णमस्कार्स लोक्स,
हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे. अजूनही बरेच श्लोक आहेत, तेही कधी प्रसंगोपात शेअर करेनच.
कस्येयं तरणि: प्रपा पथिक नः किं पेयमस्यां पयः |
धेनोर्वा उत माहिषं बधिर रे वारः कथं मंगल: |
भौमो वाऽथ शनेश्वरोऽमृतमिदं तत्तेऽधरे दृश्यते |
श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे, यद् रोचते तत्पिब ||
तर एक वाटसरू एका गावी आला आहे. त्याला तहान लागलीये. पण विहीर समोर दिसली तरी समोर एक तरुणी दिसल्यावर बोलायला काहीतरी निमित्त हुडकले तर पाहिजेच नैका? मग साहेबांनी विचारले,
"कस्येयं तरणि: प्रपा?-तहानेपासून तारणारी ही विहीर कुणाची आहे?"
"पथिक, नः- रे वाटसरू, आमची आहे."
"किं पेयं अस्यां? - यात पेय काय आहे?"
तरुणी मोठी सुंदर असावी. नपेक्षा आता यापुढे बोलण्यासारखे काही फारसे नसले तरी वाटसरू साहेब परत पीजे मारू लागले. ती काय दुधातुपाची विहीर थोडीच असणार होती? पण बोलायची हौस दांडगी ;)
"पयः-पाणी".
आता पय शब्दाची मजा अशी की त्याचा अर्थ दूध अन पाणी असा दोन्ही होतो. प्रवाश्याने दूध असा अर्थ घेऊन पुन्हा वेळ काढण्यासाठी पीजे मारणे सुरू केले.
"धेनोर्वा उत माहिषं?-गायीचं आहे की म्हशीचं?"
मुलगीही लगेच त्याची संभावना करते.
"बधिर रे, वारः- अरे बहिर्या, वार आहे ते!!!"
आता वार शब्दाची मजा अशी की वारि म्हंजे पाणी अन वार म्हंजे दिवस. [खरे तर व्याकरणदृष्ट्या श्लोकातले रूप चुकलेले आहे, पण कोटीच्या विनोदास्तव तिकडे जरा दुर्लक्ष करू.] मग प्रवासी तरुणाने अजून पीजे मारत संभाषण सुरू ठेवले.
"कथं मंगलः, भौमो वाऽथ शनेश्वरः?-वार म्हंजे काय मंगळवार आहे, रविवार आहे की शनिवार?"
आता मात्र तरुणीने सांगितले,
"अमृतमिदम्- अरे, हे अमृत आहे!"
आता इथे चांगला मौका मिळालासे पाहून तरुणाने चौका मारला-एकदम हेलिकॉप्टर शॉट!
"तत्तेऽधरे दृश्यते- ते तर तुझ्या ओठात दिसतंय" फुल्टू फ्लर्टिंग :D
आता या इतक्या बोल्ड उत्तरावर तरुणीची प्रतिक्रिया काय आहे?
"श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे- अरे विलासी प्रवासी मित्रा,
यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते पी!!! " ;) ;)
फुल ऑन ग्रीन शिग्नलच दिला की हो एकदम तिने. यापुढे काय झाले हे कवी सांगत नाही, अन सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा. राजकन्येबरोबरच्या अशाच कैक अनुभवांवरती त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले, सुळावर जातानाही त्याला तेच आठवत होते म्हणे. तेव्हा राजाने सुळावरून त्याला उतरवले. ते नंतर कधीतरी शेअर अवश्य करेन. लै मसाला आहे त्यात ;)
प्रतिक्रिया
10 Jul 2013 - 3:59 pm | स्पा
=)) =)) =))
फुल फाडू है हे
10 Jul 2013 - 4:06 pm | सुखी
लै भारी
10 Jul 2013 - 4:19 pm | आतिवास
चांगला चाललाय संस्कृतचा अभ्यास :-)
पण कोणतीही भाषा जोवर रोजच्या वापरात असते तोवर तिच्यात रोजच्या जगण्याचे प्रतिबिंब दिसणं स्वाभाविक आहे असंही पुन्हा एकदा) जाणवलं.
