माझाही अनुभव...

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
4 Oct 2008 - 5:27 pm

बरोब्बर १ वर्षा पूर्वी मला आफ्रिकेला जायचा योग आला. तशी ती माझी आफ्रिकेची पहिलीच ट्रिप असल्याने मी एकदम खुशीत होतो. नैरोबीला राहणार होतो ३ च दिवस पण एक पक्कं ठरवलं होतं काहिही झालं तरी तिथलं झू बघाच्चं म्हणजे बघाच्चंच. काम खरं म्हणजे २ च दिवसाचं होतं आणि तिसरा दिवस विमानची वेळ सोयीची नव्हती म्हणून पदरात पडला होता. म्हणजे सगळं व्यवस्थित जुळून येत होतं.

गेल्या गेल्या पहिलं काम काय केलं असेल तर कंपनीच्या ड्रायव्हरला मस्का मारायला सुरुवात केली. नाहीतर आम्हाला टॅक्सी भाड्याने (टारू वाला भाड्या नाही :) ) घेऊन झू वगैरे बघायला जावे लागले असते. ते काही परवडले नसते. आमचा ड्रायव्हर, जॅक त्याचे नाव, म्हणजे एकदम जेंटल जायंट (६ फूट ६ इंच उंची आणि वजन १०० कि. च्या खाली गॅरंटीड नसणार, एक्स केन्यन आर्मी बॉक्सिंग चँप). त्याच्या साठी दुबई ड्यूटी फ्री मधून 'खाऊ' (खरं म्हणजे 'पिऊ') नेलंच होतं. मग काय, प्रोग्राम ठरला आमचा.

ठरल्या प्रमाणे आम्ही तिघं जणं जॅक बरोबर झू मधे गेलो. नैरोबीचे झू खूपच मोठे आहे. तिथे सगळे वन्यप्राणी वेगवेगळ्या ठिकाणी मोकळे सोडले आहेत. पिंजरे वगैरे काही नाहित. आपणही मोकळेच असतो. पिंजरेवाल्या गाडीत नाही. फक्त प्राण्यांच्या आणि आपल्या मधे खूप मोठे खोल खंदक खणलेले असतात आणि त्या खंदकात तारा वगैरे टाकून जाळ्या केलेल्या असतात ज्या मुळे ते प्राणी आपल्या जवळ येऊ शकत नाहीत. तर, आम्ही फिरत फिरत, एका ठिकाणी एक चित्त्याची मादी आणि तिची २ पिल्लं ठेवली होती तिथे आलो. आम्ही अगदी कुतूहलाने शोधत असताना, अचानक तिथला केअरटेकर आला आणि म्हणाला, 'डु यू वाँट टू मीट देम? टच देमच?' ... आम्ही तिघंही तो प्रश्न आमच्या मेंदूंपर्यंत पोचायच्या आधी 'यस्स्स' म्हणून बसलो. मग आम्हाला कळलं की आपण काय बोललो आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. पण आता माघार कसली? जॅक पण होताच समोर, तो आमची गंमत बघत होता. मग विचार केला 'दे धडक, बेधडक'. जो होयेंगा वो देखा जायेंगा. आणि त्या केअरटेकरची पण काहितरी वट असेलच ना चीत्त्यांवर? मग काय घाबरायचे? 'हर हर महादेव'. तो केअरटेकर आम्हाला एका छोट्याश्या जाळीतून आत घेऊन गेला. तिथे साधारण १२ फूट बाय १२ फूट ची एक जाळीदार खोली होती. म्हणजे पिंजरा हो. त्याने आम्हाला त्या पिंजर्‍यात कोंडले आणि म्हणाला थांबा इथेच, मी आलोच चीत्त्याला घेऊन. आम्ही मस्त पैकी इकडे तिकडे बघत शिट्ट्या वगैरे वाजवत उभे होतो. २-३ मिनिटात केअरटेकर साहेब आले की खरंच त्या चीत्त्याला घेऊन. कल्पना करा १२ बाय १२ च्या बंदिस्त जागेत आम्ही ३ क्षुद्र मानव, एक 'महा'मानव, तो केअरटेकर आणि ती चीत्त्याची मादी.

