शरमेची बाब

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
1 Nov 2013 - 4:31 pm
गाभा: 

दिवाळी तोंडावर आली असतानाच एक बातमी आली, अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे शेरीफ कार्यालयात काम करणाऱ्या आरती गुप्ते नामक NRI मराठी महिलेने जमीन विक्रीच्या पैशात अफरातफर केल्याने फेडरल कोर्टाने तिला ३ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे
.
प्रतिष्ठित INFOSYS ला देखील व्हिसा घोटाळा प्रकरणी अमेरिकन कोर्टाने ३० ० कोटी डॉलर्स चा दंड ठोठावला आहे . आयटी मध्ये देखील हैद्राबाद मधून मोठ्या प्रमाणावर बोगस अनुभव प्रमाणपत्रे देण्याचे प्रकरण उघडकीस आलेले होते.

महाराष्ट्रीय NRI आज अमेरिका आणि इतर देशात उज्ज्वल यश मिळवून भारताचे नाव रोशन करत असताना अशा प्रकारच्या बातम्या ऐकून खेद वाटला .

भविष्यात परदेशात भारतीयांची ओळख fraud अशी होऊ नये ,अशी अपेक्षा !

प्रतिक्रिया

चांगल्या वाईट प्रवृत्ती जगाच्या पाठीवर सगळीकडे सारख्याच असतात. त्यात अमुक ठीकाणचे लोक चांगले, तमुक ठीकाणचे लोक वाईट असं सरसकटीकरण नाही होऊ शकत.

अमेरिकन लोक फ्रॉड करत नाही असं म्हणाय्चंय का तुम्हाला?

बॅटमॅन's picture

1 Nov 2013 - 6:28 pm | बॅटमॅन

सहमत आहे. शिवाय असे किती मनाला लावून घेणार हाही एक प्रश्न आहेच. फ्रॉडवाले तर गल्लोगल्ली दिसतात.

दादा कोंडके's picture

1 Nov 2013 - 9:34 pm | दादा कोंडके

चांगल्या वाईट प्रवृत्ती जगाच्या पाठीवर सगळीकडे सारख्याच असतात. त्यात अमुक ठीकाणचे लोक चांगले, तमुक ठीकाणचे लोक वाईट असं सरसकटीकरण नाही होऊ शकत.

हम्म. हे सांगून गुळगुळीत झालेलं वाक्य तितकसं खरं नाही. तसं असेल तर सगळं जग सारखं असलं असतं. पण हे वाक्य पटवण्यासाठी खालच्यासारखं दुसरं एक्स्ट्रीम उदाहरण देणं चुकीचं आहे.

अमेरिकन लोक फ्रॉड करत नाही असं म्हणाय्चंय का तुम्हाला?

कुठलं तरी उदाहरण घेउन एखाद्या व्यक्तीसाठी तपासून बघणं हास्यास्पद आहे. पण काही ठिकाणच्या, वर्णाच्या, वंशाच्या, जातीच्या, धर्माच्या लोकांची काही समान वैशिष्ठ्ये असतात. त्यामुळे बर्‍यापैकी मोठ्ठा सँपल सेट असेल तर त्या समाजामध्ये ते उतरताच आणि कळून येतं. बिहारमध्ये गुन्हेगारी जास्त असणं काय किंवा भारतात अस्वच्छता असणं काय एक समाज म्हणून त्या-त्या प्रदेशातली लोकं कारणीभूत असतात. याचा प्रतिवाद करायचा म्हणून अमेरिकन रस्त्यावर सिगारेट थोटुक टाकतच नाहीत काय? किंवा मराठी गुन्हेगार नसतातच काय? हे प्रश्न विचारणं म्हणजे हुच्चभ्रुपणाचं लक्षण आहे. प्रत्येक बिहारी गुन्हेगार असतो हे मानणं चुकीचं आहे पण शंभर बिहारीं आणि शंभर मराठी माणसात गुन्हेगार असण्याची शक्यता पहिल्या गटात जास्त आहे आणि तसं मानणं चुकीचं नाही.

याचा प्रतिवाद करायचा म्हणून अमेरिकन रस्त्यावर सिगारेट थोटुक टाकतच नाहीत काय? किंवा मराठी गुन्हेगार नसतातच काय? हे प्रश्न विचारणं म्हणजे हुच्चभ्रुपणाचं लक्षण आहे.

