आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
16 Jul 2014 - 4:22 pm

"एकशे वीस कोटींचा देश; बारा क्रिकेटपटू निवडण आणि टिम म्हणून खेळणं जड जाते" हि माझी नवी म्हण, क्रिकेटवरची कॉमेंट मुळीच नाही. आमचाच पक्ष ग्रेट म्हणून टिमकी वाजवणार्‍या (सर्वच भारतीय) राजकीय पक्षांना भारतासारख्या खंदप्राय देशातून पदाला शोभेलसे चार कॅबीनेट मंत्री (गृह,संरक्षण,अर्थ,परराष्ट्र) निवडण जड जाते, असे का ?

काळ बदलला इकॉनॉमीची वाटचाल समाजवादाकडन भांडवलशाहीकडे निघाली तरी, एकाधिकार शाही असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रणव मुखर्जींचा (आर्थीक दृष्टीकोण असलेला) प्रभाव कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे, राष्ट्रपतीपदावर नेमणूक करावी लागली. चला आपण याही गोष्टीच अभिनंदन करू. पि. चिदंबरम यांना एकदा गृहमंत्रीपद एकदा अर्थमंत्री पद असा खेळ. संरक्षण खात्यातील एके अँटोनी आणि पि. चिदंबरम चार पैकी दोनच मोजायचे. सुशिलकुमारांना आणि सलमानरावांना (माजी परराष्ट्रमंत्री बरंका !) कोणत्या मापानी मोजायचं ? त्याच्या आधीच्या सरकारही जसवंतसिंग आणि यशवंत सिन्हा यांची खातेपालट करत कन्फ्यूजन दाखवत राहील. आणि या वेळी परराष्ट्रमंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांना लिगली आणि इमोशनली राईट बोलत पाँईंट स्कोअर करता येतात पण आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल घोडं पुढे दामटताना पॉलीटीकली राईट बोलता यावयास हव. आपले सध्याचे पंतप्रधान त्यांचे जुने बोलणे पाहीले तर कोलांटउड्या मारतात अशी टिकाकारांना संधी असेल पण किमान पंतप्रधानपदा वर असताना पदाला शोभेस पॉलीटीकली राईट त्यांना बोलता येतं (ते तस अरुण जेटलींनाह येत हा अरुण जेटली आणि सुषमा स्वराजातील फरक असावा). पंतप्रधानांना सर्वच विषयांचा सखोल अभ्यास असावा असे नाही भूतान मधे नेपाळचा उल्लेख करायचा नसतो हे त्यांना माहित नसेल तर ठिक पण परराष्ट्रमंत्री सखोल आणि पॉलीटीकली राईट बोलणारा हवा. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून सुषमा स्वराजांना जेवढ्या टॉप लेव्हलच्या दिल्ली भेटीवरील आंतरराष्ट्रीय डिग्नीटरीजना भेटण्याची संधी मिळाली असेल तेवढी मोदींनाही मिळाली नसेल. पण भूतानच्या दौर्‍यावर मॅडमनी पत्रकारांना भूतानच्या दौर्‍यापेक्षा बांग्लादेशचा दौरा चांगला होईल अस भूतानमध्ये उभ टाकून सांगीतलं ( आता ब्रीकच्या ब्राझील दौर्‍यावर पंतप्रधानांसोबत परराष्ट्रमंत्री/परराष्ट्र राज्यमंत्रीही नाहीत आणि भारतीय पत्रकारही नाहीत ! :) ) . अगदी पंतप्रधानपदावरच्या शपथविधी पासून परराष्ट्र धोरणावर कामतर चालू झालय पण पत्रकारांशी अधिकतम संवाद परराष्ट्रखात्यातील सचीव मंडळींना साधावा लागतोय. परराष्ट्रराज्य मंत्रीपदावर विजयकुमार सिंग भारतीय सैन्यातले रिटायर्ड जनरल यांना बसवलय या साहेबांनी निवडून येण्या आधीपासून वाचाळवीरता दाखवली आहे.

अरुण जेटली आणि निर्मला सितारामन यांना डिप्लोमॅटीकली आणि पॉलीटीकली राईट बोलता येतं पण दोघेही अर्थमंत्रालय सांभाळण्यात व्यस्त आहेत, या दोघातील निर्मला सितारामन या पंतप्रधानांसमवेत ब्राझील दौर्‍यावर आहेत हे ठिक पण तुम्हाला तुमचा परराष्ट्रराज्यमंत्री एखादा मुत्सद्दी असावा आणि तो पंतप्रधानांसोबत असावा हे जमलेल नाही.

