पुरुषांचे ड्रायव्हिंग-माझा अनुभव

anagha kulkarni's picture
anagha kulkarni in जनातलं, मनातलं
24 Jun 2014 - 3:54 pm

बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते.
गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Jun 2014 - 3:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

>>ती बिचारी गोंधळून जाते
हिचं अडचण आहे... बाकी चालू द्या..

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jun 2014 - 3:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

शिवाय स्त्रिया विरुद्ध पुरुष...१०० तरी नक्कीच

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Jun 2014 - 4:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अहो १०० ने काय होणार किमान ३०० धरुन चला... :)

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 4:05 pm | पिलीयन रायडर

स्टिरिओटाईपला धक्का दिल्या बद्दल अभिनंदन..!

बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत.. त्यामुळे त्यांचा खुप गोंधळ उडतो रस्त्यावर हे खरंय...
पण पुरुष अत्यंत बेक्कार ड्राइव्ह करताना पाहिले आहेत.. बाईक नागमोडी डुलवत कट मारत जाणारे.. आपण मोठ्या गाडित बसलो म्हणजे बाकीचे सगळे किडे मुंग्या समजुन वाट्टेल तशी गाडी चालवणारे.. कारण नसताना हॉर्न वाजवणारे.. रिक्षावाले (इथे काही वर्णनाची गरजच नाही).. सिग्नल तोडणारे.. बहुतांशी पुरुषच असतात..

आणि कदाचित असंही असेल की ह्याचा बायकांना जेवढा त्रास होतो तेवढा इतर पुरुषांना होत नाही / नसावा..

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2014 - 4:18 pm | टवाळ कार्टा

बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत

याची पाटी लावायची काय??? ;)

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 4:29 pm | पिलीयन रायडर

लावा की.. माझ्या पप्पांचं काय जातय..!!

आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी..

पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)

आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी..

ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.

पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)

त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा.

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 4:51 pm | पिलीयन रायडर

ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.

लक्षात ठेवा हे वाक्य बरं का!!

त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा

.

तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं.. पण आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे..
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात... प्रश्न्च संपला किनई..

एस's picture

24 Jun 2014 - 5:27 pm | एस

माझेच वाक्य मलाच लक्षात ठेवायला सांगून आपण मी सोयीप्रमाणे भूमिका बदलणारा आहे असे ध्वनित केले आहे. माझे मिपावरील कुठलेही लेखन/प्रतिसाद वाचून मी असे काही केल्याचे दाखवून द्या असे मी आपणांस विनम्र आव्हान देत आहे. माझ्या तुम्ही उद्धृत केलेल्या प्रतिसादातही जास्तीत जास्त समतोलपणा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. तसेही जर प्रश्न संपल्याचे तुम्हांला मान्य होते तर मग पुन्हा

तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं..

ह्याची आवश्यकता नव्हती. तुमच्या प्रतिसादातील खवचटपणा जर इतर कुणाला उद्देशून असेल तर मला असल्या निरर्थक स्कोअर-सेटलिंगमध्ये रस नाही. चालू द्या.

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 5:36 pm | पिलीयन रायडर

ओ तुम्ही बरे आहात ना...
तुम्हाला काय जोक बिक कळतो की नाही?
कसले डोंबलचे स्कोर सेटलिंग* आणि नम्र आव्हानं...
टाईमपास करतेय मी..
बाकी तुम्ही भुमिका बदला न बदला.. (परत एकदा) माझ्या पप्पांचं काहीही जात नाही.. त्यामुळे असलं काही मला म्हणायचही नाही.. पण असोच....

फकत तुमचा असा प्रतिसाद पाहुन अमंळ आश्चर्य वाटले हे जाता जाता सांगुन ठेवते.. (ह्यातुन तुमच्या बद्दल काहीही ध्वनित वगैरे करायचं नाहीये.. नोंद घेणे)

* - (आणि तुमच्याशी कशाला ब्वॉ?? आपण तर तुम्हाला इज्जतीत नेहमी चांगलेच प्रतिसाद दिलेत..)

