'हे बघ आज आपण विज्ञान प्रदर्शन पाहयला जात आहोत,'आकाशचे पप्पा त्याला म्हणाले,
' हो का? मग़ चला लवकर मला पाहयाला खुप आवडते,'आकाश आंनदाने म्हणाला,
'आरे हो हो रे पहिला ग़ाडी तर स्टार्ट करु दे मला,' आसे म्हणुन त्यानी ग़ाडी स्टार्ट केली,
वडीलाचा तो खुपच लाडका, पण वडीलाना त्याचा हाट्टीपणा व दंगामस्ती पसंत नव्हती , त्याना दुसर्याची मुलेच शांत वाटत, आणि आपला आकाश ही आसा शांत व्हावा आशा नजरेने ते पाहत पण अकाश मात्र कधी शांत तर कधी वादळासारखा भिरभिरीत त्यावेळी मात्र हे वादळ शांत करण्यासाठी त्याच्या पप्पांना मात्र हाताचा वापर करावा लाग़े, मात्र त्याच्या आशेवर पाणी पडत आसे.मग म्हणत की,'आकाश तु आसा कसा अशांत,'
शाळेततर त्याचे नाव दररोज निघत आसे, शाळेतील बाई तर त्याला पुढे बसायला साग़त आसे, पण तो पुढे बसुन कधी कधी झोपा काढत आसे, मग़ त्याचा आजुबाजुची मुले त्याला मारत, हेच जेव्हा बाईच्या लक्षात येई तेव्हा मात्र त्याला तास दोन तास उभा राहयला लावी.पण तो उभा राहुन ही पेगत आसे हे कोणाला माहीत नसे.
शाळेतुन घरी आल्यावर खांद्यावरचे ओझे दफ्तर कधी ते खाली फेकतोय आसे त्याला वाटे, तो घरी आल्यावर नेहमीच्या जाग़ी ते फेकत आसे, आणि आईकडे खाण्यासाठी माग़त , त्याची शाळेतुन आलेली आवस्था पाहुन तर त्याची आई म्हणत की,
'आसा कसा रे तु वेग़ळा वेग़ळा, आसा का वाग़तोस सग़ळ्याच्या मना वेगळा ,'
आशा प्रकारे त्याची आई रोज एक त्याच्या नावाची कविता म्हणत आसे.
पण आकाश मात्र हा एका काल्पनिक विचारातच ग़ुग़ं आसे, माझे नाव आकाशच का? वरील आकाशाशी माझा काय संबध? तो वरचा आकाश आहे तर मी खाली का?तो वरचा आकाश मग़ मी खालचा आकाश तर नाही ना? तो माझा भाऊ तर नाही ना? ते आकाशातील तारे कोण आहेत? तो चांदो मामा खरंच मामा आहे का माझा?
आशा विचारात तो आनेक ग़ोष्टीचा विचार करत आसे, मग़ कधी कधी तो कविता ही करत आसे.
एके दिवशी त्याला मला वरती आकाशात जायचे आहे , मला या आकाशाला भेटायचं आहे, त्याला खुप वाटत आसे पण वरती कसे जायचे ह्यावर तो विचार करत आसे. मग़ तो स्पाइडर मँन सारखे उडायचा प्रयत्न केला , पण जेव्हा त्याच्या पायाला लाग़ले तेव्हा त्याचे प्रयत्न बंद झाले.
शेवटी मग़ तो आकाशातील विमाने पाहत आसे, पण हे विमानातुन कसे जायचे हे तो विचार करत आसे.
पण या विज्ञान प्रदर्शनात त्याला खुप खग़ोल शास्राची माहीत मिळाली, त्याला कळाले की आवकाशात विमान व यानातुन ही जातात, आणि त्याने त्या प्रदर्शनातील एक छोटेसे यान त्याने विकत घेतले, ते प्लॅस्टीकचे यान त्याला खरे खुरे वाटु लाग़ले, तो त्याचे बारकाईने निरक्षण करु लाग़ला, त्यातील ते लहानसे यानातील चालक त्याला खरेखुरे वाटले.
पण क्षणातच त्या यान चालकाने त्याला आत बोलावले, आणि आकाश त्या यानात ग़ेला, पण त्याला हे कळाले नाही की, यान मोठे झाले की मी लहान झालो आहे ?
