डॉक्टर सगळं ठिक आहे ना?

डॉ. भूषण काळुसकर's picture
डॉ. भूषण काळुसकर in जनातलं, मनातलं
9 May 2014 - 12:37 pm

काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात.
शारिरिक बिघाड किंवा आजार याची ऎकून,वाचून,अनुभवून एवढी सवय होते की त्यात काही वावगं/चूकीच अस वाटत नाही. जस आजूबजूच्या गोंगाटाची इतकी सवय होते की शांतता आपल्याला बेचैन करते. त्यामुळे प्रत्येकाने शांतपणे आपण खरच ’निरोगी’ आहोत का हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

डॉक्टर काका!! अहो फक्त सहा वर्षांची प्रॅक्टीस आहे हो त्यांची! अगदी कितीही गचके खाल्ले अस्तील तरी जास्तीत जास्त वय तीस्.....त्यांना काका म्हणावं!!!

हो कुन्फु काका ! कै प्रॉब्लेम ? :-/

डॉक्टर काका मग तुम्ही त्याला साबुदान्याच्या गोळ्या देऊन टाकायच्या ना!
काये कधी कधी पेशंटचं नुसती औषधं घेवुन पण समाधान होतं ..
कायतरी अवघड डिक्श्नरीत नसलेला शब्द बोलुन दाखवायचा पेशंटला ... तो पण खुश न....

ह्येलाच प्लाशिबो म्हन्त्यात काय?

डॉ. भूषण काळुसकर's picture

10 May 2014 - 1:04 pm | डॉ. भूषण काळुसकर

जर होमिओपॅथी हि प्लासिबो असती तर मग ही औषधं- तान्ही बाळं, प्राणी(कुत्री, मांजर इ.) इतकच काय तर झाडांच्या आजरांवर(अ‍ॅग्रो-होमिओपॅथी) कशी उपयोगी पडली असती? त्यांना कुठे असतो प्लासिबो इफेक्ट?

अहो डॉक्टर मी तेच तर म्हणतोय.

होमिओपथी ही प्लासिबो इफेक्ट तत्वावर चालते असा लोकांचा आक्षेप असतो. त्यावर तुम्ही सविस्तर लिहावं अशी अपेक्षा आहे.

तुम्ही इथली चर्चा वाचा. म्हणजे तुम्हाला या विषयाची नेमकी कल्पना येईल आणि तुम्हाला त्यावर भाष्य करता येईल.

प्रकाश घाटपांडे's picture

10 May 2014 - 3:48 pm | प्रकाश घाटपांडे

आमच म्हन्न काय समजा प्लासिबो आसनं न्हाईत नसन इफेक्ट हाय कि नाय? तेवढ बोला. आता लईच शंकेखोर मान्सांवर ते प्लासिबो काम करत नाय, मंग बसा बोंबलत.

इफेक्ट असणारच. त्याशिवाय का एव्हढे लोक "आम्हाला गुण आला" म्हणतात. :)

डॉ. भूषण काळुसकर's picture

10 May 2014 - 8:29 pm | डॉ. भूषण काळुसकर

अगदी साध्यातल आणि सोप उदाहरण(साध्यातल आणि सोप हे होमिओपॅथीच्या विविध आजार बर करण्याच्या व्यापक क्षमतेला अनुसरून म्हटले आहे) द्यायच झाल्यास- Thuja या होमिओपॅथीच्या औषधाबद्दल देता येइल. या औषधाच्या वापरामुळे जगभरात लाखो माणसांनी- चामखिळी, कुरुप, मसं, त्वचेवरील निरनिराळ्या गाठी इत्यादी आजारांपासून कायमस्वरुपी मुक्तता मिळवली आहे

अजया's picture

10 May 2014 - 9:15 am | अजया

स्वागत आहे डॉक्टर .
होमेपदीवाले डॉक नव्हते इथे, तुम्ही कसर भरुन काढली !!!

प्यारे१'s picture

10 May 2014 - 2:35 pm | प्यारे१

मिपावर स्वागत आहे डॉक्टर साहेब!

धन्याच्या तोंडी नाव ऐकलंय बहुधा. तेच का रे हे धन्या?

धन्या's picture

10 May 2014 - 2:44 pm | धन्या

होय. आपले शेजारी आहेत. :)

प्रचेतस's picture

10 May 2014 - 2:46 pm | प्रचेतस

आता मिपाकर झालेत तर घेऊन या त्यांना कट्ट्याला.

