मित्राच्या निमीत्ताने...

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
29 Sep 2008 - 11:59 am

माझ्या मैत्रीणीनी असे काही प्रश्न विचारले नाहीत.पण नंतर जवळ जवळ बारा वर्षांनी आठवण असह्य झाली तेव्हा कविता लिहून मला पाठवली.

तुझ्यामागून हिरव्या रानातून चालताना -
माझी वाट चुकली,
अन् घनगर्द अरण्यात मला माझी -
झोपडी बांधावीच लागली.

त्यानंतर किती वर्षांनी --
उन्हं माझ्या अंगणात आली,
दारच्या त्या ओंडक्यांची --
कोवळी रोपे झाली.

गर्द असे हे रान-आणि उन्हे अधीमधी,
सावलीतली ही रोपे -वाढतील का रे कधी ?
त्यात आता झोपडीचे -एक असे गाव झाले,
मनात पालवी असून -रोप बाजूला राहिले.

मनातले हिरवे रान-अणि मी झोपी जाते,
गर्द रानातली वाट-चालण्यास सोपी जाते.

१२-१२-१९९४.

कविताप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

29 Sep 2008 - 12:06 pm | मेघना भुस्कुटे

कवितांवरती प्रतिक्रिया देणं म्हणजे छळ.
पण या कवितेला दाद द्यायलाच हवी. तुमच्या मैत्रिणीला कळवा - अप्रतिम.

आनंदयात्री's picture

29 Sep 2008 - 6:48 pm | आनंदयात्री

अत्यंत सुरेख !!

बारा वर्षांनी !!!! बापरे .. सलाम !

विनायक प्रभू's picture

29 Sep 2008 - 7:04 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
उन्हे अधी मधी
आज का तुमच्या कवितानी माझा गोंधळ वाढला आहे.

अवलिया's picture

29 Sep 2008 - 7:09 pm | अवलिया

काही बोलण्यासारखे शिल्लक नाही.

मदनबाण's picture

29 Sep 2008 - 7:12 pm | मदनबाण

--

मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

रामदास's picture

29 Sep 2008 - 7:29 pm | रामदास

एक छोटं पेंटींग पण होतं.शोधून बघतो मिळतंय का ते.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

प्यारे१'s picture

29 Jul 2015 - 11:23 pm | प्यारे१

कविता वर काढतोय!
हा माणूस थोर आहे!
___/\___