मध्य वयातील वादळ -पुढे

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
9 May 2013 - 1:46 pm

कर्करोग स्तनांचा
मध्य वयातील वादळ
मध्यवयातील वादळ- पुढे

-----------------

काही गोष्टीत आपल्या मित्रांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन आपण पुढे जात आहोत.
चीड चीड कोणी स्वतःहून करीत नाही तर चिडचिड हि होते. जेंव्हा एखादी परिस्थिती आपल्या हातात नसते आणि तो बदलण्याचे आपल्याला सामर्थ्य नसते तेंव्हा माणसाची/ बाईची चिडचिड होते
१ ) पुरुषांना पण असे(रजोनिवृत्ती सारखे) होते हे थोड्याप्रमाणात सत्य आहे पण पुरुषांची संप्रेरके साठीच काय सत्तरीपर्यंत कार्यरत असतात त्यामुळे त्या वयालाही पुरुषाला मूल होऊ शकते. पण स्त्रीच्या बाबतीत हि शक्यता एकदम संपत असते. या गोष्टीचाही पुष्कळ स्त्रियांवर खोलवर मानसिक परिणाम होत असतो. आता आपल्याला मुल होऊ शकणार नाही. हि निसर्गाने दिलेली आपल्यासारखा चालता बोलता जीव निर्माण करण्याची अफाट शक्ती आता संपली असे निराशावादी विचार मनात येतात.
२)ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. याच वयात स्त्रियांनाही चष्मा(चाळीशीचा) लागलेला असतो वजन वाढलेले असते,चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. पण यात अधिक म्हणून रजोनिवृत्ती येते. आणि ती अशी त्वरित आल्यामुळे त्यांचे भावविश्व सैरभैर होते.
अशीच परिस्थिती पुरुषाची त्या वयात होते जर त्याची नोकरी गेली धंद्यात खोट आली किंवा आर्थिक स्थिती नाजूक झाली तर. कारण जसे सुंदर दिसणे हा स्त्री स्वभावाचा भाग असतो तसे आपल्या पायावर आर्थिक डोलारा सांभाळणे हे पुरुषाच्या स्वभावाचा भाग असतो. या काळात जर आर्थिक स्थिती नाजूक झाली तर पुरुषाचे भावविश्व असेच कोलमडते. परंतु त्याला जगापुढे आपले असे स्वरूप दाखवता येत नाही त्यामुळे पुरुषांचा असा कोंडमारा होतो
असो
स्त्रियांमध्ये हे शारीरिक बदल होतात त्याबरोबर त्यांच्या लैंगिक आयुष्यात फार मोठे बदल होतात. त्यांच्या संप्रेरकांमुळे मेंदूतील कामजीवनाची केंद्रे कमी काम करू लागतात त्याचा परिणाम पाच बाबतीत होतो. १.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm
यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते. या कारणा मुळे स्त्रीया कामसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. याचवेळी नवर्याकडून मानसिक आधाराची गरज असल्यामुळे त्या जवळीक( intimacy) करण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्ष शरीरसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. या अशा द्विधा वागण्यामुळे पुरुष अतिशय गोंधळात पडतो. बायको जवळ आल्यामुळे तो उद्दीपित होतो पण संबंध नाकारल्यामुळे तो दुखावला जातो. पुढच्या वेळी अशी अवहेलना होऊ नये म्हणून तो बायकोशी भावनिक जवळीक टाळतो. त्यामुळे आधीच तणावपूर्ण वातावरणात भर पडते.
स्त्रियांनी जर आपल्या नवर्याला सुरुवातीलाच स्पष्ट सांगितले कि मला फक्त जवळीक हवी आहे संबंध नको तर पुरुषाची उद्दीपित होणे आणि नंतर थंड पडणे अशी कुचंबणा टळेल आणि निदान संबंधात तणाव वाढणार नाही. कोरडे पणामुळे योनीला जंतुसंसर्ग होतो आणि त्यामुळे खाज येणे जळजळ होणे पांढरे पाणी जाणे हे प्रकार सुद्धा वाढतात. याचा वेळेत इलाज करणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने स्नेहन(lubrication) साठी क्रीम वापरणे आणि जन्तुसंसार्गासाठी प्रतिजैविक घेणे हे त्यांच्या संबंधाना पुनर्प्रस्थापित करण्यासाठी फार महत्त्वाचे ठरते. शेवटी कामसुख हे एक असे सुख आहे कि ज्यासाठी दोन्ही साथीदारांचा सहभाग आवश्यक आहे. जसे पुरुषांनी दोन पायर्या उतरणे आवश्यक आहे तसेच स्त्रियांनी दोन पायर्या चढणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा दुरावलेले संबंध पुनर्प्रस्थापित करणे फार कठीण जाते. कारण हे सुख मिळवण्यासाठी बाहेर जाणे हे कोणाच्या हि हिताचे नाही.
