FoodieMagic.com चा शुभारंभ

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
31 Mar 2014 - 2:35 pm

सर्व खवैयांसाठी आज ३१ मार्च २०१४ रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी FoodieMagic.com हे केवळ खाण्या-पिण्याला समर्पित असे संस्थळ आम्ही सहर्ष सादर करत आहोत.

मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधे ह्या फोरमवर लिहिता येईल. तुमच्या विविध पाककृती, रेस्टारंटचे अनुभव, डायेट किंवा न्युट्रीशन विषयी अधिक माहिती घेऊन अवश्य सभासद व्हा!

सभासदत्व पुर्णपणे मोफत आहे आणि तुम्ही तुमचे फेसबुक, गुगल किंवा ट्वीटर अकाऊंट वापरूनही लॉग-इन होऊ शकता.

इथल्या एकापेक्षा एक सुगरणींना आणि बल्लवांना आणि माझ्यासारख्या इतर अनेक खवैयांना खास आग्रहाचे निमंत्रण आहे - अवश्य जॉईन व्हा, तिथेही असेच मोकळेपणे आणि भरभरून लिहा. आपण सर्व मिळून आपल्यासारख्याच खवैयांसाठी एक हक्काचे व्यासपीठ बनवू या. तुमच्या सक्रिय सहभागाशिवाय मजा नाहीच; तेंव्हा अवश्य जॉईन व्हा आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा! तुमच्या सुचनांचेही स्वागत आहे!

इथे रजिस्टर करून जॉईन होता येईल: http://www.foodiemagic.com

आपल्या प्रतिकने (गणपा) लाँच पुर्वी काही महत्त्वाच्या सुचना केल्या आणि मदत केली, त्याबद्दल त्याचे खास आभार. :-)

पाकक्रियाप्रकटन

प्रतिक्रिया

गणपा's picture

31 Mar 2014 - 2:52 pm | गणपा

FoodieMagicला माझ्या तर्फे शुभेच्छा मनिष.
जमेल तसं सहकार्य देत राहूच.

धन्यवाद! आधिकाअधिक पाककृती टाकत जा जमेल तशा - जुन्या कॉपी-पेस्ट केल्या तरीही चालतील.
देशी-विदेशी पाककृतींचा एक मोठा खजिनाच तिथे तयार व्हावा अशीच इच्छा आहे! :-)

राही's picture

31 Mar 2014 - 3:28 pm | राही

शुभेच्छा.
सर्व मराठी संस्थळांवरच्या पाककृती इथे एकत्र पहायला मिळोत. (अर्थात सादरकर्त्यांची परवानगी असेल तरच.)
नवीन वर्षापासून भरभराटच होवो.

मनिष's picture

31 Mar 2014 - 4:39 pm | मनिष

धन्यवाद! स्वतः सादरकर्त्यांनीच त्या पाककृती तिथे द्याव्यात अशी इच्छा आहे!

सर्व मराठी संस्थळांवरच्या पाककृती इथे एकत्र पहायला मिळोत.

AMEN! :-)

अनन्न्या's picture

31 Mar 2014 - 4:09 pm | अनन्न्या

आधी इतरत्र प्रकाशित ( अर्थात मिपावर ) साहित्य चालेल का?

अर्थातच! मी पण तेच केले :P

स्वतःचे इतरत्र प्रकाशित (तुमचा स्वतःचा ब्लॉग, मिपा किंवा इतर संस्थळ) साहित्य नक्कीच चालेल. देशी-विदेशी पाककृतींचा एक मोठा खजिनाच तिथे तयार व्हावा अशीच इच्छा आहे, पण फक्त तिथेच लिहा अशी अट नक्कीच नाही. तुमच्या आवडत्या संस्थळांबरोबरच इथेही लिहा अशी विनंती आहे.

प्रचेतस's picture

31 Mar 2014 - 4:11 pm | प्रचेतस

अभिनंदन मनिष.
नव्या संस्थळाला शुभेच्छा

अमोल केळकर's picture

31 Mar 2014 - 4:22 pm | अमोल केळकर

संकेतस्थळास पोटभर शुभेच्छा

अमोल केळकर

मनापासून धन्यवाद वल्ली आणि अमोल केळकर!
अमोल केळकर - पोटभर शुभेच्छा खासच :-)

सुहास..'s picture

31 Mar 2014 - 4:49 pm | सुहास..

शुभेच्छा ..आयडी घेतला आहे

मनिष's picture

31 Mar 2014 - 4:55 pm | मनिष

धन्यवाद रे सुहास! :-)

अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी फक्त स्वतःच्या ई-मेल वर लिंक क्लिक केली की अ‍ॅक्टिव्हेट होईल. त्यामुळे लगेचच अ‍ॅक्टिव्हेट होईल, अ‍ॅडमिन ने अ‍ॅक्टिव्हेट करण्याची गरज नाही.

