' माझ्या सासुबै ! ' -पूढे

जेनी...'s picture
जेनी... in जनातलं, मनातलं
27 Nov 2013 - 12:56 am

' माझ्या सासुबै ! '

____________________________________/\______________________________________

त्या दिवशी मी जाम खुश होते .बामच्या बाटलीचीहि गरज पडली नाहि .. रोजच्या कचकचीवर सुचलेल्या ऊपायांवर एवढी खुश होते कि चिडुन ३६ च्या आकड्यात असणारे आम्ही दोघे ६३ च्या आकड्यात आलो होतो :)

तब्बल आठवडाभर सासुबैंचा जवळुन अभ्भ्यास केला तेव्हा लक्षात आलं कि सासुबै आरामप्रिय आणि स्तुतिप्रिय प्राण्यात मोडतात. अश्या व्यक्तिंना त्यांच्या कलेने घेवुनच आपल्या कलेत आणावं लागतं . मला त्यांना नाराज करायचं नव्हतं. कारण आपल्या नवर्‍याचं आपल्यावर खुप प्रेम असेल तर त्याच्या माणसांची मनं जपायचीच तरच ते प्रेम द्विगुणीत होतं असं एकदा आई दिदिला सांगत असताना मी ऐकलं होतं . सो शक्य तेवढी शांततेत माझी मोहिम मला पार पाडायची होती.

पहाटेच्या चहाचं गणित तर आधीच केव्हातरी सोडवलं होतं त्यामुळे सगळ्यात आधी स्वयंपाकामधली त्यांची ढवळाढवळ बंद करायची होती.
मी स्वयंपाक करायला सुरुवात केल्यानंतर बरोब्बर वीस मीनिटांनी सासुबै किचनमध्ये एन्ट्री मारतात, हे मला माहित होतं. आधीच ठरवल्याप्रमाणे मी फ्रीजमधली शेपूची भाजी काढुन एका साइडला ठेवुन दिली, दुसर्‍या बाजुला कणिक मळुन ठेवली, तीसर्या बाजुला कांदा, टोमॅटो , लसुन , सुरी असं सगळं व्यवस्थित मांडुन ठेवुन दिलं, एवढं करायला २० मिनिट लागले , इतक्यात बामुलायजा होश्शियार करत सासुबै किचन मध्ध्ये घुसल्या मी त्या दिसताच पातेलं गॅसवर ठेवुन दिलं. सवयीप्रमाणे त्यांनी भांड्यात डोकावलं तस्सं मी म्हटलं, " सासुबै तेवढी आम्टी फोडणीला घालता क्का ? मला सॉल्लिड एमर्जन्सी आलिय, सक्काळपासनं पोट गडगडतय हो " तस्श्या त्या " बर , जा जौन ये"म्हणाल्या. आणि मी तिथनं सटकले. मस्तपैकी टोयलेटध्ये मध्ये अर्धा पाउन तास टैम्पास करुन आले . मिपावरच्या तीन चार श्टोर्या वाचुन काढल्या आयफोनवर .

