उत्तम मिसळ मिळण्याचे ठिकाण

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
30 Jan 2008 - 10:25 am

मी आत्तापर्य॑त चापलेल्या बेष्ट मिसळी॑ची लिस्ट देत आहे, कृपया ऍडिशन करावी.
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार, ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली

मौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 Jan 2008 - 10:31 am | विसोबा खेचर

दाढेसाहेब,

मिपावर उत्तम मिसळ मिळाणार्‍या ठिकाणांचे संकलन करण्याचा हा आपण अत्यंत स्तूत्य उपक्रम सुरू केला आहे. सध्या जरा गडबडीत आहे, परंतु सवडीने मीदेखील यात भर घालीन आणि हे सदर समृद्ध करीन..

मिपावरील सर्व सभासदांनी यात आपल्याला माहीत असलेल्या मिसळीच्या उत्तमोत्तम ठिकाणांबद्दल येथे अवश्य लिहावे अशी कळकळीची विनंती!

तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे,
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)

आपला,
(मिसळप्रेमी) तात्या.

केशवसुमार's picture

31 Jan 2008 - 1:35 am | केशवसुमार

संजिवनी- माडिवाले कॉलनी, टिळक रोड
रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड
श्री- शनिपारा जवळ
नेवाळे- चिंचवड
जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
आज पर्यंत सगळ्यात झणझणीत मिसळ 'नेवाळे चिंचवड' येथे मिळाली.
संजिवनी मध्ये उपासाच्या दिवशी , अप्रतिम उपसाची मिसळ मिळते.

संदीप चित्रे's picture

5 Sep 2008 - 2:39 am | संदीप चित्रे

केसु .. हे रेस्टॉरंट तर माझ्या शाळेतल्या मित्राचे आहे पण कधी मिसळ खाण्याचा योग नाही आला तिथे ... आता पुण्याला गेलो की चक्कर मारतो :)

केशवराव's picture

30 Jan 2008 - 11:12 am | केशवराव

१] दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
२] कुंजविहारी , ठाणे स्टेशन .

विसोबा खेचर's picture

30 Jan 2008 - 11:25 am | विसोबा खेचर

१] दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.

दत्त स्नॅक्सची मिसळ बाकी छानच असते!

अजून काही,

१) जुन्नर बस स्थानक.
२) रामनाथ, पुणे.
३) फडतरे, कलानगरी.
४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
५) गोखले उपहार गृह, ठाणे
६) भगवानदास, नाशिक

हेम's picture

28 Oct 2010 - 11:22 pm | हेम

भगवानदास नांवाची/प्रकारची कुठलीही मिसळ नासिकमध्ये नाही. मेनरोडवर भगवंतराव आहे, पण सध्या एवढी खास नाही.

सौरभ पारखे's picture

5 Jan 2017 - 2:23 pm | सौरभ पारखे

श्री वडोबा , येथे ७ प्रकारची मिसळ आणि ११ प्रकारचे बटाटे वडे मिळतात श्री वडोबा

सौरभ पारखे's picture

5 Jan 2017 - 2:26 pm | सौरभ पारखे

निखारा दम मिसळ , कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ,उपवासाची मिसळ ,जैन मिसळ,, मिसळ फ्राय ,स्व इच्छा मिसळ असे त्याचे प्रकार आहेत .. सोबत आगळे वेगळे मारवाडी ताक सुद्धा मिळते

सौरभ पारखे's picture

5 Jan 2017 - 2:26 pm | सौरभ पारखे

निखारा दम मिसळ , कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ,उपवासाची मिसळ ,जैन मिसळ,, मिसळ फ्राय ,स्व इच्छा मिसळ असे त्याचे प्रकार आहेत .. सोबत आगळे वेगळे मारवाडी ताक सुद्धा मिळते

सौरभ पारखे's picture

5 Jan 2017 - 2:26 pm | सौरभ पारखे

निखारा दम मिसळ , कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ,उपवासाची मिसळ ,जैन मिसळ,, मिसळ फ्राय ,स्व इच्छा मिसळ असे त्याचे प्रकार आहेत .. सोबत आगळे वेगळे मारवाडी ताक सुद्धा मिळते

ध्रुव's picture

30 Jan 2008 - 11:19 am | ध्रुव

फडतरे मिसळ कोल्हापुर, मी खास ही मिसळ खायला जातो कधी कधी तिकडे पुण्याहुन.
बाकी चोरगे मिसळ कोल्हापुर पण चांगली असते.