मानसिक आजार -२० टक्के स्त्रियांना या काळात नैराश्य येते( मेंदूत होणारा केमिकल लोच्या) हे असे का होते आहे हे स्त्रियांना काळात नाही आणि ती नाटके करीत आहे असे पुरुषांना वाटत असते. दुर्दैवाने हे नैराश्य( depression) आहे कि लक्ष वेधून घेण्यासाठी( attention seeking) केले जाते ते सहज सांगणे कठीण जाते. यासाठी पुरुषांना फार धैर्याने आणि संयमाने वागणे आवश्यक असते. पण हाच काळ त्यांच्या कर्तृत्वाचा असल्याने त्यांना आपल्या बायकोला तेवढा वेळ देत येतोच असे नाही आणि ती स्त्री एकटी पडते.
४० -५० टक्के स्त्रियांना निद्रानाशाचा त्रास होतो. त्या बोलत असताना नवरा घोरू लागला हे हटकून दिसणारे चित्र आहे. मग यातून बायका नाही नाही ते अर्थ काढू लागतात. नवर्याचे माझ्याकडे लक्ष नाही मी आता तेवढी सुंदर नाही पासून त्याचे बाहेर बहुतेक लफडे असावे इथपर्यंत.
यावर उपाय काय?
१) आपली शरीर प्रणाली मंद होत आहे आणि पाळी अनियमित होत आहे हे जाणवल्यावर स्त्रियांनी स्त्री रोग तज्ञाकडून तपासणी करणे आवश्यक आहे हे रजोनिवृत्ती मुले आहे हे नक्की झाले म्हणजे पुढच्या उपाया कडे वळता येते.
२) पहिली गोष्ट म्हणजे आपली शरीर प्रणाली मंद होत आहे तर ती परत वेगवान करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे सर्वात चांगला व्यायाम म्हणजे चालणे. रोज ३५ ते ४० मिनिटे वेगाने ( गाडी पकडण्यासाठी चालतो त्या वेगाने) चालायला सुरुवात करा. रिक्षा/ दुचाकीचा वापर अत्यावश्यक असेल तरच करा. याने आपल्या स्नायुंना व्यायाम मिळून मेंदूत इंडोर्फिन नावाची संप्रेरके तयार होतात( रजोनिवृत्तीमुळे हि संप्रेरके कमी झाली असल्याने स्त्रीला उदास/ निरुत्साही वाटत असते ते नक्कीच कमी होते. शरीर थकल्यामुळे झोप चांगली लागते आणि सकाळी उठल्यावर जो निरुत्साह वाटतो तो कमी होतो.
३) आहार दहा टक्क्यांनी कमी करा यात तेलकट मसालेदार गोष्टी कमी करून फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे.(तोच वापरून दोन्ही बाजूनि गुळगुळीत झालेला सल्ला)ज्यांना वाताचा त्रास आहे अशा भगिनींनी (जवळ जवळ ६० टक्के ना हा त्रास होतो ) सकाळी उठल्यावर दात घासल्यावर अंशे पोटी एक लिटर कोमट पाणी प्यावे या पाण्यात एक लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घालावा याने आपले पोट साफ होईल रात्रभर शरीरात साठलेली दुषित द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडाला मदत होईल आणि स्वस्तात निपटेल (काहीच नाही तर अपाय नक्कीच होणार नाही)
४) एखादा छंद लावून घ्या --(परत तेच -छंद असा सहज लावून लागत नाही) म्हणून साधारण चाळीशीनंतर स्त्रियांनी आपल्याला काय आवडते आणि काय करायचे होते जे राहून गेले याची यादी करायला घ्या आणि त्यातील एक एक गोष्टी करण्याचा प्रयत्न करा यातील एखादी गोष्ट आपल्याला जमू शकेल. आता जी जमू शकली आहे ती गोष्ट रजोनिवृत्ती नंतर पूर्ण झोकून देऊन करत येईल.
५) इतर आजार -चक्कर येणे गरम वाटणे (hot flushes) यासठी तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे HRT (hormone replacement therapy) घेत येईल. हि घ्यावी किं घ्यावी याबद्दल जगभर मोठी चर्चा चालू आहे आणि मी वादात न पडता एकच सांगतो तुमच्या स्त्री रोग तज्ञाच्या सल्ल्याप्रमाणे करा. HRT ने रजोनिवृत्तीचे बरेचसे परिणाम काही काळा पुरते दूर करता येतात. एकदा तुम्ही त्या मानसिक स्थिती शी जुळवून घेतले कि हि औषधे बंद करता येतात.
६) नैराश्य यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मनोविकार तज्ञाकडे जाऊन उपाय करता येईल. पण हा आजार आहे हे घरच्यांनी/ नवर्याने जाणून घेणे आवश्यक आहे.
बाकी अदिती ताईनी दिलेल्या दुव्यांमध्ये शारीरिक आजाराची माहिती सुरेख तर्हेने दिलेली आहेच.
घरच्यांसाठी-आपल्या बायकोला/ आईला समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. कदाचित एवढ्यावरच काम भागेल. तिच्या अशा काळात तिला आपल्या मदतीची अतिशय जास्त गरज आहे. ऑफिसात बॉस ची बकबक गपचूप ऐकून घेताच मग थोडीशी बायकोची ऐकली तर काय बिघडले ? बरेच लोक हेच म्हणतील कि ऑफिसात डोके पिकवून आलो तर घरी तेच मग फरक काय?
स्त्रियांसाठी -- आपल्याला काय होते आहे याचे शांत डोक्याने परीक्षण करा कुठे चुकते आहे त्याचा विचार करा आणि संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा पहा काही फरक पडतो का?

