थोडी प्रस्तावना: पाऊस म्हणजे नेमकं काय? वाट पहाणे? मिलनाचा आनंद? एक अनामिक हुरहुर? एक अविरत सुरु असणारा काळाचा, विश्वाचा अनंत प्रवास? कि आणखी काही? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडत आलेले आहेत. या प्रश्नांची उकल करतांना स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादाही ध्यानात आल्या. मग एक दिवस या तिघीजणी भेटल्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेल्या आणि काही नवे प्रश्नही. बघा तुम्हाला काय सांगतायत ते.
पाऊस - १
पाऊस कधी असाही
पाऊस कधी तसाही
-----
कधी
गंगामाईच्या आरतीसाठी गंगामाईवरच
सोडलेल्या दिव्यांसारखा ॠषीतुल्य पाऊस
-----
कधी
थेम्सच्या कोण्या एका
निर्जन तिरावरील गिरीजाघराच्या
घंटेसारखा धिरगंभीर पाऊस
-----
कधी
भिमेवर घुमणार्या
विठूनामाच्या गजरासारखा अभंग पाऊस
-----
कधी
सकाळच्या प्रसन्नतेलाही
उदासीची झालर देणार्या
भव्य आणि वृद्ध मॅपलसारखा एकटा पाऊस
-----
कधी
सनातन वडापारंब्यांच्या
जाळीतील इवल्याश्या
गणपती मंदिरासारखा रहस्यमयी पाऊस
-----
कधी
सागरी वादळाची
निर्लज्ज साथ देणारा निर्दयी पाऊस
-----
कधी
पहाटेच्या प्राजक्तसड्यावर
नाजुक मोत्यांची लड सजवणारा रसिक पाऊस
-----
कधी
आईच्या हातच्या लोण्याच्या
गोळ्यासारखा नवनित पाऊस
-----
कधी
सखीच्या गजर्यातल्या
मोगर्यांच्या कळ्यांसारखा लाजाळू पाऊस
-----
कधी
लेकीच्या डोळ्यात चमकणार्या
आनंदी तार्यासारखा विजेरी पाऊस
-----
कधी
बाबांच्या अभिमानाने भरलेल्या
छातीतील श्वासासारखा घनव्याकुळ पाऊस
-----
कधी
मनाच्या खोल गाभार्यात घुमणार्या
सुन्न शांततेसारखा घरघरणारा पाऊस
-----
कधी
कभिन्न ढगांमागून लालपिवळ्या सूर्यकिरणांना
बालमुठीत पकडणारा पिसा पाऊस
-----
तर कधी
दूर क्षितीजावर पसरलेल्या
सांजलालीसारखा कातर पाऊस
------
पाऊस कधी असाही
पाऊस कधी तसाही
****************************
पाऊस - २
पाऊस कधी तुझाही
पाऊस कधी माझाही
-----
कधी
तुझ्या मेहंदीभरल्या हातातील
किणकिणणार्या पाटल्यांसारखा बावनकशी पाऊस
-----
कधी
तुझ्या केसात अडकलेल्या
चमचमणार्या चांदण्यासारखा लकाकणारा पाऊस
-----
कधी
तुझ्या अथांग डोळ्यांमधे उडणार्या
पक्षांच्या थव्यांसारखा बेभान पाऊस
-----
कधी
माझ्या ओठी खुलणार्या तुझ्या
हास्यासारखा खळखळणारा पाऊस
------
कधी
तुझा श्वासगंध माझ्या उरी
रुजवणारा हिरवा हिरवा कच्चा पाऊस
-----
कधी
तुझ्या सचैल भिजलेल्या
झळाळकांतीसम तुळसमंजीरी पाऊस
-----
कधी
माझ्यातला तुझ्या अन् तुझ्यातल्या
माझ्या एकसंध धाग्यासारखा अतूट पाऊस
-------
कधी
माझ्या धमन्यांमधून वाहणार्या
तुझ्या रसिक प्रेमासारखा रक्तवर्णी पाऊस
------
पाऊस कधी तुझाही
पाऊस कधी माझाही
****************************
पाऊस - ३
पाऊस कधी असाही
पाऊस कधी तसाही
-----
पाऊस कधी कळ
पाऊस कधी बळ
पाऊस कधी मन
पाऊस कधी बन
पाऊस कधी रण
पाऊस कधी क्षण
पाऊस कधी साजण
पाऊस कधी पैंजण
----
पाऊस कधी विरह
----
पाऊस कधी झरणं
पाऊस कधी सरणं
पाऊस कधी विज
पाऊस कधी निज
पाऊस कधी भिजणं
पाऊस कधी थिजणं
पाऊस कधी मोहळ
पाऊस कधी सढळ
पाऊस कधी भान
पाऊस कधी पान
पाऊस कधी भेट
पाऊस कधी पेट
-----
पाऊस कधी तू
पाऊस कधी मी
-----
पाऊस कधी असाही
पाऊस कधी तसाही
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१३/०६/२०१३)
प्रतिक्रिया
3 Aug 2013 - 8:39 am | प्रचेतस
अप्रतिम.