हा जोक आहे? ठीक आहे मग. माझ्या गैरसमजाबद्द्ल मी आपली माफी मागतो.

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 5:48 pm | बॅटमॅन

मागाच माफी तुम्ही. जोक करण्याचा हक्क सर्वांना नाहीये.

धन्या's picture

24 Jun 2014 - 5:52 pm | धन्या

ऑरवेल साहेबांच्या त्या प्रसिद्ध वाक्याची आठवण झाली.

All animals are equal, but some animals are more equal than others.

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 5:55 pm | बॅटमॅन

All are equal, but some are more equal.

Similarly:

All are chauvinist, but only a few get to parade their chauvinism as being rational.

अनुप ढेरे's picture

24 Jun 2014 - 5:58 pm | अनुप ढेरे

All are chauvinist, but only a few get to parade their chauvinism as being rational.

=))

प्रसाद गोडबोले's picture

24 Jun 2014 - 6:46 pm | प्रसाद गोडबोले

all मिपाकर्स are equal but some मिपाकर्स are more equal ! =))

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 6:48 pm | बॅटमॅन

इंडीड!!!!

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 5:54 pm | पिलीयन रायडर

काय म्हणायचय काय नक्की?

आणि बादवे.. झालेत हं आमचे गैरसमज दुर..
उगा काड्या लावु नकात..

आम्हीअन काड्या लावणार? भलतंच? अहो औकात तरी आहे का आमची तेवढी? आम्ही आपले साधे शॉव्हिनिस्ट आहोत ओ. आमची तेवढी लायकी नाही ओ.

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 6:00 pm | पिलीयन रायडर

लायकी नाही बद्दल सहमत..
शॉव्हिनिस्ट बद्दल अंशतः सहमत..
"साधे" बद्दल असहमत..

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 6:02 pm | बॅटमॅन

चला, मिपावरील 'मोर ईक्वल' कडून पावती मिळाल्याचे पाहून डॉळे पुनरेकवार निवले.

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 6:07 pm | पिलीयन रायडर

लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!!
बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!! लगे रहो..

लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!!

त्या गाजराची पुंगी वाजवा, तेवढेच मनोरंजन होईल मिपाकरांचे =)) न वाजली तर मोडून खा, तेवढंच आरोग्याला चांगलं असतं =))

बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!!

ओह सॉरी हां तुमचा यूएसपी चोरला का? अरेरेरे, दुसरा नाराच उरला नसेल नैका आता...चला आता 'हौ टु परेड वन्स ओन शॉव्हिनिझम" चे क्लासेस घ्या बघू! आयॅम शुअर लै गर्दी होईल =))

जेनी...'s picture

24 Jun 2014 - 7:20 pm | जेनी...

*biggrin*

होकाका's picture

25 Jun 2014 - 11:40 am | होकाका

George Orwell च्या Animal Farm मधल्या "... some are more equal" या वाक्याचा चुकीचा अर्थ बरेचदा लावला जातो. इथे more equal चा अर्थ आहे people who are not special at all -- they are "more equal". या उलट, "Less equal" means "people with some (special) difference".

बाकी चालू द्या ध्धम्माल....
.

होकाका's picture

25 Jun 2014 - 11:20 am | होकाका

@ टवाळ कार्टा
ही घ्या पाटी:
As a senior citizen was driving down the freeway, his car phone rang. Answering, he heard his wife's voice urgently warning him, "Herman, I just heard on the news that there's a car going the wrong way on 280. Please be careful!"
"Hell," said Herman, "It's not just one car. It's hundreds of them!"

टवाळ कार्टा's picture

25 Jun 2014 - 4:07 pm | टवाळ कार्टा

=))

मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत,

शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले.

अपेक्षा पूर्ण केल्याने लेख आवडला. शिवाय चालू फ्याशनचा असल्याने वर राजेंद्र मेहेंदळे म्हणताहेत त्याप्रमाणे १०० तरी कुठंच जाणार नाहीत. छानच गं, मस्तच गं, इ.इ.इ. झालंच तर माझ्या प्रतिसादाला शिव्या, संपादन, एकूण काय टिपिकल प्रवास =))

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Jun 2014 - 4:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

=))

बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला विद्यार्थी. पहिल्यापासून असाच तेजस्वी. पुरूषजातीवर अन्याय झाल्याची शंका जरी आली तरी उसळून भांडायला उठे. पुरूष ही "जात" नव्हे हे मी त्याला एकदा असंबद्ध आणि तुटक तुटकपणे सांगत असताना नेमके हेडसर आले आणि "जातीवरून बोलते" म्हणून माझी बदली येरवड्याच्या शाळेत केली.

शिद's picture

24 Jun 2014 - 4:23 pm | शिद

कहर... फुटलो. *lol*

@बॅटमॅन -_/|\_

पोतदार-पावसकर म्याडमचा विजय सो =)) _/\_ =)) _/\_ =)) _/\_ =))

अनुप ढेरे's picture

24 Jun 2014 - 6:00 pm | अनुप ढेरे

=))

खटपट्या's picture

25 Jun 2014 - 5:45 am | खटपट्या

"जातीवरून बोलते"

आदुबाळ हि स्त्री आय डी कि पुरुष आय डी ?

वपाडाव's picture

25 Jun 2014 - 8:10 pm | वपाडाव

आपण काय नाड्या चेक कर्णार काय?

वप्या, चक्क तू? अत्तर संपले काय?

खटपट्या's picture

25 Jun 2014 - 11:01 pm | खटपट्या

अहो, स्री आयडी असेल तर ताई बोलेन. पुरुष आयडी असेल तर दादा म्हणेन.
बाकी काय करणार आम्ही. मला माझी स्वतःची नाडी बघायची आहे (शशिकांत काका कडे)

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 4:25 pm | पिलीयन रायडर

ए तू अपर्णा रामतीर्थकर नावाच्या बाईंची भाषणं ऐक..
त्यात त्या म्हणतात..

"...सांगायला वाईट वाटतं पण जास्त चुका बायकांच्या असतात.. पुरुषांच चुका फक्त दोन.. एक की ते आईचंही ऐकतात.. बायकोचंही ऐकतात.. बहीणीचही ऐकतात.. "
दुसरी चुक नक्की काय ते आठवत नाही पण काहीतरी "बायका त्यांच्या मनात काहिही भरवुन देतात.. त्यांच्या बिचार्‍यांच हेच चुकतं की ते ऐकतात.."

तुझा आत्मा शांsssssत होईल..!!

(त्या बाई अजुनही काय काय बरळतात.. बायकांनी नवर्‍या समोर डोकं चालवु नये.. अगदी अंतराळवीर असलात तरी भाकरी यायला हवीच.. वगैर वगैरे.. तुमच्या पुरुष विभागच्या प्रवक्त्या म्हणुन पुरुषांच्या साईडनी तुझ्यापेक्षा जास्त भांडतील..!!)

बाकी मी तुझ्या प्रतिसादाला काहीहि म्हणलेलं नाही हयाची नोंद घ्यावी..

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 4:57 pm | बॅटमॅन

ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक आहेत. त्या आपल्या नवर्‍याला बहुधा म्हणत असाव्यात, "तू मला धाकात ठेव. नै ठेवलास तर याद राख, मारच खाशील माझ्याकडून. मी तुला नेहमी भिऊन राहीन. नै राह्यले तर बघच मग तू!!"

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 4:58 pm | पिलीयन रायडर

आई ग्ग!!!! खतरनाक!!!!

हाडक्या's picture

24 Jun 2014 - 7:15 pm | हाडक्या

अरारारा ...

या एका (हिंसक) व्हिडोसारखा प्रसंग डोळ्यासमोर आला.. *lol*

राही's picture

24 Jun 2014 - 6:00 pm | राही

'I am the boss of my house and I (even) have my wife's permission to say so."

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 6:03 pm | बॅटमॅन

हा हा हा, सहीच!!

विकास's picture

25 Jun 2014 - 12:25 am | विकास

हे घ्या उदाहरणादाखल एक भाषण! एव्हढे सांगून (पुढे काहीच सांगण्यासारखे न राहील्याने) मी माझा प्रतिसाद संपवतो! :)

विटेकर's picture

25 Jun 2014 - 2:16 pm | विटेकर

<< अपर्णा रामतीर्थकर >>

असहमत . लव जिहाद या विषयावर त्यांचे विचार ऐकले होते . अप्रतिम . फार झोंबणारे खरे बोलत होत्या त्या.

बाकी चालू द्या !

पिलीयन रायडर's picture

25 Jun 2014 - 2:23 pm | पिलीयन रायडर

ते मी ऐकलं नाहीये.. मी एकच भाषण ऐकलं.. दिड तासाचं होतं.. पैकी मी ४५ मिनिटं ऐकु शकले.. नंतर माझं डोकं उठलं.. बाईंकडे चांगलं बोलण्याची कला आहेच.. पण "स्त्री" ह्या विषयावर जे काही बोलल्या, ते अतिरेकी होतं हे नक्की..

असो.. हा विषय एका शतकी धाग्याचा आहे.. कशाला इथे वाया घालवा!!

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2014 - 3:18 pm | llपुण्याचे पेशवेll

जनरली स्त्री या विषयावर जालावरही चर्चिले जाते ते अतिरेकीच असते. कदाचित रामतीर्थकर बाईंच्या विरुद्ध पण अतिरेकी तर्‍हाच. परंतु तुम्ही असो म्हणून आम्हीही असो.

पिलीयन रायडर's picture

25 Jun 2014 - 3:27 pm | पिलीयन रायडर

सुवर्णमध्य कुणाला साधलाय पेशवे?

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 3:30 pm | बॅटमॅन

सोनाराला.

हाडक्या's picture

25 Jun 2014 - 8:11 pm | हाडक्या

"जातीवरून बोलतो"

असे तुम्हाला का म्हणू नये ?

म्हणा बॉ. अलीकडे काय सुतावरून जात गाठायची फ्याशनच आलीये त्यात अजूनेक भर. हाकानाका!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Jun 2014 - 1:34 am | विश्वनाथ मेहेंदळे

शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले.

अगदी अगदी !!! मागे एका मिपा ग्रुप वर पुढील वाक्य ऐकले होते
"जर एखाद्या बाईने पुरुषाला चारचौघात शिवी दिली, तर याचा अर्थ त्याने तशीच काही चूक केली असली पाहिजे" शिवाय "सगळ्या शिव्यांचे जनक पुरूषच असणार", "बायका शिव्या देत नाहीत" अशी चिक्कार मजेदार चर्चा झाली. त्यानंतर मला कसलेच आश्चर्य वाटेनासे झाले.

रच्याकने :- १०० झाले !!!!

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 12:32 pm | बॅटमॅन

पण हे सगळं शक्य झालं ते साहेबांच्या महिला धोरणामुळेच बरं का ;)

सुखी's picture

25 Jun 2014 - 2:13 pm | सुखी

खीक्क

सहसा पुरूष दुचाक्या ड्राईव्ह करत असताना सर्वात डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे दोघा किंवा तिघा बायकर्सने एकमेकांना समांतर तेही रमतगमत जाणे! जाम राग येतो अशा महाभागांचा! हा प्रकार बायकांना करताना अजून तरी पाहिलेले नाही.

कुठूनही युटर्न घेणे, लेन कधीही बदलणे हे विषय स्त्री पुरूष या मुद्द्यांवर नाही तर मुंबई-पुणे या मुद्द्यावर लढायला हवेत ना? (घ्या! आता १०० काय घेऊन बसलात राजेश राव! ;) )

एस's picture

24 Jun 2014 - 6:05 pm | एस

अशाच पद्धतीने दोन रिक्षाचालक एकाच्या रिक्षाला दुसरा एक पाय टेकवून पूर्ण लेन अडवून चालत असतात. ते तर जाम डोक्यात जातात. मी एकदा संधी मिळताच अशाच रमतगमत चाललेल्या दोन रिक्षाचालकांना ओलांडून पुढे गेलो आणि शांतपणे रस्त्यातच गाडी थांबवली. झक मारून त्यांना त्यांचे फॉर्मेशन तोडावे लागले. नाद नाय करायचावाल्यांचा खरंच एकदा नाद केला की त्यांचा आवेश किती पोकळ असतो हे कळते. म्युच्युअल डॅमेज थेरपी.

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jun 2014 - 6:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

महापाप
अहो त्यातली एक रिक्षा बंद पडलेली अस्ते म्हणुन ते असे टोविन्ग करतात..त्यात रस्ता अडवायचा हेतू नसतो

एका पायाने टोईंग करतात, तेही दोन्हीं रिक्शांमध्ये फुल माणसे भरलेली असताना. सुपर्म्यानच असावेत बहुतेक. वरील उदाहरणात ते आपसूकच शेपरेट शेपरेट नीट चालवू लागले, आणि त्यांच्या संथ वेगामुळे त्या एवढ्याश्या पुलावरील मागे वाहनांची लागलेली रांग सुरळीत झाली.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2014 - 10:45 am | llपुण्याचे पेशवेll

असहमत समांतर ड्रायव्हींगचा अनुभव प्रचंड घेतला आहे. मुले समजा समांतर जात असतील तर हॉर्न मोठ्याने रेटल्यावर मधली दुचाकी एकदम उसळून बाजूला तरी जाते पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहते. संधी मिळाल्यावर ओव्हरटेक जर करत असू तर या मुली अशा काही रागाने बघतात की त्या बाजूला होण्यास हॉर्न नाही तर कागदी रॉकेट वगैरे मारले आहे. आमचे बंधूराज अशा वेळेला गाडी जवळ नेऊन जोराने ओरडतात "गप्पा बागेत/घरी जाऊन मारा!"

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 12:32 pm | बॅटमॅन

हा हा हा, जबरीच =))

प्रभाकर पेठकर's picture

25 Jun 2014 - 2:45 pm | प्रभाकर पेठकर

माझा अनुभव कॉलेजकुमारांसंबंधी आहे.
रात्री १२ नंतर चित्रपट सुटल्यावर घरी निघालो असता ५-६ बाईक वाल्यांनी आडव्या एका रांगेत बाईक्स चालवून आख्खा रस्ता अडविला होता. मुद्दाम सावकाश चालवत होते. माझी कोंडी केल्याची मजा लुटत होते. कितीही जोरात आणि कितीही वेळ हॉर्न धरून ठेवला तरी बाजूला होत नव्हते. शेवटी माझी गाडी त्यांच्या पैकी एकाच्या बाईकला धडकविण्याइतकी जवळ आल्यावर त्यांची फळी तुटली मी माझी गाडी दामटवून, खिडकीची काच खाली करून एकाला सिग्नलपाशी अडवला आणि हात बाहेर काढून त्याची कॉलर पकडली. तेंव्हा इतर सर्व जणं पळून गेले. ज्याला मी पकडले होते त्याचा शर्ट फाटून कॉलर माझ्या हाती आली आणि तो रस्ता दुभाजकावर बाईक चढवून विरुद्ध रस्त्याने पळून गेला. ते ५-६ जणं असून एकाच्या ही अंगात माझ्याशी २ हात करायची हिंमत नव्हती. डरपोक होते. पण रात्रीची वेळ आणि माझ्यासारख्या कुटुंबवत्सल माणसाला पाहून त्यांना चेव आला होता. पण प्रसंगी हा कुटुंबवत्सल प्राणी आपले थोबाड ही फोडू शकतो हे पाहील्यावर पांगापांग झाली.

पण पुपे, तुम्ही मला कधी पाहिलं ब्वॉ श्या घालताना...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Jun 2014 - 11:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ही समान्तर बाईक्स चालवत गप्पा मारण्याची पद्धत मुम्बईत पाहिली नाही कधी. पुण्यात सर्रास करतात. मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा चाट पडलो होतो.

पैसा's picture

26 Jun 2014 - 6:40 am | पैसा

पुणेकरान्नो लक्ष असू द्या!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Jun 2014 - 8:57 am | विश्वनाथ मेहेंदळे

मुम्बईत खरेच नाही पाहिला मी हा प्रकार. गेल्या शनिवारी पुण्यात मित्राकडे आलो होतो. तो वर्जिनल मुम्बईकर, गेली काही वर्षे पुण्यात सेटल (भोग असतात हो नशिबाचे ;-) ) त्याच्याशी याच विषयावर चर्चा चालली होती. म्हणाला, आता कुणी माझ्याशी असे बोलायला लागले तर मी दचकत नाही, बोलू शकतो. आपणहून बोलण्याइतका पुणेकर झालो नाहिये अजून, असेही म्हणाला (पुण्याच्या भाषेत म्हणला)

पैसा's picture

26 Jun 2014 - 10:44 am | पैसा

*ROFL*

मालोजीराव's picture

26 Jun 2014 - 12:13 pm | मालोजीराव

पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहते

बरोबर आहे पुपे…
आणि कधी जर आम्ही एखाद्या हॉट स्कूटीवालीच्या समांतर गाडी चालवू लागलो तर लगेच या 'काकू' टाईप चालकांच्या पोटात दुखायला लागतं आणि मग जोरजोरात हॉर्न वाजवणं चालू होतं.

हॉट स्कूटीवालीच्या निमित्ताने का होईना, मालोजी अज्ञातवासातून बाहेर आला =))

नाही हो. अस काही नाहीये. मी रोज डिस्कवर १३५ बाईकवरुन प्रवास करतो पण अगदी स्कुटी पळविणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक करुन जातात. माझा स्पीड जेमतेम ५०-६० प्रति कि.मी. असतो.

तुषार काळभोर's picture

26 Jun 2014 - 10:41 am | तुषार काळभोर

डिस्कवर १३५ बाईक
जेमतेम (!!!)
५०-६० प्रति कि.मी.
स्कुटी पळविणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक....

आरारारा...... लई वैट दीस आल्यात...
(ह घ्या असं सांगाय पायजे काय? ;) )

प्रभाकर पेठकर's picture

24 Jun 2014 - 4:36 pm | प्रभाकर पेठकर

>>>>ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात .

अशी भांडणं (जी माझी अनेकदा होतात) ती तुम्हीच तुमच्या लेखात दिलेल्या एक-दोन कारणांमुळे होतात.
एकदा हिंजवडीच्या अलिकडे एका कारने अगदी जवळून माझ्या गाडी समोर गाडी घातली. त्याला अडविले असता दिशादर्शक (इंडिकेटर) टाकला होता नं, दिसत नाही का? असा उर्मट प्रश्न केला. त्याच्या मते दिशादर्शक टाकला की आपल्याला कशीही कुठेही वळायला कायदेशीर परवानगीच आहे. चांगला कुटुंब वत्सल गृहस्थ. बरोबर त्याची पत्नी आणि मुलगीही होती. त्याला मी हिंजवडी वाहतूक पोलीस चौकीत घेऊन गेलो. तिथे पोलीसाला सांगितलं की त्याने कशी असुरक्षित मार्गिका बदलली आणि अपघात टाळण्यासाठी मला कसा कचकावून गतिरोधक (ब्रेक) दाबावा लागला. त्यावर त्याला समजावून सांगण्या ऐवजी त्या पोलीसाने त्या कुटुंबाला 'तुम्ही जा साहेब, मी बोलतो ह्यांच्याशी' असे सांगून सोडून दिले आणि 'अपघात झाला का?' असे मलाच विचारले. मी म्हंटले पण, 'अहो, दुर्घटना घडल्यावरच पोलीसात जायचं का? दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणं चालकाचं कर्तव्य नाही का? तो जर तशी काळजी घेत नसेल तर तो चालक अपघाताला निमंत्रण देऊन, नियम पाळत वाहन चालविणार्‍या इतर निष्पाप चालकांच्या आयुष्याशी खेळत नाही का?' असे म्हंटल्यावर तो पोलीस म्हणतो, 'तुम्ही म्हणता तसं झालं तर रामराज्य येईल. आमची गरजच काय?' मार्गिका बदलण्यासाठी वाहतूक खात्याचे कांही ठोस नियम आहेत. त्या पोलीसाची त्याच्या वरीष्ठांकडे तक्रार करावी असा विचार मनात आला होता पण काळ उलटल्यावर आपला राग कमी होतो, तक्रारींचा कांही परिणाम होत नाही आणि वरीष्ठाच्या वाहतुक सुरक्षेच्या ज्ञानाविषयी असलेली साशंकता ह्यामुळे तो प्रसंग तिथेच आटोपला.

>>>> पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना

चर्चा करून कांही होत नाही, पोलीसात जाऊन कांही होत नाही. अवजड वाहनांना चढणीवर उभे करून नंतर आपण निघून जावे आणि त्याला ते भरलेले वाहन घाटात चढविण्यासाठी त्रासदायक व्हावे एवढेच आपण करू शकतो.

पुरुष काय किंवा स्त्री काय, पुण्यात वाहतुकीचे नियम पाळून आणि आपल्या बेदकारपणे वाहन चालवण्याने आपल्याबरोबर इतरांचेही जीव धोक्यात येऊ शकतात याची जाणिव ठेवणारे वहनचालक विरळाच.

कपिलमुनी's picture

24 Jun 2014 - 5:12 pm | कपिलमुनी

युगप्रवर्तक चेसुगुंची आठवण झाली ..

भावना कल्लोळ's picture

24 Jun 2014 - 5:22 pm | भावना कल्लोळ

अशीच स्थिती दिल्ली दरबार च्या सिग्नल पासुन ते डोंगरी पर्यंतच्या रस्त्यावर असते. सिग्नल असुन नसल्या सारखा, कोणी कशी हि गाडी नेतात त्यात तर बाईक स्वार तर सगळे "धुम" शान मध्येच. पोलिस हि या एरिया मध्ये दुर्लक्ष करतात कारण अल्पसंख्याक इथे जास्त प्रमाणात. पोलीसावरही हाथ उचलायला कमी करत नाहीत. इथुन स्टेशन पर्यंत चालत जायचे कधी म्हंटले तरी जीव मुठीत घेऊन जावे लागते कारण स्त्री पाहिली कि कट ठरलेला.

स्त्री पाहिली कि कट ठरलेला.

ही मनोवृत्ती पुरुषांच्या सुप्त भीतीतून येते. "व्हाट डज् एव्हरी पॉवरफुल मॅन वॉण्ट? मोर पॉवर." असे आहे ते. ह्याचेच सामान्यीकरण करायचे झाले तर नियम तोडून गाडी दामटणे ह्यात आपले कोणी वाकडे करू शकत नाही हे इतर वाहनचालकांना दाखवून देणे आणि त्यातून स्वतःचे तथाकथित सामर्थ्य/वर्चस्व/नियंत्रण पडताळून पाहणे हा उद्देश असतो.

