काय या पुणेकरांचे कौतुक !

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
10 Dec 2012 - 12:35 am

पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक.

यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक.

म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल.

कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात.
पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो.

दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो
आणि बातमीचे हेडींग
अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ

कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते.
दुसर्‍या दिवशी फोटो आणि बातमी.

पुणेकरांना पावसाने झोडपले.

कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी.
बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले.

थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात.
अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्‍या पुणेकरांचे फोटो.
यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते.
पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले.
फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी !

थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते,
बातमी - पुण्यातील थंडी गायब

कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही.
बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच

अशा जरा उकडणार्‍या दिवसात हलकी पावसाची सर येते.
तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो.
बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा
पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा !

उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी
पुणेकर उकाड्याने हैराण

कधी जरा हीच बातमी बदलून -
रसाच्या गुर्‍हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत.

बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा !

कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो.

अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.'
हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते.

रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते.

पाणीटंचाईची बातमी असेल तर
ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा

सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात.
मग त्या महोत्सवाचा फोटो.
हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध !

असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला
जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !

रेखाटनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

16 Dec 2012 - 11:28 pm | दादा कोंडके

पण 'पांढर्‍या वांग्या'ची मजा वाटत नाही हाडकं पनीरात. :)

पण नशीब 'लाल सुरण' वगैरे म्हणत नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2012 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार

हा किस्सा नक्की पुणेरी म्हणून खपवण्याचा प्रयत्न आहे, का एका विशिष्ठ समाजाला टार्गेट करण्याचा ?

काये, अंडी, मटण वैग्रे महाग केले म्हणून एका विशिष्ठ समाजाला नावे ठेवणारे खूप बघितले आहेत. पण शिक्षण महाग करणार्‍यांच्या नावाने गळे काढणारे कोणी बघितले नाहीत म्हणून आपले विचारतोय. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Dec 2012 - 5:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पुण्यातील काही ब्राह्मण घरात अंडे असे म्हणत नाहीत पण खातात. आज पांढर्या लिंबाची भाजी केली होती असा उल्लेख करून, असे मला काही पिढ्या पुण्यात गेलेल्या एका पुणेकर मित्राने सांगितले होते. ऐकून मला आश्चर्य वाटले तेव्हा म्हणाला की बनवलेला किस्सा नाही, असे खरेच होते.

काही शंका असेल तर व्यनी करा, त्या मित्राचे सदस्यनाम कळवतो. पुढे तुम्ही आणि तो काय तो सोक्षमोक्ष लावा.

हार प्रकार ऐकला होता पांढर्‍या बटाट्याची भाजी म्हणोन.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2012 - 5:10 pm | परिकथेतील राजकुमार

मला उद्देश्यून आहे काय ? असल्यास :-

आपल्या मदतीबद्दल धन्यवाद. पण आपण आणि आपल्या मित्राची काय चर्चा झाली, अथवा कुठली रहस्ये उलगडली गेली ह्यात मला काही इंट्रेस्ट नाही. इथे सार्वजनीक पटलावरती जे काही लिहिले गेले आहे त्याला अनुसरुन एक प्रश्न मी प्रतिसादकास विचारला आहे. 'पुण्यात पांढरी लिंबे म्हणतात, मुंबईत चुन्याचे दगड म्हणतात, इचलकरंजीत कापसाचे बोळे म्हणतात' असल्यात मला रस नाही.

धन्यावाद.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Dec 2012 - 10:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

हा किस्सा नक्की पुणेरी म्हणून खपवण्याचा प्रयत्न आहे, का एका विशिष्ठ समाजाला टार्गेट करण्याचा ?

हे तुमचे ओरिजिनल विधान. या विधानात तुम्ही किश्श्याच्या पुणेरी असण्यावर शंका घेत आहात. त्यावर उत्तर म्हणून असा किस्सा मला एका पुणेकरानेच सांगितला हे मला सांगायचे होते. परत माझ्यावरच कुणी पुणेकर मित्राच्या नावावर किस्सा खपवतो आहेस असा आरोप करू नये म्हणून "पाहिजे असेल तर खात्री करा" असे लिहिले.

बाकी, यात कुठला समाज कसा "टार्गेट" झाला हे मला शष्प कळले नाही.

अवांतर :- इचलकरंजीचे माहित नाही, पण मुंबईत अंड्याला अन्डेच म्हणतात.

कपिलमुनी's picture

12 Dec 2012 - 3:21 pm | कपिलमुनी

नक्की काय सांगायचा आहे ? पुण्यामधलेच भटं खातात ?? क्कि पुणे आले की भटांचा उल्लेख आलाच पाहिजे??
बाकी भट म्हणजे नक्की कोण ??

'भटे' हा सहकार्‍यांचाच शब्द. तोपर्यंत तरी मला अज्ञात असलेला.
आणि त्यानंतरही मी आताच वापरला.
कोणत्याही समाजाच्य भावनांना धक्का पोचवण्याचा इरादा नसून घडले ते फक्त सांगितले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2012 - 3:42 pm | परिकथेतील राजकुमार

पण हा किस्सा कुठल्या सदरात मोडतो ते पण सांगा की जरा. का असे काही घडलेले तुम्ही त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवलेत ?

सस्नेह's picture

12 Dec 2012 - 4:11 pm | सस्नेह

'असे काही' म्हणजे ?
रोख कळला नाही. आणि 'सदर' कसले ?

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2012 - 4:25 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्या निरागसतेला सलाम.

=))

पर्‍याला पहिल्यांदा निरागसते ला सलाम ठोकताना पाहुन ..सॉल्लिड गुदगुल्या होतायत मला =))

सस्नेह's picture

12 Dec 2012 - 4:30 pm | सस्नेह

सलाम स्वीकारला गेला आहे...

हारुन शेख's picture

12 Dec 2012 - 4:32 pm | हारुन शेख

तर तर. स्नेहाताई आहेच आमची निरागस. हा प्रतिसादही निरागस आहे.

कापूसकोन्ड्या's picture

12 Dec 2012 - 7:50 pm | कापूसकोन्ड्या

आणखी काही मुद्दे.
सवाईचे कौतुक.
गणपतीची विसर्जनाची मिरवणुक संपली ती वेळ.आणी चर्चा
मानाचे गणपती
पुणे महोत्सवातील हेमामालिनीचा डान्स
डेक्कन क्विनमधली पॅन्ट्री बंद झाली आणि परत चालू झाली तो दिवस (पुणेकरांचे पॅन्ट्री विना प्रचन्ड हाल आणि नंतर दिलासा), सोबत एखादा फोटो. पॅन्ट्रीची कथा तर खुप गाजली होती.
संकष्टी आणी गुरुवारी मिळ्णारी शा.खी आण दाण्याचा लाडू तर खासच.
दसर्‍याचा आदल्या दिवशी 'सोने' खरेदी करायला झालेली शनीपाराशी गर्दी
लक्ष्मी रोड वरचे नेपाळी स्वेटर वाले
सकाळ चित्रकलेच्या परिक्षेत जमिनीवर बसलेले विद्यार्थी
दहावी/बारावी परीक्षेचा पहीला (आणि शेवटचा) दिवस
बाजारात एकदम आलेली कलिंगडे/ आणि माठ यांच्या ढिगाचे फोटो
वगैरे वगैरे.

