आत्ता थोड्या वेळापुर्वी श्री जैक डेनियलचा व्यनि आला की मी आज आणि उद्या ठाण्यात आहे.आणि उद्या संध्याकाळी माझे परतीचे विमान आहे त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उद्या दुपारी तीन वाजता ठाणे तलाव पाळीवर साइकृपा हॉटेल मध्ये जमण्याचे ठरत आहे.श्री मुक्त विहारी येत आहेत. सर्व मिपाकराना हार्दिक आमंत्रण आहे.
हॉटेल श्री जैक डेनियल यांच्या सोयीने ठरविले आहे. हे ठाणे रेल्वे स्थानकपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे आणि जवळच्या खुणा म्हणजे डॉक्टर नितीन चौबल यांचे ठाणे अल्ट्रासाउंड सेंटर.याच्या जरासे पुढे(स्टेशन पासून आल्यास) किंवा गडकरी रंगायतन च्या अगोदर एच डी एफ सी बॅंकेच्या अगोदर.
सर्व मिपा करांचे स्वागत आहे.
प्रतिक्रिया
13 Jan 2014 - 6:40 pm | मुक्त विहारि
मी नक्की येत आहे.
13 Jan 2014 - 6:50 pm | शिद
कट्ट्यास आमच्या शुभेच्छा... :)
खुमासदार कट्टा वर्णन आणि फोटो हवेत ही नम्र विनंती.
13 Jan 2014 - 6:53 pm | टवाळ कार्टा
म्हैलांसाठी सोयीची खुण...बाजुलाच मोठ्ठे दागिन्यांचे दुकान आहे...(बहुतेक वामन हरी पेठे)
13 Jan 2014 - 8:22 pm | भाते
अरे बापरे! चक्क 'म्हैलांसाठी' असा शब्दप्रयोग? किमान बालिका/युवती/कन्यका असे सोज्वळ शब्द वापरायचे होते.
बाकी, अनाहिता कट्टयाला झाडुन हजेरी लावणाऱ्या यापैकी कोणी ऊद्याच्या कट्टयाला येतील का?
चला पळा, संमं किंवा यांच्या कडुन निषेध येण्याअगोदर पळा ईथुन.
13 Jan 2014 - 8:29 pm | सूड
>>अनाहिता कट्टयाला झाडुन हजेरी लावणाऱ्या यापैकी कोणी ऊद्याच्या कट्टयाला येतील का?
उद्या संक्रांत आहे. आंतरजालीय हडळीकुंकू आय मीन हळदीकुंकू असेल.
14 Jan 2014 - 12:55 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
13 Jan 2014 - 10:25 pm | अजया
आज अचानक कट्टा ठरें
मधल्या दिवशी,मधल्या वेळी
असता कामे भरपूर इकडे!
14 Jan 2014 - 10:11 am | सुबोध खरे
अहो ताई
चांगला सुटीचा दिवस पाहून कट्टा ठरवला आहे. बघा आणि जमवा. मुळात जे डी साहेबाना वेळ आहे तेवढ्यातच ठरवणे आवश्यक होते. आम्ही काय रिकामटेकडेच आहोत.
14 Jan 2014 - 10:31 am | अजया
:)
13 Jan 2014 - 6:54 pm | आदूबाळ
कट्ट्यास शुभेच्छा!
श्री जॅक डॅनियल्स हे जॅक डॅनियल्स लिहिलेला काळा टीशर्ट घालून येणार यावर आपली पैज!
13 Jan 2014 - 6:57 pm | शैलेन्द्र
कट्ट्यास शुभेच्छा.. जमल्यास नक्की जमवू :)
13 Jan 2014 - 7:06 pm | पद्मश्री चित्रे
पेठे नाही राजावन्त ज्वेलर्स
13 Jan 2014 - 7:08 pm | मुक्त विहारि
धन्यवाद.
13 Jan 2014 - 7:14 pm | जेपी
शुभेच्छा .
व्रुत्तांत आणी फोटो एक साथ येऊ द्या .
13 Jan 2014 - 7:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र वृत्तांताची वाट पाहत आहे.
13 Jan 2014 - 7:49 pm | मन१
तुम्ही सगळे दुष्ट आहात.
मला इथल्या बर्याच मंडळिंना भेटायची इच्छा आहे.
प्रामुख्याने डॉ खरे, इस्पिकचा एक्का, जे डी....
ह्यांचे अलिकडल्या कालातले, मागच्या वर्षभरातले लेख आवडलेले आहेत म्हणून भेटण्याविषयी कुतूहल आहे.
