वेगळी धुंदी इथे अन्
वेगळा हा बाज आहे.
वेगळे हे विश्व आणी
वेगळा हा साज आहे.
शांत सारे हे स्वयंभू
शांत इथला नाद आहे.
शांतिचे संगीत म्हणूनी
कोकिळाही शांत आहे.
बंद होती येथ वाटा
बंदिचे संगीत आहे.
आज बंदी पाहिली मी
मुक्त येथे गात आहे.
बंदिचेही शब्द ऐसे
मानसीचा साज आहे.
सुप्तता अन् शांततेचा
मूळचा आवाज आहे.
बोलण्यासी आतुरे तो
खोल आतलाच आहे.
आज या ही..कारणाने
मुक्त तो ही होत आहे.
शांती आणी मोक्ष सारा
येथ तो मिळणार आहे.
सत्य शामल नम्रतेने
मी इथे झुकणार आहे.
आज काहि मागणे ना
मुक्तिही मोक्षात आहे.
मुक्तिच्या विहरात येथे
समाधिही स्तब्ध आहे...
प्रतिक्रिया
29 May 2013 - 6:38 am | स्पंदना
मी जागी आहे ना? की स्वप्न आहे हे?
आत्मुस? किती सुरेख लिहुन गेलात भाउ? (भुताला भाऊ म्हंटल तर चालेल का हा प्रश्न आहेच मनी, पण राहु द्या.)
कविता शेवटी शेवटी मनाच्या गाभार्यात घुमु लागते. सुरेख!!
29 May 2013 - 7:27 am | किसन शिंदे
त्यांच्याकडे आहे हो असं उत्तमोत्तम लिहायची ताकद, पण त्या अगोबा ढगोबाच्या नादानं विडंबनं करण्यात वेळ वाया घालवतात.;)
29 May 2013 - 7:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> त्यांच्याकडे आहे हो असं उत्तमोत्तम लिहायची ताकद, पण
'पण' शी सहमत.
-दिलीप बिरुटे
29 May 2013 - 7:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता. असं उत्तमोत्तम येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
29 May 2013 - 8:35 am | प्रचेतस
उत्कृष्ट कविता.
तुमची समाधिस्थ अवस्था बेडश्याच्या चैत्यगृहात पाहिलेलीच होती.
कितीतरी दिवस त्यावर काहीतरी लेखन येईल याची वाट पाहातच होतो.
29 May 2013 - 9:08 am | सुधीर
कविता आवडली.
29 May 2013 - 9:10 am | मूकवाचक
+१
29 May 2013 - 9:15 am | चित्रगुप्त
अप्रतिम. अगदी वेगळ्या बाजाची कविता.
29 May 2013 - 10:27 am | प्रभाकर पेठकर
कविता सुंदरच आहे.
पण, त्याहून गूढ, शांत, सुंदर चित्र कवितेच्या प्रारंभीच टाकलं असतं तर मनाची एक विशिष्ट तयारी होऊन कविता जास्त चांगल्याप्रकारे समजली असती.
29 May 2013 - 10:33 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त मस्त मस्त.
29 May 2013 - 1:08 pm | प्यारे१
अप्रतिम कविता.
शत शत वंदन गुरुजी.
अवांतरः परवाच्या बुद्ध पौर्णिमेला अधिक औचित्यपूर्ण झाली असती का असं वाटतंय.
अतिअवांतरः स्मायल्या सोडून आत्मुस किती छान लिहू शकतो नाही? (इथे डोळा मारल्याची स्मायली कल्पावी) ;)
29 May 2013 - 1:54 pm | अत्रुप्त आत्मा
@तरः परवाच्या बुद्ध पौर्णिमेला अधिक औचित्यपूर्ण झाली असती का असं वाटतंय.>>> आमचा बुद्ध पौर्णिमेत अडकलेला नाही!!! ...असो. :-)
29 May 2013 - 3:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
वरची कविता खूप आवडलीच...
आमचा बुद्ध पौर्णिमेत अडकलेला नाही!!!
आणि ही एकोळी तर क्या कहने !!!
29 May 2013 - 4:38 pm | प्यारे१
>>>आमचा बुद्ध पौर्णिमेत अडकलेला नाही!!! ...असो.
'माझा ' मोड : माझा प्रतिसाद मन लावून वाचत जा. लगेच्च प्रतिसाद द्यायची घाई करत जाऊ नका.
मी तुम्हाला काय म्हणतोय हे समजत नाहीये का? ;) : माझा मोड संपला.
तुम्ही म्हणताय ते मान्यच आहे. महापुरुषां च्या विचारांच्या स्मरणासाठी एका स्पेशल दिवसाची गरज नि मर्यादा देखील असू नये.
पण अगदी परवाच बुद्ध पौर्णिमा झाली, मिपाच्या मुखपृष्ठावर तथागत गौतमाचं चित्र देखील लावलेलं होतं त्या अनुषंगानं ही कविता त्या दिवशी 'अधिक' औचित्यपूर्ण दिसली असती नि अधिक खुलून दिसली असती.
29 May 2013 - 5:02 pm | अत्रुप्त आत्मा
@त्या अनुषंगानं ही कविता त्या दिवशी 'अधिक' औचित्यपूर्ण दिसली असती नि अधिक खुलून दिसली असती.>>> अस्सं होय! पण आमची कविता झाली काल! आमचंही वाक्य ''या'' अनुषंगानी आहे,तसं त्ये वाचा! ;)
29 May 2013 - 1:11 pm | पक पक पक
______/\_________ मस्त.. :)
29 May 2013 - 3:00 pm | दिपक.कुवेत
शांत सारे हे स्वयंभू
शांत इथला नाद आहे.