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

14 May 2013 - 5:52 pm | आजानुकर्ण

निसर्गदत्त महाराज अहंकाराबाबत काही सल्ला देतात काय?

संजय क्षीरसागर's picture

14 May 2013 - 6:18 pm | संजय क्षीरसागर

ते म्हणतात अहंकार हा तुमचा भ्रम आहे.

बरोब्बर, आजानुकर्ण चा अहंकार हा संजयजींचा भ्रम आहे मात्र व्यत्यास सत्य होईलच असे नाही. ;)

आजानुकर्ण's picture

14 May 2013 - 6:59 pm | आजानुकर्ण

उपरनिर्दिष्ट प्रतिसादक प्रतिसाद देताना विभ्रम आणि भ्रम यामध्ये वारंवार गल्लत करताना दिसत आहेत ;)

राही's picture

14 May 2013 - 7:58 pm | राही

काही तरी गल्लत आहे. इन्फर्टाइल असणे आणि फ्रिजिड असणे हे दोन वेगवेगळे दोष अथवा विकार असावेत. फ्रिजिडिटी दूर झाली तरी इन्फर्टाइल अवस्था जैसे थे राहिली तर गर्भधारणा होऊ शकणार नाही. येथे इन्फर्टाइल चा अर्थ वंध्य असा घेतला आहे.

ऋषिकेश's picture

14 May 2013 - 5:31 pm | ऋषिकेश

छान.
उपाययोजना व्यवहार्य आहेत.

