'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Saint-Tukaram-...
आत्ताच ही बातमी वाचनात आली , वाचुन अत्यंत आनंद झाला ! जरा कुठे हिंदु अस्मितेचा उदय होत आहे असे वाटले :) (आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) पण काही का असेना हिंदुंनाही , अल्पसंख्य नसले तरीही , भावना असतात आणि त्याचा आदर करायला शिकले पाहिजे हळुहळु लोकांना कळायला लागले आहे . नाही तर उगाच कोणीही यावे टीकली मारुनी जावेटाईप जो उठसुट धर्मावर टीका करतोय हे पाहण्याचा कंटाळा आला होता !
कोणी हिंदुंच्या देवी देवतांची नग्न चित्रे काढतो तर म्हणे व्यक्तीस्वातंत्र आणि कोणी इंग्लंड मधे पुस्तक प्रकाशित केले तर त्याचावर पहिला बॅन आमच्या देशात ...तेव्हा व्यक्तिस्वातंत्र नाही तेव्हा अल्पसंख्यांच्या भावना दुखावणारे लेखन !
हिंदुंची मंदीरें ताब्यात घ्या ...अन इतरांना फंडींग करा
आम्ही "हिंदुराष्ट्र" म्हणले की देषद्रोह आणि तिकडे मेघालय , नागालॅन्ड जाहीरपणे स्वतःला ख्रिश्चन स्टेट डीक्लीयर करतात तर ते देशप्रेमी !
कश्मीरमधे लाखो पंडीतं देशोधडीला लागले त्यांची काळजी नाही पण बांग्लादेषातुन आलेल्या बिच्चार्या घुसखोरांचे काय होणार ह्याची सरकारला चिंता !!
ह्या धर्मातल्या अंधश्रध्दांविरुध्द बिनधास्त कायदे करा आणि महाराष्ट्रातील एक प्रख्यात "फादर" सेन्ट बनण्याच्या प्रक्रियेतल्या 'चमत्कारांचे' समर्थन करतात ते गुपचुप ऐकुन घ्या !!
बस्स . बस्स . बस्स.
आता असा दुटप्पीपणा चालणार नाही ...आता सगळ्यांना समान कायदा ...आता हिंदुंच्या भावनांचाही विचार करावा लागेल... उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे चालणार नाही आणि वाकडेतिकडे बोललात तर त्याची संपुर्ण जबाबदारी घ्यावी लागेल !
आणि हळु हळु लोकांच्या लक्षात येईल स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ... स्वातंत्रासोबत जबाबदारीही येत असते.
Freedom comes with responsibility .....or Consequences !
प्रतिक्रिया
10 Jun 2014 - 3:21 pm | आयुर्हित
संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली 'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका,' असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. इतकंच नव्हे तर पुस्तकांचे लेखक आनंद यादव व मेहता प्रकाशनाला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
पूर्ण माहिती द्या राव!
घाबरलो ना मी.
10 Jun 2014 - 3:36 pm | धन्या
माझ्याकडे "लोकसखा ज्ञानेश्वर" आहे, पण मी ते फाडणार नाही.
माझ्या मनातील ज्ञानदेवांचे स्थान अढळ आहे, ते एखादया पुस्तकातील मजकुराने डळमळीत होणार नाही.
10 Jun 2014 - 3:53 pm | प्रसाद गोडबोले
मी स्वतः ह्या दोनपैकी एकही पुस्तक वाचलेले नाहीये , पण तुकाराम पुस्तकावरुन जोरदार गदारोळ झालेला हे ऐकुन आहे ... आपण सदरपुस्ताकाचा रिव्हिव्यु लिहावी अशी ह्या निमित्ताने विनंती करीत आहे ...
>>> धन्या , हिंदु किंग इन इस्लामिक इंडियाबाबत तुझे काय मत आहे ? किंव्वा मनुस्मृती विषयी (की ज्यामधील मोजकाच मजकुर आक्षेपार्ह आहे) काय मत आहे ?
माझ्या लेखना उद्देश इतकाच होता की आता असले भावना दुखावणारे लिखाण हिंदुंकडुन खपवुन घेतले जावु नये ... हिंदु सहिष्णु आहे ह्याचा अर्थ कोणीही उठसुठ वाट्टेल ती टीका करावी असा नव्हे ...
प्लीज नोट : मी आधीही म्हणालो होतो की हरकत 'टीका करण्याला' नसुन 'अधिकार नसताना टीका करणे' ह्याला आहे. आनंद यादव हे जर "कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पुजनाचे ।। किंव्वा परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम किंव्वा मना बोलणे नीच सोशीत जावे " ह्यालेव्हलच्या संत अवस्थेत पोहचले असतील आणि मग त्यांनी तुकाराम ज्ञानेश्वर ह्यांच्यावर टीका केली असेल तर मी माझा लेख विनम्रपणे मागे घेत आहे ! पण तसे काही असेल असे वाटत नाही , उलट ते वरच्या कोर्टात गेलेत असे ऐकुन आहे !
10 Jun 2014 - 4:14 pm | धन्या
मी ही दोन्ही पुस्तके वाचली नाहीत.
महापुरुष मान अपमानाच्या पलिकडे गेलेले असतात. किंबहूना ते त्यांच्या हयातीतही तसेच वागलेले असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात एखाद्या पुस्तकात काही लिहिले असल्याने त्याने त्यांचा अपमान होत नसावा असे माझे मत आहे.
10 Jun 2014 - 4:46 pm | यशोधरा
मी दोनही पुस्तके वाचली आहेत आणि दोनही मला आवडली आहेत. फाडून टाकण्याइतके आक्षेपार्ह त्यात काहीच नाही, असे माझे मत आहे.
10 Jun 2014 - 8:56 pm | राजेश घासकडवी
+१.
मंबाजीची गोष्ट आठवली. तुकारामाच्या म्हशीने मंबाजीच्या बागेतल्या झाडांची नासधूस केल्याबद्दल मंबाजीने त्याला बाभळीच्या फोकांनी फोडून काढलं.
मी मनुस्मृती वाचलेली आहे. त्यात 'मोजकाच' मजकुर आक्षेपार्ह आहे असं म्हणणं म्हणजे विनोद आहे. ते सोडा. पण मनुस्मृतीच्या सर्व प्रती नष्ट करा, असं कुठच्या कोर्टाने सांगितलेलं आहे? ती आहे तशीच राहू द्या. विरोधकांनीही मनुस्मृतीचं प्रतिकात्मक ज्वलन केलं. असा विरोध दर्शवणं वेगळं आणि कोर्टाकडून बंदी येणं वेगळं.
हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.
10 Jun 2014 - 9:32 pm | टवाळ कार्टा
प्रचंड सहमत ... पण आताचे जाणते राजेच असे आहेत की काय बोलणार...
रच्याकने ... आत्ताच्या काळात कोणालाही "जाणता राजा" म्हणणे म्हणजे त्या खरोखरच्या जाणत्या राजाचा आपणच करत असलेला अपमान नाही??? या बाबतीत कशा कोणाच्या भावना दुखावत नाहित ... अगदी खर्या जाणत्या राजच्या वंशजांच्या सुध्धा...
आपल्या भारतीयांच्या कु**वर छडी मारणारा कोणी असल्याशिवाय आपण सरळपणे कधीच वागत नाही
10 Jun 2014 - 9:38 pm | प्यारे१
>>>>हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.
अत्यंत स्तुत्य इच्छा आहे पण दुर्दैवानं ती पूर्ण होणं अवघडच!
बहुसंख्य लोक हुल्लडबाजी नि दंगा ह्यामध्येच दंग होताना आढळतील. समत्वानं विचार होणं शक्य नाही.
बाकी इतरांची क्रिया आपल्या हातात नसतेच. आपल्याला शक्य असते ती प्रतिक्रिया. नि तीच कशी व्यक्त करायची ते ठरलं की जमलं. व्यक्ति पातळीवर जमतं बर्याचदा पण समष्टी बद्दल विचार करता हे जमणं शक्य नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते.
कुणाला स्कोअर सेटल करायचे असतात तर कुणाला आपलं स्थान बळकट करायचं असतं. कुणाला पकड मजबूत करायची असते तर कुणाला आणखी काही!
11 Jun 2014 - 10:47 pm | प्रसाद गोडबोले
मग मनुस्मृतीतील किती टक्के श्लोक जातीयतेचे समर्थन करतात ? ( हा तिरकस प्रस्न नाही , केवळ कुतुहल म्हणुन विचारतोय , मागे कोणीतरी पुरुषसुक्त जातीयतेचे समर्थन करते असे म्हणत होता त्याला मी पुराव्यानिशी सिध्द करुन दाखवले होते की त्यातील १०% पेक्षाही कमी श्लोक वर्णाश्रम व्यवस्थे विषयी बोलतात )
ओके . माझ्या अपेक्षा काही अशा आहेत ...http://en.wikipedia.org/wiki/Reconquista
http://en.wikipedia.org/wiki/Reconquista#mediaviewer/File:Spanish_reconq...
11 Jun 2014 - 11:33 pm | चिन्मय खंडागळे
आयला काय अफाट लॉजिक आहे! म्हणजे दहा किंवा अमुक% पेक्षा (अॅज ष्टिप्युलेटेड बाय द हानरेबल गोडबोलेसाहेब) जास्त कंटेंट आक्षेपार्ह असला तरच ते पुस्तक वाईट मानण्यात येईल. मग हेच लॉजिक संतसूर्य तुकारामला लावा की. सदर्हू पुस्तकात किती टक्के भाग आक्षेपार्ह आहे? (हा तिरकस प्रश्न नाही, केवळ कुतुहल म्हणुन विचारतोय)
12 Jun 2014 - 12:13 am | प्रसाद गोडबोले
करेक्ट ! आता तुम्ही जरा कुठे समजुन घेवु शकाल ...
पहिली गोष्ट
असं मी कुठेही म्हणलेले नाही , केवळ कुतुहल म्हणुन विचारले आहे .
दुसरी गोष्ट
% इज जस्ट वन पॅरामीटर ... आता मनुस्मृतीच काय तर पुरुषसुक्त अन गीतेही काही आक्षेपार्ह श्लोक आहेतच ... एव्हन बुध्दाच्या साहित्यातही असतील , फुलेंचा गणपतीवर टीका करणारा अखंड प्रसिध्द आहे ( बुध्दाने स्त्रीयांना बौध्द धर्मात प्रवेश देवु नये असे सुचवुन ठेवले आहे असे ही ऐकुन आहे ) दा विन्सी कोडही काही ख्रिच्यॅनिटीच्या पायाभुत विस्वासांना तडा लावणारी पहिली कादंबरी नक्कीच नसेल ... म्हणण्याचे तात्पर्य इतकेच तसं पाहिलं तर प्रत्येक लेखनात कोणाच्याना कोणाच्या भावना दुखावणारे काही भाग असतीलच ... % हा काही एकमेव पॅरामीटर नाही क्वालिटी हाही पॅरामीटर आहे , शिवाय ज्या समाजाशी ते लेखन संबंधीत आहे त्यांची बौधिक अवस्था इव्होल्युशनरी स्टेट हाही एक पॅरामीटर आहे ! आजवर हिंदु गपगुमान ऐकुन घेत आले कोणीही या वात्टेल ती टीका करा हिंदु आपले चिडीचुप ऐकुन घेत होतो
आजवर हिंदुंवर अनेक टीका झाल्या पण निधर्मी सरकारने त्या विरुध्द काय केले ?