तेवढ्यात माझा एक मित्र पचकलाच, 'फिडींग टाईम काय असतो हो या प्राण्यांचा?' 'होतच आला आहे आता, साहेब. खरं म्हणजे फिडींग साठीच मी आत चाललो होतो, तुम्ही दिसलात म्हणून विचारलं की येता का आत?' - केअरटेकर. खरं सांगतो मंडळी, परवा पेठकर काकांनी कुठे तरी प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे काळ्जाचं पाणी पाणी होऊन ते तुंबायला लागलं होतं आणि पटकन जिथून जागा मिळेल तिथून बाहेर पडेल असं वाटायला लागलं होतं.

केअरटेकर साहेबांनी त्या बयेला एका कोपर्‍यात खाली बसवलं आणि म्हणाले, 'या एक एक करुन'. आमची थोडी ढकलाढकली झाली, तर तो केअरटेकर म्हणतो कसा 'प्लीज बी काम, अदरवाईज शी मे गेत एक्सायटेड'. मग कसाबसा धीर करुन आम्ही एक एक करुन जवळ गेलो. त्या खाली बसलेल्या चित्तीणीच्या अंगावरुन छान हात वगैरे फिरवला. काय अनुभव होता म्हणून सांगू.... मिपाच्या भाषेत... ज ह ब ह र्‍या. तिचा तो फरकोट, थोडासा मऊ, थोडासा खरखरित. आणि तो जनावरांच्या जवळ येणारा एक विशिष्ट वास.

मी हात फिरवत असताना, एकदम तीने मान उचलून माझ्याकडे रोखून बघितलं. अथांग हिरवे डोळे म्हणजे काय असते ते मला त्या दिवशी कळलं. एखादे हिंस्त्र जनावर साधारण एखाद फूटावरून तुमच्या डोळ्यात डोळे मिसळून बघतं... आहाहाहा, काय फिलींग असतं, भिती तर वाटतेच पण आपण काहितरी जबरदस्त करतो आहे असेही एक थ्रिल जाणवत होतं. मला जिम कॉर्बेटची आठवण आली. त्याने असं लिहिलं आहे की वाघ कधी कधी सावजाला संमोहित करुन त्याची शिकार करतो असं कुमाउंमधले स्थानिक लोक म्हणतात. आईच्यान् सांगतो मंडळी, खरं असणार ते. असला खोल हिरवा रंग कधीच नाही बघितला मी.

त्या दिवशी आम्ही आत जाताना ढकलल्या सारखे गेलो होतो, पण बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. बाहेर आलो तेव्हा उगाचच नाचावेसे वाटत होते. बराच वेळ आम्ही चूपचाप होतो. मग एकदम फोन काढला आणि पहिला फोन माझ्या मुलीला केला. तिचा तर विश्वासच बसत नव्हता. मला माहित होतं की तिचाच काय तुमच्या पैकी पण कित्येकांचा विश्वास बसणार नाही. म्हणूनच हे व्हिडिओ शूटींग केलं आहे. :)

http://www.youtube.com/watch?v=CSuW1BTKjP0

बिपिन.

मौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2008 - 5:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> नाहीतर आम्हाला टॅक्सी भाड्याने (टारू वाला भाड्या नाही Smile ) ...
:-d
>> ... आम्ही तिघंही तो प्रश्न आमच्या मेंदूंपर्यंत पोचायच्या आधी 'यस्स्स' म्हणून बसलो.
नकार देणे - एक कला! :-)

मस्त अनुभव आणि झकास वर्णन!

अवांतरः ते व्हिडीओत दिसणारे तुम्हीच कशावरून?

(शंकेखोर) अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2008 - 5:35 pm | बिपिन कार्यकर्ते

अगं विश्वास ठेव, तो झोपलेला मीच आहे.

बिपिन.