आमच्यातील हुच्चभ्रुपणाचं लक्षण आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Nov 2013 - 1:41 pm | llपुण्याचे पेशवेll

दादा विचार पटला तुमचा.

अन्या दातार's picture

1 Nov 2013 - 6:29 pm | अन्या दातार

दिवाळी तोंडावर आली असतानाच एक बातमी आली........
खरंय, शिमग्याच्या तोंडावर उठून दिसली असती. ;)

खटासि खट's picture

1 Nov 2013 - 6:57 pm | खटासि खट

हुश्श !!!

शीर्षक वाचून लेखकाचा विनयभंग झाला कि काय या काळजीने काळजात कसंतरीच झालं.

आपला नम्र
विनय बंग

मंदार कात्रे's picture

1 Nov 2013 - 7:08 pm | मंदार कात्रे

ह्या ह्या ह्या

मला तर वाटलं नि:शब्द चा पुढचा पार्ट येतोय की काय ;) =))

सायकल-रणगाडा धडकेनंतर आता बाबागाडी आणि विमानाची धडक होणार असेल या शंकेने श्वास रोखून धागा उघडला तर कसलं काय =))

यसवायजी's picture

1 Nov 2013 - 8:43 pm | यसवायजी

प्र.क्र.३ विराम चिन्हांचा योग्यजागी वापर करा. (गुण १)
निशब्द वाल्या जीया खानने आत्महत्या केली म्हणे ते वाचुन वाईट वाटलं.

भाते's picture

1 Nov 2013 - 8:54 pm | भाते

धागाकर्त्याचे नाव वाचुन मीसुद्धा ऐन दिवाळीत नि:शब्द सारखे काहीतरी खुशखुशीत वाचायला मिळणार या अपेक्षेने धागा ऊघडला होता पण माझा अपेक्षाभंग झाला.
रच्याकने, नि:शब्द चा पुढचा भाग कधी येतोय?

यसवायजी,
बॅटमॅनसाहेब जिया खानच्या नाही तर या नि:शब्द पद्धल बोलत आहेत.
http://misalpav.com/node/25136

यसवायजी's picture

2 Nov 2013 - 10:03 am | यसवायजी

नि:शब्द वाल्या जीया खानने आत्महत्या केली म्हणे 'ते' वाचुन. वाईट वाटलं.
यातलं 'ते' म्हंजे तेच नोड होतं हो..
शेवटी मलाच विराम चिन्ह वापरावी लागली. :(

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 7:22 pm | चित्रगुप्त

बेकायदेशीर वर्तन करणारे सगळीकडे असले, तरी परदेशात अल्पसंख्यांक असणार्‍या समुदायापैकी एकाने जरी तसे केले, तरी त्या देशाची, समुदायाची प्रतिमा खराब होऊन त्याचा परिणाम अन्यांच्या जीवनावर होत असतो, हे खरेच. परदेशात फार जपून वागणे, तेथील कायदे काटेकोरपणे पाळणे हे स्वतःच्या आणि दुसर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक.

परदेशात फार जपून वागणे, तेथील कायदे काटेकोरपणे पाळणे हे स्वतःच्या आणि दुसर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक.

स्वतःच्या देशातदेखील असे वागलात तर बरे होईल . :)