इतरही मिपाकरांना अर्थातच भेटू इच्छितो; पण प्रत्येकाचा नामोल्लेख करणे शक्य नाही.
13 Jan 2014 - 7:55 pm | सूड
शुभेच्छा!! वृत्तांताची वाट पाहात आहे.
13 Jan 2014 - 7:56 pm | कपिलमुनी
जेडी हळूच एखादा सापाचा पिल्लू सोडायचा :)
13 Jan 2014 - 9:17 pm | आनन्दिता
याला कट्टेकर्यांच्या पायात साप सोडणे असं म्हणावं काय...?.:)
13 Jan 2014 - 8:04 pm | भाते
आधी ठरल्याप्रमाणे डॉ. सुबोध खरे यांनी आपल्या पाकिटाला अजिबात हात लाऊ नये.
जमल्यास कटयाला येण्याचा नक्की प्रयत्न करेन.
जाताजाता…
कटयाचा वृत्तांत लिहायला आणि अर्थातच कटयालासुध्दा आपले लाडके विमेकाका येणार आहेत ना?
कटयाला विमेकाकांची ऊपस्थिती गृहित धरलेली आहे हेवेसानलं.
13 Jan 2014 - 8:12 pm | अत्रन्गि पाउस
ठाण्यात कट्टा आणि आम्ही पुण्यात नेमके उद्याच!!
असो...कट्ट्याला शुभेच्छा !!!
13 Jan 2014 - 8:27 pm | प्रभाकर पेठकर
ठाणे कट्टयास शुभेच्छा...
मार्चच्या तिसर्या आठवड्यात मी येतो आहे. एखादा कट्टा मुंबईत आणि एक पुण्यात करूया.
13 Jan 2014 - 9:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आज रात्रीचा बेत ठरल्यास नक्की जमवले असते. उद्या हापिस आहे.
उद्या सकाळी पण चालले असते. हापिस ला उशिरा जाता येते. मधूनच जाणे कठीण आहे.
13 Jan 2014 - 10:29 pm | खटपट्या
जगप्रसिद्ध मामलेदार मिसळ जवळच मिळते. जमल्यास ताव मारा.
बाकी माझ्या शहरात कट्टा होतोय आणि मी नाही याचे अतीव दु:ख होतंय.
14 Jan 2014 - 12:37 am | बर्फाळलांडगा
.....
14 Jan 2014 - 6:45 am | राजेश घासकडवी
आत्ता भारतात असूनही जॅक डॅनियल्स यांना भेटता येणार नाही याची तीव्र खंत वाटते.
14 Jan 2014 - 10:06 am | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही भारतात आहात ????
14 Jan 2014 - 9:07 am | मदनबाण
मी येण्याचा प्रयत्न करतो...
खरे साहेब आपणास व्यनी पाठवला आहे.
14 Jan 2014 - 10:29 am | माझीही शॅम्पेन
किती वाजता चालू करणार आणि कितला संपणार ?
ठाण्यातच हमाली करत असल्याने शेवटी शेवटी हजेरी लावू शकतो !!!
14 Jan 2014 - 10:50 am | सुबोध खरे
तीन वाजता बरोबर चालू आणि कितीही वेळ(संपेपर्यंत किंवा हॉटेल वाले हाकले पर्यंत) मला फोन करा ९८१९१७००४९
14 Jan 2014 - 11:11 am | प्रमोद देर्देकर
वॉव मस्त सगळी दिग्गज मंडळी येत आहेत तर?
या थोरांचे दर्शन/आशिर्वाद घ्यायलाच हवे. खरे साहेब मी तुम्हाला व्हॉट्स अप वर संदेश पाठवला आहे जमणार नाही म्हणुन. पण तुम्ही जर रात्री पर्यंत थांबणार असाल तर मी सं. ७ वाजे. पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्न करतो. धन्स
14 Jan 2014 - 2:07 pm | माझीही शॅम्पेन
धागा घाई घाईत वाचला ,
आज सुट्टी नसल्याने 3 वा शक्य नाही क्षमस्व:
14 Jan 2014 - 10:55 am | विटेकर
जे डी साहेब , डॉ़क्टर अशी दिग्गज मंडळी जमणार .. वा वा आनंद आहे ,,,
शुभेच्छा !
14 Jan 2014 - 12:38 pm | खटपट्या
फोटो सहित वृतांत टाका म्हणजे झालं
14 Jan 2014 - 3:51 pm | स्वाती दिनेश
आमच्या ठाण्यातल्या तळ्यावरच्या कट्ट्याला शुभेच्छा!
