Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/26/2013 - 17:15
लेखनविषय (Tags)
भूगोल
छायाचित्रण
अगोदर आपण सौदि अरेबियातले वाळूचे वादळ बघितले... ते जरी भयानक असले तरी अनाकलनीय नव्हते. ते बर्‍याच जणाना आवडले असे दिसले. म्हणून आता एक धक्का अजून द्यावा म्हणतो... ही पहा सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...  .  .  .  .  .  दर वर्षी नाही, पण गेल्या सात वर्षांत चारदा तरी सौदी अरेबियाच्या उत्तर भागात बर्फवृष्टी झाली आहे.
  • Log in or register to post comments
  • 42516 views

प्रतिक्रिया

Submitted by भावना कल्लोळ on Wed, 06/26/2013 - 17:59

Permalink

कलजुग है कलजुग

कलजुग है कलजुग
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 06/26/2013 - 18:02

Permalink

च्यायला...कसं काय??? मुख्य

च्यायला...कसं काय??? मुख्य प्रश्न असा की सौदीच्या कुठल्या भागात बर्फवृष्टी होते? डोंगरबिंगर कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 06/26/2013 - 18:06

In reply to च्यायला...कसं काय??? मुख्य by बॅटमॅन

Permalink

आयमाय स्वारी. उत्तर भाग असे

आयमाय स्वारी. उत्तर भाग असे लिहिलेय ते बघायचे राहून गेले. हां तर उत्तर भागात बर्फ पडतो तर इस्राएलमध्येही पडतो का? सिनाय वगैरे भागात पडतो की कसे?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/26/2013 - 21:18

In reply to आयमाय स्वारी. उत्तर भाग असे by बॅटमॅन

Permalink

सौदिच्या उत्तरेला असलेल्या

सौदिच्या उत्तरेला असलेल्या जॉर्डन आणि इझ्राइलच्या डोंगराळ भागात दरवर्षी बर्फवृष्टी होते असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 06/26/2013 - 21:47

In reply to सौदिच्या उत्तरेला असलेल्या by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

माहितीकरिता धन्यवाद

माहितीकरिता धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Wed, 06/26/2013 - 18:10

Permalink

अवघडच दिसतय प्रकरण..

अवघडच दिसतय प्रकरण.. असो. एक्का काका मुडात आले परत :):)
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Wed, 06/26/2013 - 18:14

Permalink

कमालच आहे

च्यायला ईथे कुवेत मधे नुसतच धुळिचं वादळ येत पण बर्फ काय दॄष्टिस पडत नाहि. थंडित क्वचीत गारा पडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 06/26/2013 - 18:14

Permalink

निसर्गाचा चमत्कार. दुसरे काय!

निसर्गाचा चमत्कार. दुसरे काय!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 06/26/2013 - 18:18

Permalink

व्वा.

सौदी म्हणजे नुसतं वाळवंटच, असे समजत होतो. धन्यवाद. येऊ द्या अजून अशीच माहिती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by काकाकाकू on Wed, 06/26/2013 - 21:01

In reply to व्वा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

खरंय

पूर झाला. धुळीचं वाळवंट ऐकलं तरी होतं. पण गोट्यांएव्हढे दगड नी त्याचं एकंदरीत स्वरूप एव्हढं भयंकर असतं हे काहि माहित नव्हतं. आणि ते कमी म्हणून आता बर्फ!! सात वर्षात चारदा म्हणजे काहि दुर्मिळ नव्हे. विशेषतः सौदिमधे. आता पुढे काय? एक्कोजीराव, "सौदि अरेबियात एक चारशे वर्ष जुनं कपिलेश्वराचं मंदिर आहे त्याचे फोटो" वगैरे तत्सम काहि लिहिलंत तरी आश्चर्य नाहि वाटणार :-)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/26/2013 - 21:31

In reply to खरंय by काकाकाकू

Permalink

सौदि अरेबियात एक चारशे वर्ष

सौदि अरेबियात एक चारशे वर्ष जुनं कपिलेश्वराचं मंदिर आहे त्याचे फोटो" वगैरे तत्सम काहि लिहिलंत तरी आश्चर्य नाहि वाटणार दक्षिणेत एक मैदान सालेह म्हणून जागा आहे. तेथे बर्‍यापैकी सुस्थितीत असलेली इस्लामपूर्व (इसविसनापूर्वीच्या पहिल्या शतकातील) नाबातियन संस्कृतील काही थडगी (tombs) आहेत... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/26/2013 - 21:49