छान छान....

इथे आम्ही बाहेर, अन तुम्ही करा कट्टे....

(थांबा...आता इथे पण एक जोरदार कट्टा करतो.)

आमचे कट्टे अगदी दर आठवड्यालाच चालू असतात हो. पण जाहिरपणे ते समोर येत नाही इतकेच. *pardon*

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 May 2014 - 1:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अरे हा मुद्दा कळल्याची पोचपावती द्या रे कुणीतरी... मुवि, तुम्हीच द्या हो.

डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 10:51 am | डॉ. भूषण काळुसकर

कटट्यावर यायला नक्किच आवडेल

डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 10:54 am | डॉ. भूषण काळुसकर

कटट्यावर यायला नक्किच आवडेल

अहो तुमचे शेजारी म्हणजे? आमचे पण शेजारीच आहेत ते.. जाता जाता माझी आंब्याची झैरात करून जातो. काळुस्करांच्या शेजारीच आंबा विकतो आपण.

डॉ साहेब, होमिओपॅथीवर विश्वास आहेच, मी तर टायफॉइड/ मलेरियावर पण होमिओपॅथिक ट्रीट्मेंट घेतली आहे. पण होमिओपॅथी ला मोडर्न सायन्सच्या भाषेत सिद्ध करण्यसाठी काय प्रयत्न चालू आहेत (उदा. पिप वगैरे) ते समजून घ्यायला आवडेल.

पोटे's picture

10 May 2014 - 2:45 pm | पोटे

मी एम बी बी एस आहे.

पैसा's picture

10 May 2014 - 2:49 pm | पैसा

तुम्ही पण जमेल तेव्हा लिहीत चला!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 May 2014 - 1:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हे तुमचे आडनाव आहे की स्पेशलायझेशन ?? ;-)

साती's picture

11 May 2014 - 2:16 pm | साती

मस्तं प्रष्नं!
पण सत्य या विनोदापेक्षा मजेशीर असते.
माझ्या मुलांच्या पिडीअ‍ॅट्रीशीयनचे नांव डॉ बच्चा आहे.
आमच्या गावात एक नविन सर्जन आलेत. ते नविन असल्याने सध्या हर्निया हायड्रोसील अश्या छोट्या मोठ्या सर्जरीच जास्तं करतात.
त्यांच्या आडनावाचं स्पेलिंग बी यु एल एल ए आहे.(मी त्यांना नेहमी त्यांच्या नावाने हाक मारते , आडनाव उच्चारताच येत नाही)

प्रकाश घाटपांडे's picture

11 May 2014 - 2:19 pm | प्रकाश घाटपांडे

:)

प्यारे१'s picture

11 May 2014 - 2:56 pm | प्यारे१

ठ्ठो! =))

नवीन जातीव्यवस्था (नि त्यानुसार नावं किंवा उलट) म्हणावी की ही ;)

:))

मला गुंडा चित्रपटाची आठवण झाली.....

जेनी...'s picture

11 May 2014 - 4:41 pm | जेनी...

*biggrin*

बॅटमॅन's picture

12 May 2014 - 7:27 pm | बॅटमॅन

खुल्लम खुल्ला नाव घ्यायचीच चोरी की ओ =))

जेपी's picture

11 May 2014 - 5:09 pm | जेपी

शंभार
माझा पयला नंबर.

जेनी...'s picture

11 May 2014 - 5:19 pm | जेनी...

एकशे एक
माझा दुसरा नंबर ....
डॉक्टर काका ... तुम्ही लिहाना प्लासिबो बद्दल ... मला वाचायचयो :(

डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 11:06 am | डॉ. भूषण काळुसकर

लिहिणार आहे, त्या आधी थोडं होमिओपॅथी विषयी पण लिहायच आहे

आनन्दा's picture

12 May 2014 - 2:36 pm | आनन्दा

9_9_2_5_8_, गाळलेल्या जागी योग्य अंक भरल्यास एक फोन नंबर मिळेल , त्यावर फोन करण्याचा प्रयत्न करु नये !