शांतिचे संगीत म्हणूनी
कोकिळाही शांत आहे.
आज काहि मागणे ना
मुक्तिही मोक्षात आहे.
मुक्तिच्या विहरात येथे
समाधिही स्तब्ध आहे... हि दोन कडवी तर खुपच आवडली
29 May 2013 - 3:44 pm | कोमल
अगदी असेच.
छानच कविता गुर्जी.. :)
29 May 2013 - 5:25 pm | अनिरुद्ध प
येथे आपल्याला विहारात असे म्हणायचे होते का?
29 May 2013 - 6:17 pm | तर्री
आत्मा : तुझ्या प्रतिभेचा दीर्घ पल्ला दाखवणारी दर्जेदार कविता ....
29 May 2013 - 9:08 pm | लीलाधर
छान चाण छाण
29 May 2013 - 10:22 pm | अर्धवटराव
बुवा... आचमनं जास्त झालीत का ?
चैत्यगृहाने तुमच्या अंतरी कविता करवली... तरिही तुम्ही अजुन अत्रुप्त आत्मेच आहात. काय अफाट काव्य आहे हे.
अर्धवटराव
29 May 2013 - 10:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आत्मुस, क लिवलय, क लिवलय, व्वाह...
30 May 2013 - 12:57 pm | सस्नेह
काव्य शांतवून गेले...
30 May 2013 - 1:27 pm | चाणक्य
अगदी 'भोळा सांब' च्या तोडीची..... खूप आवडली
30 May 2013 - 2:25 pm | अत्रुप्त आत्मा
@अगदी 'भोळा सांब' च्या तोडीची.....>>> ह्या प्रतिसादा बद्दल विशेष धन्यवाद!!!
31 May 2013 - 8:04 am | यशोधरा
सुरेख कविता.
31 May 2013 - 11:15 am | आदूबाळ
अ.आ. - सुंदर कविता.
कधी कधी मिपावर ब्याकग्रौंड मूजिकची सोय हवी होती असं वाटतं. या कवितेला सुरात लावलेल्या तंबोर्याचं मूजिक मस्त शोभलं असतं...
1 Jun 2013 - 12:52 am | पाषाणभेद
अत्रुप्त आत्म्याने चक्क त्रुप्तीचा शोध घेतला.
2 Jun 2013 - 10:30 am | पैसा
सुंदर कविता
2 Jun 2013 - 12:18 pm | बॅटमॅन
म्हणेना कितीही स्वत:ला अत्रुप्त
इथे जाहला पूर्ण आत्माचि त्रुप्त
लिहोनी खरे धीरगंभीर साचे
मनी बोल जे आपुले आपणाचे ||
2 Jun 2013 - 2:41 pm | परिकथेतील राजकुमार
आशयघन एकद.
ही कवीता सहज गुणगुणण्याचा प्रयत्न केला असता अजून एक कवीता आठवून गेली. अर्थात 'शब्दांची गेयता' हा भाग सोडला तर दोघींना जोडणारा इतर कुठलाही धागा नाही. :-
http://www.maayboli.com/node/22918
ही काय टोळक्यांनी केली कमाल आहे
दिसतात कुट्ट काळे म्हणतात 'लाल' आहे
नाही म्हणीत तो तर बापास बाप त्याच्या
दाऊन सुर्य म्हणतो "माझी मशाल आहे!"
भात्याशिवाय पेटी, नादान अन तबलची
बेताल नाचण्याची मोठी धमाल आहे
बुध्दीस कोंभ आले, पुर्णत्वही मिळाले
भोंदू समिक्षकाचा, लंपट दलाल आहे!
आभाळ मोजणारी तुज वीत लाभली का?
शब्दाकडून त्याला इतका सवाल आहे!
-हबा
2 Jun 2013 - 2:47 pm | कंजूस
माझं सगळं झालं आहे काही द्यायचे नाही आणि काही मागायचे तर मुळीच नाही हीच भावना चैत्यगृहात आपल्या मनात येते ,या कवितेतूनही जाणवतेय हीच ती समाधी ॥पोहोचलास तू अतृप्त आत्म्या आज पलीकडे ॥बदलून टाक आजच तुझा आइडि ॥
2 Jun 2013 - 4:20 pm | चौकटराजा
शांत सारा चैत्य परिसर
कलत्या दुपारचा प्रहर आहे
वल्ली अआ च्या मस्करीवर
चौराचा पुरता कहर आहे
मंडळी असा होता तो अनुभव. पण अ आ नी त्यावर हे काव्य रचले. सुंदर !
2 Jun 2013 - 5:22 pm | प्रचेतस
नाही नाही काका.
गल्ली चुकलात.
वरील अनुभव आधीच्या बेडसे लेणीतील चैत्यगृहाच्या इथे आलेला आहे. भाजे चैत्यगृहात समाधीस्थ वाटणे अवघड आहे कारण चैत्यगृहाची दर्शनी रचना.
2 Jun 2013 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा
अगदा बरोबर ! भाजे मे वो बात नही ,के कविता हो जाए ! आणी फोटोही बेडसे लेण्यातलाच आहे,
@खरं तर बेडसे लेणी हेच काव्य आहे. आणी ही कविता हा त्या मूळरुपाचा प्रतिध्वनी !
28 Jan 2015 - 3:54 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर
अफाट लिहिलय बुवा =)