तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं
चौकोनात फिरणार्या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ
शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, (एको)
प्रतिक्रिया
14 Mar 2014 - 1:33 pm | नित्य नुतन
हेहेहे ... सुरेख ..
14 Mar 2014 - 1:36 pm | स्पंदना
देवा!
ते "तुला भागुन तुझा गुणाकार करीन" आठवलन भाऊ!!
17 Mar 2014 - 12:48 pm | मंदार दिलीप जोशी
तुला भागुन तुझा गुणाकार करीन
खूप हसलो :D
एका कवितेचा भाग आहे का हे? पूर्ण देऊ शकाल का?
14 Mar 2014 - 2:20 pm | नावातकायआहे
जमलय... :-)
14 Mar 2014 - 2:21 pm | आंबट चिंच
खुप चान खुप चान!
14 Mar 2014 - 3:29 pm | राजेंद्र मेहेंदळे
जमलंय राव
14 Mar 2014 - 5:56 pm | आदूबाळ
आवडली!
14 Mar 2014 - 6:42 pm | मृगजळाचे बांधकाम
भौमितिक कविता =)) चान चान
14 Mar 2014 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
और भी आने दो.
-दिलीप बिरुटे
17 Mar 2014 - 12:42 pm | मंदार दिलीप जोशी
प्रत्यक्ष डॉक्टरसाहेबांचा प्रतिसाद, लई भारी वाटलं! धन्यवाद :)
14 Mar 2014 - 7:28 pm | पैसा
गणित सुद्धा शिव्या दिल्यासारखं वाटलं! ;)
14 Mar 2014 - 10:14 pm | खटपट्या
मस्त चेपू वर टाकण्यास परवानगी आहे का ? (तुमच्या नावासहित)
14 Mar 2014 - 10:19 pm | आनंदी गोपाळ
मेलेलं घोडं आहे ते.
चामडं पण कुजलं आता. फेसबुकावर आल्रेडि हायेच, आजून लै ठिकाणी हाये. लिमिटेड प्रतिभेत ग्लोरिफाय होणारे हायेत ते.
14 Mar 2014 - 10:21 pm | आनंदी गोपाळ
२०११ सालचं आहे ते.
15 Mar 2014 - 4:48 am | पाषाणभेद
तेच म्हंतो. कुठंतरी वाचल्याचं आठवत होतं. मस्त है पन.
17 Mar 2014 - 12:32 pm | मंदार दिलीप जोशी
जरूर टाका
14 Mar 2014 - 10:43 pm | राघवेंद्र
हा योगायोग की पाय (२२/७) दिना निमीत्त्त ?
कविता आवडली.
17 Mar 2014 - 12:45 pm | मंदार दिलीप जोशी
पाय दिन असल्याचे एके ठिकाणी वाचले होते म्हणून त्याच दिवशी टाकली.
15 Mar 2014 - 11:52 am | सस्नेह
गणिती काव्य आवडले.
15 Mar 2014 - 1:46 pm | श्रीगुरुजी
मस्त कविता! एकदम वेगळीच कविता आहे.
अजून लिहा.
16 Mar 2014 - 6:18 am | कंजूस
न्युटनचं फळ पडलं डोक्यात .
16 Mar 2014 - 10:26 am | सूड
>>आयचाघोरसचा सिद्धांत
आयचा घोव्व !! =))))
16 Mar 2014 - 2:27 pm | आत्मशून्य
पण उगा गहन प्रतिसाद नको टंकायला.... या विचाराने शांत राहिलो होतो. :D =)
16 Mar 2014 - 1:23 pm | kurlekaar
तुम्ही घेतलेलं टोपणनाव creative आहे व या कवितेमागची कल्पना देखिल.
‘टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ’
या दोन ओळी खुपच छान आहेत. पण बाकीच्या एवढया भेदून जात नाहींत. कांही तर tangent सारख्या फक्त स्पर्शून जातात.`
16 Mar 2014 - 2:30 pm | भ ट क्या खे ड वा ला
मं .दि तेजीत आहे
17 Mar 2014 - 12:47 pm | मंदार दिलीप जोशी
:D
16 Mar 2014 - 3:04 pm | प्यारे१
आवडलं!