पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक.
यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक.
म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल.
कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात.
पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो.
दुसर्या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो
आणि बातमीचे हेडींग
अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ
कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते.
दुसर्या दिवशी फोटो आणि बातमी.
पुणेकरांना पावसाने झोडपले.
कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी.
बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले.
थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात.
अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्या पुणेकरांचे फोटो.
यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते.
पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले.
फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी !
थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते,
बातमी - पुण्यातील थंडी गायब
कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही.
बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच
अशा जरा उकडणार्या दिवसात हलकी पावसाची सर येते.
तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो.
बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा
पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा !
उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी
पुणेकर उकाड्याने हैराण
कधी जरा हीच बातमी बदलून -
रसाच्या गुर्हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत.
बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा !
कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो.
अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.'
हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते.
रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते.
पाणीटंचाईची बातमी असेल तर
ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा
सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात.
मग त्या महोत्सवाचा फोटो.
हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध !
असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला
जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा !
प्रतिक्रिया
10 Dec 2012 - 12:47 am | बॅटमॅन
आता पेप्राच्या पुणे एडिशनमध्ये पुणेकरांबद्दल बातम्या असणार की मुंबैकरांबद्दल?
पण एनीवेज, चांगले धावांचे पोटेन्शिअल आहे या धाग्यात ;)
10 Dec 2012 - 12:59 am | अभ्या..
काय या पुणेकरांचे कौतुक !
घ्या आता करुन. ;)
12 May 2015 - 7:59 pm | नर्मदेतला गोटा
पुण्याला गारांच्या पावसाने झोडपले
10 Dec 2012 - 1:10 am | कवितानागेश
मिपावर ऐन मध्यरात्री पुणेकरांचे कौतुक :)
10 Dec 2012 - 2:50 am | जेनी...
हॅ !
गोटुनाना लेख कै जमला नै बॉ :-/
पूणेकरांसाठी लिवायचं म्हणजे कसं पूणेरी टोल्यात हाणल्यागत लिवाय पायजे ;)
तमी लैच साधं सुधं लिवलय बगा :-/
10 Dec 2012 - 8:08 am | अत्रुप्त आत्मा
@तमी लैच साधं सुधं लिवलय बगा>>> अगं बालिके, आंम्ही आमच्या बद्दल लिहीताना अस्सच ग्गोगोड लिहीतो. ;-)
आमच्या कडुनही 1 बातमी>>> बरेच वर्षानी कमाल,नर्मदेच्या गोट्याची मि पा वर धमाल =)) :-b
29 Oct 2014 - 7:18 pm | नर्मदेतला गोटा
हो क्का
10 Dec 2012 - 9:09 am | श्री गावसेना प्रमुख
कवतीकाचे बोल हायती लोकास्नी येड करुन स्वताच कवतीक करताहेत
सुचना=धाग्यावर कामापेक्षा जास्त वेळ टाइम पास करु नये
10 Dec 2012 - 9:18 am | चौकटराजा
गेल्या पन्नास वर्षातील पुणेकरांचे काही खास विषय
१ पेशवे पार्कातल्या सुमित्रा हतीणीची तब्येत
२. बाबु टांगेवाला यानी हिराबागेच्या मैदानावर आज कुणाला हार घातला बरे ?
३.नव्यापुलावरील सगुणाचे काय म्हणणे आहे.
४.पालख्या आल्या का ?
६ पालख्यांच्या दुसरे दिवशी दिवेघाटातला फोटो आला का ?
७ ग्लोब्ब डबड्यासमोर ( श्रीनाथ सिनेमा) डोल्याची डावी उजवी झाली झाली का
८ ईदचा चांद दिसला की नाही दिसला ?
९ गणेशोत्सवात पावसाने उघडीप दिल्याने देखावे पाह्यला गर्दी होती.
१० पुरात पाणी नक्की किती आले साठी लकडी पुलावर गर्दी
११ सवाई गंधर्व महोत्सव दुसरे दिवशी किती वाजेपर्यंत लांबला याच चालीवर गणपती मिरवणुकीला
किती तास लागले.
१२ नाना साहेब गोरे यानी अमुक वर प्रतिक्रिया काय व्यक्त केली ?
25 Apr 2014 - 1:52 pm | आयुर्हित
शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लिम्का बुक /ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ला कळवा हो कोणीतरी!
वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली
10 Dec 2012 - 9:35 am | घाशीराम कोतवाल १.२
चला भाउ पॉप्कॉर्न घेउन तयार बघु शतक गाठतो का हा धागा .
10 Dec 2012 - 9:54 am | सूड
असल्या बातम्या वाचण्यासाठी किंवा बघण्यासाठी कोणी आवतंण देत नाही. सहन होत नसतील तर दुसरं पान वाचायला घ्या/ टी व्ही वर पाहत असाल तर चॅनल बदला.
10 Dec 2012 - 10:22 am | विश्वनाथ मेहेंदळे
झालास रे पुणेकर. खास सदाशिव पेठेतून शिकवणी चालू आहे वाटते !!
10 Dec 2012 - 11:47 am | बॅटमॅन
अगदी अगदी!!!
10 Dec 2012 - 9:58 am | सोत्रि
10 Dec 2012 - 9:59 am | सोत्रि
10 Dec 2012 - 10:00 am | सुहास..
पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक.
यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक.
म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल.
कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात.
पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो.
दुसर्या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो
आणि बातमीचे हेडींग
अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ
कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात. रस्त्यातील वाहतूक अडते.
दुसर्या दिवशी फोटो आणि बातमी.
पुणेकरांना पावसाने झोडपले.
कधी हलक्याशा सरी पडत असतात. अशावेळी हिरवागार झालेल्या सिंहगडाचे फोटो, त्यावर पर्यटकांची गर्दी.
बातमी असते - पावसाळी वातावरणात पुणेकरांनी केले सिंहगडाचे पर्यटन, पुणेकरांनी सिंहगडावर गरम गरम भजी खाणेच पसंत केले.
थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी फिरायला पुणेकर बाहेर पडतात.
अशावेळी कमला नेहरु पार्कमधला वॉकींग जॉगिंग करणार्या पुणेकरांचे फोटो.
यातल्या काही जणांच्या अंगावर शाल. पुण्यातल्या पेपरात बातमी. बातमीत वर्णन असते.
पुणेकरांनी स्वतःला शालीत लपेटून घेतले.
फोटोवर हेडींग पुण्यात गुलाबी थंडी !
थंडी संपून थोड्याशा उकाड्याला सुरुवात होते,
बातमी - पुण्यातील थंडी गायब
कधी जूनमधे पाउस पडतो पण जुलैमधे पाऊस अजिबात पडत नाही.
बातमी - पावसाचे दोन महीने उलटले पण पुणेकर कोरडेच
अशा जरा उकडणार्या दिवसात हलकी पावसाची सर येते.
तापलेले रस्ते जरा थंड होतात. उकाडा जरा कमी होतो.
बातमी - पावसाच्या हलक्या सरीने पुणेकर सुखावले किंवा
पुणेकरांवर पावसाचा प्रसन्न शिडकावा !
उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा वाढतो. अशावेळी बातमी
पुणेकर उकाड्याने हैराण
कधी जरा हीच बातमी बदलून -
रसाच्या गुर्हाळाचा फोटो, पुणेकर रस पिताहेत.
बातमीचे शीर्षक - चहापेक्षा रस बरा !
कधी कधी पुण्यातल्या रस्त्यांवर बरेच खड्डे पडतात.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो.
अशावेळी बातमी 'पुणेकर खड्याने त्रस्त.'
हेच रस्ते जर कोथरूडमधील असतील तर कौतुक आणखी वाढते.
रस्त्यातील खड्ड्यांनी कोथरुडकर हैराण अशीही ओळ पहायला मिळते.
पाणीटंचाईची बातमी असेल तर
ऐन पावसाळ्यात कोथरुडकरांच्या टँकरसमोर रांगा
सवाई गंधर्वचे दिवस असतात. कौशिकीसारखे कलाकार छान गाऊन जातात.
मग त्या महोत्सवाचा फोटो.
हेडींग-कौशिकीच्या गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध !
असा सारा पुणेकरांच्या कौतुकाचा मामला
जो पुणेकर झाल्याशिवाय इतरांना नाही उमगायचा ! >>>>>
आभारी आहे ! ;)
25 Apr 2014 - 1:41 pm | नर्मदेतला गोटा
तेच परत छापलं तुम्ही
10 Dec 2012 - 10:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
माज आहे पुणेकर असल्याचा.
