उत्तम मिसळ मिळण्याचे ठिकाण

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
30 Jan 2008 - 10:25 am

मी आत्तापर्य॑त चापलेल्या बेष्ट मिसळी॑ची लिस्ट देत आहे, कृपया ऍडिशन करावी.
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार, ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली

मौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

आपला अभिजित's picture

23 Jan 2009 - 6:08 pm | आपला अभिजित

रत्नागिरीत असताना मिसळ ही आमची फेवरेट डिश होती. कॉलेजातून परतत असताना जयस्तंभावर "सम्राट' नावाच्या हॉटेलात तीन रुपयांना मिसळ मिळायची. डबल पाव घ्यायचा असेल, तर साडेतीन रुपये. त्यात दोनदा रस्सा (कट) मिळायचा. ती चापूनच आम्ही घरची वाट धरायचो.
आणखी एक उत्तम मिसळ आठवडा बाजारात "औदुंबर' नावाच्या हॉटेलात मिळायची. आता तिथली चव फारशी चांगली नाही राहिली.
पुण्यात आल्यावर तुळशीबागेतील श्रीकृष्ण, शनिपाराजवळील "श्री' आणि नारायण पेठेतील "बेडेकर' मिसळींची नावे फार ऐकली होती. तिन्ही बंडल निघाल्या! एकतर पुण्यात प्रसिद्ध म्हणून असलेल्या ठिकाणी खाद्यपदार्थांचा दर्जा अतिशय वाईट असतो, असा माझा पक्का समज झाला आहे. (उदा ः जोशी वडेवाले.) त्यातून हे लोक राजरोस (चाकूबिकू न घेता) ग्राहकांना लुटतात. "वाडेश्‍वर'ची इडली 16 रुपयांना कशी काय मिळू शकते? शिवाय वर जादा चटणीचे पैसे वेगळे! हा म्हणजे कहरच! इडलीचे उत्पादन मूल्य जास्तीत जास्त पाच रुपये असेल. हॉटेल चालवण्याचा खर्च बिर्च मिळून आठ रुपये. त्याच्या दुप्पट-अडीच पट दर?? "रुपाली'त जाणेही मी म्हणूनच खूप पूर्वीच टाकले. असो.
तर "श्री' आणि "श्रीकृष्ण'च्या मिसळीत कांदेपोहे सापडले. बटाट्याची भाजीसुद्धा! शिवाय, तिथे सोबत स्लाईस ब्रेड देतात. मिसळ हाणायची ती लादीपावाबरोबरच! बेडेकरांची मिसळ म्हणजे चक्क आमटीभात वाटला. पुन्हा कधी फिरकलो नाही तिकडे.
मला आवडलेल्या पुण्यातल्या मिसळी ः
1. शनिवार पेठेतील "रामदास' : अतिशय कळकट हॉटेल, पण "बनविणाऱ्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीवर भेळेची चव असते,' या पुलंच्या तत्त्वानुसार तिथे उत्तम मिसळ मिळते.
2. टिळक रस्ता "रामनाथ' ः इथे ठीक मिसळ मिळते. फार नाही आवडली, कारण तेसुद्धा पोहे घालतात त्यात. पण तिखटजाळ असते. तिथे सोबत वडा खायची पद्धत आहे.
3. "काटाकिर्र'चे नाव बरेच ऐकले आहे. तिथे एकदा खायची आहे.
4. अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली. छान होती. साधीसुधी, पण उत्तम. वर उल्लेख आला आहेच.
5. नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ नुकतीच खाल्ली. उत्तम आहे.

एकूणच, शहरातल्या प्रसिद्ध मिसळींपेक्षा बाहेर छोट्या गावांत टपऱ्यांवर उत्तम मिसळी मिळतात, असे माझे मत झाले आहे!

