माझी पार्श्वभूमी :
१) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण.
२) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली.
३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती.
५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .
६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल.
सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.
अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते.
संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत.
भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
प्रतिक्रिया
31 Oct 2013 - 2:53 pm | मुक्त विहारि
"त्यामुळे ही संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर देशविभाजन, अतिरेकी हल्ले, सशस्र दंगली इ. गंभीर समस्या निर्माण होतात हे ओळखून सर्वांनाच १ मुलापेक्षा जास्त मुले होउ न देणे हे सक्तीचे केले पाहिजे. "
समान नागरी कायद्याच्या मसूद्यात हे पण येतेच.
31 Oct 2013 - 3:28 pm | संजय क्षीरसागर
पहिले छूटच मी उपाय सांगितला होता!
1 Nov 2013 - 2:57 pm | प्यारे१
बेंबट्याचं नाव घेते माझा'च' नंबर 'नेहमीच' पहिला'च'! ;)
2 Nov 2013 - 12:35 am | संजय क्षीरसागर
आता यात स्वतःला त्रास करुन घेण्यासारखं काय आहे?
31 Oct 2013 - 2:50 pm | बुडबुडा
अत्यन्त टोकाचि निष्ठा आणि अत्यन्त टोकाचा द्वेश हा फक्त सन्घाच्याच लोकान्कडुन होवु शकतो याचेच हे उदाहरण आहे.
सुरुवातीला सन्घाच काम केल्यावर सुद्धा किती टोकाचि मते तयार होतात !!!
31 Oct 2013 - 2:54 pm | मुक्त विहारि
हे माहीत आहे, त्याची मते टोकाची होत नाहीत.
31 Oct 2013 - 3:27 pm | विटेकर
सहमत !
31 Oct 2013 - 3:14 pm | विटेकर
नसबंदी संघ विचारांची नसून तुमची स्वतःची झाली आहे.
संघाचे काम करण्यासाठी तुमच्यावर कोणी जबरदस्ती केली होती का ? मग कशाला गळा काढताय ?
काहीतरी बकून लोकांची सहानुभुती मिळवायची चीप ट्रिक आहे ही! आणि धागा काढून कुठे गायब झाला ? यातच सारे काही आले..
(बघा ना हो .. माझ्या आजीला मारले .. माझ्या वडिलांचापण खून झाला... असो. तशातलाच हा प्रकार आहे झालं!)
31 Oct 2013 - 3:41 pm | राजु भारतीय
व्यस्त होतो काहि काळ त्यामुळे उत्तरे देता आलि नाहीत. विटेकर, प्रष्न जबरदस्तीचा कुठाय ? मला जे दिसलं, दिसतंय, त्याच्या विषयी मी लिहीलं आहे ! आणि सहानुभुती तुम्ही मला कशी देणार ? वैचारीक नसबंदी चा अर्थ सरासार विचार न करता !!
31 Oct 2013 - 3:48 pm | मुक्त विहारि
पण हे असे विचार फक्त हिंदूंनीच करायचे की, मुस्लीम बांधवांनी पण करायचे.
4 Nov 2013 - 4:51 pm | पिशी अबोली
अहो पण तुम्ही कितीतरी प्रश्नांना उत्तरं देणं टाळताय की हो... खरोखर स्वयंसेवक होता का तुम्ही कधी हे सांगा ना...
31 Oct 2013 - 3:58 pm | अवतार
आणि इतर सर्व समाज हा पुरोगामी आहे असा समज करून घेणे हे सोयीस्कर असले तरी हितावह खचितच नव्हे. कोणताही फ़्यासिस्ट विचार हा मानसिक असुरक्षिततेतून जन्माला येतो. स्वत:च्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले की सगळी तत्वज्ञाने खुंटीला टांगली जातात. सामान्य जनतेच्या ह्याच मानसिक स्थितीचा फायदा उठवणे हेच प्रत्येक समाजातील प्रस्थापित वर्गाचे लक्ष्य असते. ह्या देशात आधीच अस्तित्वात असलेल्या चातुर्वर्ण्य आणि जातीभेदामुळे हे काम अजूनच सोपे झाले आहे. संघ काय करतो आणि काय नाही यापेक्षा एक समाज म्हणून आपण आपल्या भूतकाळातील दुष्कृत्यांची आणि त्या कृत्यांविषयीच्या वर्तमानातील अभिमानाची सामुदायिक जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहोत का हे अधिक महत्वाचे आहे.
हिंदूंचे संख्याबळ
हिंदू समाज हा अल्पसंख्य होईल अशी हाकाटी करण्याआधी हिंदू म्हणजे नेमके कोण ह्या प्रश्नाचे उत्तर मिळणे हे अत्यावश्यक आहे. जर हिंदू हा एक धर्म असेल तर पितृभू आणि पुण्यभू ही वांशिक आणि भौगोलिक बंधने स्वत:च्याच धर्माला घालणे म्हणजे स्वत:च्याच धर्माच्या प्रसाराला पायबंद घालणे नव्हे काय?
ऐतिहासिक काळापासून विचार करायचा झाला तर ह्या देशात मुस्लिमांची संख्या मुख्यत: धर्मांतराच्या आधारे वाढली आहे. जन्मदराच्या आधारावर नव्हे. जर अल्पसंख्य होण्याची इतकीच धास्ती वाटत असेल तर स्वत:च्या धर्माचा प्रसार करून इतर धर्मियांना स्वधर्मात घेणे हा अधिक चांगला मार्ग असू शकत नाही का?
इथे धर्मांतर करणे म्हणजे छळाने किंवा कपटाने असा अर्थ अपेक्षित नाही. बौद्ध धर्म हा ह्याच भूमीत उगम पावून सर्व आशिया खंडात पसरला तो काही छळ-कपट करून नव्हे. जे याच भूमीत निर्माण झालेला बौद्ध धर्म करू शकतो ते आजचा हिंदू धर्म का करू शकत नाही?
हे नक्कीच होऊ शकते. परंतु त्यासाठी धर्म आणि वांशिकता ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत आणि त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.
6 Nov 2013 - 5:49 pm | पुष्कर जोशी
प्रयत्न चालू आहे आपल्या मदतीची अपेक्षा . .
http://lalmirchi-anilsaumitra.blogspot.in/2011/01/blog-post_7016.html
6 Nov 2013 - 5:54 pm | पुष्कर जोशी
आणखीन काही दुवे http://www.maayboli.com/node/21086
6 Nov 2013 - 5:57 pm | पुष्कर जोशी
http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:9HjUtRcLC34J:www.lo...
6 Nov 2013 - 11:53 pm | अवतार
त्याला प्रचार म्हणण्यापेक्षा पश्चातबुद्धी म्हणणे योग्य होईल. जे आदिवासी आपल्याच देशात हजारो वर्षे राहत आहेत त्यांच्यापर्यंत बाहेरचे मिशनरी अगोदर पोचतात आणि मग आम्हाला जाग येते? ह्याचा अर्थ काय? जर हे मिशनरी आदिवासींपर्यंत पोचले नसते तर हे कार्यक्रम झाले असते काय? प्रत्येक वेळी कोणीतरी आक्रमण केल्याशिवाय आम्हाला आमच्याच धर्माचा प्रचार करण्याची आठवण का होऊ नये?
ह्याचे मुख्य कारण असे आहे की ह्या धर्माकडे स्वत:चे असे एकच निश्चित तत्वज्ञान नाही. त्यामुळे प्रचार नेमका कशाचा करायचा ह्याचे उत्तर मिळणे अवघड होऊन बसते. गेल्या हजार वर्षांचा इतिहास चाळून पाहिला तर असे दिसते की आशिया खंडात जिथे जिथे हिंदू धर्म पसरलेला होता तिथे आज इतर धर्मांनी आपापले बस्तान बसवले आहे. हे अल्पसंख्य होण्याचे भय इतर धर्मांना न वाटता केवळ हिंदू धर्मियांनाच का वाटावे? कायम कोणत्यातरी धर्माच्या आक्रमणाला प्रतिक्रिया म्हणूनच जर हिंदू धर्माचा प्रचार होणार असेल तर गेल्या हजार वर्षांत जे घडले त्यापेक्षा फार काही वेगळे येत्या हजार वर्षांत घडेल असे वाटत नाही.
