मागील दुवा
तेरी मेरी कहानी........ दो नैनो की http://misalpav.com/node/25088
ए सांग ना काय म्हणत होतीस.
शी बाई .... मी विसरले
विसरलीस........ कसे शक्य आहे.
मी काय काही विसरु नये का कधी.
हो ना मला आठवतंय.. कितीदातरी भाजीत मीठ विसरायचीस. एकदा चहात साखर टाकल्याचे विसरलीस म्हणून पुन्हा एकदा आणखीन साखर टाकलीस. असे तीन वेळा विसरलीस. एका कपात आठ चमचे साखर घातलेला चहा प्यायलोय मी.
हो ते लक्षात आहे........ माझ्या पेक्षा तुझी स्मरण शक्ती चांगली आहे.
हो ना तु काहीतरी साम्गणार होतीस ते लक्षात आहे माझ्या.
हम्म्म.
हम्म्म काय. सांग ना काय सांगणार होतीस ते. आठवल का तुला?
हो.
मग सांग ना.
तु हसशील मला.
नाही हसत.
बघ नक्की हसायचे नाही.
नाही अगदी सरदारजीचा जोक असला तरी हसणार नाही.
नक्की
हो नक्की
घे शपथ.... माझ्या गळ्या शप्पथ. नकोच तुला तसे करायला साम्गितले की तु चिमटा घेतोस.
नाही घेणार.
जाउ देत नकोच शप्पथ.
अगं पण काय सांगणार होतीस ते तरी सांग ना?
हसणार नाहीस??
नाही
खरं...
हो. जाउदेत इतके सगले करण्यापेक्षा तु काय ते सांगुच नको ना मला.
ए चिडलास का?
ना.........ही.
तु चिडलास ना की कसा मस्त दिसतोस.....
कसा .....
सांगु...... तु चिडलास की तुझे डोळे तुझ्यापेक्षा जास्त बोलतात. नजर सरळ्ळ नाकासमोर असते. गाल घट्ट फुग्यासारखे.
अगदी एखाद्या लहान मुलाने गाल फुगवावे तसे. बाजुने पाहीले तर तुझे डोळे एकदम टप्पोरे पाणीदार दिसतात. एक वेगळेच तेज चमकते.
अन आनंदी असताना.?
आनंदी असताना...माझे लक्ष नसते.
तुझे डोळे कसे दिसतात.... सांगु मी
नको.......
का?
ते तू माझ्या डोळ्यात निरखत तु सांगत असतोस. मग मला कससंच होतं
ओक्के. न बघता सांगतो.
सांग..
पलकों पर ना रखो हमे. आखों की गहराई मी उतरने दो
किनारेसे गहराइ का अंदाजा नही आता है.......
हे काही माझ्या डोळ्यांचे वर्णन नाही झालं.
खरं सांगु.डोळ्यात बघताना मी मलाच विसरतो. तुला जेम्व्हा पहिल्यांदा पाहीले होते ना. तेंव्हा मला तुझे डोळेच जास्त भावले होते. एखाद्या सुंदर फोटोफ्रेमला असावी तशी मस्त काजळाची किनार. अन त्यात चमकणारे तुझे टप्पोरे डोळे. मी कवी नाही. असतो तर तुझ्या डोळ्यांवर एक कविता केली असती.
आत्ता कर ना....
काय?
कविता !
मला नाही जमत मी आपला साधा गद्य मनुष्य. मला कविता कशी येणार.
लोक कशी करतात कविता....
मेरे नैना सावन भादो.... किंवा मग नैना बरसे रीमझीम.....
डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे.....
मला एक शंका आहे.
शंकासूर आहेस नुसता. गाण्यात कसली आली रे शंका....
विचारु?
विचार.
बघ हां चिडायचे नाही.
नाही चिडत
नक्की
अरे तुझ्या गळ्या शप्पथ.
नको तू शपथ घेताना मला चिमटा काढशील.
गप्प बैस..मी म्हणजे काही तु नव्हेस. विचारायचे असेल तर पटकन विचार.
नक्की.
हो हो हो नक्क्क्क्क्क्क्क्क्की.
चिडणार नाहीस...
नाही. पन आता जर तु विचारले नाहीस ना तर नक्की चिडेन
ओक्के ओक्के विचारतो.
हं
एक सांग एखादी मुलगी चकणी असेल तर तिच्या डोळ्यातल्या भावनांचे गीत कसे वाचायचे.
सोप्पे आहे . एका डोळ्यात पहीले पान वाचायचे .दुसर्या डोळ्यात दुसरे पान.......
हम अभी आते है एक कमर्शीयल ब्रेक के बाद
ए नजदीकीयां ...क्लोज अप ए सहारे......
दादखाज खुजली का लोशन
सपट लोशन .....सपट लोशन
प्रतिक्रिया
29 Jan 2014 - 9:05 am | आनन्दिता
काय वो हे विजुभौ.. मला वाटलं आता एक झकास रोमँटीक वैग्रे प्रकार वाचायला मिळणार तर मधेच हे चकणी मुलगी, सपट मलम कुठुन उपटलं कल्लाच नै.... =))
खाडकन स्वप्नातुन जागीच!!!
29 Jan 2014 - 10:11 am | खटपट्या
धमाल मुलगा - Tue, 02/07/2013 - 07:44
जरा कुटं लवशीन येतो नं येतो, त्यो पघाय आमी आवरुन सावरुन बसतो नं बसतो तं बचदिशी आलाच का तुमच्या झैरातींचा झांगडगुत्ता? मायला....आग लागली त्या व्हिक्साला....आन त्या घडीला हुबा जाळला ऊसाच्या बांधांव. म्होरचा यपिसोड टाका लौकर.
29 Jan 2014 - 10:24 am | विटेकर
अहो जुनीच ष्टाईल आहे .. जरा रंगात आले की दोन गुलाब किंवा दोन बदके गळ्यात गळे घालतात असे दाखवायचे ! जल्ला मेलं लक्शन !
रच्याकने..
टंकणीत गंमत आहे तुमच्या , रोमॅन्टीक अंगाने ( कथेच्या हो ) अधिक छान नक्की फुलवता आले असते ! उगा तुम्ही इनोद केला.
29 Jan 2014 - 10:37 am | विटेकर
तुझ्या चकण्या डोळयात वाचताना माझी फजिती होते
एकावरुन दुसर्या डोळ्यात जातना अंमळ गंमत होते
नजर माझी भिर-भिरते डोळ्यातून डोळ्याकडे
अर्थ समजून घे तू ह्रद्याकडून ह्रद्याकडे
तुझी आई पण अशीच, विचारीन तुझ्या बाबांना
दमछाक झाली का हो इकडून तिकडे धावताना
पण खरे सांगू सखे , आहे काय त्या डोळ्यात
मी तर थेट पाहतो तुझ्या झंकारणार्या ह्रद्यात
असेन मी टरका आणि तू थोडीशी चकणी
म्ह्णून काय झाले जोडी आपलीच देखणी !
29 Jan 2014 - 11:01 am | प्रमोद देर्देकर
काही मजा नाही आली.
31 Jan 2014 - 7:45 pm | पैसा
रोम्यांटिक वाचताना मधेच यक्दम कथेला जमिनीवर आदळंत की! टीव्हीवरचे शिणेमे बघताना हाच्च वैताग असतोय!
9 Feb 2014 - 9:03 pm | विजुभाऊ
पैसा तै मला तेच फीलिंग अभिप्रेत होते.
एनी वे ही श्टोरी झैरातींचा व्यत्यय न आणता लिहीन देतो. प्रॉमिस्स्स