-मातोश्रीन्च्या बाजुने सदाशिव पेठेचा वारसा लाभलेला अस्सल माजुरडा पुणेकर-
(टिप:- सदर लेखामधे 'मटाराचे भाव उतरल्याने पुणेकरान्ची मटार उसळीची चैन चालु असल्याचा उल्लेख नाही, सदरहु लेखकाचा अस्सल पुणेरी पद्धतीनी निषेध आणि मटार उसळ खायचे आमन्त्रण') :)
10 Dec 2012 - 10:31 am | परिकथेतील राजकुमार
पुण्याचा विषय आणि 'दिवाळी पहाट', 'बि आर टी', 'बचत गटाचे कौतुक', 'चितळे' इ. चा साधा उल्लेख देखील नाही ?
10 Dec 2012 - 2:52 pm | प्यारे१
अरे ह्या 'लेखा'चा संदर्भ'ग्रंथ' सकाळ नाही ना.... हे सगळं कसं असेल त्यात?
10 Dec 2012 - 5:29 pm | रेवती
आणि शिकरणाचा उल्लेखही र्हायलाय.
10 Dec 2012 - 7:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
+१ शिकरण :)
11 Dec 2012 - 7:43 am | ५० फक्त
+१ शिकरण,
लयीत गाउन पहा काय यमक जुळलंय आणि जी काही छंदोत्पत्ती झाली आहे ती वैश्विक परदेहाच्या आत्मिक प्रोजेक्शन अवस्थेपर्यंत घेउन जाईल तुम्हाला.
10 Dec 2012 - 10:35 am | मृत्युन्जय
मध्यंतरी मी बेंगरुळुला गेलो होतो (आम्ची मजल तिथवरच हो.) तर काय गंमत म्हणुन सांगु, कित्येक वर्तमानपत्रे तिथे कन्नड मध्ये होती. सहज म्हणुन एका रिक्षावाल्याला विचारले काय बातम्या आहेत हो आज म्हणून (मी मोडक्यातोडक्या इंग्रजीमध्ये विचारले. तिथे मराठी रिक्षाचालका कुठे भेटला म्हणुन विचारु नका) मी विचारले तर चक्क त्याने बेंगलोरात कोणी कुठे आत्महत्या केल्या, कोणाचा खून झाला, कुठे खडे खोदले आहेत वगैरे वगैरे अश्या बातम्या दिल्या. इंग्रजी वर्तमानपत्रातही तेच अर्ध्याहुन अधिक बेंगलोरच्या बातम्य. मला वाटते या चोर पुणेकरांनी बेंगलोरची स्टाइल ढापली असावी अथवा बेंगलोरकरांनी पुण्याची कास धरली असावी. एकुणात काय पुणेक्रांची खोडच वाईट.
10 Dec 2012 - 12:24 pm | राही
मुंबईच्या मोठ्या पत्रांत स्थानिक बातम्यांसाठी मुंबई वृत्तांतसारखे एक वेगळे पान/पुरवणी असते. रस्त्यात खड्डे असल्याची बातमी 'मुंबईकर खड्डेग्रस्त' अशी दिली जात नसून ती 'रस्ते खड्डेग्रस्त' अशी असते.रस्त्यासारख्या निर्जीव वस्तूलाही मान देण्याची मुंबईकरांची वृत्तीच यातून दिसते.पाणीकपातीच्या सूचनाही 'पूर्व उपनगरे',किंवा 'के पश्चिम,एल पूर्व'या भागातल्या लोकांसाठी असतात.कुरलेकर,गोरेगांवकरांसाठी नसतात. अर्थात कौतुककहाणी आवडलीच.
10 Dec 2012 - 12:41 pm | मनीषा
पुणे तिथे काय उणे असे म्हणतात ना?
मग कौतुकात देखिल उणेपण कशाला ? :)
स्वगत : एकाने दूसर्याचे कौतुक केले तर तिसर्याला का जळजळ होते कोण जाणे ?
कृपया ह. घे. (आज्ञेवरून )
(पुणेरी) मनीषा
10 Dec 2012 - 12:55 pm | ह भ प
पुण्यासारखं शहर आख्ख्या उत्तर भारतात नाही..
(द-क्षीण भारत न पाहिलेला नवपुणेकर) हभप..
10 Dec 2012 - 1:13 pm | मी-सौरभ
पुणेकर हा शब्द आला की सगळे असे पेटतात ते बघा आता..
10 Dec 2012 - 1:43 pm | Atish
पुणे तिथे काय उणे ??