7 Nov 2013 - 11:03 am | राजु भारतीय
पुष्कर जोशी : आपण अगदी शोधून नेमके चुकीची उदाहरणे आणि चुकीच्या लिंका दिल्या आहेत. कदाचित आपण दिलेले उदाहरण त्यातल्या त्यात आदर्श असू शकते ! स्वामी असिमानंद यांच्या शबरी कुंभा विषयी आपण लिहीले आहे ती डायरेक्ट मिशन-यांना आव्हान देणारी खेळी होती. पण आपण असे म्हणू शकता की असेच काही प्रयत्न करून धर्मांतर रोखता येऊ शकते आणि त्याचे आपण समर्थन करू शकता. गरज आहे ती त्या भागात म्हणजे डांग, पेठ, कळवण, डहाणू, इत्यादी भागात आदिवासींच्या ( संघाच्या भाषेत वनवासींच्या ) सामाजिक उत्थानाची ! धार्मिक कार्यक्रम करून लोकांना जोडता येते ही अत्यंत वेडपट संकल्पना आहे. त्यांचे शिक्षण,आरोग्य या विषयी आदिवासींना निश्चिंत असण्याची गरज आहे आणि कार्यक्रम तसे दिले पाहिजेत. हो, हो तुम्ही मला कदाचित असे सांगाल की कल्याण आश्रमाच्या आश्रम शाळा आहेत, औषधे पुरविण्याची व्यवस्था आहे वगैरे - पण गेल्या एकसष्ट वर्षात ( कल्याण आश्रमाची स्थापना १९५२ ची ) काय आणि किती परिणामकारकता साधली आहे याचे आकडे आतल्या गोटातल्या लोकांना विचारा ! परिणामकारकता साधली असती - तर बाहेरच्यांकरीता एकच मोजपट्टी पुरेशी आहे - चोपन्न वर्षांच्या कल्याण आश्रमाच्या कामानंतर धर्मांतर रोखण्यासाठी असिमानंदना डांग मध्ये धार्मिक कार्यक्रम करून आदिवासींना वश करावे लागले आणि इतर धर्म प्रसाराकांसाठी शक्ती प्रदर्शन करावे लागले. एकसष्ट वर्षात - शहाणे करून सोडावे सकळ आदिवासी- हे कल्याण आश्रमाला आणि पर्यायाने संघाला जमले नाही. याचे एकमेव कारण तसा प्रामाणिक उद्देशच नाही. केवळ संघटने साठी संघटना बांधून त्याच्या जाहिराती इतर ठिकाणी वापरून संघटन शाबूत ठेवणे या पलीकडे आजवर तिकडे काही घडत नाही. बरे यासाठी मी आपण घात केला असे म्हणालो नाही. ज्या लिंका आपण दिल्या आहेत त्या मध्ये स्वामी असिमानंदांची ( नबकुमार बिभूतीभूषण सरकार : मूळ गांव कमरपुकार, जिल्हा हुगळी, प. बंगाल ) गोडवी हिंदूंचे तारणहार म्हणून गाईली आहे. पण हे असिमानंद बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्याखाली गेली अनेक वर्षे जेल मध्ये आहेत. हे असिमानंद फ़ेमस यासाठी आहेत की त्यांनी अटक झाल्या झाल्या काही अवधीतच त्यांच्या सगळ्या सहका-याची नावे पटापट सांगून टाकली! ( नकारात्मक कमीटमेंट ही नाही ) या देशात ठीकठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप लोकांचे बळी घेणा-या लोकांचा आपण उदोउदो करणार असाल ( ते कोणत्याही जाती धर्माचे असोत ) तर ते जबाबदार भारतीयाचे लक्षण नव्हे. मी ही ( जन्माने आणि वैयक्तिक आचारणात) हिंदू आहे पण मला अशा देशद्रोही ढोंगीलोकांची लाज वाटते.
7 Nov 2013 - 2:35 pm | श्रीगुरुजी
>>> पण हे असिमानंद बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्याखाली गेली अनेक वर्षे जेल मध्ये आहेत. हे असिमानंद फ़ेमस यासाठी आहेत की त्यांनी अटक झाल्या झाल्या काही अवधीतच त्यांच्या सगळ्या सहका-याची नावे पटापट सांगून टाकली! ( नकारात्मक कमीटमेंट ही नाही ) या देशात ठीकठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप लोकांचे बळी घेणा-या लोकांचा आपण उदोउदो करणार असाल ( ते कोणत्याही जाती धर्माचे असोत ) तर ते जबाबदार भारतीयाचे लक्षण नव्हे.
स्वामी असीमानंद, साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहीत व इतर ६-७ जणांना तद्दन खोट्या आरोपांखाली अडकवून ठेवले. ते ऑक्टोबर २००८ पासून विनाजामीन अटकेत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास सुरवातीला महाराष्ट्र पोलिस, नंतर महाराष्ट्र एटीएस, नंतर एसआयटी क्र. १, नंतर सीबीआय, त्यानंतर एसआयटी क्र. २ व नंतर एनआयए अशा विविध तपाससंस्थांनी करून व त्यांच्याविरूद्ध पुरावा तयार करण्यासाठी जंगजंग पछाडून सुद्धा कणभरही पुरावा तयार करता आलेला नाही. त्यामुळे त्यांना पकडून ५ वर्षे होऊनसुद्धा आजतगायत न्यायालयात आरोपपत्र दाखल झालेले नाही. या सर्वांचा कबुलीसाठी अनन्वित छळ करण्यात आला. प्रज्ञासिंगला अश्लील व्हिडिओ दाखविणे, अन्नात मांस मिसळणे असेही प्रकार केले. तिला कॅन्सर झाल्याचे तपासणीत उघड झाल्यावरसुद्धा उपचारासाठी १ मिनिटही सोडलेले नाही. तिच्या वडीलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा तिला सोडले नव्हते. असीमानंदांचा अनन्वित छळ करून खोटा कबुलीजबाब लिहून घेण्यात आला. कारगिल युद्धात लढलेल्या कर्नल पुरोहीतांना सुद्धा यात विनाकारण अडकविले आहे. भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी २००९ च्या निवडणुकीच्या तोंडावर या सर्वांवर खोटे आरोप लावून त्यांना पकडले व नंतर इतके आटोकाट प्रयत्न करूनसुद्धा आरोपपत्र दाखल करण्याएवढासुद्धा पुरावा मिळालेला नाही. पुरावा मिळणारच नाही कारण मुळातच आरोप खोटे आहेत.
तुम्हाला यातील धादांत खोटेपणा लक्षात आला नाही याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही.
7 Nov 2013 - 2:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
:) :) :) :)....गुरुजींचा सिक्सर!! +१
31 Oct 2013 - 4:37 pm | जेपी
भाग मिल्खा भाग या चित्रपटात लहान मिल्खाला आणी ईतर लोकांना निर्वासीत छावणीत जेवण देणारे संघ कार्यकर्ते दाखवलेत . आठवत नसल तर बघा पिक्चर
1 Nov 2013 - 9:22 am | उद्दाम
हायला गंमतच आहे.
मागच्या पानावर मी शिनेमाचे उदाहरण दिले तर आयुष्य षिनेमा नव्हे, असे मला संघी डोस दिले.
आता हेच संघाचे काम शिकायला षिनेमा बघायला सांगतात.
:)
31 Oct 2013 - 4:37 pm | विटेकर
गेली ८८ वर्षे वर्धिष्णु होणार्या एका जगन्मान्य संघटनेबद्दल आपण ही विधाने केली आहेत. कृपया आपण आपला वकूब सांगावा.असे अधिकाराने म्हणावे अशी आपण आपली काय क्षमता सिद्ध केली आहे ?
हे ध्यानात घ्यावे की, सुर्याजी पिसाळाने फितुरी केली म्हणून शिवप्रभुनां कमीपणा येत नाही !
या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे
हे जरा उलगडून सांगाल का ? संघ कामाची आवश्यकता का आहे, त्याबाबत संघाची भूमिका काय आहे ? या विषयातील तुमचे आकलन काय आहे ? ते तुम्हाला नीट समजले आहे का ? "एके पूछ् देखीली तो म्हणे हत्ती झाडू सारखा" हा वस्तुस्थितीचा नसून त्याच्या वकूबाचा भाग असतो. अशी जाहीर विधाने करण्यापूर्वी एकदा आरश्यात तोंड बघायचे होते !आणि म्हणून मी तुम्ही स्वतः ची नसबंदी करुन घेतली आहे असे म्हणालो.
प्रष्न जबरदस्तीचा कुठाय ?
जबरदस्ती नव्हती ना , मग काही दिवस सातत्याने काम करताना, केन्द्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क करताना तुमची बुद्धी काय ** खात होती का ? की एका रात्रीत संघकामाचा उपयोग नाही असा साक्षात्कार झाला ?