मिसळ खायला कधीही आवडत असल्यामुळे, कार्यालयाच्या उपहारगृहातील मिसळपण आवडते :)
--
ध्रुव

धमाल मुलगा's picture

30 Jan 2008 - 11:29 am | धमाल मुलगा

केशवराव,
नेवाळ्याची मिसळ जशी झणझणीत, तशीच "आग" लावणारी रामनाथ - ज्ञानप्रबोधिनी,सदाशिव पेठ ईथे मिळते.
कात्रजहून बोपदेव-घाटात जाताना, घाटाच्या आधीच्या गावात एका टपरीवजा "हाटिलात" पण अस्सल मावळी टच असलेली तर्रीदार मिसळ मिळते. (गावाच॑ नाव विसरलो आता.) .

मनापासुन's picture

31 Mar 2008 - 11:00 am | मनापासुन

रामनाथ ला मिसळ खाण्यापेक्षाही तिथली हॉटेल बाहेर ची मेन्यु ची पाटी जास्त मजा आणते.
अवांतरः पुणेरी पाट्या मधे ही पाटी नेहमीच टॉप ला असते..

मनिष's picture

30 Jan 2008 - 11:40 am | मनिष

पुण्यातील गरवारे कॉलेज समोर फारच छान कोल्हापुरी मिसळ मिळते -- पण गर्दी खूप असते आणि मालक (तो पुणेरी नसून कोल्हपुरी आहे) दुकान संध्याकाळई ५ वाजता (!!!) बंद करतो. (का उगाच पुणेकरांना शिव्या घालतात लोक देव जाणे? ;))

दुसरी एक कळकट तपरी आहे अलका टॉकीज समोर तिथेही झणझणीत मिसळ छान मिळते.

फ्रॅक्चर बंड्या's picture

21 Jan 2009 - 3:04 pm | फ्रॅक्चर बंड्या

गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र :)
छान मिसळ मिळते ...

स्वछंदी-पाखरु's picture

28 Oct 2010 - 10:47 pm | स्वछंदी-पाखरु

+१
सहमत लै भारी आहे त्याच्या कडे मिसळ.....

बेसनलाडू's picture

30 Jan 2008 - 12:28 pm | बेसनलाडू

प्रकाश, दादर
दत्तात्रय, दादर
वृंदावन, दादर
आस्वाद, दादर
आनंदाश्रम, दादर
(दादरकर)बेसनलाडू

नंदन's picture

30 Jan 2008 - 12:56 pm | नंदन

राहिले. खासकरून उपवासाची मिसळ :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

बेसनलाडू's picture

30 Jan 2008 - 1:22 pm | बेसनलाडू

मामा काणे राहिलेच. त्याचबरोबर 'आदर्श', दादर(पूर्व)चे 'समर्थ'ही
(अजूनही दादरकर ;))बेसनलाडू

पर्नल नेने मराठे's picture

21 Jan 2009 - 11:29 am | पर्नल नेने मराठे

पणशीकर व विनय (गिरगाव) ;;)

चुचु

अगदी न्यू यॉर्क टाईम्समध्येही प्रकाश पडला आहे. वाचून(च) ढेकर दिला :-(
(हावरट)बेसनलाडू

नंदन's picture

30 Jan 2008 - 1:05 pm | नंदन

ओर्कुटवरील मिसळपाव कम्युनिटीच्या चर्चेतील यादी

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सुकामेवा's picture

30 Jan 2008 - 5:42 pm | सुकामेवा

बालाजी स्नँक सेंटर चिंचवड येथे गणपती देवळा शेजारी

कौटील्य's picture

30 Jan 2008 - 6:39 pm | कौटील्य

नाशिक मधे

शामसुंदर - सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ)
अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ)
तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मण मिसळ)
कमला विजय - दहिपुल (ब्राह्मण मिसळ)
गारवा - अंबड (लाल मिसळ)
अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सा मस्त)
गुरुदत्त - शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ)
मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस)

अजुन खुप आहेत पण वरचे एकदा चाखाच

भुमन्यु's picture

4 Sep 2013 - 2:37 pm | भुमन्यु

क्रुष्ण विजय - गंगापूर रोड (विद्या विकास सर्कल जवळ)
विहार - गंगापूर रोड

पेस्तन काका's picture

26 Nov 2013 - 11:31 am | पेस्तन काका

भजवति - पंचवटी कारंजा
मावशीची मिसळ - रविवार कारंजा
मखमलाबाद ला पण आहे. नाव आठवत नाहिये.

