मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
प्रतिक्रिया
22 Jul 2014 - 4:48 pm | टवाळ कार्टा
मी पावन होईन असे मी म्हणालोच नाहीये ;)
=))
22 Jul 2014 - 6:05 pm | llपुण्याचे पेशवेll
>> खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच भ्रमिष्ट झालेले दिसताय (कदाचित गेले वर्षभर अखंड केलेल्या "अरविंद" जपाचा परीणाम असावा व त्यातूनच भ्रामकता आली असावी). जप/नामस्मरण यांविषयी कणभरही माहिती किंवा अनुभव नसताना तुम्ही त्याविषयी अत्यंत चुकीच्या आणि भ्रामक कल्पना मनात घट्ट धरलेल्या आहेत आणि आपल्याच भ्रामक कल्पना हेच वैश्विक सत्य आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन त्या भ्रामक कल्पना ठामपणे मांडत आहात. पोहण्याचा अनुभव घेण्याकरीता किंवा पोहणे शिकण्याकरीता स्वतः पाण्यात उतरावे लागते. निव्वळ जिलब्या पाडण्याऐवजी काही दिवस स्वतः अनुभव घेऊन बघा आणि मग भाष्य करा. <<
सहमत. मस्तं. हेच म्हणायला आलो होतो.
20 Jul 2014 - 5:23 pm | मदनबाण
एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू शकता?
जिलबी बाबा गीता न वाचता त्या बद्धल बोलु शकण्याचा दावा करु शकतात, तर ते यावर सुद्धा ठामपणं सांगु शकतात ना ? ;)
मननेन त्रायते इति मन्त्रः - जो मनन करने पर त्राण दे वह मन्त्र है
ही व्याख्या / फोड खरी असेल तर मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं कसं होइल ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- En Uchimandai... :- Vettaikaran
20 Jul 2014 - 8:03 pm | संजय क्षीरसागर
फुल रजा घेऊन, फक्त एक दिवस, अॅटॅचड्य टॉयलेट असलेल्या, बंद खोलीत, जेवणासाठी सुद्धा बाहेर न येता, कोणत्याही एकच-एक मंत्राचं, सतत उच्चारण करुन पाहा. एका दिवसात डोकं भणभणून जाईल. (मध्यमा)
दुसर्या टप्प्यात, तीन दिवस फुल रजा घेऊन (बंद खोलीतून अजिबात बाहेर न येता) तो प्रयोग करुन पाहा. हळूहळू इतर सर्व विचार करण्याची क्षमता संपून मेंदू बधीर होऊन जाईल. (पश्यंती)
शेवटी, आठवडाभरची रजा, घेऊन त्याच बंद खोलीत, फुल्ल अनुष्ठान करा (परा!).
मग अजपा सुरु होईल. मनाची सगळी प्रक्रिया तुमच्या आवाक्या बाहेर जाईल. तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी जप थांबणार नाही.
Now the person has gone mad. He has lost control over his thinking process. He can't focus on anything because the mind inside constantly distracts him!
पब्लिक उगीच टाईमपास म्हणून वैखारी पुरतं मर्यादित आहे, त्यामुळे `जगी या खास वेड्यांचा पसारा दाटलेला' दिसत नाही इतकंच.
20 Jul 2014 - 9:42 pm | नानासाहेब नेफळे
खत्तरनाक अनुमोदन.
वेल सेड संजयभाऊ.
20 Jul 2014 - 9:50 pm | प्यारे१
अगागागागागा! कस्लं भारी! =))
वरच्या नामस्मरण/ जपाबद्दलच्या अत्यंत चुकीच्या कल्पना आहेत. असहमत आहोत. तरीही असो.
21 Jul 2014 - 10:45 am | मदनबाण
पब्लिक उगीच टाईमपास म्हणून वैखारी पुरतं मर्यादित आहे, त्यामुळे `जगी या खास वेड्यांचा पसारा दाटलेला' दिसत नाही इतकंच.
हॅ.हॅ.हॅ... माझ्या पहिल्या प्रतिसादात शेवटी कबिराचा दोहा दिला आहे तो परत एकदा वाचा...
त्याचा अर्थ हातात माळ ओढणे चालु आहे,तोंडाने जिभेवाटे नामस्मरण चालु आहे,पण मन मात्र चारही दिशेला भटकत आहे अशा वेळी भगवंताशी एकरुपता कशी साधता येइल ? अनेक संतांनी वैखरी हा निषिद्ध सांगितला आहे. बाकी तुम्ही फार छान कल्पक जिलबी पाडली आहे. ;)
जाता जाता :- अजपा साधना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा
21 Jul 2014 - 12:18 pm | संजय क्षीरसागर
प्रतिसादाची घाई करण्यापूर्वी नीट वाचत चला. यापूर्वीच्या प्रतिसादात आधीच सांगितलंय :
तरीही आपण दिव्यप्रभा प्रकट केली आहे :
वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात बाह्योच्चारण हा पहिला चरण वगळून) तुम्ही काय घंटा नामस्मरण करणार? मध्यमेला जायला वैखारी अनिवार्य आहे हे कळायला नामस्मरण करण्याची सुद्धा गरज नाही.
असो, तुमच्या फालतू लिंका वाचायला मला वेळ नाही. स्वतःचा अनुभव लिहा.
आणि खरंच प्रचिती घ्यायची असेल तर तुमचा प्रिय मंत्र `श्रीराम जयराम जयजय राम' मी सांगितलेल्या प्रक्रियेनं (किंवा तुमच्या अक्कलहुशारीनं) अजपा करुन दाखवा.
तेवढं झाल्यावर, माझा प्रतिसाद स्मरणात राहिला तर (कारण तदनंतर तुम्हाला सदासर्व काळ केवळ रामनामाचा जयघोषच ऐकू येईल आणि सगळीकडे भगवंतच दिसायला लागेल!)... इथे कळवा. तुम्ही असाल तिथे तुमच्या मुलाखतीची व्यवस्था करतो!
21 Jul 2014 - 12:42 pm | मदनबाण
वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात बाह्योच्चारण हा पहिला चरण वगळून) तुम्ही काय घंटा नामस्मरण करणार? मध्यमेला जायला वैखारी अनिवार्य आहे हे कळायला नामस्मरण करण्याची सुद्धा गरज नाही.
जिलबी बाबा चला तुम्हाला इतके समजले ही देखील मोठी गोष्ट आहे ! ;)
ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका.
अरे ? तुम्ही सगळच नाकारताय ! ज्यांनी ही शिकवणी अख्या जगताला दिली ते नक्की काय आणि का सांगताय ते पहायला नको ? अर्थात तुम्ही गीता न-वाचता त्या बद्धल बोलु शकण्याचा दावा करु शकतात तेव्हा प्रतिसाद सुद्धा नीट वाचत नसणार याची खात्री आहेच. ;)
तुमच्या फालतू लिंका वाचायला मला वेळ नाही. स्वतःचा अनुभव लिहा.
तुम्हाला काही वाचण्याचा आग्रह नाहीच आहे... ज्यांना त्यात रस आहे त्यांच्यासाठी ती लिंक आहे.तुमच्या फालतु निर्थक जिलब्या पाडण्या पेक्षा जरा श्वासावर लक्ष केंद्रित करा पाहु ! मन ताळ्यावर येइल तुमचे आणि जिलब्या पाडणे लगेच बंद होइल बघा. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा
21 Jul 2014 - 12:49 pm | अत्रुप्त आत्मा
@ जरा श्वासावर लक्ष केंद्रित करा पाहु !
