पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
दारास भास आता, हळूवार पावलांचा
गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा
झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा
पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा
गीतः-सौमित्र
================
आज अगदी दुपारपासून ह्या वरच्या गीतातल्या सगळ्या भाव भावना,मानाचा अगदी छळ करत आहेत.
दोन वर्षापूर्वी नविन गाडी घेतल्याची हौस म्हणण्यापेक्षा,पावसातला शांत गझल ऐकत फिरायचा आनंद अता कार मुळे आणखि स्वस्थ चित्तानी लुटता येणार..यासाठी,मन कुठे जाऊ? कुठे जाऊ? करत होतं. पण मी पहिली नवी बाइक घेतली तेंव्हाही प्रथम गेलो,ते माझं जिवापाड प्रेम असलेल्या गावी,म्हणजे माझ्या अजोळीच.हरिहरेश्वरला! तेच मनात आलं आणि आषाढात सुरवातीलाच प्रचंड कोसळत असलेल्या पावसात,नवी गाडी आणि काही महिन्यांपूर्वीच घेतलेला नवा कॅमेरा,आवडत्या मराठी/हिंदी/ऊर्दू गीत गझलांनी भरलेला पेनड्राइव्ह...आणि आतल्या व बाहेरच्या पावसाची भेट घडवायला आसुसलेलं मन घेऊन..एका सकाळी निघालो. ताम्हाणिचा घाट नेहमीप्रमाणे चिंब होताच..
पण मला का कोण जाणे त्या ट्रीपमधे ताम्हिणीतलं आकर्षण फार वाटलं नाही. कारण मन कोकणातली लालमातिची भिजून चिंब झालेली घरं..कौलांपुढे लावलेल्या झावळ्यांवरून टपटपणारे पावसाचे चमकदार आणि टप्पोरे थेंब..
दाट भिजलेली नारळी/पोफळीची झाडं...
आणि नारळी पोफळीच्या नाकावर टिच्चून भिजलेली आणि पहिल्यापासून मला मनमोहक वाटणारी
ही केळ...!
आणि काहिशी गूढ वाटणारी कोकमाची झाडं! ही पुढची स्वप्न पहात होतं. या आषाढातही हाच सगळा बेत मनात होता,पण...यावेळी त्याच्यासह सारच हुकलं!..आणि अत्ता तो तसाच बरसून माझ्या मनाची वाट लावतोय.म्हणजे मी इथे आहे तो शरिरानी.मनानी गेला अठवडाभर तिकडेच जगतोय! अत्ता अतिबेचैन व्हायला लागलं आणि मग मनात ठरवलं ..हा सगळा पाऊस इथे सगळ्यां बरोबर वाटुन टाकू...आज आभाळ अगदी स्वच्छ झालं पाहिजे.कोरडेपणा येण्यापेक्षा ते बरं अगदी!
कोकणातला पाऊस ..मुरतो..उरतो..आणि सर्वत्र यथेच्छ दिसत रहातो अगदी!
१)
२)ही पावसानी निवळलेली वाडी..मंजे आमच्या रायगडी बोलीनुसार-
"पावसानी मंजे यंदा शाप धुऊन टाकलान् अग्दी!
३)रस्ता सुद्धा तीच साक्ष देतो!
४)आणि विहिरी...त्या काय मागे रहाणार होय!?
अंतर्बाह्य खूण पटवतात अगदी!
५) ही फुलं ही पावसाळी..? की पावसानी फुललेली..? माहित नाही. पण मन अगदी गा.........र करुन टाकतात.
६) अगदी शेतांच्या मधून जाणारी पायवाट सुद्धा ओहोळाचं रूप घेते..
७) भातशेतं आणि डांबरी रस्त्याच्या मधले हे खळगे..छोट्या मोहक तळ्यात बदलून जातात.
८) आणि नदीबाय तर भलतीच फुगते! एरवी आमच्या इकडे नदी..मंजे.."छ्छे..मेल्या ओहोळ सुद्दा नाय हो तो बारका..सा!
या नदी तळ्यांसह..नारळपोफळी....आणि माज्या लाडक्या केळीबाय सह
वाडीविहिरीबरोबरचा..घराच्या कौलांवरून सरळ मनात ओघळणारा तो पाऊस..
मी एकट्यानी भरपूर म्हणजे अगदी भरपूर अंगावर घेतला.. २/३ दिवस चिंब होऊन..नंतर माझ्या लाडक्या मामाच्या घराचा आणि विशेषतः माझ्या मनाचा भाग असलेल्या त्या सार्या परिसराचा
काहिश्या सुखद आणि जड मनानी निरोप घेऊन मी निघालो...ते पुन्हा माझ्या मूळपदावर.. पुण्याला यायला..