आज पहिल्यांदा काही तरी केले असे दिसत आहे ... कुठे तरी हिंदुंना जाणीव होत आहे की आपण गप्प बसलो म्हणुन ही लोक गप्प बसणार नाहीत ..(ऐकीव माहीती नुसार संतसुर्य ह्या कादंबरीत तुकाराम जुगार खेळायचे असा काहीसा उल्लेख होता म्हणे , हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियातील उल्लेख आपण जाणतोच ... आता ह्या गोष्टी काही सहिणु म्हणुन खपवुन घ्यायच्या नव्हेत )
...म्हणुन ...."नाठाळाचे माथी काठी " हाणावीच लागेल !
ह्यामी वैयक्तिकली हिंदु अस्मितेचा उदय समजतो !
12 Jun 2014 - 12:38 am | भृशुंडी
ह्म्म्म.. म्हणजे कशाबद्दल लोकांनी आक्षेप घेतला ते तुम्हाला ठाउकच नाही, आणि तरीही तुम्ही ह्या निर्णयाचं समर्थन करताय. नक्की काय आक्षेपार्ह आहे ते समजेल का?
मग आम्हालाही मोकळ्या मनाने हिंदु अस्मितेच्या उदयाचा आनंद घेता येईल, काय?
12 Jun 2014 - 1:00 am | प्रसाद गोडबोले
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/--/articleshow/4...?
12 Jun 2014 - 1:22 am | चित्रगुप्त
महाराष्ट्र टाईम्स मधील वर दिलेल्या दुव्यात दिला आहे, तेवढाच मजकूर जर असेल, तर त्यात फारसे आक्षेप घेण्याजोगे वाटले नाही. अर्थात तसा उल्लेख तुकारामांच्या आत्मकथनपर कवनात आहे का, हेही बघणे अगत्याचे.
12 Jun 2014 - 1:27 am | भृशुंडी
धन्यवाद. उतार्यांत काही आक्षेपार्ह दिसलं नाही.
ह्यात नक्की आक्षेप घेण्यासारखं काय वाटलं, ते मुद्देसूद सांगाल का?
12 Jun 2014 - 10:28 am | थॉर माणूस
कुठे लिहिले आहे? मलाही त्या उतार्यात तुकारामांना लागलेल्या व्यसनाविषयी लिहीलेले दिसले नाही. आणि माणसे संत म्हणून जन्माला येत नसतात, ती आपल्या कर्माने संतपदाला पोहोचतात. त्याआधी त्यांच्याकडूनही सामान्य माणसाकडून घडणार्या चुका झालेल्या असू शकतात. पण आपल्याकडे कुठल्याही 'मोठ्या' व्यक्तीमत्वाला अगदी देवत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवायचे आणि मग त्याच्या पुर्वायुष्याबद्दल कुणी आवाज काढायचा नाही की काढू द्यायचा नाही असली काहीतरी विचित्र पद्धत आहे.
अरे संत असले तरी माणूस होते ना? अध्यात्माचा मार्ग घेण्यापुर्वी झाल्या असतील की काही चुका त्यांच्याकडून. त्यांचा संत तुकाराम म्हणून आदर करणार्यांना त्यांच्या सामान्य तुकाराम म्हणून जगलेल्या आधीच्या आयुष्याशी काय देणं घेणं असावं मग?
पुस्तके फाडायला निघालेल्या या लोकांना बहुदा "निंदकाचे घर असावे शेजारी" कुणी म्हटले याचा विसर पडलेला दिसतो.
13 Jun 2014 - 1:42 am | सासवड्कर
मी हे पुस्तक वाचले आहे . त्यात त्यांच्या व्यसन विषयी लिहिले आहे . तरुणपणी दुकानात येणाऱ्या मुलींशी लगट करायचे , त्या बदल्यात त्यांना उधार किंवा फुकट माल द्यायचे . उधारी घेण्याचे बहाण्याने मुलींचे आईवडील घरात नसताना घरात जावून बसायचे . शेवटी गावात याची चर्चा सुरु होते .
असे लिहिले आहे .
संत हेही माणूस होते . माणूस असला म्हणजे तो व्यसनी असलाच पाहिजे , तरुणपणी असे प्रकार केलेच पाहिजेत असे काही आहे का ? जर लेखकाला तसे आढळले असेल तर त्यांनी कोर्टात तसे पुरावे द्यायला हवे होते .
16 Jun 2014 - 6:09 pm | llपुण्याचे पेशवेll
संत हेही माणूस होते . माणूस असला म्हणजे तो व्यसनी असलाच पाहिजे , तरुणपणी असे प्रकार केलेच पाहिजेत असे काही आहे का ? जर लेखकाला तसे आढळले असेल तर त्यांनी कोर्टात तसे पुरावे द्यायला हवे होते .
सहमत. अशा प्रवृत्तीचा निषेध व्हायलाच पाहीजे. लेखक झाले म्हणून काहीही लिहीतील काय? जसे दुर्योधनाला कोणी सज्जन माणूस सापडला नाही तसे कदाचित या लोकांना ते स्वतः सरळमार्गी नसल्याने कोणी अन्य सरळमार्गी असू शकेल असे वाटत नाही. असो.
16 Jun 2014 - 6:49 pm | टवाळ कार्टा
मग हे तरी कशावरुन खरे??? यालातरी पुरावा कुठेय?
महाभारत लिखित स्वरुपात असले तरी ते पुराण आहे त्यात ५०% जरी खरे मानले तरीही वरचे वाक्य खरे मानता येणार नाही
10 Jun 2014 - 4:32 pm | टवाळ कार्टा
तुम्ही कोणावर टिका करता?? (उगाच आपली १ शंका :) )
10 Jun 2014 - 7:11 pm | अत्रुप्त आत्मा
@माझ्या लेखना उद्देश इतकाच होता की आता असले भावना दुखावणारे लिखाण हिंदुंकडुन खपवुन घेतले जावु नये. >> या बाबतीत सावरकरांचा एक लेख इथे द्यायला पाहिजे.जो त्यांनी सनातनांन्या ठणकावण्यासाठी लिहिलेला होता. त्यात त्यांनी..ह्याच भावना का दुखवता?-वाल्यांना,-- सद्भावना दुखवू नयेत..पण असद्भावना मात्र दुखविल्याच पाहिजेत!...बुद्धिभेद करु नये,पण दुर्बुद्धिभेद केलाच पाहिजे! ...असं ठणकावलेलं आहे.
कारण जी दुखावते ती सद्भावना आहे..की असद्भावना आहे...याचा निवाडा आधी झाला पाहिजे. मला गोड खायला प्रचंड अवडतं.मग उद्या डॉक्टर नसलेल्या (अधिकार नसलेल्या) जरी कुणी- "मिठाईवर बंदी घातली पाहिजे,कारण ती डायबॅटिक लोकांना मारायसाठी तयार केलेली आहे." असं म्हटलं तर माझी सद्भावना दुखावली? का असद्भावना दुखावली??? निवाडा काय द्यायचा? (हे उदाहरण सगळ्या धार्मिक/सांस्कृतीक/सामाजिक क्षेत्रातल्या "भावनादुखी" साठी आहे.
@हिंदु सहिष्णु आहे ह्याचा अर्थ कोणीही उठसुठ वाट्टेल ती टीका करावी असा नव्हे.>>> हिंदू आपापसात अत्यंत असहिष्णू रहात आलेले आहेत. त्यामुळे आपण सहिष्णू आहोत..हा भ्रम लवकरात लवकर सोडून दिलेला बरा! दुसरं म्हणजे... हिंदू आपापसात असहिष्णू आहेत,,म्हणून ते अहिंदूंच्या समोर विखुरलेले आणि दुर्बल रहातात. ती दुर्बलता किंवा भ्याडपणा आहे..सहिष्णूता नव्हे!
@'अधिकार नसताना टीका करणे' >>> अधिकार म्हणजे ज्याच्यावर टीका करायची तेव्हढ्या पातळी आणि लायकी पर्यंत पोहोचलेले लोक असाच ना? मग असेच बरेच लोक आहेत...जे पूर्णतः अधार्मिक क्षेत्रातले आहेत. ज्यांनी केलेलं लेखन, हाच अधिकाराचा मुद्दा लाऊन धुडकाऊन दिलं जातं. म्हणजे मग शिवाजीच्या राज्यकारभारातली एखादी चूक काढणारा माणूस राज्यशास्त्र या विषयातला प्रविण असून भागायच नाही...तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो शिवाजीच्या पातळीचा हवा..नाही का?
हे अत्यंत निरर्थक आणि चुकिचं आहे. शिवाय,चुक काढण्यासाठी अगर गैरगोष्टी दाखवून देण्यासाठी..., ज्या क्षेत्रातला अधिकार असायला हवा! असं तुंम्ही म्हणत असता..ती क्षेत्र अधिकार असण्याची नव्हे..तर त्यातला अभ्यास असण्याची असतात. अधिकाराचा काय संमंध???????? ज्ञानेश्वरांचा भिंत चालवण्याचा चमत्कार..या कथित घटनेवर भाष्य करण्यासाठी..कोणत्याही माणसला त्या क्षेत्रातला,म्हणजे संतपणा मधला अधिकार आवश्यक नसून,सदर घटनेच्या संदर्भातला(भैतिकशास्त्रातला-चमत्कार तपासायचा) अभ्यास आवश्यक असतो! म्हणूनच मी म्हणतो...
10 Jun 2014 - 9:09 pm | पिंपातला उंदीर
+७८६
10 Jun 2014 - 10:46 pm | धन्या
माझ्या मनात ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर आहे. मी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरीपाठाचे अभंग वाचलेले आहेत. अगदी ज्ञानदेव नाथ संप्रदायाचे अनुयायी म्हणून प्र. न. जोशींचा "नाथसंप्रदाय" हा अभ्यासपुर्ण ग्रंथही वाचलेला आहे.
तरीही हा भींत चालवण्याचा चमत्कार माझ्या पचनी पडत नाही. तसे झाले असेल तर न्युटनचा गतीविषयक पहिला नियम निकालात निघतो. अर्थात ते होणे नाही.
आता कुणी जर म्हणत असेल की ज्ञानदेवांनी आपल्या योगसामर्थ्याने भींत चालवली तर म्हणोत बापडे. :)
11 Jun 2014 - 11:00 pm | प्रसाद गोडबोले
बाकी इतर मुद्द्यांचे खंडन करीत बसत नाही ....फक्त एक विचारतो ...
अधिकार आणि अभ्यास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ! समजा तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही इंजिनियर कडे जाणार की मेकॅनिक कडे ?...( इंजिनियरचा अभ्यास असेल ...अन मेकॅनिककडे नसेल पण मेकॅनिक कडे अधिकार असेल ! )
रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते ...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!