नर्मदेतला गोटा's picture

12 Dec 2012 - 8:14 pm | नर्मदेतला गोटा

-- पुणे आले की भटांचा उल्लेख आलाच पाहिजे??

इथे भट याचा अर्थ 'पक्के पुणेकर' असा घ्यावा
(आणि पक्के पुणेकरचा अर्थ काय घ्यावा)

नर्मदेतला गोटा's picture

12 Dec 2012 - 8:15 pm | नर्मदेतला गोटा

कोजागिरीच्या दुसर्‍या दिवशी बातमी ठरलेली
सारसबागेत जमलेली, दुध पिणारी कुटुम्बे .त्यांचे फोटो
किंवा शनवारवाड्यावरच्या गाण्याच्या मैफिलीचा फोटो

पुणेकरांनी शनिवारवाड्यावर घेतला मसाला दुध आणि भावगीतांचा आस्वाद

नावातकायआहे's picture

13 Dec 2012 - 1:51 am | नावातकायआहे

माझे 'पुणे'....
काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण बालके" ) कधी कधी असा इतका फालतू प्रश्न
विचारतात की " तुम्हाला पुणे का आवडते ?" आता मग मी विचार
केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..?
आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of
thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो,
आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने , पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे , पण
पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही !
उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे ,
किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे,
पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे ( अहो कधी पण
येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून .;),
गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे ( आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर ..;) ,
सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे, जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे, मालुसर्यांच्या 'सिंव्हा'
सारख्या मर्दानगी चे पुणे,
पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे , लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे,
शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे, अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे,
पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे, 'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे ,
'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे , इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे ,
'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे , नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे , सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे , आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे,
SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे ,
आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे ,
Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे, कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे,
चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे, वैशाली च्या yummy सांभार चे पुणे,
रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे, तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि
कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे,
college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे,
Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे ,
पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे, Nike आणि Reebok वाले पण पुणे ,
खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,
आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे, कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुडलक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे , कॅड बी आणि कॅड एम चे पुणे,
सोडा शॉप चे पण पुणे, अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे,
University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे लावणार्यांचे' पुणे ,
कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे
( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही ..;) ,
नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे,
खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे,
आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे,
शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले
त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे,
बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे ,
Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले पुणे,
सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे,
मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे,
पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे ,
आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे,
आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे,
Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे, शिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,
'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे, मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि...
देशाचा defence शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या Southern Command चे पुणे,
तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे, बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,
स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे,
सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे,
ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे,
फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे ,
'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !,
०२० चे आणि MH "बारा" चे पुणे, आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे ,
जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे, सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे,
शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे,
पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे,
आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे ,
भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे,
ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे, अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे ,
जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे
पुणे ,
अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या ,
अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे,
भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे, पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे,
bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे,
आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे ,
काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे ,
बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे, नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे,
उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे , पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे,
घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! ,
शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे , दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे,
कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे ,
फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे,
आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे, नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे,
आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill
होणारे पुणे,
रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे,
जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे,
गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे,
लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे,
प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे, आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता मटा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे,
दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे आणि Valentine day ला गुलाबाला दमवत
झुलवणारे पुणे,
दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे, Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे,
भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे,
ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे,
सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे, Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...
पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे, आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे,
अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे,
जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे,
सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे,
Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे,
पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!
पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे,
उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,
Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे,
Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे,
कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे
घोटाळे बाज खासदारांचे पुणे , नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे ,
नवीन दादांचे पुणे, जुन्या भाईंचे पुणे, बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !!
आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते?

पक्का पुणेकर....(कश्यात काय आहे?)

मोदक's picture

13 Dec 2012 - 1:57 am | मोदक

भारी...!!!!!!

असेच ढकलपत्रातून आलेलेल दादर आणि कोल्हापूर माहिती होते.. हे मात्र भारी!!!

धन्स. :-)

पूण्यात पाणिपताची लढाई कुठे झालीओ??

( अजाण बालकातलं एक बालक )

सुहास..'s picture

13 Dec 2012 - 10:22 am | सुहास..

लईच भारी ढकलपत्र ..!!

कवितानागेश's picture

19 Dec 2012 - 2:12 am | कवितानागेश

इथे पुणे हा शब्द कितीवेळा आलाय कुणी मोजून सांगेल का? :)

बॅटमॅन's picture

19 Dec 2012 - 2:24 am | बॅटमॅन

उणे बत्तेचाळीस वेळा.

किसन शिंदे's picture

19 Dec 2012 - 7:44 pm | किसन शिंदे

एकदम कल्ला आहे हे ढकलपत्र.

हे लय आवडलं. :D

पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Dec 2012 - 10:31 am | विश्वनाथ मेहेंदळे

पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!

आयला, हे वाचलेच नव्हते. पर्वतीवर practice करून एव्हरेस्टला गवसणी घालता येते ?? मी कालच रुईया कट्ट्यावरून उडी मारली. रोज हाच सराव केला तर त्या Felix सारखी अवकाशातून उडी मारू शकेन असे वाटते आहे आता...

आनन्दिता's picture

13 Dec 2012 - 3:00 am | आनन्दिता

@ नावात काय आहे

जबरदस्त धकलपत्र .... पुण्यात काय आहे याचं जाम भारी उत्तर दिलत राव !!

पुण्याचा सार्थ अभिमान असलेली
आनंदिता......

इरसाल's picture

13 Dec 2012 - 8:45 am | इरसाल

१०० रावा

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Dec 2012 - 10:57 am | घाशीराम कोतवाल १.२

वा वा आमच्या भविष्याप्रमाणे धाग्याने शंभरी गाठली कि न गो अभिनंदण

तिमा's picture

14 Dec 2012 - 7:39 pm | तिमा

दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे आणि Valentine day ला गुलाबाला दमवत
झुलवणारे पुणे,

अशी वाक्ये लिहू शकणार्‍यांचे पुणे.

राही's picture

14 Dec 2012 - 8:25 pm | राही

हे ढकलपत्र विनोदी आहे हे वाक्य पुणेकरांस मान्य होईल काय?
जर ह्या ढकलपत्रातल्या कित्येक गोष्टी किरकोळ ह्या सदरात जमा न होता खरोखरच 'अभिमानास्पद' कौतुकास्पद' वगैरे वाटत असतील तर त्यापरता दुसरा विनोद नाही. '

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Dec 2012 - 1:04 am | विश्वनाथ मेहेंदळे

हे ढकलपत्र विनोदी आहे हे वाक्य पुणेकरांस मान्य होईल काय?

नाही होणार.

जर ह्या ढकलपत्रातल्या कित्येक गोष्टी किरकोळ ह्या सदरात जमा न होता खरोखरच 'अभिमानास्पद' कौतुकास्पद' वगैरे वाटत असतील तर त्यापरता दुसरा विनोद नाही. '

सदर ढकलपत्र धागाकर्त्याच्या मुद्द्याला बळकटी देते. आणि हो, मला ते ढकलपत्र विनोदीच वाटले.