31 Oct 2013 - 4:45 pm | मुक्त विहारि
ही म्हण्/वाक्प्रचार वाचला होता.
अनुभवतोय मात्र प्रथमच.
31 Oct 2013 - 7:59 pm | विनोद१८
...सम्पुर्ण सहमत....विटेकर तुमच्याशी.
राजू भारतीय जरा याचा प्रतिवाद करावा..आपण स्वताला 'कोणे एकेकाळचे स्वयम्सेवक' म्हणवता याचीच शन्का येते, पटत नाही. जे कधीच प्रत्यक्ष सन्घात गेले नाहीत केवळ कुठेतरी काहीतरी वाचुन आपली मते व्यक्त करतात आणि 'विचारवन्ताचा' आव आणतात अशापैकी एकाने लिहीलेला लेख वाटतो तुमचा. इतकी वर्षे सन्घात जाउनही सन्घाचे आकलन झाले नाही असे दिसते.
विनोद१८
6 Nov 2013 - 6:01 pm | पुष्कर जोशी
संघाचे आकलन एकदा निवासी शिबीर केले ( कळत्या वयात ) कि लगेच होते .... मला वाटत नाही " राजू भारतीय " ह्यांनी साधे निवासी शिबीर केले असेल ...
31 Oct 2013 - 4:54 pm | आदिजोशी
उद्दाम नावाचा एक भयानक विनोदी डु.आय.डी. जन्माला आला आहे ह्याचा साक्षात्कार झाला. खरा आय.डी. असेल तर इतका बिंडोक माणूस मी दुसरा पाहिला नाही इतकेच म्हणेन.
31 Oct 2013 - 5:15 pm | टवाळ कार्टा
+९९९९९९९९९९९९९
31 Oct 2013 - 5:21 pm | मुक्त विहारि
अहो फार गहन विचार कर्रुन लिहीणारे पण एक जण आहेत.त्यांचे पण असेच काहीसे अहंमन्य विचार असतात.आजकाल ते नसतात इथे,बहूदा ते नथुचुर्ण घेत असावेत.
31 Oct 2013 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चा वाचतोय. कडाक्याची चर्चा होऊ द्या. फक्त व्यक्तिगत रोख आणि भाषेतील शब्दांचा तोल सांभाळावा, एवढेच म्हणेन.
बाकी, हम दो हम तीनचा नारा पटणारा नाही. (आता हम दो हमारे बारा कसे चालतात तो वेगळा मुद्दा) बाकी, शांततेने चर्चा चालू द्या. :)
-दिलीप बिरुटे
31 Oct 2013 - 5:53 pm | मुक्त विहारि
सध्या नथुचुर्ण घेण्यात मग्न असल्याने, चिंता नसावी.
आता कुणीतरी अहंमन्यपणे आणि हेकेखोरपणे आपलेच घोडे पुढे दामटत असेल तर काय करणार?
31 Oct 2013 - 6:42 pm | आदिजोशी
हम पाच हमारे पच्चीस
31 Oct 2013 - 5:59 pm | पिशी अबोली
काकाश्री, ससंदर्भ सांगता का जरा? नाव-गाव सांगू नका...कुठल्या प्रांताची काय जबाबदारी होती आणि त्यानंतर राष्ट्रीय जबाबदारी काय होती एवढच सांगता का? तुमचा एकदा संघदृष्ट्या परिचय द्या म्हणजे झालं... नाही, थोडसं आश्चर्य वाटलं, कारण इतका सी.व्ही. टायप परिचय संघात करत नाहीत... तुम्ही बैठकांना वगैरे देत होता तसा साधा-सरळ परिचय द्या...
यात मोठ्ठं काही आश्चर्य नाही.. संघात काहीही जबाबदारी नसणार्या स्वयंसेवकालाही हे करता येतं कारण हे सगळे अधिकारी सतत प्रवासात आणि संपर्कात असतात...
31 Oct 2013 - 6:05 pm | मुक्त विहारि
+ १
आणि हे सगळे काम ते हसतमुखाने करतात.
1 Nov 2013 - 3:58 pm | llपुण्याचे पेशवेll
आता कळेल खरा संघीष्ट होता का नाही ते. ;)
संघीष्टांची एक खास पद्धत असते. ती दिसली तरी पुरे.
नाहीतर सदर लेख मी पूर्वीच म्हटल्या प्रमाणे टेलेब्रँडच्या जाहीरातीप्रमाणे वाटला.
6 Nov 2013 - 6:05 pm | पुष्कर जोशी
आपल्या घरी सरसंघचालक येऊन गेले तरी कोणास ना सांगणारा असतो स्वयंसेवक... प्रसिद्धीपरान्मुखखाची सीमा इथे तर काही वेगळेच दिसत आहे ....
1 Nov 2013 - 2:43 pm | प्रकाश घाटपांडे
थोड्या फार फरकाने प्रत्येक पक्ष संघटना या मधे हेच असत. तो एकप्रकारचा कल्ट असतो. इथे पहा कल्ट विषयी http://www.misalpav.com/node/25873
if you are not with me you are with them अशी विचारश्रेणी लोकांना पटते चालते आवडते.
1 Nov 2013 - 3:01 pm | बॅटमॅन
नसबंदीला समर्थन देणार्या धाग्याने इतके प्रतिसाद व्यायल्याची एक मिपाकर म्हणून शरम वाटल्या गेली आहे.
1 Nov 2013 - 3:58 pm | अनिरुद्ध प
?
1 Nov 2013 - 3:48 pm | पैसा
धाग्याच्या चर्चा विषयाच्या बाजूने आलेल्या प्रतिसादात २० उद्दाम यांचे तर राजू यांचे ९ आहेत. धागा कोणाचा आहे हे परत तपासून पाहिले.
1 Nov 2013 - 8:23 pm | श्रीगुरुजी
या लेखाचे लेखक हे कधीही संघाशी संबंधित नव्हते या निष्कर्षावर मी आलो आहे. संघविरोधकांची ही एक चाल असते. मी आधी संघात होतो असे सांगून तिथल्या जातीयवाद वगैरे कारणांमुळे मी बाहेर आलो असे सांगणे ही एक पध्दत आहे. वाचणार्याला वाटावे की प्रत्यक्ष संघात असलेला माणूस तिथे जातीयवाद आहे असे सांगतो व बाहेर पडतो, म्हणजे तिथे नक्कीच जातीयवाद असणार. प्रत्यक्षात हा गोबेल्स नीतिने केलेला अपप्रचार असतो.
असो. आता खालील मुद्दे पाहू.
>>> ३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.
यांच्यावर नक्की कोणती राष्ट्रीय जबाबदारी आली होती?
>>> राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल.
समजा राष्ट्रीय आंदोलन नसले तर काय फरक पडतो? या देशात अनेक गोष्टी राष्ट्रीय तर सोडाच पण स्थानिक पातळीवर नसून देखील होतात.
>>> सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा.
असा कोणताही दुभंग संघाने निर्माण केलेला नाही. या देशातील सर्व नागरिकांना समान कायदा असावा, एखाद्या विशिष्ट धर्माचे फाजील लाड होऊ नयेत, सीमेवरील काश्मिरसारख्या राज्याला स्वायत्तता देऊन ते कायमस्वरूपी भारतापासून दुरावण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगणे इ. गोष्टी म्हणजे दुभंग निर्माण करणे नसून ती देशहिताचीच भूमिका आहे.
>>> त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे.
लव्ह जिहाद हा प्रकार अस्तित्वात आहे. जरा वाचन वाढवा. दुभंग हे राष्ट्रीय पाप १९४७ पासून नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने निर्माण केले आणि त्यानंतर "मुस्लिमांचा भारतातील राष्ट्रीय संपत्तीवर सर्वात पहिला हक्क आहे" असे अत्यंत पक्षपाती विधान करणार्या मौनमोहन सिंगांपर्यंत ही घातक परंपरा सुरूच आहे.
>>> सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.
असा कोणताही गैरसमज संघस्वयंसेवकांच्या डोक्यात, रक्तात किंवा मनात नाही. हा केवळ तुमचा कल्पनाविलास आहे.
>>> अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही.
हे तुम्ही कोण ठरविणार? तसं पाहिलं तर या देशाला काँग्रेसची सुद्धा इतर कोणाचीच आवश्यकता नाही.
>>> संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.
हे कोणी सांगितले तुम्हाला? या बाबतीत काही पुरावे द्या. १९९५ - १९९९ या काळात पुणे-मुम्बई द्रुतगती मार्ग, मेळघाटात प्रथमच झालेले डांबरी रस्ते, सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प, कृष्णा खोर्यातील पाणी अडविण्याचे प्रकल्प, नदीजोड संकल्पना इ. प्रगतीची कामे संघाशी संबंधित असलेल्यांकडूनच झालेली आहेत हे लक्षात घ्या.