12 Jun 2014 - 12:20 am | प्रसाद गोडबोले
बायदवे बुवा राग मानु नका पण
हे पाहुन मला पु.लं देशपांडेंच्या मुंबैकर पुणेकर आणि नागपुरकर मधील डायलॉग ची आठवण झाली
इकडे पिंपरी चिंचवड हिंजवडीला तशी काही अट नाही नाही ना बुवा
:D
12 Jun 2014 - 1:33 am | अत्रुप्त आत्मा
@बाकी इतर मुद्द्यांचे खंडन करीत बसत नाही ..>>> का बरं??? :D करा ना..तुम्हाला करता येतं की नाही..ते कळू दे की आंम्हाला! ;)
@अधिकार आणि अभ्यास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ! >>> हो आहेत..पण तुंम्ही ज्या क्षेत्राबद्दल चर्चा करत आहात,तिथे या दोन्ही गोष्टींचे तुमचे स्विकृत अर्थ भिन्न आहेत. हे बरोबर आहे की नाही? ते सांगा..तुमचं चर्चेचं क्षेत्र पारलौकिक आध्यात्मिक अनुभवांचं आहे...तिथे अधिकार या शब्दाचा अर्थ त्याक्षेत्रातील अधिकाधिक सिद्ध अनुभव असा होतो.त्यामुळे तिथे अभ्यास, हा शब्दसुद्धा अवाजवी आणि गैरलागू होतो...पण त्याच अधिकार शब्दाचा इहलौकिक अर्थ-त्या क्षेत्रातला अभ्यास ज्याला असतो..त्यालाच त्या क्षेत्राचे अधिकारी म्हणवता येते..असा आहे. त्यामुळे या चर्चा विषयाच्या अनुषंगानी जाताना,तुम्ही म्हणता त्या दोन गोष्टी फक्त वेगवेगळ्या न रहाता..वेगवेगळ्या क्षेत्रातल्याही होऊन बसतात..नै का?
@समजा तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही इंजिनियर कडे जाणार की मेकॅनिक कडे ?...>>> का बरं असा गैरलागू प्रश्न विचारलात??? गाडी बंद पडली तर इंजिनियरकडे जातच नाहीत..मेकॅनिक कडेच जातात
गैरलागू उदाहरणः- खरतर आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातल्या वादविवादात इहलौकिक उदाहरण लागूच पडत नाहीत. असा निष्कर्ष मी काढलेला आहे. कारण इहलोक ही वस्तुस्थिती..तर धर्म आध्यात्म हा केवळ कल्पनाविलास..किंवा सत्याभास! पहिलं सत्य आणि दुसरा भ्रम..कशी होणार तुलना??आणि कसं मिळणार लागू पडणारं उदाहरण??? ..असो!
@( इंजिनियरचा अभ्यास असेल ...अन मेकॅनिककडे नसेल पण मेकॅनिक कडे अधिकार असेल ! )>>> कैच्याकै निरर्थक विधान!..मॅकॅनिकचा अभ्यास नसतो????????????? आणि फक्त अधिकार असतो???????? बाप रे बाप!!!!!!!! आणि मॅकॅनिककडे अधिकार आलेला असतो,तो त्याच्या गाड्या दुरुस्त करण्याच्या अभ्यासातूनच!हे कसं विसरलात हो????
आणि मॅकॅनिक काही--"केवळ आपण गाडी दुरुस्त करतो आहे..करतो आहे..ती ठिक होते आहे..होते आहे..झाली..ठीक झाली..." असा ध्यानधारणेसारखा... ध्यान लाऊन मनात आभास निर्माण करून,गाडी दुरुस्त केल्याची अनुभूती आल्याचं भक्तांना सांगून अधिकाराचं प्रमाणपत्र मिळवत नाही... हे तर उघड आहे ना?
त्यामुळे-एकदा तुमच्या आध्यात्मिक/धार्मिक क्षेत्रात अधिकार कशाकशाला म्हणतात? ते सांगा..म्हणजे..त्याचे घटक काय काय आहेत?..ते(आंम्हालाही ;) )कळू द्या!
@रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! >>> हेच्च ते..! हा अधिकार अधिकार म्हणजे,त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात केलेली साधना(तिचा अनुभव) आणि त्यांची व्यक्ति म्हणून असलेली शुचिता हाच ना? मग..त्यांना देवानी दर्शन दिल्याची जी काय अनुभूती होती..तीची चिकित्सा केलेली व्यक्ति (किंवा अशा सगळ्याच घटनांच्या चिकित्सा/त्यावर टीका करणार्या व्यक्ति) ह्या अनैतिकही नव्हत्या..नसतात.(सामाजिक चळवळींमधल्या उथळ तसेच सूडबुद्धीच्या अपवादात्मक व्यक्ति सोडून)
आणि अधिकार म्हणाल,तर त्यांना(विरोधकांना) ह्या सगळ्या संत महात्म्यांच्या आध्यात्मिक धार्मिक साधना/ध्यानधारणांच्या प्रक्रीयांचं मनोवैज्ञानिक-ज्ञान त्यांच्यापेक्षा अधिक होतं आणि आहे.
@अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!>>> प्रचंड भंपक विधान. आभ्यासानी जर का फक्त बुद्धिची खाज भागते, असं असतं..तर अखिल जगतात..अंबेडकर/सावरकरांपासून ते अनेक इहलौकिक क्षेत्रातले नामवंत अभ्यासू समाज सुधारक समजाच्या उपयोगी आलेच नसते. आणि अधिकार कुणी कुणाला द्यायचा???...चिकित्सकानी/टीकाकारानी/लेखकांनी, ज्या व्यक्ति-विषयांवर टीका/अभ्यास करायचा त्यांच्याकडन,अधिकार-असल्याची प्रमाणपत्र आधी मिळवायची की काय? आणि ही प्रामाणं व त्याची पत्र कोणत्या निकषांवर मिळवायची???..त्यात..पुन्हा, धर्म/आध्यात्माच्या क्षेत्रात एकवाक्यता येणच शक्य नसतं कारण,तो प्रांत सगळाच्या..सगळा स्वसंवेद्य..म्हणजे केवळ आपापल्या(ज्याच्या/त्याच्या) अनुभवांवर आधारित..तिथे तुम्म्हाला अधिकारी असल्याची,प्रमाण किंवा किमान पातळीच ठरवता येत नाही..कारण आडातच नाही..तर पोहोर्यात कुठून येणार? मग कसं करणार तुंम्ही टीकाकाराच्या अधिकाराच मापन...आधी तुमच्याकडे त्याच माप असायला हवं ना..? ते आणा,आणि मग या अधिकाराचा वाद खेळायला!
आता...या अधिकाराच्या बाबतीतला अजुन एक राहिलेला प्रश्न-तो म्हणजे व्यक्ति सदाचरणी म्हणजे इहलौकिक दृष्ट्या नितीमान असण्याचा*!...तर तुम्ही म्हणता त्या क्षेत्राच्या विरुद्ध बाजूचे अनेक अभ्यासक/टीकाकार/चिकित्सक ..हे नितिमान होते..सदाचरणीही होते..तरीसुद्धा मी आधी म्हटल्या प्रमाणे, हा अधिकाराचा गैरलागू आणि भंपक मुद्दा काढून त्यांची निरिक्षणं/परिक्षणं/निष्कर्ष..अशीच धुडकावून लावली जातात...त्याचं काय? याचा एकदा विचार करा.
*(आध्यात्मिक धार्मिक पंथात,{वादविवादाच्या वेळी..} अधिकारा'च्या मुद्यात- हे ही एक लक्षण आवश्यक मानतात..बरोबर ना?)
12 Jun 2014 - 8:46 am | प्रचेतस
आत्मुबुवांचे मेगाबायटी प्रतिसाद पाहायला मिळत नाहीत. आज ते मिळालेत हीच ती अनुभूती.
12 Jun 2014 - 11:39 am | प्रसाद गोडबोले
ह्म्म ... एकुणच आपले ह्या विषयावर एकमत होईल असे दिसत नाही ... फक्त जाता जाता एक शेवटचा प्रश्न
१)निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ?
२)सेम होल्ड्स फॉर तुकाराम , तुकाराम स्वतःच्याच अभंगात म्हणतात की शुद्र याती जन्मलो सो त्यांचाही अभ्यास असण्याची धर्माचे अध्ययन असण्याची शक्यता फारच कमी आहे जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी आणि कदाचित एकनाथी भागवत वाचलेले असावे ... त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ?
अजुन खुप उदाहरणे देता येतील ... गोंदवलेकर महाराज , गाडगे बाबा , वगैरे लोकांनीही किती अभ्यास केला होता देव जाणे
अॅस्ट्रोनॉट श्रेष्ठ की अॅस्ट्रोनॉमर असा हा वाद आहे ... आणि माझ्यामते अॅस्ट्रोनॉट हेच श्रेष्ठ आहेत ..अअॅन्ड वी कॅन अॅग्री टू डिसअॅग्री हीयर :)
12 Jun 2014 - 12:49 pm | बॅटमॅन
मुंज झाल्यानेच किंवा ब्राह्मण असल्यानेच सनातन धर्माचा अभ्यास होतो इ. वाचून अतिशय करमणूक झाली. चालूद्या.
12 Jun 2014 - 2:46 pm | प्रसाद गोडबोले
वेद , पुराण , स्मृती , दर्शन वगैरे वगैरे ....किमा गीता , उपनिषदे आणि ब्रह्मसुत्र ह्या तीन ग्रंथांच्या अभ्यासाला मी सनातन धर्माचा अभ्यास मानतो , ज्ञानेश्वरांचा काळाचा रेफरन्स घेवुन पाहिले तर मुंज न झालेल्याला किंव्वा ब्राह्मण नसलेल्याला ह्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळत नसणार ... काळाचा संदर्भ सोडुन संतांच्या जीवनाचा अभ्यास करता येणार नाही ... असो फार बिषयांतर झाले
करमणुक कराची पावती कोणत्या पत्त्यावर पाठवु *biggrin*
12 Jun 2014 - 3:28 pm | बॅटमॅन
तुकोबा जेव्हा म्हणतात की मला काही कळत नाही, ते म्हंजे आईन्स्टाईनने मला काही फारसे कळत नाही असे म्हटल्यापैकीच आहे. ते एक वाक्य धरून आईन्स्टाईनला काही कळत नाही असे म्हणणे जितके ग्राह्य आहे तितकेच हेही आहे.
अन काळाचा संदर्भच घ्यायचा झाला तर ब्राह्मणेतर लोकांना याचा अभ्यास करायला मिळत नव्हता हेही तितकेच असत्य आहे. भक्ती चळवळ दृढमूल झाल्यापासून अशी पॅरलल व्यवस्था तयार झालेली आहेच- त्याच्याही आधीपासून असावी. अन आज वाटतो तितका तो सरळधोपट प्रकार कधीच नव्हता. पण आज त्या काळचे फारसे कै उरलेले नसल्याने एकांतिक विचार करणार्यांचेही फावतेच..असो.
बाकी चालूद्या.