नर्मदेतला गोटा's picture

15 Dec 2012 - 12:04 am | नर्मदेतला गोटा

हे पुण्याचे वर्णन परिणीता चित्रपटातल्या कलकत्त्याच्या वर्णनासारखे वाटले

नर्मदेतला गोटा's picture

16 Dec 2012 - 7:20 pm | नर्मदेतला गोटा

सवाई गंधर्व महोत्सवापूर्वी काही एक फोटो हमखास प्रसिद्ध होतो
तो म्हणजे सवाईच्या तिकिटासाठी रसिकांनी सकाळपासून रांग लावली
खाऊवाले पाटणकरांच्या दुकानात.
दुकान उघडण्यापूर्वी फूटपाथवर बसून राहीलेले पुणेकर रसिक.

मग यंदाचा १२ डिसेंबर फ़ारच कौतुकाने सेलिब्रेट केला असणार पुणेकरांनी.. १२-१२-१२ ला MH-१२ वाले जामच खुश झाले असणार... असो... पुणे तिकडे काय उणे?

बॅटमॅन's picture

16 Dec 2012 - 10:53 pm | बॅटमॅन

चेपुवर हे पेज बघितले आणि त्याच्या नावाने डोळे पाणावले.

"MH-12 Amhi Barache .. ...Amhi Punekar" :P =))

आनन्दिता's picture

16 Dec 2012 - 11:24 pm | आनन्दिता

पुणे आणि पुणेकरांचं होणार कौतुक सहन न होऊन स्वत:चे पोट दुखवून घेणारया सर्व जळितग्र्स्तांना … Get Well Soon ...!!!!

अभ्या..'s picture

17 Dec 2012 - 1:02 am | अभ्या..

उगीच?
आधी डिस्चार्ज घ्या मग इतरांना गेट वेल सून करा.

बॅटमॅन's picture

17 Dec 2012 - 1:29 am | बॅटमॅन

गेट इनो सून.

आनन्दिता's picture

17 Dec 2012 - 5:47 am | आनन्दिता

काय राव अभिजीत राव आम्ही तुम्हाला इतकं चांगलं Get well soon म्हणतोय अन् तुम्ही आम्हालाच उलटं 'उगीच' वैग्रे म्हन्ताय की… This not बरं ब्वॉ !!!!

आवांतर: ईनो on :)

अभ्या..'s picture

18 Dec 2012 - 1:40 am | अभ्या..

अहो आनंदितातै
या धाग्याच्या दुसर्‍याच प्रतिसादात म्हणलेय की हो. घ्या आता करुन कौतुक म्हणून.
मग कौतुक करुन घ्यायचे. इतर लोक काय करतात. ते कशाने ग्रस्त आहेत, त्यांना इनो द्यायचे का कोरडा गेट वेल सून द्यायचा हे नाही बघायचे. आणि तसे केले की त्याचे सुध्दा कौतुक करावे अशी अपेक्षा आहे का?
ठीक आहे मग.
वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा. धन्यवाद बरे का.
खुष आता?

आनन्दिता's picture

18 Dec 2012 - 10:03 am | आनन्दिता

अहो अभिजीत नसलेले दादा...

कोरडा वैग्रे नाही हा अगदी खर्रा खुर्रा गेट वेल सून दिला होता आम्ही ,,,,
आता तुम्हाला नसेल खपत आमच्या बिचारया पुण्याची स्तुती तर राहीलं ब्वॉ…

आवांतर : बाकी तुम्ही सोलापुर चे म्हणे … फार पब्लिक असतं हो तुमच्या सोलापुर चं आमच्याकडे college ला… पण असो. .कुठे जाणार तुम्ही तरी पुण्याशिवाय ..

कॉलेजलाच कशाला, सकाळच्या इंद्रायणीला पण ह्यांच्याकडचं बरंच पब्लिक असतं. उतरायचे वांदे करुन ठेवतात. ती गाडी शिंची पुण्याच्या पुढे सोडायलाच नको. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Dec 2012 - 12:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अस्सल पुणेकर सकाळच्या इंद्रायणीने कशाला जाईल झक मारायला? तुम्ही खरे पुणेकर दिसत नाही.
वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही, हे लक्षात ठेवा.

>>तुम्ही खरे पुणेकर दिसत नाही.वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही, हे लक्षात ठेवा.

मी फक्त सोलापूरच्या लोकांची इंद्रायणीला इतकी गर्दी असते की सकाळी उतरायचे पण वांदे होतात त्यामुळे ती गाडी पुण्यातून पुढे नाही नेली तर बरं होईल इतकंच म्हटलंय. तुम्हाला माझ्या प्रतिसादात मी पुणेकर असल्याचा दावा केल्यासारखं का वाटलं ते वाचायला आवडेल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Dec 2012 - 2:15 am | विश्वनाथ मेहेंदळे

म्हणजे तुम्ही पुणेकर नाही हे मान्य करता आहात. लक्षात ठेवेन पुढील पुणे धाग्याच्या वेळेस.
(आत्ता आला उंट डोंगराखाली)

>>म्हणजे तुम्ही पुणेकर नाही हे मान्य करता आहात.

नीट वाचा काका, मी पुणेकर आहे/ नाही किंवा मुंबैकर आहे/ नाही असलं काहीही म्हटलेलं नाहीये. रेल्वेतून उतरताना कोणत्याही सर्वसामान्य प्रवाशाला होणार्‍या त्रासाबद्दल म्हटलंय मी. ;)

च्यायला तुम्ही कोल्हापूरसारखं असं स्टेशन मागून घ्यायचे राव. पुढे कुठेच जाताच येऊ नये. गाडी फक्त मुम्बै पुणे मुम्बै.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Dec 2012 - 12:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आवांतर : बाकी तुम्ही सोलापुर चे म्हणे … फार पब्लिक असतं हो तुमच्या सोलापुर चं आमच्याकडे college ला… पण असो. .कुठे जाणार तुम्ही तरी पुण्याशिवाय ..

म्हणजे नाईलाज म्हणून पब्लिक जाते का पुण्यात ? मला तर वाटत होते की पुणेप्रेमापोटी जात असेल.

मृत्युन्जय's picture

18 Dec 2012 - 12:59 pm | मृत्युन्जय

नाही हो विमे. प्रत्येकाला आपलाच गाव प्रिय असतो. सोलापूर् / कोल्हापूरकरांना पुणे आवडले जरी (समजा) तरी पुण्यात जायचे शिकण्यासाठी किंवा नौकरीसाठी ते गरज म्हणुन. पण आपला गाव तो आपला गाव. गाव हागणदारी असण्याइतके मागासलेले जरी असले तरी त्याच्याबद्दल जे प्रेम असते ते दुसर्‍या कुठल्याही गावाला कसे मिळावे.

लोक पुण्यात येतात त्याचे मुख्य कारण म्हणजे उडदामाजी काळे गोरे. घाम, दुर्गंधी, घाण, अस्वच्छता, बकालपणा, अस्थैर्य, ती लोकल तो चिकचिकाट, तो रोजचा १ - १.५ तासाचा गर्दीत लोंबकळत केलेला प्रवास या असल्या गोष्टी टाळण्यासाठी मुंबै पेक्षा पुणे लाखपटीने बरे असे म्हणुन पुण्यात येतात. बाकी शिक्षण आणि नौकरी व्यवसायाच्या संधी सुद्धा पुण्यात खुप. म्हणुन पुणे. पण उद्या याच लोकांना (आणि पुणेकरांना देखील) उदरभरणासाठी मुंबैला यायला लागले तर झक मारत येतीलच की. म्ह्णुन काय मुंबै थोडीच आवडणार आहे. ती एक तडजोड झाली. टाळता न योण्याजोगी अपरिहार्यता.

पश्चिम महाराष्ट्रातल्यांना मुंबैपेक्षा पुणे जवळ आहे त्यामुळे गावाला जवळ म्हणून पुणे प्रेफर करणार्‍यांची संख्या जास्त आहे.

नर्मदेतला गोटा's picture

3 Mar 2013 - 9:20 pm | नर्मदेतला गोटा

प्रत्येक इमारतीच्या पार्कींगमधे एक तरी MH 31 वाली गाडी असतेच आजकाल
विदर्भवासी वाढलेत पुण्यात.

बाकी ... चालू द्या

काळा पहाड's picture

13 May 2015 - 2:59 pm | काळा पहाड

पुणं खरं तर पश्चिम महाराष्ट्राचीच राजधानी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांनी अनुक्रमे नागपूर आणि औरंगाबादला जायला काय हरकत आहे? पण नाही. तिथे वेगळा विदर्भ पाहिजे म्हणून पेटवापेटवी करतात आणि पुण्यात येवून इथले फ्लॅट महाग करतात. वर आणि 'जावून र्‍ह्यायलो' सारखी अशुद्ध भाषा वापरतात. यातले बरेच जण रिटायर्ड सरकारी नोकर आहेत. तुमच्या आमच्या आजूबाजूला रहाणारे या लोकांनी घेतलेले फ्लॅट खरं तर तिथल्या जनतेला भ्रष्टाचारानं नाडून इथं पुण्यात इन्व्हेस्ट करून घेतले आहेत. शिवाय इथं येवून हेच लोक पुणेकरांवर टीका करतात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Dec 2012 - 2:14 am | विश्वनाथ मेहेंदळे

शी बाबा, काय तुम्ही पण लॉजिकल उत्तर देऊन टाकले. असे नाही, काहीतरी खरमरीत किंवा अपमानास्पद किंवा टोकाचे लिहा ना. मग भांडता येईल. धागा मस्त द्विशतकी होतो की नाही बघा ;-)

अवांतर :- मुद्दा पटला आहे. मुळात हे मान्य होते पण म्हटले आयती आग लावायची संधी का सोडा ?
अतिअवांतर :- पुणे मला स्वतःला मनापासून आवडते. म्हणून तर तिथे यायची संधी मिळाली की सोडत नाही.
अतिअतिअवांतर :- हे लिहूनही पुढील वेळेस जालीय पुणेकर असेच पेटतील हे माहित असल्याने लिहायला काहीही हरकत नाही :-)

आनन्दिता's picture

18 Dec 2012 - 10:01 pm | आनन्दिता

विमे काका,

पुण्यात लोकं येतात कारण पुणं त्यांना पोटापाण्याच्या उद्योगा बरोबर सुसह्य जगणं सुद्धा देतं. उद्योगधंदे,शिक्षण, वाहतुक आणि दळणवळण,सुरक्षा यांचा विचार ़ केला तर इतर शहरांपेक्षा पुणं कितीतरी सरस आहे..
एक metro शहर म्हणून मिरवत असताना सोबत आपली संस्कृती जपणारं दुसरं शहर मला दाखवून द्या...
तुम्ही म्हणताय तशी नाईलाजानं आलेली लोकं ही पुण्यात आहेत.. आणि पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच ! मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!

अभ्यास वाढवा!!!! पुणे तर अजून धड मेट्रो सिटीपण नैये. जिथे मेट्रो प्रकल्प आहे ते किंवा लोकसंख्या या कुठल्याच निकषावर पुणे मेट्रो नै. मेट्रो शहर असूनही आपली संस्कृती हिरिरीने जपण्यात चेन्नै, कोलकाता यांना विसरलात वाट्टं. पुण्याची जी भौतिक संपन्नता आहे, ती बाहेरून आलेल्या उद्योगधंद्यांमुळेच. नैतर पेन्शनरांचे शहर म्हणूनच पुणे माहिती होते.

बाकी वाहतूक आणि दळणवळणाबद्दल काय बोलावे तितके कमीच आहे. इतक्या मोठ्या संख्येने दुचाक्या अन्य कुठल्याही मोठ्या शहरात नाहीत-कारण पब्लिक ट्रान्स्पोर्टचा पूर्ण बोर्‍या वाजलेला आहे.

शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली, मुंबै, कोलकाता, चेन्नै, बंगळूरू वैग्रेंच्या तुलनेत हाही दिमाख टिकत नै. इतर शहरांपेक्षा म्हणजे सांगली कोल्हापूर वैग्रे म्हणालात तर ठीके, पण त्यापलीकडे जाऊ नका :)

आणि पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच ! मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!

बाहेरून आलेल्या उद्योगधंद्यांमुळेच पुण्याचा विकास झालाय हे सत्य नाकारता येतच नै. एक सांस्कृतिक ओळख वगळली तर हे अतिमहत्वाचे भौतिक अंग बाहेरच्यांमुळेच विकसित झालेय . दुरवस्था म्हंजे नक्की काय म्हणायचेय? कैच्याकै बिनबुडाचे अंधाभिमानी लॉजिक आहे झालं.

आणि पुण्यात राहून पुण्यावर टीका करू नये वैग्रे बोलणार्‍यांना हे कळत नाही का, पुणे महाराष्ट्रात आणि भारतात येते. एक भारतीय म्हणून मला माझ्या देशातल्या कुठल्याही भागाबद्दल टीका करायचा अधिकार आहे, नैतिथे बाह्या सरसावणारे तुम्ही कवण???

दादा कोंडके's picture

19 Dec 2012 - 2:11 am | दादा कोंडके

पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच ! मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!

आणि पुण्यातली लोकं अमेरिकेत जाउन उलथल्यानंतर या लोकांना आयतच रान मिळालं. :)

अभ्या..'s picture

19 Dec 2012 - 2:46 am | अभ्या..

आणि सुव्यवस्था म्हणजे तुम्हाला कुठल्या काळातली अभिप्रेत आहे हो?
सुवर्णनांगराच्या आधीची का फार नंतरच्या रमण्याची? पेठातल्या हौदावरची की लष्करातल्या साह्यबाची? पेन्शनरांच्या गावातली की प्लॉटींगच्या आत्ताच्या पैशातली?
म्हणजे ठरवता तरी येईल सुव्यवस्था कोणी केल्या अन दुरवस्था कुणामुळे झाली ते.

आनन्दिता's picture

19 Dec 2012 - 3:10 am | आनन्दिता

कोंडके दादा...

हा टोला मात्र जोरात लागला बरका आम्हाला... आम्ही इथे अमेरिकेत उलथलोय हे खरंच आहे....कधी एकदा पुण्यात परततोय असं झालंय बघा,,

लौंगी मिरची's picture

3 Mar 2013 - 9:32 pm | लौंगी मिरची

एकदम सहमत आनन्दिता . पण आपण पुण्यात परत जाईपर्यंत पुण्याची कितपत वाट लागली किंवा लावली असेल यालोकांनी .. याची कल्पनाहि करवत नाहि .
तरिहि पुण्यावर अत्यंत प्रेम आहे हे बाकि तितकच कठोर सत्य आहे .

अभ्या..'s picture

19 Dec 2012 - 2:57 am | अभ्या..

टाळ्या,
अगदी मनापासून टाळ्या बॅट्या.
आयला आमच्या गावात आम्ही नुसते महाराष्ट्रातलेच नव्हे तर शेजारील राज्यातले पण सामावून घेतले. त्यांची संस्कॄती आमची संस्कृती असले झेंडे नाचविण्यापे़क्षा त्यांच्या मानाच्या काठया रोवल्या. आज जी संस्कृती संस्कृती म्हणतो ती अशीच मेल्टिंग पॉट्प्रमाणे बनत असते. स्वतःचे वेगळेच अस्तित्व राखणे कदाचित आज अभिमानास्पद वाटत असेल. ते नंतर हास्यास्पद (सध्यापण) आणि शेवटी टाकून देणे नाहीतर विरघळून जाणे एवढेच शिल्लक राहील.

बॅटमॅन's picture

19 Dec 2012 - 12:09 pm | बॅटमॅन

+१११११.

एक नंबर रे नसलेला अभिजीत. सोलापूर, मिरज, इ. ठिकाणी मराठी आणि कन्नड दोन्ही संस्कृती तितक्याच दिमाखाने आहेत. कॉस्मॉपॉलिटनिझमचे प्राथमिक शिक्षण असेच मिळत जाते. याबद्दल सीमाभागाचा नाद नै करायचा :)

काळा पहाड's picture

13 May 2015 - 3:06 pm | काळा पहाड

असणारंच ना. कारणी ही गावं महाराष्ट्रातली आहेत. बेळगावातल्या मराठी गळचेपी बद्दल आपलं काय मत आहे? कर्नाटकातलं एक गाव दाखवा जिथे मराठी माणसं आहेत आणि गळचेपी होत नाही असं? उगीच कॉस्मॉपॉलिटनिझम आणि मेल्टींग पॉट वगैरे घफ्फा ठीक आहेत पण तिथल्या मराठी माणसांना जो त्रास होतोय त्यांना जरा हे पटवून द्या बरं!
- (महाराष्ट्राने कर्नाटकची नाकेबंदी करायला हवी असं मत असलेला) का.प.

राघवेंद्र's picture

20 Dec 2012 - 1:00 am | राघवेंद्र

:)

आनन्दिता's picture

19 Dec 2012 - 3:54 am | आनन्दिता

नैतिथे बाह्या सरसावणारे तुम्ही कवण???

प्रतिसादामधे वापरलेल्या शब्दांच्या तीव्रतेवरुन "नैतिथे बाह्या सरसावणार " कोण आहे हे कोणीहि सांगेल,,,

चैनै प्रमाणे इतर भाषांचा अन प्रांताचा कमालीचा द्वेष ़ करणे म्हणजे संस्कृती हिरिरीने जपणे हे आम्ही मानत नाही

एक भारतीय म्हणून मला माझ्या देशातल्या कुठल्याही भागाबद्दल टीका करायचा अधिकार आहे?

आमचा अभ्यास कमी आहे एकदम्म मान्य. पण भारतीय असुन भारतातल्याच भागांना नावं ठेवणं हा आम्ही आमचा अधिकार वैग्रे मानत नाही..
त्यापेक्षा त्यांचा अभिमान बाळगणं आणि कौतुक करणं हे आम्ही आमच कर्तव्य म्हणुन prefer करु

बाकी तुमचं चालुद्या ...

...

पुण्याबद्दल चकार शब्द कुणी काढला की उसळणारे कोण, तेही बघावे, म्हणजे कळून येईल. आणि उगीच नावं ठेवणं हा अधिकार नाही, तर जे आहे ते बोलणे आणि अवास्तव डिफेन्सिव्हपणाला प्रत्त्युत्तर देणे हा अधिकार आहे.

पुण्यात बर्‍याच गोष्टी उत्तम आहेत-कोण नाही म्हणतो? हवामान उत्तम आहे, सर्व तर्‍हेच्या खाण्यापिण्याची चंगळ आहे, शिवाय ऐटी, मॅन्युफॅक्चरिंग, इ.इ.क्षेत्रांत बरेच जॉब्स आहेत. मुख्य म्हणजे मराठीपणाची सांस्कृतिक ओळख पक्की आणि बर्‍यापैकी जिवंत आहे, त्यामुळे मराठी लोकांना पुणे जवळचे वाटते- शिवाय मुंबै एका टोकाशी वसलीये, तिच्यापेक्षा पुणे बरेच जवळ पडते बहुसंख्य लोकांना-कोंकण सोडून जवळपास बाकीचा अख्खा महाराष्ट्र.

पण म्हणून कोणी पुण्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीचे उगीच समर्थनासाठी समर्थन करत बसला, तर बाकीचे खवळणारच-त्याबद्दल उगीच डिफेन्सिव्ह होणे हा मूर्खपणा आहे. योग्य तिथे समर्थन केले तर कोण काही म्हणतं का कधी? मी स्वतः कैक उत्तर भारतीयांशी बोलताना पुण्याच्या बाजूने बोलतो, पण नैतिथे समर्थन करत नाही. इथे कुणी पुण्यावर टीका करायला सरसावून बसलेय असे नाही, पण गिरे तोभी नाक/कान इ. ऊपर, वैग्रे छापाचे कोणी बोलला तर मात्र तो वेडगळपणा आहे हे दाखवणे बरे असते.

च्यायला, या असल्या धाग्यांवर बॅलन्स्ड लिहिणे लै बोअर काम तेच्यामारी. मूर्खपणाला अजून शतमूर्खपणाने उत्तर देण्यात आणि कल्ला करण्यात जी मजा आहे ती मिसतोय असे वाट्टे :P

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Dec 2012 - 2:29 am | विश्वनाथ मेहेंदळे

विमे काका

इथे छातीत एक कळ येउन गेली...

पुण्यात लोकं येतात कारण पुणं त्यांना पोटापाण्याच्या उद्योगा बरोबर सुसह्य जगणं सुद्धा देतं.

मान्य. (अर्थात काही पुणेकर अशा परप्रांतीयांचे जगणे challenging करण्यासाठी अथक प्रयत्न करीत असतात म्हणा, पण ढोबळ मानाने मुद्दा बरोबर आहे.)

उद्योगधंदे,शिक्षण, वाहतुक आणि दळणवळण,सुरक्षा यांचा विचार ़ केला तर इतर शहरांपेक्षा पुणं कितीतरी सरस आहे..

कसे काय बुवा ?? संदर्भासहित स्पष्टीकरण द्याला का?

एक metro शहर म्हणून मिरवत असताना सोबत आपली संस्कृती जपणारं दुसरं शहर मला दाखवून द्या...

मुळात वाघुळभाऊंनी लीवल्याप्रमाणे पुणे मेट्रो शहर नाही. दुसरे म्हणजे पुण्याची संस्कृती अजिबात जपली जात नाही आहे सध्या. मागील वेळेस पत्ता विचारला तर सरळ उत्तर मिळाले की हो. आणि अचूक गाईड पण केले त्याने. हे बाणेर-पाषाणवाले पण ना... शी....

तुम्ही म्हणताय तशी नाईलाजानं आलेली लोकं ही पुण्यात आहेत.. आणि पुण्याची जी थोडीफार दुरवस्था आहे , ती यांच्यामुळेच !

या विधानाचा आणि मृत्युंजयकाकांच्या (मीच एकटा का म्हणून काका?) विधानाचा एकमेकांना छेद दिला तर सगळ्या परप्रांतीयांमुळे पुण्याची दुरावस्था झाली आहे असे निष्पन्न होते. आणि याचा बॅटमॅनच्या विधानाशी छेद दिला तर अजूनच गोंधळ होतो. त्यामुळे जाऊ देत. बाकी, तुमचे विधान मत म्हणून मान्य करायला माझी हरकत नाही.

मग त्यात शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे परप्रांतिय आणि पुण्याबद्दल आपलेपणा , प्रेम नसणारे मराठी लोक दोन्ही येतात!

आणि शहराबाहेर झोपडपट्टीत राहणारे मराठी किंवा प्रेम नसणारे अमराठी येत नाहीत?

आनन्दिता's picture

19 Dec 2012 - 10:18 am | आनन्दिता

इथे छातीत एक कळ येउन गेली...

ह्हपुवा... काका हा शब्द मी आदराने लिहीला होता..:) पण प्रत्यक्षात तो कळीचा मुद्दा झाल्याबद्दल दिलगीर आहोत.:)

मुळात वाघुळभाऊंनी लीवल्याप्रमाणे पुणे मेट्रो शहर नाही

पुणे हे metropolitant शहर च आहे मुंबई, द्दिल्ली, कोलकता, चेन्नई या चार मुख्य शहराबरोबरच बेंगलुरु, हैदराबाद,अहमदाबाद,आणि पुणे ही शहरेसुद्धा metropolitant मानली जातात. वाटल्यास विकिबाबांना विचारा .
वटवाघुळ यांनाच मी हे सांगणार होते पण ते अभ्यास वैग्रे करायला सांगतात. आपल्याला भ्या वाटतं ब्वॉ!, :) कारण पूर्वीपासुनच अभ्यासाशी आमचे तितकेसे मैत्रीपूर्ण संबंध नाहीयेत!!

आवांतर हा शब्द काळजाला भिडला. म्हणजे तुमच्याऐवजी दुसरी कोणीतरी आवा बोलतेय असे वाट्टेय =)) =))

वरील संवादनाट्यात रसपूर्ण योगदान देऊन श्रीयुत नसलेले अभिजित, सूड, काका(विमे+मृत्युंजय), आनन्दिता, ब्याट्म्यान आणि इतर यांनी हा धागा, पोहर्‍यात उतरून रोचक व रसभरीत केल्याबद्दल अति अति आभार...!
a

काऽऽऽय वो हेऽऽऽ ? आनन्दिताबै आणि श्रीयुत्तऽऽऽ ?

सस्नेह's picture

19 Dec 2012 - 12:36 pm | सस्नेह

बाकी, आनन्दिताबै इतर सर्व श्रीयुतांच्या बेरजेपेक्षा कमी नाहीत असे वाटत आहे...

आनन्दिता's picture

19 Dec 2012 - 11:42 pm | आनन्दिता

बघ की बै स्नेहाताई कशी बोलतात तरी लोकं ...यांना यांची शहरं आवडतात ठिक आहे.. पण म्हणून यांनी पुण्याला कै च्या कै नावं का म्हणून ठेवायची...?.
आम्ही आमच्या गावाचा अभिमान बाळगला तर यांना वाईट ़का वाटावं बुवा ...
वरून आम्ही काही बोललो तर आमच्या अभ्यास वैग्रे सारख्या दुखर्र्या नसांवर बोटं ठेवतात... ;)

पुणेकर् ह्सलए तरि कऔतुक आणि रडलए तरि कऔतुक :)

नर्मदेतला गोटा's picture

18 Dec 2012 - 10:57 pm | नर्मदेतला गोटा

पुण्यात रहायचं आणि आयुष्यभर पुण्यालाच दात दाखवायचे

किंवा

पुण्यात राहून आमचे कोल्लापूरचे लोक कसे दिलदार आहेत
आणि पुणेकर कसे संकुचित आहेत असे म्हणून पुण्यावर तंगडी वर करायची
हे पटत नाही !

चित्रगुप्त's picture

19 Dec 2012 - 9:12 am | चित्रगुप्त

काही वर्षांपूर्वी आमच्या एका मित्राच्या मोठ्या मुलासाठी वधुसंशोधन करताना, आणि आता दुसर्‍या मुलासाठी व.सं. करताना, "कुठलीही मुलगी करा, पण पुण्याची चुकूनही करू नका" ('मुलगी करणे' हा 'टॅक्सी करणे' सारखा शब्द प्रयोगही पुणेकरांचाच) असा प्रेमाचा सल्ला खुद्द पुणेकर मंडळींनीच दिलेला आहे....
.... यातील मर्म पुणेकरांनीच उलगडावे, ही विनंती.

बोलघेवडा's picture

19 Dec 2012 - 9:37 am | बोलघेवडा

मी पुण्यात राहणे कधी पण पसंत करीन. काही तथाकथित मोठ्या शहरांच्या ह्या समस्या बघा.

बंगलोर - तुफान ट्राफिक जॅम. अगदी ५ किमी जाण्यासाठी सुद्धा एक एक तास लागू शकतो. भयंकर महागाई. मौजमजा म्हणजे सिनेमा थेटर आणि मॉल.

चेन्नई- बकाल आणि कलकात शहर. प्रचंड तुसडी लोक आणि भाषेबद्दलचा दुराग्रह. खाण्या-पिण्याचे हाल. अतिशय विषम हवामान.

मुंबई - बकाल आणि गलिच्छ शहर. जीवाची सर्वसाधारण हमी न देऊ शकणार जीवनमान.

कोलकाता - उद्योग आणि विकास कशाशी खातात हे माहित नसणार शहर. केवळ लोकसंख्या ह्या निकषावर मेट्रो बनलेले शहर

दिल्ली- न बोलेलेले बर.

या सर्व बाबतीत पुण्यातील स्थिती बरी आहे अस वाटते.

कवितानागेश's picture

19 Dec 2012 - 11:25 am | कवितानागेश

वर दिलेली सगळीच वर्णने जगातल्या बहुतांश लोकशाहीवाल्या शहरांना लागू पडतात.
आणि पुणे हे शहर नाहीच मुळी.
इतर लोक ज्या भागाला शहर म्हणतात, पुण्यातले लोक त्याच भागाला 'गावात जाउन येतो, गावात राहतो' वगरै म्हणतात.
त्यामुळे पुणे हे एकमेवाद्वितिय गाव आहे असे म्हणायला हरकत नाही. :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Dec 2012 - 10:14 am | घाशीराम कोतवाल १.२

मुंबई - बकाल आणि गलिच्छ शहर. जीवाची सर्वसाधारण हमी न देऊ शकणार जीवनमान.
काहि च्या काही ?
पुण्याची तरफ्दारी करताना मुंबईला का नाव ठेवताय

राही's picture

19 Dec 2012 - 4:34 pm | राही

या धाग्यावर सिरियस्ली लिहायचं म्हणजे कुरकुरीत पापडांवर भिजलेलं घोंगडं टाकण्यासारखं आहे.पण मुंबईची सर कशालाच नाही.मुंबई जिवंत आहे,पुणं निवांत आहे.पुण्याचा फार मोठा भाग मिलिटरी एस्टेट्सनी व्यापलाय म्हणून पुणं इतकं झोपडपट्टीमुक्त राहू शकलंय.आणि हवा हा एकच घटक पुण्याच्या फेवरमध्ये आहे,तो सुद्धा निसर्गनिर्मित.तरीसुद्धा ऐन हिवाळ्यातही लक्ष्मी रोड,कुमठेकर रोड्,मंडई,तुळशीबाग,शनिपार अशा भागांत दम कोंडतो.कधी एकदा बाहेर पडतो असं होतं.करमणुकीची साधनं नाहीत,शाळा कॉलेजिस गल्लोगल्ली खाण्याचे ढाबे,टपर्‍या,स्टॉल इ. नाहीत्,मार्केटस नाहीत.(हे सर्व मुबलक नाही असं म्हणायचं आहे.)बारीकसारीक वस्तू हवी असेल तर थेट तुळशीबागेत जा म्हणून सांगतात.स्ट्रँड सारखं एक पुस्तकांचं दुकान दाखवा.कीर्तीची लाय्ब्ररी,रुपारेलची लायब्ररी,दादरचे मुं.म.ग्रंथसंग्रहालय,आयडिअल्,डेविड ससून्,पारल्याचे लोकमान्य,ब्रिटिश कौन्सिल्,मॅक्स्म्यूलर्,भुलेश्वर-काळ्बादेवीची हिन्दी गुजराती ग्रंथदुकाने,जुहूची भली मोठी कीर्तनशाला लाय्ब्ररी,मिठीबाई-एनेमची लायब्ररी,टाउन हॉल्,किती सांगावं?टाटा थिएटर्,नेहरू सेंटर्,पृथ्वी,भारतीय विद्याभवन्,वामन केंद्रेंनी नावारूपाला आणलेला नाट्यविभाग..आर्ट गॅलर्‍या तर अगणित आहेत्.म्यूझिअम्स्-(रेल्वे,नेवल्,बी.एन्.एच.एस),लोकवाङ्मय गृहा आणि त्यातले अड्डे,भूपेश गुप्ता भवन,बण्डूगोरे भवन,नंदादीप,अलकेश मोदी..मौज,मॅजेस्टिक,शब्दवेध,वसई,अनेक अड्डे,व्यासपीठं.
पुण्यात खरी कमतरता जाणवते ती ईटरीज,करमणुकीची साधनं आणि पब्लिक ट्रान्स्पोर्टची.मुंबईत नाट्यगृहं,सिनेमा हॉल्स कितीतरी आहेत.शिवाय मुंबईत कोणी उपाशी रहात नाही,कुठल्याही गल्लीत पाच रुपयाचा वडापाव तरी मिळतोच.त्यामुळे मुंबई हे निम्नमध्यमवर्गाचं आशेचंआकांक्षेचं शहर आहे.पाचदहा रुपयात शहराच्यामोठ्या भागात बेस्टने जाता येतं.स्वतःचं वाहन नसलेला नोकरवर्ग इकडूनतिकडे जा-ये करू शकतो. रद्दीवाला,इस्त्रीवाला घरी येतो.पेपर सकाळी सहाला येतो.
आणि मुंबईचे काही नवीन भाग खरोखर देखणे आहेत.चर्चगेट-फोर्ट्-कुलाबा-कफ्परेड सोडाच. पण जेव्हीपीडी,चारकोप गोराई,लोखंडवाला,मालाड-लिंक रोड,बीकेसी,गोरेगाव-दिंडोशी पवई चांगलेच आहे. शिवाय एस्सेल वर्ल्ड्,पॅगोडा,मढ-मार्वे,नॅशनल पार्क्,कान्हेरी,जिजामाता उद्यान्,विखरोळीची गोदरेज कॉलनी आणि तिथली वृक्षसंपदा.. आणि हो, सगळ्यात शेवटी समुद्र..!

इरसाल's picture

19 Dec 2012 - 4:56 pm | इरसाल

जबरी प्रतिसाद.
आता बाकीचे उगाच जुळवाजुळव करुन पुण्याची वाचवायचा प्रयत्न करणार.

बाकी पुण्यात करमणुकीची साधनं नाहीत, खाण्याचे ढाबे,टपर्‍या,स्टॉल इ. नाहीत्,मार्केटस नाहीत हे वाचून प्रचंड कीव आली. मला पुण्याइतकी खाण्याची चैन मुंबईत नक्कीच आढळली नाही. पुण्यातली करमणुकीची साधनं म्हणाल तर मल्टिप्लेक्सला आम्ही चालत जाऊनही दहा-पंधरा मिनीटात पोचतो. अक्षरधारा सारखं ग्रंथसंग्रहालय वाहनाने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. मुंबई म्हणताना तुम्ही कुठे राहता त्याचाही विचार करा. दादर सारख्या भागात राहत असाल तर मुंबई तुम्हाला नक्कीच चांगली वाटणार. ज्यांना उपनगरातून तासंतास प्रवास करुन मुंबईत यावं लागतं त्यांना जरा विचारा एकदा.

बॅटमॅन's picture

19 Dec 2012 - 5:16 pm | बॅटमॅन

खाण्यापिण्याच्या मुद्द्याबद्दल सूडपंतांशी बाडीस (आमच्या अनेक पुणे व मुंबै दोन्ही ठिकाणी राहिलेल्या मित्रांच्या फीडब्याकवरून). मार्केटबद्दल्सुद्धा प्राब्ळम नै. मेण प्राब्ळम है तो ट्रान्स्पोर्टचा. कर्मणुकीची साधनेपण चिकार हैत म्हणा तशी.

