सिनेमा पॅराडिसो ... इटालियन फ़िल्म... १९९० चे बेस्ट फॉरीन फ़िल्मचे ऑस्कर घेतले या फ़िल्मने...
अप्रतिम सिनेमा आहे.
जरूर बघा...
या फ़िल्मचे काही कॅप्चर्स मी काढले आहेत आणि मी स्वतः मिक्स करून काही फोटो तयार केले आहेत ते इथे डकवतोय....त्यामुळे हा धागा कलादालनात टाकला आहे ...
साल्वाटोर नावाचा इटलीतला मोठा सिनेदिग्दर्शक .....३० वर्षांनी तो गावात पुन्हा परतला आहे...
त्याच्या लहानपणाची, सिनेमा शिकण्याची, घडण्याची फ़्लॆशबॆक तंत्राने सांगितलेली ही गोष्ट आहे... हा आहे लहान टोटो...याला सिनेमाचं प्रचंड आकर्षण...
प्रोजेक्शन रूम मधून पडद्याच्या दिशेने येणारा तो प्रकाश आणि त्याकडे भारावून पाहणारा टोटो.
इटलीच्या ग्युआनकाल्डो नावाच्या छोट्या शहरात ही गोष्ट घडते...शहरातल्या मुख्य चौकातल्या एका थिएटरचे नाव आहे, सिनेमा पॆराडिसो.
या थिएटरमध्ये आल्फ़्रेडो प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम करतो आणि टोटो नेहमी त्याच्याबरोबर असतो आणि फ़िल्म्सबद्दल सतत प्रश्न विचारत राहतो आणि आल्फ़्रेडोकडून शिकत राहतो.
दुसर्या महायुद्धाच्या काळात या छोट्या गावातला प्रीस्ट सिनेमे आधी पाहून सेन्सॉर करतो आणि ते साठलेले फ़िल्मचे तुकडे टोटोला हवे आहेत.
पण अलफ़्रेडो त्याला सांगतो की तू मोठा झालास की मी तुला जरूर देईन ह्या फ़िल्म्स.
अल्फ़्रेडोची इच्छा आहे की टोटोने मोठा माणूस बनण्यासाठी रोमला जावे आणि पुन्हा गावात परत येऊ नये...
त्याची इच्छा टोटो पाळतो आणि थेट ३० वर्षांनी आल्फ़्रेडोच्या अंत्यसंस्कारासाठी गावात पोचतो.... आता थिएटर अत्यंत जुने झाले आहे आणि ते पाडणार आहेत. टोटोच्या सार्या आठवणी त्या भग्न जुन्यापुराण्या वास्तूशी निगडीत आहेत....
या दोघांच्या दोस्तीची , एका वेगळ्याच बापलेकासारख्या नात्याची ही गोष्ट...
आणि आल्फ़्रेडोने टोटोला दिलेले वचन पाळले आहे....
सिनेमाच्या शेवटी पाणावलेल्या डोळ्यांनी बालपणाच्या आठवणीत रमलेला साल्वाटोर
कोणते ते वचन? जाणून घेण्यासाठी जरूर पहा, सिनेमा पॆराडिसो.
प्रतिक्रिया
25 Sep 2008 - 3:18 pm | मेघना भुस्कुटे
मास्तर, सिनेमाबद्दल लिहा की.
25 Sep 2008 - 3:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मास्तर, चित्रं दाखवून तुम्ही आम्हाला अंमळ फसवलंतच. सिनेमाबद्दलही लिहा की!
25 Sep 2008 - 4:38 pm | भडकमकर मास्तर
सिनेमाबद्दल लिहितोच आहे, पण ही प्रकाशचित्रे कशी आहेत ते तरी बघा.. :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
25 Sep 2008 - 6:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> पण ही प्रकाशचित्रे कशी आहेत ते तरी बघा..
अर्थात ए वन! तुमच्या फोटोशॉप-स्किल्सबद्दल अजिबात शंकाच नाही!
25 Sep 2008 - 4:14 pm | लिखाळ
अरे वा ! मास्तर !
चित्रपटाची ओळख छानच करुन दिलीत. चित्रपट मिळवून पाहायचा प्रयत्न करीन.
--लिखाळ.
25 Sep 2008 - 6:15 pm | विसोबा खेचर
संपूर्ण चित्रमय सफर
के व ळ अ प्र तीम....!
अन्य शब्द नाहीत. मास्तर जियो...!
तात्या.
25 Sep 2008 - 6:18 pm | स्वाती दिनेश
मास्तर,चित्रं आवडली आणि सिनेमाची ओळख झाली,आता हा सिनेमा मिळवून पहायला हवाच.
लिखाळा,मिळवलास इतक्यात तर फ्राफुला घेऊन ये रे..एकदम पाहू..
स्वाती
25 Sep 2008 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रमय सफर आवडली.
25 Sep 2008 - 10:49 pm | सर्किट (not verified)
सिनेमाच्या शेवटी पाणावलेल्या डोळ्यांनी बालपणाच्या आठवणीत रमलेला साल्वाटोर
हे चित्र अल्टिमेट !!!!!!
याची इच्छा टोटो पाळतो आणि थेट ३० वर्षांनी आल्फ़्रेडोच्या अंत्यसंस्कारासाठी गावात पोचतो
हेच का ते वचन ? आता खरेच हा चित्रपट पाहावा लागणार.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
26 Sep 2008 - 12:00 am | भडकमकर मास्तर
हेच का ते वचन ? आता खरेच हा चित्रपट पाहावा लागणार.
जरूर बघा सिनेमा...