बाकी सगळी दुनिया मुठीत आहे हो तुमच्या!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 5:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही मूलभूत (बेसिक) तत्वांबद्दल थोडे स्पष्टीकरणः

१. रुग्णाने सांगीतलेल्या रोगाच्या मूळ तक्रारी (सिंप्टम्स) (जसे, ताप, खोकला, पोटात दुखणे, छातीत दुखणे, इत्यादी) अनेक आजारांत सामायिकपणे असू शकतात. त्यामुळे केवळ सिंप्टम्स वरून मोठ्या रोगाचे निदान करणे शक्य नसते. त्यामुळे त्या रोगांचे निदान करण्यासाठी काही खास तपासण्या करणे आवश्यक असते.

अ‍ॅलोपॅथीमध्ये, पेशंटशी त्याच्या तक्रारींसंबद्धी चर्चा (हिस्टरी टेकिंग) आणि त्याची शारिरीक तपासणी (फिजिकल एक्झामिनेशन)केल्यावर बर्‍याचदा जर मोठा आजार असला तर साधारणपणे एकापेक्षा जास्त रोगांची शक्यता वाटू शकते. त्या सर्व शक्यतांच्या यादीला "डिफरेंशियल डायग्नोसिस" असे म्हणतात.

या यादीतल्या शक्यता रुग्णात आहेत की नाही हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या (रक्त-लघवी तपासणी, एक्स रे-सीटी-एम आर आय, ई सी जी, डॉप्लर, इ)केल्या जातात.

त्या तपासण्यांतल्या काही एखाद्या आजाराची पुष्टी देतात (पॉझिटिव्ह असतात) तर काहींचे निर्णय यादीतल्या इतर एखाद्या शक्यतेला खोडून काढतात (निगेटिव्ह असतात).

अश्या तर्‍हेने "डिफरेंशियल डायग्नोसिस" ची यादी लहान होत होत रोगाचे निदान पक्के होते.

याचा अर्थ असा की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असणार्‍या या सर्व निकालांच्या बळावरच मोठ्या आजाराचे पक्के निदान होऊ शकते... याचा अर्थ दोन्ही प्रकारच्या तपासण्यांचे महत्व तोलामोलाचेच असते.

त्यामुळे एखाद्या तपासणीत आजार सापडला नाही म्हणजे ती तपासणी फुकट गेली असे नाही. याला डायग्नोसिस बाय एक्स्क्लूजन असे म्हणतात आणि रोगनोदान करण्यात ती एक महत्वाची प्रक्रिया असते.

२. बर्‍याचदा फार धोकादायक रोगाचा छोटासा संशय आला तरिसुद्धा एखादी तपासणी करणे जरूरीचे समजले जाते. कारण तो रोग प्रथमावस्थेत असतानाच त्यावर प्रतिबंधक उपाय अथवा उपचार केले तर त्यापासून रुग्णाला होणारा धोका कमी होऊ शकतो. उदा. हृदयविकार, डोक्यातल्या रक्तवाहिन्यांचे विकार, मुत्रपिंडांचे आजार, कर्करोग, इ. अश्या तपासणीचा अहवाल (रिपोर्ट) जर पॉझिटिव्ह आला तर त्वरीत उपचार सुरू करणे शक्य होते; आणि जर निगेटिव्ह आला तर मोठ्या आजारासारखी लक्षणे होती पण मोठा आजार नाही हे समजून रुग्णाने खूष व्हायला पाहिजे.

वैद्यकीय व्यावसाईकाने जर हा सर्व उलगडा रुग्णाबरोबरच्या चर्चेत करून मग तपासण्या केल्या रुग्णाचा गोंधळ होवून व्यावसाईकांवरचे आरोप कमी होणे शक्य होईल.

३. माझ्या माहितीत असे रुग्ण आहेत की ज्यांना डॉक्टरने, "तुम्हाला जास्त औषधांची गरज नाही" असे सांगून कोणतीही तपासणि न करता केवळ गरज असलेली मोजकी एक ते तीन औषधे लिहून दिली आहेत. आणि त्या रुग्णांची प्रतिक्रिया अशी होती, "५०० रु फी घेतली (जी त्या कन्सल्टंट्सची पूर्वसूचीत तपासणी फी होती), एकपण तपासणी केली नाही आणि पण औषधे पण फक्त (एक-दोन-)तीनच लिहून दिली. फुकटचे ५०० रु खर्च झाले !"

