मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ठाणे कट्टा -अचानक

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आत्ता थोड्या वेळापुर्वी श्री जैक डेनियलचा व्यनि आला की मी आज आणि उद्या ठाण्यात आहे.आणि उद्या संध्याकाळी माझे परतीचे विमान आहे त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उद्या दुपारी तीन वाजता ठाणे तलाव पाळीवर साइकृपा हॉटेल मध्ये जमण्याचे ठरत आहे.श्री मुक्त विहारी येत आहेत. सर्व मिपाकराना हार्दिक आमंत्रण आहे. हॉटेल श्री जैक डेनियल यांच्या सोयीने ठरविले आहे. हे ठाणे रेल्वे स्थानकपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे आणि जवळच्या खुणा म्हणजे डॉक्टर नितीन चौबल यांचे ठाणे अल्ट्रासाउंड सेंटर.याच्या जरासे पुढे(स्टेशन पासून आल्यास) किंवा गडकरी रंगायतन च्या अगोदर एच डी एफ सी बॅंकेच्या अगोदर. सर्व मिपा करांचे स्वागत आहे.

वाचने 16633 वाचनखूण प्रतिक्रिया 78

शिद Mon, 01/13/2014 - 18:50
कट्ट्यास आमच्या शुभेच्छा... :) खुमासदार कट्टा वर्णन आणि फोटो हवेत ही नम्र विनंती.

In reply to by टवाळ कार्टा

भाते Mon, 01/13/2014 - 20:22
अरे बापरे! चक्क 'म्हैलांसाठी' असा शब्दप्रयोग? किमान बालिका/युवती/कन्यका असे सोज्वळ शब्द वापरायचे होते. बाकी, अनाहिता कट्टयाला झाडुन हजेरी लावणाऱ्या यापैकी कोणी ऊद्याच्या कट्टयाला येतील का? चला पळा, संमं किंवा यांच्या कडुन निषेध येण्याअगोदर पळा ईथुन.

In reply to by भाते

सूड Mon, 01/13/2014 - 20:29
>>अनाहिता कट्टयाला झाडुन हजेरी लावणाऱ्या यापैकी कोणी ऊद्याच्या कट्टयाला येतील का? उद्या संक्रांत आहे. आंतरजालीय हडळीकुंकू आय मीन हळदीकुंकू असेल.

In reply to by अजया

सुबोध खरे Tue, 01/14/2014 - 10:11
अहो ताई चांगला सुटीचा दिवस पाहून कट्टा ठरवला आहे. बघा आणि जमवा. मुळात जे डी साहेबाना वेळ आहे तेवढ्यातच ठरवणे आवश्यक होते. आम्ही काय रिकामटेकडेच आहोत.

मन१ Mon, 01/13/2014 - 19:49
तुम्ही सगळे दुष्ट आहात. मला इथल्या बर्‍याच मंडळिंना भेटायची इच्छा आहे. प्रामुख्याने डॉ खरे, इस्पिकचा एक्का, जे डी.... ह्यांचे अलिकडल्या कालातले, मागच्या वर्षभरातले लेख आवडलेले आहेत म्हणून भेटण्याविषयी कुतूहल आहे. इतरही मिपाकरांना अर्थातच भेटू इच्छितो; पण प्रत्येकाचा नामोल्लेख करणे शक्य नाही.

भाते Mon, 01/13/2014 - 20:04
आधी ठरल्याप्रमाणे डॉ. सुबोध खरे यांनी आपल्या पाकिटाला अजिबात हात लाऊ नये. जमल्यास कटयाला येण्याचा नक्की प्रयत्न करेन. जाताजाता… कटयाचा वृत्तांत लिहायला आणि अर्थातच कटयालासुध्दा आपले लाडके विमेकाका येणार आहेत ना? कटयाला विमेकाकांची ऊपस्थिती गृहित धरलेली आहे हेवेसानलं.

प्रभाकर पेठकर Mon, 01/13/2014 - 20:27
ठाणे कट्टयास शुभेच्छा... मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात मी येतो आहे. एखादा कट्टा मुंबईत आणि एक पुण्यात करूया.

आज रात्रीचा बेत ठरल्यास नक्की जमवले असते. उद्या हापिस आहे. उद्या सकाळी पण चालले असते. हापिस ला उशिरा जाता येते. मधूनच जाणे कठीण आहे.

In reply to by सुबोध खरे

वॉव मस्त सगळी दिग्गज मंडळी येत आहेत तर? या थोरांचे दर्शन/आशिर्वाद घ्यायलाच हवे. खरे साहेब मी तुम्हाला व्हॉट्स अप वर संदेश पाठवला आहे जमणार नाही म्हणुन. पण तुम्ही जर रात्री पर्यंत थांबणार असाल तर मी सं. ७ वाजे. पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्न करतो. धन्स

मुवि मुळे कट्टा आहे ते समजले आणि जे डी ,डॉक्टर खरे येणार म्हटल्यावर जाणे भागच होते. धन्यवाद मिपा परिवाराला एकंदर मुविना मी भ ट क वा य चे आणि मुविनि मला क ट्ट वा य चे योग आहेत

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

भाते गुरुवार, 01/16/2014 - 14:37
विमेकाका, बघितलंत, कट्टयाला तुम्ही ऊपस्थित नसल्याने तुमच्या जागी वृत्तांत लिहायला कोणीच पुढाकार घेत नाही आहे. मुविकाका, आता तुम्हीच लिहा कट्टयाचा वृत्तांत.