सुबोध खरे's picture

14 May 2013 - 7:07 pm | सुबोध खरे

याचा अर्थ असा आहे कि जर माणसाला संभोगाचे काम हे फक्त शुक्राणू दाना पुरते असते तर संभोगानंतर पुरुष आणी स्त्री आपापल्या वाटेने गेले असते ( जसे मांजर, वाघ कुत्रा इ जनावरात होते.)
तरुणपणात संभोगेच्छा हि पुरुष स्त्री च्या बरोबर राहण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. सहवासाने प्रेम निर्माण होते आणी त्यानंतर समागमाचे प्रमाण कमी झाले तरी स्त्री पुरुष एकत्र राहतात. वंध्यत्व यात काम करताना ज्यावेळी स्त्रीबिजाची वाढ पूर्ण होते(OVULATION) तेंव्हा त्या जोडप्याला संबंध ठेवण्यास सांगण्यात येते. कारण स्त्रीबीज फक्त चोवीस तास फलनशील असते या काळात संबंध आला नाही तर एक पूर्ण महिना फुकट जातो. ( वर्षात गर्भ धारणा होण्यासाठी फक्त १२ दिवस संधी असते. एकदाच भेटले आणी गरोदर राहिले हे सिनेमापुर्ते ठीक आहे).
यासाठी त्या जोडप्याला स्त्री बीज पक्व होण्याच्या अगोदरचे दिवस संबंध न ठेवण्यास सांगितले जाते आणी ते पक्व झाल्यादिवशी आणी दुसर्या दिवशी संबंध ठेवण्यास सांगितले जाते. असे तीन चार महिने केल्यावर त्या जोडप्याची सम्भोगातील मजा कमी होऊन ते एक काम म्हणून व्हायला लागते यासाठी त्यांना समुपदेशन करून त्यांच्यातील आकर्षण कायम ठेवायला सांगायला लागते. कारण जर संभोगाचा मूळ हेतू हा गर्भधारणा असेल तर ती स्त्री गरोदर झाल्यावर संबंध ठेवण्याचे कारण उरणार नाही आणी मग त्या युगुलातील परस्पर संबंधावर परिणाम होतो यास्तव हे सर्व समुपदेशन करावे लागते.
आता राहिला दुसरा प्रश्न-- मार्जार कुळातील काही प्राण्यात म्हणजे मांजर, चित्ता आणी बिबळ्या या प्राण्यात स्त्री बीज पक्व होण्याची क्रिया हि संभोगाच्या वेळेस होते त्यामुळे या प्राण्यांच्या माद्या संबंधासाठी तयार नसतात. त्यांच्यात नर त्यंच्यावर संबंधासाठी जबरदस्तीच करतात आणी या संबंधाच्या वेळी होणार्या वेदनेमुळे स्त्री बीज पक्व होते आणी गर्भधारणा होते. याकारणास्तव या प्राण्यांचे प्रणयाराधन अतिशय वादळी आणी नादमय(!) असते बोके दिवसेंदिवस मांजरीच्या मागे घोगरा आवाज काढीत फिरत असतात आणी मांजर त्याला दाद देत नाही. यातून त्यांचे भांडण चालू असते. संधी मिळेल तेंव्हा बोके जबरदस्तीने संभोग करतात आणी त्यातून गर्भधारणा होते. यानंतर बोका आणी मांजरी परत भेटत नाहीत. त्यामुळे काही प्राण्यात सम्भोगामुळे संप्रेरकाचे प्रमाण एकदम उच्चीला जाऊन गर्भधारणा होते. मानवात सम्भोगामुळे संप्रेरके वाढतात काय हे मला नक्की माहित नाही.
तिसरा मुद्दा हा आहे कि स्त्री बीज पक्व होण्यासाठी दोन तर्हा वापरल्या जातात. एक म्हणजे बाहेरून संप्रेरकाचे इंजेक्शन देऊन ते प्रमाण वाढवत नेले जाते जेणेकरून अशा पातळीवर आणले जाते कि बीजांड कोषात स्त्री बीज पक्व होईल.(RECEPTOR UPREGULATION ) याउलट जेंव्हा जास्तीत जास्त प्रमाणात संप्रेरके देऊनही जर स्त्री बीज पक्व होत नसेल तर सर्व औषधे बंद केली जातात आणी तीन महिने काहीच दिले जात नाही (RECEPTOR DOWNREGULATION) यामुळे शरीरातील संप्रेरके अगदी कमी होतात आणी शरीर अगदी कमी संप्रेरकांना प्रतिसाद देऊ लागतात. दोन्ही तर्हेने काम होते हे सिद्ध झाले आहे.
एक महिन्यापूर्वी (एप्रिल मध्ये) माझ्याकडे एक पस्तिशीच्या स्त्री रुग्ण आल्या होत्या त्यांना चार महीने पाळी आली नव्हती. त्यांनी IVF (टेस्ट ट्यूब बेबी) चे तीन प्रयत्न केले त्यात गर्भधारणा झाली पण दुर्दैवाने गर्भपात झाला होता. यामुळे अतिशय निराश होऊन त्यांनी मुलाची आशा सोडून दिली होती आणि वंध्यत्वावरील उपचार पण सोडून दिले होते. त्यांच्या यजमानांचे वय ४४ असल्याने त्यांना दत्तक देण्यास नकार मिळाला होता( याचे कारण आणि कायदा काय आहे हे माहित नाही).
त्या चक्कर येते म्हणून माझ्याकडे सोनोग्राफी साठी आल्या होत्या आणी काय आश्चर्य त्या चार महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना मुलाचे हात पाय हृदय इ सर्व दाखवले तेंव्हा त्यांचा विश्वास बसला. त्यांना आणी त्यांच्या यजमानांना अश्रू आवरत नव्हते. ते परत परत मला धन्यवाद देत होते( ?).मी त्यांना हेच सांगत होतो कि निसर्ग म्हणा किंवा देव म्हणा जे करू शकते ते कितीही निष्णात डॉक्टर करू शकत नाही. मला धन्यवाद देण्याचे काहीच कारण नाही.
अशी बरीच उदाहरणे( का चमत्कार) मी स्वतः माझ्या व्यवसायात पाहिली आहेत.
यामुळे मी स्वतः साधारणपणे कोणाच्या श्रद्धेवर( अंधश्रद्धेवर) टीका करीत नाही.