मन ताळ्यावर येइल तुमचे आणि जिलब्या पाडणे लगेच बंद होइल बघा.>>>
21 Jul 2014 - 12:51 pm | नानासाहेब नेफळे
श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन ताळ्यावर येते हा पद्धतशीर पसरवलेला गैरसमज आहे ,याला कोणताही मानसशास्त्रीय आधार नाही.
21 Jul 2014 - 1:31 pm | संजय क्षीरसागर
दुनियेचं राहू द्या, स्वतःचा अनुभव लिहा!
कल्पनाशक्ती हा बुद्धीमत्तेचा एक पैलू समजला गेला आहे. अजपा म्हणजे काय याची सांगितलेली प्रक्रिया वाचून देखिल, परिणाम काय होईल हे कुणाच्याही लक्षात येईल.
न तुम्हाला स्वतःचा अनुभव, न कल्पनाशक्ती; आनंदात राहा.
21 Jul 2014 - 3:38 pm | मदनबाण
कल्पनाशक्ती हा बुद्धीमत्तेचा एक पैलू समजला गेला आहे.
कल्पनाशक्ती आणि वास्तव यात फरक असतो हे समजण्यासाठी विशेष बुद्धीमत्ता लागत नसावी नै ? ;)
अजपा म्हणजे काय याची सांगितलेली प्रक्रिया वाचून देखिल, परिणाम काय होईल हे कुणाच्याही लक्षात येईल.
अजपा म्हणजे काय हे न-वाचताच कल्पनेच्या जिलब्या पाडता हे देखील कुणाच्याही लक्षात येईल बरं का... ;)
न तुम्हाला स्वतःचा काही वाचायची इच्छा, न समजुन काही घेण्याची वॄत्ती; जिलब्या पाडत राहा. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा
21 Jul 2014 - 3:55 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही नामस्मरणाच्या कोणत्या स्टेजला आहात आणि किती वर्ष साधना चालू आहे ते सांगा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फालतू लिंका आणि कमेंटस करण्यापेक्षा अजपा म्हणजे काय, तो सिद्ध झाल्यावर मनात नेमका काय बदल घडतो आणि पर्यायानं त्याचा जीवनावर काय परिणाम होतो ते इथे लिहा, मग बघू.
21 Jul 2014 - 4:01 pm | मदनबाण
आधी तुम्ही गीता न-वाचता त्यावर भाष्य करु कसे शकता ? ते सांगा बरं... ;)
परत सांगतो... श्वासावर लक्ष द्या पाहु... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा
21 Jul 2014 - 5:16 pm | संजय क्षीरसागर
जो विषय तिथल्या तिथे संपवत चला. तो विषय होता त्या वेळी असेच अवांतर उद्योग केले होते.
आता, अजपा म्हणजे काय ते स्वतःच्या शब्दात सांगता येत नाही.
वैखारी निषिद्ध तर ती उल्लंघून पुढच्या स्टेजला कसं जायचं याचा पत्ता नाही.
त्यात पुन्हा (मला दिलेल्या पहिल्या प्रतिसादात) हा घोळ घातलायं !:
मंत्रानं भगवंताशी एकरुपता साधते?
नामस्मरणानं एकसंध आणि मुद्देसूद विचार करण्याची क्षमता हळूहळू कशी संपते याची झलक, प्रतिसादातूनच दाखवायचं ठरवलंय का?
21 Jul 2014 - 5:57 pm | अधिराज
@@नामस्मरणानं एकसंध आणि मुद्देसूद विचार करण्याची क्षमता हळूहळू कशी संपते याची झलक, प्रतिसादातूनच दाखवायचं ठरवलंय का? =))
21 Jul 2014 - 6:58 pm | मदनबाण
जो विषय तिथल्या तिथे संपवत चला. तो विषय होता त्या वेळी असेच अवांतर उद्योग केले होते.
हॅ.हॅ.हॅ जिलबी बाबा तुमच्या जिलब्याच अवांतर असतात त्याचे काय ? *LOL* तसेही गीता न-वाचता त्यावर भाष्य करण्याच्या बाता तुम्ही करता,सर्व संत मंडळींनी जे सांगितले त्याला चूक ठरवता. मग तुमचा प्रतिसाद हा जिलब्या नाही तर काय आहे जिलबी बाबा ?
मंत्रानं भगवंताशी एकरुपता साधते?
हॅ.हॅ.हॅ... च्यामारी पहिल्या प्रतिसाद संतवाणी वाचली नाहीत त्याखाली कबीर वाणी वाचली नाहीत ! मनात कोणताही इतर विचार केला नाही तर ज्याचे नाम घेतो त्याच्याशी एकरुपता का होणार नाही ? जिथे मनोभाव नसेल त्या साधनेला अर्थच कुठे उरतो ?
असो... तुमच्या जिलब्या पाडणे चालु ठेवाच. आम्ही मोजु. *LOL*
परत एकदा :- अजुन तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करता येत नाहीये... हॉट इज धिस जिलबी बाबा. *LOL*
जाता जाता :-
जिलबी बाबा हा वरचा व्हिडीयो तुमच्यासाठी नाही बरं का... ज्यांना पहायचा असेल ते पाहतीलच. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा
21 Jul 2014 - 8:20 pm | अधिराज
धन्य आहे. आतापर्यंत बुवा तेथे बाया ऐकलं/पाहिलं होतं.
21 Jul 2014 - 8:29 pm | संजय क्षीरसागर
असा एकरुप होण्यासाठी कुणीही नाही, तो केवळ मंत्र जपणार्याचा कल्पनाविलास आहे.
असो, शेवटी (फोटो बरा वाटला म्हणून) विडिओ ऐकला. त्यावरनं आपल्या एकूण साधनेची कल्पना आली.
आपण बहुदा मंत्रोच्चारणाच्या `लास्ट स्टेजला' गेलेले दिसता! काही दिवसात इहलोकावरच आपल्याला कृष्णधाम दिसू लागेल!
माझा पहिला प्रतिसाद (मुलाखत घेतल्यावीना) सार्थ करुन दाखवल्याबद्दल धन्यवाद!
21 Jul 2014 - 9:42 pm | मदनबाण
असा एकरुप होण्यासाठी कुणीही नाही, तो केवळ मंत्र जपणार्याचा कल्पनाविलास आहे.
असं तुम्हाला वाटते हाच तुमचा कप्लना विलास आहे जिलबी बाबा. :ROFL:
शेवटी (फोटो बरा वाटला म्हणून) विडिओ ऐकला.
अर्रेच्या... अजपा जप ची लिंक दिली तर ती वाचली नाहीत,पण व्हिडीयो पाहिलात ! श्वासावर थोडेफार लक्ष केंद्रित झालेले दिसतय ! गुड कीप इट अप. :ROFL:
आपण बहुदा मंत्रोच्चारणाच्या `लास्ट स्टेजला' गेलेले दिसता! काही दिवसात इहलोकावरच आपल्याला कृष्णधाम दिसू लागेल!
