ढिश्क्लेमरः
जिंदगी जम चुकी है च्या वेळेस झाला तसा गोंधळ होऊ न देता या वेळेस मी सरळ चाणक्यलाच गळ घातली. म्हटले बाबा रे, ते अनुवाद, भावानुवाद काय मला जमत नाही ते तूच कर, तुला ते भन्नाट जमते. आणि त्याने माझ्या प्रेमाखातर केले त्यासाठी त्याला धन्यवाद देऊन त्याचा अपमान कसा करु? खरंतर, त्याचा भावानुवाद माझ्या मुळ रचनेपेक्षा सुंदर झाला आहे.
तर यावेळेसची हि हिंदी रचना आणि तिचा चाणक्य यांनी केलेला गजलेच्या स्वरुपातला भावानुवादः
कतरा कतरा जलते बदन को
एकबार छू जा
तेरे हाथोंका एहसासही मुक्कमल है
ये जलन तेरे तसव्वुरसे काबु मे रहती है
-------
तुम जो राते छोड गयी हो
अब तक उन्हे
महफूज़ करके रख्खा है मैने
वो राते
तेरे आँखोंके उजले काजलसी चमकती है
.
किसी दिन उसमेसे
कोई रात खोल के बैठ जाता हु
.
इमली के पेड के नीचे लेटकर
उसिके पत्तोसे झा़ंकते
उतरते हुए चांद को
ताकते हुए दोनोंने बितायी हुई वो रात
दूर किसी गिरजेके घंटे की आवाज़
और तेरे मेरे बीच महकता ठहराव
साफ़ नजर आता है
अब बस इस ठहराव के मायने बदल गये है
.
इन दिनो तो
वो चांद भी इस इमली के पाससे
नही गुजरता
उपरीउपरही इमलीसे पूछ लेता है
वो आयी थी क्या?
.
शायद वो भी तेरे तसव्वुरका
कायल हो गया है
.
वो सवाल सुनके
एक अजीबसी जलन मुझको
कतरा कतरा जलाती है
फिर वो रात मैं महफूज़ करके
रख देता हू
----
बस्स... एकबार छू जा
तेरे हाथोंका एहसासही मुक्कमल है
ये जलन तेरे तसव्वुरसे काबु मे रहती है
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२४/०६/२०१३)
तस्सवुर = अस्तित्व
मुक्कमल = अपनेआपमे स्वयंपूर्ण
महफूज़ = सुरक्षित
गिरजा = चर्च
मायने = अर्थ
कायल = फिदा
एकदा...फक्त एकदा ईथे येऊन जा
तुझं ईथे 'नसणं' , तूच एकदा पाहून जा
धुंद तुझ्या रात्री, जपल्या आहेत मी काही
मिट्ट तुझ्या काजळाने, त्या रात्री जरा उजळून जा
कधी बोलू पाहते, रात्र एखादी त्यातली
बोलायला उसने तिच्याशी, अवसान मला देऊन जा
अजून पांघरुणाला, सवय माझी होत नाही
आलीस की त्यालाही तुझी, ऊब जरा देऊन जा
सवयीने येत आहे, तो चंद्र रोज अजूनही
त्याला दोन धीराचे, तू शब्द जरा सांगून जा
चंद्र येता नभी मग, ते चांदणेही कावीळते
उतारा म्हणून तुझा, एक स्पर्श जरा ठेवून जा
तिच्या-माझ्यातली निःशब्दता, असली जरी अजूनही
बदलते संदर्भ तिचे, हे चांदण्या समजून जा
तुझं ईथे 'नसणं' , तूच एकदा पाहून जा
-- चाणक्य
(१४/०७/२०१३)
प्रतिक्रिया
15 Jul 2013 - 12:26 pm | चाणक्य
काहिही....आपण किती नम्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न! (ह.घे.वे.सां.न.ल)
15 Jul 2013 - 12:27 pm | वेल्लाभट
क्या बात है ! तुम्हा दोघांनीही दोन्ही रचनात बहार आणली आहे...
क्लास! जाम आवडली.
15 Jul 2013 - 4:34 pm | कवितानागेश
दोन्ही रचना सुंदर झाल्या आहेत. :)
22 Jul 2013 - 12:13 am | किसन शिंदे
माऊशी शमत! :)
16 Jul 2013 - 9:40 am | अनिदेश
दोन्ही रचना उत्तम ...!!!!
16 Jul 2013 - 1:21 pm | सुधीर
यावेळी हिंदी मधला शब्दसंग्रह अपुरा पडल्याने मराठी जास्त आवडली. शब्दार्थ दिले नसते तर पंचायत झाली असती.
16 Jul 2013 - 3:30 pm | पैसा
पण यात हिंदीपेक्षा ऊर्दू शब्द जास्त आहेत वाटतं!
19 Jul 2013 - 1:27 pm | चिगो
मिका, हिंदी कविता सुंदर. चाणक्य ह्यांची गजलही सुंदरच..
माफ करा. मला कवितेतलं फार काही कळत नाही, पण ही गजल तुमच्या कवितेचा भावानुवाद म्हणण्यापेक्षा तीवरुन सुचलेली, स्फुरलेली आहे आहे असं मला वाटतं. दोन्हीमधले 'नुआंसेस' (मराठी?) खुप वेगवेगळे आहेत..
19 Jul 2013 - 4:42 pm | भावना कल्लोळ
दोन्ही रचना आवडल्या …
21 Jul 2013 - 5:15 am | रेवती
भावनासारखेच म्हणते. दोन्ही रचना आवडल्या.