अरुंधती रॉय यांना ढोबळमानाने उद्धृत करायचे झाले तर 'द स्ट्रॉन्ग हॅव मोर फीअर ऑफ द वीक, बिकॉज दे थिंक द वीक विल अल्टीमेटली गेट स्ट्रॉन्ग.' (वाक्य नीट आठवत नाही.)

हा धागा तसा सुना सुनाच गेला नै! ;)

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 5:39 pm | पिलीयन रायडर

टु सुन रेवक्का!!

रेवती's picture

24 Jun 2014 - 6:01 pm | रेवती

हम्म्म्म्.......खरच की!

ठीकाय, बायका गोंधळतात ड्राईव्ह करताना यात पुरुषांचीच चूक असते. खुश?? =))))

ज्याप्रमाणे काँग्रेसच्या 'हाता'मागेही आरेसेसचा हात असतो =)) =)) =))

आज सकाळचाच प्रसंग !! बर्‍यापैकी लहान गल्लीत एक काकू कार चालवत समोरुन येत होत्या. हॉर्न देऊनही त्यांची गाडी माझ्या दुचाकीच्या दिशेने वळतेय हे पाहिल्यावर मी बाईक थांबवली. कार जवळ आल्यानंतर कळलं त्या काकू उजव्या हातात मोबाईल धरुन तो डाव्या कानाला लावून मोबाईलवर बोलत होत्या आणि डाव्या हाताने स्टेअरिंग सांभाळलं होतं.

आता धागा वाचल्यावर मला हे लक्षात येतंय की चूक त्या काकूंची नव्हती. तो आलेला कॉल जर एखाद्या पुरुषाचा असेल तर ती त्याची चूक होती तो जर पुरुषेतर कोणाचा असेल तर 'मी' दोनदा हॉर्न दिल्यामुळे काकू बावचळल्या असं म्हणावं लागेल. थोडक्यात काय, चूक त्यांची नव्हतीच. ;)

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 6:17 pm | बॅटमॅन

अगदी अगदी. तुझीच चूक रे सुडक्या =)) काकूंचा काय दोष? आरामात फोनवर बोलत होत्या ते दिसलं नै ते नै, वर आणि हॉर्न मारतोस? कुठं फेडशील ही पापं =))

एस's picture

24 Jun 2014 - 6:24 pm | एस

तुमच्या दुचाकीला रिवर्स गियर नव्हता, नव्हता तर तुम्ही खास बनवून घेतला नाही, किमानपक्षी दुचाकी पायाने ढकलत ढकलत मागे जाण्याचा क्षीण प्रयत्न केला नाही, वगैरे वगैरे...

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 6:26 pm | बॅटमॅन

अन सर्वांत मोठे पाप म्हणजे त्या काकू होत्या हे पाहिल्यावरही हॉर्न मारण्याचे डेरिंग केले. काका असते तर चाललं असतं, पण काकू दिसताहेत अन तरी हॉर्न? उद्धटपणाची कमालच झाली ही तर!

एस's picture

24 Jun 2014 - 6:31 pm | एस

काहीही करा अथवा न करा, प्राईम सस्पेक्ट इन द सो कॉल्ड क्राईम नेहमी तुम्हीच.

अर्थातच. शिवाय काही बोललं तर स्त्रीद्वेष्टेपणाचा (साला हा लय पापिलवार चलनी सबुद है आजकालचा) शिक्का तर आहेच.

खटपट्या's picture

25 Jun 2014 - 5:58 am | खटपट्या

एका बाईक च्या मागे लिहिले होते

महिला ड्रायव्हर म्हणजे आकाशातले तारे, ते तुम्हाला दिसतात पण त्यांना तुम्ही दिसालच याची खात्री नाही

बाईकच्या मागे एवढी जागा होती? ;-)

खटपट्या's picture

25 Jun 2014 - 11:51 am | खटपट्या

ds

vrushali n's picture

25 Jun 2014 - 9:52 am | vrushali n

I saw a girl on scooty giving left indicator and she actually turned left . SHOCKING ..

Achhe din Aane wale hain