पुन्हा एकदा कप्लना विलास ! आपण आपले जिलबी बाबा हे नाव सर्वार्थाने खरे करु दाखवलेत. :ROFL:
माझा पहिला प्रतिसाद (मुलाखत घेतल्यावीना) सार्थ करुन दाखवल्याबद्दल धन्यवाद!
हॅहॅहॅ... ते गीता न-वाचता त्यावर भाष्य करण्याच कसब दाखवा की जरा... तुमची देखील चांगली मुलाखात घ्यायला तयार आहोच. :ROFL:
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा
21 Jul 2014 - 10:22 pm | संजय क्षीरसागर
अशीच साधना सुरु ठेवा. काही दिवसातच तुम्हाला, इतरांना जे दिसत नाही ते दृगोचर होऊ लागेल. इतकंच काय इतरांना ऐकू न येणारे दिव्य ध्वनी कानात घुमू लागतील. जे दृगोचर होतंय ते इतकं स्पष्ट दिसू लागेल की तुम्ही भर रस्त्यात त्याच्याशी बोलू देखिल लागाल! तुम्हाला जगाची पर्वा करण्याचं काही कारणच उरणार नाही.
तुमच्या भोवती तुमच्या मार्गानं जाणारे असंख्य अनुयायी मिळतील. आणि त्यांच्या गराड्यात तर तुम्हाला, आपण `परातत्त्वाला' उपलब्ध झालो याची पदोपदी खात्री पटेल.
अश्या `हवाबाणबाबांना' लोक `पोहोचलेला माणूस' समजतील. सायकिअॅट्रीत यालाच `भ्रमिष्ट होणं' म्हणतात... पण तुम्हाला त्याची फिकीर करण्याचं काही कारण नाही.
22 Jul 2014 - 6:18 am | मदनबाण
जिलबी बाबा तुम्हालाच फक्त कल्पना विलासाच्या जिलब्या पाडण्या पलिकडे काही जमत नाही ! तेव्हा तुमचच डोक चेक करायची खरी गरज आहे बरं का... सतत कल्पना विलास करणारा माणुसच भ्रमिष्ठ असतो हे देखील तुम्हाला कळत नाही, तेव्हा तुम्हाला भ्रमिष्ठ म्हणजे काय ते कळणे सुद्धा महाकठिण झाले आहे.
तशीही प्रतिसाद न-वाचता जिलब्या पाडण्याची तुमची सवय जुनीच असुन तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख इथेच झाली होती. तसेच वैचारिक जिलब्या टाकायला "विशेष" गुण लागत नाहीत हे सुद्धा आधीच सांगुन झाले आहे बरं का जिलबी बाबा.
तेव्हा गेट वेल सुन !
जाता जाता :- मनाची रुणुझुणू रुणुझुणू अती वाढली की जिलबी बाबा जिलब्या टाकायला लगेच तयार होतात. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !
22 Jul 2014 - 9:46 am | संजय क्षीरसागर
त्या स्टेजला आपण हळूहळू पोहोचता आहातच. सगळीकडे भगवंत दिसू लागला आणि रात्रंदिन मंत्रघोष ऐकू येवू लागला की (कुणाला तरी) नक्की, इथे कळवायला सांगा.
सदस्यांना मंत्रजपाचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो ते पाहण्याचे सौख्य लाभेल आणि पुन्हा कुणीही असले प्रयोग करणार नाही.
22 Jul 2014 - 9:56 am | मदनबाण
सतत कल्पना विलास करणारा माणुसच भ्रमिष्ठ असतो!
चला स्वतः बद्धल खात्री पटली तर तुम्हाला ! ;) { आता ही केस पूर्ण बंद करतो. } *LOL*
पुढच्या प्रतिसादासाठी स्रॉरी सॉरी जिलबीसाठी जागा रिकामी ठेवली आहे, कारण शेवटची जिलबी आपलीच हा तुमचा हातखंडा ठावुक आहे...आणि तो तुम्ही नक्कीच पूर्ण करणार याची खात्री देखील आहे. *LOL*
जाता जाता :- सध्या जिलबी किती रु. किलो आहे ? *LOL*
आणि हो खालची सही तुमच्यासाठी नाही बरं का... उगाच उघडुन बघाल ! *LOL*
मदनबाण......
आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !
22 Jul 2014 - 11:06 am | संजय क्षीरसागर
ही क्लॅरिटी आहे. तुमचं त्या विपरित, सगळंच धुसर होतंय. रटाळ जपासारखे तेचते निरर्थक शब्द चालू झालेत. चालू द्या.
22 Jul 2014 - 1:09 pm | श्रीगुरुजी
>>> जिलबी बाबा तुम्हालाच फक्त कल्पना विलासाच्या जिलब्या पाडण्या पलिकडे काही जमत नाही ! तेव्हा तुमचच डोक चेक करायची खरी गरज आहे बरं का...
+१११११११११११११....
जिलबीबाबा ४ थ्या प्रकारातले आहेत. आपल्याला काहीच कळत नाही हेच त्यांना कळत नाही.
20 Jul 2014 - 10:03 pm | चित्रगुप्त
शालेय वयात १५ ऑगस्ट, सव्वीस जानेवारी वगैरे दिवशी गावभर कर्णकटु आवाजात "अब तुम्हारे हवाले वतन साथियों" "जरा आंख मे भरलो पानी" "वतन की राह मे ..शहीद हो" वगैरे गाणी ठाणाणा वाजत असायची, आणि जीव नकोसा व्हायचा. त्यानंतर काही दिवस इच्छा नसताना या गाण्यांचा अजपा जप मनात धिंगाणा घालायचा, आणि काही करणे मुश्किल व्हायचे. अलिकडे काही दुकानदार दुकानात 'मच्छर भगाओ - कम- गायत्री मंत्राचे मशीन लावून ठेवतात, त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत असतो. अश्या दुकानात पाच मिनीटे थांबल्यावरही नंतर बराच वेळ तो अजपा जप चालू रहातो. या अनुभवावरून अजपा जप कसा असावा याची थोडीशी कल्पना आहे, आणि 'भीक नको, पण कुत्रं आवर' अशी स्थिती होत असणार अजपा वाल्यांची.
म्हणूनच मी पहिल्या प्रतिसादापासून 'स्वानुभवाधीष्ठित माहिती द्यावी, असा आग्रह धरला आहे, परंतु धागाकर्त्याने वा अन्य कुणी तसे केलेले नाही.
20 Jul 2014 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत असतो.
ते मशीन आणि त्यातून होणार्या शब्दगळीचे चित्र एकदम डोळ्यासमोर उभे केलेत ! =))20 Jul 2014 - 10:38 pm | प्रचेतस
अगदी अगदी =))
21 Jul 2014 - 12:50 pm | प्रसाद गोडबोले
ते सुध्दा अनुराधा पौडवाल की कोणातरी स्त्रीच्या आवाजात ...
खरं तर स्त्रीयांना गायंत्री मंत्र म्हणायला बंदी आहे / निषिध्द आहे !
(टाकली काडी *biggrin* मिपाय स्वाहा: ... मिपाय इदम् न मम् !)
21 Jul 2014 - 6:21 pm | बॅटमॅन
असं नक्की कुठल्या धर्मशास्त्रात आहे? मुंज झालेली व्यक्ती हा मंत्र म्हणू शकते आणि प्राचीन काळी स्त्रियांचीही मुंज होत असे.
