या आधी : भ्रमणगाथा -३
ब्रुसेल्सच्या सहलीतच परतीच्या वाटेवर पुढच्या सहलीचे सुतोवाच करून झाले. झेक रिपब्लिक आता युरोपिय युनियनमध्ये आल्यामुळे तिथे शेंगन व्हिसा चालतो.. जायचं का प्रागला? सगळ्यांनी मिळून जर ह्या प्राचीन,सुंदर सुवर्णनगरीला भेट द्यायची असेल तर सोन्याला सुगंधच की.. मग त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. इंडियन ट्रॅवल कॉर्नरच्या रवि देशपांडेंबरोबर आम्ही ट्यूलिप्सच्या गावाला गेलो होतो , त्यांना गाठले. प्रागबरोबरच थोडे दक्षिणेला ऑस्ट्रीयात येऊन साल्झबुर्गही करायला त्यांनी सुचवले. परत फोनाफोनी ,खरडाखरडी , विरोपाविरोपी सुरू झाली. केसु आणि आम्ही दोघं जरी अगदी जवळच्या गावात राहत असलो तरी नेमके केसु दौर्यावर! दोन दिवस माद्रिद तर दोन दिवस लंडन,मध्येच स्टॉकहोम तर डार्मस्टाटला एखाद दिवस येऊन एकदम इटालीला प्रयाण असे त्यांचे जवळजवळ महिनाभर चालू होते आणि दिनेशच्या पॅरिस आणि आयबेरियात चकरा चालू होत्या. विपिन फ्लोरेन्समध्ये अडकलेले तर इरफान आणि लिखाळद्वय फ्राफुहुन बरेच लांब अंतरावर असल्याने सहलीची तारीख ठरली की आधी फ्राफुला येण्याची बुकिंग करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यात व्यग्र, तर डॉन अजून भारतातच होता. त्याचे जर्मनीचे तिकिट पक्के झाल्यावर तोही फ्राफुमध्येच राहणार असल्याने भ्रमणमंडळ कुठे, कधी सहलीला जाणार आहे याची चौकशी सुध्दा न करता त्याने सहलीत आपली जागा पक्की करून टाकली होती.
आता आम्हीही चार्ज्डअप झालो.देशपांडेंनी साल्झबुर्गला फेरियनवोहनुंग म्हणजे हॉलिडेहोममध्ये रहायचे असल्याने तिथे स्वयंपाकाची सोय आहे असे सांगितले होते. मग काय जवळ जवळ रोजच मी आणि शाल्मली जेवणाचे बेत ठरवत होतो आणि शक्यता लक्षात घेऊन बाद करत होतो.डॉन्याला भेळीसाठी चुरमुरे आणायला सांगितले होतेच त्यामुळे तो एक पदार्थ मात्र नक्की होता.
३ ऑक्टोबर हा पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या पुन:एकत्रीकरणाचा ऐतिहासिक दिवस असल्याने सुटी असते. ह्यावर्षी तो शुक्रवारी असल्याने मोठा विकांत मिळाला होता. तेव्हा गुरुवारीच दुपारी पाचच्या सुमाराला प्रागकडे कूच करायचे ठरले. लिखाळ आणि शाल्मली १/१०ला रात्रीच फ्राफुत दाखल झाले. महिन्यादोनमहिन्यांनी प्रत्यक्ष भेटत होतो आणि प्रागच्या सहलीची नशा होती त्यामुळे वाईनच्या साक्षीने रात्री गप्पा रंगल्या. जेवायला चिनी पध्दतीचा भात,सूप,चिनी बटाटे आणि डेझर्ट म्हणून वाईनक्रिम!
आमच्या जर्मन आजीआजोबांना भेटायची त्या दोघांना खूप उत्सुकता होती त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी ११च्या सुमाराला त्यांच्याकडे गेलो. तिथेही इतक्या गप्पा रंगल्या की शेवटी दिनेशला आम्हाला आठवण करुन द्यावी लागली प्रागला आजच जायचे आहे.
इरफान गेल्सनकिर्शहून ४च्या सुमाराला फ्राफुत पोहोचणार होता तर विपिनचे विमान फ्लोरेन्सहुन ४.१०ला येणार होते. केसु आणि डॉन्याही ४ च्या सुमाराला मुख्य स्टेशनातच भेटणार होते. तिथे असलेल्या 'मदन कॅश अँड करी' वाल्याला रात्रीचे जेवण आणि सामोशांची आर्डर दिली होती. ते बांधून घेऊन 'गणपतीबाप्पा मोरया'च्या गजरात गाडी विमानतळाकडे वळवली. ठरल्याप्रमाणे ८ नं च्या फाटकापाशी विपिन सज्जच होता. आता गणसंख्या पूर्ण झाली आणि सीमोल्लंघनासाठी प्रागच्या दिशेने काकांनी गाडी हाकायला सुरुवात केली. इकडे आमची तोंडे खाणे आणि बोलणे यासाठी अव्याहत चालू होती. सामोशांचा फन्ना केव्हाच उडला. गप्पा आणि हसण्याला तर उत आला होता. सहा महिन्यांपूर्वी आम्ही सारे एकमेकांना प्रत्यक्ष भेटलोही नव्हतो यावर देशपांडेकाका तर सोडाच पण आमचाच आमच्यावर विश्वास बसत नव्हता. शाळाकॉलेजच्या सहलीत जसा दंगा चालतो ना तस्सा दंगा करत आम्ही प्रागकडे चाललो होतो.
जर्मनीच्या ऑटोबानवर ( फ्रीवे)स्पीडलिमिट नाही. त्यामुळे जरी मोठा विकांत असला तरी जास्त रहदारी गृहित धरूनही १०च्या सुमाराला प्रागला पोहोचू असा अंदाज अनेकवेळा फ्राफु ते प्राग अंतर पार केलेल्या देशपांडेकाकांचा होता. पण वाटेतल्या अपघातामुळे सगळी गणितं चुकली. एरवी इथे ट्राफिकजॅम होतो म्हणजे गाड्या ४० ते ६०किमी /तास च्या वेगाने चालत असतात. पण आज मात्र वाहतुकीची कोंडी इतकी झाली होती की साकीनाक्याच्या ट्राफिकमध्ये अडकलोत असे वाटावे. ३७ वर्षात ही अशी स्टँडस्टिल राहण्याची दुसरी वेळ ! अशी माहिती काकांनी पुरवली. अशीच स्थिती पुढेही दोनतीनदा आली. सारेच कंटाळले होते.
अशातच केसुंचे पित्त खवळले होते. ते अनिश्चित रुटिन आणि फिरतीमुळे नसून काल रात्रीच्या हुकलेल्या चिनी जेवणामुळे असल्याचा निष्कर्ष म्युनस्टरवाल्यांनी काढला. आता एक छोटा कॉफी ब्रेक घेतला. त्यानंतर केसुंनी दादाकोंडकेची गाणी आयपॉडवर ऐकत आणि ज्ञानेश्वरांच्या(?) रेड्याच्या सुरात सर्वांना ती ऐकवत प्रवासात जान आणली त्यामुळे थोडा वेळ जरा बरा गेला. १० च्या सुमाराला जेवणासाठी एकेठिकाणी थांबलो आणि मदनच्या जेवणाला न्याय दिला. असं करता करता जेव्हा एकदाचे प्रागला पोहोचलो तेव्हा रात्रीचा १.३० वाजून गेला होता.
प्रतिक्रिया
8 Oct 2008 - 1:58 am | लिखाळ
अशातच केसुंचे पित्त खवळले होते. ते अनिश्चित रुटिन आणि फिरतीमुळे नसून काल रात्रीच्या हुकलेल्या चिनी जेवणामुळे असल्याचा निष्कर्ष म्युनस्टरवाल्यांनी काढला.
अशातच त्यांना आम्ही काँबिनात्सिऑन या स्वातीताईने बनवलेल्या खास पदार्थाचा फोटो आणि खाताना किती मजा आली ते सांगीतले..
प्रागला निघायच्या दिवशी सकाळचा हा बेत होता :)
--लिखाळ.
8 Oct 2008 - 2:04 am | भाग्यश्री
वा.. काय मस्त खादाडी आणि धमाल चालूय तुमची!! पुण्या-मुंबईतल्या मिपाकरांपेक्षा तुम्ही जास्त भेटता..!
सहीच! पुढची भ्रमणगाथा येऊदे लवकर..!!
8 Oct 2008 - 3:11 am | चित्रा
सुरूवात तर रंगतदार (आणि चटकदार) झालेली दिसते आहे.