In reply to by टवाळ कार्टा

बर्फाळलांडगा गुरुवार, 01/16/2014 - 12:11
प्रतिसाद उडाय्चा अन लेखन श्रम वाया जायचे म्हनु हात आखडता घेतला, बट आयम ग्लाड समवन ब्रोट देत अप। फुटिरता वादी चलवल ? :))

अर्धवटराव Wed, 01/15/2014 - 23:40
जेडी ला जसं इब्लीस इमॅजीन केलं होतं तसच निघाला हा पठ्ठा. आता मला कळतय कि साप याला का चावत नाहि ते :D

In reply to by आदूबाळ

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/16/2014 - 00:17
:D जे.डी. यांची जाडी अगदी सापांसारखीच आहे.. ;) मंजे सडपात्तळ हो! =)) पळा... अता उखडले,तर चावणार आपल्याला! =))

नंदन गुरुवार, 01/16/2014 - 05:16
वृत्तांताची वाट पाहतो. (साईकृपाचं रिनोव्हेशन पूर्ण झालेलं दिसतंय :))

In reply to by नंदन

भाते गुरुवार, 01/16/2014 - 14:34
हॉटेलच्या बाहेर अजुनही कुठेही 'साईकृपा' नावाचा फलक दिसला नाही. जर हॉटेलचे योग्य ठिकाण माहित नसेल तर नवख्या माणसाला हेच साईकृपा हॉटेल आहे हे ओळखणे अजिबात जमले नसते. :) हॉटेलबाहेर फलकाच्या जागी एक मोठी कोरी पाटी होती. त्याचा फोटो काढायचा राहिला नाहीतर तोसुद्धा टाकला असता.

In reply to by भाते

मदनबाण गुरुवार, 01/16/2014 - 14:40
नवख्या माणसाला हेच साईकृपा हॉटेल आहे हे ओळखणे अजिबात जमले नसते हॅहॅहॅ... अगदी ! पहिल्यांदा तिकडे आलो, मग तलावपाळीला परत एक संपूर्ण चक्कर मारली आणि मग येउन हॉटेल समोर दुचाकी उभी केली. ;)

In reply to by मदनबाण

भाते गुरुवार, 01/16/2014 - 15:38
अहो, धाग्याच्या सुरुवातीला पद्मश्री चित्रे यांनी राजावंत ज्वेलर्सची चांगली खुण सांगितली होती. बहुतेक त्यांना साईकृपाच्या रिनोव्हेशनची कल्पना असावी. :) तुम्ही धागा घाईघाईत वाचला होता का? राजावंत ज्वेलर्सच्या एका बाजुला अनंत काळापासुन रिनोव्हेशनसाठीच बंद असलेले 'नमस्कार हॉटेल' आहे आणि दुसऱ्या बाजुला नाव नसलेले 'साईकृपा हॉटेल' आहे. इतर काही खास कारणांसाठी :) तलावपाळीला चक्करच मारायची होती तर किमान 'वेळ जात नव्हता म्हणुन' असे कारण द्यायचे होते. हलकेच घ्या हो. :)

In reply to by भाते

मदनबाण गुरुवार, 01/16/2014 - 16:07
तुम्ही धागा घाईघाईत वाचला होता का? अत्यंत घाईत वाचला होता... तलावपाळीला चक्करच मारायची होती तर किमान 'वेळ जात नव्हता म्हणुन' असे कारण द्यायचे होते. ते सुद्धा होतच की... ;) बाकी, सर्वांना लावलेल अत्तर कसे वाटले ? ते जरा सांगा की राव. ;)

In reply to by मदनबाण

खटपट्या गुरुवार, 01/16/2014 - 22:27
बाणा तुला साईकृपा माहित नाही ? शेम शेम ? अरे ठाण्यातील आख्खी तरुणाई तिथेच असते/असायची

In reply to by खटपट्या

मदनबाण Fri, 01/17/2014 - 15:42
बाणा तुला साईकृपा माहित नाही ? शेम शेम ? हॅहॅहॅ... हे अपलं असचं हो. रंगायतनच्या बाजुला असणार्‍या तरण तलावात लहानपणी पोहायला यायचो. बरं माझी शाळा मो.ह.विध्यालय तलावपाळीच्या बाजुलाच आहे. त्यामुळे तो परिसर नवा नाही. ;) पण हल्ली ठाण्यात असं येण होत नाही त्यामुळे तिकडे आलो की जग बदलल्या सारखे वाटते. अरे ठाण्यातील आख्खी तरुणाई तिथेच असते/असायची हॅहॅहॅ...आता शाळाच तलावपाळीच्या बाजुला आहे म्हंटल्यावर "टाईमपास" बरा व्हायचा ! ;)

In reply to by मदनबाण

खटपट्या Fri, 01/17/2014 - 22:34
अच्छा मो ह विद्यालय. आम्ही बापडे न्यू इंग्लिश स्कूल चे. हो पण फरक बराच पडलाय. गडकरी रंगायतन चे उपहार गृह हि कट्टा करायला चांगली जागा आहे.