21 Jul 2014 - 6:34 pm | प्रसाद गोडबोले
गायत्री हा वेदोक्त मंत्र आहे ( ऋग्वेद ४,६२,१० ) स्त्री आणि शुद्रांना वेदोक्ताचा अधिकार नाही (त्यांच्यासाठी पुराणोक्त मंत्र आहेत) म्हणुन स्त्रीयांनी गायत्री मंत्र म्हणाणे निशिध्द आहे !
21 Jul 2014 - 6:46 pm | बॅटमॅन
प्राचीन काळी उपनयन झालेल्या स्त्रियांना हा मंत्र निषिद्ध नव्हता.
21 Jul 2014 - 6:54 pm | प्रसाद गोडबोले
हा रेफरन्स लावला असेल बहुधा ! सो लेट मी करेक्ट माय सेन्टेन्स ...
21 Jul 2014 - 7:01 pm | बॅटमॅन
बरं मग ब्रह्मवादिनी बायकांचे काय? त्यांना निषिद्ध नव्हता तो. विधिवत् मुंज बिंज करून जानवे परिधान करून गायत्री मंत्रच का, वेदांची सूक्ते त्या पठण करीत असत.
21 Jul 2014 - 7:37 pm | प्रसाद गोडबोले
त्यांची मुंज झाली नव्हती का ?
तसे असल्यास ते निशिध्दच म्हणावे लागेल ... मोडस ऑपरॅन्डी हा फॉलॉ व्हाय्लाच पाहिजे , जर सुशिक्षित लोकच त्याला फाटे फोडायला लागले , अन पळवाटा शोधायला लागले तर मग लवकरच तो मोडस नामशेष होईल !
21 Jul 2014 - 7:43 pm | बॅटमॅन
वर स्पष्टच म्हटले आहे की मुंज झाली होती म्हणून.
बरं, बाकी मुंज न होता गायत्री मंत्र म्हटल्याने काही आभाळ कोसळत नाही. तथाकथित पावित्र्यही भंगत नाही. मनातला भाव हा शेवटी महत्त्वाचा असतो.
21 Jul 2014 - 8:04 pm | प्रसाद गोडबोले
>>> आणि गायत्री मंत्र मुळीच न म्हणल्यानेही आभाळ कोसळत नाही !
आपल्या धर्मात कोनावरच कसलीच सक्ती नाहीये , ज्याला जे करायचे ते करायला तो फ्री आहे ! पण काही विधीनिशेध आहेत हे पाळले पाहिजेत . ज्याला खरंच भक्तीभावने गायत्री मंत्राचे पठण करायचे असेल त्याने विधीवत मुंज करुन घ्यावी , ती करायची नसल्यास इतर पुराणोक्त मंत्र आहेतच की .... मुंजही करणार नाही अन गायत्रीच म्हणणारच असा हट्टाग्रह कशासाठी ? ह्यातील भाव काही भक्तीयुक्त वाट्ट्त नाही !
आता सध्यातरी आम्हाला गाय्त्री मंत्राचे काही कौतुक नाही पण जेव्हा पुरश्चरण करायचे मनात येईल तेव्हा विधीनिषेध पाळुनच करु :)
अवांतर : बाकी ह्या विधीनिषेध वरुन एक किस्सा आठवला , एकदा सज्जनगडावर एक असाच हट्टाग्रही माणुस समर्थांच्या समाधीकडे / रामाच्या मुर्तींकडे पाय करुन बसला होता , त्याला जाऊन असे का करतोस बाबा म्हणुन एकाने विचारले तर म्हणतोय कसा की "जळी स्थळी काष्ठी पाषाणी देव आहे " ... तिथल्यातिथे जाऊन सन्नकन कानाखाली वाजवायचा विचार आणि हा डायलॉग मनात आला होता की "माज्या हातातही देव आहे अन तुझ्या गालातही अन ह्या आलेल्या आवाजातही *biggrin* " पण तेवढ्यात ते प्रकरण एका रामदासींनी हातळले ... आमच्या हातुन एक स्टंट हिरावला गेला किंव्वा विसोबा खेचरांसारख्या गुरुंची भेट :)
21 Jul 2014 - 8:12 pm | बॅटमॅन
त्यामुळे जर कुणाला मुंज न करता गायत्री मंत्र म्हणायचा असेल तर हट्टाग्रह इ.इ. लेबले लावणेही काही योग्य नाही. मुंज न करता गायत्री मंत्र म्हणायचा लोकांना अट्टाहास आहे हे तुमचे पर्सेप्शन आहे. ते खरेच कशावरून? याची आणि सज्जनगड एपिसोडची तुलना इतक्यासाठी योग्य नाही, की स्वतःचा पॉइंट प्रूव्ह करण्याच्या नादात एक्स्ट्रीम उदा. दिलेले आहे. अशी एक्स्ट्रीम उदा. दिल्याने मूळ मुद्दा आजिबात सिद्ध होत नाही. केस बाय केस हे बदलत असतं.
पुराणोक्त मंत्र आहेतच की, वैदिक मंत्र कशाला? हा सवाल करायची अॅथॉरिटी तुम्हांलाच काय, कुणालाही नाही. जर कुणी अशा भ्रमात असेल, तर सुदैवाने त्यांना फाट्यावर मारण्यासारखी परिस्थिती आज आहे. कधीकाळी ती नव्हती.
21 Jul 2014 - 8:33 pm | प्रसाद गोडबोले
मी हेच म्हणतोय ना ! तुम्हाला विधीनिषेध मान्य नसतील तर संपुर्ण प्रथाच फाट्यावर मारा ना ! दॅट्स इट ! गायती काय की सज्जनगड काय .... मुळ बेस लाईन इतकीच आहे की सोप्पे सोप्पे नियम जरी आपल्याला फालतु वाट्ट असतील तरी ते पाळले पाहिजेत , जर नसतीलच पाळायचे तर त्या भानगडीतच कशाला पडा ?
जे नियम पाळुन करतात त्यांना चीडवायला / डिवचायला काय ????????????
बाकी "विधीनिषेधांना फाट्यावर मारणार आन मनाला वाट्टेल तेच करणार " ह्याला मराठीत हट्टाग्रह म्हणतात असा माझा समज आहे !
21 Jul 2014 - 10:14 pm | बॅटमॅन
म्हणजे एखाद्या प्रथेतले काय अन किती घ्यावे याचे मूलभूत स्वातंत्र्यही प्रत्येकाला असू नये म्हणता? असे म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे आणि तो का मान्य करावा? बरं हे तथाकथित डिवचणे म्हणजे तरी काय? इतर लोकांनी गायत्री मंत्र म्हटला हे पाहून त्या मंत्रावर मोनॉपॉली सांगणार्यांच्या पोटात का दुखावे हे मला कोणीतरी सांगा.
एक चार ओळींचा मंत्र म्हणण्याची साधी इच्छा व्यक्त केली तर त्याला हट्टाग्रह म्हणणे, मंत्र काय तो विशिष्ट अल्पसंख्यांनीच म्हटला पाहिजे असा आग्रह धरणे हे माझ्या मते हट्टाग्रहात मोडते.
बाकी चालू द्या.