12 Jun 2014 - 3:33 pm | अत्रुप्त आत्मा
@१)निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ?>>> पलटी खाल्ल्याबद्दल हबिनंदण हो !!! :D परत परत अधिकार अधिकार करत बसा..आणि तीच तीच निरर्थक /गैरलागू उदाहरणे देत बसा! पण...मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ नका...तेंव्हा एकं-दरीत..चालू द्या...! :D
@त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ?>>> मंबाजी आणि इतर अभ्यासूही नाहीत..अधिकारीही नाहीत..टगे आणि दांभिक आहेत.. (मुद्दाम त्यांची पार्टी बदलू नका) आणि पहा बरं-पुन्हा एकदा तुंम्ही प्रस्तुत चर्चा विषयाच्या बाबतीत गैरलागू उदाहरण दिलत..(म्हणूनच ते अदखलपात्र आहे!) आणि तुकारामांचा अधिकारही जीवनाविषयीच्या अभ्यासातूनच आहे..तुम्म्ही म्हणता तसल्या पोकळ भंपक-अधिकारातून नाही.(हे विसरलात)त्यामुळे तुकारामांना आपल्या-बाजुला घेण्याचा प्रयत्न करू नका.
आणि तुम्ही म्हणता--तसल्या--अधिकाराची व्याख्या करा/सांगा(टाळू नका) मग त्यात व्याख्येत तुमच्याकडलं कोणकोण बसतं ते आपण ठरवू!
=================
आणि ही इथली चर्चा सोडून द्या..(मी हरलो...असे माना.. :) ..) फक्त..मी सांगतो ती पुस्तके वाचा आणि जमलं तर त्यांचा प्रतिवाद इथे (क्रमवार) मांडा..
१) मनुस्मृती- काही विचार...(नरहर कुरुंदकर)
२)मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती..(डॉ.आ.ह.साळुंखे)
३)विद्रोही तुकाराम...(डॉ.आ.ह.साळुंखे)
12 Jun 2014 - 6:10 pm | प्रसाद गोडबोले
मला तुमचा मुद्दाच कळाला नाही... अभ्यास आणि अधिकार ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अन एकाने दुसरा येईलच असे नाही इतकेच मी म्हणत आहे .
असो.
बाकी तकारामानां मी कशाला माझ्या बाजुला ओढतोय उलट मीच त्यांच्या बाजुला जायचा प्रयत्न करतोय !! आणि जीवनविषयक अभ्यासाविषयी बोलाल तर त्यांच्या पेक्षा जास्त अभ्यास त्यांच्या पत्नीचा होता असेच म्हणावे लागेल.... मस्त प्रपंचात रहावे सावकारीचा व्यवसाय पहावा पोराबाळांचे पोट भरावे चवीपुरते देव देव करावे बस्स !
=============================
मी चर्चा हार जीत साठी करत नसतो ... "अधिकार नावाची गोष्ट नसतेच अभ्यासाने माणसाला ज्या गोष्टीचा अभ्यास आहे त्यावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो ! " असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते काही मला पटत नाही ,
( प्रचिती , अनुभव आणि योगदान नसलेला अभ्यासी माणुस माझ्या साठी अनधिकारीच आहे ) ,
तुमचे मत तुम्ही पटवुन दीले तर आनंदाने मान्य करेन !
आ.ह. साळुखे अत्यंत वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे ... तुम्ही त्यांच्या मार्गाने जात असाल तर _/\_ :)
12 Jun 2014 - 6:21 pm | प्रसाद गोडबोले
लहानपणी एक गोष्ट ऐकली होती ती आठवली आता ही तुकारांची आहे की नाही की प्रक्षिप्त आहे ह्यावर आपण नंतर कधी तरी वाद घालु
"एका बाईचा मुलगा सारखा गुळ खात असतो , सगळे दात किडलेले असतात , आणि कितीही सांगुन तो काही ऐकत नसतो , मग शेवटी ती बाई विचार करते की तुकाराम बुवांसारख्या आदरणीय व्यक्तीने सांगितले तर कदाचित तो ऐकेल ... ती पोराला तुकारामांकडे घेवुन येते व म्हणते की 'महाराज , सारखा गुळ खातो हा , ह्याला जरा चार शब्द सांगा तुम्ही सांगितलं तर ऐकेल'... तुकाराम महाराज म्हणतात 'बाई तुम्ही ह्याला एक आठवड्याने माझ्या कडे घेवुन या मग मी सांगतो काय सांगायचे ते ' .
बाई पोराला घेवुन येते एक आठवड्या नंतर ... महाराज त्या मुलाला जवळ घेवुन कुरवाळुन सांगतात 'बाळा , सारखा सारखा गुळ खात जाऊ नकोस त्याने दात किडतील ... ऐकणार ना माझं ?'
आणि मग तो मुलगा नंतर खरचं गुळ खायचे सोडुन देतो .
पण ती बाई आश्चर्यचकित होवुन महाराजांना म्हणते ' तुम्हाला हे एक आठवडा आधीच नव्हतं का सांगता येत ?'
महाराज म्हणतात ' आलं असतं सांगता पण मला केवळ ते माहीत होतं ... गेला आठवडाभर मी स्वतः गुळ खाणे सोडुन पाहिले मग लक्षात आले की हे किती अवघड आहे पण तरीही शक्य आहे ... मग मला तसे सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला... उगाचच नुसत्या अभ्यासाने त्याला सांगितलं असतं तर त्याला ते पटलं नसतं आणि कदाचित माझं मन मला खात राहिलं असतं की जे स्वतःला जमत नाही ते दुसर्यांना उपदेशितो म्हणुन '!! "
||
12 Jun 2014 - 6:37 pm | चित्रगुप्त
अगदी शेम हीच गोष्ट (फक्त गुळाऐवजी साखर) गांधीबाबा (राहुलबाबा नव्हेत, ते आपले नोटांवरले चिरपरिचित बाबा) बद्दलही सांगितली जाते, हे कसेकाय बुवा? अन्नू मलिक वगैरें मूजिक ढापतात, तसे त्यांनीपण तुकारामांची गोष्ट ढापली की काय?
12 Jun 2014 - 7:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकाही विषयातलं काहीही माहित नसताना श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवलं की असंच काही(च्या काही) वाटणार.
आजचा दिवस गडबोल्यांनी सत्कारणी लावला.
18 Jun 2014 - 11:45 am | मंदार दिलीप जोशी
>>एकाही विषयातलं काहीही माहित नसताना श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवलं की असंच काही(च्या काही) वाटणार. >>
विक्षिप्त बाई, अहंकार सोडा. तुम्हाला सगग्ळ्यातलं सग्गळं कळतं असा जो अहंकार आहे ना. सोडा जरा. बाकी अनेकांना अनेक गोष्टी माहित अस्तात म्हटलं.
14 Jun 2014 - 7:49 pm | बाबा पाटील
ह्यो धर्म आणी धर्माब्यास म्हणजी काय रे भाउ,म्हणजी मुंजी वाले बामण सोडुन ती पुस्ताक कुनी वाचायचीच नाय का ? बाकी समदी आडाणी गोट का काय गुर्जी ? मंग माऴ्याचा जोतिबा आणी हरिजंनांचा बाबा पण तुह्या मते ठार आडाणी असल नार भावु. रागावु नका दादा पण मला कुणबाटाला जरा डोस्क्यात किडा वळवाळला म्हणुन इचारला. आपला- आडाणी गावचा अंगठेबहाद्दुर बाबाजी पाटील.
10 Jun 2014 - 4:37 pm | आनन्दा
तुमच्या मनातले नाही होणार कदचित. पण एखाद्या लहान मुलाच्या हातात हे पुस्तक पडले तर?
संवैधानिक मार्गाने बंदी आणणे केव्हाही योग्यच. नपेक्षा तुम्ही जे काही लिहिलेत त्याचे पुरावे द्या.
बाकी एक प्रश्न आहे - या पुस्तकात जर ते "कालपनिक" चे डिस्क्लेमर टाकले तर त्यांना परत प्रकाशनाची अनुमती मिळेल का?
10 Jun 2014 - 4:33 pm | धर्मराजमुटके
कसे काय बुवा तुम्ही अस्मिता बिस्मीता शोधता अशा प्रकरणांत ? अहो हा फक्त कोर्टाचा निकाल आहे. तो फक्त समोर आलेल्या पुराव्यांवर अवलंबून असतो.
अवांतर : कोर्टाला मराठीत न्यायालय असा समानार्थी शब्द कोणी शोधला हो ? त्याला फार्फार तर निकालालय किंवा निवाडागृह म्हणणे ठीक.
10 Jun 2014 - 10:42 pm | चित्रगुप्त
या संदर्भात भाऊ तोसरेकर यांचा लेख 'मोदी जिंकले पण हरवले कोणाला?' वाचनीय आहे:
http://panchanaama.blogspot.in/2014/05/blog-post_18.html
त्यातील थोडासा भागः
..........अल्पसंख्य असलेल्यांनी बहुसंख्य असलेल्यांच्या भावना, श्रद्धा, इच्छा वा आकांक्षांवर कुरघोडी करणे; असे जे चित्र मागल्या तीनचार दशकात अट्टाहासाने व आक्रमकपणे निर्माण करण्यात आले होते, त्याच्या विरोधात हिंदू समाजामध्ये मोठीच नाराजी व क्रोध खदखदत होता. जणू भारतामध्ये हिंदू असणे म्हणजेच गुन्हा आहे आणि हिंदू नसणे म्हणजेच महापुण्य आहे; असा आग्रह धरला जात होता...
... उगाच कोणाच्या अंगावर जायचे नाही, पण कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायला मागेपुढे पहायचे नाही, असा स्वभाव असलेल्या मोदींनी बारा वर्षात संयमाने त्यावरचे उपाय शोधले, कुठलीही हानी अपाय होऊ न देता तेच उपाय गुजरातमध्ये अंमलात आणले. त्यातून त्यांची हिंमत वाढली आणि दुसरीकडे त्यांच्या उपायांचे उर्वरीत भारतातल्या अशा दुखावलेल्या समाजाला आकर्षण वाटू लागले. त्यातूनच मग थेट देशाचे नेतृत्व करून अशा थोतांडाचे मूळ असलेल्या नेहरूवादाला खुल्या मैदानात आव्हान देऊन पराभूत करायचे मनसुबे मोदींनी रचले....
10 Jun 2014 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा
@अशा थोतांडाचे मूळ असलेल्या नेहरूवादाला खुल्या मैदानात आव्हान देऊन पराभूत करायचे मनसुबे मोदींनी रचले....>>>बरोब्बर शब्दरचना..+++१११ अतिशय सहमत!
12 Jun 2014 - 8:52 pm | हवालदार
पण एकदम चपखल. " जणू भारतामध्ये हिंदू असणे म्हणजेच गुन्हा आहे आणि हिंदू नसणे म्हणजेच महापुण्य आहे; असा आग्रह धरला जात होता..." असे झाले होते खरे.
10 Jun 2014 - 10:54 pm | भृशुंडी
जबरदस्त!
येऊ द्या प्रसाद साहेब, अजून असेच जाज्वल्यपूर्ण लिखाण येऊ द्यात!
ही पुस्तके आपण वाचली काय न वाचली काय - त्याने काय फरक पडतो, नाही का?
पुस्तक काय, मी तर म्हणतो कोणी आपल्या खाजगी वह्यांमध्ये सुद्धा असे अश्ल्याघ्य विचार लिहिता कामा नये.
त्यावरही बंदी आणायलाच हवी.
हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान कुणीही लुंग्यासुंग्याने करावा आणि त्यांनी गप्प बसावे- ही परिस्थिती उरली नाही.
आज जर कुणी असा वेडावाकडा विचारही केला, तर त्यांना त्याबद्दलही शिक्षा मिळालीच पाहिजे.
असा जळजळीत लेख लिहून समस्त हिंदूंच्या भावनांना वाट फोडल्याबद्दल अभिनंदन!
10 Jun 2014 - 11:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
भगव्यांना, खाकी हाफ पँट वाल्यांना शिव्या देणं, हिरव्यांच्या बोकड दाढ्या कुरवाळणं हिचं खरी धर्मनिरपेक्षता असते प्रसाद दादा....हिंदु मेला तरी चालेल...वोट बँक मेली तर कसं व्हायचं? नशिब खांग्रेस चं वाट्टोळं झालं आत्ता नाहीतर व्हॅट, एल.बी.टी., एजुकेशन टॅक्सेस, सेस बरोबर जिझिया पण लावला असता.
11 Jun 2014 - 12:13 am | भृशुंडी
नाही तर काय?
हिंदु मेला तरी चालेल, पण शीख,जैन,बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन, आदिवासी, नास्तिक अशांना धक्का लागता कामा नये.
हिंदू धर्मासारखा सर्वसमावेशक ( ते लोकायत वगैरे फालतू लोक सोडून द्या) धर्म दुसरा नाही, हे या देशाला कळेल तो सुदिन.
11 Jun 2014 - 11:09 pm | चित्रगुप्त
फार काळानंतर 'जाज्वल्य' हा शब्द वाचायला मिळाला. असेच जाज्वल्य लिखाण येऊ द्या प्रसाद्पंत.
निवडणुकांपूर्वी नेहरूशाहीत पोसली जाऊन बुजबुजलेली तथाकथित 'इंटलेक्चुअले' मोदीविरोधात एकत्र येऊन काहीतरी करणार होती म्हणे, त्याचे काय झाले, याची बतमी आलीय का कुठे?
आणि त्या चमत्कारी फादर बद्दल (त्यांचे काय नाव? लिहायला डरू नका प्रसादपंत) अंनिस, दाभोलकर यांनी आवाज उठवलेला आहे का?
12 Jun 2014 - 9:58 am | धन्या
लोकसत्ताचे आजचे संपादकीय अतिशय नेमके आहे.
12 Jun 2014 - 11:07 am | माहितगार
संजय सोनवणींनी ब्लॉगवर प्रतिक्रीया नोंदवताना त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी न्या. सौ. के. पी. जैन यांनी दिलेला संपुर्ण निकाल वाचला आहे. कविता महाजनांचीही ब्लॉगवर प्रतिक्रीया आली आहे. प्रहार मध्येही या विषयावर लेख आला आहे.
एकुण काय तर तुम्ही वाल्मिकी ऋषिंच्या वंशातले असाल तर पुराव्या अभावी होत असलेली संतनिंदा थांबवण्याची आता मागणी करू शकता. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय काय तो निकाल येत्या काळात देतीलच. पण या धागा लेखकाने काढलेला अन्वयार्थ माननिय न्यायाधिशांनाही त्यांच्या निवृत्ती नंतर सवडीने वाचण्यास जरूर मिळो, सध्या एवढीच शुभेच्छा.
12 Jun 2014 - 1:07 pm | म्हैस
हि दोन्ही पुस्तक मी वाचलेली नाहीयेत . पण आत्ता एवढा वाद चाललाय म्हणल्यावर वाचेन .
सहमत .तुकाराम महारज देशोधडीला लागायच्या आधी सामान्य माणूसच होते . त्या काळात काही चुका केलेल्या असू शकतात . जशी जशी त्यांच्यापासून १ - १ गोष्ट दूर गेली तसे तसे वैराग्य वाढू लागले आणि सत्याचा शोध घेण्याची ओढ निर्माण झाली
काही म्हणजे नक्की कोणते श्लोक आहेत ते इथे स्पष्टपणे सांगा . चर्चा करता येईल
तुम्ही पुस्तकं बरीच वाचली असतील पण स्वतःचा योगशास्त्राचा अभ्यास किती आहे?
न्युटनचा किवा कुठलाही भौतिक शास्त्राचा नियम लावण्याचं तात्पर्य काय ? अध्यात्मशास्त्राचा नियम भौतिक शास्त्राला लावलेला चालेल का?
एकदम सहमत . खूप अभ्यासू आणि विद्वान असलेल्या विवेकानंदांना पहिल्याच भेटीत रामकृष्णांनी सत्याचा अनुभव करून दिला होता .
पुस्तकी ज्ञान असणं आणि सत्याचं ज्ञान असणं ह्यात फरक अहे. गुरुचरित्रात ह्याविषयी १ अध्याय अहे. धर्मशास्त्रांचा , वेदांचा नुसताच पुष्कळ अभ्यास असणारे पण काडीचीही अक्कल नसणारे मोठे पंडित श्रीगुरुंशी वेदांवर वाद घालायला येतात आणि त्यांची कशी फजिती होते ह्यावरून पुस्तकी प्रकांद्पंडीत असण्याचा आणि 'अधिकारी' असण्याचा काहीही संबंध नाही हे स्पष्ट होत. आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते तर ज्ञानेश्वरांच्या पुढे लोटांगण का घातला त्यांनी ? त्यांना तशी कुणी सक्ती केली होती का? १४०० वर्षे योगाभ्यास केलेले चांगदेव एवढे अभ्यासी होते तर ज्ञानदेवांना गुरु करून घेण्यासाठी का आले? ह्यांचीही उत्तरं द्या
प्रकांड पंडीत असण्याचा आणि महान असण्याचा काहीच संबंध नाही हे वर मी सांगितलाच आहे . तुमचा ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा काय 'अभ्यास ' आहे ते कळू द्या . नुसत्या शक्यता वगेरे मांडू नका . ठाम काहीतरी सांगा
ईश्वर भक्ती , योगसाधना ह्यातला अधिकारी असण्यासाठी प्रकांड पंडित असावं लागतं असं कुणी सांगितला तुम्हाला ?
12 Jun 2014 - 1:08 pm | बॅटमॅन
कधी न्हवे ते म्हशीशी बह्वंशी सहमत.
12 Jun 2014 - 1:40 pm | प्यारे१
सहमत!
बाकी विषय '(इतर पंथांच्या तुलनेनं) हिंदू अस्मितेचा उदय' असा काहीसा असावा का की '(स्वधर्मीयांच्या विचारांच्या खंडनाच्या स्वरुपात) हिंदू अस्मितेचा उदय' असं अपेक्षित आहे असं लेखकाला नम्रपणं विचारु इच्छितो. ;)
12 Jun 2014 - 3:08 pm | प्रसाद गोडबोले
हा महत्वाचा प्रश्ण विचारलात प्यारेजी ... आणि उत्तर आहे
(इतर पंथांच्या तुलनेनं) हिंदू अस्मितेचा उदय'
हिंदु लोक ऐकुन घेतात म्हणुन त्यांच्या संतांवर कैच्याकै टीका करा , त्यांच्या देवी देवतांची नागडी उघडी चित्रे काढा , "मंदीरांपेक्षा शौचालये महत्वाची" , "वारी बंद करा ", असली कैच्याकाइ विधाने करा , हिंदुंच्या अंधश्रधांविरुध्द कायदा करा अन इतरांना बिन्धास्त सोडुन द्या , गणपती आले की पाणी प्रदुषणाच्या गप्पा , दिवाळी आली की वायु प्रदुषण थोडक्यात काय तर येन केन प्रकारेण हिंदुंचे कसे चुकते अन हिंदु धर्म कसा बावळटांचा धर्म आहे हे ठसवत रहाणे ...सतत तेजोभंग करत रहाणे.... भले मग हिंदुंच्या भावना दुखावल्या तरी चालतील ... कारण ते अल्पसंख्य नाहीत ना !!
हे आता बस्स झाले.
"भले तरी देवु कासेची लंगोटी | नाठाळाची माथी काठी हाणु ||"
" धटासी व्हावे धट | उध्दटासी उध्दट | खटनटासी खटनट | कैसा शोभे ||"
आणि वितंडवाद्यांनी वाट्टेल तसा अर्थ काढु नये म्हणुन हे स्पष्टीकरण "हिंदु धर्मात वाईट प्रथा परंपरा आहेतच त्या निंद्यच आहेत आणि त्यांचे निर्मुलन व्हायलाच पाहेजे " पण ज्यांना हिंदु धर्माविषयी आस्था नाही , धर्माचा प्रसार प्रचार व्हावा अशी इच्छा नाही अशा लोकांनी आता बोलु नये.
हिंदु लोक त्यांचे प्रॉब्लेम्स स्वतःच्या बळावर सोडवतील...
सावरकरांसारख्यानी हिंदु धर्मावर टीका केली तर चालेल पण ना.वा. टिळकांसारख्यानी केली तर ती अजिबात खपवुन घेवु नये !!
12 Jun 2014 - 4:49 pm | टवाळ कार्टा
मंदिरांपेक्षा शौचालये जास्त महत्वाची आहेत...भारतात ५०% पेक्षा जास्त जनता उघड्यावर शौचाला जाते...आणि त्यातल्या स्त्रीयांचे प्रमाण बघता .... जौदे जोपर्यंत तुमच्या ओळखितल्यापैकी कोणी या परीस्तिथीतुन जात नाही तो पर्यंत नाही कळणार
असे कोण , कोणास, कधी, कुठे, कशासंधर्भात बोलले??? काही विदा आहे का? असला तर मला बघायला आवडेल...आणि पटले तर मी सुध्धा तुमच्या बाजुला
हे खरेच आहे...८०% लोकांनी सण साजरा करताना हजारो टन प्लास्टर ओफ ऑफ प्यारिस पाण्यात सोडले जाणे...४-५ दिवस हवा धुराने भरुन जाणे हे प्रदुषणच आहे
आणि उरलेल्या २०% मधे...त्यांचे कान घरच्या सोनारानेच टोचले पाहिजेत (हे वाक्य समजले नाही तर हा प्रतिसाद वाचला नाही तरी चालेल)
12 Jun 2014 - 6:32 pm | प्रसाद गोडबोले
१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ?
२.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !
12 Jun 2014 - 6:39 pm | धन्या
हे ना. वा. टिळक कोण?
12 Jun 2014 - 6:44 pm | प्रचेतस
रेव्हरंड टिळक.
यांनी हिंदू धर्म त्यागून क्रिस्टियन धर्म स्वीकारला. यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृतीचित्रे' हे पुस्तक अतिशय सुरेख आहे आणि ह्यात हा सर्व घटनाक्रम वर्णिला आहे.
12 Jun 2014 - 6:54 pm | धन्या
एका विशेषांकात बालकवी यांच्याकडे राहायला होते असे वाचल्याचे आठवते.
12 Jun 2014 - 7:26 pm | चित्रगुप्त
त्यांच्याविषयी 'रेव्हरंडत्व पावलेले टिळक' असा मजेशीर शब्दप्रयोग फार पूर्वी वाचला होता, ते आठवले.
12 Jun 2014 - 6:46 pm | बॅटमॅन
काहीच कार्य न करता निव्वळ समर्थनासाठी समर्थन करणे हे अजून निंदनीय आहे.