In reply to सौदि अरेबियात एक चारशे वर्ष by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

वरचे चित्र आंतरजालावरून साभार

वरचे चित्र आंतरजालावरून साभार घेतलेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Wed, 06/26/2013 - 20:21

Permalink

मुंबईत…

च्यामायला, मुंबईत यापैकी काहीच होत नाही. ना वाळूचे वादळ ना बर्फवृष्टी!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 06/27/2013 - 11:02

In reply to मुंबईत… by भाते

Permalink

दर पावसाळ्यात धो धो पाऊस पडून

दर पावसाळ्यात धो धो पाऊस पडून मुंबईचे व्हेनिस बनते ते काहीच नाही काय ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 06/26/2013 - 21:05

Permalink

गाड्यांचा फोटो भारी आहे .

गाड्यांचा फोटो भारी आहे . वाळूचे फोटो यापेक्षा सुद्धा भारी वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by लाल टोपी on Wed, 06/26/2013 - 21:21

Permalink

चमत्कारच...

अरेच्चा हे तर नवीनच प्रकरण आहे. असं काही घडलं आहे हे माहितच नव्हते. नविन माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 06/27/2013 - 00:14

Permalink

हेही नवीनच .

हेही नवीनच .
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 06/27/2013 - 00:47

Permalink

हेच्यायला!

हे सौदी जरा खुळ्या डोस्क्याचंच दिसतंय. मरणाचं ऊन असलेलं वाळवंट काय, त्यात वाळूची वादळं काय अन बर्फवृष्टी काय! औघड है ब्वॉ! आता कळलं, अरबं अशी येड्यासारखी का वागतात ते. :D
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 06/27/2013 - 01:10

In reply to हेच्यायला! by धमाल मुलगा

Permalink

+१

+१ ह्या असल्या टापूत राहणार्‍या लोकांसाठीच (ऑडियन्ससाठी) विशिष्ट पुस्तकात काही आज्ञा/ आचाराच्या पद्धती/ काही पेश्शल सवलती दिल्या गेल्या असाव्यात का?
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on गुरुवार, 06/27/2013 - 04:44

Permalink

झकास !

झकास ! थंडी मध्ये सौदी लोकं स्वेटर कशी घालतात, याचा मी विचार करत होतो, फुल विनोदी दिसत असतील. माझ्या एका सौदी विद्यार्थ्यांला तुमचे फोटो दाखवले तर तो वेडाच झाला. त्याने मला एक अन एक अक्षर मला भाषांतर करायला लावले....कुठून दाखवले असे झाले...;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 06/27/2013 - 07:22

Permalink

काही माण्स भलती नशिबवान हो!

काही माण्स भलती नशिबवान हो! इस्पिक एक्का त्यातलेच. सगळ भव्यदिव्य यांच्या नशिबी, अन आम्ही परड अन बाग यातच खुष! वाळुच वादळ पाहिलं, तिथे प्रतिसाद द्याय्चा राहुन गेला आता दोन्हीचा मिळ्युन एकत्र देते. अविश्वसनिय!! अचाट!
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on गुरुवार, 06/27/2013 - 10:12

Permalink

जिथे वाळूचे वादळ तिथेच

जिथे वाळूचे वादळ तिथेच बर्फवृष्टी का या दोन्ही प्रदेशांत खूप अंतर आहे?? पहिल्या काही फोटोंत वाटले पांढरी वाळू दाखवून तुम्ही आम्हाला फसवत आहात ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 06/27/2013 - 10:50

In reply to जिथे वाळूचे वादळ तिथेच by तुमचा अभिषेक

Permalink

मी टाकलेल्या फोटोंतल्या

मी टाकलेल्या फोटोंतल्या वाळूच्या वादळाच्या आणि बर्फवृष्टीच्या जागांत साधारण ८०० किमी अंतर आहे. पण दक्षिण सौदितल्या (फोटोतल्या वाळूच्या वादळाच्या जागेपासून १००-१५० किमी दक्षिणेस) ताईफ या समुद्रसपाटीपेक्षा १८८० मीटर ऊंच असलेल्या डोंगरावरच्या शहरात अत्युच्च ४० अंश सेल्सियस व अतीनीच -१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. सरासरी तापमान उच्च ३५ अंश व नीच ८ अंश सेल्सियस असते. तेथे बहुतेक दर वर्षी थोडेसे तरी बर्फ पडते असे 'ऐकून' आहे. हे ठिकाण पृथ्वीगोलावर अक्षांश बघितले तर अहमदाबाद आणि मुंबईच्यामधे येते !
  • Log in or register to post comments

Submitted by रुमानी on गुरुवार, 06/27/2013 - 10:46

Permalink

फोटो मस्तच ......!

हे असे काही अस्ते महितच नव्हते....! :)
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 06/27/2013 - 16:13

Permalink

आपल्या देशात

आपल्या देशात राजस्थानात काही ठिकाणी बर्फ पडते असे ऐकून आहे. ती दोन ठिकाणे म्हण्जे माउंट अबू व गुरूशिखर ( प भारतातील सरवोच्च जागा )
  • Log in or register to post comments

Submitted by राही on गुरुवार, 06/27/2013 - 17:11

In reply to आपल्या देशात by चौकटराजा

Permalink

नखी तलाव

आबूशिखरावरच्या नखी(नाक्की) तलावात पृष्ठभागावर पाव सेन्टिमीटर जाडीचा बर्फाचा पातळ थर पाहिला आहे. हिवाळ्यात राजस्थानात काही ठिकाणी काही वेळा शून्याखाली तीन अंश से. इतके तापमान असते. पण प्रत्येक वेळी बर्फवृष्टी किंवा पाणी गोठणे होतेच असे नाही. बर्फवृष्टी बहुधा होत नाही. सीमेवरच्या वाळवंटात (साम वगैरे) कडाक्याची थंडी असते.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 06/27/2013 - 17:38

In reply to नखी तलाव by राही

Permalink

सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून

सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून १५० किमी वर जबल अख्दर (हरित पर्वत) नावाची पर्वतराजी आहे त्यांतील जबल शेख नावाच्या मुख्य गावांत बर्‍याचदा हिवाळ्यात चारचाकीच्या काचांवर रात्री पडलेल्या दवाचे सकाळपर्यंत बर्फ झालेले असते. तेथील हवामान वर्षभर थंड / खूप थंड असते आणि तेथे थंड प्रदेशातील फळांच्या (सफरचंद, पीच, प्लम, द्राक्षे, ई) व केशराच्या बागा आहेत. प्रसिद्ध मस्कती डाळिंबे तेथेच पिकतात... एका प्रजातीचे डाळींब एक ते दीड किलो वजन भरेल इतके मोठे असू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 06/27/2013 - 17:51

In reply to सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

एक दीड किलोचे डाळिंब?????????

एक दीड किलोचे डाळिंब????????? :O अगायायाया डाळिंब आहे की कलिंगडाची सुधारित आवृत्ती =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 06/27/2013 - 18:37

In reply to एक दीड किलोचे डाळिंब????????? by बॅटमॅन

Permalink

मग उगाच का पेशवाईच्या

मग उगाच का पेशवाईच्या मेजवानीत मस्कती डाळींबे खास समजली जात असत (असे कुठेतरी वाचलेले आठवते)? ही डाळींबे चविला एकदम मस्त व मउ बियांची असतात, खाताना बिया दाताखाली अजिबात कचकचत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 06/27/2013 - 18:56

In reply to मग उगाच का पेशवाईच्या by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

लै भारी

अरबस्तान एकूणच सुरस आणि चमत्कारिक आहे हे मात्र नक्की!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Sun, 06/30/2013 - 17:00

In reply to सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

वा

अलीफ डाळिंब वा(ह) डाळिंब ! (डाळिंबाला अनार फारसीमध्ये म्हणतात की अरबीमध्यी? की दोन्हीमध्ये? की दोन्हीमध्ये आणखी वेगळाच शब्द आहे?)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 06/27/2013 - 18:41

Permalink

लै भारी!

सुरस आणि चमत्कारिक!!
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 06/30/2013 - 17:27

Permalink

आता काय काय पहावं लागणार आहे

आता काय काय पहावं लागणार आहे ... !!! मस्त फोटो
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 06/30/2013 - 17:57

Permalink

फोटो

माहिती व फोटो आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 06/30/2013 - 17:57

Permalink

फोटो

माहिती व फोटो आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 07/01/2013 - 17:16

Permalink

धन्यवाद !

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे आभार !
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Fri, 08/30/2013 - 17:10

Permalink

इथे सुद्धा फोटो दिसत नाहीयेत

इथे सुद्धा फोटो दिसत नाहीयेत :(
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on गुरुवार, 09/05/2013 - 17:34

Permalink

फटू दिसू लागले

युरोपियन देश वाटला असता विदौट टायटल
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com