मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
प्रतिक्रिया
24 Jul 2014 - 4:38 pm | धन्या
या गोष्टी इतक्या सहजासहजी कळत नाहीत. आणि तुम्हाला समजावण्याईतकी माझी कुवतही नाही. मला स्वतःला समजलेलंच अजूनही "इंटलेक्च्युअल" पातळीवर आहे. ते ज्या दिवशी "इंटर्नलाईज्ड" होऊन मी स्वतःच जेव्हा शांतीस्वरुप होईन तेव्हा कदाचित समजावू शकेनही.
अर्थात तुम्हालाही हे सारं माझ्यासारखंच इंटलेक्च्युअल पातळीवर समजून घ्यायचं असेल तर मी मागच्या दोन वर्षांत वाचलेल्या दिड-दोनशे मानसशास्त्रावरच्या पुस्तकांची यादी देतो. वाचा.
24 Jul 2014 - 4:40 pm | स्पा
तुम्हालाही अनुभव नाही म्हणता
ब्वोर्र
मग वर पलीकडील अनुभव नसलेल्या मंडळींवर का चढताय
त्यांनीही दीड दोनशे ग्रंथ वाचलेलेच आहेत कि
24 Jul 2014 - 4:46 pm | धन्या
हा तुमच्या मनाचा भ्रम आहे. इथे कुणी चढत नाही. चर्चा चालू आहे इथे. सार्वजनिक मंचावर भाषा जरा जपून वापरावी. :)
24 Jul 2014 - 4:47 pm | स्पा
हाहा
मूळ मुद्द्याला उत्तम बगल
24 Jul 2014 - 4:55 pm | धन्या
अगदी अनुभव नसला तरी अनुभवाची पूर्वतयारी नक्कीच झाली आहे. माणूस एका रात्रीत आपल्या सार्या निरर्थक गोष्टी सोडू शकत नाही. ती प्रक्रिया असते.
24 Jul 2014 - 4:57 pm | प्यारे१
हार्दिक शुभेच्छा हो साहेब!
सत्यान्वेषण झालंच पाहिजे. :)
24 Jul 2014 - 5:14 pm | प्रसाद गोडबोले
धन्या , काय काय झालं पाहिजे ह्याची लिस्ट वाढतच चालील्ये राव ... आधी फक्त समष्टी होती आता सत्यान्वेषण पण नवीन अॅड झालय ... *pleasantry*
24 Jul 2014 - 5:16 pm | धन्या
आम्हा घरी धन | शब्दांचीच रत्ने ||
24 Jul 2014 - 4:58 pm | स्पा
कसली प्रक्रीया
आम्हाला पण सांगा की, आम्ही पण सोडु निरर्थक गोष्टी. हो त्या गोष्टींची लिस्ट पण द्या
24 Jul 2014 - 5:02 pm | धन्या
मला जे म्हणायचं आहे ते मी वरच्या तीन चार प्रतिसादांत म्हटलं आहे. यापेक्षा अधिक फोड करुन सांगण्यास मी असमर्थ आहे.
मी म्हटल्याप्रमाणे पुस्तकांची यादी मात्र नक्की व्यनी करु शकेन.
24 Jul 2014 - 5:00 pm | स्पा
@ अनुभवाची पूर्वतयारी नक्कीच झाली आहे.
हाहा लईच मजेदार वाक्य सोडता हो तुम्ही
24 Jul 2014 - 5:04 pm | धन्या
तुम्हाला माझं वाक्य मजेदार वाटू शकतं. एखाद्या घटनेकडे, व्यक्तीकडे, वाक्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यक्तीगणिक बदलू शकतो.
24 Jul 2014 - 7:39 pm | कवितानागेश
अगदी अनुभव नसला तरी अनुभवाची पूर्वतयारी नक्कीच झाली आहे.>>
ऑल द बेस्ट धन्या!
.
.
.
.
(अवांतरः धन्या कायम नास्तिक रहावा अशी जगन्नियन्त्याकडे कळकळीची प्रार्थना)
24 Jul 2014 - 4:42 pm | प्यारे१
:)
वाक्यं बहुतांश सारखीच. चालायचंच.