तुषार - कोलेज रोड (कॉलेज) (गोड ब्राह्मण मिसळ)

हि गोड नसुन तिखट पाणी मिसळ मिळते.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jan 2008 - 11:02 pm | llपुण्याचे पेशवेll

श्रीकृष्ण - तुळशीबाग
श्री उपाहार गृह - शनिपार , पुणे
रामनाथ - साहीत्य परीषदेशेजारी, टिळक रस्ता.
वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे
पुण्याचे पेशवे

केशवसुमार's picture

31 Jan 2008 - 1:39 am | केशवसुमार

मिराशीशेठ, पण ते वैद्य ची मिसळ साला फार टूकार निघाली, अगदी पू sss णे ३० छाप.

प्राजु's picture

30 Jan 2008 - 11:10 pm | प्राजु

आमच्या कोल्हापूरच्या मिसळीपुढे काहीच नाहीत.
१. फडतरे मिसळ
२. खासबागची मिसळ
३. चोरगे मिसळ
४. बावड्याची मिसळ.

खरंतर, कोल्हापूरात कोणत्याही छोट्या टपरीवरसुद्धा मिसळ उत्तम मिळते...
त्यात कांदेपोहे (पुणेरी) नसतात घातलेले. तर चक्क मोडाची धान्ये असतात.
म्हणूनच कोल्हापूरी मिसळ ती वेगळीच.

- (कोल्हापूरी मिरची)प्राजु

आपला अभिजित's picture

23 Jan 2009 - 5:43 pm | आपला अभिजित

खरे!

कोल्हापुरात कुठेही मिसळीची चव सारखीच असते. अगदी मलकापुरातही बेस्ट मिसळ मिळते.

मिसळ म्हणजे नुसते फरसाण आणि वर तर्री. त्या तर्रीत जी गंमत आहे, ती खरी! पोहे-बटाटे बिटाटे घातलेली मिसळ पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते माझ्या!

भुमन्यु's picture

4 Sep 2013 - 2:39 pm | भुमन्यु

ती खरी! पोहे-बटाटे बिटाटे घातलेली मिसळ पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते माझ्या!

१००% सहमत

सुचेल तसं's picture

24 Jan 2009 - 12:31 pm | सुचेल तसं

फडतरे मिसळ १ नं. नो डाऊट!!

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

अन्या दातार's picture

30 Jan 2008 - 11:14 pm | अन्या दातार

प्राजुताई,
खरंतर, कोल्हापूरात कोणत्याही छोट्या टपरीवरसुद्धा मिसळ उत्तम मिळते...
एकदम सहमत बरं का. अगदी ५-८ रुपयातही अनेक छोट्या गाड्यांवर उत्तम मिसळ मिळते.

मदनबाण's picture

30 Mar 2008 - 6:17 pm | मदनबाण

कोल्हापूरची मोहन ची मिसळ मी गेली अनेक वर्ष अगदी ताव मारुन खात आहे,
आणि चोरग्यांची मिसळ खाउन तर नाकी -डोळी लाल बुंद झालेलो आहे.

(रंकाळ्यावर स्वच्छंद बागडणारा )
मदनबाण

संजय अभ्यंकर's picture

31 Jan 2008 - 1:09 am | संजय अभ्यंकर

टेंबे उपहारगृह - ठाकुरद्वार,

छत्रे उपहारगृह - मुगभाट लेन च्या दारात.

प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर

संजय अभ्यंकर

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2008 - 2:26 am | llपुण्याचे पेशवेll

खरे आहे. पण मला सर्व चवींची मिसळ आवडते. कोल्हापूरची फडतरे पण आणि वैद्यची पुणेरी मिसळ पण.
आणि आम्ही महत्व देतो मिसळीच्या सँपल ला. त्यामुळे कांदेपोहे आहेत का चिवडा आहे याला महत्व कमी. झणझणीत सँपल आणि कांदा हे मिसळीचे खरे भरभक्कम खांब.
टीपः वरील मते माझी वैयक्तीक आहेत.
(कोणतीही मिसळ चवीने खाणारा )
धन्या.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

31 Jan 2008 - 9:21 am | विसोबा खेचर

झणझणीत सँपल आणि कांदा हे मिसळीचे खरे भरभक्कम खांब.

हेच म्हणतो...!

आपला,
(मिसळवेडा) तात्या.

मानस's picture

31 Jan 2008 - 4:00 am | मानस

मुंबईत "पणशीकर" फराळी तसेच साधी मिसळ

मुरबाड बस स्थानक
सातारा बस स्थानक

आणि अनेक ................................ बस स्थानके

मनापासुन's picture

31 Mar 2008 - 11:11 am | मनापासुन

सातार्‍यात...... पोवई नाक्यावर्..भारत भुवन्.....चन्द्रविलास
सातार्‍यात मिसळी सोबत पुरी भाजी ही फेमस आहे

लॉरी टांगटूंगकर's picture

4 Sep 2013 - 11:57 pm | लॉरी टांगटूंगकर

भाभु माहिती आहे.
चंद्रविलास नेमकं कुठंय?

संजय अभ्यंकर's picture

31 Jan 2008 - 6:28 am | संजय अभ्यंकर

सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)

लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावर नेताजी लंच होम तसेच तीन - चार लहान लहान उपहारगृहातही झण्झणीत मिसळ मिळते.

दक्षिण-मध्य आणी मध्य मुंबईतील बहुमजली औद्योगीक वसाहतीतल्या बहुसंख्य कँटीन्स मध्ये झण्झणीत मिसळ मिळ्ते.

संजय अभ्यंकर.

डॉ.प्रसाद दाढे's picture

31 Jan 2008 - 6:12 pm | डॉ.प्रसाद दाढे

हे सर्व वाचल्यावर तो॑डाला भलतेच पाणी सुटले आहे..आता ह्या 'तीर्थस्थळा॑ना' भेटी देऊन मिसळरूपी प्रसाद सेविल्याशिवाय आत्म्यास मुक्ती मिळणार नाही!!

विवेकवि's picture

31 Jan 2008 - 6:35 pm | विवेकवि

आपणास शतषहा धन्यवाद
चुकी साठी क्षमस्व

आपली

मिनु जोशी.

बापु देवकर's picture

31 Jan 2008 - 7:33 pm | बापु देवकर

मुम्बइ पुन्याबाहेरच्या बस स्थानकावर उत्तम मिसळ मिळ्ते...कुठेही खा....

केशवराव's picture

1 Feb 2008 - 8:40 am | केशवराव

समस्त मिसळ पाव प्रेमींनो,
यादी छान बनत चालल्ये. महाराष्ट्रात कुठेही हिंडताना हि यादी उपयोगी पडेल.
[ मिसळ पाव खात हिंडणारा] केशवराव.

बाजीराव रोड वर भिकारदास मारोती जवळ तापीकर काकांचे होटेल आहे. तेथे मिसळ फार उत्तम मिळते.

हॉटेल रामनाथ (टिळक रोड) हे सुध्दा एक झकास आणि झणझणीत मिसळ मिळण्याचे ठिकाण.

नीलकांत

डॉ.प्रसाद दाढे's picture

30 Mar 2008 - 6:06 pm | डॉ.प्रसाद दाढे

आज सकाळी एक फस्क्लास मिसळ खाल्ली बुवा..कर्वे रोड (पुणे) वरील 'काटा किर्र' ! झकास आहे. धमाल मुलाचे जाहीर आभार!! इतरा॑नाही माझा सल्ला- खाऊन पाहाच, मस्त आहे

धमाल मुलगा's picture

31 Mar 2008 - 10:06 am | धमाल मुलगा

काय हे डॉक्टरसाहेब,

च्यायला, तुम्ही म्हणजे फार लाजवता बुवा! आभार बिभार कसले आलेत?

ए॑जॉय माडी....

-ध मा ल अण्णा.

ध्रुव's picture

31 Mar 2008 - 11:09 am | ध्रुव

सांगा... नुसतं कर्वे रोड म्हणले तर फिरत बसावे लागेल... :)
--
ध्रुव

मनस्वी's picture

31 Mar 2008 - 11:46 am | मनस्वी

ला लागून जनता सहकारी बँक आहे.. तिच्या समोर.

ध्रुव's picture

31 Mar 2008 - 2:13 pm | ध्रुव

--
ध्रुव

सुधीर कांदळकर's picture

30 Mar 2008 - 6:30 pm | सुधीर कांदळकर

आंबा टूर काढतात. कोकणात भटकतात व येतांना कॅरिअरवर आंबे घेऊन येतात. तशी आता मिसळ टूर काढावी लागणार.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

झकासराव's picture

30 Mar 2008 - 9:13 pm | झकासराव

हे खुपच छान आहे की.
मी कोल्हापुरात फडतरे मिसळ खाल्ली.
चांगली आहे. तिखटपणा जरा कमी वाटला होता मला.
इतरवेळी देखील कोल्हापुरात नावाची पाटी नसलेल्या ठिकाणी देखील मिसळ खाल्ली आहे ती देखील चांगलीच मिळाली आजवर.
त्यामुळे प्राजुच्या कोल्हापुरात कुठेहि मिसळ चांगलीच मिळते ह्या म्हणण्याला २००% (१००% अनुभवाचे आणि १००% आमच्य कोल्हापुरकराचे:))
अनुमोदन.
केशवसुमार ने जसे लिहिले आहे त्याप्रमाणे आकुर्डी येथील जयश्री मिसळ ही देखील फर्मास आहे.
तात्या जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ" फेमस आहे. :)
गेलो आणि खाल्ली तर इथे लिहिनच शिवाय फोटॉ देखील काढेन :)

ॐकार's picture

31 Mar 2008 - 1:12 am | ॐकार

इथे उत्तम मिसळ मिळते!