स्वाती
15 Jan 2014 - 8:13 pm | सुबोध खरे
भटक्या खेड्वाला आणि मु वि
16 Jan 2014 - 12:48 pm | आदूबाळ
तुम्ही भाऊ भाऊ का हो?
लहानपणी जत्रेत गेला होता का? ;)
16 Jan 2014 - 1:17 pm | प्यारे१
+११११
नंदन म्हणतो तसा वृत्तांत येऊ द्या.
15 Jan 2014 - 8:15 pm | सुबोध खरे
भाते आणि मदनबाण
15 Jan 2014 - 8:17 pm | सूड
बाण आणि भात्याचा एकत्र फोटो काढायची कल्पकता आवडली. ;)
15 Jan 2014 - 8:33 pm | पैसा
मस्त!
15 Jan 2014 - 8:33 pm | सुबोध खरे
जे डी आणि मी
16 Jan 2014 - 2:57 pm | विटेकर
जे डी "एक्झा़क्ट्ली"" जे डी सारखे दिसतायत. डो, मात्र अपेक्षेपेक्षा बारीक आणि तरुण दिसताहेत ..!
15 Jan 2014 - 8:35 pm | सुबोध खरे
15 Jan 2014 - 8:36 pm | सुबोध खरे
क्या बात है
15 Jan 2014 - 8:37 pm | सुबोध खरे
15 Jan 2014 - 8:39 pm | सुबोध खरे
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला
15 Jan 2014 - 8:44 pm | सुबोध खरे
अजया आणि जे डी
अजया ताईना मानलं. एवढ्या कमी वेळात रसायनी वरून त्या आल्या.हैटस ऑफ
15 Jan 2014 - 8:45 pm | सुबोध खरे
जळजळ होत आहे का?
15 Jan 2014 - 8:46 pm | सुबोध खरे
आणि आता ?
15 Jan 2014 - 9:34 pm | भ ट क्या खे ड वा ला
मुवि मुळे कट्टा आहे ते समजले आणि जे डी ,डॉक्टर खरे येणार म्हटल्यावर जाणे भागच होते.
धन्यवाद मिपा परिवाराला
एकंदर मुविना मी भ ट क वा य चे आणि मुविनि मला क ट्ट वा य चे योग आहेत
15 Jan 2014 - 10:00 pm | आदूबाळ
वृत्तांत कधी?
15 Jan 2014 - 10:13 pm | खटपट्या
एवढेच लोक्स आले होते का ?
15 Jan 2014 - 10:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे
परत फक्त फोटो???
16 Jan 2014 - 2:37 pm | भाते
विमेकाका,
बघितलंत, कट्टयाला तुम्ही ऊपस्थित नसल्याने तुमच्या जागी वृत्तांत लिहायला कोणीच पुढाकार घेत नाही आहे.
मुविकाका,
आता तुम्हीच लिहा कट्टयाचा वृत्तांत.
15 Jan 2014 - 10:17 pm | अजया
़कट्ट्यातले ७५% आमचे माहेरवासी डोंबिवलीकर असल्याने, एक कट्टा तो इनके साथ बनता था!!
15 Jan 2014 - 10:57 pm | पैसा
अनाहितांचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल धन्यवाद!
16 Jan 2014 - 9:06 am | टवाळ कार्टा
मिपाची फुटीरतावादी चळवळ???
16 Jan 2014 - 9:15 am | पैसा
कोणी गेली नाही तरी तसं बोलतात, गेली तर असं. अवघडे ब्वॉ तुम्ही मिपाकरांचं! ;)
16 Jan 2014 - 9:57 am | टवाळ कार्टा
मी याबद्दल प्रतिसाद दिला...बाकी तुम्ही चलाख आहात....;)
16 Jan 2014 - 12:11 pm | बर्फाळलांडगा
प्रतिसाद उडाय्चा अन लेखन श्रम वाया जायचे म्हनु हात आखडता घेतला, बट आयम ग्लाड समवन ब्रोट देत अप।
फुटिरता वादी चलवल ? :))
15 Jan 2014 - 10:50 pm | शुचि
सुंदर!!!
15 Jan 2014 - 11:06 pm | बर्फाळलांडगा
सुरेख मैफल आहे बावा!
15 Jan 2014 - 11:40 pm | अर्धवटराव
जेडी ला जसं इब्लीस इमॅजीन केलं होतं तसच निघाला हा पठ्ठा. आता मला कळतय कि साप याला का चावत नाहि ते :D
15 Jan 2014 - 11:52 pm | आदूबाळ
लय बारागंड्याचं आहे ते...