स्मिता श्रीपाद's picture

31 Mar 2014 - 5:02 pm | स्मिता श्रीपाद

मस्त....आयडी घेतला आहे

संस्थळास शुभेच्छा! मँगो करी छान दिसतीये.

धन्यवाद रेवतीताई आणि स्मिताजी! तिथेही लिहा भरभरून!

विकास's picture

31 Mar 2014 - 6:44 pm | विकास

अरे वा! चांगली कल्पना आहे. FoodieMagic.com संस्थळास मन:पुर्वक शुभेच्छा!

यशोधरा's picture

31 Mar 2014 - 6:47 pm | यशोधरा

शुभेच्छा!

साती's picture

31 Mar 2014 - 8:05 pm | साती

आयडी घेतला आहे.
प्रतिसाद दिला आहे.
मिपासारखी डायरेक्ट मराठीत लिहायची सुविधा दिल्यास उत्तम!

वरच्या मेन्युमध्ये Type In:मराठी/English असे दोन पर्याय आहेत.
मराठी पर्याय निवडल्यास मिपा सारखच मराठीत टंकता येईल.

गणपाने आधीच उत्तर दिले आहे. गमभन वापरून डायरेक्ट मराठीत लिहिता येते. "Type In:" मधून भाषा निवडा किंवा फायरफॉक्स वापरत असल्यास CTRL+\ वापरूनही भाषा बदलता येईल - मिपा सारखीच! :-)

तुमचं संस्थळ हापिसात उघडंना ओ !!

मनिष's picture

31 Mar 2014 - 9:19 pm | मनिष

काय म्हणतोय ब्राउजर?

मुक्त विहारि's picture

31 Mar 2014 - 9:35 pm | मुक्त विहारि

संस्थळास शुभेच्छा!

पैसा's picture

31 Mar 2014 - 9:40 pm | पैसा

संस्थळ पाहिले छान आहे. रजिस्टर करायचा प्रयत्न केला पण कॅप्चा फॉण्ट नीट कळत नाहीये. ४/५ वेळा चुकल्यानंतर थांबले.

मनिष's picture

31 Mar 2014 - 9:43 pm | मनिष

धन्यवाद!

कॅपचाचा फॉण्ट इतका विचित्र आहे का?
गुगल अकाऊंट किंवा फेसबुक वापरुन बघा...कॅपचा ची गरज नाही मग.

धन्यवाद मुक्त विहारि, विकास आणि यशोधरा!

खेडूत's picture

31 Mar 2014 - 9:48 pm | खेडूत

मेरेकू तो जम्या!

शुभेच्छा !!

छान! :-)
लिखाण करा आवडेल तसे!

बहुगुणी's picture

31 Mar 2014 - 10:09 pm | बहुगुणी

नोंदणी केली आहे, हमखास आवडीचे (पण "कधी-कधीच" यशस्वी!) असे अवघड पदार्थ, तसेच नव-नवीन पदार्थ-प्रयोगही पहायला मिळतील अशी आशा आहे.

'खवैयांच्या गप्पां' मध्ये वाचकांना आवडलेल्या / आवडणार्‍या महाराष्ट्रीय खाद्य-संस्थळांची यादी येऊ शकेल.

अवश्य! "गप्पा-गोष्टी" मध्ये सुरू करा चर्चा - आम्हीही यथाशक्ती हातभार लावूच! :-)

सानिकास्वप्निल's picture

31 Mar 2014 - 10:11 pm | सानिकास्वप्निल

नव्या संस्थळास मन:पुर्वक शुभेच्छा :)

धन्यवाद! तुमची वाटच पाहतो आहे - सवड मिळेल तशी नक्की जॉईन व्हा.

सानिकास्वप्निल's picture

2 Apr 2014 - 3:04 pm | सानिकास्वप्निल

खातं उघडलं आहे :)

धन्यवाद. आता लिखाणाची वाट पहावी लागणार! :P

नि३सोलपुरकर's picture

1 Apr 2014 - 10:34 am | नि३सोलपुरकर

FoodieMagic.com संस्थळास मन:पुर्वक शुभेच्छा!