21 Jul 2014 - 10:39 pm | नानासाहेब नेफळे
जाऊ दे रे ब्याटमाना !
वेदोक्त कि पुरणोक्त यावादात शाहु छत्रपतींची बदनामी करण्यापर्यंत या दुराग्रही लोकांची मजल गेली होती!! या दुराग्रहात टिळकांसारखा व्यासंगी माणुसही आघाडीवर होता,तिथे प्रगोसारख्या पामरांकडून कसल्या लॉजिकल स्पष्टीकरणाची अपेक्षा करत आहात!!!
22 Jul 2014 - 12:35 am | प्रसाद गोडबोले
तुम्ही गप्प बसाहो नेफळे ...तुम्हाला वेद नको आहेत पुराणेही नको आहेत टिळकही नको आणि शाहुही नको आहेत ... तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे ...
एक तर तुम्हाला वेदांविषयी आदर नाही तरीही वेदोक्तच पाहिजेल ...बर दिले तर नियमानुसार पाळणार नाही अन नाही दिले तर राडा करनार .... तुम्हाला व्यवस्थित ओळखुन आहेत सगळे !!
22 Jul 2014 - 11:32 am | नानासाहेब नेफळे
वेदोक्त दिले तर.... पुरणोक्त दिले तर.....>>>>>
देणारे तुम्ही कोण? वाडवडीलार्जीत इस्टेट असल्यासारखे दावे का करतातय?
वेद पुराणे ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे काय?
वेद अपौरुषेय आहेत, याचा अर्थ कुणाचाही तिर्थरुपाची खाजगी मालमत्ता नाही, ज्याला जसे योग्य वाटेल तसे त्याने त्यातला सार घ्यावा ,कुणा प्रगोबिगोच्या परमिशनची गरज नाही.
22 Jul 2014 - 11:59 am | प्रसाद गोडबोले
चला काहीही कारणाने का होईना ... तुम्ही वेदांमधील सार घ्यायला तयार झालात हेच खुप झाले :)
(पणत्वैयक्तिक टीका करुन तुम्ही परत तुमची "पातळी" दाखवत आहातच म्हणा )
22 Jul 2014 - 12:24 pm | नानासाहेब नेफळे
वेद पुराणांच्या बाबतीत एका विशिष्ट समाजाने पझेसीव्ह व्हायचे कारण नाही! ती त्या समाजाची खाजगी मालमत्ता नाही ,एवढेच मला सांगायचेय!!
22 Jul 2014 - 12:36 pm | प्रसाद गोडबोले
बरं मग कधी येताय वेदोक्त मंत्र म्हणायला ? तुमच्या नावाने आपण एखादा छोटासा यज्ञच करुयात की !!
22 Jul 2014 - 1:38 pm | नानासाहेब नेफळे
चालेल ,कुठे करायचा.... यवतेश्वरला करायचा कि थेट गडावर करुयात?
22 Jul 2014 - 12:31 am | प्रसाद गोडबोले
हेच लॉजिक सर्वत्र लावणार काय ? सिलेक्टीव्ह सिलेक्शनचे मुलभुत स्वातंत्र्त्य ... ह्म्म ?? तसे असले तर वे वाक्य सवे करुन ठेवत आहे ... पुढे मागे कुठेतरी क्वोट करेन सविस्तर चर्चेच्या रेफरन्स साठी :)
22 Jul 2014 - 1:05 am | बॅटमॅन
अवश्य.
पण याचा बादरायण संबंध सिलेक्टिव्ह रीडिंगशी लावण्यात काही हशील नाही, कारण दोहोंत क्वालिटेटिव्ह फरक आहे. इथे फक्त निरुपद्रवी उपासना आहे, तर तिकडे जाणूनबुजून केलेला विपर्यास आणि अंततोगत्वा चिखलफेक आहे.
22 Jul 2014 - 1:24 am | प्रसाद गोडबोले
निरुपद्रवी कशी ? धर्माचे नियम न पाळता केली उपासना(जे की बर्याच वेळा ढोंग / दांभिकता असते) ही धर्माचे नियम पाळुन उपासना करणार्यांसाठी उपद्रवच असतो !
22 Jul 2014 - 1:33 am | बॅटमॅन
चार ओळीचा मंत्र म्हटल्याने नक्की कुणाला आणि कसला उपद्रव होतो ते मला अजूनही कळालेलं नाही. पण अशा वांझोट्या चर्चांत अडकून पडलेल्या समाजावर मूठभर अल्पसंख्य परकीयांनी कसं काय राज्य केलं असेल ते उमगलं. एकीकडे असली एक्स्क्लूझिव्हिटी दाखवायची आणि दुसरीकडं अन्य धर्मीयांच्या धर्मप्रसाराला लोक बळी पडतात म्हणून ओरडायचं! स्वतःच दारे बंद करून घेतली तर लोक घरात येत नैत म्हणून ओरडण्यापैकी प्रकार आहे हा. याला काहीच अर्थ नाही.
22 Jul 2014 - 3:59 am | खटपट्या
१००% सहमत.....
कोणत्या शतकात आहोत आपण ?
22 Jul 2014 - 11:56 am | प्रसाद गोडबोले
तुम्हाला काय वाटतं ....
इतर धर्मात असे विधीनिषेध डू & डोन्ट्स नसतात ?
की जे असतात ते फाट्यावर मारायचे स्वातंत्य्र असते ?
की जे लोक असे फाट्यावर मारतात त्यांना खुप मोठ्ठा आदर मिळतो ?
22 Jul 2014 - 12:08 pm | बाळ सप्रे
या असल्या बिनबुडाच्या विधीनिषेधांमुळेच सर्व धर्म गुंडाळून ठेवायची गरज आहे..
त्यापेक्षा तुम्ही आपले धर्म म्हणजे धारण करणे किंवा एक जीवनपद्धती या सेफ व्याख्येवर या मग काय कोणालाच प्रॉब्लेम नसतो !!
कारण तुमचे हे असले विधीनिषेध म्हणजे हिंदु धर्म नव्हेच असे सांगणारे अनेक हिंदु धर्माभिमानी भेटतील..
:-)
22 Jul 2014 - 12:17 pm | बॅटमॅन
इतर धर्मांत काहीही का असेना, एंड रिझल्ट हाच आहे की आपल्याच लोकांना स्वीकारायला हिंदू म्हणवणारे कुचकुचतात. त्यामुळे असल्या प्रथा तरी बिनकामाच्या आहेत. अवघा हिंदू एक इ.इ. बाता मारणार्यांना जर साधा एक मंत्र इतरांनी म्हटल्यामुळे त्रास होत असेल तर घंट्याचं एकीकरण होणारे.
आणि बाकी धर्मांत काय होतं याची फिकीर मी का करावी हा एक वाईड बॉल सोडून देत आहे. चालुद्या.
22 Jul 2014 - 12:35 pm | प्रसाद गोडबोले
>>> मुळीच नाही ... आधी म्हणल्याप्रमाणे पुराणोक्त मंत्र आहेतच की !
मंत्र म्हणल्याने कोणाला त्रास कशाला होतोय ? मी वरच म्हणले आहे की हिंदु धर्म फ्री आहे ...ज्याला जे हवे त्याने ते करावे ... कोणी अडवणारे नाहीये ... मी मुद्दा इतकाच मांडतोय की जे विधीनिषेध पाळुन हे सर्व करतात त्यांच्या साठी हा भोंदुपणा आहे बस्स इतकेच !!