पावसाख्यान अतिशय आवडले.
3 Aug 2013 - 8:58 am | चित्रगुप्त
पाऊसाच्या उपमांचा पाऊस खूपच आवडला.... पावसाच्या उपमांचा पावस खूपच आवडला.
3 Aug 2013 - 9:38 am | चाणक्य
सुरेख. पाऊस दरवेळी नव्याने भेटतो खरा. जे मनात तेच पावसात...
3 Aug 2013 - 10:41 am | तिमा
तिन्ही पाऊस आवडले. पण पहिला विशेष!
बरसते रहो.
6 Aug 2013 - 5:38 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो....पहिला पाऊसच जास्त आवडला.
फेबु आणि अन्य ठिकाणी सर्क्युलेट होणार्या आणि मला बेहद्द आवडणार्या "आयुष्य म्हंजे नानाचा अंगठा...पावनखिंडीत हातात घेतलेली मूठभर माती..." इ.इ.
या राईटअपची आठवण झाली.
3 Aug 2013 - 11:25 am | मदनबाण
सुरेख ! :)
4 Aug 2013 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा
चीं.................ब! :)
4 Aug 2013 - 10:46 am | Bhagwanta Wayal
खुपच छान..!
5 Aug 2013 - 1:38 pm | michmadhura
खूप आवडले.
5 Aug 2013 - 1:56 pm | स्पा
__/\__
कमाल .. कमाल ... कमाल ....
निवांत वाचण्यासाठी राखून ठेवलेली होती
चीज झालं ..
हायलाईट काय करू ? एकूण एकूण कडवं कहर आहे
जियो मिका
5 Aug 2013 - 11:24 pm | सईसखी
तिघीजणी एकदमच आल्याने पाऊस फारच जोरदार झालाय..पण पाऊस तो पाऊसचं भिजायला कोणाला आवडणार नाही?
एक एक कविता वाचत गेले आणि मनापासुन आवडल्या...पावसासारख्याच..मस्त..बहारदार.
6 Aug 2013 - 4:46 pm | मनीषा
पावसाची अनेक रुपे आवडली !
6 Aug 2013 - 6:51 pm | मदनबाण
मिका तू इतके सुंदर लिहले आहेस की यावरुन मला थोडासा रुमानी हो जाये या चित्रपटातला नाना पाटेकरचा एक सीन आठवला होता... माझ्या आधीच्या प्रतिसादात तो द्यायचा राहुन गेला होता, तो आता इथे देतो.