16 Jan 2014 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा
:D
जे.डी. यांची जाडी अगदी सापांसारखीच आहे.. ;)
मंजे सडपात्तळ हो! =))
पळा... अता उखडले,तर चावणार आपल्याला! =))
16 Jan 2014 - 5:16 am | नंदन
वृत्तांताची वाट पाहतो.
(साईकृपाचं रिनोव्हेशन पूर्ण झालेलं दिसतंय :))
16 Jan 2014 - 12:59 pm | बॅटमॅन
=))
16 Jan 2014 - 2:34 pm | भाते
हॉटेलच्या बाहेर अजुनही कुठेही 'साईकृपा' नावाचा फलक दिसला नाही. जर हॉटेलचे योग्य ठिकाण माहित नसेल तर नवख्या माणसाला हेच साईकृपा हॉटेल आहे हे ओळखणे अजिबात जमले नसते. :)
हॉटेलबाहेर फलकाच्या जागी एक मोठी कोरी पाटी होती. त्याचा फोटो काढायचा राहिला नाहीतर तोसुद्धा टाकला असता.
16 Jan 2014 - 2:40 pm | मदनबाण
नवख्या माणसाला हेच साईकृपा हॉटेल आहे हे ओळखणे अजिबात जमले नसते
हॅहॅहॅ... अगदी ! पहिल्यांदा तिकडे आलो, मग तलावपाळीला परत एक संपूर्ण चक्कर मारली आणि मग येउन हॉटेल समोर दुचाकी उभी केली. ;)
16 Jan 2014 - 3:38 pm | भाते
अहो, धाग्याच्या सुरुवातीला पद्मश्री चित्रे यांनी राजावंत ज्वेलर्सची चांगली खुण सांगितली होती. बहुतेक त्यांना साईकृपाच्या रिनोव्हेशनची कल्पना असावी. :) तुम्ही धागा घाईघाईत वाचला होता का?
राजावंत ज्वेलर्सच्या एका बाजुला अनंत काळापासुन रिनोव्हेशनसाठीच बंद असलेले 'नमस्कार हॉटेल' आहे आणि दुसऱ्या बाजुला नाव नसलेले 'साईकृपा हॉटेल' आहे. इतर काही खास कारणांसाठी :) तलावपाळीला चक्करच मारायची होती तर किमान 'वेळ जात नव्हता म्हणुन' असे कारण द्यायचे होते.
हलकेच घ्या हो. :)
16 Jan 2014 - 4:07 pm | मदनबाण
तुम्ही धागा घाईघाईत वाचला होता का?
अत्यंत घाईत वाचला होता...
तलावपाळीला चक्करच मारायची होती तर किमान 'वेळ जात नव्हता म्हणुन' असे कारण द्यायचे होते.
ते सुद्धा होतच की... ;)
बाकी, सर्वांना लावलेल अत्तर कसे वाटले ? ते जरा सांगा की राव. ;)
16 Jan 2014 - 10:27 pm | खटपट्या
बाणा तुला साईकृपा माहित नाही ? शेम शेम ?
अरे ठाण्यातील आख्खी तरुणाई तिथेच असते/असायची
17 Jan 2014 - 3:42 pm | मदनबाण
बाणा तुला साईकृपा माहित नाही ? शेम शेम ?
हॅहॅहॅ... हे अपलं असचं हो. रंगायतनच्या बाजुला असणार्या तरण तलावात लहानपणी पोहायला यायचो. बरं माझी शाळा मो.ह.विध्यालय तलावपाळीच्या बाजुलाच आहे. त्यामुळे तो परिसर नवा नाही. ;) पण हल्ली ठाण्यात असं येण होत नाही त्यामुळे तिकडे आलो की जग बदलल्या सारखे वाटते.
अरे ठाण्यातील आख्खी तरुणाई तिथेच असते/असायची
हॅहॅहॅ...आता शाळाच तलावपाळीच्या बाजुला आहे म्हंटल्यावर "टाईमपास" बरा व्हायचा ! ;)
17 Jan 2014 - 10:34 pm | खटपट्या
अच्छा मो ह विद्यालय. आम्ही बापडे न्यू इंग्लिश स्कूल चे. हो पण फरक बराच पडलाय.
गडकरी रंगायतन चे उपहार गृह हि कट्टा करायला चांगली जागा आहे.
16 Jan 2014 - 10:38 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
16 Jan 2014 - 11:02 am | स्पा
झकास झाला कट्टा :)
17 Jan 2014 - 10:57 pm | समीरसूर
फोटो फार छान आले आहेत. मी अजून इतक्या वर्षात एकाही कट्ट्याला हजेरी लावलेली नाही. :-( बघू कधी जमतयं ते...