अनाम वीरा...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
5 Apr 2014 - 2:06 am

अनाम वीरा....

एखादे शब्द मनावर गारुड का करून जातात? जेंव्हा जीवनाची ठराविक एक अशी काहिही समज आलेली नसते,तेंव्हाही.आणि जेंव्हा ती आलेली आहे,असा भास होत असतो,तेंव्हांही!!! हे गाणं मी पूर्विही ऐकलय...आज घरी येता येता सहज ऐकलं. आणि ते तितक्याच सहजतेनी विसरलंही गेलं! आणि अत्ता कानात परत वाजू लागलं? का??? ही रात्रीची वेळ शांत असते म्हणून? की अणखि काही? मृत्यु..हा जिवनातला अविभाज्य भाग किंवा त्याचा शेवटचा परिणाम असला,तरी तो सहज/नैसर्गिक असेल तर नकोसा(च) वाटतो! पण तिथे त्यागाचं,एखाद्या नैतिक जाणिवेनी सर्वस्व अर्पण करून लढून मृत्यूला हसत हसत आलिंगन देण्याचं मूल्य आलं,की त्याच्या विषयी मनाला अत्यंतीक ओढ का वाटते? तो आपला 'सखा' असल्यासारखी जाणिव का होते? कसा शोध घ्यायचा या जाणिवेचा??? दुसर्‍या बाजुनी?????? असेलही कदाचित...पाहू या प्रयत्न करून.

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त,
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!

हे मनुष्यत्वा... मजसारख्या सामान्याची जीवनयात्राच अशी नसते,की तिला शेवटाकडे जाताना कुठलेही भव्यत्व दिव्यत्वाचे अलंकार साथिला येतील.तरिही मी या समरात उडी घेतो,कारण मला तुझ्याकडे नेणार्‍या "मार्गाचं-मूल्य" नेमकं ठाऊक झालं आहे...फक्त कार्यपूर्तीकडे जाताना तुझ्या जाणिवेची दृढं साथ दे...म्हणजे झालं! अन्य मी..तुझ्याकडून काहिही अपेक्षिणार नाही!

धगधगता समराच्या ज्वाला या देशा काशी
जळावयास्तव संसारातुनी उठोनिया जाशी!

पुढची वाट बिकट आहे..अत्यंत कठीण आहे.सखे,सांगाती...धीर देत आहेत..सावधंही करत आहेत.पण मन आता मागे फिरायला तयार नाही.कळलेलं आहे, "तो" माझी वाट पाहात उभा आहे.मनातले सगळे स्वार्थ देहबंधनातून मुक्त होणार्‍या प्राणाप्रमाणे विलग होत आहेत,आणि त्याच्या पर्यंत नेणारा हा मधला सेतू एका सद्कार्याच्या दोरीने विणलेला आहे... अता थांबता येणार नाही!

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेशा
मरणामधे विलीन होती ना भय ना आशा!

हे आप्तजनहो, तुंम्ही मला कित्तिही सांगितलत न सांगितलत तरी...माझ्यासाठी हे असं मरण,हेच एक जनन आहे,इतका मी त्याच्यामधे मला मिसळून टाकित आहे. अश्या क्षणी "माझं" आणि तुंम्ही माझ्याबद्दल चिंतिलेलं असं "तुमचं" ..किती आणि काय उरणार आहे? हे सर्वच काहि मी त्याला अर्पून टाकलेलं आहे..नव्हे,,,ते त्याचच झालं आहे.

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

हे माझ्या प्राणसख्या..हे किती बरे आहे,की मी मनुष्यमात्रांमधला एक सामान्य जीव आहे.कार्य समाप्तीनंतर.. तुझ्याकडे येत असता माझ्यामागे कोणतेही वलय/किर्ती नाही,की माझ्यामागे नक्की काय आणि कुणासाठी रहाणार आहे,असल्या इहलौकिक स्वार्थांन्निही मी बांधलेला असण्याच्या शक्यताही नाहीत. कारण....,तुझ्याकडे येण्यामागे कुठलाही पवित्र आणि उदात्त हेतू नसता,तर माझ्यासारख्या क्षुद्र मनुष्याच्या पायातल्या त्या बेड्याच असत्या ना!!!?

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !

हे माझ्या देवदूता... तुझ्याकडे येताना माझ्या जिवनाचे मूल्य मी इतके शून्यवत करवून घेतले आहे,की तुझ्याप्रती स्वतःला समर्पित करीत असतांना मला माझ्यामागे किर्तिरुपाने काय उरावे,याचा विचारंही पडू नये...आणि त्याशिवाय माझ्यासारखा माणूस कसा बरे तुझ्याकडे येतानाच्या "मार्गासाठी" तयार होइल? नाहितर...केवळ मृत्यू..म्हणून मला तुला कवटाळायचे कारणच काय होते!???

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

हे माझ्या प्राणप्रीया.. माझ्या मनाला खात्री आहे,तुझ्याकडे येण्यासाठी मी जो जिवनमार्ग,एक मूल्य म्हणून निवडला आहे...स्विकारला आहे. तोच मला तुझ्याकडे फिरुन एकवार येण्यासाठीचा दुसरा रस्ता तयार करून ठरणार आहे. तुझ्या भेटिचे हे सहजसाध्य मला उमगले,म्हणूनच तर माझा तुझ्याकडे येण्याचा मार्ग सहज आणि सुकरं झाला. देहबंधन पूर्विही असे वाटत नव्हते,आणि यापुढेही असे ते कधिच वाटणार नाही.तुझ्या भेटीचे फलित हे असेच अक्षय्य असते...हे मला माझ्या खर्‍या मातेच्या....निसर्गाच्या कुशित असताना समजले असावे कदाचित...त्या अ'जाणत्या वयात! म्हणूनच मला माझे अ'नाम असणे आज पूर्ण मान्य आहे! मी त्याचा आनंदाने स्विकार करीत आहे.
......................................................................................................................

गीत/काव्यः-कुसुमाग्रज. __/\__

संस्कृतीसमाजविचार

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

5 Apr 2014 - 3:39 am | आत्मशून्य

सत्याचे मातेरं होतं तरीही, जे वाचु ते छानच वाटतं. उत्तम आहे.

प्रचेतस's picture

5 Apr 2014 - 8:00 am | प्रचेतस

छान लिहिलंय आत्मुदा.

आत्मुस काव्य लिहिणारा लिहुन जातो. आपण ज्या परिस्थीती ते ऐकतो, त्या संदर्भानुरुप त्याचा उलगडा नव्याने आपणास होतो. या कवितेचही तसच झालंय. असेलही वाटला असा अर्थ तुम्हाला ज्या पद्धतिचे रसग्रहण तुम्ही केलय. मला अभंग ऐकताना सुद्धा असाच काहीसा संभ्रम पडतो.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Apr 2014 - 2:09 pm | अत्रुप्त आत्मा

येस येस ..अपर्णाताय..अगदी असच झालेलं हाय! :)