पुरुषांचे ड्रायव्हिंग-माझा अनुभव

anagha kulkarni's picture
anagha kulkarni in जनातलं, मनातलं
24 Jun 2014 - 3:54 pm

बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते.
गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

सखी's picture

25 Jun 2014 - 5:38 pm | सखी

अगं नाही गं १०० बायका आणि १००० पुरुष - मग अ‍ॅपल टु अ‍ॅपल कसे होणार? ते म्हणजे अ‍ॅपल टु मोठ्ठा फणस होईल ना. दोघेही शंभरच घ्याना. हे स्टडीज केले गेले होते त्यात पण ७०० की ८०० बायका आणि पुरुष होते असे मागे वाचले होते, नक्की आकडा लक्षात नाही पण मोठ्या प्रमाणात हा स्टडी केला गेला होता, दोघांचे प्रमाण समसमान होते.

पिलीयन रायडर's picture

25 Jun 2014 - 5:49 pm | पिलीयन रायडर

तुला सॅम्पल साईझ सेम ठेवा असं म्हणायचय का? तसं असेल तर कशासाठी नक्की? कारण % काढलं की तसंही येणारं उत्तर हे "१०० पैकी क्ष" असंच असणार ना दोन्ही गटांसाठी..

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 6:15 pm | बॅटमॅन

सँपल साईझ कितीही असो, तुलना फक्त अ‍ॅब्सोल्यूट नंबर ऑफ अ‍ॅक्सिडेंटची नको तर % ची पाहिजे. वरच्या पीडीएफमध्ये किमान ३ इंडिकेटरमध्ये स्त्री आणि पुरुषांत सिग्निफिकंट डिफरन्स दिसून येत नाहीये.

प्रसाद गोडबोले's picture

25 Jun 2014 - 6:41 pm | प्रसाद गोडबोले

वरच्या पीडीएफमध्ये किमान ३ इंडिकेटरमध्ये स्त्री आणि पुरुषांत सिग्निफिकंट डिफरन्स दिसून येत नाहीये.

पार्शली करेक्ट ! पण .... सदर लेखक महाशयांनी वेरीयन्स बाबत काहीच उल्लेख केला नाहीये ,त्यामुळे सगंळंच शंकास्पद आहे . पण लेखकाला बेनीफीट आफ डाऊट देवुन वेरीयन्सही सिग्निफिकन्टली वेगळा नाहीये असे मानु !

इन दॅट केस ... ड्रायव्हिंगच्या बाबतीत पुरुषांची बाजु सध्यातरी नक्कीच वरचढ ठरते कारण स्त्रीया जे छोट्या सेट मध्ये जो परफॉर्मन्स दाखवतात तोच पुरुष मोठ्ठ्या सेट मध्ये दाखवत आहेत ...

सोप्प्या अ‍ॅनालॉजीत , सद्यस्थितीत स्त्रीया "विराट कोहली " आहेत तर पुरुष "सचिन तेंडुलकर" :D !

अवांतर : मला करवंद आवडतात

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 6:58 pm | बॅटमॅन

रैट्ट, व्हॅरियन्स सेम आहे याची खात्री पटल्याखेरीज अ‍ॅनोव्हा किंवा काही लावता येतच नाही.

राजेश घासकडवी's picture

25 Jun 2014 - 6:21 pm | राजेश घासकडवी

हॅ ! पहिल्याच वाक्यावर वाचायचे सोडले ...

च्यायला, पहिल्या वाक्यातच सगळं कंपॅरिटिव्ह स्टॅटिस्टिक्स यावं अशी अपेक्षा होती तर. भाऊ, पुढचं वाचा. तुम्हाला हवी तशी पर्सेंटेजं दिलेली आहेत.

एका वाक्यावरून आख्ख्या स्टडीबद्दल मत बनवता यावरून तुमच्या मताला किती किंमत द्यायची हे लक्षात आलं.

प्रसाद गोडबोले's picture

25 Jun 2014 - 6:30 pm | प्रसाद गोडबोले

पहिल्या वाक्यातच सगळं कंपॅरिटिव्ह स्टॅटिस्टिक्स यावं अशी अपेक्षा होती तर. भाऊ, पुढचं वाचा. तुम्हाला हवी तशी पर्सेंटेजं दिलेली आहेत.

>>>> मग तर अजुनच वाईट ! संपुर्ण योग्य अ‍ॅनालिसिस करुनही सुरवातीला जर चुकीचे विधान टाकत असतील तर त्या लेखकाच्या दृष्टीकोनाबद्दलच शंका निर्माण होते आणि तो लेखक नक्कीच बायसड असणार असे अनुमान काढावे लागते !

एका वाक्यावरून आख्ख्या स्टडीबद्दल मत बनवता यावरून तुमच्या मताला किती किंमत द्यायची हे लक्षात आलं.

गुड ! अभिनंदन ! आता योग्य अ‍ॅनालिसीस करुन चुकीचे / मिसलिडींग वाक्य / हेडर देणार्‍या लेखाला किती किंमत द्यायची हे कळाले की कळवा =))

तो ष्टडी वाचून पुरेसे चित्र डोळ्यांसमोर उभे राहत नसल्याने त्याला प्रमाण किती मानायचे हा प्रष्ण आहे.

राजेश घासकडवी's picture

26 Jun 2014 - 1:56 am | राजेश घासकडवी

एकदा डोळे मिटूनच घ्यायचे ठरवले तर समोर ताजमहाल असला तरी चित्र उभं राहत नाही. बाकी प्रमाण वगैरे कोणी सांगावं? एक डेटापॉइंट म्हणून तरी बघा. त्याला काउंटर डेटा पॉइंट दाखवला तर आम्ही पण उघड्या डोळ्यांनी बघू.

ड्राइविंग बद्दल अज़ून थोडेसे काही, कृपया लक्षात घ्या हे माज़े लिखाण नाही...

http://palshikar.blogspot.in/2006/01/blog-post_113679477670113272.html

बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत

म्हणून तर बायका driving च्या वेळी driving करतात . आणि पुरुष driving च्या नावाखाली गोंधळ घालतात .

पुरुष driving च्या नावाखाली गोंधळ घालतात

म्हणजे नक्की काय व कसा गोंधळ घालतात, जरा प्रकाश पाडाल का?

विटेकर's picture

25 Jun 2014 - 2:41 pm | विटेकर

स्वतः ची गाडी घेतल्यावर हौसेने विटुकाकूला क्लास लावला गाडी शिकवली . आणि एक दिवस पार्किंगच्या खांबावर धा..ड.. काय काय तुटले आठ्वत नाही पण ४५ हजार बिल झाले.. थान्कु इन्शुरन्स वाले !
दुरुस्त करुन आणल्यावरही गाडीतून असंख्य आवाज येत , ते नेमके अपघाताचे आहेत की बनावटीतील आहेत हे गाडी विकेपर्यन्त कळले नाही.

त्यानंतर आज तागायत ती चालवत असेल तर मी गाडीत बसत नाही ! ते धैर्य गोळा करायला ३-४ जन्म जातील. बाकी सध्याच्या गाडीला असंख्य ठिकाणी जख्मा झाल्या आहेत. अर्थात ती ज्या गाडीवर शिकली त्याचा मेक वेगळा होता हा काही तिचा दोष नाही !त्या मेकची गाडी असती तर तिने असे काही होऊच दिले नसते असा तिचा दावा आहे ! ( असेल ही तसे !)

भन्नाट प्रतिसाद काका. अगदी पोट धरुन हसतोय.

मस्त हो काका! काहीही असलं तरी विटूकाकू गाडी चालवायचे सोडत नैत ना? मग झालेतर!

अम्रुता आफले's picture

25 Jun 2014 - 3:46 pm | अम्रुता आफले

चूक झाली ती सुधारणे जास्त महत्वाचे आहे मग ती कुणाची का असेना . पुरुष बायकांच्या चुका काढतो बाई पुरुषाच्या येवढा करूनसुद्धा अपघात काही टळत नाहीत होताच राहतात मग येवढा मोठा लिखाण करण्याचा काय उपयोग

एक प्रसिद्ध वाक्य आहे, नेमकं कुणाचं आहे ते माहिती नाही.

किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि लावणीने तो बिघडला नाही.

इथे किर्तन शब्दाच्या ऐवजी मिसळपाववरील लेखन असे वाचलेत की तुम्हाला उत्तर मिळेल.

प्रसाद गोडबोले's picture

25 Jun 2014 - 6:43 pm | प्रसाद गोडबोले

इथे किर्तन शब्दाच्या ऐवजी मिसळपाववरील लेखन असे वाचलेत

>>> मग लावणी शब्दाच्या ऐवजी काय वाचावे ? :P

पैसा's picture

25 Jun 2014 - 7:49 pm | पैसा

मिपावरचे तमाशे नेहमीच 'आतून कीर्तन वरून तमाषा' पेक्षा मनोरंजकअसतात!

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2014 - 11:04 am | प्रसाद गोडबोले

मिपावरचे तमाशे नेहमीच 'आतून कीर्तन वरून तमाषा' पेक्षा मनोरंजकअसतात!

आणि म्हणुनच मिपावर चर्चा करायला मजा येते !!

आय लव्ह मिपा !! *give_rose*

अम्रुता जी ने क्या बात बोली है, बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2014 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे मूळ धागा कशावर होता हे आठवतेय का कोणाला ???

जाऊंद्या, कायका असेना... आता ३०० वरच श्वास घ्या ! ;)

मदनबाण's picture

26 Jun 2014 - 7:22 am | मदनबाण

नारायण ! नारायण !
हिस्टरी रिपीट इट-सेल्फ असं काहीस म्हणतात बाँ... इतका दंगा चालु आहे पण कोणाला मिपावरचा याच विषयावरचा अजरामर धागा आठवला का ? नाही आठवत ? स्त्रिया आणि ड्रायव्हिंग असा तो धागा होता. अर्थात तो आता उपलब्ध नाही.बहुतेक त्यानंतर डॉ.प्रसाद दाढे यांनी इथे परत चक्कर टाकली नाही. :(

जाता जाता :--- नारायण नारायण ! काय करणार ? हल्ली काडी टाकुन जायची सवय लागली आहे असं म्हणा हवं तर...
डॉ.प्रसाद दाढे यांचा अजुन एक सुंदर धागा आहे.
कोणता ? :- पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे
चला माझे काम झाले ! ;) नारायण ! नारायण ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- प्यार हुआ चुपके से... :-1942 A Love Story

यशोधरा's picture

26 Jun 2014 - 11:09 am | यशोधरा

जुना धागा दिल्याबद्दल बाणबुवांचे आभार. मज्जा आली वाचून! :)

अवांतरः २०० होऊन गेलेले दिसतात, मला २०० वा प्रतिसाद द्यायचा होता ना! *beee*