प्रागचे फोटो पहाण्यास उत्सुक.
8 Oct 2008 - 4:39 am | रेवती
हेवा वाटतोय सगळ्यांचा. काँबिनात्सिऑन बघून (आम्हाला न मिळाल्यामुळे) वाईट वाटतयं
थांबा गड्यांनो, मी, प्राजु, शितल, चतुरंग सहपरिवार भेटतोय येत्या १८ तारखेला. रिपोर्टची ग्यारेंटी नाही.
रेवती
8 Oct 2008 - 6:48 am | विसोबा खेचर
वा! स्वाती,
सचित्र भ्रमणगाथा नेहमीप्रमाणेच सुंदर....
लैच धमाल चाल्ली आहे बॉ तुम्हा सगळ्यांची..! :)
तात्या.
8 Oct 2008 - 9:58 am | आनंदयात्री
भारी फिरताय बॉ तुम्ही लोक !! मस्त :)
आमच्या अडाणी गाववाल्या कार्ट्याला फिरवुन आणले, गंमत जंमत दाखवली त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत .. पण थोडं लक्ष ठेवा हं .. कुठे चुकला बिकल म्हणजे पंचाईत व्हायची !!
बाकी डोक्यावर काळा ससा ठेवल्याएवढे केस वाढलेत ढान्या .. काप की मेल्या !!
9 Oct 2008 - 9:06 pm | प्राजु
आमच्या अडाणी गाववाल्या कार्ट्याला फिरवुन आणले, गंमत जंमत दाखवली त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत .. पण थोडं लक्ष ठेवा हं .. कुठे चुकला बिकल म्हणजे पंचाईत व्हायची !!
आंदू शेठ... हे एकदम आवडलं. :)
स्वातीताई.. जबरा वृत्तांत. एकदम आवडलं वर्णन.
फोटो सह्हीच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Oct 2008 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त वृत्तांत! मस्त मजा करा तिकडेही आणि आम्हाला अशीच सचित्र वर्णनं पाठवा.
आणि डान्या, आंद्याकडे लक्ष देऊ नकोस फार, तुला पोनीटेल बांधायची असेल किंवा म.गांधी कट जरी करायचा असेल तर गो अहेड! तिकडे कोणीही तुला छळणार नाही असं का म्हणून!
8 Oct 2008 - 10:08 am | ऋषिकेश
जळवा जळवा लेको ;)
लई धम्म्माल करताय चमचमीत वर्णन आवडले.. युरोपियन ट्रॉपिक असते हे ही कळले..
येऊ द्या पुढचा भाग! मस्त चालु आहे
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
8 Oct 2008 - 10:17 am | यशोधरा
स्वातीताई, तू आता एक प्रवासवर्णनाचे पुस्तकच लिही!! मस्तच लिहितेस! आणि ही सगळे खादाडीचे फोटूपण टाक त्यात! :)
ए डान्या, उठ की आळश्या!!
8 Oct 2008 - 10:28 am | मनस्वी
स्वातीताई.. नेहेमीप्रमाणेच छान वर्णन..
जर्मन आजीआजोबा गोड आहेत.
प्रागचा वृत्तांत लवकर टाक.
डान्या - सांगितलेल्या सगळ्या सूचना लक्षात आहेत ना? नाव, पत्ता लिहिलेला कागद शर्टच्या खिशाला सेफ्टीपिनने लावायला विसरु नकोस.
मनस्वी
8 Oct 2008 - 12:49 pm | विजुभाऊ
डान्या - सांगितलेल्या सगळ्या सूचना लक्षात आहेत ना? नाव, पत्ता लिहिलेला कागद शर्टच्या खिशाला सेफ्टीपिनने लावायला विसरु नकोस.
तो तिकडे गेल्यापासुन खिशाला रुमालाची त्रिकोणी घडी सुद्धा लावतो सेफ्टीपीन ने
8 Oct 2008 - 10:29 am | मिंटी
स्वातीताई, तू आता एक प्रवासवर्णनाचे पुस्तकच लिही!! मस्तच लिहितेस! आणि ही सगळे खादाडीचे फोटूपण टाक त्यात!
एकदम सहमत....
खुप सुंदर लिहीतेस तु स्वाती ताई...
आता प्रागचे वर्णन आणि फोटो बघायला मी फार उत्सुक आहे ..