>>>> - कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो.
प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमध्ये दोष आहेत हे शाळकरी मुलगा सुद्धा सांगू शकेल. त्यासाठी संमोहनाची अजिबात गरज नाही. संघ समांतर व्यवस्था उभी करतो म्हणजे नक्की काय करतो. जरा सोदाहरण स्पष्ट करा.
>>> वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची.
बर. असे प्रयत्न कोण करतात ते सांगाल का?
>>> समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते.
संघाचे कोणते सामाजिक प्रकल्प हे तद्दन सत्ताकेंद्री, मनुष्य केंद्री व आतबट्ट्यातले आहेत याची जरा यादी देता का?
>>> संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत.
अत्यंत हास्यास्पद विचार. आपण काय लिहिले आहे ते २-३ वेळा नीट वाचा व त्यावर मनन करा. त्यातील अर्थहीनता व अतार्किकता तुमच्या लक्षात यावी हीच सदिच्छा.
>>> भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर.
कोणी पाडल्या या रेषा? आणि कोणाच्या स्वार्थासाठी पाडल्या गेल्या?
>>> त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
कशा पुसणार या रेषा? ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत व भळभळत ठेवल्या जाण्याचे तुम्हाला दु:ख वाटते व त्यामागे स्वार्थ, कपट व देशाचे अतोनात नुकसान आहे असे तुम्हाला वाटते.
पण १९४८ च्या गांधीवधाच्या जखमा, १९९२ च्या जखमा, २००२ च्या जखमा इ. वखवखत व भळभळत ठेवल्या जाण्याचे तुम्हाला दु:ख वाटत नाही का व त्यामागे स्वार्थ, कपट व देशाचे अतोनात नुकसान आहे असे तुम्हाला वाटत नाही का? तसे वाटत असेल तर त्या जखमा कायम उघड्या ठेवणार्यांविरूद्ध तुम्ही काय करणार आहात?
2 Nov 2013 - 12:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हेचं म्हणतो मी. ह्यांना संघ म्हणजे काय काँग्रेस वाटला काय अशी दुफळी माजवुन फायदा मिळवायला. मला वाटत नाही ह्या गृहस्थांना साधी शाखेची प्रार्थना पण येत असेल म्हणुन.
2 Nov 2013 - 10:35 am | श्रीगुरुजी
>>> ह्यांना संघ म्हणजे काय काँग्रेस वाटला काय अशी दुफळी माजवुन फायदा मिळवायला.
१०१ टक्के सहमत! समाजात दुफळी माजवून आपली पोळी भाजून घ्यायला संघ म्हणजे काँग्रेस नव्हे.
2 Nov 2013 - 11:37 am | ध्यानस्थ बगळा
जोक ऑफ द डे
2 Nov 2013 - 8:15 am | पिशी अबोली
ते संघ स्वयंसेवक कधीही नव्हते असंच खात्रीने वाटतंय... विकिपिडियावरुन संघाची माहिती घेऊन आपलं घोडं दामटवायचा प्रयत्न आहे...
2 Nov 2013 - 12:05 pm | विनोद१८
...हा जाणीवपूर्वक टाकण्यात आलेला धागा आहे, हा जो कोणी 'राजू भारतिय' नामक धागाकर्ता बोगस दिसतोय. तो स्वयम्सेवक असणे श्क्यच नाही, नुसती काडी लावून मजा बघतोय तो. त्याला आता प्रतिवाद न करणे हेच उत्तम.
विनोद१८
2 Nov 2013 - 1:00 pm | प्रसाद गोडबोले
ओ राजु भारतीय , ते राम मंदीर राहु द्या हो , राम आपला तुमच्या आमच्या सारखा गरीब बिचारा माणुस ...
तुम्हाला हुबाल माहितीये का हो ? त्याचे मंदीर कुठे आहे ? किंव्वा बामियान विषयी तुमचे काय मत आहे ? किंव्वा हगिया सोफिया चर्च विषयी तुमचे काय मत आहे ? किंव्वा "विष्णोर्ध्वजःस्थापितः" असे लिहिलेला शिलालेख कुठे आहे हो ? ब्रिक लेन सिनेगॉग विषयी आपल्याला काय माहीती आहे ?
असो . झोपलेल्यांना जागं करता येतं , झोपंचं सोंग घेतलेल्यांना / किंव्वा डोळ्यावर कातडी ओढुन घेतलेल्यांना कितीही समजावले तेरी काय समजणार ?
||तुका म्हणे उगी रहावे| जे जे होईल ते ते पहावे ||
2 Nov 2013 - 7:02 pm | अमोल मेंढे
चालु द्या....वाचतोय...
2 Nov 2013 - 10:06 pm | उगा काहितरीच
ब-याच मिपाकरांप्रमाणेच मी पण लहानपणि शाखेत जात होतो. आता जरी प्रत्यक्ष शाखेत जात नसलो तरी संघाबद्दल कटु भावना मनात नाहीत. धागाकर्त्याचि कमालिची टोकाची भुमीका बघुन आश्चर्य वाटले.
हे तर नविनच काहितरी.. देशात बिनकामाच्या कितीतरी संघटना , व्यक्ती आहेत. त्यामानाने संघ निश्चीतच निरुपद्रवी आहे.
आणखी एक मुद्दा म्हणजे वरील लेखावर आलेल्या ब-याच विचीत्र प्रतिक्रीया..मिपावर फारसे प्रतिक्रीया वगैरे देणे होत नसले तरी नियमीतपणे मिपा वाचत असतो. ब-याचदा थट्टा मस्करी चालु असते पण खालच्या पातळीवर पोहोचत नाही. परंतु सदरील लेखावर अतिशय हिनकस प्रतिक्रीया पाहुन वाईट वाटले. :( विशेषत: पेठकर काका यांच्या सम्यक, शांत प्रतिक्रीयेवर उद्दाम यांची त्यांच्या नावाप्रमाणेच आलेली आलेली प्रतिक्रीया वाचुन वाईट वाटले.
2 Nov 2013 - 10:40 pm | आनंदी गोपाळ
.
3 Nov 2013 - 10:38 pm | सुधीर मुतालीक
माझ्या या देशात सगळ्यांना सगळं काही म्हणण्याचा अधिकार आहे. हममम....त्यामुळे चालु द्या !
4 Nov 2013 - 2:09 am | भडकमकर मास्तर
असेच अनुभव येउद्यात...
वीकांताला करून बघेन.
5 Nov 2013 - 10:37 am | जेपी
हाच लेख फेसबुक टाकला गेलाय . लेखक महाशय ओळखले गेले आहेत . त्यामुळे सगळा खटाटोप प्रसिद्धी साठी असा संशय पक्का होत आहे .
5 Nov 2013 - 10:57 am | पैसा
व्यनि केलात तरी चालेल.
5 Nov 2013 - 1:42 pm | इष्टुर फाकडा
व्यनि प्लीज :)
5 Nov 2013 - 1:57 pm | विटेकर
द्या इथेच.... बघु या तरी ...
5 Nov 2013 - 1:58 pm | विटेकर
द्या इथेच.... बघु या तरी ...
5 Nov 2013 - 1:59 pm | जेपी
माझा थोडा गोंधळ झाला . सदरील पोष्ट त्या व्यक्तिने copy paste करुन टाकली आहे .सोबत मिपाची लिंक दिली आहे . त्या व्यक्तिचे म्हणणे मांडलेले नाहि त्यामुळे सदरील व्यक्तिच लेखक आहे का याबद्दल गोंधळ होत आहे .
6 Nov 2013 - 6:38 pm | राजु भारतीय
तथास्तु, माझे लिखाण चेपू वर कुणीतरी चिकटवले आहे हे वाचून गंमत वाटली. कृपया इथे त्याची लिंक देता का ?