प्रभाकर पेठकर's picture

24 Jan 2009 - 1:20 pm | प्रभाकर पेठकर

पुण्यात आल्यावर तुळशीबागेतील श्रीकृष्ण, शनिपाराजवळील "श्री' आणि नारायण पेठेतील "बेडेकर' मिसळींची नावे फार ऐकली होती. तिन्ही बंडल निघाल्या!

सहमत. त्यातल्या त्यात 'श्री मिसळ' चांगली आहे.

"वाडेश्‍वर'ची इडली 16 रुपयांना कशी काय मिळू शकते? शिवाय वर जादा चटणीचे पैसे वेगळे! हा म्हणजे कहरच! इडलीचे उत्पादन मूल्य जास्तीत जास्त पाच रुपये असेल. हॉटेल चालवण्याचा खर्च बिर्च मिळून आठ रुपये. त्याच्या दुप्पट-अडीच पट दर??

हॉटेलची गणितं इतकी सोपी नसतात. दक्षिण भारतिय पदार्थांची 'मटेरियल कॉस्ट' बरीच कमी असते. त्या मानाने पंजाबी पदार्थ, थाळी, बिर्याणी, ज्यूस वगैरे पदार्थांची 'मटेरियल कॉस्ट' जास्त असते. शिवाय, मनुष्यबळाचा खर्च, वेस्टेज, विविध हप्ते इत्यादी जास्त असते. म्हणजेच 'कॅपिटल इन्व्हेस्टमेंट' आणि 'रनिंग कॉस्ट' दोन्ही जबरदस्त असते. 'रुपाली' चा दिवसाचा खर्चच मुळी दहा हजाराच्या वर असणार. १६-१६ रुपयांना इडल्या विकून त्याला तितकाच फायदा झाला पाहीजे तरच ते हॉटेल चालू राहिल. एकूणात नफ्याचे प्रमाण जास्त असते पण तसाच नुकसानीचा धोकाही जास्त असतो. असो. प्रसिद्धी लाभली की त्याचे 'मुल्य'ही पदार्थांच्या दरात वाढते. अगदी तशीच किंवा त्याहून चांगली इडली एखाद्या कमी प्रसिद्ध उपहारगृहात मिळू शकेल. पण तिथे 'रुपाली' सारखे वातावरण, तत्पर सेवा, स्वच्छता, 'डेकोर' मिळणार नाही. काही हॉटेल्सना 'स्टेटस' सुद्धा चिटकलेले असते. 'बरिस्ता' ला कॉफी एवढी महाग का? असो.

शिवाय, तिथे सोबत स्लाईस ब्रेड देतात. मिसळ हाणायची ती लादीपावाबरोबरच!

१०० टक्के सहमत.

बेडेकरांची मिसळ म्हणजे चक्क आमटीभात वाटला.
१०० टक्के सहमत.

मला आवडलेल्या पुण्यातल्या मिसळी ः
1. शनिवार पेठेतील "रामदास' : अतिशय कळकट हॉटेल, पण "बनविणाऱ्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीवर भेळेची चव असते,' या पुलंच्या तत्त्वानुसार तिथे उत्तम मिसळ मिळते.

अजून चव चाखली नाही. जाऊन खायला पाहिजे.

2. टिळक रस्ता "रामनाथ' ः इथे ठीक मिसळ मिळते. फार नाही आवडली, कारण तेसुद्धा पोहे घालतात त्यात. पण तिखटजाळ असते.

'ठीक' हाच शब्द योग्य.

3. "काटाकिर्र'चे नाव बरेच ऐकले आहे. तिथे एकदा खायची आहे.

झकाऽऽऽऽस..! खाऊन पाहा. नक्कीच आवडेल.

4. अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली. छान होती. साधीसुधी, पण उत्तम. वर उल्लेख आला आहेच.
5. नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ नुकतीच खाल्ली. उत्तम आहे.

हम्म्म! खाऊन पाहिल्या पाहिजेत ह्या 'मिसळी'.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

आचरट कार्टा's picture

24 Jan 2009 - 10:58 am | आचरट कार्टा

रत्नागिरीत कधी आलात, तर ही ठिकाणं नक्की ट्राय करा.