=======================०००००००००००००००००००००००००००००००००=======================
प्रतिक्रिया
1 Aug 2014 - 10:05 pm | धन्या
सुंदर !!!
माझं कोकणातील बालपण नजरेसमोर उभं राहीलं.
2 Aug 2014 - 10:28 am | चौकटराजा
माझं आणि इथल्या मिपावरच्या न भागलेल्या इतर काकांचं म्हातार पण नजरेसमोर आलं !
1 Aug 2014 - 10:15 pm | तुमचा अभिषेक
मस्तच आत्माराव, नेलेत पार कोकणात, डोळे हिरवेगार आणि जीव थंडगार करून टाकलात.
कोकणातल्या हिरवळीतील टवटवीतपणा आणखी कुठे नाही. कुठल्याही दिशेने चौफेर कॅमेरा फिरवा डोळ्यांना लुभावणारेच त्यात टिपले जाणार. आपण मात्र छानच टिपलेय आणि अंगणातल्या तुळशीशिवाय सेट पुर्ण होणार नव्हताच.
1 Aug 2014 - 10:15 pm | मुक्त विहारि
पुढचा कट्टा बुवांच्या आजोळी (हरिहरेश्वरला) करू या का?
1 Aug 2014 - 10:20 pm | प्रचेतस
मी ही भिजतोय.
घाटमाथ्यावरचा पाऊस कित्येकदा झेललाय. गणतीच नाही. पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.
1 Aug 2014 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा
@पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.>>> आता यंदा नवरात्र झालं ,की पाऊस असला नसला तरिही आपली १ ट्रीप नक्की...भटकू फिरु..मु.वि.म्हणतात तो कट्टाही करु.
मु.वि.- याल ना हो!? :)
2 Aug 2014 - 12:59 am | मुक्त विहारि
की बुवांच्या बरोबर फेरफटका नक्की...
1 Aug 2014 - 10:29 pm | रेवती
सुरेख आहेत फोटू आणि लेखन. अनन्याची आठवण आली.
मनात आलं की कोकणात जाता आलं पाहिजे.
1 Aug 2014 - 10:34 pm | मधुरा देशपांडे
सुंदर.
2 Aug 2014 - 12:11 am | भिंगरी
अगदी स्वतः पावसात, कोंकणात जाऊन आल्यासारखे वाटले.
2 Aug 2014 - 12:20 am | सखी
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच, नशिबवान आहात.
2 Aug 2014 - 12:47 am | बहुगुणी
(नवीन गाडीबद्दल अभिनंदन!)
2 Aug 2014 - 12:57 am | अत्रुप्त आत्मा
@(नवीन गाडीबद्दल अभिनंदन!) >>> अहो..ते आत्त्ता नाय..२ वर्षापूर्वीचं सांगताना सांगितलय.
गाडी झाली आता २ वर्षाची!
2 Aug 2014 - 1:47 am | आनन्दिता
गाडी दोन वर्षाची झाल्याबद्दल अभिनंदन! *biggrin*
2 Aug 2014 - 3:56 am | बहुगुणी
अहो हो, ते वाचलं धाग्यात, पण इथे तुम्ही आता सांगितलं ना, म्हणून आता अभिनंदन. आणि तसंही अभिनंदन काय केंव्हाही स्वीकारता येतं, आता आनन्दिता म्हणतात तसं दोन वर्षांचं म्हणून माना, हाकानाका :-) बाकी फोटो बाकी मस्त आलेत.
2 Aug 2014 - 7:02 am | अत्रुप्त आत्मा
@गाडी दोन वर्षाची झाल्याबद्दल अभिनंदन! >>> दुष्ष्ष्ष्ट! :-/
2 Aug 2014 - 3:27 pm | शशिकांत ओक
कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे....
जाता जाता... दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.
2 Aug 2014 - 2:15 am | खटपट्या
सर्व फोटो छान !
तीन नंबर ची विहीर खूप आवडली !!
पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.
2 Aug 2014 - 7:21 am | अजया
सुरेख! हिरवाई बघुन डोळे निवले.आहेच आमचा भाग हिरवागार,त्यात पावसाळ्यात तर अधिकच देखणा!!
2 Aug 2014 - 8:52 am | प्रचेतस
ते मंदिर आणि पुष्करिणीचे फोटो आहेत ते दिवेआगरच्या आमच्या लाडक्या रूपनारायण मंदिराच्या नुकत्याच झालेल्या जीर्णोद्धाराचे आहेत ना. :)
3 Aug 2014 - 1:06 am | अत्रुप्त आत्मा
वल्ली
@लाडक्या रूपनारायण मंदिराच्या नुकत्याच झालेल्या जीर्णोद्धाराचे आहेत ना.>>> होय. तेच ते.
