आताच्या माझ्या आजारपणात १ उपाय बाकी नामी सापडला किंवा जुना उपाय नामी आहे हे सिद्ध झाले म्हणूयात. तो असा कि अंगात ज्वर असेल तर आणि paracetamol /antibiotic ने पण फरक पडत नसेल तर कांद्याचा रस हातापायाला/अंगाला चोळावा. यात ताप वेगवेगळ्या पद्धतीने उतरू शकतो. ५ दिवसांपूर्वी माझे अंग रस चोळल्या वर १० मिनटात थंड पडले आणि रात्री तर थंडी वाजली. काल मात्र पाय अजून गरम झाले आणि नंतर थंड.(अंतिम परिणाम-ताप उतरला).५ दिवसात फक्त दोनदा हा उपाय केला. रोज नाही. बरेचदा अंगात आपल्याला चांगलाच ताप वाटतो पण thermometer मध्ये तो दिसत नाही , अश्या वेळेस हा खंग्री उपाय आहे. ५ वर्षाखालील मुलांवर मात्र विचार करून हा प्रयोग करावा. कांद्याचा रस लावायचा असल्यास अल्प प्रमाणात प्रथम लावावा कारण sensitive skin absorbs the juice faster and could give immediate results. So अंग लगेच थंड होऊ शकते.
या निमित्ताने कोणाला ताप/इतर उष्णतेचे विकार यावर घरगुती उपचार माहित असतील तर इथे येऊ द्यात.धन्यवाद!!
-- (वैद्य) सचिनबुवा कुलकर्णी. ;)
प्रतिक्रिया
11 May 2013 - 1:54 pm | प्रचेतस
घरगुती उपाय करावेच पण पण १/२ दिवसांतही काहीही फरक न पडल्यास अशा आजारात डॉक्टरांचा सल्लाही आवर्जून घ्यावा.
11 May 2013 - 5:04 pm | सचिन कुलकर्णी
वल्ली शेठ, धन्यवाद . ५ दिवसांपूर्वी ऑफिसातून आल्यानंतर अचानक ताप भरला. परासितोमोल ६ ५ ० घेऊनही देर रात तक कुछ फरक नही . तापाने अंगाची लाही लाही होत होती . तेव्हा बाबांच्या (म्हणजे वडील - कोणी 'तसला बाबा नाही ) ;) सांगण्यावरून हा प्रयोग केला गेला . (In fact त्यांनीच कांदे किसून रस अंगाला लावून दिला). वर म्हन्त्ल्याप्रमाणे तुरंत नतीजा . दुसर्या दिवशी मी लगेच डॉक्टर कडे गेलोच . ४/५ दिवस त्यांचे पालनपोषण करून (डॉक्टर मंडळीनी हलके घ्यावे) थोडे बरे वाटले परंतु काल परत internal fever वाटत होता पण तापमापकात उतरत नव्हता. म्हणून डॉक्टर मानायला तयार नव्हते . (आता माझा काय आभासी ज्वर होता कि ज्वानीचा ज्वर ; पण नाही ). शेवटी परत आपला देशी उपाय केला जो कामाला कामाला आला. आता लाकूड स्पर्ष (touchwood हो) सारे ज्वर उतरले आहेत.
11 May 2013 - 1:56 pm | स्पा
मिपावर एक आरोग्य आणि परामर्श असा वेगळा विभाग काढल्यास उत्तम होईल .
सगळी माहिती एका विभागात टाकता यील.
- आरोग्यप्रेमी इस्पा
11 May 2013 - 2:13 pm | चेतन माने
+१ एकदम सहमत
11 May 2013 - 5:05 pm | सचिन कुलकर्णी
धन्यवाद स्पा साहेब. आणि आपल्या सूचनेला पूर्ण अनुमोदन.
11 May 2013 - 2:15 pm | स्पा
वल्ली काकांचा प्रतिसाद उडला वाटत
11 May 2013 - 2:18 pm | प्रचेतस
बघा की राव. आहे की वर.
11 May 2013 - 2:30 pm | निवेदिता-ताई
छान माहिती दिलीत
11 May 2013 - 2:56 pm | अविनाशकुलकर्णी
कांदे चिनी चालतिल का?