10 Jul 2013 - 4:29 pm | बॅटमॅन
+११११११११११११११११११११११.
यावरून अजून एक श्लोक आठवला. सासरा-जावयाचे संभाषण हा विषय आहे. जावई सासुरवाडीला आलाय आणि त्याची सरबराई पाहून खूष होऊन म्हणतो-
"श्वशुरगृहनिवासः स्वर्गतुल्यो नराणाम् - पुरुषांसाठी सासुरवाडीला राहणे म्हंजे स्वर्गात राहिल्यासारखेच आहे."
सासर्याला वाटले, जावई आता इकडेच येऊन राहतो की काय? त्यामुळे त्याने सांगितले,
"यदि भवति विवेकी, पंचमे षड् दिने वा- जावयाला डोके असेल तर पाचसहा दिवसच तो इकडे राहील."
जावई अजून लोचटपणा करतच होता-
"दधि-मधु-घृत-लोभात् मासमेकं वसेच्चेत्- दही,मध अन तुपाच्या लोभापोटी एक महिना तरी इथे राहिलेच पाहिजे."
आता मात्र सासर्याची सटकली. जावयाला दिली ओसरी अन जावई हातपाय पसरी?? चोलबे ना!!
"तदुपरि दिनमेकं पादरक्षिप्रयोगः-त्यानंतर एखाददिवशी चपलेचा वापर केल्या जाईल" ;) :D :D
11 Jul 2013 - 8:35 am | चौकटराजा
म्हणून मी डोबिवलीला एकच दिवस रहायचो . दूध, दही,तूप काय असेल ते चापून हाणायचो. सासरा चप्पल शोधू लागला
की मी माझ्या चपला पायात सरकवायचो आपल्या घरला जाण्यासाठी !
14 Jul 2013 - 11:38 pm | शैलेन्द्र
बर.. डास आणी पाणी सहन व्हायच नाही ते सांगा ना.. कशाला सासर्याची निंदा करता.. :)
10 Jul 2013 - 4:25 pm | चाणक्य
मस्त आहे
10 Jul 2013 - 4:44 pm | सौंदाळा
मस्त रसग्रहण आहे (श्लोकाचे) ;)
10 Jul 2013 - 4:46 pm | मदनबाण
यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते पी!!!
हॅहॅहॅ... मी नाही यातली ! ;)
फुल ऑन ग्रीन शिग्नलच दिला की हो एकदम तिने. यापुढे काय झाले हे कवी सांगत नाही, अन सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा.
हॅहॅहॅ... ओठांचा रस मिळत असताना च्यामारी बोलतयं कोण ? ;)
अशाच कैक अनुभवांवरती त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले, सुळावर जातानाही त्याला तेच आठवत होते म्हणे. तेव्हा राजाने सुळावरून त्याला उतरवले. ते नंतर कधीतरी शेअर अवश्य करेन.
वेळ-सवड मिळताच हे महत्वाचे कार्य वटवाघुळ मानवाने संप्पन करावे ही विनंती. :)
लै मसाला आहे त्यात
मसालेदार चिविष्ठ वर्णन आत्ताच डोळ्या समोर यायला लागले आहे. ;)
(प्रेमरस प्रेमी) ;)
10 Jul 2013 - 4:48 pm | पैसा
लाईनी मारणे आणि 'चपला' यांचा प्रयोग तेव्हाही होत होता हे पाहून मजा वाटली. पुढचा लेख कधी टाकतोस?
10 Jul 2013 - 8:56 pm | प्रभाकर पेठकर
मुलांचे मन म्हणजे अगदी पवित्र मंदिरासारखे असते.......
.....म्हणूनच त्यांना बघताच मुली 'चप्पल' काढतात.
10 Jul 2013 - 10:30 pm | अत्रुप्त आत्मा
@मुली 'चप्पल' काढतात.>>> आगागागागागा....! =))
10 Jul 2013 - 11:25 pm | बॅटमॅन
आयो.....काय जबरा मारलाय काका, मान गये _/\_
=)) =)) =)) =)) =))
10 Jul 2013 - 4:50 pm | प्यारे१
बॅटमनच्या संस्कृतचं, सुभाषितकाराचं, त्यातल्या कथानायकाचं नि सगळ्यात जास्त नायिकेचं कौतुक.