10 Dec 2012 - 2:33 pm | टिलू
हि actually वृत्तपत्रांची खोड आहे. यामध्ये 'सकाळ' आघाडीवर आहे. मुंबई सकाळमध्ये सुद्धा अशा बऱ्याच वेळा बातम्या असतात. जरा काही आपत्ती आली कि लगेच 'मुंबईत चाकरमान्यांचे हाल' अशी बातमी असते. जणू काही मुंबईतले चाकरमाने हाल करून घेण्यासाठीच जन्माला आले आहेत.
10 Dec 2012 - 2:44 pm | दादा कोंडके
विषय गुळगुळीत झाला असला तरीही...
१०-११ वर्षांपुर्वी प्रथमच पुण्याला आल्यावर सकाळ वाचल्या नंतर अगदी असच वाटलं होतं. पेपरभर पुणे-पुणे--पुणे-पुणे-पुणे! संपूर्ण पेपरामधले एकतृतीआंश शब्द 'पुणे' असतील.
15 Dec 2012 - 10:55 pm | विजुभाऊ
संपूर्ण पेपरामधले एकतृतीआंश शब्द 'पुणे' असतील.
टाईपसेटचे तेवढेच खिळे उरले किंवा छापखान्यातील जुळार्याला तेवढेच शब्द जुळवता येत असतील असे म्हणायला हल्ली ऑफसेट प्रिंटिंग टेक्नॉलोजी मुळे वाय उरलेला नाही. आपण म्हणूया फॉन्ट मधे तेवढीच अक्षरे मिळाली असतील.
10 Dec 2012 - 4:03 pm | Mrunalini
खरच... @मन उधाण वार्याचे माज आहे पुणेकर असल्याचा....
पुणे तिथे काय उणे...
आणि @ह भ प मला तर वाटते पुण्यासारखे शहर जगात कुठेही नाही.
10 Dec 2012 - 4:12 pm | गणपा
धागाकर्त्याच्या नावा प्रमाणेच घासुन घासुन गुळगुळीत झालेला धागा. :)
10 Dec 2012 - 4:43 pm | निनाद मुक्काम प...
मोठ्या अपेक्षेने हा धागा वाचायला आलो .
आणि निराशा झाली.
कट्टरता लोप पावून सगळ्या गांधीवादी प्रतिसाद पाहून अपेक्षाभंग झाला.
शतक गाठणे दूरच येथे अर्ध शतकाची मारामार दिसत आहे.
10 Dec 2012 - 7:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जरा मटार उसळ, शिकरण आणि दुपारची वामकुक्शी होउ दे. अस्सल पुणेकराला कट्टर पणा ह्या तीन गोष्टीनन्तरच येतो.
विषय विसन्गत : आनुस्वार कसा द्याय्चा?
10 Dec 2012 - 8:13 pm | रेवती
मउवा,
shift m अनुस्वारासाठी. विसंगत. :)
10 Dec 2012 - 10:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
विसंगत. जमलं.
10 Dec 2012 - 5:17 pm | श्री गावसेना प्रमुख
पुणेकर असल्याचा माज असा आहे की जसे काही पुणे महाराष्ट्रापासुन तोडन्यासाठी प्रयत्न झाले आणी त्यात माज असलेल्यांपैकी कोणीतरी विरांसारखे लढुन शहीद झाले
पुणे बेळगाव बर्हाणपुर सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे
10 Dec 2012 - 5:28 pm | रसायन
अहो पुणेकर ,पुणेकरच आहेत :):):)
तुलानाच नाही इतरांशी
10 Dec 2012 - 5:31 pm | रसायन
क्रुपया पुणेकरांचा मत्सर करु नये
अन्यथा कायदेशीर ईलाज केला जाईन ;)
10 Dec 2012 - 5:34 pm | श्री गावसेना प्रमुख
थंडी तापाचा का?सरकारी डॉक्टर का तुम्ही नाही कायदेशीर उपचार तिथेच होतात वाटते
10 Dec 2012 - 5:34 pm | बॅटमॅन
विशिष्ट जमातीने विशिष्ट जमातीच्या कौतुकाकरिता काहाडलेला धागा.
(स्वगतः दिलाव् रे बाँब टाकूण ;) )
10 Dec 2012 - 6:30 pm | तिमा
टाकायचाच असला तर असा टाकावा.