जैनाचं कार्ट's picture

4 Oct 2008 - 5:36 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>>व्हिडीओत दिसणारे तुम्हीच कशावरून?

असं ध्यान आणी कुणाचं असणार यमे ;)
समजून घेत जा बाळा !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

जैनाचं कार्ट's picture

4 Oct 2008 - 5:33 pm | जैनाचं कार्ट (not verified)

जबरा !
पहीला भाग व हा भाग एकदम मस्त जमला आहे .... जरा लेखाची सिमा वाढव !
व्हिडीओ तर जबरा ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2008 - 5:37 pm | बिपिन कार्यकर्ते

साहेब, त्या खोबार चा आणि या भागाचा काही संबंध नाहिये... त्या आगाऊ कार्ट्या चा लेख आहे ना 'माझा अनुभव' म्हणून त्याच्या वरनं हे आठवलं म्हणून लिवलं... खोबार येतंय मागनं

जैनाचं कार्ट's picture

4 Oct 2008 - 5:38 pm | जैनाचं कार्ट (not verified)

अरे मी दोन्ही एका मागोमाग वाचले.... म्हणून भाग म्हणालो !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अवलिया's picture

4 Oct 2008 - 5:36 pm | अवलिया

उत्तम अनुभव वर्णन

मी हिरव्या डोळ्यांचे जनावर कधी नाही पाहीले जवळुन पण असे अथांग गहिरे डोळे असलेले माणसे भरपुर पाहीली आहेत. जनावरे खुप बरे अशा माणसांपेक्षा हे नक्की

विजुभाऊ's picture

7 Oct 2008 - 11:11 am | विजुभाऊ

माझ्या एका कोकणस्थ मैत्रीणीचे डोळे होते हिरवेकच्च.
ती कोणाकडे पाहुन बोलायला लागली की बहुतेकवेळा लोक आज्ञाधारक बंडु व्हायचे.
हिरवे डोळे असलेले लोक त्या डोळ्याच्या तसल्या रंगामुळे एकदम खानदाने श्रीमन्त वाटतात.
(उदा: वर्षा उसगावकर कधीच गरीब मुलगी वाटली नाही . कायम श्रीमन्तच)

यशोधरा's picture

4 Oct 2008 - 5:39 pm | यशोधरा

मस्त अनुभव आणि व्हिडिओ शूटींग, पण ते क्रमशः ही येऊदेत पुढचं!

टारझन's picture

4 Oct 2008 - 6:00 pm | टारझन

. एखादे हिंस्त्र जनावर साधारण एखाद फूटावरून तुमच्या डोळ्यात डोळे मिसळून बघतं... आहाहाहा, काय फिलींग असतं, भिती तर वाटतेच पण आपण काहितरी जबरदस्त करतो आहे असेही एक थ्रिल जाणवत होतं

हो मालाही असंच वाटलं होतं .. आमच्या बँकेतली माझ्यावर फुल्टू लट्टू झालेली ६फुट ३इंच निळ्या+काळ्या डोळ्यांची मरिना .... ज्यावेळी मी तिच्यापासून एक सेंटीमिटर वर होतो ... तेंव्हा असलंच फिलींग आलेलं .. आणि भारतात दिवाळी-दसर्‍याला आंडू पांडू शरिराच्या मित्रांना आलिंगण करताना अफजल खानाचं फिलींग यायचं . पण इथे आलिंगन देताना (हे मुलींना आलिंगन मला नविनचं होतो .. प्रचंड काटे उमटले होते ) मलाच अफजल भेटली .. आणि मी शिवाजी .. खी खी खी ...

असो .. आता अवांतर :
बिप्पीन भौ ... इकडल्या अभयारण्यात गेलेलो .. इथे ही सेम खंदक खाणलेले मोकळे प्राणी होते .. सिंहाला शिवायचा चानस होता .. मी पटक्न त्याच्या शेपटाला शिवून पळून गेलो .. त्याने झटक्यात मागे पाहिलं आणि माझं अँड्रिनलिन अचानक लै लै वाढलं ... त्याचे विटकरी डोळे जणू शरिराला मॅचिंग कॉंटॅक्ट लेन्स लावल्या सारखे होते .. त्याचे बायसेप्स माझ्यापेक्षा मोठे होते ... बाकी चित्ता म्हणजे छडमाड हो .. फारच शामळू आणि गरिब प्राणी .. खरं थ्रिल अनुभवायचं असेल तर ढाण्या वाघ किंवा मेगा जायंट अफ्रिकन सिंह यांच्या जवळ जा ... अँड्रिनलीन वाढण्याची गॅरेंटी ...

मरिना चा ड्रिमबॉय
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2008 - 6:03 pm | बिपिन कार्यकर्ते

१ सें.मी. ???

