पं. रत्नाकर पईंची गुरूपौर्णिमा

मोहन's picture
मोहन in कलादालन
24 Sep 2008 - 5:32 pm

गेल्या रविवारी पईबुवा मस्त गायले. ८२ वर्षे वय जाणवले नाही. बसंत, परज व डागोरी. २५ -३० मि. मजा आला. मला वाटते जयपूर घराण्याचे ते आता 'लास्ट ऑफ द रोमन्स' असावेत. मिपाच्या कलादालनात शास्त्रिय संगीतप्रेमीं साठी हे छायाचीत्र . (आय्.आय.टी. पवई , २१ सप्टे. २००८).


- मोहन

कलासंगीत

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

24 Sep 2008 - 6:52 pm | अमोल केळकर

मोहन साहेब,
माफ करा
पं. रत्नाकर पईं यांच्या बद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पईंचे गुरू जयपूर घराण्याचे पं. मोहनराव पालेकर आणि उस्ताद गुलूभाई जसदनवाला. पईंची ओळख ही त्यांच्या स्वत:च्या कार्यक्रमांपेक्षा त्यांनी तयार केलेल्या शिष्यर्वगातून होते. मुंबई मुक्कामी असुन सुध्दा त्यांना प्रसिध्दी फारच कमी मिळाली. पण पं. जितेन्द्र अभिषेकी, डॉ. आश्विनी भिडे-देशपांडे, शाल्मली जोशी, मिलींद मालशे ई. प्रतिथयश कलाकार त्यांनी घडवले आहेत हे लक्षात घेतले की त्यांची योग्यता कळते. पुण्याचे स्व. कानिटकर बुवा त्यांचे गुरूबंधू होते.

जयपूर घराण्याचे रत्नाकर पई, ग्वाल्हेरचे यशवंतबुवा जोशी, आग्रा वाले बबनराव हळदणकर हे सगळे " लास्ट ऑफ द रोमन् स"

मोहन

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 1:18 am | विसोबा खेचर

जयपूर घराण्याचे बुजूर्ग कलकार पं रत्नाकर पैं यांचा फोटू येथे दिल्याबद्दल आभार..

तात्या.