बाहेर येउन बघते तर सासुबैंन्नी भाजी फोडनीला घालुन , शेपू नीट करुन , चपाती लाटायला घेतली होती . मी दिसल्यावर म्हणाल्या " लाट बै त्या चपात्या , थकले गं बै, पडते जरावेळ " म्हणत हाश्श ... हुश्श ... करत बाहेर गेल्या आणि मी शांतपणे एकहि उपदेश न ऐकता चपात्या केल्या .
दुसर्या दिवशी पून्हा व्यवस्थित मांडणी , फक्त डाळ फोडणीला घालुन ठेवली होती , उगी शंका यायला नको :-/.सासुबै आत आल्या , डाळीत वाकुन बघणार तोच " ओह्ह माय गॉड्ड , " असं म्हणत मी कपाळाला हात लावला ,त्यावर त्या काळजीच्या सुरात म्हणाल्या " काय गं , काय झालं ?" .
मग मी चेहेर्यावर खुपच टेन्शन आणत म्हटलं " अहो मॅकचा एक अर्जंट मेल येणार होता , त्याने दुपारपर्यंत येइल , मेलबॉक्स मधुन जाउन घेउन ये असं सांगितलं होतं , तो आता
फोन करेल , आणि माझ्या आत्ता लक्षात आलं , तुम्ही डाळीकडे लक्ष द्याल का , मी घेउन येते "
त्यांच्या रीप्लायची वाट न बघताच मी दाराकडे धाव घेतली , अर्धातास बाहेर टैम्पास केल्यावर घरी आले , बघते तर काय सासुबैंनी भाजी नीट करुन चपात्या लाटायला घेतल्या
होत्या , मी धावतच जौन त्यांना म्हटलं " अहो सासुबै कशाला करत बसलात , मी केलं असतं नं आल्यावर , अहो त्या शेजारच्या विल्सन काकु भेटल्या मग काय सोडायलाच तयार नैत , बसले मग ५ मिन्ट गप्पा मारत त्यांच्याशी "
मी दिसताच सासुबैनी हातातुन हळुच खाली ठेवलेलं लाटनं मी घेतलं न राहिलेल्या चपात्या लाटुन घेतल्या . सासुबै शांतपणे बाहेर सोफ्यावर जाउन बसल्या .

असं आण्खी पाच सहा दिवस कधी टॉयलेटचं तर कधी मॅकच्या न येणार्या मेलचं तर कधी फोनचं तर कधी कायपण कारण देउन मी सटकतेय ते पाहुन सासुबैंचं कीचनमध्ये येनच हळु हळु कमी , मग बंदच झालं , त्यावेळात त्या " मी जरा थोडं चालुन येते गं " असं म्हणु लागल्या .
एका वेळी एकच या नियमानुसार मी आठवडाभर किचन एके किचन हि मोहिम फत्ते केली .

आता माझा मोर्चा मी बाहेर जाताना नेहेमीच त्यांचं सोबत येणं जे मला ज्याम खटकायचं , त्याकडे वळवला . अ‍ॅक्चुली माझं घर शॉपिंग मॉल /सेंटरपासुन जवळजवळ ५ मैल लांब आहे , ५ मैलाच्या आवारात जवळपास एकहि साधं दुकानहि नाहिय , त्यामुळे गाडीशिवाय पर्याय नाहि .
अश्यावेळी एखादी विसरलेली वस्तु आणायच्या बहाण्याने बाहेर पडलेल्या जीवाला पूढे पार्लर मध्ये म्हणा , एखाद्या मैत्रिणीकडे म्हणा ... तसच पूढे जाउन एखाद्या शॉपिंग मॉल मध्ये म्हणा ... असं कुठे तरी भटकावसं वाटतच ना ! पण सासुबैंच्या सारखच सोबत येण्यानं मला पाय साखळ्दोर्‍याने बांधल्यासारखं झालं होतं . यावर काहितरी तोडगा काढायलाच हवा असं ठरवलं .