तू तिच्यापासून १ सेंमी वर पोचलासच कसा? ;)

(क्रिप्टीक गेलं का?) :)

बिपिन.

टारझन's picture

4 Oct 2008 - 6:05 pm | टारझन

तू तिच्यापासून १ सेंमी वर पोचलासच कसा?

आता कोण कोणाजवळ पोचलं हे सांगायला हवं का ?
काही झालं की निसती खेटाखेटी ( मानभावी पणा न करत मलाही खेटावंच लागतं हो) ..पण हल्ली मी सुरक्षित अंतर ठेवतो ... :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2008 - 6:10 pm | बिपिन कार्यकर्ते

टूकटूक... तुला क्रिप्टिक गेलाऽऽ...

अवलिया's picture

4 Oct 2008 - 6:12 pm | अवलिया

टूकटूक... तुला क्रिप्टिक गेलाऽऽ...

=)) =)) =))
लहान आहे भौ अजुन संभाळुन घ्याव... :P

टारझन's picture

4 Oct 2008 - 6:21 pm | टारझन

आहो क्रिप्टिक नाही गेला .... मी प्रतिसाद 'मन' मारुन लिहीला आहे ....

बाकी उंचीचा फायदा होतो :) -- क्रिप्टिक

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

आगाऊ कार्टा's picture

4 Oct 2008 - 5:43 pm | आगाऊ कार्टा

वा बिपिनभौ....
बोले तो एकदम रापचिक ... फन्डू ....
तुम्ही तर माझ्या एक पाऊल पुढे गेलात....
वर्णन तर एकदम झकास...
आणि व्हिडियो.....
माझ्याकडे शब्दच नाहीत.
लगे रहो!!!!!!

मेघना भुस्कुटे's picture

4 Oct 2008 - 5:50 pm | मेघना भुस्कुटे

खतरनाक! अजून कसले कसले अनुभव आहेत हो तुमच्याकडे?

शितल's picture

4 Oct 2008 - 5:50 pm | शितल

मस्त अनुभव आहे तुमचा.
आणि व्हिडिओ ही पाहिला. अगदी घरचा चित्ता असल्या सारखे त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहात. :)

एकलव्य's picture

4 Oct 2008 - 6:05 pm | एकलव्य

जबर्‍या आवडले!!

सहज's picture

4 Oct 2008 - 6:25 pm | सहज

बिपीनभौ!! जबरी.

लहानपणी दुरदर्शनवर "प्रोजेक्ट टायगर" नावाची सिरीयल असायची तेव्हापासुन वाघाला हात लावायची /मिठी मारायची इच्छा आहे. बघु कधी पुरी होईल. :-)

अफ्रिकन सफारी "टु डू" लिस्ट मधे आहे.

प्राजु's picture

4 Oct 2008 - 8:12 pm | प्राजु

नशिबवान आहात आपण.
आपला हा अनुभव वाचताना मला डॉ. पूर्णपात्रेंच्या सोनालीची आठवण झाली..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

फटू's picture

5 Oct 2008 - 1:20 am | फटू

बिपिनदा,

नशिबवान आहेस... चक्क चित्त्याच्या ( स्वारी, चित्तिणीच्या :D ) डोक्यावरून हात फिरवला तू...

लेखही छान जमला आहे !!!

(स्वगत : बिपिनदाने तो व्हिडीओ एडिट वगैरे तर केला नसेल ना... च्यायला चक्क चित्तिणीला गोंजारतोय पठठ्या... आपली तर साला कुत्रं बाजुने गेलं तरी फाटते... :S )

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2008 - 1:25 am | बिपिन कार्यकर्ते

फाटली तर माझी पण होती भाऊ ;) .... ते थारोळं एडिट केलं आहे त्या व्हिडिओ मधून.

बिपिन.

फीर भी... कुछ पल के लियेही सही... तू चक्क वाघीणीला गोंजारलं... मान गये आपको !!!

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

टुकुल's picture

5 Oct 2008 - 1:32 am | टुकुल

बिपीनभौ घरच्या चंपी कुत्रीला कुरवाळावे तसे गोंजरताय तुम्ही..

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Oct 2008 - 3:20 am | ब्रिटिश टिंग्या

सही अनुभव!
आपली तर काय डेअरिंग नाय बॉ!
मान गये खोबार-ए-आझम! :)

(अननुभवी) टिंग्या!