24 Jul 2014 - 4:56 pm | स्पा
ज्याप्रमाणे तुम्ही दुसर्यांच्या मोठ्ठ्या मोठ्ठ्या शब्द वापरण्यावरुन टर उडवताय, अनुभव नाही सांगताय, तुमची स्थिती काही वेगळी नाही, दिडशे पुस्तकांच्या भांडवलावर तुम्ही चर्चेचे गुर्हाळ मांडुन बसला आहात, अनुभव काहीच नाही, नुसतेच फुकाचे शब्द.
:-D
24 Jul 2014 - 5:05 pm | धन्या
हरकत नाही. तसं तर तसं.
24 Jul 2014 - 5:08 pm | स्पा
धन्यवाद :-D
24 Jul 2014 - 4:42 pm | सूड
मला वाटतं शांती ही बोडणात ठेवलेल्या अन्नपूर्णेप्रमाणे असते. आपणच ती परातीत ठेवतो, आपणच तिच्यावर आपल्या आशा, आकांक्षा, आनंद, दु:ख, चिंतांची पंचामृतं ओततो. ही पंचामृतं आणि भौतिक सुखाचे नैवेद्य आणि अलंकारासकट बोडण कालवून/कळवून झालं ही पुन्हा तीच अन्नपूर्णा त्यातून मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. असते डोळ्यासमोरच आपणच दडवतो आणि आपणच पुन्हा ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. (चू भू दे घे.)
इति लेखनसीमा॥
24 Jul 2014 - 4:44 pm | स्पा
सूडणीय :)
24 Jul 2014 - 5:16 pm | प्रसाद गोडबोले
=))
24 Jul 2014 - 4:45 pm | प्यारे१
धूल खुद हमी पे थी, हम शीशा साफ करते रहे!
24 Jul 2014 - 7:32 pm | कवितानागेश
आत्तापर्यंतची सगळी बोडणं आठवली रे.... =))
24 Jul 2014 - 4:37 pm | प्यारे१
मार्ग कुठलाही अवलंबला तरी हरकत नाही.
बाकी कुणाचंही नाव घेऊन नामस्मरणाचे फायदे मिळणं अशक्य आहे.
नाम हे ईश्वराचं, अवतारांचंच घ्यावं नि शक्यतो गुरुमुखातून आलेलं असावं असं शास्त्र आहे. (शास्त्र म्हणजे सायन्स नव्हे.)
कुणा अवतारावर आपली श्रद्धा नाही ही गडबड आहे, असते. असावी की नसावी हा वेगळा विषय आहे.
असो!
24 Jul 2014 - 4:40 pm | बॅटमॅन
एकदा अवतारावर श्रद्धा नसणे हीच गडबड म्हटल्यास असावी की नसावी हा वेगळा विषय जरी मानला तरी काय फायदा? अवतारावर श्रद्धा न ठेवणे ही गडबड कशी काय ते आम्हां पामरांना समजावून सांगा बघू हभप.
24 Jul 2014 - 4:43 pm | धन्या
वाल्या कोळ्याला मिळाले होते की. राम हे जरी देवाचे नांव असले तरी "मरा" हे देवाचं नांव नाही. तरीही त्याचा उद्धार झालाच की. आणि गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम जन्मलाही नव्हता.
24 Jul 2014 - 4:48 pm | शिद
एक शंका: राम जन्मा अगोदर पासूनच राम नामाला एवढे महत्व कसं काय? काही कळलं नाही. *unknw*
24 Jul 2014 - 4:50 pm | प्यारे१
त्याला अर्थवाद म्हणतात.
ह्याच्या बरोबरच अजामेळाचं उदाहरण देखील सांगितलं जातं.
देवाचिये द्वारी उभा 'क्षण' भरी हे देखील अर्थवादाचंच उदाहरण.
