उस्ताद क़मर जलालवींची ही दिलकश ग़ज़ल, ग़ुलाम अलींनी यमनच्या माहौलमधे जी काय बेहद्द रंगवली आहे ती पुन्हा पुन्हा ऐकण्याजोगी आहे.
इश्काचा बिमार तिचीच कहाणी अखेरपर्यंत गात राहिला. पण (गीतात) जेंव्हा संध्याकाळच्या (तिच्या समवेत व्यतीत झालेल्या भेटीच्या आठवणींचे) उल्लेख (दाटून) आले तेव्हा (मात्र माहौल इतका व्याकूळ झाली की) पहाटपर्यंत साथ देणार्या दिपीका सुद्धा निमावून गेल्या.
दुसर्या ओळीतल्या `शामे-अलम' या शब्दावर गुलाम अलींनी केलेली तीव्र मध्यमाची जादू निव्वळ श्रवणीय.
मरीज़े मुहोब्बत उन्हींका फ़साना सुनाता रहा दम निकलते निकलते
मगर ज़िक्रे-शामे-अलम जबके आया चराग़े सहर बुझ गया जलते जलते |
_________________________________
तिच्याशी फारकत घ्यावी (आणि तिला विसरुन जावं) असा इरादा (कैकदा) केला पण तिच्या त्या लाघवी हास्याची पुन्हा (पुन्हा) मोहिनी पडली. असा (मी) किती वेळा स्वत:ला सावरत गेलो आणि (आता) जरा कुठे सावरत होतो तर... पुन्हा तोल गेला, (पुन्हा तिच्या प्रेमात पडलो).
इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन
फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम
अभी खाके ठोकर संभलने ना पाए
के फिर खाई ठोकर संभलते संभलते |
_________________________________
(सखे) जर बेईमानीची परिसिमा असेल (तर असे मिलनाचे संकेत तू किती वेळा चुकवलेस ते) स्वत:च्या हृदयाला विचार. भेटीचे वायदे तू असे काही बदलत नेलेस की मिलनाचा दिवस पुढे सरकत सरकत (आज) जगाच्या अंताचा दिवस आला.
या कडव्यात गुलाम अलींनी सरगम काय केलीये, कमाल!
मगर कोई वादा खिलाफ़ी की हद है
हिसाब अपने दिलमे लगाकर तो देखो
क़यामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता
मुलाक़ात का दिन बदलते बदलते |
________________________________
दिल बेचैन आहे असं तिला कळवलं तर ती (साफ) म्हणाली, तुझ्याशी प्रेम करणार नाही. जर (मला) दिल बहेलवायचं होतं तर (ते) तिच्यावर कुर्बान करायची काय गरज होती? (आयुष्य तसंही सरलं असतं आणि) दिल तर काय कसंही बहेललं असतं.
`बहेल जाएगा दिल बहेलते बहलते' ही जागा निव्वळ लाजवाब!
उन्हे ख़तमें लिखा था दिल मुश्तरिब है
जवाब उनका आया मुहब्बत ना करते
तुम्हें दिल लगानेको किसने कहा था
बहेल जाएगा दिल बहेलते बहलते |
____________________________
ती माझी सहचराणी झाली ती किती वेळासाठी तर दिपमाला आणि तारका विझेस्तोवर. (मला वाटत होतं ती माझं मन भरेस्तोवर साथ देईल पण) तिला घरी जायची अशी काही घाई होती की चांदणं निमावायला आलं (आणि आता पहाटेचा माहौल तयार होतच होता इतक्यात)... ती निघून गेली.
इथे `जल्दी' या शब्दोचारणावरची नजा़कतदार लगबग ऐकण्यासराखी आहे
वो महेमां रहे भी तो कबतक हमारे
हुई शम्मा गुल और ना डूबे सितारे
क़मर इस क़दर उनको जल्दी थी घरकी
वो घर चल दिए चांदनी ढलते ढलते |
प्रतिक्रिया
22 Jun 2014 - 2:40 pm | मुक्त विहारि
धन्यवाद..
22 Jun 2014 - 2:50 pm | मूकवाचक
+१
22 Jun 2014 - 3:10 pm | स्पा
क्या बात...
:-)
22 Jun 2014 - 3:24 pm | तिमा
एकदम १९८० सालांत नेऊन सोडलंत! माझी ही आवडती गजल आहे. असंच, 'मुद्दते हो गई है, चुप रहते' या गजलवरही लिहा!
22 Jun 2014 - 3:31 pm | संजय क्षीरसागर
'मुद्दते हो गई है, चुप रहते' वर जरुर लिहीन.