जे लगेच पाहणार नाहीयेत सिनेमा, त्यांच्यासाठी स्पॉइलर ऍलर्ट टाकून पूर्ण ष्टोरी लिहू का थोडं थांबू काही कळत नाहीये... :?
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
26 Sep 2008 - 10:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
लिहा आधीच ... माझ्यासारख्या लोकांनी पिच्चर पहाण्याची वाट बघायची म्हटलं तर दोनेक वर्ष थांबावं लागेल.
26 Sep 2008 - 1:11 pm | llपुण्याचे पेशवेll
मला तर संपूर्ण सिनेमाची स्टोरी व्य . नि. ने पाठवलीत तरी चालेल. :) तसेही हल्ली नाटक सिनेमा बघायला वेळ मिळतोच कुठे. हा पण स्टोरी त्यातल्या गर्भितार्थासकट पाठवा. (नाहीतर आधीच सिनेमे कळायची बोंब आहे)
पुण्याचे पेशवे
25 Sep 2008 - 11:15 pm | घाटावरचे भट
प्रकाशिचित्रे भारीच....सिनेमा पण पाहायलाच हवा!!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
26 Sep 2008 - 12:36 am | भास्कर केन्डे
मास्तर, छान संकलन तसेच प्रदर्शन!
आजा नचले या चित्रपटावरुन घेतला की हा आजा नचले वरुन. अर्थात बॉलिवूडला चोरीची जास्त सवय असल्याने शक आजा नचले वरच जास्त आहे.
26 Sep 2008 - 12:40 am | भडकमकर मास्तर
नहीं sssssssssssssssssssssssssssssssssssssssss
मी अगदी ढोबळ ष्टोरी लिहिली आहे म्हणून वाटत असेल तसं.... पण तसे काहीही नाही... काय संबंध नाय...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
26 Sep 2008 - 1:05 am | भडकमकर मास्तर
चळवळ्या,उद्योगी टोटो
प्रोजेक्टरमध्ये फ़िल्म कशी चढवावी ते शिकणारा टोटो
शाळेत परीक्षेच्या वेळी आल्फ्रेडोला काही येत नाही, हे पाहून हसणारा टोटो
"तू मला प्रोजेक्शन रूम मध्ये येऊ दिलंस तर तुला मदत करेन... " ... सौदा
"यह मेरा एरिआ है".... :)
"अबे शाणे मैं इधरका बॉस हूं"
दोस्ती
काउंटडाउन सुरू...
पॅराडिसो कोसळताना
पॅराडिसो स्वत:च्या डोळ्यांसमोर उध्वस्त होताना पाहणारा साल्वाटोर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
26 Sep 2008 - 2:50 am | लिखाळ
मास्तर,
चित्रे फार उत्तम तयार केली आहेत.
पहिल्या प्रतिसादाच्यावेळी लिहायचे राहिले. हा नवा हप्ता तर लाजवाब आहे.
--लिखाळ.
26 Sep 2008 - 6:33 am | मुक्तसुनीत
शब्दांवाचून कळले सारे , शब्दांच्या पलिकडले. स्पॉइलर अलर्ट कसला देताय, चित्रपटाचा आत्मा गवसला आहे या चार तुकड्यांमधे , मास्तर :-)
साधु ! साधु ! :-)
26 Sep 2008 - 7:16 am | शितल
फोटो पाहुन सिनेमा पॅराडिसो पाहण्याचे पक्के केले आहे.
:)
सुंदर फोटोची मेजवानी तुमच्यामुळे आम्हाला मिळाली.
धन्यवाद !
:)
26 Sep 2008 - 10:45 am | मनिष
अशक्य गोड आहे!!! येऊ देत स्टोरी! मी बघतो डीव्हीडी मिळते का ह्याची!
(अवांतर - ह्याच नावाची कोरेगाव पार्क मधे एक छान डीव्हीडी लायब्ररी आहे!)
26 Sep 2008 - 1:43 pm | भडकमकर मास्तर
http://www.dailyscript.com/scripts/cinema_paradiso.html
ही आहे सिनेमा पॅराडिसोच्या संपूर्ण शूटिंग स्क्रिप्टची लिन्क....इच्छुकांनी लाभ घ्यावा... :)
स्क्रिप्ट वाचायची सवय नसेल तर सुरुवातीला कदाचित कंटाळा येइल थोडासा पण एक मस्त अनुभव आहे हा ... निवांत वाचा... :)
...
माझ्याकडे जी डीव्हीडी आहे, त्यात शेवटचे बरेचसे प्रसंग, संवाद नाहीत...
त्यामुळे सिनेमा पाहिल्यानंतरसुद्धा एकदा स्क्रीनप्लेकडे नजर टाकायला हरकत नाही...
हा स्क्रीनप्ले एफ टी आय आय मध्ये किंवा इतर फिल्मरायटिंग शिक्षण देणार्या संस्थांमध्ये अभ्यासक्रमात असतो म्हणे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
26 Sep 2008 - 1:06 pm | विसुनाना
आपले चित्रसंकलन प्रचंड आवडले.
पॅराडिसो पहायलाच हवा...
26 Sep 2008 - 1:26 pm | गणा मास्तर
सिनेमाच्या शेवटी पाणावलेल्या डोळ्यांनी बालपणाच्या आठवणीत रमलेला साल्वाटोर
हा फोटो अगदी अप्रतिम आहे मालक.
पिच्चर जालावर कुठे मिळेल का?
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
26 Sep 2008 - 5:32 pm | झकासराव
तुम्ही बनवलेली चित्रे मस्त आहेत.
दुसरा हप्ता खास आहे :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
26 Sep 2008 - 8:45 pm | नंदन
प्रकाशचित्रे आणि वर्णन आवडले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी