काय या पुणेकरांचे कौतुक !

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
10 Dec 2012 - 12:35 am

पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक.

यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक.

म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल.

कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात.
पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो.

दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो
आणि बातमीचे हेडींग
अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ

कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते.
दुसर्‍या दिवशी फोटो आणि बातमी.

पुणेकरांना पावसाने झोडपले.

कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी.
बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले.

थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात.
अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्‍या पुणेकरांचे फोटो.
यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते.
पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले.
फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी !

थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते,
बातमी - पुण्यातील थंडी गायब

कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही.
बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच

अशा जरा उकडणार्‍या दिवसात हलकी पावसाची सर येते.
तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो.
बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा
पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा !

उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी
पुणेकर उकाड्याने हैराण

कधी जरा हीच बातमी बदलून -
रसाच्या गुर्‍हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत.

बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा !

कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो.

अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.'
हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते.

रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते.

पाणीटंचाईची बातमी असेल तर
ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा

सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात.
मग त्या महोत्सवाचा फोटो.
हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध !

असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला
जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !

रेखाटनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मोदक's picture

19 Dec 2012 - 11:18 pm | मोदक

बास की आता राव....

घर विकत घेणार्‍या (एकाच) गिर्‍हाईकाचे दोन ब्रोकर चुकून समोरासमोर आल्यावर "कोणती लोकॅलिटी जास्त चांगली?" यावर चर्चा सुरू आहे असे वाटू लागले आहे आता.

लायब्ररी, कीर्तनशाला, नाट्यगृहे, सिनेमा हॉल... रद्दीवाला,इस्त्रीवाला घरी येतो. पेपर सकाळी सहाला येतो. :-))

धाग्याची गाझापट्टी तीं हींच कांय रें मोदका =))

नर्मदेतला गोटा's picture

22 Dec 2012 - 12:07 am | नर्मदेतला गोटा

मुंबई महाराष्ट्रातच रहावी यासाठी लढणारे पुणेकर

आणि बेस्टबसमधे दो गेट वे ऑफ इंडीया दे दो असं हिंदीत मराठी कंडक्टरला सांगणारे मुंबईकर.

यांच्या ****** ******

मुंबई महाराष्ट्रातच रहावी यासाठी लढणारे पुणेकर

अभ्यास वाढवा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी काय फक्त पुणेकर होते का आँ? की अत्र्यांच्या गाड्याबरोबर नळ्याची यात्रा काढणे सुरूये??

श्रीरंग_जोशी's picture

22 Dec 2012 - 1:03 am | श्रीरंग_जोशी

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आंतरजालावर मुंबई व पुणे या दोन शहरांबद्दल भरपूर लेखन व चर्चा झाल्या आहेत. मराठी आंतरजालावरील सदस्यांमध्ये या शहरांचे प्रतिनिधित्व करणारे बहुसंख्य आहेत हि वस्तुस्थिती असली तरी इतर ठिकाणचेही अनेक सदस्य आहेतच.

पण महाराष्ट्रातील इतर शहरांविषयी अथवा निमशहरी ठिकाणांविषयी फारसे लिहिले जात नाही त्यामुळे त्यावर लिहू शकणाऱ्या सर्वांना आग्रहाचे सांगणे आहे की त्यावर जरूर लिहा. महाराष्ट्राबाहेरील अशी ठिकाणे जेथे अनेक पिढ्यांपासून मराठी संस्कृतीची पाळेमुळे घट्ट रुजली आहे त्यावर लिहिले गेल्यास दुधात साखरच.

नर्मदेतला गोटा's picture

29 Mar 2013 - 1:23 pm | नर्मदेतला गोटा

दिल्लीत अचानक पाउस,

दिल्लीकरांची तारांबळ अशी बातमी आजच्या पेपरमधे दिसतेय.

बातमीदार पुणेकर दिसतोय.

नर्मदेतला गोटा's picture

15 May 2013 - 9:31 pm | नर्मदेतला गोटा

पुण्यात दुकानदारांचा बंद

दुकानात काम करणार्‍या मुलांनी लक्ष्मी रोडवर चेंडूफळी खेळणे पसंत केले

भटक्य आणि उनाड's picture

15 May 2013 - 11:13 pm | भटक्य आणि उनाड

Assal Puneri, sadashiv pethi
Sathe ekda bapat la saangat hote ..
Aho te Lele. Ahet na tyanni tyanchya navacha rubber stamp banavla ahe ..
Gammat mhanje tyanni ekach 'le' banavla ahe ani donda stamp kartat ..
Bapat mhanale aho hyat kaay vishesh ..
te Gokhale ani Godbole ahet na tyanni fakt 'Gokha' ani 'Godbo' stamp banavla ahe;
Lelencha 'le' udhar gheun jatat !!;)=

नर्मदेतला गोटा's picture

14 Jun 2013 - 7:59 pm | नर्मदेतला गोटा

पुणेकरांचे रेनकोट छत्र्या पुन्हा बाहेर
कांदाभजी इ.

पैसा's picture

14 Jun 2013 - 11:21 pm | पैसा

मग, तुमच्या पुण्यात पाऊस पडला की नाही आता?

वेल्लाभट's picture

15 Jun 2013 - 6:51 am | वेल्लाभट

हाहाहाअहाहाहाहा
टॉपिक असा आहे, की ५०० ते १००० प्रतिक्रीया निश्चित समजा !

चित्रगुप्त's picture

13 May 2015 - 2:23 am | चित्रगुप्त

पुण्याच्या पेप्रात पेज थ्री असे का ? आणि त्यात काय काय, कोण असते बरे ??