णमस्कार्स लोक्स,
हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे. अजूनही बरेच श्लोक आहेत, तेही कधी प्रसंगोपात शेअर करेनच.
कस्येयं तरणि: प्रपा पथिक नः किं पेयमस्यां पयः |
धेनोर्वा उत माहिषं बधिर रे वारः कथं मंगल: |
भौमो वाऽथ शनेश्वरोऽमृतमिदं तत्तेऽधरे दृश्यते |
श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे, यद् रोचते तत्पिब ||
तर एक वाटसरू एका गावी आला आहे. त्याला तहान लागलीये. पण विहीर समोर दिसली तरी समोर एक तरुणी दिसल्यावर बोलायला काहीतरी निमित्त हुडकले तर पाहिजेच नैका? मग साहेबांनी विचारले,
"कस्येयं तरणि: प्रपा?-तहानेपासून तारणारी ही विहीर कुणाची आहे?"
"पथिक, नः- रे वाटसरू, आमची आहे."
"किं पेयं अस्यां? - यात पेय काय आहे?"
तरुणी मोठी सुंदर असावी. नपेक्षा आता यापुढे बोलण्यासारखे काही फारसे नसले तरी वाटसरू साहेब परत पीजे मारू लागले. ती काय दुधातुपाची विहीर थोडीच असणार होती? पण बोलायची हौस दांडगी ;)
"पयः-पाणी".
आता पय शब्दाची मजा अशी की त्याचा अर्थ दूध अन पाणी असा दोन्ही होतो. प्रवाश्याने दूध असा अर्थ घेऊन पुन्हा वेळ काढण्यासाठी पीजे मारणे सुरू केले.
"धेनोर्वा उत माहिषं?-गायीचं आहे की म्हशीचं?"
मुलगीही लगेच त्याची संभावना करते.
"बधिर रे, वारः- अरे बहिर्या, वार आहे ते!!!"
आता वार शब्दाची मजा अशी की वारि म्हंजे पाणी अन वार म्हंजे दिवस. [खरे तर व्याकरणदृष्ट्या श्लोकातले रूप चुकलेले आहे, पण कोटीच्या विनोदास्तव तिकडे जरा दुर्लक्ष करू.] मग प्रवासी तरुणाने अजून पीजे मारत संभाषण सुरू ठेवले.
"कथं मंगलः, भौमो वाऽथ शनेश्वरः?-वार म्हंजे काय मंगळवार आहे, रविवार आहे की शनिवार?"
आता मात्र तरुणीने सांगितले,
"अमृतमिदम्- अरे, हे अमृत आहे!"
आता इथे चांगला मौका मिळालासे पाहून तरुणाने चौका मारला-एकदम हेलिकॉप्टर शॉट!
"तत्तेऽधरे दृश्यते- ते तर तुझ्या ओठात दिसतंय" फुल्टू फ्लर्टिंग :D
आता या इतक्या बोल्ड उत्तरावर तरुणीची प्रतिक्रिया काय आहे?
"श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे- अरे विलासी प्रवासी मित्रा,
यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते पी!!! " ;) ;)
फुल ऑन ग्रीन शिग्नलच दिला की हो एकदम तिने. यापुढे काय झाले हे कवी सांगत नाही, अन सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा. राजकन्येबरोबरच्या अशाच कैक अनुभवांवरती त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले, सुळावर जातानाही त्याला तेच आठवत होते म्हणे. तेव्हा राजाने सुळावरून त्याला उतरवले. ते नंतर कधीतरी शेअर अवश्य करेन. लै मसाला आहे त्यात ;)
प्रतिक्रिया
17 Jul 2013 - 11:37 am | अत्रुप्त आत्मा
अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त...! ;-)
17 Jul 2013 - 11:52 am | बॅटमॅन
अगदी अगदी ;)
17 Jul 2013 - 11:46 am | पिशी अबोली
वत्सा,
सहा सोपान चढून इतक्या उंचीवरुन तुला प्रेमात 'पडायचं' का आहे? जरा पायथ्याशी असतानाच पडलास तर कमी लागेल की जरा...
17 Jul 2013 - 11:54 am | बॅटमॅन
अनुभवाचें बोल दिसताहेंत ;)
17 Jul 2013 - 1:33 pm | पिशी अबोली
कसला अनुभव, जीवनोन्नतीचा??? छे छे... ते कुठे माझ्यासारख्या सामान्यांना यायचे?? ;)
21 Jul 2013 - 2:19 am | अभ्या..
बॅट्या ते कायतरी लिव्हलेले आहे ना तेच खरे बघ ;)
तेच पुरुष भाग्याचे, अंगे भिजल्या जलधारांनी, ऐंशा ललना स्वयें येऊन आलिंगिती ज्यांना.
21 Jul 2013 - 11:18 am | बॅटमॅन
कसलं खत्रा बे , कोणती कविता आहे म्हणे ;)
21 Jul 2013 - 12:32 pm | अत्रुप्त आत्मा
अब्या डब्या >>> अत्यंत सहमत!!! =))
अता अख्खि कविता टाक,म्हणजे परीपूर्ण सहमत होइन. ;-)
16 Jul 2013 - 12:05 am | गणपा
__/\__ दंडवत स्विकारावा.
पुढचा भाग आला नाही अजून?
16 Jul 2013 - 4:37 pm | मी-सौरभ
...
16 Jul 2013 - 8:36 pm | मोदक
तिला पाऊस खूप आवडतो..
आणि मला पावसात ती.
तिला भिजायला खूप आवडते..
आणि मला भिजलेली ती.
मला खूप आवडते ती..
पण तिला नाही आवडत मी.
म्हणून खड्ड्यात गेला पाऊस आणि खड्ड्यात गेली ती!!!! :-D
16 Jul 2013 - 8:46 pm | बॅटमॅन
ओल्ड बट गुड वन!
भर्तृहरी साहेबांच्या या श्लोकाची आठवण झाली.
यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता - जिचे मी सारखे चिंतन करतो ती माझ्याबद्दल विरक्त आहे.
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्त:। - तीही दुसर्या एकावर प्रेम करते ज्याचे अजून दुसरीवर प्रेम आहे.
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या - माझ्यासाठीही दुसरीच एकजण झुरतेय.
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥ - धिक्कार असो तिचा(तरुणी क्र. १), त्याचा, कामदेवाचा, हिचा (तरुणी क्र. २) आणि माझाही!!
है की नै चपखल ;)
18 Jul 2013 - 4:42 pm | प्रसाद गोडबोले
केवळ ३०० (+/-) सुभाषिते लिहुन हा नांउस महाकवी कसा झाला ? ह्या प्रश्नाचे उत्तर एकेक सुभाषित वाचल्यावर उमगत जाते !!
भर्तृहरी रॉक्क्स्स्स !!
18 Jul 2013 - 5:22 pm | बॅटमॅन
भर्तृहरी इंडीड रॉक्स!!!!
16 Jul 2013 - 8:46 pm | अत्रुप्त आत्मा
@म्हणून खड्ड्यात गेला पाऊस आणि खड्ड्यात गेली ती!!!! smiley>>>![http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif](http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif)
16 Jul 2013 - 8:50 pm | अत्रुप्त आत्मा
@धिक्कार असो तिचा(तरुणी क्र. १),त्याचा,कामदेवाचा,हिचा(तरुणी क्र. २)आणि माझाही!! >>>![http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif](http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif)
18 Jul 2013 - 12:11 pm | तुमचा अभिषेक
जबरी... शाळेत संस्कृतमधील रुपांनी छळले.. पण संस्कृतचे हे रुप आवडले..
हे एक असे असेल, तर ते आगामी आकर्षण ८५... वाट बघतोय :)
18 Jul 2013 - 6:31 pm | बॅटमॅन
फायनल अपडेटः चौरपंचाशिका मध्ये ८५ नसून ५० श्लोक आहेत. कुठे डुलकी मारली होती दिमागाने कोण जाणे.
<a href="http://www.khapre.org/portal/url/sa/sahitya/pustak/chaur/z110909161236%2...संस्कृत काव्याची लिंक.</a>
याचे मराठीत भाषांतर करणारे कवी म्हणजे श्री. विठ्ठल बीडकर हे होत. (इ.स. १६२८-१६९०)
<a href="http://marathivishwakosh.in/khandas/khand16/index.php?option=com_content...मराठी विश्वकोषातली विठ्ठल बीडकरांची लिंक.</a>
या मराठी भाषांतराला बिल्हणचरित्र असे नाव आहे. मूळ संस्कृत काव्य रचणारा कवी बिल्हण होय. महाराष्ट्र सारस्वतात याच्या अर्ध्या भागाचे भाषांतर दिलेय.
<a href="http://archive.org/stream/MaharashtraSaraswatBhaveWithSupplementFull/Mah...त्यासंबंधीची महाराष्ट्र सारस्वतातील लिंक.</a>
अजून शोध घेता घेता कळाले की ज्येष्ठ मिपाकर श्री. शरद यांनी यावर ऑलरेडी एक लेख मिपावर लिहिलाय अन माझ्या सुरुवातीच्या उत्खननसत्रात मीही कधीकाळी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. तस्मात या विषयावरती पुन्हा लेख लिहून रिपिटिशन नको करायला.