१) वायंगणकर (मारुती मंदिर)
व्यक्तिश: मला फार नाही आवडत, पण इकडे फेमस आहे.

२) दत्त मिसळ (टॉकीजवरची / गांध्याची मिसळ)
उत्तम तर्री, झणझणीत. पण दुपारनंतर तर्री संपते. लवकर जाऊन खावे, हे ठीक.

३) माऊली हॉटेल ( KBS होस्टेल समोर)

४) हॉटेलचं नाव आठवत नाही. पण टॉकीज जवळच्या भाजी मार्केटशेजारी शाळेसमोर एक छोटंसं हॉटेल आहे. तिथे सुंदर मिसळ असते. झणझणीत, साधी, पण चविष्ट.

अरुंधती's picture

24 Mar 2010 - 10:22 am | अरुंधती

पुण्यात कोथरुडात कर्वेनगरला शिवदीप स्नॅक्सची मिसळ चांगली असते असं ऐकलंय... खात्री करायची आहे! :-)
त्याखेरीज पुण्यातल्या फेमश मिसळींची यादी वर आलीच आहे.
माझ्या आवडत्या
१. श्रीकृष्ण भुवन, तुळशीबाग
२. श्री उपाहारगृह शनिपार
३. बादशाही बोर्डिंग हाऊस - अगदी पेठी मिसळ मिळते हो! अजिबात तिखट नाही!
४. स्वीट होम - येथेही पेठी मिसळ मिळते! तर्री मात्र खूप तिखटजाळ करतात कधीकधी.

मिसळ हा सर्दीवरचा रामबाण इलाज आहे!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मालोजीराव's picture

28 Oct 2010 - 5:04 pm | मालोजीराव

पाटणकर उपहार गृह, भोर
आळेफाटा येथील मिसळ
नसरापूर एस टी थांब्या जवळची मिसळ अप्रतिम

मालोजीराव's picture

28 Oct 2010 - 5:11 pm | मालोजीराव

पाटणकर उपहार गृह, भोर
आळेफाटा येथील मिसळ
नसरापूर एस टी थांब्या जवळची मिसळ अप्रतिम

जरा हॉटेलचे नाव सांगाल का? हाय वे वरच आहे का?

मी महीन्यातुन २-३ वेळा त्या मार्गाने जात असतो. स्वाद घेता येइल.

मालोजीराव's picture

29 Oct 2010 - 3:58 pm | मालोजीराव

पाटणकर उपहार गृह, भोर ----- हे भोर मध्ये आहे राजवाडा चौका जवळ

आळेफाटा येथील मिसळ ----- आळेफाटा चौकातून माळशेज घाटाकडे जायला वळलो कि लगेच उजव्या हाताला (नाव लक्षात नाही )

नसरापूर एस टी थांब्या जवळ ------ राजगड ला जायला (गुंजवणी,वाजेघर)जिथे वडाप थांबतात त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला एक हॉटेल आहे

अविनाशकुलकर्णी's picture

28 Oct 2010 - 10:36 pm | अविनाशकुलकर्णी

बादशाही उपहार गृह ..
लो.टी.स्मा... जवळ
टिळक रस्ता..नदिच्या अलीकडचे पुणे....
पुणे..