विसोबा खेचर's picture

31 Mar 2008 - 1:17 am | विसोबा खेचर

हम्म! हे ठिकाण नवीनच दिसतंय, सवडीने जरा एकदा इथलीही मिसळ खाईन म्हणतो...! :)

धन्यवाद ॐकारशेठ,

बाय द वे, दाढे साहेबांनी सांगितलेल्या पुण्यातल्या ठिकाणीही एकदा व्हिजिट द्यायला हवी!

तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

31 Mar 2008 - 10:45 am | डॉ.प्रसाद दाढे

धमालचे आभार अशासाठी की मी काटा-किर्र मिसळीचा एक्झॅट पत्ता विचारण्यासाठी रविवारी सक्काळी सक्काळी त्याच्या झोपेचे खोबरे केले तरी त्याने मला शिव्या न घालता (पुणेकर असूनही चक्क) बरोबर पत्ता सा॑गितला..:)
बाय द वे 'रामनाथ' टिळक रोडची मिसळ इतकी चा॑गली असते काय..?चक्कर मारली पाहिजे

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Mar 2008 - 8:52 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो डॉ. साहेब रामनाथ म्हणजे काय सांगू लाजवाब... मस्त कोल्हापूरी मिसळ घ्यायची इथली.. ... त्यामधे इथली गोल कांदाभजी कुस्करुन टाकायची..एकदम मस्त.. अहाहाहाहा...
मजा येते मिसळ खाताना. :)
पुण्याचे पेशवे

डॉ.प्रसाद दाढे's picture

2 Apr 2008 - 10:23 pm | डॉ.प्रसाद दाढे

मस्त कोल्हापूरी मिसळ घ्यायची इथली..
माझ्या एका (पोळलेल्या) मित्राने रामनाथ मिसळ खाल्ल्यावर बाजूच्याच मेडिकल स्टोअर्समधून 'कैलास जीवन' खरेदी करण्याचा प्रेमळ सल्ला दिलाय..:))

डॉ.प्रसाद दाढे's picture

17 Jun 2008 - 11:06 pm | डॉ.प्रसाद दाढे

कालच मी रामनाथची मिसळ खाल्ली. मित्रा॑नी सल्ला दिल्यामुळे त्याला कमी तिखट सा॑गितली (कमी तिखट म्हटल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलेले पाहून मी मान खाली घातली.. पण इलाज नव्हता.. उद्या टेल लाईट पेटला म्हणजे?) पण कमी तिखट मिसळसुद्धा एकदम झणझणीत होती. चवही उत्कृष्ट होती. घाईत असल्याने फोटू काढू नाही शकलो. मिसळप्रेमी॑नी जरूर हाणावी..

डॉ.प्रसाद दाढे's picture

17 Jun 2008 - 11:16 pm | डॉ.प्रसाद दाढे

जुन्या मु॑बई-पुणे महामार्गावर लोणावळे येथे स्वामी विज्ञानान॑दा॑चा एक आश्रम आहे (मनशक्ति के॑द्र). लहानपणापासून मु॑बई-पुणे प्रवास अस॑ख्य वेळा केला असूनही इथल्या मिसळीचा बरीच वर्षे मला पत्ता नव्हता. एकदा मी आणि माझा मित्र मक्या परा॑जपे बाईकवरून पुण्याला चाललो होते ते॑व्हा त्याने मला इथली दही- मिसळ खाण्याचा सल्ला दिला. पण हरामखोराने मला असेही घाबरविले की इथल्या कॅ॑टीनमधे काही खायचे असेल तर तासभर बसून जप करावा लागतो.. खरे वाटून मी पळच काढणार होतो पण थट्टा करतोय म्हटल्यावर गेलो तिथे. (आता जाता-येता मिसळ खाल्ल्याशिवाय पुढे हलत नाही..) तिथली दही-मिसळ एकदम छान असते. बटाटे वडाही फस्क्लास असतो. हे दोन्ही पदार्थ खाऊन मग त्यावर एक चहा प्यावा अन पुढे सुटावे..