यावरून प्रश्न असा आहे की, "डॉक्टरने रोग बरा करण्यासाठी योग्य तेवढीच औषधे लिहून द्यावी की पेशंटच्या मनाचे समाधान होण्याएवढी मोठी यादी द्यावी?" सुज्ञजनांना याचे उत्तर नक्की माहिती असते... पणे तेच सुज्ञ रुग्ण बनले की दर पन्नास रुपयामागे कमीतकमी एका औषधाची भर प्रिस्क्रिप्शनमध्ये पडावी असा विचार करून तसे न झाल्यास डॉक्टरला दुषणे देऊ लागतात.

अश्या परिस्थितीत काही डॉ़क्टर जर अनावश्यक (बहुदा व्हिटॅमिन्ससरख्या) औषधांची भर टाकून लांबलचक प्रिस्क्रिप्शन बनवू लागले तर त्यात डॉक्टरांच्या इतकाच रुग्णांचा दोष नाही का?

४. सर्वसाधारणपणे आपण घर बांधताना चांगला आर्किटेक्ट निवडतो, आयकराचे विवरण भरताना सी ए शोधतो, कोर्टात केस करताना योग्य वकील शोधतो... त्यातही साधारण पणे थोडक्यात ज्या विषयाचा सल्ला पाहिजे त्या विषयातील शिक्षण घेतलेला तज्ञ शोधतो. पण अ‍ॅलोपॅथिचे औषध इतर पॅथीची पदवी असलेल्या आणि अ‍ॅलोपॅथिची पदवी नसलेल्या डॉक्टरकडून घेताना बर्‍याच रुग्णाना काही गैर करतो आहे असे वाटत नाही... आणि जनतेला चालते म्हणून सरकारही (हे जनतेनेच निवडलेले प्रतिनिधी असतात) त्यांना न शिकलेल्या विषयांचा व्यवसाय करू देते. याला काय म्हणणार?

जे शहाणपण आपण आपल्या घराच्या बांधणीच्या वेळेस, आयकराचे विवरण भरताना किंवा वकिली सल्ला घेताना दाखवतो ते आपल्या स्वास्थ्याचा विचार करताना केव्हा दाखवणार ?

साती's picture

11 May 2014 - 7:06 pm | साती

उत्तम प्रतिसाद!

पैसा's picture

11 May 2014 - 9:48 pm | पैसा

उत्तम आणि संतुलित प्रतिसाद.

डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 12:51 pm | डॉ. भूषण काळुसकर

आपले पहिले २ मुद्दे अगदी योग्य आहेत, पण या बाबतीत डॉक्टर- पेशंट संवाद अपूर्ण अथवा पारदर्शक नसेल तर नंतर गैरसमज वाढत जातात. मी बर्‍याचदा असं ऎकल किंवा पाहीलं आहे की बरेचदा अनेक डॉक्टर, पेशंटशी अतिशय संतापून वागतात किंवा खूपच कमी बोलतात. त्यामुळे पेशंट विनाकारण दुखावला जातो. याऊलट डॉक्टर- पेशंट सुसंवाद असेल तर त्याचे परिणामही(outcome) चांगले होतात.
तिसर्‍या मुद्दाबद्दल- भरपूर औषधे घेतली, इंजेक्सन घेतल, सलाईन लावल की आपण लवकर बरे होतो अशी पेशंटची मानसिकता का होते याचा शोध घेणे गरजेचे आहे. पेशंट मागतात म्हणून इंजेक्शन मधुन फ़क्त स्टराईल वॉटर देणारे काही डॉक्टर मी ऎकलेले आहेत. काही डॉक्टर तर पेशंटने फार किरकिर केली, तर त्याला विश्वासात न घेता परस्पर झोपेच्या गोळ्या लिहून देतात. त्यामुळे हा दोष दोघांचा आहे आणि असं होऊ नये याची जबाबदारी पण दोघांवरही आहे.(एका हाताने कधीही टाळी वाजत नाही).
४ था मुद्दा- माझेही हेच मत आहे की प्रत्येकाने ज्या शास्त्रात पदवी घेतली आहे, त्याचीच प्रॅक्टीस करावी. तसेच आपल्याकडे स्वास्थ्याच्या बाबत फारच उदासीनता आहे, अगदी डॉक्टरांमधे सुद्धा.