22 Jun 2014 - 10:21 pm | मारवा
संजय जी
काय अप्रतिम आस्वाद !
तुमचा जुना लेख ज्यात तुम्ही कवि ग्रेस यांच्या कवितेच अप्रतिम रसग्रहण केल होत त्याची तीव्रतेन आठवण झाली. काव्यार्थ तरलतेने अचुक पकडणे आणि परत सुंदर शब्दात तो त्याच्या सौंदर्यस्थळां सहीत आस्वाद करुन देणे तुम्हाला फार छान जमते.
आस्वादात तुमची संगीताची जाण ही दिसुन येते.
तुम्ही कविता मालिका घ्या हो एखादी मजा येइल
22 Jun 2014 - 10:29 pm | मारवा
ज्यांचा हा लेख वाचायचा राहीला असेल त्यांनी जरुर एकदा वाचावा. यावरील चर्चा ही निव्वळ अप्रतिम आहे. मिपाच्या क्लासिक्स मधील एक लेख !
http://www.misalpav.com/node/21296
23 Jun 2014 - 10:55 am | देशपांडे विनायक
पूर्ण चर्चा वाचली आणि आपले आभार मानावेसे वाटले !
धन्यवाद !!!
22 Jun 2014 - 10:32 pm | अनुप ढेरे
छान लिहिलय. आवडलं!
22 Jun 2014 - 10:35 pm | मदनबाण
मस्त...
>मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dick Dale & The Del Tones "Misirlou" 1963
22 Jun 2014 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा
सुंदर!!! *i-m_so_happy*
23 Jun 2014 - 12:40 am | संजय क्षीरसागर
मेहदी हसन, गुलाम अली, नुसरत फ़तेह अली खान, फ़रिदा खा़नुम या दिग्गजांनी एकेका ग़ज़लेचं सोनं केलंय. मूड येईल तसा आवडलेल्या ग़ज़लांचा रसास्वाद, त्यातली नजा़कत आणि सूफ़ियाना अंदाज़ तुमच्यासाठी सादर करतांना आनंद होईल.
23 Jun 2014 - 1:09 am | रमेश आठवले
अशाच आणखी वेचक गझला तुमच्या रसग्रहणासह येऊ द्यात.
23 Jun 2014 - 11:21 am | ज्ञानोबाचे पैजार
फारच सुंदर गजल आणि त्याचे रसग्रहणही छान केले आहे.
बर्याच दिवसांनी ऐकली. याच शमा मधल्या बाकीच्या गजल पण सुरेख आहेत.
- मुद्दते हो गयी है चुप रहेते
- आधी रात को ये दुनिया वाले
अजुनही दोन तीन चांगल्या गजल होत्या या अल्बम मधे.
आता घरी जाउन ऐकणे आले.
23 Jun 2014 - 11:24 am | चाणक्य
मस्त लिहीलं आहे. छान गजल आणि त्यातले बारकावे पण छान दाखवले आहेत तुम्ही. मजा आ गया.
एक वैयक्तिक मत :- रसग्रहण किंवा अनुवाद करताना खूप कंस आले की त्यातली जान निघून जाते.
23 Jun 2014 - 1:34 pm | संजय क्षीरसागर
त्यावेळी कंसांचा आधार घ्यावा लागतो. कारण त्या अर्थाशी सरळ मिळणारा शब्द गज़लेत नसतो.
उदाहरणार्थ :
या ओळी शायर स्वतःपुरत्या म्हणतोयं, त्यात प्रेयसीचा फक्त निर्देश आहे. त्या ओळींचा शब्दशः अनुवाद केला तर शब्दांमागे दडलेला अर्थ लक्षात येणार नाही. तिच्याशी फारकत घ्यावी असं शायर सरळ म्हणत नाहीये. तो म्हणतोयं `प्रेमापासून फारकत घ्यायचा इरादा होता'; (इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन) पण तसं लिहीलं तर तो शब्दानुवाद होईल, त्यात रसमिर्मिती होणार नाही. त्यामुळे ते रसग्रहण असं करावं लागलं :
तुम्ही तिथे कंस नाहीत असं समजून सरळ वाचलंत तर तुम्हाला मजा येईल. कंस असले तरी लेखनप्रवाहाला बाधा येणार नाही अश्या पद्धतीनंच लिहीलं गेलंय.
23 Jun 2014 - 1:40 pm | असंका
मूळ गझलीमध्ये जे शब्द नाहीत पण अर्थ लावताना आवश्यक असे शब्द सरांनी कंसात टाकले आहेत.