मनिष's picture

19 Jun 2008 - 12:03 am | मनिष

मिसळीत दही म्हणजे मिसळीची "तौहिन" वाटते बुवा.....मिसळ कशी झणझणीत तर्री बरोबरच छान लागते!
पण एकदा करतो ट्राय ह्या मनशक्ती केंद्राची.

मनापासुन's picture

31 Mar 2008 - 11:08 am | मनापासुन

धमाल्या मुळचा बारामतिकर आहे.....अजुन सच्चे पुणेकरी गुण त्याला लागयचे आहेत.
असो.
बापट उपहारग्रुह ( जुन्या राजा केळकर म्युझीअम शेजारी) इथे मिसळीबरोबर साहित्य प्रेम ही मिळते.....झणझणीत मिसळीबरोबर त्यानन्तर मस्त गुळ टाकलेला खरवस मिळतो.......बाकी बापट उपहार्ग्रुह पुण्याला अपवाद नाही इथे पुणेरी पाट्या चक्क मेन्यु कार्ड मधे बघायला मिळतात. उदा: जेवण मोठे....जेवण लहान्.....किंवा ...आमच्या येथे लस्सी खायची असते...इतरत्र ती प्यायची असते.
इथे मिसळी बरोबर असणारा रस्सा.आहाहाहाहा.रसना त्रुप्त होते

मनस्वी's picture

31 Mar 2008 - 11:44 am | मनस्वी

मिसळीनंतर खरवस..?? सगळी मजाच गेली मग मिसळीची..

माझी आवडती
श्री उपहार गृह (पुणे)
चोरगे (कोल्हापूर)
कैलास (खेड-शिवापूर)

काटा किर्र (पुणे), फडतारे (कोल्हापूर) आता ट्राय करीन नक्की.

अवांतर :
घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर बापट उत्तम पर्याय आहे.
इथला दहीभात अवश्य खाउन बघा.

घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर बापट उत्तम पर्याय आहे.
इथला दहीभात अवश्य खाउन बघा.
आणि झुणकाभाकर आणि वांग्याची मसालेदार भाजी सुद्धा. आणि जोडीला सोलकढी ग्लास :)
(हावरट)बेसनलाडू

पुण्यातले सर्वात आद्य मिसळीचे दुकान
वैद्य मिसळ : मोती चौक्/फडके हौद दरम्यान रवीवार पेठ रेल्वे बूकींग शेजारी.
ही मिसळ म्हणजे पुण्यातली आद्य मिसळ्...कित्येक वर्षात चवीत जराही बदल नाही
थोडी सौम्य असते.पण सकाळी ९:३० च्य अगोदरच मिळते.
दुकानातले वातावरण ही आद्य आहे.खुर्च्या टेबले काउंटर काऊटरवरचा माणुस सगळे कसे राजा गोसावी च्या पिक्चर मधुन थेट उचलुन आणल्यासरखे वाटते.भींती वरची चित्रे सुद्धा.
मिसळी मधे नायलॉन चे पोहे ही इथली खासीयत.

रितेश's picture

3 Apr 2008 - 6:56 pm | रितेश

महाराष्ट्र सोड्ल्याच खुप दुख: होतय आज....
कुणाल Hyderabad मधे मिसळ कुठे मिळते माहित आहे का?

विसुनाना's picture

30 Jun 2008 - 1:15 pm | विसुनाना

हैदराबादमंदी मिस्सळ पायजेल काय? मर्दान्यानो, मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळ करू या की. कवा येतायसा?
कारभारनीला मटक्या भिजवायला सांगून ठिवतो. ;)

पांथस्थ's picture

4 Sep 2008 - 8:50 pm | पांथस्थ

करता काय...आम्ही पण पुणे सोडून बंगलोर मधे आलो...आता मारा कपाळावर हात...

असो...गृहलक्ष्मी करुन खाऊ घालते कधी कधी....तुमच्या कडे हि सोय आहे कि नाही? :?

(तर्रिच्या सुगंधाने मदहोश होणारा) पांथस्थ...

लवंगी's picture

21 Jan 2009 - 1:20 am | लवंगी

मिसळितला मि पण दिसत नाही... यादी पाहुन लाळ गळतेय.

रामराजे's picture

17 Jun 2008 - 11:30 pm | रामराजे

टिटवाळ्याला, गणपतीच्या मंदिराबाहेर
पुणे-नगर रोडला, वाघोली फाट्याजवळ

कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर निदान कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व
आहे!