नंदन's picture

1 Apr 2014 - 12:01 pm | नंदन

मीही सदस्यत्व घेतले. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

चिरोटा's picture

1 Apr 2014 - 12:48 pm | चिरोटा

चांगली कल्पना.आय.डी.(ह्याच नावाचा) घेतला आहे.
जुन्या/नव्या/विस्म्रुतीत गेलेल्या मराठमोळ्या पाकृ येथे 'खायला' मिळतील ही अपेक्षा.!

तुमचा अभिषेक's picture

1 Apr 2014 - 12:53 pm | तुमचा अभिषेक

घरून सभासदत्व घेतो. वाचक म्हणून योगदान असेलच.

मराठी माणसांच्या आवडीच्या पाककृत्या हे वैशिष्टय ठरावे.
संकेतस्थळ भरभराटीला येवो हिच सदिच्छा !

मनिष's picture

1 Apr 2014 - 2:11 pm | मनिष

धन्यवाद नि३सोलपुरकर, नंदन आणि अभिषेक! वाचक तसेच लेखक म्हणुनही लिखाण करा ही विनंती.

मलाही खाण्याची आणि खिलवण्याची आवड - पण लिखाणाचा कंटाळा, आता ह्या निमित्त्ताने लिहिले जाईल अशी आशा आहे! :-)

मनिष's picture

2 Apr 2014 - 3:03 pm | मनिष

नुसते वाचक म्हणून नव्हे तर लिखाणही करा! सध्या पाककृती लिहणार नसाल, तर ज्यांनी पाककृती लिहिल्यात त्यांना प्रतिसाद दिलात तर त्यांनाही आवडेल आणि नवीन साईटलाही प्रोत्साहन मिळेल. :-)

हुश्श्श्य ...झाले बाई मी सदश्या तिकड ;) ... :D

अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट केलेले दिसत नाही. तुम्हाला स्वतःच मेल्वरून ते करता येईल.

दिव्यश्री's picture

2 Apr 2014 - 3:44 pm | दिव्यश्री

केल आहे . जरा चेक कराल का?

मिपाची जाहिरातही फुडमॅजिकवर येऊदेत :)

मनिष's picture

2 Apr 2014 - 3:32 pm | मनिष

जरूर! पण कशी?

यशोधरा's picture

2 Apr 2014 - 3:34 pm | यशोधरा

मला कसं करता येईल ह्याची कल्पना नाही, पण नीलकांताला विचारलंत तर सांगेल तो :)

नीलकांतला विचारुनच इथे FoodieMagic.com च्या लाँचविषयी लिहिले होते.

तिथे आता आवडत्या खाण्याच्या ब्लॉग/संस्थळांविषयी धागा काढला आहे - त्यावर अर्थातच मिपाविषयी लिहिता येईल. मी पण लिहिनच!

स्मिता चौगुले's picture

2 Apr 2014 - 3:54 pm | स्मिता चौगुले

मी देखिल घेतला आयडी.. स्मित नावाने

झाले मेंबर झाले. कालच आईंनी दुधीची भाजी नारळाचं दूध अन काजू घालून केलेली शिवाय भानोळीही. ती परत केली की नीट पाकृ टाकेन.

अर्धवटराव's picture

10 Apr 2014 - 9:31 am | अर्धवटराव

खाण्यापिण्यावर आधारीत साहित्यवाचनासारखं सुख नाहि. शिवाय खायची-खिलवायची हौस भागवयला उत्तम व्यासपीठ. गणपाच्या आशिर्वादाने शुभारंभ झालाय म्हटल्यावर चविष्टतेची गॅरंटीच मिळाली.

अनेकानेक हेल्दी शुभेच्छा. बोर्डावर भेटुच :)

धन्यवाद शुचि आणि अर्धवटराव! अवश्य लिहा तिथेही - काही मदत लागली तर आम्ही आहोतच! :-)

दिपक.कुवेत's picture

10 Apr 2014 - 12:57 pm | दिपक.कुवेत

नविन उपक्रमास हार्दिक शुभेच्छा आणि लगेच मेंबरहि झालोय (वीकेंड पर्यंत धीर धरवलाच नाहि).

भेटुच मग.