>>> कारण तुम्हीच तर म्हणालात ना की असल्या विधीनिषेधांमुळे धर्मांतर होतात .... मी इतकच दाखवुन देतोय की असले विधीनिषेध सर्वच धर्मात असतात !
22 Jul 2014 - 12:48 pm | बॅटमॅन
वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्र कुणाला पाहिजेत ते ते त्याप्रमाणे घेतील, तुम्ही ठरवायचं काम नाही. हा फालतूचा अहंकार बिनबुडाचा आहे, कालबाह्य आहे. हे ठरवणारे तुम्ही कोण? ग्रंथांतले सगळेच्या सगळे आहे तस्से सर्व काळी घ्यायचे हा वेडपटपणा कशासाठी? हिंदू धर्मही काय सर्वकाळ एकसारखाच होता काय?
तथाकथित विधिनिषेध म्हणजे बर्याचदा निव्वळ कर्मकांड असते, बस्स इतकेच! त्याला बाकीच्यांच्या दृष्टीने काडीचेही महत्त्व नाही. नुसता दंभ असतो कैकदा..
हा हा हा. अन्य धर्मांतील विधिनिषेधाचा नकार मी कधीच केलेला नाही, फक्त विधिनिषेध हिंदू धर्माला कसे भोवले हे सांगतो आहे. अन्य धर्मांतील विधिनिषेध कसे का असेनात. आपल्याला काय भोवले हे पाहण्याची इच्छाच नसणे ही सोयीस्कर आत्मविस्मृती झाली. याचा झाला तर तोटाच होईल. बसा मग आपापल्या पोथ्यापुराणांत, जगाशी याचमुळे संपर्क तुटतो आणि परकीय येऊन राज्य करून जातात. सुदैवाने हे मत अलीकडे बहुमतात नाही त्यामुळे चालूदे.
22 Jul 2014 - 12:54 pm | प्रसाद गोडबोले
कन्क्लुडींग कमेन्ट फ्रॉम माय साईड :
द्विजांनी वेदोक्त मंत्र म्हणले अन इतरांनी पुराणोक्त म्हणले तर त्यात काही उच्च नीच नाही ... आमच्या साठी वेद आणि पुराण दोन्हीही श्रेश्ठच आहेत !
ज्यांना जे म्हणायचेत त्यांनी ते म्हणावेत ... पण जे विधीनिषेध पाळुन धर्माचरण करतील ते विधी निषेध न पाळता धर्माचरण करणार्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत ( हे वैयक्तिक मत आहे, तुमच्यालेखी फाट्यावर मारणारे श्रेष्ठ आणि नियम पाळणारे कनिष्ठ असे असु शकेल , त्याला कोणाचीच हरकत नाही , हिंदु धर्मात वाट्टेल ते स्वातंत्र्य आहे ज्याला जे हवे त्याने ते मत बनवावे )
ही माझी कन्क्लुडींग कमेन्ट !
तुमचा प्रतिसाद सविस्तर पणे वाचुन , कधी तरी कट्ट्याला चर्चा करु .
बाकी नेफ़ळेरावांना ह्या निमित्ताने वेदातील मंत्र म्हणण्याची इच्छा झाली ह्या बद्दल आनंद व्यक्त करुन मी माझे चार शब्द संपवतो *biggrin*
22 Jul 2014 - 1:02 pm | बॅटमॅन
सर्वांनीच वेदोक्त मंत्र म्हटले तरी त्यात धर्महानी काहीच नाही.
वैयक्तिक मत कसेही असूदे. पण 'माझ्यालेखी फाट्यावर मारणारे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ' हा हेत्वारोप चुकीचा आहे हे सांगणे अवश्यमेव आहे. माझ्यालेखी दोन्ही लोक सारखेच आहेत. रँकिंग ठरेल ते खर्या मनोभावावर. तस्मात वाट्टेल ते स्वातंत्र्य इ.इ. कंडिसेन्शन इथे नको.
बाकी चर्चा करूच.
22 Jul 2014 - 3:59 pm | अत्रुप्त आत्मा
प्र.गो.-हे वाचा आणि थोडा विचार करा.
प्र.गो. आपणे जे म्हणतायत,ते येणे प्रमाणे- जर वेदोक्त शिकायचे असेल,तर मुंजिचा संस्कार करुन शिकावे..आणि ते ज्यांना(द्विजांना) धर्मानी अधिकार दिला आहे त्यांनीच. बाकिच्यांना पुराणोक्ताचा अधिकार आहे.आणि या दोन्हीत श्रेष्ठ/कनिष्ठ असे काहिही नाही. तेंव्हा कमी-जास्त पणाचा आरोप करु नका.
प्र.गो:- हे सगळं तुंम्ही तुमच्या सद्बुद्धीचा कौल लाऊन म्हणताय.(जे शास्त्राला अजिब्बात मान्य नाही.)प्रत्यक्ष वैदिक(ज्याला सामान्यतः हिंदू संबोधतात.)त्या परंपरेत आणि ती परंपरा चालविणार्या आमच्या वैदिक आचार्यांमधे वेद मंत्रांची किंमत आणि स्थान हे पुराणोक्ताच्या वरचं आहे. पुराणोक्त कर्म(कांड) करणे..हे दुय्य्यम आणि हलक्या स्वरुपाचं मानलेलं..आचरलेलं आहे. म्हणजे वेदोक्त श्रीखंडासारखं,तर पुराणोक्त मंजे निव्वळ दही साखर...! दोन्हीतले घटक/कृती तीच पण घटीत आणि दर्जा वेगळा! मंत्रातला अर्थ/आशय तोच पण मान आणि दर्जा वेगळा..असा हा मामला आहे. मला या गोष्टी कळल्यावर मी आमच्यातल्या अनेकांना हा प्रश्न विचारला,पण उत्तरं देताना कोणिही पोथीप्रामाण्या बाहेर गेले नाहीत.(एका अर्थी स्वतःच्या अंगावर येणार,ते पोथीच्या अंगावर ढकललं..इतकच)
आता यातही काहि आचार्य/प्रवचनकार/पुरोहित हे वेदमंत्र ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे.(शिकण्याचा नव्हे!) अशी भुमिका (अर्थातच शास्त्रा धार-काढून) घेत असतातच.यातल्या काहिंना असं प्रामाणिकपणे वाटत असतं,की आपण म्हणतो तेच शास्त्रातलं मत बरोब्बर..बाकिची लफंगेगिरी/अप्रामाणिकता.उरलेल्यांना ही उघड विषमता आहे हे कळत असतं,पण लोकांनी ऐकावं म्हणून आणि त्यांनाही परंपरेत राहुन हे साध्य करायचं असल्यानी ते शास्त्राधार घेतात. ..असो!
माझ्या सारख्यांना सावरकरांची वेदामृत सर्वांना पाजा ही माणुसकीपूर्ण भुमिका पटते...त्यामुळे मी ज्याला वेदमंत्र शिकण्याची पात्रता आहे त्या (हिंदुसमाजातल्या) प्रत्येक स्त्री/पुरुषाला..पौरोहित्य किंवा व्यक्तिगत उपासनेसाठी वेद शिकवले पाहिजेत. या मताचा आहे.