झकासराव's picture

19 Jun 2008 - 12:12 am | झकासराव

सगळीकडे मिसळ छानच मिळते ह्या समजुतीला तडा गेला माझ्या. :(
मिसळीची फार तल्लफ आली होती म्हणून कसाबसा वेळ काढुन जवळच म्हणून ष्टँडजवळच्या कॅफे जयभवानी मधे मिसळ खाल्ली.
:(
वाइट्ट.
त्यासोबत दिलेला पाव हा बहुतेक मिल्क ब्रेड होता तो गोड आणि मिसळीचा कट म्हणून बहुतेक पुरी भाजी ची पातळ भाजी होती.
कधीच खाउ नका तिथे.
थोड अजुन लांब जावुन दुसरीकडे खाल्ल्ली असती तर बर झाल असत रावं.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Jan 2009 - 5:33 pm | डॉ.प्रसाद दाढे

कोल्हापुरात सगळीकडे छान मिसळ मिळते हा माझाही समज परवा भ॑ग पावला.. कोल्हाप्रास दुपारी तीनला पोचलो, चोरगे, फडतरे इ मिसळी॑ची चौकशी केली पण त्या
फक्त सकाळी मिळतात असे कळले आणि मला तर दुसर्‍या दिवशी सकाळी लगेच
परतायचे होते. मग स्टॅन्डवर सुब्रैय्या नामक एका हॉटेलात गेलो व मिसळ-पाव खाल्ला.
पाव म्हणजे ब्रेड स्लाईस होता (मोस्टली शिळा) आणि तर्री म्हणजे सकाळचे उरलेले सा॑बार
होते. अर्थात चूक माझीही होतीच, उडप्याकडे मिसळ कशी चा॑गली मिळेल पण मला वाटल॑ हा कोल्हापुरातला उडपी आहे ते॑व्हा.. जाऊ देत.
अवा॑तरः बाकी कोल्हापूर मला फार आवडले, बेष्ट शहर आहे. काय एकेक ब॑गले आहेत, व्वा! हवा आल्हाददायक, माणसेही मेहमाननवाजीत तरबेज. स्वतः पुणेकर असल्याने कोल्हापुरी दिलदारी अन खातीरदारी जास्तच जाणवली.

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Jun 2008 - 6:37 pm | डॉ.प्रसाद दाढे

पुणे- नगर रस्त्यावर शिरूरच्या अलिकडे सरदवाडीस चा॑गली मिसळ मिळते.. आम्ही परवाच हाणली (गडबडीत फोटू राहून गेला)

आपला अभिजित's picture

23 Jan 2009 - 5:46 pm | आपला अभिजित

मी पण हुरडा पार्टीला नगरला जाताना हाणली सरदवाडीची मिसळ.

बेश्ट आहे एकदम!!

शैलेन्द्र's picture

29 Jun 2008 - 6:55 pm | शैलेन्द्र

पुणे नाशिक रोड्ला, चाकण जवळ, ऊर्मिला रुचिपालट, पन हल्लि बिघडलिय म्हणतात.

१.५ शहाणा's picture

29 Jun 2008 - 9:13 pm | १.५ शहाणा

दौंड मधे जोगळेकर उपहार ग्रह ... व कामत यांची मिसळ खा

श्रीयुत संतोष जोशी's picture

30 Jun 2008 - 1:05 pm | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,
पेण ला चावडी नाक्यावर तांडेल ची मिसळ 'लै भारी ' असते. पण सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंतच मिळते.

आणि

नाशिक ला कॉलेज रोड ला एक गाडीवाला आहे. झक्कासच बनवतो.तो पण सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंतच असतो.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

पेस्तन काका's picture

26 Nov 2013 - 11:23 am | पेस्तन काका

नाशिक ला कॉलेज रोड ला एक गाडीवाला आहे

. तुम्हाला गणुची मिसळ म्हणायचीये का?

सचीन जी's picture

30 Jun 2008 - 2:10 pm | सचीन जी

उत्तम मिसळिचे माझे निकष असे आहेत -
१. मूळ पदार्थ - मोड आलेली मटकिचि उसळ ! यात अत्यंत थोडे फरसाण व बराच कांदा. मिसळिचा दर्जा हा फरसाणाच्या व्यस्त प्रमाणात असतो. काही नाजुक मिसळिमधे भरमसाठ फरसाण असते. काही महान लोक यात बटाट्याची भाजी पण घालतात. ही तर अगदीच फालतु मिसळ.
२. अत्यंत तिखट, गरम, झणझणीत तर्रि - हिच्यावर तेलाचा तवंग असलाच पाहिजे. तर्रि ही डायरेक्ट मोठ्या भांड्यातुनच वाढायला हवी आणि ती ही मागाल तितक्या वेळेला. कमीत कमी ३ / ४ वेळा तर्रि मागीतलिच पाहीजे. वाटीतुन तर्रि मिळ्णारी मिसळ ही मिसळ नव्हेच!
३. थोडासा शिळा वाटणारा गोल पाव.( स्लाइस पाव नव्हे )
४. हॉटेलातल कळकट वातावरण

या सगळ्या निकषाला पावणारी बेस्ट मिसळ मीळते - हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव!
एकदा अवश्य भेट द्यावी!