11 May 2013 - 5:07 pm | सचिन कुलकर्णी
पाकिस्तानी पण चालतील..
11 May 2013 - 3:11 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
11 May 2013 - 5:32 pm | राही
उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर उन्हात खेळल्याने उष्माघात किंवा ताप होऊ नये म्हणून कांदे किसून डोक्यावर थापण्याची पद्धत होती. गायीच्रे तूपही टाळूवर थोडेसे ओतून त्यावर गोड्या एरंडाचे पान ठेवीत असत.
11 May 2013 - 5:33 pm | राही
पांढरे कांदे.
11 May 2013 - 8:17 pm | सचिन कुलकर्णी
धन्यवाद निवेदिता-ताई,मुक्त विहारि आणि राही.
राहीजी माझ्या बाबांनी पण एरंडाच्या पानाची उपयुक्तता सांगितली होती आणि पु.लं.च्या वाड्मयात पण याचा उल्लेख आढळतो.(आठवा - नंदा प्रधानच्या मैत्रिणीचा खडूस बाप.
11 May 2013 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतातील अनेक तज्ञजगभर विविध देशात अशा कंदमुळावर अभ्यास करत आहेत म्हणे त्याना या माहितीचा उपयोग होईल असे वाटते.
बाकी, कुलकर्णी साहेब असा प्रयोग करुन पाहीन पण मला खुप दिवस नै वर्ष झाले ताप आला नाही हो... :(
-दिलीप बिरुटे
12 May 2013 - 12:16 am | सचिन कुलकर्णी
पण तुम्ही दुसर्यांना ताप देत त्याचे काय बिरुटे साहेब. ;) (कृपया हलके घेणे).
Joke apart but you are so lucky then and be lucky.
आणि धन्यवाद <<भारतातील अनेक तज्ञजगभर विविध देशात अशा कंदमुळावर अभ्यास करत आहेत म्हणे त्याना या माहितीचा उपयोग होईल असे वाटते.>>या साठी !!
12 May 2013 - 9:23 am | विसोबा खेचर
काल फेबुवर लगेच अपडेट मिळाला होता. इथे हा लेख आत्ताच पाहतो आहे. असो, टायमावर औषध घे आणि जरा आराम कर.
14 Jun 2013 - 9:09 am | सचिन कुलकर्णी
कृपया पावसाळ्यात येणाऱ्या टपावर हा उपाय करू नये. त्यासाठी १ नंबरी काढ्याची कृती देतोय.(आईसाहेबांकडून confirm करून).
14 Jun 2013 - 9:11 am | सचिन कुलकर्णी
कृपया टपावर हे तापावर असे वाचावे. धन्यवाद.
14 Jun 2013 - 10:38 am | प्रसाद१९७१
पावसाळ्यात येणारा ताप आणि दुसर्या ऋतुमहे येणारा ताप असा काही फरक नसतो. शरीराच्या कुठल्याही अवयवास infection झाले की शरीराचे तापमान वाढवुन infection कमी करण्याचा प्रयत्न होतो.
ताप आला म्हणजे शरीरात कुठेतरी bacterial किंवा viral infection आहे.
14 Jun 2013 - 5:51 pm | सचिन कुलकर्णी
विनोद.Actually
शरीरातील प्रतिकार शक्ती त्या इन्फेक्शनच्या जीवाणू/विषानुशी लढते,अश्या वेळेस यातील काही पेशी (चांगल्या पेशी) मृत पावतात. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. तापमान वाढवून infection कमी करायचा प्रयत्न नाही होत.
14 Jun 2013 - 10:23 am | वेल्लाभट
इंटरेस्टिंग आहे ! लक्षात ठेवायला हवं.
14 Jun 2013 - 10:35 am | प्रसाद१९७१
ह्यात काही विषेश नाही. कुठल्याही रसानी किंवा Liquid नी असेच होइल.
ताप आल्यावर कपाळावर आणि तळपायावर पाण्याच्या घड्या घालायला म्हणुनच सांगतात. कांदे वाया घालवण्या पेक्षा साध्या पाण्याच्या घड्या ठेवा किंवा अंग गार पाण्यानी पुसुन काढा.
Antibiotic ने ताप उतरत नसेल म्हणजे तो viral असणार. तो त्याच्या त्याच्या वेळे प्रमाणे आणि शरिरानी प्रतिकार केल्या मुळे कमी झाला.
Paracetemol नी ताप उतरत नसेल तर दुसरी ताप उतवरणारी ऑषधे आहेत ती घ्यावीत.
14 Jun 2013 - 5:55 pm | सचिन कुलकर्णी
कपाळावर पाण्याच्या घड्या ठेऊन माझा कधीही ताप कमी झालेला नाही (लहानपणा पासूनचा अनुभव). आणि हुडहुडी सकट ताप असेल तर कांदा,गार पाण्याने अंग पुसणे हे दोन्ही उलटू शकतात.
14 Jun 2013 - 10:41 am | चित्रगुप्त
तापावर हा इलाज प्रथमच कळला, त्याबद्दल धन्यवाद.
मिपावर 'आरोग्य' विभाग सुरु कर णे सर्वांना खूप लाभदायी होइल.
मुळात 'ताप' म्हणजे काय, त्याची कारणे, वगैरे माहिती आयुर्वेद, आलोपाथी इ. च्या जाणकारांनी इथे द्यावी ही विनंती. कारण याविषयी वेगवेगळ्या (आणि परस्पर विरुद्ध) समजुती प्रचलित आहेत, त्यामुळे नक्की काय, हे कळत नाही.
विविध प्रकारे पोट बिघडणे, हे तापाचे प्रमुख कारण असते का? आणि ताप हा एक रोग आहे की अन्य काही रोगाचे लक्षण? की ताप हा एक नैसर्गिक इलाजच आहे? असेही ऐकले आहे की शरिरात साचलेली हानिकारक द्रव्ये नष्ट करण्याची नैसर्गिक क्रिया म्हणजे ताप, त्यामुळे ताप जबरदस्ती उतरवू नये, वगैरे.
काही औषधांनी ताप उतरवणे बरे की आपोआप उतरु देणे बरे? वगैरेवर प्रकाश टाकावा.
आमच्या वडिलांचे औषधाचे दुकान असून ते स्वतः कधीही औषध घेत नसत, तीच सवय मला आहे. तीन-चार दिवस सहन केल्यास कोणतेही दुखणे आपोआप बरे होते, असाच आजवरचा अनुभव आहे...मागे चिकनगुनिया झालेला असतानाही अजिबात औषध घेतले नाही, आणि यथावकाश त्यातून सुटका झाली, परंतु त्यावेळी अनेकांना हा रोग झाला होता, त्यापैकी ज्यांनी औषधे घेतली, त्याचा आजार उलट दीर्घकाळ लांबला, असे अनुभवास आले.
14 Jun 2013 - 11:01 am | प्रसाद१९७१
जेंव्हा Bacterial किंवा Viral infection होते, तेंव्हा शरिर आपले तापमान वाढवुन Bacteria/ virus मारण्याचा प्रयत्न करते. हे जीव असे असतात की ते फार थोड्या तापमान मर्यादेत जगु शकतात. त्यामुळे शरिराचे तापमान वाढले की ते मरतात. ह्याला ताप येणे असे म्हणतात.
प्रमाणात ताप आला तर त्यात काही वाईट नाही. फक्त ताप जर फार जास्त वाढला तर मॅदुवर परिणाम होऊ शकतो म्हणुन लक्ष देणे गरजेचे असते.
कांद्याचा रस लावुन शरिरातले bacteria/virus मरत नाहीत. जर शरिर स्वता bacteria ला मारु शकत नसेल तर Anti biotic घेणे गरजे चे आहे. Virus मारण्याचे काम शरिरावर च सोडावे लागते.
चिकन्गुनिया, swine flue ह्यांना ऑषधे नाहीतच. आपोआपच बरे होतात. त्या काळात आपण शरिराला उर्जा आणि पाणी पुरवणे गरजेचे असते.
14 Jun 2013 - 5:59 pm | सचिन कुलकर्णी
अश्या प्रकारे चिकन गुनिया , स्वैन फ्लू आपोआप बरा व्हायला प्रतिकार शक्ती अति उत्तम दर्जाची असायला हवी. अन्यथा या रोगांना भारतात इतके बळी (fatal ) पडले नसते.