विसंवादाचं उत्तम उदाहरण! दुसर्‍या देशात नियम पाळा ह्याचा अर्थ स्वतःच्या देशात पाळू नका असा काढायचा असेल तर काय बोलणार!
परदेशात राहाणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या त्या देशाची संस्कृती/ प्रतिमा घेऊन येते आणि वावरत असते. त्यातून समूहाविषयी एक आकृतीबंध बनलेला असतो (अगदी महारष्ट्रात भय्ये असे/ लुम्गीवाले अस्स/ गुज्जूभाय अस्सेच.. तदवत) आधीच भारतातला भ्रष्टाचार जगजाहीर आहे त्यात अशा गोष्टी झाल्या वा वारंवार होत राहिल्या की भारतियांकडे बघण्याची दृष्टी/ विश्वासार्हता ढासळू शकते. शिवाय प्रामाणिक भारतियांना परदेशात फटका बसू शकतो. इमिग्रेशन हे त्याचे उत्तम उदाहरण देता येईल. भारतिय कंपन्यांनी, तसेच भारतिय बॉडी शॉपर्सनी एच वन सिस्टीमचे एवढे हाल केले गेल्या दहा वर्षात की ज्यांची खरोखरच पात्रता आहे एच वन वर काम करायची त्यांना सुद्धा कठीण झालय, अमेरिकेने कडक धोरणं अवलंबिलेयत एच वन साठी. बी१ वर व्हिसावर पण अस्स्च अब्युजिंग चालू आहे, इन्फोसिसला पण दंड सुनावलाय अमेरिकेतल्या न्यायालयाने. लहान मोठ्या प्रमाणात सगळ्याच भारतिय कंपन्या (कदाचित पीअर प्रेशरमुळेही असेल) नियमांचे गळे घोटत्यात त्याची परिणिती म्हणजे सगळ्यांकडेच संशयाने बघितले जातेय.
एकंदर बाहेर राहाणार्‍या भारतियांवर सचोटीने राहायची जास्त जबाबदरी आहे हे खरचं, तुम्हाला नागरिक म्हणून तिथे हक्क नसले तरिही आणि त्याची भारतत्ल्या नागरिकांनी कसे वागावे ह्याची तुलना करायची गरजच नाही. असो१

यसवायजी's picture

1 Nov 2013 - 7:35 pm | यसवायजी

नमस्कार. हे आंजावरचे मिपा केंद्र आहे. मंदार कात्रे आपल्याला बातम्या देत आहेत.

परदेशात फार जपून वागणे, तेथील कायदे काटेकोरपणे पाळणे हे स्वतःच्या आणि दुसर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक.

आपल्या स्वत:च्या देशातही कायदे काटेकोरपणे पाळणं हे स्वतःच्या आणि तसेच दुस-यांच्या सुरक्षिततेसाठी चांगलं असतंच की.
परदेशात कायद्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते म्हणून तिथले कायदे पाळायचे, आणि तसेच कायदे भारतात असूनसुद्धा, 'कोणी विचारत नाही' म्हणून विसरून जायचे, असे डबल-ढोलकी लोकसुद्धा कमी नाहीत. अगदी साधी उदा. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, गाडी भरधाव चालवणे, इ. त्यापेक्षा तिथे जाऊन फ्रॉड करणारे बरे. ते भारतात राहिले असते तरी फ्रॉड केला असता, अमेरिकेत गेले आणि तरीही फ्रॉड केलाच - देश बदलला म्हणून माणसांची वृत्ती बदलली नाही. तिथे कायदा पाळायचा(भितीयुक्त आदरामुळे?), आणि इथे मात्र आनंदी-आनंद(भितीही नाही, आदर तर नाहीच नाही) असं वागणा-या लोकांबद्दल जास्त खेद वाटतो.

बलि's picture

1 Nov 2013 - 8:08 pm | बलि

+१

यसवायजी's picture

1 Nov 2013 - 8:08 pm | यसवायजी

@ परदेशात कायद्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते म्हणून तिथले कायदे पाळायचे, आणि तसेच कायदे भारतात असूनसुद्धा, 'कोणी विचारत नाही' म्हणून विसरून जायचे, असे डबल-ढोलकी लोकसुद्धा कमी नाही >>
'परदेशात कायद्याची अंमलबजावणी होते म्हणून तिथले कायदे पाळायचे'
असे नाही तर बरेचसे कायदे पाळण्यासाठी अनुकुल वातावरण आहे म्हणुन ते आपोआप पाळले जातात.
इथे ट्राफीक पोलिस स्वतःच लाल सिग्नल असताना सुद्दा 'जांदो जांदो' म्हणतात. ते तरी काय करणार बिच्चारे..

इथे ट्राफीक पोलिस स्वतःच लाल सिग्नल असताना सुद्दा 'जांदो जांदो' म्हणतात. ते तरी काय करणार बिच्चारे..

हेच ट्राफिक पोलिस तुम्हाला उद्या सिग्नल मोडला म्हणून अडवतील .