ब्राझीलला जाताना पंतप्रधानांच विमान फ्रँकफर्ट एवजी बर्लीनहून नेल गेल जर्मनीच्या मुख्य मर्केल बाई भेटण्याची शक्यता खूप कमी आहे हे माहीत असताना आणि ब्राझीलमधील चीन सोडता इतर मिटींगांना विस्कळीतपणा आल्याचे रिपोर्ट येत आहेत. संदर्भः फर्स्टपोस्ट म्हटल तर छोट्या गोष्टी आहेत. परराष्ट्र सचीवांना जर्मनीतील अंबॅसॅडरपदाचा आणि इतरही बराच अनुभव त्यांच्या टिमनी देवयांनी खोब्रागडेंच्या बाबतीत आणि अलिकडील केरळ नर्सेस प्रकरणात चांगल राजनैतीक यश संपादन केल आहे नाही असे नाही पण परराष्ट्र सचीव पदावर येऊन आत्ता कुठे जेमतेम एक वर्ष पूर्ण होतय. हि इंग्रजी विकिपीडियावरील भारताच्या परराष्ट्रसचीव पदी असलेल्या स्वातंत्र्य्त्तर सर्वांची यादी पहा. बहुसंख्य जण दीड दोन फारतर तीन वर्षेपदावर राहीले आहेत ! चार वर्षे पूर्ण केलेला परराष्ट्र सचीव पाहण्या साठी इंदीरा गांधीच्या कारकीर्दिच्या सुरवातीस जावे लागते आणि सहा वर्षे राहीलेला परराष्ट्र सचीव पाहण्यासाठी नेहरूंच्या कारकीर्दी पर्यंत मागे जावे लागते. म्हणजे पॉलीटीकल आणि एक्झीकटीव्ह दोन्हीही लेव्हलला स्टॅबिलीटीचा परराष्ट्रखात्यात सॉर्ट ऑफ अभाव आहे.

पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ ते सर्व खासदार ते पक्ष वाचाळ विरता टाळण्यासाठी सगळ्यांना दमात घेतलं तरीही पक्षाचा नव्हे पण पक्षाच्या गोतावळ्यातला एक वेदप्रकाश वैदिक नावाचा वाचाळ वीर निघालाच. तिकडे आमेरीकेत आमेरीकी काँग्रेसच पंतप्रधानांना आमंत्रण मिळण्या आधीच भारतीय प्रेसच्या वाचाल वीरांच ढोल वाजवण चालू आहे म्हणजे जशा मर्केल बाई भेटल्या नाहीत पुतीनरावांनी वेळेचा घोळ घातला तसाच आमेरीकेतही काही घोळ करतील. एकीकडे आपण भारतीय राजनैतीक देवयानी खोब्रागडेंच्या प्रतिष्ठेसाठी आकाश पाताळ एक करतो आणि दुसरीकडे आपल्या वाचाळवीरतेने आपल्याच पंतप्रधानांची इज्जत आपण स्वतःहून कमी करण्याच्या मागे पडलेले असतो.

हि वाचाळ विरता काय भानगड आहे, स्पिकींग पॉलिटीकली राईट म्हणजे काय ? इत्यादीचे सध्या परराष्ट्रमंत्र्यांकरताच क्लास भरवावा लागेल अशी वेळ असताना सुशिलकुमार ते वेदप्रकाश वैदिक या सर्वपक्षीय गोतावळ्यास मार्गदर्शनार्थ कोण उपलब्ध होईल ते काळच सांगेल.

* हे सुद्धा पहा २०१४ उगवत्या सरकार समोरचा पहीला; मावळत्या सरकारचा शेवटचा आंतरराष्ट्रीय राजनितीक गूंता इटालीयन ?

राजकारणविचारमाध्यमवेध

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

16 Jul 2014 - 6:42 pm | आनन्दा

मला वाटते की कोणतेही नवीन खाते स्वीकारताना त्या माणसाला किमान ५ ते १५ दिवसांचे ट्रेनिंग घेणे बन्धनकारक केले पाहिजे.