अतिशय आवडला प्रतिसाद. माझ्या बघण्यात तर( गेली पंधरा वर्ष )बरेचसे इतर पॅथीचे डॉक्टर्स अ‍ॅलोपथी ची प्रॅक्टीस त्यांच्याकडे येणार्‍या एम.आर.च्या ऑफर्स आणि त्यांनी सांगितलेल्या त्या त्या आजाराची औषधं वापरुन करतात ;) ( याच्च क्रमाने वाचावे).

एक 'डॉक्टर' म्हणून साजेसा आणि संतुलित प्रतिसाद!! *i-m_so_happy*

कानडाऊ योगेशु's picture

11 May 2014 - 11:28 pm | कानडाऊ योगेशु

पदापर्णातच डॉक्टरांनी शतकी मजल मारली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पदार्पणातच द्विशतकासाठीही शुभेच्छा!

डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 11:08 am | डॉ. भूषण काळुसकर

धन्यावाद!!! मेडन सेंचुरी-

म्हशीस चालते का हो तुमची होमिओपदी?

यावर तुम्ही म्हटलंय

निश्चितच चालेल कारण माझ्या कडे काही श्वान येतात- पेशंट म्हणून, म्हणजे त्यांचे मालक आणतात त्यांना. त्यांचे आजार होमिओपॅथीने बरे झाले.

या फुलटॉसवर अजून बॅटींग झालेली नाही. आणि

उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे.
ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?

हा मूळ धाग्यालाच धोबीपछाड मारणरा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.

उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे.
ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?

हा मूळ धाग्यालाच धोबीपछाड मारणरा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.

माझ्या अल्पमतीप्रमाणे अ‍ॅनोटोमी, फिझिओलोजी, मोडर्न मेडिसीन वगैरे अत्यावश्यक घटक सर्व पॅथींच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात.
असो, माझी अल्पमती पुरे, आपण सूज्ञ आहातच.

आणि अजून एक, कालेजात शिकवले नाही म्हणजे इतरांना एम आर आय वाचताच येत नसेल का हो? तसे असेल तर मग सर्व धाग्यांवर आपला जो संचार चालू असतो त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे.

साती's picture

12 May 2014 - 3:21 pm | साती

अल्पमती हे स्वतःच कबूल केल्याने पुढिल प्रतिसाद देण्याचा त्रास वाचला.

धन्यवाद (तो प्रतिसाद तुम्हाला नव्हताच.), तसेही माझा वाद होमिओपॅथिक डॉ. ना अ‍ॅलोपॅथिक औषधे देण्याचा अधिकारच नाही असे म्हणणार्‍यांबरोबर आहे. व्यक्तिशः मी देखील होमिओपॅथिक डॉ.नी अ‍ॅलोपॅथिक प्रॅच्तिस करू नये याह मताचा आहे, कारण त्यांना त्यातले सखोल ज्ञान नाही. पण बेसिक मेडिसिन/ मोडेर्न मेडिकल सायन्स त्यांना शिकवलेच जात नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आणि कोणत्याही विषयातले ज्ञान हा व्यासंगाचा भाग आहे, संक्षींनीच खाली म्हणल्याप्रमाणे. तेव्हा इत्यलम|

संजय क्षीरसागर's picture

12 May 2014 - 3:28 pm | संजय क्षीरसागर

दादा, प्रश्न काळुसकरांनी MIR का करायला सांगितला आणि त्यांना (रिपोर्ट न पाहाता) तो वाचता येतो का (अभ्यासक्रमात नसल्यानं) असा आहे. उत्तर त्यांनी द्यावं अशी अपेक्षा आहे.

मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा सखोल अभ्यास आहे. अनेक ठिकाणी प्रतिसाद असणं हा व्यासंगाचा भाग आहे. आपण माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल.

संजय क्षीरसागर's picture

12 May 2014 - 3:30 pm | संजय क्षीरसागर

म्हणायचंय.

प्यारे१'s picture

12 May 2014 - 3:31 pm | प्यारे१

*fool* *fool* *fool*

पण सवयीला इलाज नाही!

प्यारे१'s picture

12 May 2014 - 4:15 pm | प्यारे१

असो.
माननीय सखाराम गटणे आठवले होते. ;)

अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे हो पण सामान्यज्ञान कुठं आहे?

अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे हो पण सामान्यज्ञान कुठं आहे?