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2008 - 3:47 am | बिपिन कार्यकर्ते

नशीब 'खोबार-ए-आझम' लिहिलंस, 'खोबरा-ए-आझम' लिहिलं असतंस तर माझ्या इज्जतीचं खोबरंच केलं असतंस. ;)

(अनुभवी) बिपिन.

मदनबाण's picture

5 Oct 2008 - 3:47 am | मदनबाण

व्वा ,,,जबरदस्त अनुभव..
चित्तीणीच्या डोक्यावरुन हात फिरवण्याचा थ्रिलिंग अनुभव...
पुढच्या भागाची वाट पाहतोय..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

करत आहेत बिपिन! आणि तीसुद्धा तशीच आनंदाने गोंजारून घेत आहे.

विसोबा खेचर's picture

5 Oct 2008 - 8:16 pm | विसोबा खेचर

बिपिनभावजी,

जबरा बर्र का! आहात खरे वाघाचे छावे! :)

मस्त अनुभवकथन, चित्रफितही लै भारी...

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2008 - 10:04 pm | प्रभाकर पेठकर

मस्त पण तितकाच थरारक.
त्या चित्तीणीची 'कवळी' काढून ठेवली होती का?

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2008 - 10:12 pm | बिपिन कार्यकर्ते

काका... त्या चित्तीणीची 'कवळी' काढून ठेवली होती का?

अहो त्या चित्तीणीला दोन लहान पिल्लं होती हो... अश्या तरूण वयात कवळी नसावी तिला. कवळी बहुतेक वेळा म्हातारपणी लागते ... :)

बिपिन.

(अवांतर - आता ती आज्जी मला विचारेल, कशावरुन ती पिल्लं त्या चित्तीणीचीच होती? भयंकर उठाठेवी या आज्जीला) ;)

ऋषिकेश's picture

5 Oct 2008 - 10:30 pm | ऋषिकेश

अनुभव वाचूनच विश्वास बसला होता ;) तुमी डेरिंगबाजच हाय... उगाच नाय मुलाखतीत तसले ड्वायलाग मारले व्हते तुमी ;)

-(माणसाळलेला) ऋषिकेश

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2008 - 12:05 am | बिपिन कार्यकर्ते

अरे हे डेरिंग नाही रे... तो बंडू घोटाळा करतो आयत्या वेळी नेहमी... डेरिंग असतं तर ते थारोळं कशाला एडिट करावं लागलं असतं? ;)

वाटाड्या...'s picture

7 Oct 2008 - 12:54 am | वाटाड्या...

आयला..लय भारी की राव...

आपलं एकदा असच झालेलं ..काय झाल की ग्रेडेन कुत्र्याने आमच्या अंगावर एका गाफील क्षणी (आमच्या) त्याचे पुढचे २ पाय ठेवायचा प्रयत्न केलेला आणि आम्ही चारी मुंड्या चित झालो..नुसती पिवळी...बाकी तुम्ही आफ्रिकन मंडळी काय काय कराल काही भरोसा नाही...वाघ काय, शिंव्ह काय...