मग एके दिवशी ह्या मोहिमेला हाती घेउनच टाकलं . त्या म्हणाल्या " थांब गं , मीहि येते " . मी म्हटलं " चला ".
मग आम्ही दोघी एका मॉल मध्ये शिरलो , तिथुन एका कपड्याच्या दुकानात पोहोचलो . तिथे एक टॉप अतिशय आवडला , सासुबैन्नीही त्या टॉपवर पसंतीची मोहोर चिपकवली.
मग आम्हि बिल करन्यासाठी काउंटरवर पोचलो . पर्स उघडली , आणि मी उडालेच . " पून्हा सॉल्लिड टेन्शनमध्ये येत , " ओह्ह म्माय गॉड्ड " करत मी कपाळाला हात लावला!
तश्या त्याहि टरकल्या , अक्शरशा कपाळावर आठ्या आणत त्यांनी " काय गं ? " म्हटलं , तशी चालुच झाले
मी : " अहो सासुबै माझं वालेट घरीच राहिलं बहुतेक ? "
सासुबै : " म्हणजे गं " ?
मी : " अहो म्हणजे माझी छोटी पर्स , त्यात पैसे , डेबिट , क्रेडिट सगळेच कार्डहि आहेत "
सासुबै : " आणि मग ही पर्स? ह्यात काहिच नसतं का ? "
मी : " नाहि कसं , असतं ना "
असं म्हणत मी माझी पर्स त्यांच्या समोर रीकामी केली . एक हेअर ब्रश , नेल्पेंट्स, २/४ लिप्स्टिक्स चे शेड्स , छोट्टासा मेकप बॉक्स , स्कार्फ , गॉगल , क्लिन्झर , सॅनिटरायझर,
एक दोन फेशिअल वाइप्सचे पाउचेस पण होते ... बरच काहि निघालं पर्समधुन .सगळ्या वस्तुंकडे मोट्ठा आ वासुन पहात होत्या , शेवटी बोल्ल्याच
सासुबै : , " आता काय हे सगळं त्या बाइला देउन टॉप विकत घेणारेय्स काय "
मी : " नाहि ओ सासुबै , तुम्हाला दाखवत होते कि हे सग्गळं असतं माझ्याकडे "
सासुबै : " अगं अक्खं कपाट पर्समध्ये घेउन फिरण्यापेक्षा एकच बार्कुशी पर्स त्यात पैसे एवढच वागवावं कि हातात , आमचं बरं बै , दोन चार नोटांची शीगरेटी एवढी सुरळी करुन ब्लाउझमध्ये ठेवुन दिली क्का ना चोराची भिती ना पैसे पडायची ".
एक मात्र होतं सासुबै कुठेहि बोलायचा चांस सोडायच्या नाहित ... कौतुकच वाटायचं मला तर बै .
मी बापूडी त्या टॉपकडेच बघत होती , जणु बिच्चडने का दुख तुम क्या जानो सासुबै . :-/ मी फारच बारीक चेहेरा करुन म्हटलं , " श्श्या , आता परत हाच पिस मिळणं अशक्क्य "
त्यावर अगदि अपेक्षित आणि हेच ... हो हो हेच हवं आसनारं उत्तर शेवटी एकदाचं मिळालच , " अगं आहेत माझ्याकडे पैसे मी देते "
" अहो नको सासुबै , र्हाउद्या हो ... "
" अगं आवडलाय ना तुला , आणि मला काय तुम्हीच तर देणार न पैसे ' परत ' , म्हणजे हवे असतिल तेव्हा " . सासुबै बर्र्याच महत्वाच्या शब्दांवर कम्मालीचा जोर देत बोलत होत्या . झालं बील केलं , टॉप घरी आणला . संध्याकाळी चहा सोबत मस्त कोबीचे भजी केले आणि टॉप घालुन मॅकच्या पूढे येत म्हटलं , " हे बघ सासुबैन्नी माझ्यासाठी नविन टॉप घेतला , त्यांना आवडला , त्यांनी मग माझ्यासाठी घेउनच टाकला " :D

सासुबै शॉक् सुनबै रॉक्

मक्या कसला खुश झाला , आईची चोइस न सुनेबद्दलचं प्रेम दोन्हीनी भरुन आलं होतं त्याला बहुतेक =))

