उत्तम मिसळ मिळण्याचे ठिकाण

मी आत्तापर्य॑त चापलेल्या बेष्ट मिसळी॑ची लिस्ट देत आहे, कृपया ऍडिशन करावी.
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार, ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली

स्तूत्य..

दाढेसाहेब,

मिपावर उत्तम मिसळ मिळाणार्‍या ठिकाणांचे संकलन करण्याचा हा आपण अत्यंत स्तूत्य उपक्रम सुरू केला आहे. सध्या जरा गडबडीत आहे, परंतु सवडीने मीदेखील यात भर घालीन आणि हे सदर समृद्ध करीन..

मिपावरील सर्व सभासदांनी यात आपल्याला माहीत असलेल्या मिसळीच्या उत्तमोत्तम ठिकाणांबद्दल येथे अवश्य लिहावे अशी कळकळीची विनंती!

तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे,
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! Smile

आपला,
(मिसळप्रेमी) तात्या.

पुणे,

संजिवनी- माडिवाले कॉलनी, टिळक रोड
रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड
श्री- शनिपारा जवळ
नेवाळे- चिंचवड
जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
आज पर्यंत सगळ्यात झणझणीत मिसळ 'नेवाळे चिंचवड' येथे मिळाली.
संजिवनी मध्ये उपासाच्या दिवशी , अप्रतिम उपसाची मिसळ मिळते.

संजिवनी --

केसु .. हे रेस्टॉरंट तर माझ्या शाळेतल्या मित्राचे आहे पण कधी मिसळ खाण्याचा योग नाही आला तिथे ... आता पुण्याला गेलो की चक्कर मारतो Smile

हि घ्या आणखी काही नावें.......

१] दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
२] कुंजविहारी , ठाणे स्टेशन .

छानच..

१] दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.

दत्त स्नॅक्सची मिसळ बाकी छानच असते!

अजून काही,

१) जुन्नर बस स्थानक.
२) रामनाथ, पुणे.
३) फडतरे, कलानगरी.
४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
५) गोखले उपहार गृह, ठाणे
६) भगवानदास, नाशिक

फडतरे...

फडतरे मिसळ कोल्हापुर, मी खास ही मिसळ खायला जातो कधी कधी तिकडे पुण्याहुन.
बाकी चोरगे मिसळ कोल्हापुर पण चांगली असते.

मिसळ खायला कधीही आवडत असल्यामुळे, कार्यालयाच्या उपहारगृहातील मिसळपण आवडते Smile
--
ध्रुव

वा !!!

केशवराव,
नेवाळ्याची मिसळ जशी झणझणीत, तशीच "आग" लावणारी रामनाथ - ज्ञानप्रबोधिनी,सदाशिव पेठ ईथे मिळते.
कात्रजहून बोपदेव-घाटात जाताना, घाटाच्या आधीच्या गावात एका टपरीवजा "हाटिलात" पण अस्सल मावळी टच असलेली तर्रीदार मिसळ मिळते. (गावाच॑ नाव विसरलो आता.) .

रामनाथ

रामनाथ ला मिसळ खाण्यापेक्षाही तिथली हॉटेल बाहेर ची मेन्यु ची पाटी जास्त मजा आणते.
अवांतरः पुणेरी पाट्या मधे ही पाटी नेहमीच टॉप ला असते..

पुणे...

पुण्यातील गरवारे कॉलेज समोर फारच छान कोल्हापुरी मिसळ मिळते -- पण गर्दी खूप असते आणि मालक (तो पुणेरी नसून कोल्हपुरी आहे) दुकान संध्याकाळई ५ वाजता (!!!) बंद करतो. (का उगाच पुणेकरांना शिव्या घालतात लोक देव जाणे? Wink)

दुसरी एक कळकट तपरी आहे अलका टॉकीज समोर तिथेही झणझणीत मिसळ छान मिळते.

गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र :)

गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र Smile
छान मिसळ मिळते ...

दादरची काही

प्रकाश, दादर
दत्तात्रय, दादर
वृंदावन, दादर
आस्वाद, दादर
आनंदाश्रम, दादर
(दादरकर)बेसनलाडू

मामा काणे?