अन्य : मुद्द्याला बगल देऊन मुद्दा मांडणा-यावर हल्ला करायची संघवाल्यांची खोड मला पूर्ण परिचित आहे. चर्चा मुद्यांवर करावी अशी माझी विनंती आहे. गंमत अशी आहे इथे " मी सलग दहावर्षे संघाचे काम करतो आणि सलग चार वर्षे तरी नियमित शाखेत गेलो आहे असे ठाम पणे सांगून राजू भारतीय जे म्हणतो ते अमुक अमुक कारणांनी चुकीचे आहे" असे कुणी म्हणतच नाही. बहुतेक सगळे - मलातरी - लांबून संघाला सदिच्छा व्यक्त करणारे किंवा शरियत देशभर लागू होईल म्हणून भयगंडाने पछाडलेले युवक दिसत आहेत. तसा भयगंड निर्माण करणे हीच संघाची व्यूहरचना आहे आणि त्याला बळी पडलेले नागरिक मला मिपावर वावरताना दिसत आहेत. त्यामुळे माझ्या मुद्यांवर चर्चा करायची सोडून मी खरा की खोटा याचवर बहुतेक चर्चा चालू आहे.
दुसरे : इथे प्रसिद्धी मला कशी मिळणार ? हा काय बालिशपणा आहे ? मुभा असल्यामुळे मी माझे प्रत्यक्ष नाव गाव दिले नाही. जसे अन्य शेकडो लोकांचे ही इथे नाही. त्यामुळे मी आपल्या काहीजणांच्या शेजारी रहात असलो तरी त्यांना राजू भारतीय कोण हे समजणार नाही, मग प्रसिद्धी कशी मिळते आणि प्रसिद्धी साठी धागा काढला म्हणजे नेमके काय ? आणि ही प्रसिद्धी मिळाल्यावर नेमका फायदा काय होतो ? कुणाला ? त्यामुळे या मुद्याचा खुलासा असा की हा धागा काढण्याचा प्रसिद्धी हा हेतू नसून माझ्या मनात कित्येक वर्षे काही सांगायचे राहून गेले होते ते सांगणे हा आहे. या सांगण्यातून कुणाला काही फायदा झाला तर उत्तम. माझे म्हणणे अमान्य असेल तर तसे अधिकारवाणीने खुशाल सांगावे. कुणाला वैयक्तिक दुखावण्याचा हेतू तर अजिबात नाही, हे एका इझम वर चे भाष्य आहे. तरीही जर कुणी दुखावले गेले असेल तर शतश: माफी मागतो.
6 Nov 2013 - 7:11 pm | मुक्त विहारि
त्यामुळे,
निदान माझ्या द्रुष्टीने तरी,
तुमचे म्हणणे अमान्य आहे.....
तुमचा अभ्यास खूप जास्त आहे.
6 Nov 2013 - 10:42 pm | राजु भारतीय
संघ स्थापना ज्या काळात म्हणजे १९२५ सालची परिस्थिती आणि १९४७ नंतरची परिस्थिती या मध्ये जमीन अस्मान चा फरक आहे . हिंदू समाज अक्षरश: अनाथ आहे अशी तत्कालीन परिस्थिती होती . सावरकरांची स्थान बद्धता, टिळकांचे ऑगस्ट १९२० मध्ये जाणे आणि महात्मा गांधीचे आगमन या तीनही घटनांचा तत्कालीन हिंदू नेत्यांवर एका अर्थाने आघातच होता - विशेषता: डॉ मुंजे यांच्यावर ! डॉ मुंजे यांच्या घरी डॉ केशव बळीराम हेडगेवार शिक्षणासाठी नागपुरात राहिले होते . संसदेतला डॉ मुंजे हा हिंदूंचा बुलंद आवाज होता . हिंदूंचा कैवार घेणारे म्हणजे हिंदू समाजामध्ये लढायची वृत्ती निर्माण करणारे प्रयत्न हवे होते म्हणून शाखा हा प्रकार सुरु झाला , म्हणजे सुरुवात मैदानात करू चार भिंतीत नाही ही भावना होती. त्या वृत्तीबरोबरच हिंदू समाज संघटीत झाला तर एकत्रित हिंदुसामाजाचाही राजकीय निर्णय घेताना विचार करावाच लागेल अशी ही भावना होती . संसदेतली डॉ मुंजे यांची भाषणे, त्यांचे पत्रव्यवहार अभ्यासले तर संघ स्थापने मागचा हेतू आणि संघ जन्माला घालण्यामागाची परिस्थिती याचा पूर्ण अंदाज येइल. सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदूंचा कैवार घेण्याची गरज इंग्रजांनी मुस्लिमांचे अतोनात लाड करण्यातुन निर्माण झाली . लाडाचे अनेक दाखले देता येतील त्यातला एक महत्वाचा पुरावा म्हणजे मुसलमानांचे राखीव मतदार संघ . वगैरे . पण स्वातंत्र्या नंतर तशी परिस्थिती नक्की नाही . मुसलमानांचे लाड काही प्रमाणात काँग्रेस करते हे मान्य आहे पण त्यांना ते फार करता येतेच असे नाही कारण त्याचे त्यांना मतपेटीतून प्रचंड फटके बसले आहेत . आणि आजकाल मुसलमान त्यांना जुमानतच नाहीत . उत्तरप्रदेश , दिल्लीतली मुस्लिम बहुल प्रभाग पहा ना ! त्यामुळे हिंदूंचे संघटन करण्याचा मुळ १९२५ सालचा हेतू आता उरला नाही .
7 Nov 2013 - 2:54 pm | विटेकर
संघाची स्थापना का झाली हे तुम्हाला खरेच माहीत नाही !
दुसरी गोष्ट : इतके बाईट्स वाया घालवून संघ देशाच्या प्रगतीमधील अडसर कसा आहे हे तुम्ही सांगितलेच नाहीत!
तुमचा नेमका प्रोब्लेम काय आहे ? उगाच गरळ ओकायची आणि टी आर पी वाढवायचा काय ? तुमचा नेमका विरोध कशाला आहे ? हिंदूंचे संघटन करायला आहे की संघाने राजकारण करायला आहे की राम मंदिराला आहे की परावर्तानाच्या कामाला आहे ? की " संघ " या शब्दाचीच तुम्हाला अॅलर्जी आहे?
तुमच्या शंका आणि तुमच्या भावना जर खरोखरच प्रामाणिक असत्या तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचवल्या असत्या ( तसा तुम्हाला अॅक्सेस होता असे तुम्हीच म्हटले आहे) आणि गेले ४० वर्षापासून संघात जात असल्याने हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की तुमचे शंका निरसन नक्की झाले असते. संघात प्रमाणापेक्शा जास्त लोकशाही आहे , सहीष्णुता आहे ( आणि हा संघकामाच्या गतीचा अडथळा ही आहे ) मुस्कट्दाबी तर अजिबात नाही , हे मी खात्रीने सांगु शकतो ! 'एकचालकानुवर्तित्व' हा व्यवहारातील सोयीचा भाग आहे, त्याची मूळे " राजा- प्रजेचा विश्वस्त " या भारतीय संकल्पनेत आहेत. संघातील सारे निर्णय हे " बैठकीत ठरल्याप्रमाणे च होतात, त्यात व्यक्तिपूजा अजिबात नसते .
तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत ( मा. मधुकरराव देवल , मा. आप्पा पेंडसे..) ही थोर माणसे संघानीच घडवली , व्यक्ती तितक्या प्र्कृती या न्यायाने त्यानी रचनेच्या बाहेर काम करायचे ठरविले आणि तसे दिव्य काम करुनही दाखवले. त्यानी कधीही संघाची बदनामी केली नाही , मतभेद असले तरीही!
तेव्हा , अजूनही वेळ गेली नाही , चर्चेने वाद संपतात, योग्य त्या स्थानिक कार्यकर्त्यांना भेटा, तुमच्या शंका विचारा, पूर्वग्रह ( आणि अहं) बाजूला ठेवून चर्चा करा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे नक्की मिळतील.
तसा प्रय्त्न पूर्वी केला असेल तर पुन्हा एकदा प्रयत्न करा. या धाग्याप्रमाणे जाहीर बोलू जाल तर नाचक्की तर होईलच पण त्यापेक्षा लोक बघतील बघतील आणि दुर्लक्ष करतील आणि तुम्ही अधिक फ्रस्टेट व्हाल !
तो निखिल वागळे सकाळ - संध्याकाळ बोंब मारतो , काय संघाला फरक पडला ? संघात करायचे बदल संघात राहूनच करता येतील. ज्याच्या खांदावर पालखी आहे तोच पालखीचा दिशा आणि गती ठरवतो... तुटे वाद संवाद तो हीतकारी !
आणि हे ही नाही पटले तर .. संघाचे काम करत नाही तर मग तुम्ही नेमके कोणते अन्य विधायक ,समाजहितैषी, देश हिताचे काम करता ते आम्हांला सांगा.ते संघापेक्षा कसे चांगले आहे ते सांगा.. आणि ते जर संघापेक्षा जास्त चांगले आहे तर ते संघापेक्षा अधिक वेगाने पुढे का जात नाही ? की " संघद्वेष" हेच तुमचे आता जीवीत कार्य आहे ?
