बो, बॉब आणि आयफोन

हेमंत बेंडाळे's picture
हेमंत बेंडाळे in जनातलं, मनातलं
18 Jul 2014 - 11:32 am

दिवस: फेब्रुवारी २०१० २रा आठवडा (नक्की दिवस आठवत नाहीये पण सुट्टी होती त्यानंतर )
स्थळ: Superior ,CO
वेळ: असेल रात्री ७, ८ वाजेची
मी आणि माझा सहकारी योगेंद्र बस मधून उतरून lawn तुडवत शोर्टकट मारत माझ्या अपार्टमेंट वर चाललो होतो अचानक मला माझ्या पायाखाली काहीतरी तुडवल्यसारखे वाटले बर्फ होता पण त्याखाली काहीतरी होतं थोडा अंधार होता तिथे जे काही होता ते उचलला आणि पुढं जाऊन बघतो तर काय मी पायाखाली चक्क आयफोन तुडवत होतो. बापा जन्मात कधी आयफोन बघितला नवता आणि तो पायाखाली. मला वाटला गेला आता तो, पण बनावट चांगली आहे म्हणावा नाहीतर काय ७० किलो चा भर सहन केला त्याने आणि तरी चालू होता. थंडी भरपूर होती - मध्ये होता कि तापमान म्हटला आता इथे रस्त्यवर उपक्रम नकोत तडक रूम (तेच ते अपार्टमेंट, आपलं रूम चांगला वाटतं) वर गेलो. पहिले काही कळेना चालवायचा कसा ते, काहीतरी फाईट मारली आणि त्याचा call register उघडला. त्याच्या missed calls आणि received calls मध्ये एकच बाई होती लिंडा. कमीत कमी १५ मिस कॉल आणि तेवढेच आलेले कॉल तिचेच, फोन बुक मध्ये हि ४ ते ५ लोक फक्त फोन केलेल्या लोकांमध्ये काही वेगळे नंबर दिसत होते सांगायचं तात्पर्य काय कि बहुतेक फोन नवीन होता. म्हटला आता लिंडा बाई बहुतेक बायको / गर्ल फ्रेंड असेल (इतका त्रास देतेय म्हटल्यावर, काय सांगावा बुवा तिलाच कंटाळून फोन फेकला असेल त्याने , अरे पण आपल्याला कुठे माहितेय कि फोन "तिचा" आहे कि "त्याचा"? काय राव इतका ठळक अक्षरात लिहिला आहे कि वरती बो आणि बॉब असो ..) तर मी लिंडा ला फोन लावला कोणीच उचलला नाही , परत लावला , परत तेच (हा आणि लिंडा काय मिस कॉल मिस कॉल खेळतात कि काय नाहीतर जोरदार भांडण वगैरे झालं असेल दोघांचा काही असो आपल्याला काय ..) मग मी मोर्चा वळवला तो शेवटच्या फोन कॉल वर.
शेवटचा फोन संध्याकाळी केला होता त्यालाच फोन लावला त्याला कसला "ती" निघाली तिकडून
(संवाद मराठीतून टाकतोय पण घडला इंग्लिश मधूनच, आपल्या सिनेमा सारखा नाही "हिरो" हिंदी मधून बोलतो म्हणून अंग्रेज पण हिंदी मधेच बोलतात )
मी: माझा नाव हेमंत (आडनाव बेंडाळे सांगितला नाही नाहीतर ते म्हणण्यामध्ये तिचा (आणि माझा) बराच वेळ गेला असता ). मला हा आयफोन सापडला आहे horizon मध्ये. संध्याकाळी ह्या फोन वरून शेवटचा फोन तुम्हाला लावण्यात आला होता म्हणून तुम्हाला फोन केला
ती (नाव आठवत नाही तिचा, असाही तिचं नाव नव्हतं फोन मध्ये ): मला नाही माहिती बुवा मला कोणी फोन केला ते , हा landline आहे असा म्हणून फोन ठेवला तिने

आता म्हटला अजून काही तरी बघावा लागणार फोन मध्ये म्हणून काहीतरी काडया करायला सुरुवात केली तेवढ्यात त्या बाईने परत फोन केला. तिला साक्षात्कार झाला होता कोणी फोन केला होता ते
ती : आता आठवला हा फोन कोणाचा आहे ते. बॉब ने संध्याकाळी फोन केला होता (तिच्या घरातला कोणालातरी बॉब ने फोन केला होता असा कळलं)
तुम्ही कुठे आहात ?

मी : आम्ही Rock Creek Parkway ला आहोत, Horizons मध्ये
ती : मग तुम्हाला बॉब community center ला भेटेल
मी : आम्ही बॉब ला कसा ओळखावं?
ती : बॉब कडे एक मोठा कुत्रा आहे , त्याचा नाव बो आहे
मी : (घ्या म्हणजे आता कुत्र्यावरून लोकांना ओळखायचा का इकडे ?) बरं ठीक आहे, बघतो मी. धन्यवाद.

मी आणि योगेंद्र भरपूर हसलो बो वरून बॉब ला ओळखायचं अशी कल्पना करुनच.
मग आम्ही आमचा मोर्चा community center वर वळवला. योगेंद्र त्याच्या घरी जाणार होता आणि वाटेत community center होतं. आम्ही आत गेलो आणि बो ला शोधायला लागलो (काय लाज आहे राव, लिहायला देखील कसंतरी वाटतंय , पण खरंच बो ला शोधत होतो आम्ही) बो काही सापडला नाही मग आम्ही receptionist कडे गेलो आणि तिला वृत्तांत कथन केला

ती : कोणता बॉब ?
मी : (झाली का पंचायत ) ज्या बॉब कडे बो नावाचा मोठा कुत्रा आहे.
ती : अछा तो बॉब (आम्ही आता फक्त पडायचेच बाकी होतो) मला जरा तो फोन दाखवा बरं.
तिने तो फोन घेतला आणि (काय माहित कुठून ) त्यातले फोटो काढले.
ती : हा बो नाहीये (दुसऱ्या कुठल्यातरी कुत्र्याचा फोटो होता, म्हणजे स्वताचा एक पण फोटो नाही आणि दुसऱ्या कुत्र्याचा फोटो ? )

मी आणि योगेंद्र आम्ही एक मेकांकडे बघितले. नक्की काय चालू आहे ? आपण बॉब ला शोधतोय कि बो ला ?

ती : येसं हाच बो (तिच्या तोंडावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, बो म्हणजे जणू काही ब्रॅड पिट च)
पण आता बो नाहीये बॉब बरोबर ( अरे काय चालू काय आहे बो म्हणजे काय GF आहे का काय बॉब ची? आणि बो नाहीये बॉब बरोबर म्हणजे काय ? हे अमरु (अमेरिकन) काय करतात काही कळत नाही )
मी : (आता तो बो बॉब बरोबर का नाहीये हे विचारण्याचं धाडस आम्ही केला नाही, नाहीतरी अजून काहीतरी अतर्क्य कथा गळ्यात पडली असती आतापर्यत जितके झाले ते पुरे झाले ) मग तुम्ही देणार का आयफोन बॉब ला?
ती : हो नक्कीचं. धन्यवाद (तेवढ्यात तो आयफोन वाजला, साक्षात लिंडा देवी प्रसन्न झाली होती आणि receptionist ने फोन उचलला.)
ती : हेल्लो ...
तिकडून : ---
ती : she just hung up on me
मी : ( आता ती लिंडा बाई धुलाई करणार बहुतेक बॉब ची. मरो तो आयफोन , बो , बॉब आणि लिंडा. आम्ही ती काय म्हणतेय तिकडे काना डोळा करत म्हणालो ) धन्यवाद.

म्हणून आम्ही निघालो

त्यानंतर मी पुन्हा कधी community center ला पण गेलो नाही. माहित नाही बॉब ला बो (परत) भेटला कि नाही, लिंडा ने बॉब ला किती तुडवला आणि महत्वाचा म्हणजे बॉब ला आयफोन भेटला कि नाही .....

--------------------------------------------------: Epilogue :-------------------------------------------------------

आता हि गोष्टं सांगितल्यावर लोक म्हणतील कि तू मोठा राजा हरिशचंद्र आयफोन देऊन आला तिकडे, मग दुसरी गोष्टं सांगावी लागते..

--------------------------------------------------: Flash back :----------------------------------------------------
दिवस : मे २००९ चा कोणता तरी शनिवार
स्थळ : कॉलोराडो मिल्स मॉल, डेनवर (फार मोठा मॉल आहे म्हणून गेलो तिकडे , कसलं काय मॉलसारखा मॉल बाकी काही नाही. एक पैशाची (सेंट ) ची पण खरेदी केली नाही आम्ही )
वेळ : साधारण दुपारी २ किंवा ३

मी आणि माझे दोन सहकारी वेणू(गोपाल) आणि विपुल
मी : अरे मेरा मोबाईल (नोकिया इ ५१, हं असा तसा नाही बर का business series चा होता, तो परत कसा हरवला ती पण एक गोष्ट आहे पण ती censored आहे :-) ) खो गया लगता है| जेब मै नही है |
वेणू : अरे ऐसे कैसे ? लाया हि नही होगा. ( विपुल पण त्याला साक्ष आणि मी त्या दोघांवर ठेवला विश्वास)
मी : ठीक है रूम पर जाके देखते है |

पूर्ण रूम शोधून काढली पण मोबाईल काही मिळेना. मग तर्क लावण्यात आले कुठे पडला असेल त्याचे. भेटण्याची काही शाश्वती वाटत नवती पण तरी RTD ऑफिस (तिकडची PMT हो ) फोन लावला आणि काय सांगता तिकडच्या एका भल्या ड्रायवर ला तो सापडला होता आणि त्याने तो जमा पण केला होता. मग काय त्यांनी मला पासपोर्ट नंबर वगैरे विचारला आणि दुसऱ्या दिवशी मी जाऊन फोन देखील घेतला ...

--------------------------------------------------: पुन्हा Epilogue :------------------------------------------------

कळलं.....

संस्कृतीकथाअनुभव

प्रतिक्रिया

एस's picture

18 Jul 2014 - 12:58 pm | एस

आणि म्या पयला हे मगाशीच टंकलं व्हुतं पन 'प्रकाशित करा' वर टिचकी मारली आणि मिपा बंद पडलं... ;-)

हेमंत बेंडाळे's picture

18 Jul 2014 - 1:25 pm | हेमंत बेंडाळे

धन्यवाद स्वॅप्स

मस्त खुसखुशीत किस्सा ! लेखन आवडले

हेमंत बेंडाळे's picture

18 Jul 2014 - 1:47 pm | हेमंत बेंडाळे

धन्यवाद स्नेहांकिता

धमाल मुलगा's picture

18 Jul 2014 - 2:39 pm | धमाल मुलगा

भारी लिहिलंय भौ! और भी लिख्खो! :)

हेमंत बेंडाळे's picture

18 Jul 2014 - 2:53 pm | हेमंत बेंडाळे

प्रयत्न करु :-)

शिद's picture

18 Jul 2014 - 3:25 pm | शिद

बो, बॉब आणि लिंडाचा किस्सा एकदम धमाल आहे...तुम्ही सुद्धा मस्त खुलवून सांगितला आहे.

बाकी तुमचा लेख वाचून ह्या म्हणीची आठवण झाली, पेरावे तसे उगवते. :)

हेमंत बेंडाळे's picture

18 Jul 2014 - 6:12 pm | हेमंत बेंडाळे

धन्यवाद

रेवती's picture

18 Jul 2014 - 4:06 pm | रेवती

किस्सा आवडला.

हेमंत बेंडाळे's picture

18 Jul 2014 - 6:12 pm | हेमंत बेंडाळे

धन्यवाद

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jul 2014 - 4:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

काय राव सिम काढुन टाकुन वापरायचा ना? नाही आपलं गावठी मत दिलं
बाकी लेख खुसखुशीत

हेमंत बेंडाळे's picture

18 Jul 2014 - 6:16 pm | हेमंत बेंडाळे

त्या साठीच तर E ५१ चा प्रपंच दिला ना खाली. गद्गदित झाल हो फार हरवलेला मोबाईल परत भेटला तेव्हा म्हटल चला बॉब ला देखील हा आनंद देऊया

मुक्त विहारि's picture

18 Jul 2014 - 6:14 pm | मुक्त विहारि

अजून लिहा...

हेमंत बेंडाळे's picture

18 Jul 2014 - 6:18 pm | हेमंत बेंडाळे

धन्यवाद. प्रयत्न करू :-)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2014 - 9:35 am | अत्रुप्त आत्मा

@प्रयत्न करू >>> करा..नक्की होइल!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-414.gif

साती's picture

18 Jul 2014 - 6:46 pm | साती

पुढिल लेखनास शुभेच्छा!

स्पंदना's picture

18 Jul 2014 - 9:02 pm | स्पंदना

धन्यवाद साती. तुम्हाला पण शुभेच्छा! :)

मुक्त विहारि's picture

18 Jul 2014 - 11:38 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद दिल्या बद्दल

तुम्हाला पण धन्यवाद...

एस's picture

19 Jul 2014 - 8:17 am | एस

वरच्या प्रतिसादाला धन्यवाद दिल्याबद्दल तुम्हांलापण धन्यवाद! :-)

टवाळ कार्टा's picture

20 Jul 2014 - 2:54 pm | टवाळ कार्टा

शुभेछ्छुक टवाळ ;)

शुचि's picture

18 Jul 2014 - 11:33 pm | शुचि

अतिशय खुसखुशीत..... शंकरपाळीसारखा किस्सा आवडला हेमंतभाऊ.

खटपट्या's picture

19 Jul 2014 - 2:36 am | खटपट्या

मस्त वर्णन केलंय.
अजून असे अनुभव येवुदेत.

मस्त किस्सा.
नक्की काय चालू आहे ? आपण बॉब ला शोधतोय कि बो ला ?
तेवढ्यात तो आयफोन वाजला, साक्षात लिंडा देवी प्रसन्न झाली होती
हे पंचेस खास आवडएले.