'कसा आहेस आकाश?,' तो यान चालवणारा म्हणाला,
'माझे नाव कसे माहीत तुम्हाला?,'
'ते नंतर कधीतरी सांग़ेण पण तुला आवकाश पहायचे ना?,'
'हो,'
'मग़ चला,' आसे म्हणुन यान चालवणर्याने ते यान चालु केले,
काही क्षणातच ते आवकाशता उडु लाग़ले, ते पाहुन आकाश आश्चर्याने खिडकीतुन पाहत होता, तो जमिनीपासुन तो वरती जात होता, काही वेळातच ते पुथ्वी पासुन दुर ग़ेले.
आता ते यान आवकाशात तरंगु लाग़ले,
' हे बघ हे आवकाश आहे,' यान चालवणारा म्हणाला,
'येथे तर खुप काळोखचं दिसतो जिकडे तिकडे, पण हे सुदर आसे विविध रंग़ाचे चेडु खुप सुदंर आहेत'
' हो पण ते चेडु नाहीत , ती बघ ती निळ्या रंग़ाची आपली पृथ्वी, '
' हो का, म्हणजे आपण तेथे राहतो,'
'हो ,'
' किती सुदंर दिसते ही पृथ्वी, आणि तो आपला चंद्रच हो की नाही?,'
' अग़दी बरोबर, आणि तो बघ आपला सुर्य व त्याचे ग़्रह'
आसे म्हणुन त्यानी आकाशला त्या ग़्रहा संबंधी माहीती दिली.
हे तो आश्चर्य चकित होउन ऐकत होता, त्यातुनच तो म्हणाला,'
' आपण या विश्वात किती लहान आहोत ना? तरीपण लोक स्वत:ला किती मोठे समझतात ना,'
'हो रे पण तुला जसे समझले तसे थोडेच कुणाला समजणार आहे का?,'
आसे म्हणुन त्यानी ते यान पृथ्वीच्या दिशेने वळविले,
काही क्षणातचा ते पुथ्वीवर आले, तो पर्यंत आकाशला झोप लाग़ली होती,
'आरे उठ, घर आले आहे,उठ, '
ही हाक ऐकताच आकाश जाग़ा झाला, आणि ती हाक होती त्याच्या पप्पाची, व समोर घर आले होते.
मग़ त्याने डोळे चोळत आपल्या हातातील ते यान पाहिले तर ते ग़रम झाले होते, बहुतेक ते उडल्यामुळे की हातात धरल्या मुळे हे माहीत नव्हते, पण त्याने यानात पाहिले तेव्हा त्या मध्ये तो यान चालवणारा तेथे नव्हता, ह्याचे मात्र त्याला आश्चर्य वाटले.
प्रतिक्रिया
3 Dec 2013 - 10:34 am | जेनी...
हुर्र्र्र्र्र्र्र्रे ...
जीवु काकांचा लेख आला ......
3 Dec 2013 - 10:36 am | चावटमेला
असो, मी दुसरा तर दुसरा, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन. आता लेख वाचतो
3 Dec 2013 - 10:41 am | जेपी
वाचताना आमचीच यान बनुन उडायची वेळ आलती . :-)
3 Dec 2013 - 10:48 am | अत्रुप्त आत्मा
@मग़ त्याने डोळे चोळत आपल्या हातातील ते यान पाहिले तर ते ग़रम झाले होते, बहुतेक ते उडल्यामुळे की हातात धरल्या मुळे हे माहीत नव्हते, पण त्याने यानात पाहिले तेव्हा त्या मध्ये तो यान चालवणारा तेथे नव्हता, ह्याचे मात्र त्याला आश्चर्य वाटले. >>>
कुनी काई बी म्हना आपला दावा आहे... जिवनभाऊ मिपा'चा लेख कू छावा आहे.
3 Dec 2013 - 10:54 am | जेनी...
जिवु काका हा लेख मुक्तपिठ मध्ये द्या ....
खरच छान लिहिलयत , अगदि यानात कधी बसेन आणि उडेन असं झालय मला
खुप छान ... मस्त लेख
खरच मुक्तपिठ मध्ये द्या , तुम्हालाहि यानातुन फिरवुन आणतिल तिथले प्रतिसाद ....
आवडला ... ज्याम आवडला ....
3 Dec 2013 - 11:40 am | मुक्त विहारि
जीवन भाऊंच्या लेखाचा प्रताप....
पूजा ताईचे सुद्धलेखन पण सुधारले...
3 Dec 2013 - 12:18 pm | विशाल चंदाले
खरच मुक्तपिठ मध्ये द्या , तुम्हालाहि यानातुन फिरवुन आणतिल तिथले प्रतिसाद ....>>> *lol* *biggrin*
3 Dec 2013 - 5:47 pm | mohite jeevan
धन्यवाद
4 Dec 2013 - 9:23 am | mohite jeevan
धन्यवाद
3 Dec 2013 - 11:04 am | अत्रुप्त आत्मा
हे लेखक महाशय अ.कूं.ची "कसर" भरून काढणार .असं दिसतय. ;)
3 Dec 2013 - 11:05 am | स्पंदना
असेच म्हणते.