राहिले. खासकरून उपवासाची मिसळ Smile

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

खरेच की

मामा काणे राहिलेच. त्याचबरोबर 'आदर्श', दादर(पूर्व)चे 'समर्थ'ही
(अजूनही दादरकर Wink)बेसनलाडू

पणशीकर व

पणशीकर व विनय (गिरगाव) Batting Eyelashes

चुचु

ओर्कुटवरील यादी

ओर्कुटवरील मिसळपाव कम्युनिटीच्या चर्चेतील यादी

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

मिसळपाव

बालाजी स्नँक सेंटर चिंचवड येथे गणपती देवळा शेजारी

नाशिक

नाशिक मधे

शामसुंदर - सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ)
अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ)
तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मण मिसळ)
कमला विजय - दहिपुल (ब्राह्मण मिसळ)
गारवा - अंबड (लाल मिसळ)
अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सा मस्त)
गुरुदत्त - शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ)
मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस)

अजुन खुप आहेत पण वरचे एकदा चाखाच

पुणेरी काही

श्रीकृष्ण - तुळशीबाग
श्री उपाहार गृह - शनिपार , पुणे
रामनाथ - साहीत्य परीषदेशेजारी, टिळक रस्ता.
वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे
पुण्याचे पेशवे

क्षमस्व

मिराशीशेठ, पण ते वैद्य ची मिसळ साला फार टूकार निघाली, अगदी पू sss णे ३० छाप.

या सगळ्या...

आमच्या कोल्हापूरच्या मिसळीपुढे काहीच नाहीत.
१. फडतरे मिसळ
२. खासबागची मिसळ
३. चोरगे मिसळ
४. बावड्याची मिसळ.

खरंतर, कोल्हापूरात कोणत्याही छोट्या टपरीवरसुद्धा मिसळ उत्तम मिळते...
त्यात कांदेपोहे (पुणेरी) नसतात घातलेले. तर चक्क मोडाची धान्ये असतात.
म्हणूनच कोल्हापूरी मिसळ ती वेगळीच.

- (कोल्हापूरी मिरची)प्राजु

हे बरीक

खरे!

कोल्हापुरात कुठेही मिसळीची चव सारखीच असते. अगदी मलकापुरातही बेस्ट मिसळ मिळते.

मिसळ म्हणजे नुसते फरसाण आणि वर तर्री. त्या तर्रीत जी गंमत आहे, ती खरी! पोहे-बटाटे बिटाटे घातलेली मिसळ पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते माझ्या!

फडतरे मिसळ

फडतरे मिसळ १ नं. नो डाऊट!!

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

सहमत

प्राजुताई,
खरंतर, कोल्हापूरात कोणत्याही छोट्या टपरीवरसुद्धा मिसळ उत्तम मिळते...
एकदम सहमत बरं का. अगदी ५-८ रुपयातही अनेक छोट्या गाड्यांवर उत्तम मिसळ मिळते.

एकदम सहमत

कोल्हापूरची मोहन ची मिसळ मी गेली अनेक वर्ष अगदी ताव मारुन खात आहे,
आणि चोरग्यांची मिसळ खाउन तर नाकी -डोळी लाल बुंद झालेलो आहे.

(रंकाळ्यावर स्वच्छंद बागडणारा )
मदनबाण

गिरगावात...

टेंबे उपहारगृह - ठाकुरद्वार,

छत्रे उपहारगृह - मुगभाट लेन च्या दारात.

प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर

संजय अभ्यंकर

केशवसुमार यांचा (यांची ) मान राखून

खरे आहे. पण मला सर्व चवींची मिसळ आवडते. कोल्हापूरची फडतरे पण आणि वैद्यची पुणेरी मिसळ पण.
आणि आम्ही महत्व देतो मिसळीच्या सँपल ला. त्यामुळे कांदेपोहे आहेत का चिवडा आहे याला महत्व कमी. झणझणीत सँपल आणि कांदा हे मिसळीचे खरे भरभक्कम खांब.
टीपः वरील मते माझी वैयक्तीक आहेत.
(कोणतीही मिसळ चवीने खाणारा )
धन्या.
पुण्याचे पेशवे

हेच,

झणझणीत सँपल आणि कांदा हे मिसळीचे खरे भरभक्कम खांब.

हेच म्हणतो...!

आपला,
(मिसळवेडा) तात्या.

मुंबईत

मुंबईत "पणशीकर" फराळी तसेच साधी मिसळ

मुरबाड बस स्थानक
सातारा बस स्थानक

आणि अनेक ................................ बस स्थानके

सातार्‍यात......

सातार्‍यात...... पोवई नाक्यावर्..भारत भुवन्.....चन्द्रविलास
सातार्‍यात मिसळी सोबत पुरी भाजी ही फेमस आहे

दक्षिण-मध्य, मध्य मुंबई...

सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)

लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावर नेताजी लंच होम तसेच तीन - चार लहान लहान उपहारगृहातही झण्झणीत मिसळ मिळते.

दक्षिण-मध्य आणी मध्य मुंबईतील बहुमजली औद्योगीक वसाहतीतल्या बहुसंख्य कँटीन्स मध्ये झण्झणीत मिसळ मिळ्ते.

संजय अभ्यंकर.

वाहवा..!!

हे सर्व वाचल्यावर तो॑डाला भलतेच पाणी सुटले आहे..आता ह्या 'तीर्थस्थळा॑ना' भेटी देऊन मिसळरूपी प्रसाद सेविल्याशिवाय आत्म्यास मुक्ती मिळणार नाही!!

उत्तम

आपणास शतषहा धन्यवाद
चुकी साठी क्षमस्व

आपली

मिनु जोशी.

मुम्बइ

मुम्बइ पुन्याबाहेरच्या बस स्थानकावर उत्तम मिसळ मिळ्ते...कुठेही खा....

यादी छान बनत चालल्ये....!

समस्त मिसळ पाव प्रेमींनो,
यादी छान बनत चालल्ये. महाराष्ट्रात कुठेही हिंडताना हि यादी उपयोगी पडेल.
[ मिसळ पाव खात हिंडणारा] केशवराव.

तापीकर काकांचे लक्ष्मी विश्रांती गृह...

बाजीराव रोड वर भिकारदास मारोती जवळ तापीकर काकांचे होटेल आहे. तेथे मिसळ फार उत्तम मिळते.

हॉटेल रामनाथ (टिळक रोड) हे सुध्दा एक झकास आणि झणझणीत मिसळ मिळण्याचे ठिकाण.

नीलकांत

काटा किर्र् र्र

आज सकाळी एक फस्क्लास मिसळ खाल्ली बुवा..कर्वे रोड (पुणे) वरील 'काटा किर्र' ! झकास आहे. धमाल मुलाचे जाहीर आभार!! इतरा॑नाही माझा सल्ला- खाऊन पाहाच, मस्त आहे

काय हे

काय हे डॉक्टरसाहेब,

च्यायला, तुम्ही म्हणजे फार लाजवता बुवा! आभार बिभार कसले आलेत?

ए॑जॉय माडी....

-ध मा ल अण्णा.

नक्की पता

सांगा... नुसतं कर्वे रोड म्हणले तर फिरत बसावे लागेल... Smile
--
ध्रुव

गरवारे कॉलेज

ला लागून जनता सहकारी बँक आहे.. तिच्या समोर.

धन्यवाद...

--
ध्रुव

मुंबईकर लोक .....

आंबा टूर काढतात. कोकणात भटकतात व येतांना कॅरिअरवर आंबे घेऊन येतात. तशी आता मिसळ टूर काढावी लागणार.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

वा!

हे खुपच छान आहे की.
मी कोल्हापुरात फडतरे मिसळ खाल्ली.
चांगली आहे. तिखटपणा जरा कमी वाटला होता मला.
इतरवेळी देखील कोल्हापुरात नावाची पाटी नसलेल्या ठिकाणी देखील मिसळ खाल्ली आहे ती देखील चांगलीच मिळाली आजवर.
त्यामुळे प्राजुच्या कोल्हापुरात कुठेहि मिसळ चांगलीच मिळते ह्या म्हणण्याला २००% (१००% अनुभवाचे आणि १००% आमच्य कोल्हापुरकराचे:))
अनुमोदन.
केशवसुमार ने जसे लिहिले आहे त्याप्रमाणे आकुर्डी येथील जयश्री मिसळ ही देखील फर्मास आहे.
तात्या जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ" फेमस आहे. Smile
गेलो आणि खाल्ली तर इथे लिहिनच शिवाय फोटॉ देखील काढेन Smile

इथे

इथे उत्तम मिसळ मिळते!

हम्म!

हम्म! हे ठिकाण नवीनच दिसतंय, सवडीने जरा एकदा इथलीही मिसळ खाईन म्हणतो...! Smile

धन्यवाद ॐकारशेठ,

बाय द वे, दाढे साहेबांनी सांगितलेल्या पुण्यातल्या ठिकाणीही एकदा व्हिजिट द्यायला हवी!

तात्या.

धमालचे

धमालचे आभार अशासाठी की मी काटा-किर्र मिसळीचा एक्झॅट पत्ता विचारण्यासाठी रविवारी सक्काळी सक्काळी त्याच्या झोपेचे खोबरे केले तरी त्याने मला शिव्या न घालता (पुणेकर असूनही चक्क) बरोबर पत्ता सा॑गितला..Smile
बाय द वे 'रामनाथ' टिळक रोडची मिसळ इतकी चा॑गली असते काय..?चक्कर मारली पाहिजे

रामनाथ...

अहो डॉ. साहेब रामनाथ म्हणजे काय सांगू लाजवाब... मस्त कोल्हापूरी मिसळ घ्यायची इथली.. ... त्यामधे इथली गोल कांदाभजी कुस्करुन टाकायची..एकदम मस्त.. अहाहाहाहा...
मजा येते मिसळ खाताना. Smile
पुण्याचे पेशवे

मस्त

मस्त कोल्हापूरी मिसळ घ्यायची इथली..
माझ्या एका (पोळलेल्या) मित्राने रामनाथ मिसळ खाल्ल्यावर बाजूच्याच मेडिकल स्टोअर्समधून 'कैलास जीवन' खरेदी करण्याचा प्रेमळ सल्ला दिलाय..Smile)

रामनाथ

कालच मी रामनाथची मिसळ खाल्ली. मित्रा॑नी सल्ला दिल्यामुळे त्याला कमी तिखट सा॑गितली (कमी तिखट म्हटल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलेले पाहून मी मान खाली घातली.. पण इलाज नव्हता.. उद्या टेल लाईट पेटला म्हणजे?) पण कमी तिखट मिसळसुद्धा एकदम झणझणीत होती. चवही उत्कृष्ट होती. घाईत असल्याने फोटू काढू नाही शकलो. मिसळप्रेमी॑नी जरूर हाणावी..

मनशक्ति

जुन्या मु॑बई-पुणे महामार्गावर लोणावळे येथे स्वामी विज्ञानान॑दा॑चा एक आश्रम आहे (मनशक्ति के॑द्र). लहानपणापासून मु॑बई-पुणे प्रवास अस॑ख्य वेळा केला असूनही इथल्या मिसळीचा बरीच वर्षे मला पत्ता नव्हता. एकदा मी आणि माझा मित्र मक्या परा॑जपे बाईकवरून पुण्याला चाललो होते ते॑व्हा त्याने मला इथली दही- मिसळ खाण्याचा सल्ला दिला. पण हरामखोराने मला असेही घाबरविले की इथल्या कॅ॑टीनमधे काही खायचे असेल तर तासभर बसून जप करावा लागतो.. खरे वाटून मी पळच काढणार होतो पण थट्टा करतोय म्हटल्यावर गेलो तिथे. (आता जाता-येता मिसळ खाल्ल्याशिवाय पुढे हलत नाही..) तिथली दही-मिसळ एकदम छान असते. बटाटे वडाही फस्क्लास असतो. हे दोन्ही पदार्थ खाऊन मग त्यावर एक चहा प्यावा अन पुढे सुटावे..

दही-मिसळ...

मिसळीत दही म्हणजे मिसळीची "तौहिन" वाटते बुवा.....मिसळ कशी झणझणीत तर्री बरोबरच छान लागते!
पण एकदा करतो ट्राय ह्या मनशक्ती केंद्राची.