12 Jun 2014 - 6:59 pm | टवाळ कार्टा
हे कोणासाठी???
12 Jun 2014 - 7:09 pm | एस
आपण या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, करत आहात आणि त्यामुळे तुम्हांला इतरांना ह्या नाही तर त्या क्याट्येगरीत घालण्याचा अधिकार आहे असे गृहीत धरू.
धर्माच्या बाबतीत सकारात्मक काम करणे किंवा योगदान देणे म्हणजे काय? आपल्याच धर्माच्या निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणार्या रूढीपरंपरा धर्मातून हद्दपार करणे हे सकारात्मक नाही काय? आणि समजा एखाद्याने काहीच न करता स्वतःच्या धर्माबद्दल काही मत - मग ते नकारात्मक का असेना - व्यक्त केले तर त्याला तुमच्या दृष्टीने अजिबात किंमत नाही. का बरं? धर्म, जात, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी मनुष्याच्या जन्मापासून त्याला चिकटतात. कोणी असे म्हणत नाही की माझे मूल सुजाण वयाचे झाल्यावर त्याचे त्याला ठरवू दे कुठला धर्म स्वीकारायचा ते. मी आत्तापासूनच माझ्या संततीला अमुक धर्माच्या पद्धतीनुसार वाढवणार नाही.
मला असे म्हणायचे आहे की, समजा माझ्या धर्माबद्दल असे काही योगदान मी दिले नसेल तर त्याचा अर्थ मला माझ्या धर्मावर टीका करण्याचा हक्क नाहीये का? आहे. जरूर आहे. कारण मला माझा धर्म आहे तसा फॉलो करायचा नसला तरी जन्मापासूनच माझा धर्म निश्चित झाल्यामुळे त्याचा बरावाईट परिणाम माझ्यावर होतो. त्यापासून सुटका केवळ धर्मांतरामुळेच काही प्रमाणात शक्य आहे. त्याचेही ना घर का ना घाटका असं होऊन बसतं. एकूणच मानवसंस्कृतीत संपूर्ण धार्मिक निरपेक्षता प्रत्यक्ष व्यवहारात शक्य होत नाही.
अशी परिस्थिती असताना मी गप्प का बसायचं? केवळ स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या हुल्लडबाजीला घाबरून?
बादवे, ज्याला तथाकथित हिंदू धर्म म्हणलं जातं त्याबद्दल प्रबोधनकारांचे जे मत आहे तेच माझंही मत आहे.
12 Jun 2014 - 7:28 pm | टवाळ कार्टा
म्हणजे शौचालयांची गरज आहे ...ते सुध्धा खुप मोठ्या जनसमुदायासाठी हे तुम्ही(सुध्धा) मानता...मग मंदिरांची गरज आणि शौचालयांची गरज यातील कोणती गरज लवकर पुर्ण झाली पाहिजे???
१. लोकांनी उघड्यावर शौचास जाणे चालेल पण सर्व सार्वजनिक ठिकाणी मंदिर असले पाहिजे
२. उघड्यावर शौचास जाणार्या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली पण लोकांनी घरातल्या देवाच्या तसबीरीपुढे हात जोडले तरी चालतील
शाळेत गेलेले एखादे शेंबडे पोरसुध्धा यातला २ पर्याय निवडेल
हे सगळे शाळेत्/कॉलेजात असताना केलेले आहे...आतासुध्धा जमेल तसे करतो
आणि मी हे केले तरच माझा मुद्दा बरोबर ठरतो असा जर तुमचा समज असेल तर मग मलापण विचारावेसे वाटते की तुमच्या घरात शौचालय असले पाहिजे की देवघर???
मला कोणत्याही क्याटेगरीत टाकायची गरज नाहिये ... तितका तुमचा "अभ्यास" आणि "अधिकार" दोन्ही नाहिये
अशाबाबतीत मी अजुन कुठेही आणि काहिही लिहिलेले नाही...हे तुमचे "मनचे श्लोक" आहेत
आधी मी कधी कुठे कोणाचा कशासाठीही "प्रचार" केला आहे त्याचा "अभ्यास" करा आणि मग जर त्यावर विचार केलाच तर आधी समोरच्याचे मतपरिवर्तन विचारानेच करता येते का ते पहा ...हे सगळे झाल्यावरच माझा निषेध करा
उगाचच उंटाच्या.... (म्हण माहित नसेल तर अभ्यास करा)
13 Jun 2014 - 11:36 am | प्रसाद गोडबोले
>>> ह्या प्रस्नाला तुम्ही व्यवस्थित बगल दिली आहेत , त्या मुळे तुम्ही ह्यातले काहीच केलेले नाहीत असा संशय येत आहे .
>> ह्या बद्दल अभिनंदन ... हे कार्य वाढवावे , गणेशोस्तव बंद करा असे म्हनण्यापेक्षा मातीच्या मुर्ती वापरु असे जर तुम्ही समाजाला संदेश देत असाल तर तुम्हाला ह्या विषयावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो ...मला हेच म्हणायचे होते :)
इथे तुम्ही प्रतइकात्मक आहात हो ... काहीच न करता उगाच नुसती भाषणे झाडणारी १०० माणसे मी तुम्हाला भेटवुन देईन ह्या येत्या गणेशोत्स्वात !!
बरं ! सध्या तुम्हाला अभ्यास आणि अधिकार ह्यातील फरक समजला , मला जो मुद्दा मांडायचा होता तो कन्वे झालाय , ह्यात आनंद मानतो ... बाकी माझ्या अभ्यासावर आणि अधिकारावर भेटल्यावर निवांत चर्चा करु :)
12 Jun 2014 - 3:05 pm | ऋषिकेश
छे छे छे!
किती तरी हिंदु व्यक्ती हिंदु धर्माबद्द्लच कस्सं कस्सं वैट्ट वैट्ट बोलताहेत. काही पोच्च राहिलेला नाही!
हजारोवर्षांपूर्वीचा व जुना का असेना इतक्या पवित्र धर्माबद्दल असं बोल्लात तर नरकात जाल (ते शक्य नसेल तर जेल मध्ये जाण्याचेही दिवस दूर नाहित)
12 Jun 2014 - 7:01 pm | बॅटमॅन
याचीच वाट पाहत होतो. आता धन्य जाहलो!
12 Jun 2014 - 9:07 pm | अनुप ढेरे
मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन क्यांप कधी सुरु होतात आणि त्यासाठी जमीन अधिग्रहण कधी सुरु होतय त्याची वाट बघतोय.
13 Jun 2014 - 9:00 am | माहितगार
बर्याच लोकांना काँटेक्स्ट आणि उपरोध समजत नाहीत, (त्यामुळे कॉमेंट टाकताना जरा जपून)
13 Jun 2014 - 9:44 am | अनुप ढेरे
ओके.
13 Jun 2014 - 1:05 pm | बॅटमॅन
नैतर काय च्यामारी.
12 Jun 2014 - 3:09 pm | धन्या
मला योगशास्त्रामधलं काहीही कळत नाही.
मात्र विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून एव्हढं कळतं की या विश्वात निसर्गनियमांपलिकडे जाऊन काहीही घडत नाही. निसर्गाच्या नियमांचं आकलन किंवा विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. न्युटनचा गतिविषयक पहिला नियम हाही निसर्गाचाच नियम. न्युटनने त्याला फक्त त्याची पडताळणी करुन विधान स्वरुपात मांडणी केली. तर हा नियम असं म्हणतो की कोणतेही बल लावले नसेल तर अचल अवस्थेतील वस्तू चलमान होऊ शकत नाही. हे जगाच्या पाठीवर कुठेही शक्य नाही.
अतिशय हास्यास्पद विधान. मुळात अध्यात्मशास्त्र म्हणून काही नाही. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी शास्त्रामध्ये एकवाक्यता असते. भारतातला शास्त्रज्ञ एक बोलतोय, अमेरिकेतला शास्त्रज्ञ वेगळं बोलतोय असं होत नाही. अध्यात्माला फारतर विचारसरणी किंवा आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण म्हणता येईल. हा दृष्टीकोण व्यक्तीगणिक बदलू शकतो. नव्हे, तो बदलतोच. एकवाक्यता अशी नसतेच. अध्यात्मामध्ये प्रत्येकाचा "अनुभव" वेगळा, प्रत्येकाची "अनुभूती" वेगळी. काय प्रमाण आणि कोण अधिकारी हे कसं ठरवणार? आणि मुळात जे समोरच्या व्यक्तीला प्रमाण वाटतंय ते मला मान्यच नसेल तर?
ज्ञानदेव काहींना विष्णुचे अवतार वाटतात, मला मात्र ते एक महान तत्वज्ञ, श्रेष्ठ दर्जाचे कवी पण तरीही तुमच्याआमच्यासारखे माणुसच वाटतात. कोणाचं म्हणणं प्रमाण मानायचं?
12 Jun 2014 - 3:40 pm | यशोधरा
कोणाचं म्हणणं प्रमाण मानायचं? >> ज्यांना ज्ञानोबांमधलं विष्णुत्व दिसतं त्यांनी ते मानावं, आणि ज्यांना ते कवी, तत्वज्ञ म्हणून भावतात, त्यानी ते अंगिंकारावं. जो जे वांछिल अशी प्रार्थना खुद्द ज्ञानोबांनीच केली आहे, हे विसरु नये, म्हणजे झालं. :)
12 Jun 2014 - 3:53 pm | धन्या
आम्हीही केव्हाचं तेच म्हटलंय. :)
12 Jun 2014 - 3:58 pm | यशोधरा
फरक इतकाच असावा की ज्ञानदेवांनी जेह्वा ते म्हटलंय तेह्वा कोणाला 'बापडे' समजलेल नाही वा तसा भाव मनात बाळगलेला नाही. लै लै मोठठाल्ला फरक है बाप्पा!
12 Jun 2014 - 4:08 pm | धन्या
एकदम मान्य. म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात.
मी वापरलेला "बापडे" हा शब्द "एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते" अशा अर्थी होता.
12 Jun 2014 - 5:04 pm | प्यारे१
>>> एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते
:)
12 Jun 2014 - 8:16 pm | यशोधरा
धन्या तेच तर. प्रत्येकाला आपल्याला काय अधिक महत्वाचं वाटतं ते ठरवायचा मूलभूत हक्क आहेच की. मग जर एखाद्याला विज्ञान तुझ्याइतकं महत्वाचं वाटत नसेल तरीही त्यात काही चुकीचं नाही. आहे का? तुझी श्रद्धा विज्ञानावर, एखाद्याची अध्यात्मावर आणि कोणाची, आणि कुठे. :)
13 Jun 2014 - 1:03 pm | धन्या
एव्हढं सोडून बाकीचं पटलं.
श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. उदाहरणार्थ सतराव्या शतकात गॅलिलिओने पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे ठाम प्रतिपादन करेपर्यत लोकांची पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे अशी श्रद्धा होती जी खोटी होती.
सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते. ज्याची श्रद्धा असते त्याला कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसते.
विज्ञान हा श्रद्धेचा विषय नाही. तो पडताळून पाहण्याचा विषय आहे. जे पुराव्यांनी सिद्ध करता येत नाही ते विज्ञान नसते.