माझे दिवस सॉल्लिड बिज्जी जात होते , आता हे झालं , पूढल्यावेळी काय करायचं ते आधीच ठरवावं लागायचं , ऐनवेळी पचका होता कामा नये म्हणुन खुप काळजीहि घ्यावी लागयची . असच आणखी एकदा त्यांना प्रोड्युस मध्ये घेउन गेले , तिथे कार्ड एक्सेप्ट करत नाहित , कॅशच द्यावी लागते , तेही एक्दम सुट्टेच . मोट्ठि नोट घेत नाहित , हे सगळं माहित असताना देखिल प्रोड्युस वाल्या बयेला मोठी नोट दाखवली , आणि सासुबैन्ना म्हटलं , " सुट्टे आहेत का हो ? " .
त्यानी गप्चुप काढुन दिले . मी मनात म्हटलं , विसरा आता हे सुद्धा :P
एकदा लायब्ररित घेउन गेली , म्हणजे त्याच आल्या होत्या सोबत ,मी तसच पूढे मॉलमध्ये नेलं . त्याना जास्त फिरवलं का त्या कंटाळुन जायच्या , 'घरी चल , घरी चल ' चालु करायच्या , पण मी ' थांबा हे पाहुन जाउ , ते बघुन जाऊ ' करत बसायचे . मी त्यांच्यासाठी एक एक्स्ट्रा पाण्याची बॉटल जवळ ठेवायचे , काळजी तर घ्यावीच लागायची ना .
कधी कधी तर चार पाच टॉप किंवा काहिहि कपडे घेउन ट्रायल रूम मध्ये जाउन टैम्पास करत बसायचे , त्या सारखं दरवाजा ठोकत बसायच्या , " अगं किती वेळ , आम्हाला साडी नेसायलाहि एवढा वेळ लागत नै , "
खरच ज्याम कुचक्यासारखं वागायला लागायचं मला , पण दुसरा पर्याय नव्हता . गोड गोड बोलुन काम्गिरि चालु ठेवली होती मी .
नंतर मग त्यानी सोबत येण्याबद्दल विचारायचच सोडुन दिलं , त्याऐवजी त्यानी टीव्ही वरच्या मालिका पहायला सुरुवात केली . मीच एकदा विचारलं
" सासुबै , येताय का ? " तर म्हणे ," नक्को , मला अमुक अमुक सीरीअल पहायची आहे " .
मी उगाच किंचितच उदास भाव चेहेर्यावर आणत म्हटलं , " ओह्ह "
तर म्हणे " पर्स घेउन जा हं !
मी म्हटलं , " अरे हो , बरी आठवण केलीत , बघितलं आजहि विसरलीच असती "

तर म्हणे , " क्का ? मी येनारच , असं ग्रुहितच धरलं होतस क्का काय . त्यावर मी उगाच हसुन म्हटलं , " नाहि नाहि , तुम्ही बघा तुमची सीरीअल , मी आलेच जाउन " :P

हुश्श......

आता घरचं वातावरण थोडक्यात असं होतं , मी सकाळी जिम वरुन घरी आले कि त्याना चहा द्यायचे मग साधारण ९ वाजता आम्ही दोघी नाश्ता करायचो , मग मी घर आवरुन स्वयंपाकाला लागायचे , त्या बाहेर चालायला जायच्या . सासुबै घरी येइपर्यन्त जेवन टेबलावर हजर असायचं . दुपारी मी माझी बाहेरची कामं करायला बाहेर पडायचे , त्यावेळी त्या थोडा आराम करुन टीवी पहात बसायच्या ... संध्याकाळी मॅक आल्यावर , कधी ते दोघं तर कधी आम्ही तिघहि थोडं फिरुन यायचो .माझं दडपण थोडं कमी
झालं होतं . आमच्यात आता सुसंवादहि होउ लागले होते .

दुपारी असच एकदा जेवताना सासुबैन्ना म्हटलं , " सासुबै तुम्ही कोथिम्बिरिच्या वड्या छान करता म्हणे " . खुश होत म्हणाल्या , " मक्याने सांगितलं ना ? त्याला फार आवडतात माझ्या हातच्या " .
" हो , कालच म्हणत होता , आई छान करते वड्या " . मग मी खाली मुंडी घालुन जेवु लागले तर म्हणे , " कोतिम्बीर आहे ना गं घरात ?"
मी म्हटलं , " हो , आहे कि ".
त्यावर शांतता . आम्हि जेवनं आटोपुन आपापल्या खोलीत गेलो . त्यादिवशी मला कुठेहि जायचं नव्हतं . मस्तपैकि नेटवर उचापात्या करत बसले होते .( मिपावरच्या सासुबैन्ना छळत बसले होते :D)