24 Jul 2014 - 4:51 pm | बॅटमॅन
हिंदू धर्मातील एका अतिमहत्त्वाच्या अवतारावर शंका घेता शिदराव? भाकडकथा सॉरी सॉरी पुराणं नै वाचत का ओ कंदी ;)
24 Jul 2014 - 4:55 pm | शिद
नाय ओ. पण मिपावरील अश्या चर्चा समजण्यासाठी आता बहूतेक सुरूवात करावी लागेल असं दिसतंय. :)
24 Jul 2014 - 4:57 pm | बॅटमॅन
अगदी अगदी. मीही सुरुवात करू म्हणतोय. सुदैवानं त्यात दोन्ही बाजूनं लोकं बोलतात त्यामुळे प्रवचनकारांप्रमाणे पाहिजे ते तुकडे उचलून लोकांच्या तोंडावर फेकावेत हे उत्तम ;)
24 Jul 2014 - 5:00 pm | प्यारे१
तुम्ही पण हवेतच गोळीबार करत होतात काय आधुनिकोत्तर बुवा?
24 Jul 2014 - 5:04 pm | बॅटमॅन
कसली हवा, कसली गोळी न कसला बार? सब भ्रम आहे. गीताप्रेसची पुस्तके वाचा, भ्रम दूर होईल. :)
24 Jul 2014 - 5:07 pm | प्यारे१
खरंच भ्रम दूर होतात. असो!
24 Jul 2014 - 5:10 pm | बॅटमॅन
चांगलंय की मग! गुड फॉर यू!
24 Jul 2014 - 5:17 pm | प्रसाद गोडबोले
नवीन इन्निंग सुरु झालीये का ....
मग .....मीपण मीपण ब्यॅटींग करणार *dance4*
24 Jul 2014 - 5:19 pm | बॅटमॅन
अर्रे बघतांय कांय, सामील व्हा!
24 Jul 2014 - 5:20 pm | प्यारे१
नक्कीच!
24 Jul 2014 - 5:12 pm | धन्या
हे म्हणजे आय. आय. टी. च्या संगणक विभाग प्रमुखाला एम. एस. सी. आय. टी. चं पुस्तक वाचा म्हणून सांगण्यासारखं झालं राव. :)
24 Jul 2014 - 5:19 pm | बॅटमॅन
होय, पण आमची लायकी किती अन आम्ही बोलावे किती याचा ताळमेळ पाहता शेवटी तेच बोललो झालं. :)
लहान तोंडी (कल्पनेनेच, कारण नैतर तोंड फाटून जाईल) मोठा घास घेऊन सांगतो, प्रस्थानत्रयी, त्यातही गीता आणि उपनिषदे मुळातून वाचली तर अतिउत्तम. आय आय टी वाल्यांना हे समजणे अवघड नसावेसे मानण्याचे धार्ष्ट्य करतो आहे.
24 Jul 2014 - 5:21 pm | प्यारे१
१००% सहमत!
त्यावरील शांकरभाष्य सुद्धा वाचावं.
24 Jul 2014 - 5:26 pm | प्रसाद गोडबोले
गीताप्रेसने शांकरभाष्य मराठीत अनुवादीत करुन छापलेले नाहीये ...किमान अजुन तरी ... आम्हाला हिंदीतच वाचावे लागते ... हा सरळ सरळ मराठी भाषिकांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे .... त्याचा आम्ही तीव्र शव्दात निषेध्द करतो *beee*
( ३ च राहिलेत रे ...४०० वा प्रतिसाद टंकायचा मान मला पाहिजेल यंदा )
24 Jul 2014 - 5:29 pm | बॅटमॅन
पण शांकरभाष्य अन्य प्रकाशनाने छापले असेलच की मराठीत, भागवत बुक डेपोमध्ये चौकशी केली पाहिजे अप्पा बळवंत चौकात.
24 Jul 2014 - 5:27 pm | बॅटमॅन
भाष्य इ. वाचलं तरी 'परमार्थेण न गृह्यतां वचः', कारण शेवटी आचार्यांचा अद्वैतमत प्रस्थापित करायचा अजेंडा होता. अजेंडाविरहित बुकं वाचणं हे सर्वोत्तम.
24 Jul 2014 - 5:32 pm | प्यारे१
अद्वैतमत बरोबरच आहे. पण ते फार वरचं टोक आहे.
बाकी ह्याच अजेंडा वाल्या शंकराचार्यांनी अत्यंत सुंदर भक्तिस्तोत्रं (द्वैतवादी?) रचली आहेत.
अर्थात सिस्टीमचा वापर करुन काम नाही झालं तर सिस्टीम फेल. काम झालं तरी नंतर सोडावीच लागणार. त्यामुळं सिस्टीमचं अवडंबर नको.
24 Jul 2014 - 5:34 pm | प्रसाद गोडबोले
सिस्टीमचं अवडंबर हे समष्टीच्या व्यामिश्रते इतकेच गहन असते *lol*
24 Jul 2014 - 5:46 pm | धन्या
म्हणजे काय हो?
24 Jul 2014 - 6:15 pm | बॅटमॅन
गुरुदेवांच्या 'इन ट्यून विथ द ट्यून' मध्ये याचं स्पष्टीकरण मिळेल. ;)
24 Jul 2014 - 6:17 pm | प्रसाद गोडबोले
तुम्ही आधी दासबोध वाचुन या मग तुम्हाला कळेल *biggrin*
24 Jul 2014 - 5:36 pm | बॅटमॅन
स्तोत्रे छानच आहेत याबद्दल शंका नाही. संस्कृतात यमक हा फंडा त्यांच्या सोडून अन्य कुणाच्या रचनेत असल्याचे आजवरच्या तुटपुंज्या वाचनातून दिसले नाही.
अद्वैतमताबद्दल ज्ञानेश्वरांची 'साडेपंधरेया-सोलेया' इ.इ. कमेंट मस्त आणि एकदम नेमकी आहे. ते एक असोच.
बाकी कोण कसलं अवडंबर माजवतंय ते स्वयंस्पष्ट आहेच.
24 Jul 2014 - 6:01 pm | प्यारे१
सिस्टीमला बळंच फेकून देणं हे 'नो सिस्टीम' च्या सिस्टीमचं एक अवडंबरच. :)
24 Jul 2014 - 6:14 pm | बॅटमॅन
सिस्टिमला बळंच फेकून देण्याची व्याख्या मनाप्रमाणे करणं हे तर सर्वांत मोठं अवडंबर. आपल्या मनी काहीएक सिस्टीम असावी, तीच लोकांनी फॉलो नै केली तर भ्यँऽऽऽ! करावे हे मोठेच अवडंबर. ज्यांना जमते त्यांचा हेवा वाटतो खरा. :)
24 Jul 2014 - 7:44 pm | प्यारे१
व्हेरीफाईड अॅण्ड टेस्टेड आहे हो ती. आमचा आग्रह नाही ब्वा!
ज्यांनी अनुभव घेतला त्यांचं म्हणणं आहे ते. ते वाचलं आहे का तुम्ही? समजून वाचा बरं. ;)
24 Jul 2014 - 7:48 pm | बॅटमॅन
सोयीस्कर समजुती करून घेण्याचा आग्रह बाकी हभप पणाला साजेसाच आहे हो ;)
24 Jul 2014 - 7:51 pm | प्यारे१
आधुनिकोत्तर बुवा, तुम्ही म्हणाल तसं. ;)
24 Jul 2014 - 7:57 pm | बॅटमॅन
ठीके इस्माईलभाई.
वो थोडा कोनों मे भी साफ करो यारो ;)
-बॅटमॅन फेकू.
24 Jul 2014 - 5:36 pm | प्रसाद गोडबोले
परमार्थेण न गृह्यतां वचः|
ह्या मंत्राचा अर्थ काय ?
24 Jul 2014 - 5:39 pm | बॅटमॅन
इथे अर्थ 'दिल पे मत ले', अर्थात, पूर्णपणे आहे तसे घ्यायचे कारण नै.
24 Jul 2014 - 5:29 pm | बॅटमॅन
४००!
24 Jul 2014 - 5:33 pm | सूड
४०१ !!
24 Jul 2014 - 6:07 pm | शिद
धागा ४२० पर्यंत तरी पोचलाच पाहीजे. ;)
24 Jul 2014 - 6:23 pm | पैसा
सगळ्या चर्चेचं सार थोडक्यात सांगा.