स्वाती दिनेश's picture

7 Oct 2008 - 2:52 pm | स्वाती दिनेश

मस्त ,थरारक अनुभव आणि व्हिडीओ तर खासच !
बिपिन तुझ्या अनुभवामुळे माझीही आठवण ताजी झाली.खूप वर्षं झाली त्याला..पुण्याच्या सर्पोद्यानात राजा नावाचा चित्ता ठेवला होता. राजा मांजरीच्या पिलाएवढा असताना त्याला बाटलीने दूध पाजून माझ्या एका चुलतभावाने त्याला घरात वाढवला.(ते पिलू असहाय्य स्थितीत असताना त्याला एका ट्रेकमध्ये सापडले आणि त्याने ते घरी आणले.)राजा मोठा झाल्यावर घरात ठेवणे इष्ट नव्हते म्हणून मग त्याला सर्पोद्यानात नेला. एकदा आम्ही त्यांच्याकडे गेलो असता राजाला भेटायला जायची टूम निघाली. आम्ही तिथे पोहोचलो. राजा पिंजर्‍यात होता. प्रशांतला,माझ्या चुलतभावाला पाहून त्याने शेपटी हलवून आनंद व्यक्त करायला सुरूवात केली. त्याने राजाला मोकळे केले आणि आमच्याकडे घेऊन आला.आता राजा ते गोजिरं मांजर राहिल नव्हता तर पूर्ण वाढ झालेला चित्ता होता.त्याला हात तर लावायचा होता,गोंजारायचंही होतं,प्रशांत तिथे असतानाही मनात भीती होतीच. शेवटी एका हाताने प्रशांतला धरलं आणि दुसर्‍या हाताने राजाला गोंजारल.. ते संमोहन करणारे हिरवे डोळे माझ्याकडे पाहत होते.क्षण दोन क्षणातच प्रशांतचा हात मी कधी सोडून दिला ते कळलं नाही आणि मग मी दोन्ही हातानी राजाला गोंजारु लागले. त्याच्याबरोबर मग आम्ही बराच वेळ होतो. अर्थात प्रशांतला मात्र तिथून क्षणभरही बाजूला होऊ दिलं नाही..
आता पुढच्या भारत भेटीत राजाला भेटायला हवं, आता तो कुठे आहे कुणास ठाउक?प्रशांतला मेल करायला हवी..
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2008 - 3:00 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त... आता परत भेटलीस राजाला की मस्त फोटो वगैरे काढ त्याचे. बाय द वे, ते हिरवे डोळे काय मस्त असतात ना?

बिपिन.

लिखाळ's picture

14 Oct 2008 - 9:15 pm | लिखाळ

बिपीन,
लेख उत्तम. अनुभव खरेच थरारक आहे. स्वातीताईच्या अनुभवाबद्दल सुद्धा वाचायला आवडेल.
पेशवेपार्कात एका वाघाला पिंजर्‍याच्या बाहेरुन हात लावायची संधी तेथल्या एका प्राण्यांच्या डॉक्टरांमुळे मिळाली होती त्याची आठवण झाली.
--लिखाळ.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Aug 2010 - 5:14 pm | घाशीराम कोतवाल १.२

पुण्याच्या सर्पोद्यानात राजा नावाचा चित्ता ठेवला होता.
एक शंका माझ्या माहिती प्रमाणे भारतात शेवटचा चित्ता १९५४ साली मध्यप्रदेशात मारला गेला
आता भारतात चित्तेच अस्तित्वात नाहीत तर मग तुमच्या भावाला चित्ता कसा सापडला ट्रेक मधे तो बिबट्या असावा

राग मानु नका

स्वाती दिनेश's picture

17 Aug 2010 - 5:19 pm | स्वाती दिनेश

बिबट्या असेल. त्याच्या अंगावर ठिपके होते खरे..
पण तो एक वेगळाच थरारक अनुभव होता हे मात्र खरे..
स्वाती

अनिल हटेला's picture

7 Oct 2008 - 3:22 pm | अनिल हटेला

ह्याला म्हणतात वाघाची छाती !!

मस्त च रे बिपीन भो !!!

(आम्ही कुत्रा - मांजर , बैल, गाढव , घोडा इ .इ. प्राण्यांना हात लावुनच स्वत: ला सरदार समजुन घेतो ....)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2008 - 10:22 pm | प्रभाकर पेठकर

हिंस्त्र श्वापदांचा १०० टक्के भरवसा देता येत नाही.
सर्कशीतील जनावरांना सांभाळणार्‍या एका पालक कर्मचार्‍याचे आयुष्यभरातल्या अनुभवाचे बोल असे आहेत की, 'कितीही माणसाळवला तरी हिंस्त्र प्राणी कधीही हल्ला करू शकतो.'
कित्येक हत्ती आपल्या वर्षानुवर्षाच्या माहुताला आपल्या पायाखाली मारून टाकतात असेही एक निरिक्षण आहे.
कृपया काळजी घ्यावी.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2008 - 11:54 pm | बिपिन कार्यकर्ते

मागे दामू धोत्रे यांचे 'वाघ सिंह माझे सखे सोबती' हे पुस्तक वाचेल होते. त्यांचे पण हेच म्हणणे आहे.

बिपिन.

शुभान्गी's picture

11 Oct 2008 - 9:01 am | शुभान्गी

बिपिन मानले तुंम्हाला....... मस्त...... आणी हो कॅनडा ला आमच्या घराजवळ अफ्रिकन लायन सफार्री आहे...... तेव्ह केव्हा येत ते कळ्वा.......