<a href="http://www.misalpav.com/node/13683">शरद यांच्या मिपावरील लेखाची लिंक.</a>
सो लोकहो, मराठी भाषांतर पहा अन एंजॉय ;) :D :D
18 Jul 2013 - 6:35 pm | बॅटमॅन
ऊप्स लिंका गंडल्या. पुन्हा देतो.
संस्कृत काव्याची लिंक.
मराठी विश्वकोषातली विठ्ठल बीडकरांची लिंक.
त्यासंबंधीची महाराष्ट्र सारस्वतातील लिंक.
शरद यांच्या मिपावरील लेखाची लिंक.
19 Jul 2013 - 12:58 pm | lakhu risbud
धाग्यातील विषयाशी साधर्म्य राखणारा जुना धागा
मोरोपंताची "स्वस्त्री घरात नसता" या सु(कु)प्रसिद्ध आर्येच्या चर्चेचा धागा
19 Jul 2013 - 3:34 pm | मदनबाण
वटवाघुळ मानवा... पळवाट शोधुन नकोस ! भाषांत देण्याचे कष्ट घ्या.
बाकी चौरपंचाशिका मधे पहिल्याच श्लोकात माझ्या नावाची यंट्री दिसली ! ;) बा द वे पीनस्तनीं म्हणजे काय रे ब्यॅटॅ ?;)
19 Jul 2013 - 3:45 pm | बॅटमॅन
मगनबाण साहेब, शरद यांच्या लेखाची लिंक दिलीय की वर, त्यात जवळपास १५-२० "महत्वाच्या" श्लोकांचे वर्णन आल्रेडी आहेच.
अन पीन च्या अर्थाचा दुवा इकडे पहा. काये ना, अर्थ सरळ लिहिले की संस्कृतिरक्षक ब्रिगेडकडून आरडाओरडा सुरू होतो उगीच. काव्यशास्त्रविनोद राहिला बाजूला, नैतिकता अन शिष्टाचाराचे काढे उकळून पाजले जातात. त्यापेक्षा लिंक देतो, कळेलच.
19 Jul 2013 - 3:46 pm | बॅटमॅन
19 Jul 2013 - 3:47 pm | बॅटमॅन
च्यायला या लिंकच्या.
http://spokensanskrit.de/
ही वेबसाईट पहा अन पीन शब्द त्यात पेष्टवा.
19 Jul 2013 - 3:59 pm | मदनबाण
वरच्या दुव्या बद्धल धन्स ! :)
मी राउंड हा अर्थ घेतला. ;)
19 Jul 2013 - 4:08 pm | अत्रुप्त आत्मा
च्यायला-वाल्या लिंकमधल्या स्मायली अन्वर्थक समजाव्या काय??? =))
19 Jul 2013 - 5:47 pm | jaypal
आयला म्हंजी त्या टाईंबालाबी आपली सांस्क्रुतीक चालुगीरी चालु हुती म्हना की ;-)
लै भारी हाय हे आवडल अमासनी.
ते म्हराटीतबी लिवलयसा म्हनताना ट्क्कु-यात वाईच शिरल, न्हाईतर देवादीकाच हाय समजुन चिपळ्या वाजवत हरी हरी म्हनत उड्या मारल्या असत्या राव. येवढ कश्यापाई प्वोरा कडुन सकाळ अन सांज्याला अस दोन टायबांला पाठ कराया लावल असत.
22 Jul 2013 - 1:12 pm | drsunilahirrao
भारी ! (y)
4 Jan 2016 - 12:30 am | पॉइंट ब्लँक
जबरी लेखन. :)
4 Jan 2016 - 9:00 am | नाखु
अश्या लिखाणाची फक्त आठवण...
खंतावलेला नाखु
4 Jan 2016 - 10:56 am | अजया
येईल परत नक्कीच!
जी.एं च्या कथेतल्या ग्रीक कथेच्या संदर्भात कालच मिसल्या गेले आहे बॅटमॅनाला.
5 Jan 2016 - 8:52 pm | गामा पैलवान
हे सस्तनखेचरमानव, मिपास्थले पुनरुद्भव !
-गा.पै.
5 Jan 2016 - 9:02 pm | गामा पैलवान
हे बरोबर बोललो का?
-गा.पै
9 Feb 2017 - 12:50 am | बॅटमॅन
खलु युक्तमेव कथितं गामामल्लेन |