माहितगार's picture

16 Jul 2014 - 8:18 pm | माहितगार

हे ५-१५ दिवसात कस होणार ? परराष्ट्र खात्यासाठी लागणारी डिप्लोमसी सगळ्यात कठीण आणि जागतीक मुक्त व्यापार धोरणे तरीही आंतरराष्ट्रीय राजकीय समीकरणांमध्ये फारसा बदल न होणे यात राजकीय, सामरीक, आर्थीक मुत्सद्देगिरीची जबरदस्त आवश्यकता असणार, मला वाटते सर्व खात्यांसाठी नसेल तरी किमान अर्थ,परराष्ट्र,संरक्षण,गृह या चार विभागांसाठी विरोधी पक्षांचे शॅडो मिनीस्टर्स असावेत आणि त्यांना विरोधी पक्ष नेत्या प्रमाणेच किमान दर्जा देऊन प्रशिक्षणही उपलब्ध करावे म्हणजे जेव्हा केव्हा विरोधी पक्ष सत्तेत जातील तेव्हा माणूसबळाची कमतरता जाणवणार नाही.

माणूसबळच नसेल तर एकटे मोदी कुठवर पुरतील. जेटलींच बजेटस्पीच डिटेल मध्ये वाचल तेव्हा जेटलींच्या जागी इतर कोणताही भाजपा नेता ठेवला तरी असच बजेट आल असत अस वाटल असा कल्पकतेचा अभाव जाणवण्यापेक्षा मग जेटली परराष्ट्र खात्यात काय वाईट असे वाटत राहीले.

अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत दोवाल नक्कीच सक्षम आहेत पण ब्राझील सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामरीक चर्चेसाठी ते कितपत पुरेसे आहे या बद्दल मनात शंका राहतेच. समजा इटालीयन मरीन्सच्या वादावरून इटली आणि भारताचे वाजलेच तर इटलीचे सागरी आरमार भारतापेक्षा सशक्त आहे किंवा चीनचे आरमार भारता पेक्षा सशक्त आहे. आरमारासाठी जहाजे लागतात ती अव्वाच्या सव्वा किमतीस रशीयादी देशाकडन विकत घेतली जातात. ब्राझील सारख्या देशात दक्षीण आमेरीका खंडातील अनेक देशांचे प्रमुख एकत्र आलेले असताना किमान जहाज बांधणी विमान बांधणी अशा सामरीक बाबतीत काही पहल करण्याची कल्पकता भारताने दाखवावयास हवी होती.

इकॉनॉमीक टाइम्स मधील एक कार्टून उल्लेखनीय होते, मंत्री सर्व गोष्टी करताहेत पण वेगळे आणि अधिक काही करतील अशी अपेक्षा मात्र पूर्ण करू शकत नाहीत असा काही कार्टूनचा अर्थ होता.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jul 2014 - 10:04 pm | निनाद मुक्काम प...

अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत दोवाल नक्कीच सक्षम आहेत पण ब्राझील सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामरीक चर्चेसाठी
बद्दल मनात शंका राहतेच
जागतिक दहशतवादावर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांना व्याख्यान द्यायला बोलावतात , तुम्हाला बरे अश्या शंका पडतात.
जरा अजून माहिती मिळवून मग लिहिणे

माहितगार's picture

17 Jul 2014 - 7:09 am | माहितगार

तुम्हाला बरे अश्या शंका पडतात. जरा अजून माहिती मिळवून मग लिहिणे

:)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jul 2014 - 10:13 pm | निनाद मुक्काम प...

मार्केल ब्राझील ला जाणार हे आठवड्यापूर्वी जगाला माहिती होते ,लोकसत्ता मध्ये तर जर ब्राझील शी जर्मनी जिंकला तर मोदी ह्यांची भेट मार्केल ह्यांच्याशी होण्याची शक्यता नाही. असे वृत्त होते पण मोदी तरीही बर्लिन ला उतरले ह्यामागे नक्कीच त्यांची काही काही कारणे असतील.
दिल्लीच्या फुकट्या पत्रकारांना विदेशी सफर घडवून न आणता ह्यावेळी पंतप्रधान कार्यालय त्यांच्या वेब साईट वरन जनतेशी संपर्क साधत आहेत व वृत्त पत्र त्या बातम्या आपल्या पेपरात प्रकाशित करत आहेत.
आता पेड न्यूज च्या काळात मिडिया अशी उपाशी राहिली की त्यांना जळजळ होणारच मग ती बाहेर येणार
पण तरीही अश्या बातम्या येतच राहणार कारण मोदी सरकार काय करणार हे सांगत बसत नाहीत करून दाखवतात.

आशु जोग's picture

18 Jul 2014 - 11:15 pm | आशु जोग

या लेखकाची वाक्ये २, ३ ओळींनंतर संपतात. ती संपूच नये असे वाटते. लेखक माहितीपूर्ण आहे का माहित नाही

पण फार साधं सोप सरळ लिहीतो... नो कन्फ्यूजन त्याचं आणि वाचकांचही... सध्या एवढच पुरे