आता तुमचा रहाता राहिला मुद्दा विधिनिषेध पाळण्याचा...
तर तुंम्हाला हे नम्रपणे सांगतो की धर्मशास्त्रातले विधिनिषेध हे ऐहिक दृष्ट्या निरर्थक आहेत. निर्रर्थक म्हणजे - तुलनाच न करता येण्याच्या स्वरुपाचे.
वेदाध्ययना साठी मुंजीचा संस्कार हा विधि करावा लागतो.. हा विधी न करता वेद शिकणे हा निषेध.
आता हे निर्रर्थक कसं होतं ते पहा...
मुंजीचा संस्कार हा वेदाध्ययनाच्या दालनात शिरायचा गेटपास आहे. पण आपल्या धर्मपरंपरेत हा पास लायकीवर नाही,तर जातिवर मिळतो..ही पहिली विषमता. (आपल्याला CAR शिकायची असेल,तर ज्याला येते त्याला शिकायचा गेटपास म्हणजे लर्निंग लायसनची मुंज करवून मिळते आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास परमनंट लायसन मिळतं..आणि स्वतःची गाडी चालवायचं उपासना स्वातंत्र्य मिळतं..किंवा चालक या पदावर पौरोहित्याची संधी मिळते....म्हणजे जात पाहिली जात नाही..सरळ लायकता पाहिली जाते.. ही ऐहिक समता[आपल्याच लोकसमुहाकरीता] धर्मात का नाही? याचा विचार करा.) ही विषमता आजही जिवंत आहे. वेदपाठशाळांमधे स्त्रीया वा ब्राम्हणेतरांना प्रवेश नाही.याबद्दल तुंम्हाला काय वाटतं?
आता थोडा ग्रंथाधारः- मनु:स्मृती - अध्याय- २ :- श्लोक ३१ ते ४९ हा भाग मुद्दाम वाचा हा खास उपनयनाचे द्विंजांसाठी/त्रैवर्णिकांसाठीचे नियम सांगतो.. हे ही जाती आधारीत आहेत.अध्ययनाकरिता ब्राम्हणापासून पुढे प्रत्येक वर्णाची मुंज ही ४ वर्षांची गॅप ठेऊन सांगणे. कमरे भेवतीच्या मेखला वेगवेगळ्या धाग्यांच्या सांगणे,धरणाचे दंड वेगवेगळ्या वृक्षांचे आणि उंचीचे सांगणे... असा या आमच्या वैदिककॉलेज मधे,,विद्यार्थीसमुहात पाहाता क्षणीच ओळखायला सोप्पा जावा ,असा जन्माधारीत विषमतेचा कडेकोट बंदोबस्त,मनुस्मृतीनी सांगितलेला आहे..विधीनिषेधाच्या नावाखाली हा पाळण्या योग्य मानायचा का? आपल्याला काय वाटतं? शिवाय शूद्रा*ला मुंज करून शिकायला परवानगीच नाही..हे का बरं? पाण्यात उडी मारायला संधीच द्यायची नाही,आणि तू पोहोण्यायोग्य नाहीस असा आधिच निर्वाळा द्यायचा..हे कशाचं लक्षण मानायचं?
शिवाय दुसर्या धर्मांमधेही असच आहे..ते बघा..!--- असा सल्ला मधुन मधुन तुंम्ही देता. तर तुंम्हाला ते ही समर्थनीय वाटतं काय? आणि मी किंवा माझ्यासारख्या कुणी ही विषमता माझ्याधर्मापुरती दुर/हद्दपार करायची,आणि धर्मात समता आणायची म्हटली तर त्यात काहि चूक आहे...असं तुम्हाला दुसर्या धर्मांचा दाखला देऊन सांगावसं का वाटतं? त्यांचं घर राहू दे ना घाणेरडं आपण आपलं स्वच्छ करू..काय हरकत आहे? असं का वाटत नाही? :)
*@द्विज/त्रैवर्णिक इत्यादी कलीयुगात नाहीत. कलियुगात दोनच वर्ण अस्तित्वात आहेत. ब्राम्हण व *इतर(शूद्र) हे धर्मशास्त्र्यांचं मत आहे. आणि त्यावरूनच शाहू/वेदोक्त प्रकरण झालं होतं. मग तुंम्ही वादापुरतं सुद्धा द्विज म्हणजे त्रैवर्णिकांच्या कथित अधिकाराचं बाहुलं नाचविण्यात काय अर्थ उरतो??? याचाही विचार करा.
====================
प्र.गो:--- मी वर मांडलेले विचार..मुद्दे हे तुंम्हाला हरवण्यासाठी नाहीत. हे जाता जाता नमूद करु इच्छितो.
22 Jul 2014 - 4:04 pm | बॅटमॅन
सोनारानेच कान टोचले हे लै झ्याक झालं आत्मूस.
प्रतिसाद फार तिरके होताहेत, तस्मात हा प्रतिसात पुन्हा एकदा पेष्टवतो खाली.
22 Jul 2014 - 4:06 pm | प्रसाद गोडबोले
आय थिंक आय कॅन स्टिल डिफेन्ड माय पॉईट !
असो . पुढील चर्चा भेटी अंती :)
22 Jul 2014 - 6:49 pm | llपुण्याचे पेशवेll
सोनार म्हणायला हा सोनार, सोनार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. इत्यलम्.
21 Jul 2014 - 8:19 pm | नानासाहेब नेफळे
तुमच्या सण्णकन थोबाडण्याच्या कृतीला त्याने 'जळी स्थळी काष्ठी पाषाणी' देवच आहे या तत्वाने पुन्हा लाथेने प्रत्युत्तर दिले असते तर आपण काय करणार होतात?
विषयवासनेचा स्पर्श होऊ नये यासाठी समर्थ शिधाही पाण्यात धुवायचे व बेचव करुन खायचे, त्याच समर्थगडावर सत्तेसाठी भांडाभांड करणारे दोन रामदासी गट आहेत हे ही निदर्शनास आणुन देतो.
21 Jul 2014 - 8:27 pm | प्रसाद गोडबोले
नाठाळाचे माथी काठी हाणु ! ह्या हिशेबाने काठी हाणणार होतो ... *biggrin*
ते निदर्शनास आणुन देण्याचे गरज नाही हो त्या दोन्ही गटातील वाद निवळलाय (मला परसनली तर दोन्ही गटातील माणसे ओळखतात... दोघांशी चर्चा होत असते माझी त्यामुळे हे १००% खात्रीने सांगु शकतोय मी )... दोन काय ११०० गट स्थापन करण्याचा आमचा मानस आहे !!
21 Jul 2014 - 8:36 pm | प्रचेतस
रामदासी पंथांमधला वाद तर समर्थांच्या मृत्युनंतर लगेचच सुरु झाला होता.
संभाजी राजांनी ह्या संदर्भात सज्जनगडाचा किल्लेदार जिजोजी काटकर ह्याला सक्त ताकीद दिल्याचे अस्सल पत्र उपलब्ध आहे.
21 Jul 2014 - 8:38 pm | धन्या
हा तर दिव्याखाली अंधारच म्हणायचा.