साधारण चार साडेच्यार च्या सूमारास किचनमध्ये कसला तरी आवाज येउ लागला म्हणुन पहायला गेले तर चक्क सासुबै कोथिम्बिर चिरत बसल्या होत्या , मी म्हटलं ," काय करताय सासुबै ? " तर म्हणे अगं एकहि धड कार्यक्रम नाहिय टिवी वर , म्हणुन म्हटलं चला आज कोतिम्बिर वड्या करुया " . मी जाम खुश झाले . खरतर मलाच खायच्या होत्या . " वॉव , मी काहि मदत करु का , मला सांगा काहि कापाकापीचं करायचं असेल तर " . मी मदतीचा हात पूढे ़करताच सासुबैन्नी तो घट्टच धरुन ठेवला ... मग आम्हि दोघिन्नी मिळुन कोथिम्बिरिच्या वड्या बनवल्या . रात्री जेवताना सासुबै सारख्या मक्याला विचारत होत्या , " काय रेतिखट नैत ना वड्या ? , कश्या झाल्यात रे ? तुला खायच्या होत्या ना ? " हे सगळे प्रश्न ऐकुन मॅकने हळुच माझ्याकडे पाहिलं , " अरे तु म्हणाला होतास ना आई जेवन छान बनवते , त्यात वड्या एकदम भारी बनवते , म्हणुन त्यानी आज तुझ्यासाठी बनवल्यात " मी मॅकच्या न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देउन टाकलं .

मग असच मॅकचं नाव सांगुन मी कधी त्यांच्याकडुन कडी बनवुन घ्यायची तर कधी धपाटे तर कधी रताळ्याच्या घार्या .... त्यांच्या हाताला जब्बर्दस्त चव होती .
आणि मी मला न जमनार्या गोष्टी त्यांच्याकडुन गोड गोड बोलुन करुन घ्यायचे .

एकदा सासुबै दुपार नंतर झोपुन ऊठल्यावर माझ्या खोलीत आल्या , थोड्या अपसेट दिसत होत्या . काहि होतय का ? काहि हवय का ? विचारलं तर म्हणाल्या नाहि ... सहजच . त्यांचा चेहेरा पाहुन म्हटलं , " चला बाहेर जाऊन येऊ " .. तश्या त्या उठल्या , तयारीला लागल्या . त्यांचं आवरेपर्यंत मी थर्मास मध्ये चहा आणि चहाचे मग , एक पाण्याची बॉटल असं सगळं घेउन गाडीत ठेवुन दिलं . जवळच दीड मैलावर एक गोल्फकोर्स चं मैदान आहे , बसायला एक दोन बेन्चेसहि आहेत . मी आणि मॅक कधी कधी चालत तिथे जातो , खुपवेळ तिथे टैम्पास करतो , छान आहे ती जागा .
तिथं गेल्यावर . आम्हि दोघीनी मैदानाच्या कडेने एकदोन राउंड मारले , मग एका बेन्चवर बसलो , दोघिन्साठी दोन मग चहाचे भरले ... त्यांच्या हातात देत म्हटलं ," सासुबै , करमत नाहिय का तुम्हाला ? "
त्या हसल्या , आकाशाकडे बघत म्हणाल्या , " अगदिच तसं काहि नाहि , पण एकटेपण येऊ नये आयुष्यात कधीच कुणाच्या "
माझ्या खुप जिव्हारी लागलं , वाटलं आपल्या अश्या वागण्यामुळेच तर नाहिना त्यांना असं वाटतय? " फार चुकिचं वागले का मी ? "
माझे सासरे ९वर्षांपूरीच गेले , तेव्हापासुन सासुबैन्नी एकट्याने दोन्ही मुलांची जवाबदारी व्यवस्थित पार पाडली .
"सासुबै तुम्ही ंमामंजीना काय हाक मारायचात ?" . मी खुपच धीट होउन संवादाला सुरुवात केली , वाटलं त्या थोड्या मोकळ्या होतील , मनात कधी कधी खुप काहि साठलेलं असतं , फक्त ते रीकामं करायला जागा हवी असते .
त्या खुप उत्साहाने बोलु लागल्या " कधी साहेब तर कधी यजमान म्हणायचे मी , पण एकटे असतानाच , बाकि कुणापूढे बोलणं व्हायचच नाहि " अगदि भरभरुन बोलत होत्या .
मग म्हणाल्या " ए काय गं , तु काय म्हणतेस मक्याला दोघच असता तुम्ही तेव्हा ? "
" इश्श्य , मी तर त्याला गोंंड्या कधी सोंड्या असं काहिहि म्हणते " फारच लाजत उत्तर दिलं , तर म्हणे , " ही कसली गं नावं " ... मग म्हटलं , " आता शोना मोना पिल्लु म्हणायला तो तेवढा नाजुक नैय्ये ना , म्हणुन गोंड्या सोंड्या म्हणते " :P

घरी आल्यावर रात्री मी मॅकला म्हटलं , " मी सासुबैन्ना तुला कोणत्या नावाने हाक मारते ते सांगितलं , तसा तो निदान चार पाच इंच तरी वर उडाला , मग म्हटलं , " अरे हो , हो ... ते ते वालं नाव नाहि सांगितलं ... बाकिचि सांगितली =))

त्या दिवसानंतर सासुबैन्ना मी शक्य तेवढा वेळ देऊ लागले , बाहेर फिरण्यापासुन , जेवण बनवण्यापासुन ते अगदि गप्पा मारण्यापर्यंत ...पण आत्ता जे काहि करत होते ते मात्र अगदी मनापासुन , मारुनमुटकुन नव्हे .

कुठल्याहि नात्यात संवाद हवाच ,त्याशिवाय ते उलगडत नाहि आणि घडतहि नाहि ..

तीन आठवड्या पूर्वी सासुबै भारतात परत गेल्या , जाण्या पूर्वी आम्ही दोघीन्नी मिळुन बॅकयार्ड मध्ये एक पिवळ्या गुलाबाचं झाड लावलं होतं , त्याला पहिली कळी आली की
सगळ्यात पहिलं मलाच सांगायचं हं !असं प्रॉमिस करुन घेतलं माझ्याकडुन .

आणि जेव्हा पहिली कळी आली तेव्हा मी त्यांना फोन करुन सांगितल , तर म्हणाल्या " अगं वेडाबाई , त्या कळीचा फक्त एक बहाणा होता ... त्या आडुन तुला वेगळच काहि सांगण्याचा तो एक प्रयत्न होता ;) " आणि पोटभरुन हसल्या ....

आय रीअली मिस्ड हर ....
_________________

अवांतर : लेख बराच मोठा झालाय , पण काय करणार सासु विषयच असा आहे , कि संपता संपत नै :-/

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

नाही नाही. चुकून टंकलं गेलं. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2013 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

नाही म्हणण्याअगोदर "दादागिरी करतो/ते तो/ती दादा" ही व्याख्या पसंत असेल तर वापरायला हरकत नाही :)

लेख खरच चांगला नाहिय उगाच खोटे खोटे प्रतिसाद दिलेत लोकान्नी :(
चांगला असता तर असा गोंधळ घातला गेलाच नसता :(

एनिवेझ ...... वाचन्यासारखा नसेल तर वाचनमात्र करन्यात तरि काय अर्थ आहे ,
हा धागा रद्द करण्यात यावा अशी विनंती .

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2013 - 4:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय तो विनय (बादवे, हे मुलाचे नाव नाही !)... फार दुर्मिळ गोष्ट आज्च्या काळात नै का? :) अभिणंदण !

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2013 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख खरच चांगला नाहिय उगाच खोटे खोटे प्रतिसाद दिलेत लोकान्नी
वरचा प्रतिसाद यासाठी होता !

पैसा's picture

3 Dec 2013 - 6:05 pm | पैसा

झाली रडारड सुरू? बाकी लोकांच्या धाग्यांवर बागडायला लै मज्जा येते नै?

बॅटमॅन's picture

3 Dec 2013 - 6:25 pm | बॅटमॅन

सासुबैंशी सहमत आहे ;)

(काडीसारू) बट्टमण्ण.