पूर्वी पुण्यामधे टाईम्स ऑफ इंडिया छापला जात नसे, मुंबईहून डाक एडिशन सकाळी दहा साडेदहाला पोचत असे. असाच एकदा सकाळी पुण्याच्या नातेवाईकांकडे गेलो. त्यांनी टाईम्स पुढे केला. त्यावर अस्सल मुंबईकराप्रमाणे मी म्हणालो," शी! हा शिळा पेपर आम्ही वाचत नाही. यातल्या बातम्या आम्ही मुंबईला कालच वाचल्यात." नातेवाईकही पुणेकर, सदाशिवपेठेतलेच होते. ते म्हणाले," वाचायला दिला नाहीच मुळी! एवढा प्रवासाहून आला आहेस तर परसदारी जायचे असेल, म्हणून दिलाय! पाणीटंचाई मुळे तुला संवयच असेल ना!
10 Dec 2012 - 8:15 pm | जेनी...
हिहिहि .. अगदिमनापासुन हसले हिहिहि
10 Dec 2012 - 9:23 pm | आनन्दिता
एकंदरीतच पुणेकर अन त्यांच्या सवयी (खोडी) कौतुकाचा विषय असणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाहीए ...
10 Dec 2012 - 10:00 pm | जेनी...
खरय .
आश्चर्य वाटण्यासारखं नक्कीच नाहि .... विचित्र वाटण्यासारख आहे मात्र .
10 Dec 2012 - 10:55 pm | बॅटमॅन
पूर्ण सहमत!!!!
(र्याशनल) ब्याटम्यान.
10 Dec 2012 - 10:59 pm | पैसा
असलात तर नदीपलीकडचे असाल. आणि पुण्यात रहात नसाल तर कृपया इनो घ्या. पुणेकरांच्या दृष्टीने नदीपलिकडे जग संपते.
10 Dec 2012 - 11:05 pm | बॅटमॅन
पैसातै यू टू???????
(अं.ह. & डो.पा.) बॅटमॅन.
10 Dec 2012 - 11:12 pm | पैसा
रविवारात महिनोन्महिने राहिले आहे. आणि पुण्याचा अभिमान असणारे कित्येक पुणेकर नातेवाईक आहेत, एवढं माहिती असायलाच पाहिजे ना!
10 Dec 2012 - 11:15 pm | बॅटमॅन
कथिन आहे, लोकं कायकाय लक्षात ठेवतात ;)
10 Dec 2012 - 11:16 pm | जेनी...
कोणची नदी व्हातेवो तुमच्या पुण्यात??
10 Dec 2012 - 11:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आहे एक नाला, त्यालाच नदी म्हणतात. (मुंबईमध्ये नदीला नाला म्हणतात ती गोष्ट वेगळी)
11 Dec 2012 - 12:54 am | जेनी...
अय्या विशु :)
कित्ती हुस्शार आहेस रे तु =))
11 Dec 2012 - 9:43 am | विश्वनाथ मेहेंदळे
पहिल्यापासूनच... ;-)
11 Dec 2012 - 7:53 pm | चौकटराजा
पुण्यातून राम नावाची नदी वहाते पण ही मुम्बईच्या मीठी नदी इतकीच प्रसिद्ध आहे .
25 Apr 2014 - 1:44 pm | नर्मदेतला गोटा
काय या पुणेकरांचे कौतुक !
मतदान केलं तरी फोटो झळकतात यांच्या बोटांचे
केले नाही तर मतदारयादीत नाव नाही ही देशपातळीवरची बातमी होते
10 Dec 2012 - 11:18 pm | जेनी...
अओ सासुबै ... रविवारा बद्दल नैओ ... पुण्याबद्दल सांगा ..
माझ्या ससुबै म्हणजे पण ना ! :-/
शी बै ... यांना सांभाळायचं म्हणजे कथिण होउन बसतं खरच :-/
18 Dec 2012 - 1:13 am | नर्मदेतला गोटा
कोठरूडमधील पुणेकरही हेच म्हणतात,
नदीपलिकडे पुणं सम्पतं
11 Dec 2012 - 3:38 am | आनन्दिता
पुणे आणि पुणेकर दोन्ही ही लाजवाब असून त्यांचे कौतुक होणे ही अतीशय साह्जिक आहे ...
ज्याना हे मान्य नाही त्यांनी सामोर यावे शनिवार वाड्याचा राखवालदार जाहिर मुका घेऊन त्यांचा सत्कार करेल..!!