राजु , माणसांचे काम आहे, मतभेद होतात, घरातही भांड्याला भांडे लागते पण म्हनून कोणी आपलेच नाक कापून दुसर्याला अपशकुन करण्याचा विचार करत नाही अथवा घरात ढेकूण झाले म्ह्णुन कोणी घर जाळायला निघत नाही. असे केल्यास त्याला "नमक-हरामी" किंव खाल्ल्या थाळीत छेद केला असे म्हणतात...
बाकी निर्णय तुमचा आहे .. सरतेशेवटी .. माझे एक आवडते वाक्य लिहितो आणि थांबतो..
Principles (संघ विचार)are like Lighthouse ! if you don't follow the Lighthouse , it is you , who will be at loss ! Lighthouse is there as it is guiding many forever !
- Stephen Covey
7 Nov 2013 - 6:37 pm | राजु भारतीय
संघाची स्थापना का झाली हे तुम्हाला खरेच माहीत नाही !
ओके मग तुम्ही सांगा ! संघाची स्थापना का झाली ?
दुसरी गोष्ट : इतके बाईट्स वाया घालवून संघ देशाच्या प्रगतीमधील अडसर कसा आहे हे तुम्ही सांगितलेच नाहीत!
माझ्या लिखाणात व्यवस्थित ते आले आहे. १) हिंदू आणि मुसलमान हा दुभंग निर्माण करून स्वातंत्रोत्तर काळात ही जिवंत ठेवला आहे. १९४८ साली भारत सरकारला प.पु.श्री. गुरुजींनी दिलेले प्रतिज्ञा पत्र पहा. मोतीबागेत आज खास हे पत्र मिळविण्यासाठी चक्कर मारा. फक्त सांस्कृतिक आणि सामाजिक काम करू असे प्रतिज्ञापत्र दिल्यावरच बंदी उठली आहे. त्यावेळी "मंदिर वही बनाएंगे" हा अजेंडा ही नव्हता आणि तसे म्हणण्याचे धाडस ही नव्हते. माझे वैर ना रामाशी आहे ना रामदासांशी आहे. माझे भांडण रामाचे राजकारण करणा-या बरोबर आहे. रामाचे काय आणि कसे राजकारण संघाने केले असा भाबडा प्रश्न नका मला विचारू, प्लीज २) आणखी एक दुभंग आहे. संघाने एक "अव्यक्त समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात प्रयत्न केला आहे. संघाबाहेर संघा इतके किंवा संघापेक्षा चांगले काही होऊच शकत नाही असा सहज स्वयंसेवकांचा समज असतो. संघाबाहेरच्या माणसांची ओळख "तो कॉंग्रेस चा, हा कम्युनिस्ट अशीच सहजपणे बोलण्यातून केली जाते." आपले काम हिंदू समाजाचे संघटन करण्याचे आहे त्यात सगळे असतील, कॉंग्रेसवाले, समाजवादी, कम्युनिस्ट …. ! पण ते प्रत्यक्ष शाखेत जाणारे वा परिवारातल्या कुठल्या संघातानेतले नसतील आणि अन्य कुठे कार्यरत असतील तर ते आपले नसतात ( जसे तुमच्या पुण्यात : श्री गजानन एकबोटे ). तुमच्याच लिहिण्यात खाली ते सहजपणे उतरले आहे ना ! संघापेक्षा चांगले काम करता का ? आणि ते संघापेक्षा ज्यास्त वेगाने का जात नाही ? …. हा स्वयंसेवकांचा उद्धट पणा नव्हे का ? याच धर्तीवरच मोठा दुभंग म्हणजे जे जे अन्य सरकारे करतील ते सगळे फालतू आणि त्याच विषयावर बौद्धिके चालतात. उदाहरणार्थ : अ) संघाचा १९८९ साला नंतर सुरु झालेल्या संगणीकरणाला विरोध ! आपण जुने स्वयंसेवक आहात जरा आठवून बघा, केवढा प्रचंड विरोध संघाने केला होता. भारतीय समाजाच्या दुर्दैवाने संघजर पॉवरफुल असता तर.....
( उर्वरित प्रतिसाद काही नामोल्लेख असलेने व्यनी केला आहे )
6 Nov 2013 - 9:43 pm | श्रीगुरुजी
>>> " मी सलग दहावर्षे संघाचे काम करतो आणि सलग चार वर्षे तरी नियमित शाखेत गेलो आहे असे ठाम पणे सांगून राजू भारतीय जे म्हणतो ते अमुक अमुक कारणांनी चुकीचे आहे" असे कुणी म्हणतच नाही.
तुमच्या मूळ लेखातील व नंतरच्या प्रतिसादातील अनेक चुका अनेकांनी सकारण दाखवून दिलेल्या आहेत. तुम्ही दिलेले ऐतिहासिक संदर्भ चुकीचे असून संघाविषयी तुम्ही व्यक्त केलेले विचार अनेकांनी सप्रमाण खोडून टाकलेले आहेत. तरीसुद्धा "पडलो तरी पाठ वर" या उक्तीप्रमाणे तुमचे वरील वाक्य आहे.
6 Nov 2013 - 10:51 pm | राजु भारतीय
तसे नव्हे, गुर्जी, मि काय म्हणतो "सलग दहावर्षे संघाचे काम करतो आणि सलग चार वर्षे तरी नियमित शाखेत गेलो" असा खरच कुणी इथे आहे का ? कारण तुम्ही चुका दाखविल्या वगैरे म्हनालात ना, ते खुपच बाळ्बोध आहे हो. त्या उत्तरांकडे - तुमच्या सकट - फारसे पहावेसे वाटत नाही. मी उत्तरे अनेकांना दिली आहेत, अगदी मुद्देसुद. काही जणांना अगदी व्यनी करुन उत्तरे दिली आहेत. माई भागुंगा नाही, काळजी नक्को.
7 Nov 2013 - 9:59 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
३-३.५ वर्षांपुर्वी सलग १४ वर्ष शाखेत नियमित जात होतो साधा स्वयंसेवक म्हणुन. अजुनही जायची इच्छा आहे, पण प्रभात आणि सायम दोन्ही वेळा सध्या मोकळ्या नाहीत म्हणुन बंद आहे. दसरा परेड/ रखिपोर्णिमेला छोट्या प्रमाणात अजुनही निघते. शाखा हिंदु मुस्लिमांमधे मतभेद करते असं तुमचं मत आहे. मी शाखेत जात होतो तिथे २ मुस्लिम बंधु लहानपणी शाखेत यायचे (आधी नुसतं खेळायला मिळतं म्हणुन यायचे). त्यांचे आई वडील उच्चशिक्षित होते त्यांनीही कधी विरोध केला नाही. दोघही सगळ्यांच्या बरोबर संघाची प्रार्थना म्हणायचे. पांडुरंगाची वारी येते दर वर्षी तिथे जेवण वाढायला मदतही करायचे. दुर्दैवानी त्यांच्यातला एकजण अपघातामधे गेला. दुसरा आता इथे राहात नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, मी जितका भारतीय आहे तितकेच ते दोघही होते. संघ हिंदुत्ववादाकडे झुकणारा असला तरी दुसर्या धर्मांना आदराची वागणुक देणारा आहे. तुमचा धर्म मिटऊन आमचा धर्म वाढवु असं कुठ्ल्याही शाखेत शिकवत नाहीत.
संघात वरिष्ठ पातळीवर जाऊनही आपल्याला साध्या संघ प्रार्थनेचा अर्थ समजलेला नाही. कृपया एकदा प्रार्थना म्हणा आणि मनन करा. नाही समजला तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विचारा.
7 Nov 2013 - 12:09 pm | अनिरुद्ध प
+१११ सहमत
7 Nov 2013 - 1:26 pm | राजु भारतीय
दसरा परेड ? परेड हा शब्द सहामहिने शाखेत गेलेला स्वयंसेवक ही उच्चारत नाही ! दसरा परेड राखी पौर्णिमेला ? खुक्क !! राखी पौर्णिमा अशी सुद्धा परिभाषा कोणत्याच प्रांतात संघात कुठेच प्रच्लीत नाही....! आपण खरेच शाखेत जायचा ? पुढे, आपण सामान्य स्वयंसेवक असल्याने आपल्याशी संघाच्या व्युहरचने विषयी बोलण्यात काही अर्थ नाही. त्या पुढचे, सलग चौदा वर्षे शाखेत जाणा-या तो अगदिच सामान्य असल्याशिवाय सामान्य ठेवतच नाहीत कारण अहो कार्यकर्त्यांचि वानवाच तितकी आहे. आता हिन्दु मुस्लिम - मुसलमानांविषयी संघाला काही अड्चण नसेल तर " गर्व से कहो हम हिंदु है" कशासाठी ? बाबरी पाडुन - मुस्लिम समाजाच्या विरोधात जाउन मंदिर कशाला ? का तुमच्या सारख्या भाबड्या मनाला असे वाटते की बाबरी पाडून संघाने मंदिर उभे करायला मुसलमानांचि हरकत नव्हती ? आणि शेवटि प्रार्थने विषयी मुसलमानांविषयी संघाचा काही ग्रह नसेल तर प्रार्थनेत "...त्वया 'हिंदूभुमे' सुखं वर्धितो ..." कशाला ?