हेम's picture

28 Oct 2010 - 11:16 pm | हेम

कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकले तरी मिसळीच्या लोकप्रियतेबाबत मात्र सर्वदूर एकमत असेल यांत शंका नाही.
स्वतःला मिसळभोक्ते म्हणवत असाल तर तुम्ही सकाळी मिसळवाला फोडणी देत असलेल्या वेळीच तिथे हजर असायलाच हवं. सूर्य वर चढत जातांना ज्याप्रमाणे नीरेची ताडी होते त्याप्रमाणे मिसळीची उसळ होत जाते. नाक झणझणावून टाकणार्‍या फोडणीच्या वासासारखा ब्रह्मानंद नाही. 'पंगतीत बसल्यावर वाढपी ओळखीचा हवा.कारण तुम्ही कुठेही कोपर्‍यांत बसला असाल तरी तुम्हांला हवे ते व्यवस्थित मिळते' असे पूर्वीचे लोक म्हणत, त्यांवरून जर मिसळवाला तुमच्या ओळखीचा असला तर तुमच्या मिसळीला बाकीच्यांपेक्षा चव आलेली असते.
मिसळस्थानांचे प्रकार दोन. पहिला प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुटुंबासहित बसून सुटसुटीतपणे मिसळ खाऊ शकतो, अशी hotel किंवा तत्सम जागा. दुसरा प्रकार म्हणजे रीक्षावाले वा तत्सम मंडळींबरोबर पंगतीला उभे राहून गाडयाच्या तिन बाजूंस असलेल्या लाकडी तटबंदीवर ठेवलेल्या पलेटमधला पाव हातांत धरुन दुसर्‍या हाताने तुकडे मिसळीच्या रश्श्यांत भिजवत मिसळ हाणणे.
मिसळीला फाकडू बनवण्यांत तिच्यात असलेल्या घटकांचा 'वाटा' फार महत्त्वाचा ठरतो. पहिला म्हणजे मिसळीचा बेस असलेली उसळ. ही जर व्यवस्थित मोड आलेली असली तर मजा आणते. त्याच्यावरचा थर हा प्रत्येक मिसळवाल्यासाठी optional असतो. यांत पोहे, भावनगरी, शेव, साबुदाणा खिचडी, चिवडा इ. पदार्थांपैकी काहिही असू शकते. या सर्वांवर कडी करणारा तिसरा थर आणि प्रत्येक मिसळीचा अतीमहत्त्वाचा घटक म्हणजे मिसळीचा रस्सा आणि त्यांवर तरंगणारी तर्री! 'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणार्‍यांच्यासुद्धां!) लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते, आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगैरे मंडळी लज्जत वाढवण्यास मदतीला असतातच. मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच खायला हवी. तिखटपणा झेपत नाही म्हणून मग दही, पापड इत्यादींशी सलगी करून मिसळ खाणार्‍यांना काटकोनाच्याच पंगतीत बसवायला हवं! हे म्हणजे मूळच्या गोडसर असलेल्या भोपळयावर फोडणी व तिखटमिठाचे संस्कार करून तथाकथित भाजी करण्यासारखं झालं! त्यापेक्षा भोपळयाचे घारगे केले तर किती दणादण संपतात! असो.
नासिकमध्ये श्यामसुंदर, तुषार,गंगा टी हाऊस, अंबिका, भगवंतराव या प्रस्थापित मिसळींशिवायदेखिल अनेक मिसळस्थाने आहेत. गंगापूर रोडवर Modern Cafe, विहार, रेणुका, अंकल्स, मेनरोडवर अगत्य, मखमलाबाद गांवात सुदर्शन हॉटेल, सणसणीत रश्शासाठी आडगांव नाक्यावर ओमसाई नाहीतर नेहरु गार्डन, सिडकोत शिवाजी चौकांत भामरे, साक्षी गणेश जवळ ओम टी हाउस, म्हसरुळ- पेठरोड रस्त्यावरचं सोहम्, सीतागुंफेच्या पुढे प्रविण टी उर्फ देवा, रविवार कारंजावरची बाळासाहेबांची मिसळ, रविवार पेठेतली लोकमान्य, कथडा भागातली सीतामाईंची हिरव्या रश्शाची मिसळ, बागवानपुर्‍यांत शिरसाट ही काही नांवे.

चिंतामणी's picture

29 Oct 2010 - 12:44 am | चिंतामणी

तात्या, तुमच्या आणि इतर मिसळप्रेमींच्यावतीने एक यादी टाकतो.

उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार, ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली
५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड
६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड
७) श्री- शनिपारा जवळ
८) नेवाळे- चिंचवड
९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
१०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२) जुन्नर बस स्थानक.
१३) फडतरे, कलानगरी.
१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
१५) गोखले उपहार गृह, ठाणे
१६) भगवानदास, नाशिक
१७) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे
१९) प्रकाश, दादर
२०) दत्तात्रय, दादर
२१) वृंदावन, दादर
२२) आस्वाद, दादर
२३) आनंदाश्रम, दादर
२४) मामा काणे
२५) आदर्श, दादर
२६) समर्थ दादर(पूर्व)
२७) पणशीकर (गिरगाव)
२८) विनय (गिरगाव)
२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक
३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक
३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक
३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक
३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक
३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे
४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार,
४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.
४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)
४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम
४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल
५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ
५२) हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव
५३) बावड्यातली मिसळ कोल्हापुर
५४) बादशाहि मिसळ, पुणे
५५) अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली
५६) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ
५७) शनिवार पेठेतील "रामदास'
५८) वायंगणकर(मारुती मंदिर) रत्नागिरी
५९) दत्त मिसळ (टॉकीजवरची / गांध्याची मिसळ) रत्नागिरी
६०) माऊली हॉटेल (KBS होस्टेल समोर) रत्नागिरी

नवीन भर
६१) सिंहगड रस्त्यावर नवश्या मारुतीचे शेजारी "खासबाग मिसळ"

दोन आठवड्यापुर्वी पुण्यात गेलो होतो तेव्हा एक दिवस काढुन लोणावळ्याला भट्कुन आलो. "मनशक्ती"ची मिसळ खायचा बेत होता. पण एकदोन रिक्षावाल्यांना विचारता त्यांनी दगडोबाची उर्फ बुवाची उर्फ हॉटेल साईनाथची मिसळ रेकेमेंण्ड केली. तेव्हा तिथे कुच केले. लोणावळ्याकडुन खंडाळ्याकडे जात असतांना हॉटेल फरियाझ ला जिथे उजवीकडे वळतात तोच रस्ता घ्यायचा, पण फरियाझला न थांबता थोडे पुढे निघायचे. हमरस्त्यापासुन साधारण पणे अर्धा-पाउण कि.मी. आता आहे.

इथे साधी/मिडीयम्/तिखट मिसळ मिळते. मी मिडीयम मिसळ आणि तर्रीवाला रस्सा मागवला होता. मंडळी भट्कुन भट्कुन खुप भुक लागली होती त्यामुळे समोर आलेल्या मिसळीचा फोटो काढणे राहुन गेले. इथे मिसळी बरोबर मिरचीचा ठेचा/खर्डा देतात. रस्सा मस्त मसालेदार/तिखट होता त्यात खर्डा. पुछो मत!!! एकदम जन्नत!!!

नंतर आत मधे जाउन फोटो काढले.

१. तेव्हा मावशींना बघुन सगळा माल घरगुती असल्याची खात्री पटली आणि चवीचे रहस्य उलगडले!!!
सुगरण हात!

२. तर्रीवाला रस्सा कातील होता!!
तर्रीबाज रस्सा

३. चला मंडळी मिसळ खायला!! याच फोटोत लिंबुंच्या बाजुला एका डब्यात खर्डा आहे.
मिसळ मांडियेली ...

नक्की चव घेउन बघा!

सुकामेवा's picture

4 Sep 2013 - 2:13 pm | सुकामेवा

+१

पांथस्थ's picture

4 Sep 2013 - 2:29 pm | पांथस्थ

गुगल मॅप्स च्या लिंन्क्स -

आता नक्की जाउन या!

