आमच्या जाणिवेचा प्रेरणास्त्रोत - जाणिव
कुठेतरी पोट माझं
कण्हत राहतं
थंड सुस्कारांना
वाट देत राहतं
जेवण ओरपलेलं
चवीनं
''जाणीवे''च्या टोकांनी
बोचत राहतं
नेहमीच आधी केला
विचार अधिकाचा
समोर नसलेलं सारं
जणु माझंच होतं
प्रत्येक घासासवे
उदराचा घेर
वाढलेला
आणि सफाईसाठी
नको तिथे बोळं
अडलेलं असतं
नजरांचे ते असंख्य वार
अन मुठीतल्या नाकांचे वेडगळ दृष्य
सहन करून,
अवघडलेलं पोट
गुरगुरत राहतं
आता कसली तक्रार
आणि चिंता कशाची?
"ईनो" घेतल्यानंतर
जे व्हायचं
ते होऊनच जातं
"यातनां"नी मात दिली
माझ्या "जाणीवां"ना
आणि मानलं मी
तुलनेनं बकासुराचं पोट
अंमळ मोठंच होतं!!
प्रतिक्रिया
7 Oct 2008 - 11:00 am | मनीषा
"पोटाचा प्रश्न" ही खरोखरीच एक जागतिक समस्या आहे..
या तुम्हाला झालेल्या जाणीवेचे तुम्ही केलेले मुक्त प्रकटन आवडले
7 Oct 2008 - 1:28 pm | राघव
हा हा हा..
विडंबन हलकेच घेतल्याबद्दल धन्यवाद. :)
मुमुक्षु
8 Oct 2008 - 1:07 pm | दत्ता काळे
जेवण ओरपलेलं
चवीनं
''जाणीवे''च्या टोकांनी
बोचत राहतं
. हे फार सुंदर