मस्तच. :)
12 Jul 2013 - 12:31 pm | sagarpdy
+1
10 Jul 2013 - 4:52 pm | अभ्या..
हेहेहे भारीच.
ही पण एक कलाच हाय राव. येउ दे अजून. बघू काय फ़ायदा होतोय का? ;-)
10 Jul 2013 - 5:10 pm | मालोजीराव
पुण्यात हाती बिसलेरीची बाटली घेतलेल्या ललनेशी असा संवाद घडू शकेल काय?
घडल्यास वरीलप्रमाणेच सेम रिझल्ट मिळू शकेल काय ?
10 Jul 2013 - 5:12 pm | पैसा
नशीब आजमावून बघा! बहुतेक दुसर्या कवितेतल्या चपलांचा प्रसाद मिळण्याची शक्यता जास्त!
10 Jul 2013 - 5:16 pm | बॅटमॅन
"डिपेंड्स" हेच खरे उत्तर आहे ;)
10 Jul 2013 - 9:11 pm | आनंदी गोपाळ
पण ते तुमच्या मुखचंद्रम्यावर आन सिक्ष प्याकावर डिपेंडत असावं भौतेक ;) किंवा ललनची मर्जी तत्क्षणी कशी आहे त्यावर.
आजच हा (मराठी) पीजे वाचला:
>>
मुलगा - झोपली असशील तर स्वप्नं पाठव,
जागी असशील तर आठवण पाठव,
दु:खात असलीस तर अश्रू पाठव,
.
.
.
.
.
मुलगी - भांडी घासतीये... खरकटं पाठवू ????
<<
10 Jul 2013 - 11:26 pm | बॅटमॅन
अर्थातच. बाकी पीजेबद्दल म्हणाल तर मुलगी एसेमेस पाठवते अन मुलगा म्हणतो की निसर्गाच्या हाकेला ओ देतोय अशी व्हर्जन वाचलीये =))
10 Jul 2013 - 5:31 pm | सूड
ट्राय मारुन बघा. ट्रायल फळली तर सांगा नाय फळली तर कळेलच !! ;)
10 Jul 2013 - 5:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बॅट्या, लेका काय काय खजाने आहेत रे बाबा तूझ्याकडे??
=)) =))
10 Jul 2013 - 6:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
सगळ्या काळात सगळ्या प्रकारची माणसे होती... फक्त प्रत्येक काळच्या सामाजीक परिस्थितीप्रमाणे त्यांचे भावनांप्रदर्शन वेगवेगळ्या पद्धतीने होत होते (केवळ रिस्क मॅनेजमेंट, अजून काय?)...
उघडा खजीना आणि टंकवा अजून बरेच वेगवेगळे संस्कृत भाषेचे नजराणे... सर्वे वाचयती नक्कीम् । ;)
10 Jul 2013 - 7:46 pm | देशपांडे विनायक
तिने त्याला टेकडीवर संध्याकाळी बोलावले .
तो धापा टाकत टेकडी चढून तिच्याजवळ पोहचला तेंव्हा सूर्यास्त होत होता
उशीर झालेला असतानाही तिची माफी न मागता तो म्हणाला
काय सुंदर आहे सूर्यास्त
आणखी काय सुंदर आहे ?तिने चिडून विचारले .
तुझा TOP आणि जीन
आणखी ?तिने पुन्हा विचारले
तुझी पर्स आणि तू खाली ठेवलेली सायकल
तुला जे पाहिजे ते घेऊन जा . ती उदार होत म्हणाली
घरी पाई जाताना ती रडत होती असे कानावर आले
10 Jul 2013 - 8:47 pm | सचिन कुलकर्णी
काव्यशास्त्रविनोद आवडला. :)
सुंदर रसग्रहण.
10 Jul 2013 - 9:06 pm | पिंगू
संस्कृत रोमिओ... :) __/\__
10 Jul 2013 - 9:52 pm | चित्रगुप्त
वाहवा, मस्त मस्त मस्त.
अजून येऊद्या.
