अगोदर आपण सौदि अरेबियातले वाळूचे वादळ बघितले... ते जरी भयानक असले तरी अनाकलनीय नव्हते. ते बर्याच जणाना आवडले असे दिसले. म्हणून आता एक धक्का अजून द्यावा म्हणतो... ही पहा सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...
.
.
.
.
.
दर वर्षी नाही, पण गेल्या सात वर्षांत चारदा तरी सौदी अरेबियाच्या उत्तर भागात बर्फवृष्टी झाली आहे.
प्रतिक्रिया
26 Jun 2013 - 5:59 pm | भावना कल्लोळ
कलजुग है कलजुग
26 Jun 2013 - 6:02 pm | बॅटमॅन
च्यायला...कसं काय??? मुख्य प्रश्न असा की सौदीच्या कुठल्या भागात बर्फवृष्टी होते? डोंगरबिंगर कुठे आहेत?
26 Jun 2013 - 6:06 pm | बॅटमॅन
आयमाय स्वारी. उत्तर भाग असे लिहिलेय ते बघायचे राहून गेले.
हां तर उत्तर भागात बर्फ पडतो तर इस्राएलमध्येही पडतो का? सिनाय वगैरे भागात पडतो की कसे?
26 Jun 2013 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
सौदिच्या उत्तरेला असलेल्या जॉर्डन आणि इझ्राइलच्या डोंगराळ भागात दरवर्षी बर्फवृष्टी होते असे ऐकून आहे.
26 Jun 2013 - 9:47 pm | बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद :)
26 Jun 2013 - 6:10 pm | सौंदाळा
अवघडच दिसतय प्रकरण..
असो. एक्का काका मुडात आले परत :):)
26 Jun 2013 - 6:14 pm | दिपक.कुवेत
च्यायला ईथे कुवेत मधे नुसतच धुळिचं वादळ येत पण बर्फ काय दॄष्टिस पडत नाहि. थंडित क्वचीत गारा पडतात.
26 Jun 2013 - 6:14 pm | प्रचेतस
निसर्गाचा चमत्कार. दुसरे काय!!!!!!!!
26 Jun 2013 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सौदी म्हणजे नुसतं वाळवंटच, असे समजत होतो. धन्यवाद.
येऊ द्या अजून अशीच माहिती.
-दिलीप बिरुटे
26 Jun 2013 - 9:01 pm | काकाकाकू
पूर झाला. धुळीचं वाळवंट ऐकलं तरी होतं. पण गोट्यांएव्हढे दगड नी त्याचं एकंदरीत स्वरूप एव्हढं भयंकर असतं हे काहि माहित नव्हतं. आणि ते कमी म्हणून आता बर्फ!! सात वर्षात चारदा म्हणजे काहि दुर्मिळ नव्हे. विशेषतः सौदिमधे. आता पुढे काय? एक्कोजीराव, "सौदि अरेबियात एक चारशे वर्ष जुनं कपिलेश्वराचं मंदिर आहे त्याचे फोटो" वगैरे तत्सम काहि लिहिलंत तरी आश्चर्य नाहि वाटणार :-)
26 Jun 2013 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
सौदि अरेबियात एक चारशे वर्ष जुनं कपिलेश्वराचं मंदिर आहे त्याचे फोटो" वगैरे तत्सम काहि लिहिलंत तरी आश्चर्य नाहि वाटणार
दक्षिणेत एक मैदान सालेह म्हणून जागा आहे. तेथे बर्यापैकी सुस्थितीत असलेली इस्लामपूर्व (इसविसनापूर्वीच्या पहिल्या शतकातील) नाबातियन संस्कृतील काही थडगी (tombs) आहेत...
26 Jun 2013 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
वरचे चित्र आंतरजालावरून साभार घेतलेले आहे.
26 Jun 2013 - 8:21 pm | भाते
च्यामायला, मुंबईत यापैकी काहीच होत नाही. ना वाळूचे वादळ ना बर्फवृष्टी!
27 Jun 2013 - 11:02 am | डॉ सुहास म्हात्रे
दर पावसाळ्यात धो धो पाऊस पडून मुंबईचे व्हेनिस बनते ते काहीच नाही काय ? ;)
26 Jun 2013 - 9:05 pm | सस्नेह
गाड्यांचा फोटो भारी आहे .
वाळूचे फोटो यापेक्षा सुद्धा भारी वाटले.
26 Jun 2013 - 9:21 pm | लाल टोपी
अरेच्चा हे तर नवीनच प्रकरण आहे. असं काही घडलं आहे हे माहितच नव्हते.
नविन माहिती बद्दल धन्यवाद
27 Jun 2013 - 12:14 am | रेवती
हेही नवीनच .
27 Jun 2013 - 12:47 am | धमाल मुलगा
हे सौदी जरा खुळ्या डोस्क्याचंच दिसतंय. मरणाचं ऊन असलेलं वाळवंट काय, त्यात वाळूची वादळं काय अन बर्फवृष्टी काय! औघड है ब्वॉ! आता कळलं, अरबं अशी येड्यासारखी का वागतात ते. :D
27 Jun 2013 - 1:10 am | प्यारे१
+१
ह्या असल्या टापूत राहणार्या लोकांसाठीच (ऑडियन्ससाठी) विशिष्ट पुस्तकात काही आज्ञा/ आचाराच्या पद्धती/ काही पेश्शल सवलती दिल्या गेल्या असाव्यात का?
27 Jun 2013 - 4:44 am | जॅक डनियल्स
झकास !