नाखु's picture

5 Jul 2008 - 5:19 pm | नाखु

कुणालाच कोल्हापुरची "बावड्यातली " कशी आठवत नाही ?????????????????
मी पुण्यातुन कोल्हापुर ला गेल्यावर हि "मीसळ" बर्याच वेळा चापली आहे..

नेवाळे आणि बालाजी चिंचवड ही स्थानीक "तीर्थशेत्रे" आहेतच.....

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

दिनेश५७'s picture

5 Jul 2008 - 10:33 pm | दिनेश५७

फोर्टमध्ये मोती हलवाईकडेपण मस्त मिसळ मिळते. पण संध्याकाळनंतर तीची चव उतरत जाते. दुपारी या मिसळीची मजा काही न्यारीच असते.

कुंदन's picture

6 Jul 2008 - 4:45 pm | कुंदन

घाटकोपरला पुर्वेकडे, फलाटाच्या कल्याणच्या बाजुच्या असलेल्या रेल्वे पुलावरुन उतरल्या उतरल्या स्थानका बाहेरच लॉटरीच्या दुकाना शेजारी एक छोटेखानी हॉटेल आहे ( नाव आठवत नाही , पण बहुतेक "नित्यानंद" असे असावे). तिथे मिसळ पाव तसेच कांदा भजी ही छान मिळतात....

मिंटी's picture

5 Sep 2008 - 10:44 am | मिंटी

पुण्यात मिसळ सगळ्यात मस्त मिळते काटाकिर्र्........मधे...

वाई फाट्याला अजिंक्य नावाचं हॉटेल आहे तिथे पण फार मस्त मिसळ मिळते.......

वाई गावात शेवड्यांकडे तिखट मिसळ मिळते.........

मनिशा पिम्पर्कर's picture

19 Sep 2008 - 7:48 pm | मनिशा पिम्पर्कर

मिसल नाव जरी घेतले तरी एकदम मस्त.. अहाहाहाहा...

ranjit's picture

20 Jan 2009 - 3:05 pm | ranjit

मी हि कोल्हापूर्चाच सर्व kop. मिसळ छानच!!!!!!!!!!

पुण्यात लक्ष्मी रस्त्याला विजय(लि.ना.चि.म.) या चित्रपटगृहात जे हाटेल आहे
तिथली मिसळ अतिशय छान असते. तर्री अगदी गरमा गरम आणि त्यात
पाव बुडवून सोबत बटाटा वड़ा खावा. फक्त जरा सकाळी सकाळी जावे.
साधारण १० च्या आसपास.

अविनाशकुलकर्णी's picture

21 Jan 2009 - 12:08 am | अविनाशकुलकर्णी

अरेरे....मित्रांनो एक नाव राहिले...सहत्र बुध्धे यांच्या बादशाहि भुवन च्या मिसळिचि चव काय वर्णावि..खावे तेंव्हा ठावे...अप्रतिम चव असलेल्या मिसळचि चव नक्कि घ्या..मिसळ खाल्ल्यावर मस्का स्लाईस व चहा..आत्मा खुष...टिळक रोड..नुसत्या खमंग वासावरुन सुध्धा उपहार ग्रुह
शोधुन काढताल...

अविनाश..बादशाहि मिसळ प्रेमि

केदार केसकर's picture

22 Jan 2009 - 6:38 pm | केदार केसकर

अलका टॉकीज च्या समोर!

mamuvinod's picture

23 Jan 2009 - 1:21 pm | mamuvinod

चाकणची मिसळ कधी खाल्ली का रे मिपाकरानो,

एकदा खा, चव घ्या मग बोला सोबत भेळ पण खा.

एक चाकणकर

ढ's picture

23 Jan 2009 - 2:31 pm |

काही हाटीलाचं नाव पत्ता रस्त्याचं नाव सांगशील की नाही?
का चाकण मधे येऊन मिसळ मिसळ असं ओरडायचं?