:)) मात्र! मात्र! मातेर!
अस कस? कायतरी गडबड आहे.
असो.
मुवि कुठाहेत? पूजा इथुन पुढे मुविंची वाट पहायची. पहिला प्रतिसादाचा नारळ मुविच फोडणार.
3 Dec 2013 - 11:52 am | विटेकर
अरेच्चा , हे बालसाहित्य एकदम वयात आले की काय ? एक्दम पेग मारायला लागले आहे?
3 Dec 2013 - 12:22 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
3 Dec 2013 - 11:11 am | मुक्त विहारि
निव्वळ अप्रतिम....
छान कूट...
5 Dec 2013 - 10:14 am | mohite jeevan
धन्यवाद
3 Dec 2013 - 11:30 am | इरसाल
ज़ीव़ऩ भा़उ़ंच्या़ अतिशय बारीक बारीक बारकावे ठळकपणे दाखवणार्या लिखाणाचा पंखा आहे
3 Dec 2013 - 11:31 am | इरसाल
एक राहिलचं, वरचा लेख मी वाचलेला नाही हे सगळे मागील अनुभवाचे बोल....
3 Dec 2013 - 11:49 am | विटेकर
अप्रतिम लेखन ! असा लेखक मिपावर गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही !!
( जिवनभाउ, आता छान छान म्ह्ट्लय की नाही ?... आता थांबायच हं !)
यांना काही दिवस लेखन संन्यास घ्या हे सभ्य आणि योग्य भाषेत ( बाळ हो ते, मन कस दुखावायच ) कसे सांगावे या विवंचनेत असलेला...
4 Dec 2013 - 1:24 pm | आदूबाळ
ओ असं नका हो बोलू...
4 Dec 2013 - 3:10 pm | बॅटमॅन
ओ विटेकरजी, असं कं बोलता हो? मिपाक्र जन्तेवर असं अत्याचार कं ओ कर्ता? :(
4 Dec 2013 - 3:13 pm | थॉर माणूस
नाय नाय ह्ये चालणार नाय...
जीवनभौ तुम्ही मागे हटू नका, आम्ही हाओत तुमचे पंखे.
आता माघार घ्यायची नाय, अरे चर्चा तर होणारच... पुढचा लेख येणारच...
5 Dec 2013 - 1:54 pm | इरसाल
तुम्ही नक्कि थॉर की थोर ?
5 Dec 2013 - 3:53 pm | थॉर माणूस
थोर असण्याबद्दल मी स्वतःच कसं ठरवणार?
म्हणून आपण आपले थॉर माणूस... मु. पो. अॅसगार्ड ;)
5 Dec 2013 - 4:02 pm | बॅटमॅन
खपल्या गेले आहे =)) _/\_
5 Dec 2013 - 4:13 pm | थॉर माणूस
यासाठी मार्वल नामक संस्थानाला धन्यवाद द्यावे लागतील. या शहरात रहाणार्या लोकांना अजून कळले नाहीये की ते या शहराचे नाव आहे की काम. (तुम्हाला काय वाटलं आम्ही सारखे सारखे पृथ्वीवर कशाला येतो? लवकरच इकडे रेशनकार्डावर नाव लावून घेणारे बगा.)
5 Dec 2013 - 4:35 pm | बॅटमॅन
नाव आहे की काम >>> खपल्या गेले आहे. =))
3 Dec 2013 - 11:57 am | रिम झिम
संपूर्ण अवकाशातच नव्हे तर संपूर्ण ब्रम्हांडातील सर्वात सुंदर आणि सुरेख लेख....
6 Dec 2013 - 8:09 am | mohite jeevan
धन्यवाद
3 Dec 2013 - 12:00 pm | रिम झिम
काय पाहायला आवडते ते पण पुढच्या वेळी लिहीत चला !
उगीचच मनात नसत्या शंका येतात हो....
3 Dec 2013 - 6:12 pm | टवाळ कार्टा
=)) =)) =))
3 Dec 2013 - 12:09 pm | युगन्धरा@मिसलपाव
अप्रतिम लेख........
3 Dec 2013 - 12:28 pm | प्यारे१
___/\___
तुमच्या भाषांतरासारखाच. ;)
बाकी ते 'ग़ुग़ं' लिहायला बराच त्रास झाला मला. तुम्हाला चटकन जमला ना जीवनभौ?