2 Aug 2014 - 9:01 am | किसन शिंदे
फार सुंदर फोटो आहेत हो बुवा सगळे. यंदाच्या श्रावणात जातोय कोकणात....तिथला पाऊस अनुभवायला! :)
2 Aug 2014 - 10:38 am | ज्ञानोबाचे पैजार
सुंदरच फोटो आहेत सगळे,
आपल कोकण आहेच मुळी देखण
पैजारबुवा,
2 Aug 2014 - 10:39 am | नानासाहेब नेफळे
आत्मुबाबा एकदम भारी वृत्तांत आणि फोटो.
रायगडची कोस्टल लाईन रत्नागिरी सिंधुदुर्गपेक्षा 'प्रेक्षणीय' आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.
2 Aug 2014 - 10:43 am | रुमानी
पाउस म्हणटल कि अलगद ओठावर येते हे गान...:)
गीत, फोटो , कोकणातली हिरवाई व पाउस....सगळेच अप्रतिम...!
2 Aug 2014 - 10:44 am | कविता१९७८
मस्तच
2 Aug 2014 - 10:48 am | psajid
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच
2 Aug 2014 - 10:54 am | फिझा
फ़ोटो सगळे अगदी मस्त !!!
पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?
2 Aug 2014 - 12:08 pm | सस्नेह
'ओल्या हळुवार ' कोकण दर्शनाने ड्वाले भिजून चिंब झाले..
2 Aug 2014 - 12:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोकण, धो धो पाउस आणि हिरवागार परिसर ! मनाने कोकणाची एक मस्त सफर घडवलीत !! त्यात हरिहरेश्वर सारखे आवडते ठिकाण... म्हणजे सोन्याहून पिवळे !!!
पहिला, दुसरा आणि "३)रस्ता सुद्धा तीच साक्ष देतो!" ही छायाचित्रे खास आवडली !
2 Aug 2014 - 12:59 pm | अनुप ढेरे
कविता आणि फोटो दोन्ही सुंदर!
2 Aug 2014 - 1:15 pm | माधुरी विनायक
पाऊस कोसळू लागला की मन कोकणाकडे धाव घेऊ लागतं. आम्हीही लवकरच पोहोचू कोकणात प्रत्यक्ष... तोपर्यंत मात्र तुम्ही टिपलेलं कोकण पुन्ह-पुन्हा बघत राहणार...
2 Aug 2014 - 1:19 pm | संजय क्षीरसागर
उबदार वातावरणात, पाऊस फक्त पाहायला आणि ऐकायला आवडतो, तुमच्यामुळे ती संधी मिळाली. धन्यवाद!
2 Aug 2014 - 4:45 pm | स्पा
अप्रतीम फोटो
एकच नंबर. __/\__
घर, विहिर ,कुंड,शेतं कचकाउन आलेत फोटो, क्या बात
2 Aug 2014 - 5:30 pm | प्यारे१
नखशिखांत चिंब भिजलो. ___/\___
धन्यवाद बुवा!
2 Aug 2014 - 7:38 pm | प्रभाकर पेठकर
मस्त छायाचित्र आणि मनःकथन.
पुढच्या महिन्यात एखादी भारतभेट घडवून आणावी असा विचार आहे. पाहूया स्वप्नपूर्ती होते का.
2 Aug 2014 - 7:57 pm | पद्मश्री चित्रे
सुंदर फोटो आणि मन:पूर्वक केलेली भटकंती आवडली. मन आणि डोळे तृप्त झाले....
2 Aug 2014 - 10:10 pm | सुधीर
सुंदर फोटो आणि वर्णन!
कोकणातला पाऊस ..मुरतो..उरतो..आणि सर्वत्र यथेच्छ दिसत रहातो अगदी!
मस्तच!
2 Aug 2014 - 10:40 pm | पैसा
छान लिहिलंत आणि फोटोतही सगळीकडे हिरवा रंग बघून शांत वाटलं. हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!
2 Aug 2014 - 11:18 pm | रेवती
पुन्हा चित्रे बघून गेले.
3 Aug 2014 - 12:56 am | अत्रुप्त आत्मा
१)शशिकांत ओक
@कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे....>>> ही अतृप्ती गोड आहे..कारण, ती मूळची ओढ आहे! :)
@दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.>>> अरेच्चा! असंही असतं होय यातलं अंत-स्थ साध्य...!? कळ्ळच नै आधी मला. *blum3* नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. ;)
=============
२)खटपट्या
@पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.>>> क्रमवारीत बरोबर आहे. पण आमच्याकडे (रायगड जिल्ह्यात तरी) मी रातांब्याचं झाड असं कधिही ऐकलेलं नाही. कोकमाचं झाड-असच म्हणतात.
