कर्नाटकची राणी व्हाया हरखुन गेली कमळाबाई;मुखात मारुन मटकन बसली हिरमुसलेली कमळाबाई !पदर धरोनी हिचा जयांनी लुळा-पांगळा प्रवास केला--'ठिकाण' येताच ते म्हणाले --भरकटलेली कमळाबाईठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ?परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई !बाप-लेक ते बनेल कोल्हे काटा-छापा खेळुन गेले;साधन म्हणुनी वापरली ही --खुळी 'अधेली' कमळाबाईधर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू यापाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' !सत्ता-डोही न्हाण्याचीही ओढ जिवाला ओढत असता--कावेरीच्या पाण्याविण ही सुकली वेली कमळाबाईनिधर्मवादी मधुमेहींनी छान मतलबी पथ्य पाळले--चाटुन-चोखुन दूर लोटली ही गुळभेली कमळाबाईशिवाजी जवरेदीपनगर - ४२५ ३०७ता. भुसावळ, जि. जळगाव ( आमचे ज्येष्ठ कविमित्र शिवाजी जवरे ह्यांनी येदियुरप्पा मुख्यमंत्रिपदी आरूढ होण्यापूर्वी ही हझल लिहिली होती. मिसळपाववरील वाचकांना ती नक्कीच आवडेल, असे वाटल्यामुळे इथे देत आहे.)
प्रतिक्रिया
10 Dec 2007 - 5:07 pm | विसोबा खेचर
धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या
पाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' !
निधर्मवादी मधुमेहींनी छान मतलबी पथ्य पाळले--
चाटुन-चोखुन दूर लोटली ही गुळभेली कमळाबाई
जबरा, जोरदार, सणसणीत गझल!
वाचताना साले शब्द घुसले काळजात आरपार...!
लई भारी...
तात्या.
10 Dec 2007 - 5:19 pm | नंदन
भाष्य करणारी कविता. आवडली.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
10 Dec 2007 - 5:56 pm | धोंडोपंत
भन्नाट कविता.
चित्तरंजन,
श्री. शिवाजी जवरे यांना आमचा दंडवत सांगा.
धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या
पाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' !
हा हा हा हा हा.
आपला,
(अपवित्र) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
10 Dec 2007 - 6:47 pm | व्यंकट
आहे
10 Dec 2007 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्तरंजन सेठ
शिवाजीरावला लै भारी सुचले या कमळाबाईवर..... :)
ठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ?
परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई !
या ओळी आवडल्या !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
11 Dec 2007 - 2:44 am | सर्किट (not verified)
वा ! मझा आ गया !
- सर्किट
11 Dec 2007 - 7:43 am | सर्किट (not verified)
अरे चित्तर,
ह्या कवितेला मनोगतावर मेघनाद नावाच्या व्यक्तीने "पाचवे कडवे सोडून" असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याला काही उत्तर ?
कदाचित मनोगतावर लिहिणार्यांना पाळी अश्लील वाटत असावी.
आपल्या मुले/मुली व्हाव्या, त्याही अशा अश्लील प्रक्रियेतून, ह्याविषयी त्यांना घृणा असावी कदाचित.
???
- सर्किट
11 Dec 2007 - 4:53 pm | धोंडोपंत
सर्कीट,
कदाचित मनोगतावर लिहिणार्यांना पाळी अश्लील वाटत असावी.
प्रशासकाचं सोवळं आड आलं असेल रे !
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
11 Dec 2007 - 7:50 am | धनंजय
गंमत वाटली.
11 Dec 2007 - 9:10 am | बेसनलाडू
उत्तम गझल आहे. राजकीय परिस्थितीवरचे भाष्य गझलेतून करणे हे विशेषच म्हणावे असे आहे.
(आस्वादक)बेसनलाडू
11 Dec 2007 - 4:07 pm | विजय पाटील
खरच खुप छान आहे. पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते राजकारणाविषयी उत्तम गझल आहे.
- विजय
13 Dec 2007 - 5:53 am | मनोज
राजकरण या विषयावर येव्हडी छान कविता केली आहे.
आपलाच,
मन्या
13 Dec 2007 - 4:50 pm | गारंबीचा बापू
वा,
छान कविता. कमळाबाईबद्दल शिवाजीरावांच्या मनात फारच राग दिसतोय. तो चांगला व्यक्त झालाय.
बापू
13 Dec 2007 - 5:07 pm | माधवी गाडगीळ
शिवाजीरावांचे अभिनंदन!
-माधवी.