आणि काही चित्रे:
![b](http://2.bp.blogspot.com/-RMQoGR8nAUE/ThmgJUvU1KI/AAAAAAAAKjE/RjC1kqSpnYg/s400/Well.jpg)
10 Jul 2013 - 11:28 pm | बॅटमॅन
चित्रे आवडली चित्रगुप्तजी!! मस्त आहेत एकदम, अजून पहायला आवडतील. :)
11 Jul 2013 - 8:34 am | प्रचेतस
ही चित्रे पाहून अजून एक श्लोक आठवला.
ऊर्ध्वास: पिबति जलं यथा यथा विरलाङगुलिश्चिरं पथिकः |
प्रपापालिकापि तथा तथा धारां तनुकामपि तनुकरोति ||
तिच्या सौंदर्याचे आकंठपान करता यावे म्हणून तो पाणी पिण्याचा बहाणा करून तिला उघड्या डोळ्यांत साठविण्याचा प्रयत्न करीत असतो, पाणी सारे खाली वाहून जात असते. तर त्याच्या व्यक्तिमत्वावर भाळलेली प्रपाही (नवयुवती) त्या युवकाचे सान्निध्य अधिक काळ लाभावे म्हणून सुरईतील पाण्याची धार बारीक बारीक करीत जाते.
11 Jul 2013 - 11:18 am | बॅटमॅन
हा श्लोक तुझ्या सिग्नेचरमध्ये पाहिला होता, जबरीच आहे एकदम!!! मी सांगितलेल्या श्लोकापेक्षा जास्त "सेडक्टिव्ह" आहे ;)
10 Jul 2013 - 10:06 pm | प्रचेतस
मस्त रे बॅट्या.
कथासरित्सागरातील हा श्लोक आठवला.
राजन्न्वसर: कोsयं मोदकानां जलान्तरे |
उदकै: सिञ्च मा त्वं मामित्युक्तं हि मया तवः ||
सन्धिमात्रं न जानासि माशब्दोदकशब्दयो: |
न च प्रकरणं वेत्सि मूर्खस्त्वं कथमीदृशः ||
10 Jul 2013 - 11:53 pm | बॅटमॅन
वल्लीशेठ काही संदर्भ लागले नाहीत. दुसरा श्लोक कळाला पण शब्दोदकशब्दयो: चा संदर्भ कळाला नाही. पहिल्यातले मोदक, जलांतर हेही प्रकर्ण समजले नाही, कृपया विस्कटून सांगावे.
(मूर्खोऽहं कथमीदृशः म्हणणारा) बॅटमॅन.
11 Jul 2013 - 1:00 am | बॅटमॅन
डोकेफोड केल्यावर शेवटी एका जालमित्राला विचारले अन खरेच "मूर्खोऽहं कथमीदृशः" चा साक्षात्कार घडला.
मोदक=मा+उदक चे वैकल्पिक रूप हे कळ्ळेच नव्हते. त्यामुळे मा-शब्द-उदक-शब्दयो: चा संबंध देखील कळला अन शेवटी दिमागात बत्ती झाप्पकन पेटली :)
तर वल्लीशेठ, श्लोक अतिशय जबरी आहे, फक्त इथे रिझल्ट एकदम वेगळा आहे ;) =))
11 Jul 2013 - 8:22 am | प्रचेतस
येस. श्लोक जबरीच आहे.
राजा राणी सरोवरात जलक्रीडा करत असताना राजा तिच्या अंगावर पाणी उडवायला लागतो. तेव्हा राणी म्हणते 'मोदकानां मा ताडयत' तेव्हा राजाला वाटते राणीला मोदक खायला हवे आहेत तेव्हा तो सेवकांकडून मोदकांनी भरलेले ताट आणवतो. तेव्हा राणी पुढील श्लोक उधृत करते.
हे राजन, येथे पाण्यामध्ये मोदकांचा काय उपयोग? माझ्यावर पाणी शिंपडू नका असे मी आपणास म्हटले होते. 'मा' आणि 'उदक' ह्या शब्दांचा संधीही तुम्हास माहित नाही तसेच प्रसंगही तुम्ही लक्षात घेतला नाही. इतके तुम्ही मूर्ख कसे?