राही's picture

19 Dec 2012 - 7:00 pm | राही

चालत दहा मिनिटांवर मल्टिप्लेक्स हे तुम्ही कुठे रहाता त्यावर आहे.अख्ख्या पुण्यातली मल्टिप्लेक्सची संख्या कितीशी आहे? सांस्कृतिक वातावरण ,सिनेमादि करमणुकीसाठी आज मुंबईच्या प्रत्येक उपनगरात चांगल्या सोयी आहेत.अगदी मुळुंद,ठाणे(मुंबईत मानले तर.)गोरेगाव,बोरिवली,पारले,अंधेरी,डोंबिवली(हे पुन्हा मुं.मा.त.)सगळीकडे. चांगली कॉलेजिस अशीच प्रत्येक उपनगरात आहेत.विलेपारले येथील केळवणी मंडल ही तर खूप मोठी आणि देशभर नावाजलेली संस्था.फादर अ‍ॅग्नेल्,अंजुमन इस्लाम्,सेंट झविअर्स,ह्या शंभर शंभर वर्षांची परंपरा असलेल्या उत्तम संस्था.झुनझुनवाला,विवेकानंद,पाटकर,विद्यावर्धिनि ह्याही गेल्या तीसचाळीस वर्षात नावारुपाला आलेल्या संस्था.निम्न मध्यमवर्गाला परवडणार्‍या आणि स्वच्छ अश्या उडप्यांची तर मुंबईत रेलचेल आहे.या शिवाय अफोर्डिबिलिटीप्रमाणे त्या त्या स्तरावरची असंख्य हॉटेले.चाटची दुकाने.(गाड्या नव्हेत.)वडापाव तर जागोजागी.पंजाबी,चायनीझ ही भरपूर्.काँटिनेंटल (इटालिअन्,फ्रेंच),मेक्सिकन ,केरळी,गुजराती,राजस्थानी,कच्छी,चेट्टिनाड्,गोवन,मालवणी,कोल्हापुरी कश्मिरी,जे हवे ते. हां आता मिसळ,खिचडी,थालीपीठ हे मात्र सर्वत्र मिळत नाही.(त्याची मुंबईत क्रेझ ही नाही.)आणि या सर्वांसाठी (काँटिनेंटल आणि कश्मिरी सोडून)कुठे लांब जायला नको.प्रत्येक उपनगरात हे सर्व आहे.इलेक्ट्रॉनिक वस्तू,कपडे,(गार्मेंटची मोठी इंडस्ट्री मुंबईत आहे.)सेरॅमिक्स्,हार्ड्वेअर्,यासाठी शहराच्या केंद्रभागात जावे लागत नाही.मुंबईसारखा किरकोळीचा मोठा फूलबाजार तर मी महाराष्ट्रातल्या कुठल्याच मोठ्या शहरात पाहिला नाही.जिथे तिथे फ्लॉरिस्ट्स आहेत.(बूके वगैरेसाठी)इ.इ. यादी कितीतरी वाढवता येईल.मुंबई बेट असल्यामुळे विस्तारावर मर्यादा आहे,त्यामुळे रहायची जागा महाग आहे हे खरे पण आता नवी मुंबई,कोपरखैराणे,ऐरोली,घणसोली,रबाळे,येथे तुलनेने स्वस्त घरे आहेत.सध्या पुण्यातही औंध बाणेर पाषाणचे लोक नोकरीसाठी मगरपट्टा,विमाननगरला जातात आणि तिथले लोक हिंजवडीला येतात.आणखी विशेष म्हणजे मुंबईत वाहतुकीचे अनेक नवे पर्याय निर्माण झाले आहेत किंवा पाइपलाइन मध्ये आहेत.ठाणे वाशी रेल वे हा प्रमुख मानता येईल.पुण्यात या बाबतीत काही हालचाल दिसत नाही.

पिलीयन रायडर's picture

19 Dec 2012 - 7:32 pm | पिलीयन रायडर

ते बाकी जे जे काही लिहिलय ते ठिके... पण खाण्याच्या बाबतीत पुणे मागे आहे??????????
तुम्ही पुण्यात कुठे आणि काय काय खाल्लय ताई??

यावर परा भाऊंनी राही ताईंना उत्तर द्यावे अशी मी नम्र विनंती करते.. कारण सदाशिव पेठी उत्तर फक्त "तिकडुनच" येउ शकते..

काळा पहाड's picture

13 May 2015 - 3:21 pm | काळा पहाड

याबाबतीत पुणेरी (सदाशिव पेठी म्हणा हवं तर) उत्तर हे "आग्रह नाही आमचा पुण्यात या म्हणून असं आहे" याची कृपया नोंद घ्यावी.

मी पुणेकर
कधीकाळी पुणे मुन्सीपाल्टित " मारलेल्या उंदराचा" हिशेब ठवण्याचे माझ्याकडे काम होते. तेव्हा मी अमेरिकेच्या प्रेसिडेन्टची अर्थिक धोरणे कशी चुकतात यावर भाष्य करायचो. (आभार पु.ल.)
आता वयाच्या मानाने होत नाही म्हणून टिका करायची खाज मुंबै चैनै आणि बंगळुरू या विषयावर भागवितो. शिवाय अमेरिकेत सगळे "आपलेच" असल्यामुळे जास्त बोलता पण येत नाही.
असो. पूर्वी सारखे पुणे राहीले नाही हेच खरे.

ह भ प's picture

19 Dec 2012 - 5:51 pm | ह भ प

एका पुणे जिल्ह्यात असले वीसएक मुंबई जिल्हे सहज मावतील..
शिवाय प्रती चौरस किमीमधे राहणार्‍या रहिवाश्यांची घनता तर अबब.. अन हवेतला दमटपणा नको रे बाबा..पावसाळ्यात होणारे जीवाचे हाल (टीव्हीवर) बघवत नाहीत..
समजा ५ वर्षापुर्वी इंजिनीअरिंग पासआउट झालेला इंजिनीअर आज पुण्यात स्वतःच घर घेउ शकतो..

तर्रीबाज's picture

19 Dec 2012 - 7:37 pm | तर्रीबाज

येवडा काथ्या कुटल्यावर मंग शेवटी काय ठरलं? पुनं चांगलं, का म्हमई?

सुंब जळला तरी पीळ काई जात न्हाई मराटी मानसांचा.
उद्या बाहेरच्या कुनी पैशाच्या जोरावर यांना जंगलात हाकलून दिलं तरी तितं बी येकमेकांच्या उरावर बसतील 'पुनं चांगलं का म्हमई?' आसं इच्यारत.

..बरे झाले द्येवा अडानी झालो.. न्हाईतर असते दंभेचि मेलो, आसंच आता संत तुकाराम म्हाराजांच्या अबंगाची उसनवारी करुन म्हनावंसं वाटतंय.

नर्मदेतला गोटा's picture

19 Dec 2012 - 10:42 pm | नर्मदेतला गोटा

हो का
मग एवढे मुम्बैकर आजकाल हाकून दिल्यागत
पुण्यात का येताहेत.

बाकी
मुंबईची एक गोष्ट मात्र मानावी लागेल
ते म्हणजे मुंबई विद्यापीठ आणि त्याचे रेप्युटेशन.

मुंबई विद्यापीठाचा उजेड जगभर पडला आहे.
सगळे कुलगुरूदेखील गुणाचे...
इतकं बास आहे

पुणेकर बंगलोर हैदराबादला जात नाहीत का?आणि एक आय्.टी सोडले तर बाकी कित्येक क्षेत्रातले लोक वेअरहाउसिंग क्लिअरिन्ग,मीडिया,फिनॅन्स्,फॅशनवेअर्,टी.वी,सिनेमा यातले कलाकारच नव्हेत तर बॅक स्टेजची मोठी फौज मुंबईकडे धावते आहे त्याचे काय?हॉस्पिटॅलिटी,स्पेशलिटी हॉस्पिटल्स्,अणुविज्ञान,सोशल सायंसेस यातले अत्युत्तम शिक्षण आणि संधी मुंबईत आहेत.पालनपुर आणि सुरते खालोखाल हिरेउद्योग आणि व्यापार मुंबईतच आहे.अर्थात या धंद्याकडे सुसंस्कृत मराठी माणूस ढुंकूनही पहात नसल्याने पुणेकर येथे धावत सुटण्याची शक्यता नाही.