7 Nov 2013 - 2:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ऑब्लिक (/) चा अर्थ आणि वापर का करतात ते शिका हो कोणाकडुन तरी आधी. दसर्याला घरोघरी जाऊन सोनं वाटतात आमच्यासारखे सामान्य स्वयंसेवक. राखीपोर्णिमेला भगव्या राख्या सुद्धा बांधतात घरोघरी जाऊन. आता तुम्हाला शाखा किंवा संघ माहितीच नसल्याने आणि छापील माहिती वरुन तुम्ही टिका करत असल्याने तुम्हाला हे वाटणं साहाजिकच आहे म्हणा.
ज्या संघटनेनी आपल्याला मान सन्मान दिला, राष्ट्र्पातळीवरची जबाबदारी दिली (तुम्ही ती बे-जबाबदारपणे पार पाडलीतच). त्या संघटनेमधे एक सामान्य कार्यकर्ता म्हणुन काम करायला माझी कधीचं ना नव्ह्ती किंवा नाहीये. सामान्य तर सामान्य हो, पण अजुन तुमच्यासारखं संघाला **ण दाखवुन बाहेर नाही पडलो. (आता तुम्ही दाखवलं का तुमच्या लाथ बसली हा स्वतंत्र वादाचा मुद्दा होऊ शकतो). सामान्य म्हणा अतिसामान्य म्हणा संघाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ आहे आणि मरेपर्यंत राहीनही.
ह्याच्यामधे दुसर्या धर्माला शिव्या दिलेल्या, निंदा-नालस्ती केलेली कुठे आढळली नाही बॉ.
तुमचं घर पाडुन तुमच्या शेजारच्यांनी अतिक्रमण केलं तर तुम्ही कायदेशिर कारवाई कराल का त्याची परवानगी घेउन रितसर आपल्या खर्चानी त्याच्या घराची वास्तुशांत करुन द्याल?
सिलेक्टीव मिनिंग काढु नका. पुर्ण प्रार्थना वाचा, वाटल्यास आमच्यासारख्या "अतिसामान्य" लोकांकडुन अर्थ समजुन घ्या.
7 Nov 2013 - 3:56 pm | राजु भारतीय
"परेड" विषयातले आपले विचार प्रदर्शित नाई केले ? संघात कुठली आणि कसली " परेड" असते ?
राखी पौर्णिमा असा शब्द संघ परिभाषेत नाही, पण तो तुम्ही वापरला म्हणजे संघ तुम्हाला समजला नाही, हे मान्य न ?
पूर्ण प्रार्थना पण अर्थासकट म्हणून दाखवतो पण जर शाखेत मुसलमान यायचे अणि त्यांना काही प्रोब्लेम नाही तर प्रार्थनेत " त्वया हिन्दुभूमे …" असे का म्हणतात ? या प्रश्नाला अशी बगल द्यायची नाही. उत्तर द्या. लहान मुलांना खेळायला जायचे असते, त्यांना तुमचे म्हणजे संघवाल्यांचे छक्केपंजे नाही समजत, अहो !
मुद्दा आक्रमण करणा-यांचा नव्हता. मुसलमानांविषयी आकस संघाला नाही तर मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ? बाबरी पाडल्या नंतरचे दंगे सर्वदूर दोन हिंदू गटात झाले का ? ते दंगे हिंदू मुस्लिम दंगे नव्हते का ? संघाचे ( भाजपचे नव्हे ) किती पदाधिकारी, किती प्रचारक मुसलमान आहेत ? मुसलमानांना जर संघ आपले म्हणतो तर मुसलमानांचा एखादा तरी सण संघ साजरा करतो का ? कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते हि तुमच्या म्हणजे संघाबरोबर असतील तर त्यांना असे वाटत असेल ना की आपला एखादा सण संघाने साजरा करावा.
संघ हे हिंदूंचे कडवे संघटन आहे हे मान्य करा. त्यात मुस्लिम विरोध अद्यहृत आहे. ताकाला जाऊन भांडे लपवायचा प्रयत्न करू नका. फार मुसलमानांचा पुळका येउन जर आपण संघविश्वात वावरलात तर बहिष्कृत व्हाल. आणि संघातल्या बहिष्कृत स्वयंसेवकांचे हाल कसे होतात हे पहा. आपणांस ते दिसत नसतील तर आपल्या गावाचे नांव आणि आपले contact details द्या, मी तुम्हाला असे पीडित स्वयंसेवक दाखवतो, तुमच्या गावातले !!
7 Nov 2013 - 4:18 pm | ग्रेटथिन्कर
त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे ही त्यांनी मारलेली लोणकढी थाप आहे. वास्तवात मी शाखेत जायचो तेव्हा शिवाजीने अफजलचा कोथळा बाहेर काढल्याचे सत्तरवेळा सांगायचे... 'त्यांची' संख्या वाढतीय यावर चर्चा झडायच्या..
एका विशिष्ट ज्ञातीचे लोक शाखा चालवायचे किंवा त्याच ज्ञातीचे लोक प्रमुख पाहुणे असायचे,गर्दी करायला आजूबाजुची पोरंटोरं बोलावयचे, ती पण प्रार्थना झाल्यावर टंगळमंगळच करायची.
एकंदर संघ म्हणजे ठराविक लोकांना' सायकोलॉजिकल एडव्हांटेज 'मिळावा यासाठी जगवलेली संघटना आहे.
7 Nov 2013 - 4:34 pm | विटेकर
एकंदर संघ म्हणजे ठराविक लोकांना' सायकोलॉजिकल एडव्हांटेज 'मिळावा यासाठी जगवलेली संघटना आहे
मना वीट मानू नको बोलण्याचा .....
7 Nov 2013 - 4:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
विश्वास ठेवा म्हणुन कोणी आग्रह केला नाही.
खरचं आहे की मग ते. का मग अफजलखानाला हार्ट अॅटॅक येऊन मेला असं सांगायच होतं का मग?
बाकीच्या ज्ञातीच्या लोकांना चालवायची बंदी केली होती का?
प्राथना झाल्यावर शाखा चालु रहाते? कुठल्या जगावेगळ्या शाखेत जात होतात ते जरा सांगा की.
बाकी तब्बेत अजुन सुधारलेली दिसतं नाही तुमची. नत्थुगुग्गुळ चा डोस डबल करा.
7 Nov 2013 - 5:17 pm | मुक्त विहारि
जा बरे...
अद्याप तू नथु चुर्ण घेतले नाही आहेस.
आणि ते पथ्यपाणी पण सांभाळा.
7 Nov 2013 - 4:29 pm | विटेकर
प्रार्थनेत " त्वया हिन्दुभूमे …" असे का म्हणतात ?
कारण अनादी कालापासून ही हिण्दुभूमी आहे म्हणून !
हिमालय्स्मारभ्यं याव हिण्दुसरोवरम | तं देव निर्मितं देशं हिण्दुस्थान प्रच़क्षते ( शुद्ध लेखन चु भु द्यावी घ्यावी)
मुसलमानांची बाबरी
मुसलमानांची बाबरी??? सर , जरा इतिहासाचा अभ्यास वाढ्वा . ते प्रभु रामचंद्राचे जन्मस्थान आहे !त्यावर बाबराने आक्रमण केले.. याला प्राज्ञ मराठीत चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात.
मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ?
अनेक वेळा चर्चा घडली आणि बिघडली.. नपुंसक सरकारने काही ही केले नाही. प्रभु रामचंद्र हा भारताचा राष्ट्र्पुरुष आहे आणि रामजन्मभूमी हा करोडो हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न होता. अनेक कारणांनी नाकरल्याच्या संतप्त भावनेचा उद्रेक हा बाबरी पतनाला कारणीभूत ठरला. विहिंप चे आंदोलन हे फक्त तात्कालिक कारण ठरले !
मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ?
तुम्हाला हिंदू शब्दाचा अर्थच समजला नाही. "हिंदू" आणि "कडवा" हे परस्पर विरोधी शब्द आहेत ! हिन्दू शब्दात मुसलमान च काय पण अखिलमानव जातिला सामावून घेण्याची शक्ती आहे.
संघाचे ( भाजपचे नव्हे ) किती पदाधिकारी, किती प्रचारक मुसलमान आहेत ? मुसलमानांना जर संघ आपले म्हणतो तर मुसलमानांचा एखादा तरी सण संघ साजरा करतो का ?
संघाचे पदाधिकारी अथवा प्रचारक मुसल्मान नाहीत कारण त्यांची उपासना पद्दह्ती ते मान्य करणार नाही! त्यांचेच अन्य बांधव त्यांना जगणे मुष्किल करतील ! ईश्वर अल्ला तेरे नाम " हे म्हणण्यासाठी जी सहिष्णुता लागते , ती दुर्दैवाने त्यान्च्या उपासना पद्द्ध्तीत समाविष्ट होऊ शकत नाही ! पण त्या मर्यादेत राहून अनेक मुस्ल्मान संघाचे हितचिंतक आहेत च की!
आणि सण साजरा करण्यासंदर्भात - संघ ही हिंदूचे सारे सण साजरे करत नाहीच , ज्यामुळे आपला विजिगिषु इतिहास आणि दिव्य परंपरांचे आणि पराक्रमी महापुरुषांचे स्मरण होते अश्याच सणांची संघात पद्ध्त आहे. रच्याकने तुम्ही कोणते मुस्लिम सण तुमच्या घरात साजरे करता ? (प्रामाणिक उत्तर अपेक्षित आहे )
फार मुसलमानांचा पुळका येउन जर आपण संघविश्वात वावरलात तर बहिष्कृत व्हाल.
कैच्या कै ! एक अनाहूत सल्ला - अश्या बहिष्कृतांची संघट्ना आपण बांधावी. शुभस्य शीघ्रम !
7 Nov 2013 - 4:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
+११२८३७
बहिष्क्रुतांच्या संघटनेतही राष्ट्रिय पातळीवर पोहोचावे, आणि मग तिथुन बाहेर पडुन परत एक लेख इथे टाकावा.
7 Nov 2013 - 4:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
दोन गोष्टी करा.
१. वाचन वाढवा.
२. कधीतरी जवळच्या शाखेत जा आणि एक आठवडा काढा.
रझा अॅकॅडमी वाल्यांनी दिवाळीचे आकाशकंदील लावले की संघवाले शिर-खुर्मा करणारेत.
7 Nov 2013 - 5:43 pm | ग्रेटथिन्कर
शिरखुर्मा... आरेएसेसवाले करणार?...
लापशी करुन विजयादशमीला खा... त्यादिवशी तरी लोक येतील शाखेत ...
7 Nov 2013 - 6:29 pm | अनिरुद्ध प
नावाला साजेसेच हुच्च विचार्,आपल्या ज्ञान पाजळ्ण्याने आपण एकदाही सन्घाच्या शाखेत गेलेले नाहीत यावर मात्र आपणच शिक्कामोर्तब केलेत हे अतिउत्तम झाले.
5 Nov 2013 - 2:27 pm | उद्दाम
http://marathivishwakosh.in/khandas/khand18/index.php?option=com_content...
हा गुरुचरित्रात वर्णिलेला प्रसंग आहे.
_________________________________________________
श्रीपाद श्रीवल्ल्भ कुरवपूर येथे कृष्णेत स्नान करावयास जात, तेव्हा तेथे कपडे धुणारा एक धोबी त्यांना नेहमी वंदन करीत असे. त्याने एकदा एका म्लेंच्छ राजाला आपल्या परिवारासह नदीत नौकाविहार करताना पाहिले. ह्या राजासारखे वैभव आपल्याला मिळावे, अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. ती जाणून श्रीपाद श्रीवल्लभ त्याला म्हणाले, तुला असे राजवैभव मिळेल व पुढल्या जन्मी म्लेंच्छ होऊन तू ते भोगशील पण वैभव मिळाले, तरी गुरुंचा वियोग होईल ह्या जाणिवेने त्या धोब्याला वाईट वाटले. त्यावर श्रीपादगुरुंनी त्याला आश्वासन दिले, की नरसिंहसरस्वती ह्या नावाने आम्ही तुला भेटू. त्याप्रमाणे पुढील जन्मी
हा धोबी बीदरचा मुसलमान बादशहा झाला आणि नरसिंहसरस्वतींचा तो उपासक बनला.
_____________________________________________________________________
ही गुरुचरित्रातील कथा आहे. या कथेनुसार धोब्याला पुढचा जन्म म्लेंछ म्हणजे मुसलमान धर्मात मिळाला आणि तोही दत्तगुरुंच्याच इच्छेवरुन.
जर एक धोबी म्लेंछ व्हावा हे महाराजांच्या इच्छेने घडते, तर भारतातील इतर म्लेंछही त्यांच्याच इच्छेने जन्म घेत असणार. मग त्यांची संख्या वाढते की कमी होते, याची चिंता इतर पामरांनी का करावी?
:)
6 Nov 2013 - 6:06 pm | मृत्युन्जय
सगळ्या धोब्यांना हा शाप मिळाला आहे की काय? म्हणजे या जन्मीचा धोबी तो पुढच्या जन्मीचा मुसलमान असे काही आहे की काय? गुरुचरित्रात असे लिहिले आहे? भलतेच मजेशीर अर्थ लावता ब्वॉ तुम्ही.
7 Nov 2013 - 12:14 pm | उद्दाम
अक्कल गहाण ठेवली असल्यास किमान त्याचे जाहीर प्रदर्शन करु नये अशी नम्र विनंती
हे तुम्हालाही लागू आहे ना? :)
5 Nov 2013 - 2:44 pm | होबासराव
मग त्यांची संख्या वाढते की कमी होते, याची चिंता इतर पामरांनी का करावी?
खरय तुमच...... आपण गुरुचरीत्राचे पारायण करता हे वाचोन पामराना आनन्द झाला.
5 Nov 2013 - 2:50 pm | उद्दाम
आण्णा, अहो आमचा जन्म आणि संगोपनच कुरुंदवाड ग्रामी झालेले आहे. नरसोबावाडीच्या नदीत आम्ही पोहायला शिकलो. मग भवसगारात पोहायला आम्हाला येईलच ना हो?
:)
6 Nov 2013 - 12:08 pm | अनिरुद्ध प
प्रथम दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,"नरसोबावाडीच्या नदीत आम्ही पोहायला शिकलो. मग भवसगारात पोहायला आम्हाला येईलच ना हो? "या भवसागरात तरुन जाण्यासाठी शुभेच्छा,तरी सुद्धा अभ्यास कमी पडतोय,तेव्हा श्रीगुरुचरित्र या ग्रन्थाचा सखोल अभ्यास करा,आणि मग बोला,कारण मी आपल्याला एक व्यनि केलेला होता त्याचे उत्तर आपण देवु शकला नव्हतात्,हेसुद्धा लक्षात असुद्या.
6 Nov 2013 - 12:41 pm | उद्दाम
एखादा प्रश्न ऑप्शनला सोडला तरी परिक्षा तरता येते. शिवय तुमचा प्रश्न आज अनुत्तरीत राहिला, तरी उद्या त्याचे उत्तर कदाचित आम्हाला मिळेल. प्रश्न पुन्हा एकदा खरडावा ही नम्र विनंती.
7 Nov 2013 - 4:43 pm | अनिरुद्ध प
प्रतिसादांवरुन तर तुम्ही एकच काय सर्वच प्रष्ण ऑप्शनला ठेवुन परिक्षा तरुन गेला आहात अशी शन्का येतेय.
6 Nov 2013 - 6:05 pm | रघुपती.राज
२२४
आणखी एक.... २२५
6 Nov 2013 - 8:02 pm | बॅटमॅन
आयला या धाग्याची नसबंदी करा राव आता! मेर्कू भौत बोर मार्रा!!!!
(संघाबद्दल डोंट केअर मोड मध्ये असलेला) बॅटमॅण.
7 Nov 2013 - 12:15 pm | अनिरुद्ध प
ई ना चोलबे,मग धागा ३००+ कसा होणार?
6 Nov 2013 - 11:12 pm | गजानन५९
च्यामारी कवाधरन बघतुय पन एक सांगा मंडळी ह्ये संघ म्हंजी नक्की काय असतंय ओ :)