मस्तच डेरिंग केलंय तुम्ही! मलाही आवडेल हात लावायला चित्त्याला. अजून संधी आली नाहीये!
(प्रकाश आमट्यांच्या प्राणी संग्रहाची आठवण झाली).

चतुरंग

विनायक प्रभू's picture

11 Oct 2008 - 11:53 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
छान विडियो.
आता कोणालाही हात लाउ शकता.

भडकमकर मास्तर's picture

14 Oct 2008 - 2:33 am | भडकमकर मास्तर

लै भारी अनुभव आहे ...
.... मस्तच
....
स्वगत : तात्या बरोबर मामलेदाराची मिसळ खाणारा इसम आणि या चित्रफितीमध्ये चित्तीणीचे चित्त हरण करू पाहणारा इसम यांच्या बांधा, चेहरेपट्टी यात पुष्कळ साम्य असून हे दोन्ही इसम एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2008 - 10:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वगत : तात्या बरोबर मामलेदाराची मिसळ खाणारा इसम आणि या चित्रफितीमध्ये चित्तीणीचे चित्त हरण करू पाहणारा इसम यांच्या बांधा, चेहरेपट्टी यात पुष्कळ साम्य असून हे दोन्ही इसम एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.....

फोटोशॉप विसरलात की काय मास्तर? ;-)
झालंच तर सगळे हिंदी पिक्चर ज्यात बॅडी लोकं मुखवटे चढवून हिरो असल्याचं भासवतात ....

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2008 - 8:53 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर तो मीच आहे हो. १००%. :)

बिपिन.

अवांतरः मुलींवर विश्वास ठेवू नका. मुली किती डँबिस असतात ते कळेलच आता तुम्हाला. ;)

ऋचा's picture

14 Oct 2008 - 9:49 am | ऋचा

जब्राट अनुभव!!!
सही लिहिल आहेस.
आणि व्हिडीओ पण लै भारी...

(पण तो व्हिडीओतला तुच आहेस कश्यावरुन??? :? )

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2008 - 8:46 pm | बिपिन कार्यकर्ते

(पण तो व्हिडीओतला तुच आहेस कश्यावरुन??? )

काही विक्षिप्त लोकांना हा प्रश्न पडला तर समजू शकतो. पण तू सुध्दा? देवा, काय दिवस आले आहेत? कलियुग रे बाबा, कलियुग.

;)

बिपिन.

धमाल मुलगा's picture

14 Oct 2008 - 11:16 am | धमाल मुलगा

ह्याला अनुभव म्हणायचं का गंमत?

डायरेक्ट चित्त्याच्या पिंजर्‍यात शिरुन तो म्हणजे घरची मनीमाऊ असल्यासारखं कुरवाळायचं? तेही त्याच्या जेवणाच्या वेळी???
भले बहाद्दर!

ओ शेठ, पुढच्या भारतभेटीला माझ्यासाठी एक चित्त्याचं/बिबट्याचं पिल्लु आणता का गिफ्ट म्हणुन? घरी मांजराऐवजी तेच पाळेन म्हणतो ;)

(स्वगतः हा प्रकार पाहिल्यापासून आमच्या वहिनी, बिपीनभाऊला मांजराच्या पिल्लापाशीसुध्दा जाऊ देत असतील की नाही शंकाच आहे!)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2008 - 8:41 pm | बिपिन कार्यकर्ते

ओ शेठ, पुढच्या भारतभेटीला माझ्यासाठी एक चित्त्याचं/बिबट्याचं पिल्लु आणता का गिफ्ट म्हणुन? घरी मांजराऐवजी तेच पाळेन म्हणतो

धम्या लेका, चित्ता आणा / बिबट्या आणा म्हणून उड्या नको मारूस जास्त. ३-४ महिन्यांपासून तुझं कोकरू झाल्याचं ऐकतो आहे. तो चित्ता पहिला तुलाच खाऊन टाकेल. सांभाळ हो...

बिपिन.

सुनील's picture

14 Oct 2008 - 12:59 pm | सुनील

अनुभव जबराच! अजून असले अनुभव येउद्यात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.