13 Jun 2014 - 2:07 pm | यशोधरा
ओके.
>>सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे >> हे मला मान्यच आहे पण
अवांतरः कितीश्या "विज्ञानवाद्यांना" हे मान्य असतं? जिथे धर्म आणि रुढी (ज्या चुकीच्या असू शकतात) ह्यातला फरकही न समजावून घेता, हिंदू धर्माच्या निरर्थकपणाबद्दल स्यूडो सुधारक टाहो फोडत राहतात ( ह्या धाग्यावरच उदाहरण आहे! ;) ) तिथे पुढे कशाला काही बोलायचं? (असंही वाटत.) :)
असो. :)
12 Jun 2014 - 4:50 pm | आदूबाळ
कोण अस्मिता? कोण उदय?
धन्यवाद.
12 Jun 2014 - 9:23 pm | सूड
रोचक चर्चा !!
13 Jun 2014 - 12:53 pm | म्हैस
तुम्हीच तुमच्या मतावर ठाम नाही आहात . एकीकडे तुम्ही म्हणताय मला एका शास्त्रातल काही काळात नाही. दुसरीकडे म्हणताय दुसरीकडे म्हणताय त्यात हे नाही आणि त्यात ते नाही . काय हास्यास्पद विधान आहेत . हे म्हणजे engineering मध्ये हुशार असलेल्यांनी medical मधलं काही कळत नसताना त्यात हे नाही आणि त्यात ते नाही हे म्हणण्यासारख आहे .
साधकाला त्याच्या तयारीप्रमाणे आणि पुर्व कार्मान्नुसार आलेले अनुभव वेगळे असले तरी अंतिम ज्ञान एकाच असतं . जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी त्या सत्यात एकवाक्यताच असते . सत्य थोडीच बदलतं ? तुकाराम महाराज वेगळं बोलतात आणि ज्ञानेश्वर महाराज किवा कुठलाही'साधक वेगळं बोलतोय असं होत नाही
अभिमान असणं आणि अहंकारी असणं वेगळं आहे . आम्ही विज्ञानाला कधीच नावं ठेवत नाही किवा विज्ञानाच्या विरोधात अजिबात नाही . विज्ञानात हे नसतं आणि ते नसतं अशी फुकाची फुरफुर करत नाही आम्ही . विज्ञानाच्या पलीकडे काही आहे ह्याचा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आम्ही अभिमानी अहोत. अहंकारी नाही.
13 Jun 2014 - 1:51 pm | धन्या
इथे विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र. न्युटनच्या नियमांचा अभ्यास भौतिकशास्त्रात होतो. आणि शाळेत गेलेला प्रत्येकजण भौतिकशास्त्र आणि न्युटनचे गतीविषयक नियम शिकलेला असतो.
योगशास्त्र हा सर्वत्र शिकवला जाणारा विषय नाही. त्यामुळे त्याबद्दल एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद काय आहे?
बाकीचे चालू दया. :)
13 Jun 2014 - 2:27 pm | सुहास..
प्लीज नोट : अधिकारावरुन , मी लोहगावातल्या आठवडी बाजारामध्ये सार्वजनीक शौचालयाचा प्रस्ताव आणला, ग्रामसभेमध्ये मंजुर झाल्यावर , निधी आणि त्याचा योग्य वापर करुन बांधुन ही घेतले, अर्थात, देखरेखी खालीच, लवकरच, अजुन पाच एक आठवड्याने ते निशुल्क ही होईल, लोहगावातच जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदीराच्या सुशोभीकरण्याचा प्रस्ताव ही तीन वर्षांपुर्वी माझ्याच तोंडुन निघाला, त्यात फक्त वर्गणीदारम्हणुनच नव्हे , वर दोन महिने उन्हातान्हाची वर्गणी मागत फिरणार्या कार्यकरणीत ही माझा सहभाग होता. धन्यवात !!
वैयक्तीक मत सांगायचे तर हल्ली कुठेतरी कायतरी झाल म्हणुन अस्मितेचा उद्य कसा होतो हा प्रश्न मला पडला आहे ? अस्त झाला होता म्हणायचे की काय ? मग घाशीराम कोतवाल हे काल्पनिक आहे असे तेंडुलकरांनी डिक्लेयर केल्यावर अस्मिता झोपी गेली होती का थोडी वर्ष ( असो .. पुस्तक वाचलं नाही तरी संदर्भ समजण्याईतपत अक्कल आली आहे लोकांना म्हणजे काही ही होवु शकते ) मोरेंच्या वकीलांना विचारले तर कसली आलीये म्हणे अस्मिता ( कसला हिंदु - बांधव, भोंदु-बांधव सगळे ) !!
नेमके काय आहे ?
गेल्या २००९ पासुन हा वाद चालु आहे, आणि त्यामध्ये यादवांना अटक आणि जामीन जोस्जीशी, पेताड मोहन जोशी संमेलनाध्यक्ष चालतात, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेळा लेखक मात्र चालत नाही, अस्मितेला मात्र २०१४ उजाडल ? ते ही नेमके सरकार आल्यावर असे ज्यांना वाटत असेल, तर ते तसे नाही , वकीलांनी पटवुन दिले की ज्या प्रकारे विटबनेमुळे गेली काही दिवस पुणे पेटतय त्या अनुषंगाने या पुस्तकांवर बंदी आणावी , निकाला त कुठे ही असे म्हटलेले नाही की ही पुस्तके फाडुन टाका , अश्या प्रकारची सामाजिक मानहानी ( मग ती कुठली का असेना ) सर्व च प्रकारची पुस्तके फाडुन टाका ..मला आश्चर्य याचे वाटते की दोघांना दंड कश्यासाठी ? पुस्तक खपलय आणि वर काही जणांनी लिहीलय सुध्दा की आक्षेपार्ह असे काही नाही , मी ही वाचलय ! भक्त असुनही मला आक्षेपार्ह वाटल नाही, एक सरळ साधा लेखन विस्तार.मग त्यात अस्मिता कुठुन आली ? त्या त इथे काही उगा टाळ्या घेण्यासाठी प्रतिसाद उठाठेव करताहेत त्यांची तर कीव करावी तेव्हढी थोडीच आहे .ज्यांचे डोळे उघडे आहेत त्यांनी पान क्रमांक ९३ ९४ नकी वाचावे , बाकीच्यांना अस्मिता लखलाभ होवो
अस्मिताच शोधायची असेल तर मोहसिन च्या ब्रुटल मर्डर मध्ये का शोधत नाहीत ? असो ...वेळ थोडा कमी आहे..
त्यामुळे थांबतो
13 Jun 2014 - 3:26 pm | ऋषिकेश
__/\__
अधिक काय लिहिणे!
13 Jun 2014 - 3:54 pm | माहितगार
सुहासजी आपण न्यायालयाचा निकाल वाचून हे लिहिले आहेत ? न्यायालयाच्या निकालाचा सध्याच्या घटनांशी संबंध आहे असे म्हणावयाचे आहे का ? संजय सोनवणींनी त्यांच्या ब्लॉगवर न्यायालयाचा निकाल वाचल्याचे म्हटले आहे त्यांच्या पोस्टशी आपला उपरोक्त मजकुर जुळतो असे वाटत नाही. संजय सोनवणींचे बरोबर असेल तर भादवि अंतर्गत येणार्या Defamation संबंधातील दोन कलमांतर्गत पुर्वज बदनामीचा खटला वंशजांनी टाकला, कादंबरीस काल्पनिक म्हणण्या एवजी संशोधनपुर्वक लिहिल्याचे लेखकाने म्हटल्यामुळे पुरावे देण्याची वेळ आली असावी, पण तेव्हा हाताशी पुरावे असणे शक्य नव्हते. आनंद यादवांचा वकील कच्चा पडला की आनंद यादव माहीत नाही,(लोक आनंद यादवांना दोष देत आहेत) पण संशोधन या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला गेला का की संशोधन शब्दास साहित्यिक अर्थछटा असु शकते हे (आनंद यादवांचा वकील आणि) माननीया न्यायालयाने लक्षात घेतले असावे का ? माझा तुकाराम गाथेचा अभ्यास नाही त्यातील सर्व शब्द समजत नाहीत पण काही गाथांकडे नंतर निर्देश करेन. पण त्यापुर्वी येथे प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली जावयास हवी ती भारतीय संस्कृतीत इश्वर मानवी अवतार घेतो हे या करताही गृहीत धरले जाते की या जगातल्या सर्व अडी अडचणी तो स्वतः भोगतो आणि मग उपाय देतो. श्रीकृष्ण बालपणी लोण्यावर हात मारतो हे ठिक पण तिरूपती बालाजीची एक कथा विचारात पाडणारी आहे. ज्या देशात इश्वरी अवतार चुकू शकतात आणि नंतर मोठे होतात, वाल्मिकी सारखे ऋषि असतात साहित्यिक एका व्यक्तीत सामान्य गुण होते पण तो नंतर असामान्य झाला हे एवढ्या करता दाखवू इच्छितो की सामान्यगुणांची व्यक्तीही असामान्य पातळी गाठू शकते हे दाखवायचे असते आणि अशी साहित्यिक वर्णने भारतीय साहित्यात आणखीही असतील. तुम्ही लेखकाच्या भूमीकेचे समर्थन करा अथवा न करा, न्यायालये कायद्यांतर्गत काय तो निकाल देतील, तरीपण एका साहित्यिकाच्या लेखना मागे काही चांगलीही भूमीका असू शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न न करता घेतल्या जाणार्या टोकाच्या भूमीका भारतीय संस्कृती समजलेल्यांच्या म्हणवता येतील का हे पाहता यामुद्यावर वारंवार साशंक व्हावयास होते.
तुकारामांच्या गाथा अभंग नोंदवतो आहे चुकत असल्यास सांगावे आणि संपादकांकडून उडवावेत. गाथा क्रमांक ओळ तिसरी आणि चौथी मध्ये संत तुकाराम म्हणतात .....नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥ येथे संत महोदय स्वतःकडे कमीपणा घेतात (म्हणजे ते वृत्तीने तसे असतात असे नव्हे). आउट ऑफ काँटेक्स्ट असल्याचा आरोप नको म्हणून आता संपूर्ण अभंग देतो "मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥ " अठ्ठावनाव्या अभंगात संत तुकाराम म्हणतात "सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥ त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥ नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥ " याचा अर्थ पुर्वाश्रमीचे संत तुकाराम आंनद यादव कादंबरीत दाखवतात तसे होत नाही पण माझा म्हणण्याचा उद्देश एक संत माणूस स्वतःकडे स्वतःच्या शब्दा सामान्यपण घेऊ शकतो, एक सामान्य व्यक्ती असामान्य होऊ शकते असा दाखवण्याचा साहित्यिक आनंद यादवांचा प्रमाद पुराव्यांच्या पातळीवर टिकणारा नसेल परंतु साहित्यिकाचा इथे मूळ हेतू चांगला नसण्या पेक्षा चांगला असण्याचीच शक्यता अधीक असावी. अर्थाचे अनर्थ आणि कायद्याची कैची लागण्यास एकच वेळ झाली असे दिसते. आनंद यादवांवर टिकाकरणार्यांनी टिका जरूर करावी पण तुम्हाला काळ्या वाटणार्या त्या ढगांना असलेली चांगल्या उद्देशाची चंदेरी कडा न पाहता टिका एकांगी तर नाही ना अशी शंका येते आणि संतनिंदा नेमके कोण करते आहे असा प्रश्न पडतो. यामुळे आनंद यादव आणि त्यांचे समकालीन साहित्यिकांच्या कच खाऊ भूमिके बद्दल संजय सोनवणींचा खेद समजून घेता येतो.