तुम्ही दैनंदिन भाषेत इंटेलिजन्स कोशंट आणि ईमोशनल इंटेलिजन्स बद्दल तर बोलत नाही ना?

तळटीपः माझ्या प्रतिसादाचा रोख कुणा व्यक्तीकडे नसून प्रशांत यांच्या प्रतिसादातील अभ्यास, व्यासंग आणि सामान्यज्ञान या शब्दांच्या अर्थाकडे आहे.

संजय क्षीरसागर's picture

13 May 2014 - 10:29 am | संजय क्षीरसागर

आरत्या बंद पडल्यामुळे `अशांत कावले' आहेत. माझा प्रतिसाद दिसला की काही तरी पिंक टाकायची इतकंच.

प्यारे१'s picture

13 May 2014 - 2:03 pm | प्यारे१

:)
चला हेतू सफल झाला! ;)

मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा सखोल अभ्यास आहे. अनेक ठिकाणी प्रतिसाद असणं हा व्यासंगाचा भाग आहे.

त्यातल्या किती गोष्टी तुम्ही अभ्यासक्रमात शिकला आहात?

घंटाचंदांचं मी एकवेळ समजू शकतो, त्यांना कुठेही पिंका टाकायची सवय आहे. तुमच्या बाबतीत तर मला काहीही माहिती नाही. प्रतिसादाच्या निमित्तानं प्रोफाईल आणि लेखनकारकिर्द पाहिली असता विषेशज्ञान कसलं असावं याचीही कल्पना येत नाही. पण विषेशज्ञान आणि व्यासंग यातला फरक कळत असावा अशी अपेक्षा आहे.

आनन्दा's picture

13 May 2014 - 11:21 am | आनन्दा

हे घ्या - विशेषज्ञान
काळुस्करसाहेब, काही चुकले असेल तर सुधारा.

डॉ. भूषण काळुसकर's picture

13 May 2014 - 11:33 am | डॉ. भूषण काळुसकर

आनन्दा- त्या साईट वरती बरच काही आहे, काही केसेसही आहेत, तुला नक्की काय सांगायच आहे ते कळलं नाही

संजय क्षीरसागर's picture

13 May 2014 - 1:02 pm | संजय क्षीरसागर

माझ्या प्रतिसादावर त्यांनी ही पिंक टाकली होती

तसे असेल तर मग सर्व धाग्यांवर आपला जो संचार चालू असतो त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे.

पण विषेशज्ञान (या चर्चेच्या संबधात, Professional Qualification) आणि व्यासंग (Exploration) यात फरक आहे ही स्वतःची चूक लक्षात आल्यावर, त्यांनी अशी मखलाशी (ती सुद्धा चुकीची) करुन :

कोणत्याही विषयातले ज्ञान हा व्यासंगाचा भाग आहे, संक्षींनीच खाली म्हणल्याप्रमाणे.

इत्यलम, .... म्हणजे काढता पाय घेतला आहे.

आनन्दा's picture

13 May 2014 - 4:09 pm | आनन्दा

माझ्या अल्पमतीप्रमाणे अ‍ॅनोटोमी, फिझिओलोजी, मोडर्न मेडिसीन वगैरे अत्यावश्यक घटक सर्व पॅथींच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात.

या वाक्याच्या पुराव्यासाठी दिलेली लिंक आहे ती. बी. एच एम एस चा अभ्यासक्रम. आहो संक्षी, बेसिक मेडिसिन, शरीरशास्त्र वगैरे सर्वांनाच शिकवले जाते. अगदी पॅथोलोजी पण. म्हणजेच त्यांना बेसिक मेडिसिनचे प्रोफेशनल क्वलिफिकेशन नाही हा मुद्द संपला. त्याच्या आधारावर जनरल प्रॅक्टिस ते नक्कीच करू शकतात. आणि त्याच आधारावर सध्या त्यांना ती परवानगी आहे.

सध्या ज्या प्रश्नावर वाद सुरू आहे त्याची बहुधा तुम्हाला माहिती नसावी. ती पूर्ण टाकण्याईतके त्या विषयाचे ज्ञान मला नाही, कारण मी त्या क्षेत्रात काम करत नाही. पण एव्हढे नक्की सांगू शकतो, की होमिओपॅथिक डॉ. ला एम आर आय प्रिस्क्राइब करण्याचा अधिकारच नाही हे विधान नक्कीच पूर्वग्रहदूषित आहे.