हुकुमावरुन
11 Dec 2012 - 8:12 pm | बॅटमॅन
आपली आपण करी स्तुती | तो एक मूर्ख ||
- नारायण सूर्याजीपंत ठोसर , मु.पो.जांब.
11 Dec 2012 - 10:00 am | परंपरा
पैसाताई शी सहमत. नदीपलीकडे पुणे संपते!!!!
परीकथेतील राजकुमार यांना देखील +साडेबत्तेचाळीस पॉईंट.
अरे पुण्याचा विषय आणि 'दिवाळी पहाट', 'बि आर टी', 'बचत गटाचे कौतुक', 'चितळे' इ. चा साधा उल्लेख देखील नाही ?
लेख कुछ जम्या नही.
11 Dec 2012 - 5:23 pm | ह भ प
सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सव लाईव्ह दाखवला टीव्हीवर तर काय मज्जा येइल..
11 Dec 2012 - 6:00 pm | तिमा
आणि, त्याच्या बाहेर जे खाण्याचे स्टॉल लावलेले असतात, त्यातून होम डिलिव्हरी मिळाली तर आणखीनच ब्येस्ट!
11 Dec 2012 - 7:57 pm | दादा कोंडके
असहमत!
अशाने पुणेकर नाराज होतील. सवाई गंधर्वला येणारे ९९% पुणेकर 'आम्ही सवाई गंधर्वला येतो!' हे दाखवायला उपस्थिती लावतात आणि बहुतांश वेळ गेटपाशी कोण कोण आलं आहे हे बघण्यात घालवतात. दुसर्या दिवशी सकाळ मध्ये आलेली माहिती वाचून काढतात कारण कुणी आणि काय गायलं म्हणून विचारलं तर फजिती नको व्हायला.
*सदर मत हे पुणेद्वेशी मुंबईकर मित्राचं आहे.
11 Dec 2012 - 11:51 pm | रामपुरी
"९९% पुणेकर 'आम्ही सवाई गंधर्वला येतो!' हे दाखवायला उपस्थिती लावतात"
हे मात्र तंतोतंत खरे आहे. ज्यावेळी हा कार्यक्रम रात्री होत असे तेंव्हा तर भलतीच मजा असायची. अंथरूण पांघरूण घेऊन लोक (पक्षी: पुणेकर) घरात पडायचे ते तिथे मैदानात झोपायला यायचे आणि १० वाजले की घोरासुराचे आख्यान सुरू करायचे... वर सकाळी उठून "रात्री रोणू काय जमला नाही बुवा" म्हणायला मोकळे. लेका, काय जमलं आणि काय नाही ते ऐकायला जागा तरी होतास काय? आणि असतास तरी त्यातलं काही कळ्लं असतं काय?
11 Dec 2012 - 7:58 pm | रुस्तम
स्माइली कसे टन्कायचे.....प्लीज सान्गा...
11 Dec 2012 - 8:19 pm | जेनी...
:) :( :-/ :D :P =)) असे
11 Dec 2012 - 8:25 pm | गणपा
नको हो.. काही मंडळींनी स्मायल्या टाकून ईतका उच्छाद मांडलाय की आता अजीर्ण झालय. इनोही संपलय. ;)
तेव्हा स्मायल्या रहीत प्रतिसाद चालतील आम्हाला. :)
: ) = स्मीत हास्य स्मायली.
; ) = डोळा मारणारी स्मायली.
= )) लोळणारी स्मायली.
: D = दात काढणारी स्मायली
: ( = रडकी स्मायली.
आम्ही शक्यतो येवढ्याच वापरतो.
(वर दिलेल्या स्मायल्यां मधली रिकामी जागा (स्पेस) काढून टाका )
11 Dec 2012 - 11:00 pm | सोत्रि
होना!
प्रतिसाद नको पण स्मायल्या आवर... ;)
- (गणपाशी बाडीस असलेला) सोकाजी
12 Dec 2012 - 8:04 am | सूड
गणपा आणि सोत्रिंशी बाडीस.
12 Dec 2012 - 10:08 am | इरसाल
गणपा, सोत्री, सुडशी हज्जारदा सहमत.
उठावणीला आणलय ह्या लोकांनी बर इतके वेळा किती लोकांच बोलुन झालय पण काडीमात्र फरक नाही (मराठीत याला काहीतरी विशिष्ट शब्द आहे म्हणे )
12 Dec 2012 - 10:20 am | विश्वनाथ मेहेंदळे
मी असे प्रतिसाद वाचतच नाही. माउसवर छान स्क्रोल बटण आहे. (आणि चांगल्या प्रतीचा माउस घेतल्याने ते एखाददोन धागे वाचून मोडलेले नाही). ते वापरून पुढे जातो.