स्पंदना's picture

4 Dec 2013 - 3:38 am | स्पंदना

+१

आनन्दिता's picture

4 Dec 2013 - 8:59 am | आनन्दिता

+२ प्रचंड सहमत.....

इरसाल's picture

4 Dec 2013 - 11:30 am | इरसाल

खर्‍या सास्बै शोभतात.

काय आहे पूजा, मी लेखनाबद्दल काही म्हंटलच नाही. नेव्हर! मी फकत मांडलेल्या कथेविषयी बोलतेय. म्हणजे ते नाही का ते कसल मारझोड प्रेम त्याबद्दल धागा होता, तेथे लोक्स नाही का कथेबद्दल बोलले? तसच. अर्थात मी काही लेखन सोडुन बाकिच्या गोष्टींवर गदारोळ नाही केला. कुणाला काड्या सुद्धा नाही लावल्या. फक्त आजवरचा अनुभव सांगितला. तो ही जरा वेळ घेउन. त्यात लगेच गोंधळ काय?
अन तसाही माझ्या एका प्रतिसादाने तुझा लेख पन्न्नास वरुन शंभरीकडे निघाला याचे आभार मानायचे सोडून....टी आर पी वाढवल्याबद्दल थन्क्यु म्हणायच सोडुन...शी बाई!!

युगन्धरा@मिसलपाव's picture

4 Dec 2013 - 11:42 am | युगन्धरा@मिसलपाव

हे पुजा, तु इतर लोकांकडे लक्ष देउ नको ग. तुझा धागा खरचं उत्तम जमलाय.
बाकि दुनिया को मारो गोली.

पूजा एवढे निराश होण्याची गरज नाही आहे. मिपावर काही प्रतिसाद खरोखर प्रामाणिकपणे दिले जातात पण हि एक खरेच दुदैवाची गोष्ट आहे कि काही जन उगाचच काहीतरी विचित्र प्रतिक्रिया देतात आणि मुळ धागा बाजूला राहतो आणि काहीतरी फालतू विषयांतर होते.

असे करून ह्या लोकांना काहीतरी असुरी आनंद मिळत असावा. आपण स्वतः तर काही चांगले contribute करत नाहीत पण दुसर्यांच्या efforts ला acknowledge पण करू शकत नाहीत. कोणाच्या प्रतिक्रियेला किती भाव द्यावा हे तुम्हीच ठरवा. मला खरेच मनाला भावला म्हणून मी प्रामाणिक प्रतिक्रिया दिली.

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 5:51 pm | प्यारे१

>>>आपण स्वतः तर काही चांगले contribute करत नाहीत पण दुसर्यांच्या efforts ला acknowledge पण करू शकत नाहीत.

Sighhhhhh!

जेनी...'s picture

4 Dec 2013 - 1:41 am | जेनी...

सॉरी माधवी अँड थँक्स .
कोणाच्या प्रतिक्रियेला किती महत्व द्यायचं हे खरच आपलं आपण ठरवायला हवं .
थँक्स अगेन ......

ओ माधवी बाई काही आसूरी बिसुरी नाही.
मी आपल एक मत नोंदवल. निरीक्षण आहे ते!

मयुरा गुप्ते's picture

4 Dec 2013 - 1:54 am | मयुरा गुप्ते

खटयाळ सुनबाईंचा खुसखुशीत लेख आवडला.

--मयुरा.

श्रीरंग_जोशी's picture

4 Dec 2013 - 5:44 am | श्रीरंग_जोशी

पहिला भाग वाचून फार काळजी वाटत होती.

दुसरा भाग वाचून खूप बरे वाटले.

जिंकलस पोरी.

जेपी's picture

4 Dec 2013 - 6:38 am | जेपी

बाकी अंवातर टाकुन आमाला लय आसुरी आनंद होतो बगा .
=))
असुर -तथास्तु

जेपी's picture

4 Dec 2013 - 6:39 am | जेपी

झाल .

जेपी's picture

4 Dec 2013 - 6:39 am | जेपी

झाल .

व्वा. लय भारी लिवलय तुमी.