ती मांजर गेली..ब..कोकमावर
यंदा..कोकमं उतरली का नाय अजून!? असं उल्लेखातून आणि इतर प्रकारेही "कोकमाचं झाड" असच ऐकलेलं आहे.
=================
३)फिझा
@पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?>>> होय. सुपारिचीच.
==================
४)पैसा
@हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!>>> येस्स!!!
3 Aug 2014 - 12:16 pm | शशिकांत ओक
प्रिय आत्मन्
*angel* असे म्हणतात - विवाहोत्तर काली फक्त राजाराणीचे फोटो काढले जातात... तोवर मिपा कट्टेकरींबरोबर किंवा रम्य ठिकाणांचे फोटो काढत बसायची वेळ म्हणून आली नाsssss... पटकन सिंहगड रस्त्यावरील वडगाव उपनगरीय क्षेत्रातील आपल्या स्वतःच्या मालकीच्या भव्य फ्लॅटमधील गिटारसम वाद्यासह वा पेंटींग काढताना असे स्टाईलिश कपड्यातील ग़ॉगलवाले स्नॅप्स, नंतर सराईपणे हीरो होंडा वरून जातानचा फक्कड फोटू टाका... *nea*
*fool* म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील... *man_in_love*
...'लग्नाच्या बेडी' मधील 5 विवाह केलेल्या गोकर्ण अन् अविवाहित घोड नवऱ्या अवधूतांच्या नाटकीय संवादाचा 'स्वप्नीय' संदर्भ...
3 Aug 2014 - 1:05 pm | अत्रुप्त आत्मा
@म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील>>>. पैसा/प्रतिष्ठा/पद यांचे काळाप्रमाणे बदललेले संदर्भ लक्षात आलेले दिसत नाहित अजून तुंम्हाला! असो! ;)
...'लग्नाच्या बाजारातील'' ५० नकार पचविलेल्या आत्मू अँड आत्मू आत्म लिमिटेड कंपनीच्या प्रत्यक्ष संवादांचा 'खरा' संदर्भ... :p
3 Aug 2014 - 1:18 am | बॅटमॅन
आई शप्पथ!!!!!!!!!!!!!
लयच हिरवेगार अन ओले मस्त फटू. बघतानाच चिंब भिजून गेलो. काञ मस्त आलेत सगळे, व्वा!!!
3 Aug 2014 - 5:01 pm | मदनबाण
मस्त... :)
ते कुंड कसल आहे ? त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }
3 Aug 2014 - 8:53 pm | अत्रुप्त आत्मा
@ते कुंड कसल आहे ? >>> दिवेआगर>>> रुपनारायण मंदिर>>> समोरची उघड विहिर(बारव)
@त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. >>> असावं. आमाले रानफुलातलं कै बी कळत न्हाय.
3 Aug 2014 - 8:57 pm | धन्या
तेरडाच आहे तो.
3 Aug 2014 - 8:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
होय. तो "तेरड्याचा रंग तीन दिवस" मधला तेरडाच आहे :)
3 Aug 2014 - 5:31 pm | चित्रगुप्त
हिरवाई बघून डोळे निमाले. मस्त.
3 Aug 2014 - 9:08 pm | यशोधरा
देवळातल्या पुष्करिणीचा फोटो जाम आवडलाय :)
ऋतू बरवा, ऋतू हिरवा ची आठवण झाली..
4 Aug 2014 - 11:50 am | एस
लेख आवडला. फोटो आणि वर्णन दोन्ही छान!
4 Aug 2014 - 12:16 pm | शरभ
छान. तुमचे सगळेच फोटो लय भारी.
4 Aug 2014 - 12:27 pm | वटवट
व्वा… व्वा … व्वा… अप्रतिम प्रची आणि वर्णन पण…!!
4 Aug 2014 - 12:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तच.. *ok*
4 Aug 2014 - 12:42 pm | सविता००१
सुरेखच. सगळे फोटो तर फर्मास आहेत
7 Aug 2014 - 6:12 pm | शिद
कोकणातील हिरवाई पाहून मन मस्त गारेगार झालं. मस्त आले आहेत सगळे फोटो.
8 Aug 2014 - 1:08 am | मराठे
रिफ्रेशींग कोकण
8 Aug 2014 - 1:15 am | श्रीरंग_जोशी
पावसातले कोकण दर्शन खूप आवडले.
12 Aug 2014 - 5:03 pm | नाखु
बहुरंगी आत्मुदा..
(कोकण)सह्लीत आम्हाला सामील केल्याब्द्दल मंड्ळ आभारी आहे.
घाटावरचा (ना.खु)