सुकामेवा's picture

9 Oct 2013 - 3:14 pm | सुकामेवा

धन्यवाद

ज्ञानव's picture

4 Sep 2013 - 12:55 pm | ज्ञानव

बेस्ट मिसळ लिस्ट साठी इथे चक्कर मारायला हवी

(skip द ad)

दत्ता काळे's picture

4 Sep 2013 - 1:43 pm | दत्ता काळे

अजंठा हॉटेल, काका हलवाई समोर, एल.बी.एस. रोड, नवी पेठ, पुणे-३०.
कमी तिखट पण एक्दम चवदार.. कट एक नंबर.. क्वांटीटी भरपूर.. वयस्कर माणसांनासुध्दा खूप आवडेल.. फक्त
अतिशय कमी वेळात उपलब्ध असते ( कारण.. पुणे-३० ), सकाळी १०.३० ते दु.२.०० आणि संध्याकाळी ५.३० ते ८.३०. काही मान्यवर मंडळी इथे नेहमी येणार्‍यातली आहेत.

दीपक साळुंके's picture

3 Oct 2013 - 9:15 pm | दीपक साळुंके

वर कुणीतरी उल्लेख केलेलाच आहे, नगर रस्त्यावरच्या सरदवादीची (खास करुन नवनाथ) मिसळ ! अहाहा ! जन्नत !!!

सरदवाडीचीच 'मोरया' मिसळ आता पुण्यात चंदननगर-खराडी परिसरात मिळू लागलीय. पुण्यात बेष्ट !

आशु जोग's picture

4 Oct 2013 - 9:00 pm | आशु जोग

हा उल्लेख अजून कुणीच कसा केला नाही.
श्रीपाद उपाहारगृह - पौडकडून पुण्याकडे जाताना घाट चालू होण्यापूर्वी बहुतेक जण इथे थांबतात.
मालकांचे बोलणेही झणझणीत आहे.

स्वलेकर's picture

7 Oct 2013 - 1:20 pm | स्वलेकर

दीपक साळुंके >>

सरदवाडीचीच 'मोरया' मिसळ आता पुण्यात चंदननगर-खराडी परिसरात मिळू लागलीय. पुण्यात बेष्ट !>>>
नक्कि कुठे? मिळते. काही landmark? किंवा पत्ता.

एक तारा's picture

8 Oct 2013 - 4:48 pm | एक तारा

गूगल map वर या सगळ्या हॉटेल/दुकानांना tag करा आणि त्याचा दुवा द्या. म्हणजे सगळ्यांना आपापल्या ठिकाणाहून त्या त्या जागी कसा जायचा ते पाहता येईल. आणि exact location हि कळेल.
फक्त हे कसा करायचा ते मला नक्की माहित नाही. गुगलून पाहिल्यावर हे सापडला. जाणकारांनी कृपया मार्ग दाखवावा.
https://support.google.com/maps/answer/144365?hl=en

बबन ताम्बे's picture

8 Oct 2013 - 6:42 pm | बबन ताम्बे

पुण्याकडुन जाताना चाकणच्या पुढे भाम नावाचे गाव लागते पुणे-नाशिक हाय वे वर. तिथे भामची मिसळ म्हणुन फेमस हॉटेल आहे. टेस्टि असते मिसळ तिथली .

इथे एक "मिसळ-वारी" चा मार्ग सापडला!
फक्त गावाचं नाव बदला (नाशिक, कोल्हापूर, इत्यादि) आणि नकाशावर शोधा.

(इथे आपल्या आवडीचं नवीन ठिकाण यादीत कसं टाकायचं ते कळलं नाही, बहुधा मेंबरशिप लागेल.)

ज्योति होतेल ,भिगवन, पुने सोलापुर रस्ता

मालोजीराव's picture

23 Oct 2013 - 4:15 pm | मालोजीराव

संपूर्ण सोलापूर रोड ला चांगली मिसळ मिळण्याचे एकमेव ठिकाण.

