कमळाबाई

चित्तरंजन भट's picture
चित्तरंजन भट in जे न देखे रवी...
10 Dec 2007 - 4:27 pm

कर्नाटकची राणी व्हाया  हरखुन गेली कमळाबाई;मुखात मारुन मटकन बसली हिरमुसलेली कमळाबाई !पदर धरोनी हिचा जयांनी लुळा-पांगळा प्रवास केला--'ठिकाण' येताच ते म्हणाले --भरकटलेली कमळाबाईठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ?परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई !बाप-लेक ते बनेल कोल्हे काटा-छापा खेळुन गेले;साधन म्हणुनी वापरली ही --खुळी 'अधेली' कमळाबाईधर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू यापाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' !सत्ता-डोही न्हाण्याचीही ओढ जिवाला ओढत असता--कावेरीच्या पाण्याविण ही सुकली वेली कमळाबाईनिधर्मवादी मधुमेहींनी छान मतलबी पथ्य पाळले--चाटुन-चोखुन दूर लोटली ही गुळभेली कमळाबाईशिवाजी जवरेदीपनगर - ४२५ ३०७ता. भुसावळ, जि. जळगाव ( आमचे ज्येष्ठ कविमित्र शिवाजी जवरे ह्यांनी येदियुरप्पा मुख्यमंत्रिपदी आरूढ होण्यापूर्वी ही हझल लिहिली होती. मिसळपाववरील वाचकांना ती नक्कीच आवडेल, असे वाटल्यामुळे इथे देत आहे.)

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Dec 2007 - 5:07 pm | विसोबा खेचर

धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या
पाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' !

निधर्मवादी मधुमेहींनी छान मतलबी पथ्य पाळले--
चाटुन-चोखुन दूर लोटली ही गुळभेली कमळाबाई

जबरा, जोरदार, सणसणीत गझल!

वाचताना साले शब्द घुसले काळजात आरपार...!

लई भारी...

तात्या.

नंदन's picture

10 Dec 2007 - 5:19 pm | नंदन

भाष्य करणारी कविता. आवडली.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

धोंडोपंत's picture

10 Dec 2007 - 5:56 pm | धोंडोपंत

भन्नाट कविता.

चित्तरंजन,

श्री. शिवाजी जवरे यांना आमचा दंडवत सांगा.

धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या
पाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' !

हा हा हा हा हा.

आपला,
(अपवित्र) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

व्यंकट's picture

10 Dec 2007 - 6:47 pm | व्यंकट

आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2007 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्तरंजन सेठ

शिवाजीरावला लै भारी सुचले या कमळाबाईवर..... :)

ठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ?
परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई !

या ओळी आवडल्या !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट's picture

11 Dec 2007 - 2:44 am | सर्किट (not verified)

वा ! मझा आ गया !

- सर्किट

सर्किट's picture

11 Dec 2007 - 7:43 am | सर्किट (not verified)

अरे चित्तर,

ह्या कवितेला मनोगतावर मेघनाद नावाच्या व्यक्तीने "पाचवे कडवे सोडून" असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याला काही उत्तर ?

कदाचित मनोगतावर लिहिणार्‍यांना पाळी अश्लील वाटत असावी.

आपल्या मुले/मुली व्हाव्या, त्याही अशा अश्लील प्रक्रियेतून, ह्याविषयी त्यांना घृणा असावी कदाचित.

???

- सर्किट

धोंडोपंत's picture

11 Dec 2007 - 4:53 pm | धोंडोपंत

सर्कीट,

कदाचित मनोगतावर लिहिणार्‍यांना पाळी अश्लील वाटत असावी.

प्रशासकाचं सोवळं आड आलं असेल रे !

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धनंजय's picture

11 Dec 2007 - 7:50 am | धनंजय

गंमत वाटली.

बेसनलाडू's picture

11 Dec 2007 - 9:10 am | बेसनलाडू

उत्तम गझल आहे. राजकीय परिस्थितीवरचे भाष्य गझलेतून करणे हे विशेषच म्हणावे असे आहे.
(आस्वादक)बेसनलाडू

विजय पाटील's picture

11 Dec 2007 - 4:07 pm | विजय पाटील

खरच खुप छान आहे. पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते राजकारणाविषयी उत्तम गझल आहे.
- विजय

मनोज's picture

13 Dec 2007 - 5:53 am | मनोज

राजकरण या विषयावर येव्हडी छान कविता केली आहे.
आपलाच,
मन्या

गारंबीचा बापू's picture

13 Dec 2007 - 4:50 pm | गारंबीचा बापू

वा,

छान कविता. कमळाबाईबद्दल शिवाजीरावांच्या मनात फारच राग दिसतोय. तो चांगला व्यक्त झालाय.

बापू

माधवी गाडगीळ's picture

13 Dec 2007 - 5:07 pm | माधवी गाडगीळ

शिवाजीरावांचे अभिनंदन!

-माधवी.