12 Dec 2012 - 10:25 am | जेनी...
अगदि सहमत .
12 Dec 2012 - 1:10 pm | गणपा
हो माउसचं स्र्कोल बटणं वापरणं हा उपाय आहेच.
पण आम्हा थर्डवल्ड मध्ये रहाणार्या लोकांकडे नेट स्पीड भारत/युरोप/उसगाव आदी पुढरलेल्या देशांपेक्षा भलताच कमी असतो.
त्यात हे असले नाका पेक्षा मोती जड असलेले स्मायल्यांनी बरबटलेले प्रतिसाद असले की धागा लोड व्हायला वेळ लागतो. वरुन आमचे बाईट्स फुकट जातात ते वायलं. परवडत नाय हो.
:) :( =)) :P :D या व अश्या लहान-सहान स्मायलींना आमची ना नाही.
12 Dec 2012 - 1:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे
थांबा, एखादे क्रोम किंवा अग्नीकोल्हा प्लग-इन लिहिता येते का ते बघतो. असे प्रतिसाद फिल्टर करणारे ;-)
12 Dec 2012 - 1:54 pm | सूड
आम्हा थर्डवल्ड मध्ये रहाणार्या लोकांचे बाईट्स वाचवण्यासाठी तरी या लोकांनी नमतं घ्यावं अशी माफक इच्छा आहे. ;)
12 Dec 2012 - 4:01 pm | अभ्या..
वा रे वा गंपादादा
तुझ्या पाकृ च्या इमेज बघता बघता आमचे बाईटस आणि लाळ वाया जाते ते काय नाही का? ;)
तुझ्या एका पाकृ प्रेसेंटेशन च्या साईजमध्ये कितीतरी लाख स्मायल्या बसतील की.
(उगी आम्ही तुझ्यासाठी परवडण्याचा न परवडण्याचा हिसाब ठेवत नाही म्हणून ;) )
12 Dec 2012 - 4:14 pm | गणपा
हॅ हॅ हॅ.... ती काळजी घेत सध्या भटारखाना बंद केला आहे. :)
वरी णॉट.
12 Dec 2012 - 4:33 pm | अभ्या..
अन्याव करु नकोस बाबा.
ते प्राण्यांच्या फोटोपेक्षा तुझ्या वरिजिनल पाकृ तरी बघु दे.
मग जाउ दे बाईट्स कितीपण. :) यू टू वरी णॉट. ;)
11 Dec 2012 - 11:51 pm | रमेश आठवले
बऱ्याच वर्षापूर्वी पुण्याच्या इंग्लिशमध्ये वापरात असलेल्या poona या नावाचा पुणे या सध्याच्या सरकारमान्य नावात बदल करण्यात आला. हा बदल बहुधा जून महिन्यात झाला असावा. कारण टाईम्स ऑफ इंडीआ मध्ये या नावावर कोटी करणारा pune in june या शीर्षकाचा अग्रलेख वाचल्याचे स्मरणात आहे.
12 Dec 2012 - 1:36 am | श्रीरंग_जोशी
आपल्या राज्याच्या सर्वच मोठ्या शहरांत राज्याच्या इतर भागांतून लोक पोटापाण्यासाठी स्थलांतरित होतात. यासाठी बहुतांश लोकांची पहिली (कधी कधी पहिली अन शेवटची दोन्हीही) पसंती पुण्यालाच असते.
कारण पुणे जसे सहजपणे नव्या स्थलांतरीतांना सामावून घेतं, पोटापाण्याची सोय झाल्यावर ज्ञानाची, कलेची भूक शमवण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतं. पोटापाण्यासाठी नाईलाजाने स्वतःचं गाव सोडून येणाऱ्यांना आणखी काय हवं असतं?
हे शहर महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक संस्कृतीचं प्रतिनिधित्व सशक्तपणे करतं यात शंकाच नाही. पण या योगदानाचे पाहिजे तसे कौतुक होते नाही.
एखाद्या लोभसवाण्या गोष्टीला दृष्ट लागू नये म्हणून काही खटकणारेही असावेच लागते. त्यामुळे 'हुकुमावरून', 'कायमचा इलाज केला जाईल' 'अपमान करण्यात येईल' या प्रकारच्या सरंजामी (+/-) प्रवृत्तींचाही समावेश असतो. पण एवढ्या चांगल्या गोष्टीस दृष्ट लागू नये म्हणून जर कुणी स्वतः वाईटपणा घेत असेल तर त्यांच्या या त्यागासाठी त्यांचे आभार मानायलाच हवे.
