळा भाग म्हणजे आता फक्त धर्मवेड्या लोकांचा वैराण प्रदेश असंच आतापर्यंत वाटत होतं.
24 Aug 2014 - 12:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !