अज्जुका यांची 'बिघडलीये काच' बघून अचानक आम्हाला कवितेच्या दोन-दोन प्रतिमा दिसायला लागल्या आणि मग दुसरी प्रतिमा टंकण्याखेरीज प्रत्यवाय उरला नाही! B)
भलताच जाच घडलाय.
दोन काव्यबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
दुसरं डोळे वटारणारं.
विडंबन केलेल्या
कवितेच्या कवीच्या डोळ्यांसारखे
कवीचेच डोळे
विडंबनात दिसत रहातात.
मी समजावत रहातो स्वतःला.
कुणाचं कोण..
एखादी मंद आठवण..
एक गम्मतकाव्य..
जुन्यानव्या कविता सोलून त्यावर..
विडंबकाची गुजराण...
सगळं सगळं
त्या डोळ्यात टिपलं जातं.
मी समजावत रहातो..
कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात
खरंच
भलताच हा जाच
संपवलाच पाहिजे!
चतुरंग
प्रतिक्रिया
15 Oct 2008 - 11:26 pm | पिवळा डांबिस
मूळ कविताही छान आहे आणि विडंबनही मस्त जमलंय...
मी समजावत रहातो..
कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात
:))
15 Oct 2008 - 11:55 pm | बेसनलाडू
बरेच दिवस नॉन-स्ट्रायकर् म्हणून उभे होतात काय? आज स्ट्राइक् मिळालाय ;) आणि लगेच चौकार! हाहाहा ... आवडला फटका .. लगे रहो
(प्रेक्षक)बेसनलाडू
15 Oct 2008 - 11:57 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो !
चतुरंग फॉर्मात आले आहेत ! :-) उत्तम विडंबन !
16 Oct 2008 - 12:08 am | चतुरंग
हल्ली बरेच सरपटी येतात त्यामुळे उचलून मारता येत नाही! ;) (आजूबाजूच्या मैदानांवर सुद्धा बघून आलो मी ;) )
हा भन्नाट हाफव्हॉली होता! :)
चतुरंग
16 Oct 2008 - 12:08 am | प्राजु
एकदम खास..
निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Oct 2008 - 11:48 am | स्वाती दिनेश
एकदम खास..
निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास..
प्राजुसारखेच म्हणते.
स्वाती
16 Oct 2008 - 12:31 am | नीधप
आप महान हो! :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
16 Oct 2008 - 9:54 am | विसोबा खेचर
आयला रंग्या! तुझ्या विडंबनाचा हा भलताच जाच देखील आम्हाला आवडला.. :)
छ्या! रंग्या तूदेखील अंमळ वेडझवाच विडंबनकार आहेस.. :)
तात्या.
16 Oct 2008 - 10:53 am | सहज
कविता ही छान व विडंबन तर लै भारी!
अवांतर : कोण म्हणालं कविता छान का जे काय म्हणायचंय ना ते तिथेच सरळ म्हणा ना. इतर ठिकाणी कशाला? :-)
16 Oct 2008 - 2:05 pm | धम्मकलाडू
पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन. हे काव्य कळूनदेखील भारी वाटते आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
16 Oct 2008 - 7:19 pm | संदीप चित्रे
आता एखादी हाफ व्हॉली दिसली की रंग्याच्या विडंबनाची उत्सुकता असते :)
----------
अवांतर
>> "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
नशीब धम्मकलाडूने "तुझं वजन किती? तू चरतोयस किती?" असं नाही विचारलं. ;)
17 Oct 2008 - 1:21 am | लिखाळ
>कवितेच्या कवीच्या डोळ्यांसारखे<
>कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात<
सुंदर विडंबन.. आवडले.
--लिखाळ.
17 Oct 2008 - 1:39 am | चतुरंग
सहन करुन(ही) दाद देणार्या रसिकांचे आभार! ;)
चतुरंग