सातीतैंचा प्रश्न पूर्ण वेगळा आहे, की ते लोक होमिओपॅथी शिकून अशी प्रॅक्टिस का करतात. तो पूर्णपणे वेगळा विषय आहे, त्याला वर उल्लेखलेल्या वादाचा संदर्भ आहे, म्हणून मी त्यांना तिथे इत्यलम म्हटले, त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. तुमच्या वाक्याचा फक्त संदर्भ घेतला आहे. तुमचा माझा संवाद यापुढेही चालू राहील. सध्या आंब्यामुळे मला फारसा वेळ नाही, तरी पण वेळ मिळताच तुम्हाला उत्तर दिले जाईल.

व्य. नि. तून झालेला आहे, तो मी इथे देऊ शकत नाही. तस्मात होमिओपाथनं MRI करायला सागांवा का ? हा (त्यांचा) मुद्दा बाजूला ठेवू. आपला `सं'वाद (माझ्या) व्यासंगाविषयी होता. व्यासंगासाठी विषय अभ्यासक्रमात असण्याची गरज नाही हा खुलासा मी पूर्वीच केला आहे. तस्मात संवाद पूर्ण झालेला आहे.

डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 8:48 pm | डॉ. भूषण काळुसकर

प्राण्यांवर होमिओपॅथीची औषध काय काय परिणाम करु शकतात हे पहायचं असेल तर एकदा माझ्या दवाखान्याला भेट द्यायला यावे. प्राण्यांचे मालकच तुम्हाला सविस्तर सांगतील.
खाली २ वेबसाईट्स देत आहे, व्हेटरनरी असोसिएशन च्या आहेत- त्याही वाचा. एक कॅनडातील आणि एक साहेबाच्या देशातील आहे.
-http://theavh.org/
http://www.bahvs.com/

नक्की काय उपयोग झाला याविषयीचा तुमचा अनुभव विषद केलात तर बरं होईल.

डॉ. भूषण काळुसकर's picture

12 May 2014 - 9:37 pm | डॉ. भूषण काळुसकर

एकंदरीत आपणांस होमिओपॅथी विषयी चर्चा करण्यात असलेला उत्साह हा वरवरचा वाटतो.

संपूर्ण सहमती दर्शवतो. पेशंट औषध न घेता बरा झाला तर सर्वोत्तम. त्यामुळे पॅथी हा विकल्प आहे, वाद नाही.

कमीतकमी उपायानं इप्सित परिणाम साधायचा असेल तर होमिओपॅथी हा पहिला पर्याय आहे. त्यामुळे होमिओपॅथीत माझा इंटरेस्ट वरवरचा नाही. तुम्ही जर गुणकारकता पटवून देऊ शकलात तर होमिओपॅथी हा कुणाही ओपन माइंडेड व्यक्तीचा पहिला विकल्प राहील.

आता या समवैचारिकतेतून पाहता : माझ्या मते, होमिओपॅथी रामनामासारखी आहे. औषध घेऊन स्वतःच स्वतःला बजावत राहायचं `मी बरा होतोयं'. जसा रामनामवाल्यांना रामाचा दिलासा असतो आणि एखादे वेळी काम होऊन जातं तसा होमिओपॅथीचा (एखादे वेळी) गुण येऊ शकतो. थोडक्यात, पेशंटची श्रद्धा महत्त्वाची.

अ‍ॅलोपथी निर्वैयक्तिक विज्ञान आहे, पेशंटच्या श्रद्धेचा औषधाच्या परिणामाशी संबंध नाही.

अर्थात, तुम्ही कुत्री, झाडं, तान्ही मुलं यांची उदाहरणं देतायं म्हणून कुतूहल आहे.

खरं तर जे औषध एकावर परिणाम करतं (तान्ह्या मुलांच्या बाबतीत) त्याचा निर्विवाद परिणाम बहुतेकांवर व्ह्यायला हवा, कारण मानवी शरीराच्या प्रक्रिया एकसारख्या आहेत. औषधाची मात्रा किंवा परिणामकारकता वाढवावी लागेल इतकंच. तुम्ही केवळ Thuja या एकमेव औषधाचं उदाहरण देतायं आणि त्याचा मला तरी अनुभव नाही (म्हणजे तशा प्रकारची व्याधी नसल्यानं ते घेण्याची शक्यता नाही).