यसवायजी's picture

1 Nov 2013 - 8:22 pm | यसवायजी

हो. पण युरोपात पाहिलं ते सगळंच वेगळं होतं. सिग्नल तोडायची कधी गरजच पडत नाही असं वाटलं. काय ते रस्ते.. काय ती मेट्रो सिस्टीम.. काय ते वेळापत्रक पाळणं.. क्या कहने !!
इथं च्यायला कर्वे ते गोखले नगर ६-७ किमी चा प्रवास अन आज ४५ मींटं लागली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Nov 2013 - 8:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

>>प्रतिष्ठित INFOSYS ला देखील व्हिसा घोटाळा प्रकरणी अमेरिकन कोर्टाने ३० ० कोटी डॉलर्स चा दंड ठोठावला आहे>>बाकीच्या आय.टी. कंपन्यासुद्धा इतकी वर्षे बिझिनेस व्हीसावर लोकांकडुन काम करुन घेत होत्याच की विचारा TCS,WIPRO वाल्यांना

व्हिजाचा गैरवापर हा प्रकार एल वन (इंट्रा कंपनी ट्रान्स्फर) च्या बाबतीतही होतो. या व्हिजाच्या अटींनुसार अमेरिकेत गेलेल्या व्यक्तीने आपल्या भारतीय कंपनीच्या अमेरिकेतील कार्यालयात काम करणे बंधनकारक असते. प्रत्यक्षात होते मात्र वेगळेच. भारतीय कंपनीचे अमेरिकेतील रजिस्टर्ड ऑफीस नावालाच असते. अमेरिकेत गेलेली व्यक्ती एखादा दिवस आपल्या कंपनीच्या कार्यालयात हजेरी लावते. आणि थेट ग्राहक कंपनीच्या कार्यालयात रुजू होते.

अर्थात या प्रकारात अमेरिकन ग्राहक कंपन्याही सामिल असतात. त्यांच्या पुर्ण सहकार्याशिवाय असे गैरप्रकार करणे शक्यच नसते. स्थानिकांच्या नोकर्‍यांवर गदा येते असे सामान्यांनी कितीही म्हटले तरी कंपन्यांना स्वस्त मजुर हवेच असतात.

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 8:41 pm | चित्रगुप्त

माझ्या प्रतिसादाचा 'परदेशात कायद्याच्या भितीमुळे जपून वागावे, इकडे खुशाल कायदे मोडावेत', असा अर्थ काढला गेल्याचे बघून आश्चर्य वाटले.
आपण परदेशात वावरताना, तिकडल्या लोकांच्या मनात भारतीयांविषयी प्रतिकूल प्रतिमा निर्माण होऊ न देण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, हे मला यातून सांगायचे आहे, कदाचित चुकीच्या वाक्यरचनेमुळे हा अर्थ पुरेसा स्पष्ट झाला नसावा.

वडापाव's picture

1 Nov 2013 - 8:55 pm | वडापाव

उलट तुम्ही मांडलेल्या मुद्याशी मी सहमत आहेच. मी फक्त त्या मुद्यावरुन अजून एक मुद्दा मांडू पाहत होतो इतकंच.

प्रभाकर पेठकर's picture

4 Nov 2013 - 1:50 am | प्रभाकर पेठकर

>>आपला नम्र,
वडापाव<<

आयला, मी, आपला 'नरम' वडापाव वाचलं.

पण नंतर जे कवित्व केले त्यावरून प्रश्नाला सवंगतेचा वास आहे असा काहींनी धरलेला सूर बुचकळ्यात टाकून गेला. चित्र गुप्तांच्या चिंतेत सहभागी...

विनायक प्रभू's picture

1 Nov 2013 - 8:43 pm | विनायक प्रभू

वन सॅड सॅ़़क

धन्या's picture

1 Nov 2013 - 10:59 pm | धन्या

प्रतिष्ठित INFOSYS ला देखील व्हिसा घोटाळा प्रकरणी अमेरिकन कोर्टाने ३० ० कोटी डॉलर्स चा दंड ठोठावला आहे .

या बातमीत तथ्य असेल तर "ड्रिव्हन बाय व्हॅल्यूज"ची काशी झाली म्हणायची.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Nov 2013 - 1:44 pm | llपुण्याचे पेशवेll

ड्रिव्हन बाय लोकल व्हॅल्यूज असे सुधारून म्हणावे.