11 Jul 2013 - 8:42 am | चौकटराजा
मला वाटले आपल्या मिपाकर मोदकाचा काही श्लोक आहे म्हणजे गडावर पाण्याचे टाके आहे . त्यात मोदकाला ढकलण्यासाठी हे राजा, ( राजा नावाचा कोणी मिपाकर गडप्रेमी) तू का बरे अवसर लावीत आहेस ... ?
11 Jul 2013 - 10:55 am | डॉ सुहास म्हात्रे
हायला ! बॅटमन्राव, अतीसुप्रसिद्ध "मोदकैही ताडय" पण आठवलं नाही? अर्थात ११ वी नंतर संस्कृत सोडलेल्या आमच्या डोस्क्यात त्याच्यापुढे काय म्हंजे कायपण गेलं नाय ही गोष्ट वेगळी ;)
11 Jul 2013 - 10:59 am | डॉ सुहास म्हात्रे
ते ८५ श्लोक टाका लवकर !
14 Jul 2013 - 3:16 am | पाषाणभेद
बॅटमॅन चाल लेख म्हणजे मानसिक मेजवानी अन चित्रगुप्तांची चित्रे म्हणजे नजरेची मेजवानी आहे.
अवांतरः बॅटमॅनने माझा उल्लेख खाली काका म्हणून केला आहे. त्याचा त्यामुळे निषेध! (स्मायली टाकावी लागते नाहीतर लोक वेगळाच अर्थ घेताता आजकाल.) :-)
14 Jul 2013 - 11:46 pm | बॅटमॅन
धन्यवाद पाभेजी :)
काका म्हटल्याबद्दल आयमाय स्वारी ;) यापुढे अशी चूक...लक्ष नसेल तेव्हा होईल ;)
16 Jul 2013 - 2:11 pm | बॅटमॅन
लौकरच टाकतो एक्कासाहेब! काही पोर्शन तरी नक्कीच :)
10 Jul 2013 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा
@आता इथे चांगला मौका मिळालासे पाहून तरुणाने चौका मारला-एकदम हेलिकॉप्टर शॉट!
"तत्तेऽधरे दृश्यते- ते तर तुझ्या ओठात दिसतंय" फुल्टू फ्लर्टिंग smiley>>>![http://www.sherv.net/cm/emoticons/smile/flirty-smile-smiley-emoticon.gif](http://www.sherv.net/cm/emoticons/smile/flirty-smile-smiley-emoticon.gif)
@आता या इतक्या बोल्ड उत्तरावर तरुणीची प्रतिक्रिया काय आहे?
"श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे- अरे विलासी प्रवासी मित्रा,
यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते पी!!! " smileysmiley >>>![http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/raining-hearts.gif](http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/raining-hearts.gif)
फुल ऑन ग्रीन शिग्नलच दिला की हो एकदम तिने. यापुढे काय झाले हे कवी सांगत नाही, अन सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा. राजकन्येबरोबरच्या अशाच कैक अनुभवांवरती त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले, सुळावर जातानाही त्याला तेच आठवत होते म्हणे. तेव्हा राजाने सुळावरून त्याला उतरवले. ते नंतर कधीतरी शेअर अवश्य करेन. लै मसाला आहे त्यात >>>![http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/smiley-with-beating-heart.gif](http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/smiley-with-beating-heart.gif)
10 Jul 2013 - 11:39 pm | बॅटमॅन
स्मायली आत्मा असे नाव पाहिजे तुमचे खरे तर ;)
11 Jul 2013 - 12:50 am | अत्रुप्त आत्मा
स्माइली आमुच्या तळहतांवरिल रेषा
स्माइली म्हणजे शब्दांच्या भाग्याची भाषा ... :)
10 Jul 2013 - 11:43 pm | जॅक डनियल्स
अशी संस्कृत सुभाषिते शाळेत असती तर मला १०० पडले असते आणि पुढचे शिक्षण पण मिळाले असते.;)
देव, देवः आणि माला, माले करता करता कसा तरी पास झालो.
11 Jul 2013 - 12:04 am | कवितानागेश
हे भारीये की. :)
11 Jul 2013 - 1:04 am | अग्निकोल्हा
दंडवत.