थंडी मध्ये सौदी लोकं स्वेटर कशी घालतात, याचा मी विचार करत होतो, फुल विनोदी दिसत असतील. माझ्या एका सौदी विद्यार्थ्यांला तुमचे फोटो दाखवले तर तो वेडाच झाला. त्याने मला एक अन एक अक्षर मला भाषांतर करायला लावले....कुठून दाखवले असे झाले...;)
27 Jun 2013 - 7:22 am | स्पंदना
काही माण्स भलती नशिबवान हो!
इस्पिक एक्का त्यातलेच. सगळ भव्यदिव्य यांच्या नशिबी, अन आम्ही परड अन बाग यातच खुष!
वाळुच वादळ पाहिलं, तिथे प्रतिसाद द्याय्चा राहुन गेला आता दोन्हीचा मिळ्युन एकत्र देते.
अविश्वसनिय!! अचाट!
27 Jun 2013 - 10:12 am | तुमचा अभिषेक
जिथे वाळूचे वादळ तिथेच बर्फवृष्टी का या दोन्ही प्रदेशांत खूप अंतर आहे??
पहिल्या काही फोटोंत वाटले पांढरी वाळू दाखवून तुम्ही आम्हाला फसवत आहात ;)
27 Jun 2013 - 10:50 am | डॉ सुहास म्हात्रे
मी टाकलेल्या फोटोंतल्या वाळूच्या वादळाच्या आणि बर्फवृष्टीच्या जागांत साधारण ८०० किमी अंतर आहे.
पण दक्षिण सौदितल्या (फोटोतल्या वाळूच्या वादळाच्या जागेपासून १००-१५० किमी दक्षिणेस) ताईफ या समुद्रसपाटीपेक्षा १८८० मीटर ऊंच असलेल्या डोंगरावरच्या शहरात अत्युच्च ४० अंश सेल्सियस व अतीनीच -१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. सरासरी तापमान उच्च ३५ अंश व नीच ८ अंश सेल्सियस असते. तेथे बहुतेक दर वर्षी थोडेसे तरी बर्फ पडते असे 'ऐकून' आहे.
हे ठिकाण पृथ्वीगोलावर अक्षांश बघितले तर अहमदाबाद आणि मुंबईच्यामधे येते !
27 Jun 2013 - 10:46 am | रुमानी
हे असे काही अस्ते महितच नव्हते....! :)
27 Jun 2013 - 4:13 pm | चौकटराजा
आपल्या देशात राजस्थानात काही ठिकाणी बर्फ पडते असे ऐकून आहे. ती दोन ठिकाणे म्हण्जे माउंट अबू व गुरूशिखर ( प भारतातील सरवोच्च जागा )
27 Jun 2013 - 5:11 pm | राही
आबूशिखरावरच्या नखी(नाक्की) तलावात पृष्ठभागावर पाव सेन्टिमीटर जाडीचा बर्फाचा पातळ थर पाहिला आहे. हिवाळ्यात राजस्थानात काही ठिकाणी काही वेळा शून्याखाली तीन अंश से. इतके तापमान असते. पण प्रत्येक वेळी बर्फवृष्टी किंवा पाणी गोठणे होतेच असे नाही. बर्फवृष्टी बहुधा होत नाही. सीमेवरच्या वाळवंटात (साम वगैरे) कडाक्याची थंडी असते.
27 Jun 2013 - 5:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून १५० किमी वर जबल अख्दर (हरित पर्वत) नावाची पर्वतराजी आहे त्यांतील जबल शेख नावाच्या मुख्य गावांत बर्याचदा हिवाळ्यात चारचाकीच्या काचांवर रात्री पडलेल्या दवाचे सकाळपर्यंत बर्फ झालेले असते. तेथील हवामान वर्षभर थंड / खूप थंड असते आणि तेथे थंड प्रदेशातील फळांच्या (सफरचंद, पीच, प्लम, द्राक्षे, ई) व केशराच्या बागा आहेत. प्रसिद्ध मस्कती डाळिंबे तेथेच पिकतात... एका प्रजातीचे डाळींब एक ते दीड किलो वजन भरेल इतके मोठे असू शकते.
27 Jun 2013 - 5:51 pm | बॅटमॅन
एक दीड किलोचे डाळिंब????????? :O
अगायायाया डाळिंब आहे की कलिंगडाची सुधारित आवृत्ती =)) =))
27 Jun 2013 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
मग उगाच का पेशवाईच्या मेजवानीत मस्कती डाळींबे खास समजली जात असत (असे कुठेतरी वाचलेले आठवते)?
ही डाळींबे चविला एकदम मस्त व मउ बियांची असतात, खाताना बिया दाताखाली अजिबात कचकचत नाहीत.
27 Jun 2013 - 6:56 pm | बॅटमॅन
अरबस्तान एकूणच सुरस आणि चमत्कारिक आहे हे मात्र नक्की!!!!
30 Jun 2013 - 5:00 pm | राही
अलीफ डाळिंब वा(ह) डाळिंब !
(डाळिंबाला अनार फारसीमध्ये म्हणतात की अरबीमध्यी? की दोन्हीमध्ये? की दोन्हीमध्ये आणखी वेगळाच शब्द आहे?)
27 Jun 2013 - 6:41 pm | पैसा
सुरस आणि चमत्कारिक!!
30 Jun 2013 - 5:27 pm | भडकमकर मास्तर
आता काय काय पहावं लागणार आहे ... !!! मस्त फोटो
30 Jun 2013 - 5:57 pm | स्वाती दिनेश
माहिती व फोटो आवडले,
स्वाती
30 Jun 2013 - 5:57 pm | स्वाती दिनेश
माहिती व फोटो आवडले,
स्वाती
1 Jul 2013 - 5:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे आभार !
30 Aug 2013 - 5:10 pm | जयवी
इथे सुद्धा फोटो दिसत नाहीयेत :(
5 Sep 2013 - 5:34 pm | मालोजीराव
युरोपियन देश वाटला असता विदौट टायटल