पुढचा भाग लौकर येऊ देत...
भरपुर मज्जा केलेली दिसतीए सगळ्यांनी....
8 Oct 2008 - 11:03 am | सहज
स्वातीताई, प्राग सहलीचा पहिला भाग जबरीच जमला आहे.
इतके बिझी शेड्युल असतानाही मिळेत तो वेळ साधुन सगळेजण एकत्र येत आहेत यात सुत्रधाराचे जबरदस्त यश आहे. हॅट्स ऑफ मॅडम!!
प्रसंग व पदार्थ वर्णन ऐकुन सगळ्यांना आपली बदली लवकरात लवकर जर्मनीत व्हावी असे वाटल्यास नवल नाही.
8 Oct 2008 - 11:21 am | नंदन
सहजरावांशी सहमत आहे. मस्त जमलाय पहिला भाग. आता प्रागचे आणि साऊंड ऑफ म्युझिक वाल्या साल्झबुर्गचे फोटोज पहायला उत्सुक आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 Oct 2008 - 11:57 am | ऋषिकेश
अरे हो की! स्वातीताईने ठिकाणांची नावे सांगितल्यावर तेच आठवत होतो साल्झबर्गबद्दल कुठे पाहिल/वाचलं आहे.. आता आठवलं.. धन्यु नंदन!
अवांतरः साऊंड ऑफ म्युझिक मधे शेवटचा शो दाखवला आहे ते सभागृहही साल्झबर्गमधेच आहे का?
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
8 Oct 2008 - 11:12 am | मदनबाण
मस्त वर्णन..ताई जोरदार भटकंती चालु आहे तर..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
8 Oct 2008 - 1:03 pm | छोटा डॉन
=)) =)) =))
भारीच. माझी "अनावर झोप" त्यामुळेच उडाली असा आरोप मी करत नाही ...
पण केसुंनी एकदम रापचीक मज्जा आणली, पहिल्या ५ मिनीटातच फॉर्मॅलिटी संपली ...
माझा तो "झोपाळु फोटो" कोणी, कधी, केव्हा आणि महत्वाचे म्हणजे " का" काढला ???
अरे जरा सांगुन तरी काढायचात ना, थोडे केस वगैरे सावरुन बसलो असतो ...
आता चांगलाच "कात्रजचा घाट" झाला माझा ....
स्वगत : आपल्या केसांवर जळणार्यांची संख्या कमी नाय भौ, जरा सावधान ...
बाकी ट्रीप मध्ये शॉल्लेट्ट SSSSSSSSSS मजा आली, स्वातीताई लिहीलच पुढे, आम्हीही जमेल तशी त्यात भर टाकु ...
अवांतर : मी नेहमी बाहेर पडताना ( मग ते इंड्या असो की जर्मणी ) माझा नाव, पत्ता, फोन नं, झालच तर पासपोर्ट डिटेल्स असे लिहलेला कागद नेहमी जवळ बाळगतो आणि तो सेफ्टीपीन ने खिश्याला बांधतो. झाले का समाधान ?
आमच्या हितचिंतकांना काळजी बद्दल धन्यवाद ....
अतिअवांतर : अदितीची "पोनीटेल" ची आयडीया लै लै लै भारी . विचार चालु आहे , लवकरच निर्णय कळवण्यात येईल ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
8 Oct 2008 - 2:19 pm | जैनाचं कार्ट (not verified)
बिझी शेड्युल असतानाही मिळेत तो वेळ साधुन सगळेजण एकत्र येत आहेत यात सुत्रधाराचे जबरदस्त यश आहे. हॅट्स ऑफ मॅडम!!
अगदी हेच म्हणतो !
बाकी तुम्ही लई मजा करत आहात बॉ :D
येणार येणार आम्ही बी येणार .... टुक टुक टुक टुक टुक.... :B
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
8 Oct 2008 - 3:27 pm | शाल्मली
स्वाती ताई,
आपण सहलीहून आल्या-आल्याच लेख टाकलास पण..
नेहमीप्रमाणेच मस्त वर्णन केले आहेस.
शाळाकॉलेजच्या सहलीत जसा दंगा चालतो ना तस्सा दंगा करत आम्ही प्रागकडे चाललो होतो.
पूर्ण सहमत..