बेभान's picture

9 Oct 2013 - 7:35 pm | बेभान

पुण्यात मॉडेल कॉलनीमध्ये निळ्या रंगाची निनावी टपरी आहे. भन्नाट, झणझणीत, नाद खूळा, एक नंबर, टांगा पलटी, मर्दानी मिसळ. तोडच नाय (गणेशखिंड रोडटच कृषी महाविद्यालयाकडून पुणे विद्यापीठाकडे येताना पुणे सेंट्रल मॉलनंतरचा पहिला लेफ्ट मफतलाल बंगल्याशेजारी). ह्याची मिसळ सकाळच्या एका-दिड तासातच संपते. साधारण सकाळी ९:३०ला तो तयार होते. नंतर डायरेक्ट दुपारी ३:३०वा. वरील ब-यापैकी ठिकाणी (कोल्हापूर आणि पुण्याच्या काटा किर्र्र्र्र्र्र, रामनाथ फडतरे इ.) मिसळ चाखल्या आहेत. यांचा नादच करायचा नाही तरीपण या तोडीची मिसळ हा माणूस बनवतो. आम्ही सगळ्या कोल्हापूरकर, नाशिककर, सांगली-सोलापूरी मित्रांचं प्रमाणपत्र याला मिळालयं.
नाहीतरी ब-याच ठिकाणचं कोल्हापूरी = नुसतच तिखटजाळ हे समीकरण आम्हाला कोणालाच झेपत नाही. स्पाइसी आणि हॉट यातला फरकच कळत नाही या लोकांना.

सिंहगडरोडवरती ’शेतकरी’ला अस्सल कोल्हापूरी पांढरा-तांबडा मिळतो. पण तिथे मिसळ मिळते का नाही याची कधी चौकशीच केली नाही.

किति कतुअक कराल कोल्हापूर आनि पुनेचे नशिक मधलि मिसल खऊन बघ एक्दा

लालबाग, न्यु सरदार. कोथिंबीर वडी सुद्धा उत्तम.

मालोजीराव's picture

23 Oct 2013 - 4:18 pm | मालोजीराव

श्री गणेश मिसळ, खेड शिवापूर , सातारा रस्ता

....झणझणीत रस्सा आणि कैरी फ्लेवर ची भर अप्रतिम

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Oct 2013 - 7:12 pm | डॉ.प्रसाद दाढे

जगात भारी, सातारा रोड, पुणे हे पण एक मस्त ठिकाण आहे. आमच्या सिंहगड डेंटल कॉलेजमधल्या चिपळुणकरांच्या कॅन्टीनमध्ये पण खूप छान मिसळ मिळते. त्याची तर्री बटाटवड्यात कांदा, शेव, कोथिंबिर आणि लिंबू पिळून तर लय भारी लागतं.
दीनानाथ हॉस्पिटलच्या तळघरातल्या कॅन्टीनमधली मिसळही छान असते; फक्त वाईट एव्हढेच असते की सहसा आपण असल्या ठिकाणी आपल्या आजारी नातलगाला भेटायला किंवा सोबत आलेलो असतो त्यामुळे मूड खूप चांगला नसतो. पण माझे वडील अतिशय गंभीर आजारी असतांना माझा मूड एलेव्हेट करायचे कामही 'त्या' मिसळीने नक्कीच केले होते (सुदैवाने वडिलही बरे झाले)

बलि's picture

23 Oct 2013 - 8:09 pm | बलि

साई छाया मिसळ हाउस - कात्रज बोगद्याच्या नंतर शिंदेवाडी मध्ये (साताऱ्याकडे जाताना )

अत्रुप्त आत्मा's picture

23 Oct 2013 - 10:07 pm | अत्रुप्त आत्मा

+१
परंतु ते फेमस व्हायच्या "मागे" लागलय,त्यामुळे ...

भाते's picture

25 Nov 2013 - 11:00 am | भाते

सोमवारी सकाळी हे असले धागे नका रे वर काढत जाऊ. हापिसात बसुन काम करायला खुप त्रास होतो.

उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणेउत्तम मिसळ मिळणारी ५१ ठिकाणे

१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती केंद्र, लोणावळ
३) मामलेदार, ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली
५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड
६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड
७) श्री- शनिपारा जवळ
८) नेवाळे- चिंचवड
९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
१०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२) जुन्नर बस स्थानक.
१३) फडतरे, कलानगरी.
१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
१५) गोखले उपहार गृह, ठाणे
१६) भगवानदास, नाशिक
१७) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे
१९) प्रकाश, दादर
२०) दत्तात्रय, दादर
२१) वृंदावन, दादर
२२) आस्वाद, दादर
२३) आनंदाश्रम, दादर
२४) मामा काणे, दादर
२५) आदर्श, दादर
२६) समर्थ दादर(पूर्व)
२७) माधवराव, सातारा
२८) विनय (गिरगाव)
२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक
३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक
३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक
३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक
३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक
३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार/रविवार पेठ , पुणे
४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४) टेंबे उपहारगृह - ठाकुरद्वार,
४५) छत्रे उपहारगृह - मुगभाट लेनच्या दारात.
४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)
४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावर नेताजी लंच होम
४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल
५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेणला चावडी नाक्यावर, तांडेल

१ ) अण्णा बेडेकर , पुणे
२ ) मनशक्ती के॑द्र , लोणावळा
३ ) मामलेदार , ठाणे
४ ) मूनमून मिसळ , डो॑बिवली
५ ) संजिवनी - माडिवालेकॉलनी , टिळक रोड
६ ) रामनाथ - साहित्य परिषदे जवळ , टिळक रोड
७ ) श्री - शनिपारा जवळ
८ ) नेवाळे - चिंचवड
९ ) ज?श्री - बजाज ऑटो समोर अकुर्डी .
१० ) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा .
११ ) कुंजविहारी , ठाणे स्टेशन
१२ ) जुन्नर बस स्थानक .
१३ ) फडतरे , कलानगरी .
१४ ) अनंताश्रम , जेल रोड , इंदौर
१५ ) गोखले उपहार गृह , ठाणे
१६ ) भगवानदास , नाशिक
१७ ) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८ ) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र , पुणे
१९ ) प्रकाश , दादर
२० ) दत्तात्रय , दादर
२१ ) वृंदावन , दादर
२२ ) आस्वाद , दादर
२३ ) आनंदाश्रम , दादर
२४ ) मामा काणे
२५ ) आदर्श , दादर
२६ ) समर्थ दादर ( पूर्व )
२७ ) पणशीकर ( गिरगाव )
२८ ) विनय ( गिरगाव )
२९ ) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३० ) शामसुंदर - सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ ) नाशिक
३१ ) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ ) नाशिक
३२ ) तुषार - कोलेज रोड ( गोड ब्राह्मणमिसळ ) नाशिक
३३ ) कमला विजय - दहिपुल ( ब्राह्मणमिसळ ) नाशिक
३४ ) गारवा - अंबड ( लाल मिसळ ) नाशिक
३५ ) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त ) नाशिक
३६ ) गुरुदत्त - शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ ) नाशिक
३७ ) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान ( रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस ) नाशिक
३८ ) श्रीकृष्ण - तुळशीबाग , पुणे
३९ ) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ , बुधवार् / रविवार पेठ , पुणे
४० ) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१ ) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२ ). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३ ) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४ ) टेंबे उपहारगृह - ठाकुरद्वार ,
४५ ) छत्रे उपहारगृह - मुगभाट लेन च्या दारात .
४६ ) प्रकाश ( जोगळेकर ), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७ ) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली ( डिलाइल रोडची बाजू )
४८ ) लोअर परळ स्टेशन ( पश्चिम ) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम
४९ ) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल
५० ) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे . तिथे " दांगटांची मिसळ "
५१ ) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ
५२ ) हॉटेल ज्योती , सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव
५३ ) बावड्यातली मिसळ कोल्हापुर
५४ ) बादशाहि मिसळ , पुणे
५५ ) अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली
५६ ) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ
५७ ) शनिवार पेठेतील " रामदास '
५८ ) वायंगणकर ( मारुती मंदिर ) रत्नागिरी
५९ ) दत्त मिसळ ( टॉकीजवरची / गांध्याची मिसळ ) रत्नागिरी
६० ) माऊली हॉटेल ( KBS होस्टेल समोर ) रत्नागिरी