11 Jul 2013 - 11:14 am | मूकवाचक
+१
11 Jul 2013 - 3:31 am | बांवरे
मस्त है रे बॅट्या, ८५ श्लोक कधी टाकतोस मग ?
11 Jul 2013 - 4:18 am | स्पंदना
बॅटमॅन पंच्यांऐशी ची वाट पहात आहे.
श्लोक मात्र फारच खुलवुन सांगीतला आहे, शाळेतल्या पेडणेकर बाईंची आठवण झाली. अर्थात त्या अश्या खुलवुन नाही सांगायच्या पण भाषांतर चांगल होत, किंवा समजावुन सांगताना काव्यरस व्याकरणाने बाद्ध न करता सांगायच्या मग त्या पुढे संधी, ह्यांव अन त्यांव यायच. पण तरीही आम्ही अडकलो ते पाठांतरातच.
काय हो २० वर्षापुर्वी ते एक गाव होतं जेथे संस्कृत बोलीभाषा म्हणुन वापरल जायच ते अजुनही आहे का?
11 Jul 2013 - 11:21 am | बॅटमॅन
धन्यवाद!
चौरपंचाशिका टाकायला हरकत नाही, पण चावटपणा आहे सगळा त्यात, तो ट्रिम करू गेलो तर श्लोकांची मजाच निघून जाईल =))
12 Jul 2013 - 2:14 am | धमाल मुलगा
बेट्या मिपा हे वयात आलेलं पैलं म्हराटी संस्थळ आहे (चालः वयात आलेलं नाटक) हे ठाऊक नाही काय तुला? टाकच तू.
निदान त्या निमित्तानं का होईना आमच्यासारख्या दगडांना संस्कृतची गोडी लागेल. ;)
11 Jul 2013 - 9:12 am | सुधीर
संस्कृत श्लोकाची मस्त ओळख.
11 Jul 2013 - 9:43 am | किलमाऊस्की
:-)
11 Jul 2013 - 11:15 am | दिपक.कुवेत
सॉल्लीड मजा आली वाचुन....
11 Jul 2013 - 8:47 pm | श्रीनिवास टिळक
मिपाची सतत आवक जावक चालू असल्यामुळे तिची संपूर्णपणे MSEB झाली म्हणून कंटाळून नाद सोडला होता. आज काही कारणास्तव परत आलो तर हा अपूर्व लाभ झाला. मला वाटत असल्या प्रयोगांमुळे जनतेत संस्कृत बद्दल प्रेम आणि रुची वाढेल. पुढच्या ८५ ची आतुरतेने वाट पहात आहे.
11 Jul 2013 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा
@मला वाटत असल्या प्रयोगांमुळे जनतेत संस्कृत बद्दल प्रेम आणि रुची वाढेल.>>>मनःपूर्वक... +१
12 Jul 2013 - 1:58 am | उपास
शेवटची पलटी आवडली.. थोडक्यात इथे फ्लर्ट (फक्त)पांथस्त करत नसून 'ती' सुद्धा त्याला भरीस पाडत आहे ;) आवडलच!
12 Jul 2013 - 5:44 am | श्रीनिवास टिळक
कदाचित Flirting [and Scoring]the Sanskrit Way हे शीर्षक अधिक सार्थ ठरेल
12 Jul 2013 - 7:02 am | चित्रगुप्त
संस्कृत श्लोकांच्या धाग्याला आंग्ल भाषेतील नाव कशाला?
एवढी दरिद्री झाली काय संस्कृत भाषा?
12 Jul 2013 - 7:48 am | मुक्त विहारि
झक्कास...
12 Jul 2013 - 11:14 am | बॅटमॅन
समस्त प्रतिसादकांचे आभार!
@धमुशेठः तुमच्यासाठी कायपण ;) टाकतोच श्लोकपण :D
@श्रीनिवास टिळकः हो, तेही शीर्षक चालू शकेल.