काल या कंसांचा अडथळा वाटून मी हा लेख नुस्ता वरवर वाचला. आज सकाळी कंसांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून वाचून बघितला. पूर्ण वेगळा अनुभव मिळाला. आणि किती सुरेख..
23 Jun 2014 - 1:48 pm | संजय क्षीरसागर
पूर्ण वेगळा अनुभव मिळाला.
दॅटस द वे! जे सांगायला मला इतका वेळ लागला तेच तुम्ही अगदी सहज सांगून गेलात. मनःपूर्वक धन्यवाद!
23 Jun 2014 - 11:47 am | चौकटराजा
मस्त रसास्वाद !
'ना जाओ छोडकर' कहनेवाले ही थे हम
लब्ज होटोंपे थम गये निकलते निकलते
23 Jun 2014 - 12:30 pm | माधुरी विनायक
उर्दू काव्य मनापासून आवडतं, पण काही शब्द कळत नाहीत आणि त्यामुळे त्या रचनेचा आस्वाद घेता येत नाही. तुमच्या या लिखाणामुळे आणखी एका सुंदर रचनेचा आस्वाद घेता आला. धन्यवाद...
26 Jun 2014 - 1:22 pm | दिपक.कुवेत
सध्या परिक्षण नुसतं घाईघाईत वाचलय पण गझल आणि वर केलेलं परी़क्षण उत्तम असणार ह्यात शंका नाहि. ऑफिस मधे असल्यामुळे घरी जाउन निवांत एकेन. धन्यवाद एका सुंदर रचेनेबद्द्ल
23 Jun 2014 - 3:44 pm | धन्या
छान रसग्रहण. आवडले.
24 Jun 2014 - 5:27 pm | अनिता ठाकूर
फार छान! मराठीतहि भीमराव पांचाळांच्या सुंदर गझला आहेत.
26 Jun 2014 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह संक्षीसेठ...! गझल निवड आवडली आणि अनुवादही.
प्रेमात पडलेल्या माणसांना आपला अनुभव वाटावा अशी आत पोहचलेली ही गझल. तिच्या अजब वागण्यामुळे ''इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम'' हे तर अतिशय सुंदर. 'इरादा था तर्के' तर अहाहा. तिला विसरुन जावं, पुन्हा तिच्याकडे बघू नये, तिचा विचार मनातही येऊ नये, तिच्याशी फारकत घ्यावी असा विचार त्या प्रियकराच्या मनात येतो तसा हाही सर्व तसा लटका राग असतो म्हणुन मला पुढच्या ओळी खास वाटल्या. प्रियकर फ़सतो ते तिच्या त्या मोहक हसण्याला. आणि अनेकदा अशा अवस्थेतून तो सावरलाही आहे आणि पुन्हा सावरला की येरे माझ्या मागल्या प्रमाणे त्याच्या वाटेला पुन्हा इरादा तर्केचा म्हणजे ठोकरा खाण्याचा अनुभव येऊ लागतो.
असो, अशाच सुंदर गझला येऊ द्या..... !
तुम्हें दिल लगानेको किसने कहा था
बहेल जाएगा दिल बहेलते बहलते |
-दिलीप बिरुटे
26 Jun 2014 - 11:48 am | संजय क्षीरसागर
आवडलेल्या ग़ज़लांची अशी मैफिल नक्की जमवत जाईन.
26 Jun 2014 - 10:30 pm | सुधीर
रसग्रहण आवडले.
"ग़ज़लांची अशी मैफिल नक्की जमवत जाईन."
वाट पाहतो.27 Jun 2014 - 7:24 pm | पैसा
छान गझल आणि तितकंच सुरेख रसग्रहण!
6 May 2015 - 11:21 pm | शब्दबम्बाळ
पुन्हा पुन्हा वाचून सुद्धा मन भरत नाही! :)
शेवटचे कडवे वाचल्यानंतर हे आठवले,
"अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें"
7 May 2015 - 12:55 pm | द-बाहुबली
:(
7 May 2015 - 8:21 pm | ईश्वरसर्वसाक्षी
वा संजयजी मस्त लिहिलय.
चुप्पी / खामोशी वरुन आठवल..
उम्र भर जलता रहा दिल और खामोशि के साथ
शमा को एक रात की सोज-ए-दिलि पे नाझ था
मित्रहो मि आता पर्यन्त मिपा चा वाचक होतो.पण आज सदस्य झालोय आणि हि माझी पहिलि प्रतिक्रिया.