नाऊ कमिंग टू द पॉइंट :

गवि लिखित साखरगोळ्या...या विचारप्रवर्तक लेखात मूळ मुद्दा असा आहे :

होमिओपथी "Laws of similars" वर बनवलेली आहे...रोगाची लक्षणं नीट पहायची आणि तीच लक्षणं शरीरात निर्माण करणारा पदार्थ अत्यंत डायल्य़ूट करून औषध म्हणून द्यायचा. त्या पदार्थामुळं मूळ रोगासारखीच लक्षणं शरीरात तयार होऊ पाहतील आणि मूळ रोग (लक्षणांचं कारण) शरीरातून बाहेर पडेल.

होमिओपथीत असं मानलं जातं की जितके जास्त C, म्हणजे जितकी जास्त विरळता तितकी जास्त पोटेन्सी (प्रभावीपणा). हे तत्व आपल्याला माहीत असलेल्या "जास्त डोस-जास्त परिणाम" या तत्वाच्या विरोधात अहे.

मुळात १२C च्या डायल्यूशनपेक्षा जास्त डायल्यूशन केलं तर मूळ पदार्थ त्यात शिल्लक राहूच शकत नाही (एक रेणू देखील). कारण Avogadro's number ची लिमिट ओलांडली तर मूळ पदार्थ आपल्या गुणधर्मांसहित त्याहून अधिक डायल्यूट करताच येत नाही.

होमिओपथीवाल्यांचं म्हणणं असं की तो पदार्थ जरी शिल्लक राहिला नाही तरी त्याचा स्पिरिच्युअल इफेक्ट पाण्यात उतरतो. हे निदान फिजिक्सच्या कसोटीवर अगदी निराधार आहे.

आणि सरते शेवटी, गविशी संपूर्ण सहमत होत, त्याचाच प्रश्न विचारतो:

इतपत शंका येण्यासाठी होमिओपथीचा Doctor असण्याची गरज नाही. त्या शंका दूर करणं मात्र होमिओपथी एक्स्पर्टसच्या हातात आहे.

एकूण काय तर ही औषधं श्रद्धेमुळे रोग्याला बरं करतात. अदरवाईज त्या खरंच साखरेच्या गोळ्या आहेत. त्यात मूळ पदार्थ नसतोच. भले मूळ तत्व आपल्याला मान्य का असेना.

ते सेकंड लास्ट परिच्छेद म्हणून वाचावं.

संजय क्षीरसागर's picture

14 May 2014 - 1:09 pm | संजय क्षीरसागर

*scratch_one-s_head*

प्रकाश घाटपांडे's picture

12 May 2014 - 12:05 pm | प्रकाश घाटपांडे

दाकतरसाहेब समद्यांना पुरुन उरनार हैत!

धन्या's picture

13 May 2014 - 8:58 am | धन्या

असं दिसतंय खरं. ;)

आनन्दा's picture

12 May 2014 - 3:04 pm | आनन्दा

डॉ. साहेब, अभिनंदन.. अशीच वाटचाल चालू राहिली तर या यादीत आपण लवकरच स्थान मिळवाल

मार्मिक गोडसे's picture

13 May 2014 - 9:36 am | मार्मिक गोडसे

@ डॉ.भूषण काळुसकर- पेशंट मागतात म्हणून इंजेक्शन मधुन फक्त स्टराईल वॉटर देणारे काही डॉक्टर मी ऐकलेले आहेत.

हे 'स्ट.वॉटर'चे इंजेक्शन शिरेत की स्नायूत देतात ? शिरेत दिल्यास रक्तपेशी नष्ट होत नाही का ? कारण रक्ताची क्षारता स्ट.वॉटरपेक्षा अधिक असते.

तुम्हाला हे त्या डॉक्टरनी सांगितले की पेशंटने ?

तुम्हाला स्ट. सलाईन असे म्हणायचे होते का?

नक्की काय?

मार्मिक गोडसे's picture

13 May 2014 - 9:39 am | मार्मिक गोडसे

स्नायूत

साती's picture

13 May 2014 - 11:51 am | साती

वॉटर देतात दोन एम एल.
इंजेक्शन डिसॉल्व करायला मिळते ना ते.
दोन तीन सी सी ने काही फरक पडत नाही.