21 Jul 2014 - 8:54 pm | प्रसाद गोडबोले
,पण ह्यावर सविस्तर चर्चा पुढील ट्रिप च्या वेळेस):)
22 Jul 2014 - 6:50 pm | llपुण्याचे पेशवेll
पत्र उपलब्दवणे प्लीज.
23 Jul 2014 - 8:59 am | प्रचेतस
समर्थांनी सज्जनगडावरील काही एक व्यवस्था भानजी व रामाजी गोसावी यांजकडे सुपूर्द केल्या. त्यासाठी छत्रपती शिवाजी आणि तद्नंतर संभाजीराजांनाही त्याला अनुदान चालूच ठेवले. समर्थांच्या मृत्युनंतर मात्र उद्धव गोसाव्याने द्रव्यलोभासाठी कटकटी सुरु केल्या. उद्धवास सज्जनगडाचा किल्लेदार जिजोजी काटकर हा सुद्धा सामील झाला. ह्या गोष्टी कानावर जाताच संभाजीराजांनी २/६/८२ रोजी जिजोजी काटकरास आज्ञापत्र लिहिले. त्याचा मूळ मायना पुढीलप्रमाणे.
श्री स्वामी अवतार पूर्ण करण्यागोदरच आज्ञा केली होती. ऐसे असतां उधव गोसावी उगीच द्रव्यलोभास्तव भानजी व रामाजी गोसावी यांसी कटकट करितांत, तुम्ही ही उधव गोसावी यांशी द्रव्ये, पात्रें व वस्त्रे भानजी व रामाजी गोसावी यांकडून श्री स्वामींची देवविली म्हणोन कळू आले. तरी तुम्हांस ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उधव गोसावी यासी कटकट गरज काये. याउपरि जे जे वस्त्राभाव व द्रव्य उधव गोसावी याचे आधीन तुम्ही करविले ते मागतें भानजी व रामाजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करो न देणे. श्री स्वामीची पहिलीच आज्ञा करणे...वेदमूर्ति दिवाकर गोसावी यांचे विद्यमाने आम्हास श्रुत होऊन होणे तों होईल...या उपरि ये घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामीच्या समुदायांसी काडीइतके अंतर पडो न देणे...या पत्राप्रमाणे राहाटी करणें.
21 Jul 2014 - 8:10 pm | नानासाहेब नेफळे
वेदांनी स्त्रीला शुद्र मानले आहे, स्त्री ब्राह्मण असली तरी तिचे उपनयन धर्मबाह्य आहे.
21 Jul 2014 - 8:13 pm | बॅटमॅन
नक्की कुठल्या वेदात आणि कुठल्या अध्यायात/मंडलात/ऋचेत इ.इ. असे सांगितले आहे?
23 Jul 2014 - 11:31 am | मृत्युन्जय
त्यांच्याकडच्या प्रतीत म्हटले आहे. तुम्हाला काय घेणे देणे. ते म्हणतात ना म्हणजे मग तेच खरे. ते म्हणतात ते सगळे खरेच असते. त्यांनी विजु खोट्यांना हाक मारली तर तेही दुसर्या दिवसापासुन विकु खरे म्हणुन ओळखले गेले पाहिजेत.
बाकी तुम्हाला अध्याय, मंडल आणि ऋचेमधला फरक तरी कळतो का? आलेत लोकांना वेदामधल्या शंका विचारायला.
23 Jul 2014 - 12:57 pm | बॅटमॅन
तेही बाकी खरंच म्हणा.
21 Jul 2014 - 8:15 pm | यशोधरा
सादळलेली काडी. :)
21 Jul 2014 - 8:34 pm | प्रसाद गोडबोले
नेफळ्यांचे सगळेच सादळले आहे हो =))
21 Jul 2014 - 8:49 pm | हाडक्या
हेच तुमचेदेखील विचार आहेत का ? म्हणजे तुम्ही या विचारांशी सहमत तसेच समर्थक आहात काय ??
21 Jul 2014 - 8:37 pm | मराठे
अनुराधा पौडवालची मुंज झालीय का?
21 Jul 2014 - 8:48 pm | प्रसाद गोडबोले
हा भारी प्रश्न आहे =))
21 Jul 2014 - 12:57 pm | बॅटमॅन
अगदी अगदी =)) =)) =))
20 Jul 2014 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा
@त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत *mosking* असतो. >>> *ROFL* हे फॅड साधारण १५ वर्षापूर्वी सुरु झालं. मला माझ्या पेशामुळे या प्रकारची अनेक अॅप-लावत फिरणारे(विक्रेते) भेटलेले आहेत. ह्या गोष्टी साधारणपणे पेनकिलर किंवा सपोर्टीव्ह मेडिसिन सारख्या आहेत..असं भासवून त्याचं फुल्ल मार्केटींग केलं जात होतं.आता त्याच्या पुढचा टप्पा सुरु झालाय.असो!
21 Jul 2014 - 12:19 am | खटपट्या
लांजा मध्ये एका हॉटेल मध्ये "श्री स्वामी समर्थ" च मशीन २४/७ चालू असते. का ते माहित नाही.
21 Jul 2014 - 10:23 am | स्पा
संक्षि =))
21 Jul 2014 - 10:23 am | स्पा
संक्षि =))
21 Jul 2014 - 9:30 pm | श्रीगुरुजी
मी आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, जप्/नामस्मरण इ. विषयी किंचितही अनुभव नसताना त्याविषयी अत्यंत भ्रामक कल्पना तुमच्या मनात ठासून भरलेल्या आहेत.
21 Jul 2014 - 10:27 pm | संजय क्षीरसागर
हवाबाणांची काय परिस्थिती झालीये पाहिली नाही का?
आता तुमचं अनुभव कथन येऊ द्या. इथे बरीच गर्दी झालीये वाटत असेल तर स्वतंत्र पोस्ट टाका. बहुत मजा आएगा.
22 Jul 2014 - 1:17 pm | श्रीगुरुजी
>>> हवाबाणांची काय परिस्थिती झालीये पाहिली नाही का?
निव्वळ भ्रामक कल्पनाविलासामुळे तुमची किती भ्रमिष्ट अवस्था झाली आहे ते आधी बघा.
>>> आता तुमचं अनुभव कथन येऊ द्या. इथे बरीच गर्दी झालीये वाटत असेल तर स्वतंत्र पोस्ट टाका. बहुत मजा आएगा.
माझे अनुभव लिहिले तरी तुम्हाला ते कळणार नाही. तुम्हाला ते समजण्याइतकी तुमची पात्रता नाही. कारण अजून तुमचं मडकं कच्चं आहे. निव्वळ कच्चं नाही तर ते गळकं आणि पालथं पण आहे.
त्याऐवजी तुम्ही आपलं अरविंदाख्यान लावा किंवा काहीतरी रूणुझुणु सुरू करा. बहुत मजा आएगा.
22 Jul 2014 - 2:00 pm | नानासाहेब नेफळे
श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव इतरांना न कळण्या इतपत ambiguous आहेत हे मान्य केल्या बद्दल तुमचे आभार.
अरविंदाख्यानाचं संक्षि बघतिलच, वाढलेल्या पेट्रोल डीझेल आणि रेल्वेभाड्याच्या किंमतीत कसा 'राष्ट्रवाद' आहे हे सांगण्यासाठी मोदीचालिसा लिहा.कृपा करून आता विषयांतर करु नका..