आपण म्हणता तसा हा खटला न्यायालयात काही वर्षांपासून चालू आहे. त्याचा निकाल लागण्याची वेळ आणि वेगळ्या पक्षाचे सरकार निवडून येणे हा केवळ योगायोग त्याचा बादरायण संबंध लावून भाजपा सरकार निवडून आले नसते काँग्रेसचेच सरकार असते तर खटल्याचा निकाल काही वेगळा लागला असता का ? काँग्रेस सरकारे असतानाचे निकाल न्यायालयांनी दबून दिले होते का ? तसा इतिहास नाही उलटपक्षी सर्वसाधारणपणे भारतीय न्यायालयांची निष्पक्षतता निर्विवाद आहे. धागालेखकाने अप्रत्यक्ष असे निर्देश करणे कदाचित न्यायालयाचा अवमानाच्या कायदेशीर कचाट्यात येणार नाही, पण न कळतका होईना न्यायालयीन प्रक्रीयेस कमी लेखणे संतनिंदेपेक्षा अधीक चुकीचे नाही ना असा प्रश्न पडतो आहे.
13 Jun 2014 - 6:23 pm | प्रसाद गोडबोले
>>> निष्पक्षतता ? 'सॅटॅनिक' वर बॅन आणायला कितीवर्ष घेतली न्यायालयाने ? आणि संतसुर्यवर ? आणि हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियावर वर ?
तुर्तास फक्त वर्षंची आकडेवारी टाका , मग आपण निवांत चर्चा करु निष्पक्षतेवर !
न्यायलीन प्रक्रिया किंव्वा न्यायालयाचे निर्णय ह्यांना कमी लेखणे हे अगदी १९४७ पासुन सुरु आहे , गांधीहत्येत संघाचा हात नाही असे न्यायालयाने म्हणल्यावर्ही पटेल म्हणाले होते की 'संघाचा हात नसला तरी संघाचीच विचारसरणी आहे' , सावरकरांना निर्दोष मुक्त करुनही आजही त्यांच्यावर चिखल फेक होतेच की !
मोदींना सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली तरी माझ्या लेखी मोदी खुनीच आहेत असे लोक स्पष्टपणे मिडीयावर बोलत होते .
न्शिवाय न्यायालय दरवेळी योग्य "न्याय" निर्णयच देते असे नाही , अयोधेत वादग्रस्त जागी १४ शतक्या पुर्वी मंदीर होते असा स्पष्ट निकाल आर्किऑलॉजिस्ट ने दिल्या नंतरही त्या प्रकरणातला न्यायालयाचा निर्णय आपण पाहिलाच !
शिवाय न्यायालयाच्या निर्णयाचा मान न राखण्याचे आदर्श राजीव गांधींनीच "शहाबानो" प्रकरणा पासुन घालुन दिले आहेत !
जाऊन दे ... खुप विषयांतर झाले !
13 Jun 2014 - 8:16 pm | माहितगार
या प्रतिसादाच्या सुरवातीसच माझी भूमीका स्पष्ट नमूद करतो की पुस्तकांसहीत कोणत्याही कलाकृतीस कोणत्याही समाजाच्या आग्रहास बळी पडून बंदी घालू नयेच सर्वच ग्रंथ आणि कलाकृतींना विद्यापीठ प्राध्यापकस्तरीय समीक्षण बंधनकारक करून विरोधी मुद्यांचे खंडन करणारी समीक्षा प्रस्तावनेसोबत छापणे बंधनकारक करावे, त्या खंडनास प्रतिसाद देण्याची मोकळीक कलाकृती निर्मात्यास/प्रकाशकास द्यावी. मग त्या कलाकृतीतून काय घ्यावयाचे आणि नाही घ्यायचे ते रसिक ठरवेल. शासनास वाटल्यास अपवादात्म स्थितीत कलाकृती समीक्षणासाठी अधिक विद्यापीठीय तज्ञांकडे अधिक काळा साठी पाठवावी.
आता आपल्या बाकी काही मुद्यांकडे येतो. :) मान्यवर आपला धागा लेखच अंशतः विषयांतराने झालेला नाही ना, ते असू द्यात ते फार महत्वाचे नाही. या धाग्यावर अथवा इतरत्र लोक विषया वरील अधिकाराच्या गोष्टी करत असताना पाहीले आपण कायद्याच्या सर्व बाजू माहित असून लेखन करत असल्यास त्या कायद्याच्या बाजू जाणून घेणे आणि माझ्या ज्ञानात भर घालणे मला नक्कीच आवडेल.
कायद्याच्या पैलूंबाबत आपली काही गल्लत होत नाहीएना अशी सध्या तरी मला अल्पशी शंका येते. संतसूर्य बद्दल सरकार न्यायालयात गेले असल्या बाबत माझी माहिती नाही, संतसूर्यचा खटला एका व्यक्तीच्या वंशजाने टाकलेला खासगी व्यक्तीने टाकलेला आणि तोही भादवि च्या वेगळ्या कलमांनी; सामाजिक अशांतता पसरू नये म्हणून सरकार वेगळ्या कलमांचा आधार घेते म्हणून आपली तुलना किमान संतसूर्यबाबत लागू होऊ शकणार नाही. सामाजिक अशांतता पसरेल हा भिती घालणारा मुद्दाही न्यायालये नेहमी ग्राह्य धरत नाहीत, उलटपक्षी तुम्हाला परिस्थिती नियंत्रणात ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करावा लागेल अशी तंबी काही वेळेस न्यायालयांनी संबंधीत प्रशासनांना दिलेले आहेत. अर्थात सामाजिक अशांतता या विषयावर सरकारने विनंती करणे आणि न्यायालयांनी त्या विषयास तौलनीक प्राधान्याने वेळ देणे हे समजण्या सारखे आहे पण इथे मुलतः जबाबदारी लोकशाही सरकारांची, आणि आपले उत्पातमुल्य दाखवू इच्छित भारतातील सर्वच समाजगटातील विवीध बेजबाबदार समाज घटकांची आहे, न्यायालयांचा यात दोष नाही, सामाजिक दोषांकरता न्यायालयांच्या माथी खपार फोडणे योग्य नव्हे हे लक्षात घेतले पाहीजे.
सध्या अके-निग बदनामी खटल्याच्या एका प्रसंगी अके गटा कडून सरकार बदलल्याने निकाल असा आला अशा टिके बद्दल न्यायालयात न्यायालयीन अवमानाचे आक्षेप दाखल झाले आहेत आपण आपल्या धागा लेखात "(आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) हे वाक्य मोघम स्वरूपात लिहिल्याने कायदेशीर दृष्ट्या सुखरूप ठरण्याची शक्यता आहे हे कायद्याची बाजू लक्षात यावी म्हणून लक्षात घ्यावे. संतसूर्य तूकाराम केस मध्ये काही शतकांपुर्वीच्या पुर्वजाबद्दल बदनामीचा खटला दाखल होऊ शकतो तर आपण म्हणता त्या अनेक केसेस मध्ये बदनामीचे खटले दाखल करता येण्याची शक्यता असू शकते. अर्थात त्या केसेस दाखल करणे ज्याची बदनामी झाली त्याची स्वतःची जबाबदारी आहे.
चुकीची चिखलफेक आणि नकारात्मक मार्केटींग हे समोरची व्यक्ती उत्तरे देण्यात नेमकी असेल तर इफेक्टीव्ह असू शकत नाही उलट चिखलफेक आणि नकारात्मक मार्केटींग करणार्यांचेच नुकसान होते हे मोदींच्याच वि़जयाने सिद्ध झाले आहेच. इतर काही समाज घटक पुरोगामी नाहीत म्हणून पुरोगामी राहण्याची क्षमता असलेल्या घटकांनी स्वतःकरता पुरोगामी असू नये का हा जरा विषयांतराचा मुद्दा असल्याने नंतर कधी चर्चा करूयात. हे जरी खरे असले तरी शासनाचे निर्णय (अगदी कोणत्याही परिस्थितीत) उत्पात मुल्य वापरणार्या समाज घटकांना दबून होऊ नयेत याच्याशी मी सहमत आहे अर्थात हि जबाबदारी लोकशाही नेतृत्वांची आहे त्याचे खापर न्यायालयांवर फोडणे हे वड्याचे तेल वांग्यावर ठरते असे माझे व्यक्तीगत प्रांजळ मत आहे.
14 Jun 2014 - 12:42 am | प्रसाद गोडबोले
आपला प्रतिसाद ३ वेळा वाचल्यावर व्यवस्थित कळाला , बहुतांश पटलाही . वरील वाक्य अत्यंत आवडले . आजवर भारतसरकारचे धर्म समाज विषयक नियम कायदे हे काही विषिष्ठ समाजांच्या उत्पात मुल्याला घाबरुन केलेले नजरेस येतात (पक्षी : सॅटीनिक ...शाहबानो...इशानेतील काही राज्यांनी स्वतःला ख्रिश्चन राज्य घोषित करणे वगैरे वगैरे ), फक्त हिंदु तसे झुंडशाहीने आजवर हम करे सो कायदा करीत नव्हते , आता लोकांना हळु हळु कळायला लागले आहे की हे फक्त आपल्यालाच चेपत आहेत अन इतरांना ठील देत आहेत (ह्याचे क्लासिक उदाहरण म्हणजे जेव्हा एक विशिष्ठ समाज फाळणी व स्वतंत्र देशाची मागणी करतो तेव्हा ती कबुल करणे अन जेव्हा दुसरा समाज करतो तेव्हा त्यांना दहशतवादी ठरवुन त्यांच्या प्रार्थनागृहात घुसुन मारणे ! एका धर्मियांची प्रार्थना स्थळे ताब्यात घेणे अन दुसर्यांच्या बाबत चुकार शब्दही न काढणे , वगैरे वगैरे).
आपणजर आपले उत्पात मुल्य दाखवले नाही तर हे असेच चालु ठेवतील ,सो ..... तेव्हा सर्वच समाजामधे अस्मिता प्रखर झाल्याचे दिसुन येत आहे , उशीरा का होईना पण हिंदुंचीही अस्मिता जागी झाली आहे इतकाच माझा निषकर्ष आहे :)
13 Jun 2014 - 9:44 pm | म्हैस
एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद किवा चुकीचं काहीच नहिये. पण ते नसताना चुकीची विधानं करून त्या विषयाबद्दलची स्वतःची आणि इतरांचीही मतं कलुषित करण हे चुकीचं आहे . ज्ञान घ्यायला ज्ञानाचे दरवाजे सदैव उघडे आहेत . नसेल घ्यायचं तरी काही हरकत नाही . पण विनाकारण त्याबद्दल नकारात्मक विचार पसरवण्याच काहीच कारण नाही असं मला वाटतं