बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते.
गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
प्रतिक्रिया
24 Jun 2014 - 6:10 pm | दिनेश सायगल
स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी पुरुषांना नावे ठेवण्यासाठी काढलेला धागा.
24 Jun 2014 - 6:13 pm | बॅटमॅन
"स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी" म्हटले की "पुरुषांना नावे ठेवण्यासाठी" हे अध्याहृतच आहे ओ.
24 Jun 2014 - 6:20 pm | दिनेश सायगल
खरंय हो.
25 Jun 2014 - 4:08 pm | टवाळ कार्टा
म्हन्जे त्ये "आणा हिथं" सुद्दा शेमच का? ;)
25 Jun 2014 - 4:11 pm | बॅटमॅन
शक्यता नाकारता येत नाही..यद्यपि प्रथमहस्ती विदा नसल्याने तूर्त सर्वार्थ साधणारी गुळणी ऊर्फ मौन धरून बसलो आहोत.
24 Jun 2014 - 6:16 pm | राजेंद्र मेहेंदळे
म्हटले होते की नाही १०० कुठेच गेले नाहीत
24 Jun 2014 - 6:30 pm | शिद
ह्याबद्दल पण बोला म्हणजे लेखात नमूद केलेल्या तुमच्या निरीक्षणांबरोबर तुलना करता येईल. की फक्त दुसर्यांनाच नावं ठेवायची?
माझं निरीक्षणः
१. स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी पुरुषांना नावे ठेवण्यासाठी काढलेला धागा. - श्रेयअव्हेरः दिनेश सायगल.
२. स्वतःकडे चारचाकी असल्याची जाहिरात.
24 Jun 2014 - 6:35 pm | बॅटमॅन
क्या तोबी बोलरा इन्हे!
धागा बोल्ता, ये मरद लोगां कैसा ड्रायविंग करते बोलके लिखने होना. उस्मे जित्ती जित्ती गल्ति होती, सब्बिच मरद लोगोंकी आउर खाला लोगां जो करते उसका बी जिम्मेदारी मरद लोगोंकाइच! अब ऐसे बोल्ते तो तुम क्या तो बी बोलरा रे? पयलेइच बोला ना सब गलती मरद लोगांच करते, औरतानको नक्को बोल करके? खुंदल खुंदल के ड्रायविंग करे तोबी गलती, हल्लू हल्लू गाडी मारे तोबी गलती! ठोका तोबी गलती, नै ठोका तब्बी गलतीच!! आउर दूसरा सोचो नक्को तुम!
24 Jun 2014 - 6:46 pm | शिद
आजचा हा दुसरा दंडवत _/|\_ *lol*
यानिमित्ताने 'द अंग्रेज' पाहणे आलं. (माहीत नाही कितव्यांदा ते :) )
24 Jun 2014 - 6:49 pm | बॅटमॅन
पहा पहा ;)
24 Jun 2014 - 6:35 pm | धन्या
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं पाहायचं वाकून. :D
24 Jun 2014 - 6:47 pm | शिद
*biggrin*
24 Jun 2014 - 6:32 pm | धन्या
ते उजवीकडे सिग्नल देऊन डावीकडे वळणं किंवा उलट याबद्दल कसे कुणी अजून लिहिले नाही? :)
24 Jun 2014 - 6:42 pm | प्रसाद गोडबोले
आता माझा कालचाच अनुभव सांगतो :
संध्याकाळच्या वेळेला घरी येत होतो , हिंजवडी चौकाचौनेहमीप्रमाणेच भयंकर टृअॅफीक होते, पण दोन कार च्या मधे जी स्पेस होती त्यातुन मला पटकन माझी बाईक काढुन पुढे जाता आले असते ...पंण त्या मागची कार मॅडम चालवत होत्या ... मी मधुन जाणार असे लक्षात आलायावर लगेच गाडी पुढे घेतली आणि म्हणालाय "नो" ( हे मी लिप्स रीडींग वरुन ओळखलं )... शुध्द देशी आडगेपणा !!
आता खरंतर , बाईकवाले असे बाईक बाजुला काढुन चारचाकी गाड्यांना रस्ता रिकामाच करुन देत असतात , पण ह्या मॅडमना ते मान्य नव्हतं
मग काम मी बाजुने बाईक काढली , पुढे मोकळा रस्ता होता तरी मुद्दाम मॅडमच्या गाडी पुढे जाऊन थांबलो ... सिग्नल सुटला तरी थांबलो , हॉर्न वाजवत होत्या तरी थांबलो . "कफ यु " म्हणण्याचा आणि मध्यमाअंगुली निर्देश करण्याचा अनावर मोह होत होता पण घरच्या संस्कारांना जागुन तो आवरला ...
अवांतर : आता ह्या असल्या अडग्या लोकांवर अजुन एक अभिनव प्रयोग करायचे ठरवले आहे ... एक काळी बाहुली विकत घेवुन सोबत ठेवणार आहे अन असला कोणी आडगे पणा केला की फक्त एका चिठ्ठीवर नंबर लिहिलाय असे दाखवायचे अन ती ती चिठ्ठी काळ्या बाहुलीला टोचायची अन मग ती काळी बाहुली असल्या लोकांसमोर नाचवायची
:D
(असले लोक आधीच घाबरट असतात त्यांच्याबर काही सायकॉलॉजिकल परिणाम होतो का ह्याचा अभ्या करता येईल ह्या निमित्ताने =)) )
24 Jun 2014 - 6:51 pm | बॅटमॅन
भावलीची ऐड्या यकदम जबराट!!!!!
24 Jun 2014 - 7:28 pm | हाडक्या
अवांतर, पण सध्या 'अभ्या' कुठे आहे..? तो सोलापूरचा ..
24 Jun 2014 - 6:42 pm | पिलीयन रायडर
अनघा तै.. शक्य तेवढी मदत केली आहे.. योग्य दिशेने वळवला आहेच.. मंडळी (नेहमी प्रमाणे) पेटली आहेतच.. उद्या सकाळ्पर्यंत धागा (राहिलाच तर) १-२ शतकं पार करुन गेला असेल..
तेवढं आमच्याही धाग्यावर यायचं लक्षात ठेवा बरं का!!
संपादकांना रात्रपाळीसाठी शुभेच्छा!!
24 Jun 2014 - 6:44 pm | बॅटमॅन
गर्भित धमकी नोंदवल्या गेली आहे...शेवटी मोर ईक्वल असल्यावर हे चालायचंच म्हणा.
24 Jun 2014 - 6:46 pm | धन्या
म्हणजे धाग्याची मोराची चिंचोली होणार तर.
24 Jun 2014 - 6:48 pm | बॅटमॅन
मला तर वाटलं 'चेच'न्या प्रांत होणार =))
24 Jun 2014 - 6:58 pm | सूड
चला धाग्याच्या निमित्ताने नवा वाक्प्रचार मिळाला. ;)
24 Jun 2014 - 6:58 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो ;)
24 Jun 2014 - 6:43 pm | पाषाणभेद
धमाल फक्त धमाल.
बाकी आजकालच्या मुली (बाप्येही) बिगर गिअरच्या स्कुट्या अॅक्टीव्ह्या सुझुक्या भरधाव वेगाने घेवून जातांना त्याच्या अज्ञानाची किव करावी वाटते.
24 Jun 2014 - 6:57 pm | प्रसाद गोडबोले
पाभे , ह्या निमित्ताने एखादी लावणी/ भारुड / होवुन जाऊ दे , बरेच दिवसात तुमचे काही लेखन वाचनात आलेले नाहीये , आज बरेच दिवसांनी दिसलात ...
त.टी मी तुमच्या कवितांचा लई मोठ्ठा फॅन आहे :)
24 Jun 2014 - 7:02 pm | रेवती
बाई, पुरुष असा काही चालवण्यातला फार फरक मला तरी आढळला नाही ब्वॉ! आपल्या वाहनाच्या मागे ठराविक अंतर ठेवून अनेक मैल कोणी येत असलं तर सहज ओळखवं की ड्रायव्हर किंवा ड्रायव्हरीणबाई (मुद्दाम लिहिलेय तसे) फोनवर बोलत बोलत येतायत व आपल्या गाडीचा सहारा आहे. गाडी मध्येच तिरकी जाऊन एकदोनदा सरळ केली म्हंजे मनुष्य (बाई/ पुरुष) टेक्स्टींग करतायत. लाल दिव्याला उभे असलेले वाहन हिरव्या दिव्याला जरा उशिराने हलले आणि लगेचच्या लाल दिव्याला थांबायची घाई असली की बाई असल्यास बरेचदा मेक अप चाललेला असणे, पुरुष असेल तर गाडीतील कचरा उचलून ट्रॅश ब्याग भरायची वेळ असते. हायवेला बुंगाट जाणार्या गाड्या एकदम सुतासरख्या सरळ झाल्यास पुढे मामारावांची स्वारी दिसणे, कोणालातरी पकडलेला असणे यातील एक किंवा दोन्ही गोष्टी असल्याचे निदर्शक! दोन अठवड्यांपूर्वी एक १८ चाकी बंब्या ट्रक आडवा झाला होता. रस्त्यात सगळी ट्रकमधील बॉक्सेस पसरली, काचा फुटल्या व पोलीसकार्य चालू होते. मुलांच्या शाळा सुटण्याची वेळ झाल्याने आम्हा सर्व पालकांना पोहोचण्याची घाई झाली होती. चालू असलेल्या एकाच लेनमधून जाताना सगळे बाई किंवा पुरुष नव्हते तर फक्त पालक होते. मध्ये जिथे पूर्ण थांबावे लागले तिथे सर्व बाया व पुरुषांनी हात मोकळे फोन फिरवून आपापल्या मुलांना कळवले की उशीर होतोय. तरण्या मुलींनी मेक अप व मुलांनी टेक्सटींग सुरु केले. त्यातूनही जे काही किंचित फरक दिसतात ते तसेच असू द्यावेत तर मजा आहे. नैतर धाग्याला विषय कसे मिळणार? न्यूजर्सीच्या वाटेवर एक बाई मुरांब्यामधून हळूहळू चालवताना सुकाणूवर पुस्तक ठेवून वाचत चालली होती तर एक बुवा सुकाणूवर नकाशा पसरून चालवत होता. कुठला आलाय डोंबलाचा फरक? दोन वेगळे (पण तसे नैसर्गिक) अनुभव म्हणाजे वाहतुकीच्या मुरांब्यात वृद्धांना नैसर्गिक बोलावणे धरवत नाही तेंव्हा नाईलाजाने ते बाजूच्या जंगालात जातात. आपणाही कधीतरी त्या वयात असणार आहोत ही जाणीव ठेवणे महत्वाचे. दुसर्या अनुभवात एक बाई भयंकर जोरात गाडी वळवून एका मोडक्या घरापाशी थांबली व माझ्या गाडीच्या पुढे गाडी घातली तिने. मलाही करकचून थांबावे लागले. तिने पटकन गाडीचे दर उघडले, तान्ह्या बाळाला कारसीटमधून काढले आणि आधी त्याला पाजायला सुरुवात केली. ते रडणे थांबल्यावर मला कल्पना आली. त्यावेळी कोणीही पुरुष तिथे निरिक्षण शक्ती पणाला लावत बघत बसले नव्हते हे महत्वाचे! भारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?
24 Jun 2014 - 7:22 pm | प्रसाद गोडबोले
बरेच फरक आहेत ... बारीक निरीक्षण केल्यास लक्षात येतील ... माझ्या निदर्शनास आलेले हे काही
१. बायका गाडी थांबवायची असल्या विमानाची चाके बाहेर येतात तसे दोन्ही पाय बाहेर काढतील ...पुरुश दोनचाकी गाडी थांबवायची असल्यास कायम डावाच पाय पाय जमीनीवर टेकवतील ( मग ते अॅक्टीव्हा चालवत असले तरीही )
२. पुरुश गाडी चालवताना नेहमी ऑप्टीमम / फ्युएल एफिशियंट वाट काढतील , बायका सहसा कंफर्ट वर भर देतील .
३ पुरुषांन सिग्नल तोडायला आवडेल पण पण लईच हाय ऑन अॅड्रीनॅलीन असतील तेच सिग्नल तोडतील , बायकांना कदाचित सिग्नल पाळायला आवडेल पण सिग्नल सुटल्यावरही मागुन चार वेळा हॉर्न वाजल्या शिबाय हलणार नाहीत .
४. चारचाकी गाड्यां मधे पुरुष कधीच मान उंच करुन रस्ता पाहण्याचा प्यत्न करणार नाही , बायका मात्र कायम कायम मान उंचावुन चेक करत राहतील (पुढचे चाक पंक्चर आहे काय हे पाहण्याचा प्रयत्न करत असतात की काय देव जाणे )
बरेच आहेत फरक ...
24 Jun 2014 - 7:43 pm | रेवती
पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत असेल तर नावे ठेवण्यात हाशील नाही ना! तिथे शेजार्यांच्या काकू असोत नाहीतर तुमची पत्नी, मुलगी असोत. ते असेच करणार. बरेचदा परिस्थिती अशी असते की त्या जागी फक्त मनुष्यप्राणी उरतो. बाई पुरुष असे ठ्सठशीतपणे न राहता! किंचित नैसर्गिक फरकांपलिकडे जाण्याचा प्रयत्न मी केलाय. यात ना पुरुषांना नवे ठेवत ना स्त्रीयान्ला! तुमचा स्वत:च मुलगा आणि मुलगी यात फरक असणारच्चे. मुले अस्तील तर त्यांच्या वागणुकीतून कळले असेलच, नसतील तर भविष्यात कळेल (अशी आशा). शाळेच्या सहलीचा अपघात, शाळेत गोळीबार झाल्यावर तातडीने तिकडे गाडी काढून पळणारे पालक हे आई, वडील यातील नैसर्गिक फरकामुळे वेगळ्या प्रतिक्रिया देतीलच पण काळजीने धाव ज्या प्रकारे घेतील ती एका मनुष्याला आपल्या बाळाची वाटणारी काळजी असेल. नियम न तोडण्याची शिकस्त करत गाडी पळवणे वगैरे प्रकारांचा विचार करून पहा! काये ना, रोजच्या गाडी चालवण्यापलिकडे आयुष्यात बर्याच गोष्ती आहेत, बाईने मान उंचावून बघितले की पुरषाने एक पाय टेकवला यात मला खरेच इंतरेस्ट नाही. अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. बायकांना वेगळ्या गोष्टींची काळाजी करावी लागते तर पुरुषांना आणाखी वेगळ्या, कधीकधी दोघांनाही घर चालवण्याची भ्रांत पडलेली असते. ते बॉडीलँग्वेजमधून दिसते एवढेच. त्यातून काही अपघात घडत नसतील असे नाही, असतीलच, अडचणीही येत असतील पण त्यासाठी एकट्या बाईला किंवा पुरुषाला वेगळे काढणे जमणार नाही.
24 Jun 2014 - 7:54 pm | सूड
>>त्यासाठी एकट्या बाईला किंवा पुरुषाला वेगळे काढणे जमणार नाही.
+१
24 Jun 2014 - 8:28 pm | किसन शिंदे
रेवतीताईंच्या वरील दोन्ही प्रतिसादांशी प्रचंड सहमत.
25 Jun 2014 - 11:54 am | प्रसाद गोडबोले
ओके , मग तुमचे आधीचे अर्ग्युमेन्ट की "स्त्री पुरुषांच्या ड्रायव्हिंग मधे तसा काही फरक नसतो" हे "लॉजिकली" चुकीचे आहे ... तुर्तास इतकेच म्हणतो !!
फरक असतोच आणि त्याचा इतरांना अनुभवही येतो पण तुम्ही फरक मानत नाही इतकेच !!
ह्या लॉगिकने तर मग कोणातच काहीच फरक नसतो असेही म्हणता येईल :)
25 Jun 2014 - 6:13 pm | रेवती
किरकोळ गोष्टी आहेत या, याची चर्चा करण्यात वेळ घालवणार नाही. टंकाळा हेही कारण आहेच. काल लै टंकलय.
25 Jun 2014 - 8:33 pm | वपाडाव
म्येलो... म्येलो...
लँडिंग ङियर...
24 Jun 2014 - 10:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे
चला, नविन मुद्दा. निवासी विरुद्ध अनिवासी. होऊ
दे दंगा.
24 Jun 2014 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
...त्यावेळी कोणीही पुरुष तिथे निरिक्षण शक्ती पणाला लावत बघत बसले नव्हते हे महत्वाचे! भारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?
हे चुकून "महाभारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?" असे वाचले :) त्यामुळे जिज्ञासा जागी झाली...खरंच, महाभारताच्या काळी रथ चालवायचे आणि ओव्हरटेक करायचे (विशेषतः युद्धभूमीवर) काही नियम होते काय?
जाणकारांच्या प्रतिक्षेत.
25 Jun 2014 - 6:19 pm | रेवती
एकतर आखाती धागे काढून, जास्त माहिती देऊन तुम्ही मला त्यांचा हेवा वाटवलाय. इथं ड्रायव्हिंग करून भयानक कंटाळा आलाय आणि तिकडे बायकांना परवानगी नाही म्हणे! अरे, हवीय कोणाला स्त्रीमुक्ती? ;) गाडी माझी आणि एक ड्रायव्हर! मज्जाए! येत्या ३ दिवसात मी कमीतकमी दीडशे मैल डाईव्ह करणारे, त्यानंतरच्या अठवड्यात किमान २०० मैल! आणि मला म्हणतात सगळेजण की हिला फिरायला आवडत नाही. अरे, काय फिरणार?
25 Jun 2014 - 6:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
24 Jun 2014 - 7:09 pm | मुक्त विहारि
एक प्रतिसाद...
बाकी चालू द्या...
24 Jun 2014 - 8:31 pm | तिमा
मला कुणाच्याच ड्रायव्हिंग बद्दल बोलायचं नाही. पण मी कधीकाळी ड्रायव्हिंग शिकलो तेंव्हा आमच्या ट्रेनर ने जे मौलिक विचार ऐकवले ते लिहित आहे.
' रास्तेमें कोई गाय, भैंस या औरत आयेगी ना, तो कभीभी उसके पीछेसेही निकलनेका !'
24 Jun 2014 - 8:38 pm | रेवती
अगदी असेच मला हैदराबादेच्या ट्रेनरने शिकिवले. "अम्मा, रास्तेमे औरत लोगां चार चार बच्चे लेके क्रास करतें, तब रुकना पडता पर आदमी लोगांके लिये हारन (हॉर्न) मारे तो ब्बी नै हिलते" मला त्याने सांगितल्याप्रमाणे किंवा आणखी वेगळेही अनुभव आलेत.
24 Jun 2014 - 9:48 pm | मराठे
चांगलं आणी रद्दड ड्रायव्हींग करणारे पुरूष असतात आणि बायकाही.
फरक इतकाच की रद्दड ड्रायव्हींग करणारा मुलगा आईच्या वळणावर गेलेला असतो आणि चांगलं ड्रायव्हींग करणारी मुलगी बाबांच्या ! ;-)
25 Jun 2014 - 5:03 pm | मराठी कथालेखक
यावरुन काही आठवलं... नवीनच नोकरीस रुजू झालो होतो, पहिली दुचाकी (बाईकच्या जमान्यात स्कूटर) घेतली होती. मी आणि बाबा आपापल्या कंपनीत रात्रपाळी करुन आपापल्या स्कूटरवर परतत असताना मी बाबांना बुंगाट ओवरटेक केली.
नंतर बाबांनी आईला ऐकवले. "तो कसा रॅश चालवत होता " पासून चालू झालेली गाडी मग "तु लाडावले आहेस त्याला.." वगैरे पर्यंत आल्यावर मग आईनेही उत्तर दिले "पण त्याला गाडी चालवायला मी नाही ना शिकवले..."
24 Jun 2014 - 10:05 pm | वेल्लाभट
असं मुळीच नाही. जनरलाईझ करणं चुकीचं आहे.
एवढंच आहे की या सगळ्या वर नमूद केलेल्या गोष्टींपैकी अनेक गोष्टी पुरूष मंडळी मुद्दाम आणि उद्दामपणे करतात, तर महिला मंडळी धांदरटपणामुळे किंवा अनवधानाने करतात. करतात मात्र सगळेच. ड्रायव्हिंग चं डिसिप्लीन नसणं हा एक मूलभूत प्रॉब्लेम आहे भारताचा. किंबहुना, कुठलाच नियम पाळण्याची वृत्तीच नसणं हाच प्रॉब्लेम आहे.
असो. बोलावं तितकं कमीच.
पण हा असला फरक करणं मात्र बरोबर नाही. महिला मंडळी सगळ्याच बाबतीत नियमाने वागतात असं नव्हे याची नोंद घ्यावी.
25 Jun 2014 - 2:26 pm | असंका
अगदी हेच म्हणायला आलो होतो....!
(पण समोरच्याला धोक्यांचे अवधान नसणे आणि समोरचा जाणून बु़जून धोका घेणे यातला कुठला धोका जास्त?)
24 Jun 2014 - 10:35 pm | कंजूस
चाकामागे नाही बसलो पण चाकवाल्याच्या मागे बसलो आहे .अमकु डरायविंग नहि आना काली ऐदराबादका हिंदी आना ।ब्याटमानका मकान किदरका जी ?
चांगले ड्रायविंग म्हणजे गाडी कायम गिअरमध्ये असणे .वेग अक्सेलेटरने वाढवायचा आणि गिअर वरचा टाकायचा .काही जण अक्सेलेटर दाबतात सोडतात पुसूक पुसूक गाडी चालवतात .
24 Jun 2014 - 10:45 pm | कंजूस
धाजण इकवेळ ठिवायला गेलो तर कुणीतरी फुडं आणि कुणीतरी म्हागं पडणारच की .हे जाजसायबांनी तवाच वळकलं हुतं .तेंच्या फारमवर सर्व्या अनिमलांसाटी तसा फलेक्सच लिवून ठिवलाय .
24 Jun 2014 - 11:26 pm | प्यारे१
ओ काकू, का कू न करता जरा त्या पुढच्या हायवे पर्यंत सोडता का?
25 Jun 2014 - 12:06 am | स्वप्नांची राणी
हे ड्रायवींगच्या नियमात बसतं की नाहि माहिती पण गाडी चालवतांना एकदम काच खाली करून किंवा दार उघडून थुंकतांना मात्र फक्त पुरूषांनाच पाहिलय... थंकतांथं
25 Jun 2014 - 10:05 am | स्मिता चौगुले
+++१११
25 Jun 2014 - 12:27 am | हुकुमीएक्का
हा व्हिडियो पाहिल्यानंतर काही वेळा असे वाटते की पुरुष नक्कीच असे अपघात करत नाहीत. शक्यतो पुरुषांचे होणारे अपघात हे जास्त वेगामूळे होतात. व्हिडियो खाली पहावा. नेहमी चूक स्त्रीयांचीच असते असे नाही परंतू लेन पद्धत न पाळल्यानेच खुपदा स्त्रीयांवर ही टिका करण्यात येते की त्यांना गाडी नीट चालवता येत नाही.
आता ज्या लेन मधून ७०-८० च्या वेगाने गाडी चालवायची आहे तेथे ४० ने गाडी चालवल्यावर मागचे लोक हॉर्न वाजवणारच. आणि हे हॉर्न वाजवणारे बहूदा चारचाकी वालेच असतात कारण त्या लेन मधून सहसा दुचाकी असणारे जातच नाहीत.
25 Jun 2014 - 7:22 am | सखी
रेव्वाकाशी बाडीस.
आता हा व्हिडिओ पाहील्यावर असे म्हणायला पाहीजे का की बायका असे अपघात कधी करत नाही :)
25 Jun 2014 - 11:53 am | खटपट्या
खालील व्हिडीओ पण पहा
http://www.youtube.com/watch?v=vRfbL6memSs
26 Jun 2014 - 5:26 am | सखी
आवो मी बी हाच इडियो दिलता नवता का? :)
25 Jun 2014 - 10:32 pm | हुकुमीएक्का
अरेरे पुरुषसुद्धा असे अॅक्सिडेंट्स करतात हे व्हिडियो पाहून पटले. सखी म्हणत आहेत त्यातही तथ्य आहे हे नक्की.
25 Jun 2014 - 1:25 am | शेखर
पहिल्याच धाग्यात शंभरी जवळ पोहचल्याबद्दल अभिनंदन...
25 Jun 2014 - 2:21 am | रेवती
झाले का शंभर! गुड!
लेखिकाबै, तुमच्या धाग्याची शंभरी पार करवून दिलीये, आमचा कट पाठवून द्या. आता इथला मुक्काम हलवते. ;)
25 Jun 2014 - 10:35 am | इरसाल
आज्जीबैनी सुपारी घेतली होती तर ?
25 Jun 2014 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
हळू हळू ध्यानात येत ध्याग्याची शंभरी करायच्या आयडिया ;) :)
(हघ्या हेवेसांन)
25 Jun 2014 - 12:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
हळू हळू ध्यानात येत आहेत ध्याग्याची शंभरी करायच्या आयडिया ;) :)
(हघ्या हेवेसांन)
25 Jun 2014 - 10:33 am | llपुण्याचे पेशवेll
तुमच्या निरीक्षणाशी सहमत. पुरुष बर्याच वेळेला बेदरकारपणे वाहनं हाकतात. पण सिग्न तोडताना बाया आणि बाप्याना सारख्याच प्रमाणात पाहीले आहे. त्यामुळं या एका निरीक्षणाशि मात्र असहमत आहे.
बाकी गाडीचे जजमेंट पुरुषाना पटकन येते आणि बायका एकदम एखाद्या अरुंद जागेत गाडी घुसवायला घाबरतात हे मी स्वतः अनुभवले आहे. माझी वहीनी गाडी चालवत असेल तर शेजारी बसलेल्यास विचारते निघेल का? शक्यतो शेजारी दादाच बसतो, तो नसेल तर मी. जर हो म्हटले तर हाकते गाडी पुढे. दादा आणि वहीनी एकदम गाडी शिकले पण दादा स्वतः गाडी घेऊन कुठेही जाऊ शकतो पण वहीनीला पुण्याबाहेर गाडी न्यायची असेल तर शेजारी कोण्तरी ड्रायव्हींग करू शकणारा बसायला लागतो.
25 Jun 2014 - 10:41 am | यशोधरा
वहीनीला पुण्याबाहेर गाडी न्यायची असेल >> ह्यासाठी वाहन चालकतेच्या कमतरतेपेक्षा आयुष्यभर जर 'तुला जमणार नाही/ तुला जमेल का/ बाईमाणसाला जमेल का' वा तत्सम झालेले मानसिक कंडिशनिंग (मराठी शब्द?) अधिक कारणीभूत असण्याची शक्यता अधिक.
25 Jun 2014 - 11:07 am | llपुण्याचे पेशवेll
नाही असे कधीही तिला कोणीही म्हटलेले नाही. उलट आमच्या घरामधे, ती घरात जास्त असते त्यामुळे आईबाबांना कुठे न्यायचे असेल तर म्हणून तिला गाडि शिकवली होती. मी आणि दादा हापिसात गेल्यावर गाडी चालवणारा कोण नाही म्हणून काम अडू नये.
पण तिलाच बरोबर कोणीतरी असावे असे वाटते.
25 Jun 2014 - 11:22 am | यशोधरा
तुम्ही कोणी करता अहात असे म्हणण्याचा उद्देश्य नाही. ते बहुतांशी मुलींच्या लहानपणापासूनच नकळत सुरुच असते.
26 Jun 2014 - 12:56 pm | बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2014 - 11:15 am | एस
मानसिक कंडिशनिंग होतेच. 'गाडी नीट वळव' अशा सकारात्मक सूचना देण्याऐवजी 'गाडी वळवताना धडकवू नकोस मागच्यासारखी' अशा नकारात्मक सूचना दिल्या जातात. हेच तत्त्व मुलांच्या संगोपनालाही लागू आहे. कोणी असे सतत तुम्हांला म्हणत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून सकारात्मक स्वयंसूचना घेत राहणे ह्यासारखा दुसरा उपचार नाही.
25 Jun 2014 - 10:55 am | नानासाहेब नेफळे
बायका वाईट ड्राईवींग करतात, याला जबाबदार पुरषांचे हॉर्मोन्स. ड्रायविंग हे फक्त पुरशांसाठीच असते.
http://news.bbc.co.uk/2/hi/health/4202199.stm
25 Jun 2014 - 11:03 am | धर्मराजमुटके
त्याच बातमीत असही म्हटलयं की
"Men do seem to be better at spatial abilities, and women at verbal and emotional skills"
-Dr Nick Neave, British Psychological Society
त्यामुळे ह्या आणि कोणत्याच धाग्यावर बायका पुरुषांना बोलायच्या बाबतीत तरी हार जाणार नाहीत. :)
25 Jun 2014 - 12:16 pm | llपुण्याचे पेशवेll
बास्स इथे धाग्याचे +३०० पोटेंशियल चालू झाले आहे.
25 Jun 2014 - 11:57 am | प्रसाद गोडबोले
+३६२४३६
25 Jun 2014 - 12:25 pm | सस्नेह
स्त्रिया अन पुरुष. पण काही काही पुरुष जितके बेदरकार अन सुपरफाईन ड्रायव्हिंग करतात, तितके एखाद्या स्त्रीला करताना अजून पाहिले नाही. मी तरी अजुनी हायवेलासुद्धा १०० गाठायला बिचकते.
25 Jun 2014 - 5:15 pm | मराठी कथालेखक
स्वतः बर्यापैकी ड्रायविंग करु शकणारी माझी पत्नी शेजारी बसते तेव्हा मी वेग ८० च्या पलीकडे नेवू लागलो तर मला वेग कमी करण्यासाठी सूचना देवू लागते. १०० ला काट्याचा स्पर्श जरी झाला तरी 'ओरडणे' होते. त्याउलट ड्रायविंग न येणारी माझी आई शेजारी बसली असताना मी अनेकदा शंभरी पार केली आहे, पण आई काही बोलत नाही.
26 Jun 2014 - 1:22 am | खटपट्या
हा प्रकार आणखी वेगळा.
जर बाजूला बसलेला माणूस ड्रायवर असेल तर तो समोर बघून त्याच्या मनामध्ये गाडी चालवत असतो. आणि अक्चुअल ड्रायवर ने त्याच्या मनाविरुद्ध काही केले कि बाजूला बसलेला अस्वस्थ होतो आणि सूचना देवू लागतो. या उलट जर बाजूला बसलेला ड्रायवर नसेल तर शांत असतो.
25 Jun 2014 - 12:43 pm | गवि
वाहन चालवणे ही गोष्ट अनकॉन्शस माईन्डकडून(किंवा सबकॉन्शस माईन्ड- जो काही बरोबर शब्द असेल तो घ्यावा)झाली की ती स्मूथ होते. पण ते जर कॉन्शस माईंडच्या हाती सोपवलं तर वाट लागते.
स्त्रियांच्या बाबतीत जास्त कथा अशासाठी तयार होतात की शंभरातल्या किमान पंचाहत्तर स्त्रिया लग्न झाल्यावर / पस्तिशीनंतर पहिल्यांदा ड्रायव्हिंग शिकतात. त्यावेळी पुरुष किंवा स्त्रिया या सर्वांचाच नवीन शारिरीक कौशल्य शिकण्यातला आत्मविश्वास कमी झालेला असतो. याचा परिणाम म्हणजे वाहनचालन करताना प्रचंड कॉन्शसनेस. संपूर्ण लक्ष ड्रायव्हिंगकडे देण्याच्या नादात आणि अतिरिक्त अॅलर्टनेस ठेवण्याच्या प्रयत्नात स्नायू एकदम स्टिफ होतात / आखडलेले राहतात.. आठवा.. स्टियरिंग किंवा हँडल कसं घट्ट गच्चम धरलेलं असतं आणि नजर जशी "एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार" सारखी सम्मोर रोखलेली. मग बाजूने कोणी आलं की त्यासाठी वेगळं प्लॅनिंग केलेलं नसल्याने गाळण. अशा वेळी आता कोणता गियर टाकायचा या विचाराने मनातले विचार गोठून जातात. मग न्यूटनचा नियम लागू पडतो. गतीशील असल्यास गती तशीच ठेवणे आणि थांबलेले असल्यास थांबून राहणे.. मग कोणालातरी डेंटचा लाभ किंवा मागून हॉर्न्सची लाखोली.
या सर्वावर उपाय म्हणजे ज्यांच्याकडे वाहन आहे त्यांनी लहान वयातच मुलींना ते शिकवावं किंवा ड्रायव्हिंग स्कुलात नाव घालावं. पती किंवा पिता हे स्वतः स्त्रियांना वाहन शिकवायला कुचकामी असतात. कारण ते सब्जेक्टिव होतात. शिकवतात कमी आणि खेकसतात जास्त. शिकणार्या स्त्रीचं लक्ष वाहनचालनात कमी आणि बाजूच्या पुरुषाकडून येणार्या पुढील जजमेंटकडे जास्त असं होतं.
अगदी खराखरा कॉन्फिडन्स यायचा असेल तर गाडीचे तत्व समजून घेऊन पूर्ण एकट्याने गाडी चालवावी. सोबत कोणी असल्यावर आत्मविश्वास यायला फार जास्त वेळ जातो.
कोणी सतत बाजूला बसून जजमेंट करत नाहीये म्हटल्यावर ते घट्ट पकडून अन स्नायू आखडून चालवणं कमी होतं आणि सफाई येते.
हँडल ढिले पकडा. सहा महिन्याचे बाळ समजा. ते हातातून निसटू नये इतकीच घट्ट पकड पण त्याला आवळले जाऊ नये इतकी हलकीही.
25 Jun 2014 - 12:58 pm | योगी९००
हँडल ढिले पकडा. सहा महिन्याचे बाळ समजा. ते हातातून निसटू नये इतकीच घट्ट पकड पण त्याला आवळले जाऊ नये इतकी हलकीही.
गविटच म्हणतात तो हाच काय...?
25 Jun 2014 - 1:24 pm | अजया
गवि _/\_
तुम्हाला कसं कळलं !!!
25 Jun 2014 - 5:18 pm | सखी
हेच म्हणते. माझी चायनीज ड्रायव्हींग कोच सांगायची स्टीअरींग म्हणजे मोठं अंड आहे असे समज, सोडलं तर पडुन फुटेल आणि घट्ट धरलं तर हातातच फुटेल.
बाकी तुम्ही म्हणता आहेत ते खरेच आहे बहुतेक बायका या तिशिचाळीशीच्या दरम्यान कार चालवायला शिकतात तेव्हा त्यांच्या डोक्यात काळज्या अधिक असतात. हे खालचे रिसर्च दुवे अर्थातच परदेशातले आहे आणि त्यावरुन हेही सिद्द होऊ शकते मुली/बायका जास्त सुरक्षित कार चालवतात कारण बहुतेक मुलं+मुली बरोबरच १५ वर्षाच्या आसपास कार चालवायला शिकतात.
दुवा १
दुवा २
याबरोबरच पुरुषांना दिशांचा (डिरेक्शन) अंदाज खूप चांगला असतो हे वाचले होते आणि अनुभवपण खुपदा आलाय.
25 Jun 2014 - 5:22 pm | मराठी कथालेखक
[हे माझे मत आहे]
कमी आत्मविश्वास
![at lower end](//ww1.hdnux.com/photos/12/44/00/2768940/8/628x471.jpg)
चांगला आत्मविश्वास
![at higher end](http://i.istockimg.com/file_thumbview_approve/14207205/2/stock-illustration-14207205-steering-wheel-and-hands.jpg)
25 Jun 2014 - 9:47 pm | रेवती
याबद्दल्चे निरिक्षण असे की मी पहिल्या फोटूप्रमाणे हात ठेवले तर बाकीचे लोक्स दुसर्या फोटूप्रमाणे असतात. मात्र मी कान्फिडन्स दाखवायला गेले की लोकांचे सुकाणूवरील हात पैल्या फोटूप्रमाणे होतात.
अवांतर- तुम्ही परपिडावाले काहो?
26 Jun 2014 - 11:00 am | मराठी कथालेखक
'जनातलं,मनातलं' मध्ये माझ्या आतापर्यंत सात पोस्ट्स आहेत...तुम्ही फक्त दोनच वाचल्या असतील तर तुम्ही तसं म्हणू शकता.. *smile*
25 Jun 2014 - 1:00 pm | कवितानागेश
"एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार" =))
25 Jun 2014 - 1:09 pm | राजेश घासकडवी
इथे वाचा...
http://www.aami.com.au/sites/default/files/fm/pdf/AAMI-Facts_MenWomen_08...
25 Jun 2014 - 1:23 pm | प्रसाद गोडबोले
हॅ ! पहिल्याच वाक्यावर वाचायचे सोडले ... हे म्हणजे सुडो-स्टॅटिस्टिक्स चा उत्तम नमुना आहे !
अहो असं काऊंट बेसीस वर कंपॅरिझन नाही करता येणार , कंपॅरिझन परसेंटेज बेसीस वर व्हायला हवे ... टक्केवारी काढा पाहु ...
उदा:
समजा १०० बायका गाडी चालवतात त्यातील २५ रिस्की गाडी चालवतात आणि १००० पुरुष गाडी चालवतात त्यातील २०० रिस्की गाडी चालवतात , मग २५ < २०० म्हणुन बायकांपेक्षा पुरुष जास्त रिस्की गाडी चालवतात असे अनुमान काढता येईल का ?
25 Jun 2014 - 5:18 pm | सखी
काहीही म्हणजे १०० बायका १००० पुरुषांच्या बरोबरीने? तुलनाच करायची तर नंबर तरी सेम घ्या ना.
25 Jun 2014 - 5:23 pm | पिलीयन रायडर
अगं तेच तर ते म्हणत आहेत...
बायकांची संख्या कमी आहे म्हणुन तर अॅपल टु अॅपल तुलना व्हावी म्हणुन % घ्या म्हणत आहेत..
25 Jun 2014 - 5:31 pm | पैसा
पण अॅपल हे अॅपल असतं आणि करवंद हे करवंद.
25 Jun 2014 - 5:51 pm | पिलीयन रायडर
That is altogether different question!!!
मी तर आधीच म्हणलं होतं.. मुळात मेंदुच वेगळे आहेत.. तुलना तशीही होऊ शकत नाही!!
25 Jun 2014 - 6:13 pm | बॅटमॅन
पण मग जर मेंदूच वेगळे आहेत तर परीक्षेत मार्क तरी सेम स्केलवर का द्यायचे म्हणे =)) तुलना करणारे अंमळ मूर्खच असावेत नै?
25 Jun 2014 - 6:49 pm | पिलीयन रायडर
आपण ड्रायव्हिंग बद्दल बोलत होतो ना?
अशी थिअरी वाचनात आली होती की नेव्हीगेशन मध्ये पुरुष जास्त चांगले असतात.. त्यांना एकच एक फोकस्ड काम जास्त चांगलं जमतं.. तर बायका मल्टि टास्किंग जास्त चांगली करतात वगैरे.. ह्यानुसार बायकांना मुळातच ड्रायव्हिंग स्किल्स कमी आहेत.. हा माझा आणि पै तै चा मुद्दा आहे..
मुळात घेताय ती परीक्षा पद्धत आयडीयल आहे हे ग्रुहितक आहे इथे.. आधी ते बघा.. मग मार्क वगैरेच पाहु..
25 Jun 2014 - 6:57 pm | बॅटमॅन
मुळातच रडीचा डाव खेळायचा असला की असली कारणं सुचतात.
नेव्हिगेशन आणि ड्रायव्हिंग हे एकच आहे असं तर नै ना सुचवायचं?
बाकी परीक्षेच्या रडी मुद्द्यालाही फाट्यावर मारले गेले आहेच.
25 Jun 2014 - 7:06 pm | पिलीयन रायडर
रडीचा डाव?
तुला समजुन घ्यायचं नाहीये की समजत नाहीये.. थोडं नीट वाच..
आपण ज्या मुद्द्यावर स्त्री पुरुष तुलना करु पहत आहोत, त्या बाबतीत जर त्यांचे मेंदु सिग्निफिकंटली वेगळे असतील तर ती तुलना व्हॅलिड राहील का? जी गोष्ट तुम्हाला अगदी सहज जमते ती करताना स्त्रीया बर्ञाच गोंधळतात.. सिंपल..
ह्यात न कळण्या सारखं काय आहे..
पण आता वैयक्तिक टिका सुरु झालीये.. सो.. रामराम...
तसेही इतके इयत्ता दुसरी ब ला समजावायचे पेशन्स माझ्यात नाहीत...
धन्यवाद...
25 Jun 2014 - 7:13 pm | बॅटमॅन
मुळात सिग्निफिकंट डिफरन्स आहे यालाच आक्षेप आहे. असा बचाव करण्याने तो डिस्प्रूव्ह होत नाही. त्या आक्षेपाला भक्कम पुरावा असेल तर तुझं सगळं मान्य करतो, नसेल तर मात्र हा रडीचा डावच.
सिग्निफिकंट डीफरन्स नक्की कुठल्या क्षमतेत आहे, किती आहे, कोण सिद्ध केलं, इ.इ. विदा दिल्यास पुढची चर्चा ठीक होईल. नपेक्षा स्लगफेस्ट आहेच नेहमीची- दुसरी ब आणि पहिली फ. काय? स्लगफेस्ट खेळायचीय की कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा करायचीय? केव्हापासून पाहतोय, एक अॅझम्प्शन कवटाळून बसलेलं पाहतोय. सपोर्टिंग विदा द्या मग बोला.