गप्पा आणि हसण्याला तर उत आला होता
अगदी खरय.. किती हसत होतो आपण.. हसून हसून गाल दुखायला लागले होते..
जाम धम्माल केली आपण..
--शाल्मली.
8 Oct 2008 - 3:39 pm | यशोधरा
शाल्मली, कट्टी!! आमाला जळवतेस ना.. भ्यां :''(
8 Oct 2008 - 5:07 pm | केशवसुमार
स्वातीताईं,
सहली इतकेच खुमासदार वर्णन.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
( ज्ञानेश्वरांचा रेडा)केसु
8 Oct 2008 - 9:31 pm | लिखाळ
>सहली इतकेच खुमासदार वर्णन.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..<
असेच म्हणतो.
-- (ज्ञानेश्वरांच्या रेड्याकडुन बिब्बं घ्या बिब्बं ! शिकेकाई, हे गाणे ऐकलेला आणि सहन केलेला)लिखाळ.
8 Oct 2008 - 5:29 pm | झकासराव
वर्णन भारीच आहे.
शिवाय फोटो देखील मस्तच.
लिखाळरावानी टाकलेला फोटू बघुन आमची पुण्यात बसुन अम्मंळ जळजळ झालीच. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
8 Oct 2008 - 5:37 pm | शितल
स्वाती ताई,
मस्त लिहिले आहेस.
पदार्थ करण्यात तुझा हात कोण धरणार नाही :)
लेखाचा पुढचा भाग लवकर लिहि.
(अवांतर - रेवती म्हणते तसे आम्ही ही १८ ता. भेटणार आहोत.)
8 Oct 2008 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर प्रवासवर्णन त्याचबरोबर खादाडीच्या वर्णन वाचून जीव नुसता मेताकुटीला आला आहे.
प्रवासवर्णन असलेलें एक पुस्तक येऊच दे !!!
8 Oct 2008 - 11:10 pm | डॉ.प्रसाद दाढे
थोडे विषया॑तरः साल्झबर्गजवळच ऑबरसाल्झबर्ग असावे (ऑबर म्हणजे 'वर' ना?) तिथे हिटलर राहात असे पुष्कळदा. (त्याच्या ब॑गल्याचे नाव 'बर्गहॉफ' ). तिथेच त्याच्या व मुसोलिनी (इटलीचा हुकूमशहा), डॉ. शुशेनिग (ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर), डॉ. हाचा (झेकोस्लोव्हाकियाचा अध्यक्ष) इ लोका॑शी महत्वाच्या भेटी झाल्या होत्या. ती निसर्गरम्य जागा जगाच्या व दुसर्या महायुद्धाच्या इतिहासाची महत्वाची साक्षीदार आहे.
आता तेथे काय आहे ते पाहून कळवाल का?
9 Oct 2008 - 1:27 am | बिपिन कार्यकर्ते
झकास...
पुढचा भाग लवकर टाक गं... आणि ते गुपचूप काढलेले फोटो पण टाक इथे. :)
दाढे साहेब, तुमची इच्छा होईल पूर्ण बहुतेक. मलाही उत्सुकता लागली आहे. आज पर्यंत जी नावं कैक वेळा वाचळि आहेत तिथले फोटो तरी बघायला मिळतिल.
बिपिन.
9 Oct 2008 - 8:57 pm | सुनील
छान. युरोपच्या त्या भागाबद्दल फारसे लिहिलेले आढळत नाही. लवकर येउद्यात तुमचे प्रागचे वर्णन आणि फोटो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
9 Oct 2008 - 10:46 pm | ब्रिटिश टिंग्या
पुढचा भाग येउ देत लवकर!
10 Oct 2008 - 1:00 pm | चित्तरंजन भट
बर्याच दिवसांनी आजीआजोबांना बघून फार बरे वाटले. दोघांना माझा सा.न. पोचवा. किंवा माझ्यातर्फे सा.न. करा.
त्या सुरेख वाइन आइसक्रीमच्या सोबतीचे सफरचंद अगदी भारतीय वाटते आहे; नाही? एकंदर तुम्हा लोकांचे काँबिनात्सिऑन अगदी जमलेले दिसते आहे.
आगामी भ्रमणासाठी शुभेच्छा!
12 Oct 2008 - 5:07 pm | स्वाती दिनेश
भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद,
आमच्या प्राग सहलीचे वर्णन आणि चित्रे येथे पहा
स्वाती