धागाकर्त्याची निरीक्षणशक्ती जोरदार दिसत आहे. इतर महाराष्ट्राविषयीपण लिहा...
13 May 2015 - 2:48 pm | काळा पहाड
बाकी महाराष्ट्रात आता उरलंयच काय? पुणे, मुंबई आणि फार फार तर नाशिक/औरंगाबाद/नागपूर्/कोल्हापूर (इथले लोक सुद्धा पुण्याकडेच यायला उत्सुक असतात). आघाडी सरकारनं ही शहरं सोडली तर बाकी सगळा महाराष्ट्र उजाड, भकास, रखरखीत आणि भटक्या टोळ्यांचा प्रदेश करून ठेवला आहे. जलसंधारणात इतके प्रचंड पैसे खाल्लेत की शेतीवर जगणं सामान्य शेतकर्याला शक्यच नाही. आणि आता त्यात सुधारणा करण्यासाठी सरकारकडं पैसे सुद्धा शिल्लक नसतील. सगळं प्रदूषित करून ठेवलंय. वीज, पाणी आणि रस्त्यासारख्या सामान्य सुविधांपासून ग्रामीण महाराष्ट्र आजही वंचित आहे आणि कदाचित आता कायमच वंचित राहील. गावं म्हणजे टग्या लोकांच्या राहण्याची आणि जनतेला त्रास देण्याची जहागिरीची स्थानं बनलियेत. काँग्रेस तशीही गावपातळीवर संपली होती. आता युवराजांच्या दिव्य नेतृत्वामुळं काय स्थिती असेल कुणास ठावूक. राष्ट्रवादीनं ज्या प्रकारे महाराष्ट्राची हानी केलिये त्याला तोड नाही. जनतेला असं कदाचित फक्त मोगलांनीच लुटलं असेल. नवीन सरकार कडे ना अनुभव आहे, ना नोकरशाहीवर जरब बसवण्याची क्षमता आहे. सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेनं पाय ओढणे एवढा एकचकलमी कार्यक्रम राबवलेला आहे. गाव पातळीवर राष्ट्रवादीचे गुंड आणि शिवसेनेचे वळू यांच्यात फारसा फरक नसावा. जनतेचं असं शोषण तर इंग्रजांनीही केलं नसेल.
12 Dec 2012 - 7:04 am | आनन्दिता
१००% सहमत
12 Dec 2012 - 2:50 pm | सस्नेह
बदली निमित्त पुण्याला दोन वर्षे राहिले (हो, हो, खरंच) होते तेव्हाची गोष्ट.
रोज हापिसात डब्याला दहा पाच सहकारी (बहुतांश भटें ) असत. भाजीचे समान वाटप होई. मग पंगत सुरु होई.
एक दिवशी भाजी आणायचं राहिलं म्हणून अंडा बुर्जी डब्यात नेली होती. लंचटाईमला सगळे गोळा झाले. मी काही डबा वर काढला नाही. तशीच बसून राहिले.
सगळे म्हणाले 'मॅडम आज उपास का ?'
मी म्हटलं ‘उपास नाही, तुमचं झाल्यावर डबा खाणार आहे.’
‘का हो ?’
‘आज पांढरी वांगी आहेत....’
‘मग आधी डबा द्या इकडे अन आमचा घ्या हा तुम्हाला.’
अन माझा डबा सगळ्या भटांनी फस्त केला.
शेवटी म्हणाले, ‘लक्षात ठेवा, आम्हाला माणूस सोडून सगळं चालतं !’
अलीकडे पुण्यात जाणे फारसे होत नाही. पण ऐकायला मिळते की आता तर पुणेकर काहीच सोडत नाहीत....
12 Dec 2012 - 3:00 pm | दादा कोंडके
पांढरी वांगी... हा हा. पहिल्यांदाच ऐकला हा शब्द. :)
मटणाला या परिभाषेत काय म्हणतात हो?
13 Dec 2012 - 10:48 am | ह भ प
नाण्वेज सोयाबीन म्हणा हवंतर..
14 Dec 2012 - 7:29 pm | तिमा
मटणाला या परिभाषेत काय म्हणतात हो?
' हाडकं पनीर'