-राँर्बट प्यारे
3 Dec 2013 - 12:45 pm | विटेकर
हा कुण्या जुन्या मिपाकराचा डु आय डी असावा असा दाट संशय ! कंपुबाजीचे बाळ्कडु उपजतच आहे ..
.
.
.
.
संपादक मंडळाचे इकडे लक्ष आहे का ?
3 Dec 2013 - 12:46 pm | प्यारे१
श्श्श्श् !!!
चुप्प्प्प्प.
आगावपणा करतो का रे? आँ????
3 Dec 2013 - 2:31 pm | मी_आहे_ना
प्यार्या... कसं लिहायचं रे ते "ग़ुग़" ? मी अर्थात चोप्य्-पस्ते केलंय, पण उत्सुकता आहे :)
3 Dec 2013 - 2:35 pm | प्यारे१
g+J+u g+J+M
3 Dec 2013 - 2:47 pm | मी_आहे_ना
ध़न्य़वा़द़ प्या़रे़ ... आपलं हे, धन्यवाद प्यारे :)
3 Dec 2013 - 10:15 pm | mohite jeevan
धन्यवाद
3 Dec 2013 - 12:12 pm | यसवायजी
*DANCE*
हेSS ढ्यांग टिका, टिक्क टिका, ट्याक्क टि़क्का टिक्क..
हेSS ढ्यांग टिका, टिक्क टिका, ट्याक्क टि़क्का टिक्क..
*DANCE*
3 Dec 2013 - 12:24 pm | अग्निकोल्हा
छान लिहलयस.
फक्त तुजी शैली बदलू नकोस. "सग़ळ्याच्या मना वेगळा" मधे 'वेगळा' हा 'वेग़ळा' असा हवा होता. बाकी कथाबिज भ्ल्तच सशक्त आहे हे मान्य केलेच पाहिजे.
3 Dec 2013 - 12:28 pm | चावटमेला
जीवनभौना 'मिपाचे रजनीअण्णा' हा सन्मान बहाल करण्यात यावा :)
3 Dec 2013 - 12:38 pm | कपिलमुनी
हत्ती चालला की कुत्री भुंकतात ,
तुमच्या पुढच्या लेखनाला शुभेच्छा !
242 वाचने>> बघा तुमचा वाचक वर्ग केवढा मोठा आहे..
3 Dec 2013 - 1:43 pm | साती
लहानपणी किशोर, ठकठक इ. मासिकांत अश्या कथा असाअच्या.
आजकाल ही मासिके बहुतेक निघत नसल्याने किंवा निघूनही कुणी वचत नसल्याने जी पोकळी तयार झाली होती ती जीवनभाऊंच्या या कथेने भरून निघाकी.
पोकळ्या तयार झाल्याचे आपण कितीदा वाचतो / ऐकतो पण पोकळी भरून काढल्याचे काम सहसा दिसत नाही.
हे असेच एक दुर्मिळ उदाहरण.
3 Dec 2013 - 3:43 pm | दिपक.कुवेत
लगे रहो! आपलं साहित्य अजरामर आहे......आणि हेच अजरामर साहित्य तुम्हाला अमर करेल!
3 Dec 2013 - 3:53 pm | शिद
=))
3 Dec 2013 - 4:17 pm | मिनेश
>>>>मग़ तो स्पाइडर मँन सारखे उडायचा प्रयत्न केला , पण जेव्हा त्याच्या पायाला लाग़ले तेव्हा त्याचे प्रयत्न बंद झाले.
हे भारीच......पायापेक्षा डोक्याला लागले असते तर बरे झाले असते.....
3 Dec 2013 - 4:18 pm | जेनी...
=))
3 Dec 2013 - 7:25 pm | सोत्रि
एका लहानग्या जिवामार्फत त्यांनी पोहोचवलेले त्यांच्या संवेदनशील मनातले झंकार म्हणजे जीवनभौची ही कथा. रुपकात्मक ललितबंध म्हणून ह्या कलाकृतीकडे बघितल्यास जीवनभौचा ह्या प्रकारतला हातखंडा दिसून येतो. वर्तमानाच्या परिप्रेक्षात बालमनाच्या परिप्रेक्षातून बघायला लावणे ही जीवनभौची खासियत आहे.
विश्वाचा पसारा, त्यापुढे मानवाचे खुजेपण आणि सांप्रतची मनुष्याची 'लार्जर दॅन लाइफ' होण्याची लालसा ह्यावर मार्मिकतेने केलेले भाष्य मन मोहवून जाते. त्यासाठी त्यांनी खुबीने वापरलेले 'आकाश' हे त्या मुलाचे नाव आणि त्या मुलाला पडणारे निरागस प्रश्न ह्यातून जीवनभौची प्रतिभा दृष्टीगोचर होऊन जाते.
वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व त्यांना समजले असल्याने त्यांनी विज्ञान प्रदर्शन, अवकाश, प्लॅस्टिकचे अवकाश यान ह्यांची रुपकात्मक सांगड कथेत इतक्या सहजपणे केली आहे की जीवनभौचे असामान्यपण त्यातुन अलगद उलगडले जाते.
'आसा कसा रे तु वेग़ळा वेग़ळा, आसा का वाग़तोस सग़ळ्याच्या मना वेगळा ,' ह्या ओळीतून त्यांचे बहुआयामी व्यक्तीमत्व कळून येते आणि कथेशी वाचक चक्क एकरुप होतो.
- (समिक्षक) सोकाजी
3 Dec 2013 - 9:26 pm | मुक्त विहारि
परीक्षण
4 Dec 2013 - 5:36 am | स्पंदना
जीवनभु नुक्ते वाचायला लावतात.
तुम्ही परि, गोचर खेचरायाम जायाम...
राहू दे!! मी जातेच कशी!
4 Dec 2013 - 9:42 am | पियुशा
खो ना जाये ये तारे जमींपर ;)
जिवन्भो तुम्ही द्याच एक लेख मुपिमध्ये तिथे ब्रम्हे नावाचे खुप नावाजलेले लेखक आहे तुमच्या लेखणीतही ती ताकद आहे " ब्र्म्हे " सारखे लै फेमस होता येइल तुम्हाला बघा, घ्या मनावर !
4 Dec 2013 - 10:34 am | मुक्त विहारि
ब्रम्हे ते ब्रह्मेच...
http://www.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm
5 Dec 2013 - 1:20 pm | पियुशा
लोल.. धन्स मुवी..
ब्रम्हेचा हा धागा वाचुन पुन्हा एकदा ड्वाले पाणावले ;) खरच ब्र्हम्हे ते ब्र्म्हेच ;)
6 Dec 2013 - 9:08 am | मुक्त विहारि
कधी वैताग आला....
डोके दुखायला लागले...
किंवा...
निराश वाटायला लागले... तर...
खालील लिंक उघडा...
https://www.facebook.com/Muktapeeth
रामबाण उपाय...
4 Dec 2013 - 10:17 am | नाखु
हि "नूरा" कुस्तीचा प्रकार वाटतोय्.(एका आय डी ने धागा टाकायचा अन दुसर्या आय्डी ने धुरळा ऊडवायचा)
4 Dec 2013 - 10:22 am | मिनेश
जीवनभौ...........JULES VERNE नंतर तुम्हीच..
4 Dec 2013 - 3:09 pm | थॉर माणूस
तुम्ही अजून त्यांच्या खर्य्रा खुर्य्रा कल्पना-विज्ञानकथा वाचल्याच नाहीत. तुमचा वर्न झक मारेल, काय समजलात?
4 Dec 2013 - 9:31 pm | मिनेश
वाचल्या आहेत हो......त्यांचा फ्यान आहे आपुन.....
4 Dec 2013 - 1:29 pm | आदूबाळ
मला कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली एकदम! आमच्या ब्येमशीशी कालेजात अशाच सुदंर चेडवा असायच्या.
4 Dec 2013 - 3:11 pm | बॅटमॅन
खपल्या गेले आहे =))
बाकी आमच्या श्योइपीत किमान ब्याचमध्ये मात्र यांची वानवाच होती. वर्गात तर असले एकेक चेडू होते काय साङ्गावे ;) विरक्तीस कारणीभूत होऊ शकतील असले अनेक =))
4 Dec 2013 - 3:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
आज पुन्हा चुकुन ऑफिसमध्ये उघडला आणि ......
4 Dec 2013 - 4:39 pm | शैलेन्द्र
जिवन्बौ,
जाउद्या,
लक्ष नका देवु..
ही बाल्कथा आहे हे सांगूनही सगळे बाप्ये आन बाप्या इथे येवुन गोंधळ घालतात
पुढच्या वेळी एक काम करा,
लेख टाकला की त्याच्यावरच्या प्रतिक्रिया पण तुम्हीच लिहून द्या.. फुल्ल पॅकेज.. चान्सच नका देवु या सैतनांना.. कितीतरी प्रतीभाशाळी लेखक या लोकांमुळे इथुन निघुन गेले. पण तुम्ही हार मानू नका..