हा मेरे दोस्त
वही बारिश
वही बारिश जो आसमान से आती है
बूंदों मैं गाती है
पहाड़ों से फिसलती है
नदियों मैं चलती है
नेहरों मैं मचलती है
कुवे पोखर से मिलती है
खाप्रेलो पर गिरती है
गलियों मैं फिरती है
मोड़ पर संभालती है
फिर आगे निकलती है
वही बारिश
ये बारिश अक्सर गीली होती है
इसे पानी भी कहते है
उर्दू मैं आप
मराठी मैं पानी
तमिळ मैं कन्नी
कन्नड़ मैं नीर
बंगला मैं… जोल केह्ते है
संस्क्रित मैं जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते है
ग्रीक मैं इसे aqua pura
अंग्रेजी मैं इसे water
फ्रेंच मैं औ’
और केमिस्ट्री मैं H2O केह्ते है
ये पानी आँख से ढलता है तो आँसू कहलता है
लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है
हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है
और कभी कभी यह पानी सरकारी फ्य्लो मैं अपने कुए समेत चोरी हो जाता है
पानी तो पानी है पानी जिन्दगानी है
इसलिए जब रूह की नदी सुखी हो
और मन का हिरण प्यासा हो
दीमाग मैं लगी हो आग
और प्यार की घागर खाली हो
तब मैं….हमेशा
ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूँ
मेरी मानिए तो ये बारिश खरिदेये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश
सिर्फ 5 हज़ार रुपये मैं
इस्से कम मैं दे कोई तो चोर की सज़ा वो मेरी
आपकी जुती सिर पर मेरी
मेरी बारिश खरीदये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश
6 Aug 2013 - 7:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हा संवाद खुपच सुंदर आहे. नानाच्या बर्याच मुलाखतींमधून त्याने उद्धृत केला आहे. मलापण खुप आवडतो हा.
6 Aug 2013 - 9:33 pm | पैसा
मस्त लिहिलंस! बाकी थेम्सवरच्या पावसाची आता सवय झाली असेल ना! :)
7 Aug 2013 - 3:50 am | स्पंदना
जेंव्हा शब्द सपडत नाहीत तेंव्हा वाट पहावी लागते प्रतिसाद द्यायला.
या वेळी अजुनही काही सुचल नाही लिहावं असं, कदाचित मनाचा पिळा जरा जास्तच थबथबलाय पावसानं.
7 Aug 2013 - 4:16 am | सस्नेह
हे विशेष आवडले !
7 Aug 2013 - 7:40 am | कवितानागेश
परत परत वाचतेय....
काय प्रतिक्रिया द्यावी ते कळत नाहीये. :)
9 Aug 2013 - 10:28 pm | दत्ता काळे
कविता आवडली.
9 Aug 2013 - 11:55 pm | आतिवास
एकदम खूप अंगावर आल्यागत झाला पाऊस!
शिवाय कवीला स्वतःला काय वाटतं नेमकेपणानं हे समजलं नाहीच....
सवडीने वाचते परत, निवांत
बघते काही कळतंय का ते! :-)
10 Aug 2013 - 12:46 am | अभ्या..
मिका रे एका पावसासाठि किती मोत्यांचा पाउस पाड्लास रे. अन आम्ही पामर एक प्रतिसाद द्यायला शब्द सापडेना .
3 Jul 2015 - 2:07 pm | प्यारे१
+111111
ह्या मिका ला काही चेटूक अवगत आहे नक्की!
12 Aug 2013 - 9:07 am | वेणू
क्ला स....!!
शब्दनिवड बेहद्द आवडली
14 Aug 2013 - 10:19 am | अनिदेश
आवडली.....!!!
14 Aug 2013 - 11:48 am | psajid
कधी ...
लेकीच्या डोळ्यात चमकणार्या
आनंदी तार्यासारखा विजेरी पाऊस
आणि ....
कधी
बाबांच्या अभिमानाने भरलेल्या
छातीतील श्वासासारखा घनव्याकुळ पाऊस
हे खूपच छान आणि भावनिक ! सुन्दर कविता !
18 Aug 2013 - 1:42 pm | भ ट क्या खे ड वा ला
चिम्ब भिजलो ,अति अप्रतिम
18 Aug 2013 - 10:19 pm | चिगो
तिन्ही कविता सुंदर आहेत.. दुसर्या कवितेने "तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही" हे गाणं आठवलं..
19 Aug 2013 - 3:19 pm | फिझा
मस्त अप्रतिम ….छान !!
19 Aug 2013 - 9:24 pm | भ ट क्या खे ड वा ला
चिंब .......................... भिजवलत .
3 Jul 2015 - 12:50 pm | एक एकटा एकटाच
जबरदस्त
3 Jul 2015 - 1:56 pm | पद्मावति
खुप छान. पहिली कविता तर फारच सुरेख.
3 Jul 2015 - 1:59 pm | वेल्लाभट
क्या बात है ! सुरेख !