@चित्रगुप्तजी: शीर्षक "कॅची" वाटल्याने टाकलं, एवढंच. संस्कृतमध्ये त्या अर्थाचे शब्द नि:संशय असतील, पण जो अर्थबोध होणे अपेक्षित आहे त्या अर्थच्छटेचा इंग्लिश शब्द सर्वांत योग्य वाटला तस्मात टाकला.
15 Jul 2013 - 1:57 am | अभ्या..
हम्म बॅट्या ढम्यासाठी तरी टाकच ही पंचाएंशी स्टोरी.
त्याला सिक्स्टीफाईव्ह, ट्रीपल फाईव्ह, एटीफाईव्ह आसले आकडे लै आवडतेत ;)
15 Jul 2013 - 8:45 am | पाषाणभेद
>>>> त्याला सिक्स्टीफाईव्ह, ट्रीपल फाईव्ह, एटीफाईव्ह आसले आकडे लै आवडतेत
ऑं? एकसष्ठ, बासष्ठ तसेच आणखी काही पेशल आकडे इसरलेत का काय? काय म्हनावं आता?
15 Jul 2013 - 12:17 pm | बॅटमॅन
तरी बरं सिक्स्टीफाईव्ह अन ट्रिपल फाईव्हच म्हणालास ते =))
12 Jul 2013 - 1:37 pm | आदूबाळ
एक लंबर! दोन्ही सायडींनी फ्लर्टिंग आहे!
13 Jul 2013 - 9:48 am | इन्दुसुता
मज्जेदार !!!!
८५ च्या प्रतिक्षेत.....
13 Jul 2013 - 2:14 pm | सस्नेह
हेपण फ्लर्टिंग ऐका..
तुझ्यावर लैन मारता मारता आले म्हातारपण
पडले डोक्यास टक्कल अन गेले दातपण
..तरीपण थेरडे, तुझ्यासाठी कायपण !
14 Jul 2013 - 12:36 am | बॅटमॅन
तुमच्यासाठी कायपण =)) =)) =)) जबरीच!
अन पाभेकाका: येस, लौकरच अन्य लेख मार्गी लावण्याचा विचार आहे, धन्यवाद :)
14 Jul 2013 - 12:30 am | पाषाणभेद
जबरदस्त. लवकरच इतर लेख पुर्ण करावेत.
15 Jul 2013 - 9:21 pm | साती
बॅटमन भवोदया , तव संस्कृतभाषये गती दृष्ट्वा बहुल समाधान संतोषं च लभ्यते.
15 Jul 2013 - 9:36 pm | बॅटमॅन
अयि सातीमहोदये, भवत्या: संस्कृतान्वितप्रशंसावाक्यं दृष्ट्वा अंशमात्रेण मांसवृद्धिरभवन्मम शरीरे :)
16 Jul 2013 - 12:02 am | पिशी अबोली
महोदय, मम अनाहूता सूचना-'फ्लर्टिंग' विषयस्य साक्षात् अभ्यासः अपि प्रचलति स्यात् भवतः| अतः प्रशंसाया: स्वीकारः मांसवृद्धया न कृत्वा अन्येन केनचित् उपायेन करोतु, यतः सा तु फ्लर्टिंग्बाधिका... ;)
16 Jul 2013 - 12:40 am | बॅटमॅन
अत्र तु अहं निमिषमात्रे "अनाहिता" शब्दमेव अपठम् :P मिपास्थाने शब्दस्यास्य इतिहासं दृष्ट्वा नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम् ;)
बाढम् , किन्तु "व्यापार-रहस्यानि" एतादृशं सर्वान् कथयित्वा यदि सर्वेऽपि तानि अनुसरन्ति, को लाभः भवेन्मम =)) अपि च मांसवृद्ध्या: फ्लर्टिंगविषयेण सार्धं सम्बन्धः पूर्णत्वेन स्वीकृतः ;)
16 Jul 2013 - 1:16 am | पिशी अबोली
अहो आश्चर्यं, अनाहिताया: एकेनेव प्रतिसादेन साक्षात् वाल्गुदेयस्य नेत्रक्षालनं कृतम्| ;)
भो: महोदय, मया एकमेव रहस्यं उद्धृतं तथापि एषा चिंता| भवान् तु पंचाशीतिरहस्यानि सर्वेषां पुरतः प्रदर्शयितुं प्रवृत्तः| तर्हि तेषां सर्वेषां उपयोगः भवता पूर्वमेव कृतः किम् ?? ;)
16 Jul 2013 - 1:36 am | बॅटमॅन
आम्, अधुना अनाहितानां युगे एतादृशमेव वक्तव्यं श्रेयस्करम् ;)
अयि अनाहिते, त्वया कथितं रहस्यं ननु भिन्नम् | कुतः योषिदाराधनरहस्यं, कुतो स्मरकेलिवर्णनानि ;)
16 Jul 2013 - 9:00 am | पैसा
वाल्गुदेया, मांसवृद्धी फक्त शब्दात येऊन काय उपेग? किमान ४ प्याक अॅब्स आण म्हणजे लाईनी मारायला जरा वजन येईल. आणि सगळी रहस्य काय ती इथे येऊ देत!