24 Jul 2014 - 6:33 pm | बॅटमॅन
24 Jul 2014 - 6:42 pm | प्यारे१
रसम, सार, सांबार... भात के साथ आहाहा!
24 Jul 2014 - 6:48 pm | बॅटमॅन
पैसा तै, हे घ्या वरील सगळ्या चर्चेचं सार.
24 Jul 2014 - 6:26 pm | यशोधरा
५०० वी प्रतिक्रिया मी टाकणारे. आधीच सांगून ठेवते.
आता सुरु र्हाऊंद्यात. पटापटा पोस्टा. ४९९ झाले की सांगा, येतेच.
24 Jul 2014 - 7:31 pm | बॅटमॅन
४०० आणि ४२० दोन्हींचा मान माझा! येऽऽऽ!
24 Jul 2014 - 7:36 pm | कवितानागेश
एकदा अनिल तापकीरांना भेटायला हवं. फार पुण्यवान आहेत ते. :)
24 Jul 2014 - 7:42 pm | प्यारे१
झालं.... जरा एखाद्याचं बरं झालेलं बघवत नाही ह्या लीमाऊला.
अज्जिबात भेटू नकोस. पुण्य घेऊन येशील त्यांचं सगळं.
नैसर्गिक नियमानुसार जिथं जे नाही तिथं ते येऊन समतोल साधण्याचा प्रयत्न होतो ना? ;)
24 Jul 2014 - 7:45 pm | कवितानागेश
..पण माझ्याकडे सगळंय. मला काहीच कमी पडत नाही. :)
24 Jul 2014 - 8:01 pm | कपिलमुनी
ऐतिहासिक धाग्यावर आमचीही पिंक ;)
24 Jul 2014 - 8:05 pm | बॅटमॅन
मंत्रावेगळा ळॉळ =))
या धाग्यावर ५०० झालेच पाहिजेत. संपादक मंडळी, प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज ब्रेकर नका ना लावू. मिपाच्या गौरवशाली इतिहासात आजवर एकही धागा पञ्चशतकी नै झालेला. तो बहुमान याला घेऊ द्या नं प्लीज! _/\_
24 Jul 2014 - 8:15 pm | शिद
आमेन! *biggrin*
24 Jul 2014 - 8:44 pm | संजय क्षीरसागर
पहिली गोष्ट, पिरा पूर्वग्रह सोडून वाचू शकली, त्यामुळे तिला नेमका मुद्दा उचलता आला.
पूर्वग्रहरहित चित्त हा आकलनातला प्रथम चरण आहे. नवी गोष्ट समजायला सर्व पूर्वधारणा सोडायची तयारी हवी, मग त्या कितीही जिवलग असोत आणि कितीही काळ जपलेल्या असोत.
पिरानं हा मुद्दा अचूक पकडला आहे :
ईश्वर ही प्रत्येकाची अज्ञानमूलक धारणा आहे आणि मंत्र किंवा जपानं त्याप्रत पोहोचू ही तिची उप-धारणा आहे. पहिली व्यर्थ आहे त्यामुळे दुसरीही व्यर्थ आहे.
पिराच्या जे लक्षात आलंय, तेच मी चर्चेतल्या प्रथम प्रतिसादात सांगितलं होतं:
आता जर कुणाला, अध्यात्म नक्की काय आहे समजावून घ्यायचं असेल तर माझा, लेखकाला दिलेला हा प्रतिसाद वाचा :
वरचा प्रतिसाद हे माझ्या अध्यात्मिक आकलनाचं सार आहे. ते तुम्हाला ही कळणं विषेश अवघड नाही. कारण ती अदिम शांतता आणि आपण एकच आहोत. शांतता एकच आणि अविभाज्य असल्यानं तिच्यासाठी प्रयत्न करणं हाच ती गवसण्यातला अडथळा आहे.
हे एकदा समजलं की मग तुम्ही देखिल तथाकथित देव, कर्मकांड, जपजाप्य यातून सर्वस्वी मोकळे होऊन स्वच्छंद जगू शकता. फक्त, पूर्वग्रह सोडून शांतपणे वाचता यायला हवं!
24 Jul 2014 - 8:59 pm | नानासाहेब नेफळे
+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००