16 Jul 2013 - 11:56 am | बॅटमॅन
आयो......४ प्याक अॅब्स?? म्हंजे लाईन मारताना काहीतरी रोमँटिक बोलू की रेझ्युमे दाखवू- ४ प्याक अॅब्स, १ नोकरी, इ. लिहिलेला =)) =))
16 Jul 2013 - 12:12 pm | पैसा
आयडिया वाईट नै! एक रेझ्युमे तयार करून ठेव. आणि ३/४ कंपन्यांसारखे ३/४ "ठिकाणी" अप्लाय कर. कुठेतरी "ऑफर" मिळेल.
16 Jul 2013 - 12:15 pm | पिशी अबोली
लाईन मारल्यानंतर उत्तरपण रोमँटिक यायला हवे असेल तर बघ असे करुन, नुस्ते लाईन मारुन समाधान होणार असेल तर काही गरज नाही.. ;) =)) =))
16 Jul 2013 - 12:32 pm | प्रचेतस
हम्म.
क्याटवूमनला मनापासून हाक मारा आता.
16 Jul 2013 - 12:42 pm | बॅटमॅन
नक्कीच!
सर्व सल्लागारांचे (म्ह. सल्ला देऊन गार करणारांचे) मणापासूण आभार ;)
16 Jul 2013 - 2:31 pm | अभ्या..
बॅट्या हेच काय ते "फ्लर्टींग द संस्कृत वे" काय? ;)
तू एक संस्कृतात बिघडलायस ती पिशी पण का?
नीट गंतव्य स्थान सीसीडी, कापुचिनो पिबन्ति अन गप्पा करिष्यसि. काय समजले?
आणि
भो पिशे, आमचे बटूशास्त्री हास्यविनोदचर्चा चालवून घेतात तस्मात तूपण टेक लाईट. काय? ;)
16 Jul 2013 - 2:43 pm | बॅटमॅन
अगदी अगदी ;) त्वमेव असि, भवतः कृते किमपि, कदानीमपि ;)
16 Jul 2013 - 9:31 pm | पिशी अबोली
समजले हे, की बॅटमॅनसाठी अजून एक फ्लर्टिंग-रहस्य (जाहीर प्लॅटफॉर्मवर आल्याने) निरुपयोगी झालेले आहे... बिच्चारा!
आणि अभ्यादादा, आय आल्वेजं टेकं लायटम्..
16 Jul 2013 - 10:11 pm | अभ्या..
अय्या कूल
मतितार्थ इतकाच की गोंधळ घालायला अजून एक हुशार अन स्मार्ट आयडी आला आहे. कम कम पिशे. वेलकम
17 Jul 2013 - 11:47 am | पिशी अबोली
;)
17 Jul 2013 - 1:53 am | बॅटमॅन
नाह!
शीशीडीमध्ये गप्पा इ. तर परिणती आहे, तिथपर्यंतच्या जीवनोन्नतीचे सहा सोपान चढल्यावरची. काय ? ;)
17 Jul 2013 - 2:14 am | मोदक
बरेच काही नवीन शिकतोय... ;-)
17 Jul 2013 - 2:22 am | बॅटमॅन
दत्तगुरूंचा कित्ता गिरवतोय...२१ च का, पाहिजे तितके गुरू करून दिसेल ते शिकतोय ;)