आजानुकर्ण's picture

14 May 2013 - 7:35 pm | आजानुकर्ण

शास्त्रीय माहिती देणारा प्रतिसाद आवडला.

संजय क्षीरसागर's picture

14 May 2013 - 7:57 pm | संजय क्षीरसागर

त्यानंतर समागमाचे प्रमाण कमी झाले तरी स्त्री पुरुष एकत्र राहतात.

सुबोधजी या पेक्षाही प्रेमाला वेगळा अर्थ आहे. एकमेकांचा सहवास, एकमेकांना हात देत जगणं, मुलं, त्यांचं संगोपन अश्या अनेकानेक प्रसंगातून दोघांचे सूर जमत जातात. आकर्षण केवळ शारीरिक असेल तर प्रणय हा विवाहाचा केंद्रबिंदू ठरेल पण तुम्ही आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे :

मानवी बालपण हे प्राणीमात्रात सर्वात लांब म्हणजे जवळ जवळ पंधरा ते अठरा वर्षे असते या काळात एकट्या स्त्री ला बालकाचे पूर्ण पालन पोषण हे अशक्य आहे म्हणून वर लिहिलेले वाक्य बरोबर आहे असे वाटते

त्यामुळेच तर विवाह हे अत्यंत बहुपेडी नातं आहे आणि एकमेकांतला अनुबंध हे उत्तररंगातल्या रम्य जीवनाचा (जो या लेखनाचा विषयी आहे) महत्त्वपूर्ण आधार आहे.

साती's picture

14 May 2013 - 8:29 pm | साती

लेख आणि प्रतिसाद दोन्ही उत्तम.
डॉक्टरसाहेब तुमचे या लेखमालेबाद्दल अभिनंदन!

अर्धवटराव's picture

14 May 2013 - 9:58 pm | अर्धवटराव

हि जी चर्चा चालु आहे, प्रॉब्लेम्सचं स्वरुप जसं स्पष्टीकरणासहीत दिल्या जातय... समजेल अशा शब्दात यापुर्वी कधीच असं कुठे वाचलं नाहि.
धन्यवाद हो डॉक्टरदादा.

दिवसेंदीवस मी देवाप्रती अधिकाधीक कृतज्ञ होतोय कि ज्याने मला मनुष्यदेहाने हा जगात पाठवले व विज्ञान समजण्याजोगी बुद्धी दिली :) ... आयला.... काय अफाट पसारा आहे... तरिही किती सुत्रबद्ध... व्वाह.

अर्धवटराव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 May 2013 - 12:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठी विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक जालावर उपलब्ध आहे. हा दुवा

आजानुकर्णाने बहुदा वाचलेलं असेलच; त्याला जे म्हणायचं आहे तेच राजवाडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून, पुराव्यानिशी सांगत आहेत. संक्षींना काही सांगायची आवश्यकता नाहीच; त्यांना सगळं ज्ञान आधीच झालेलं आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 May 2013 - 12:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
यशोधरा's picture

15 May 2013 - 9:28 am | यशोधरा

लिंक चालत नाही.

पैसा's picture

15 May 2013 - 11:26 am | पैसा

इमेल करते. आहे माझ्याकडे.

यशोधरा's picture

15 May 2013 - 11:16 pm | यशोधरा

केलेस का इमेल?

हे नवीन पुस्तक आहे का? मी राजवाड्यांचे "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" वाचले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 May 2013 - 10:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाह, गडबडीत झालेली टंकनचूक.

पैसा's picture

15 May 2013 - 11:36 pm | पैसा

मला वाटलं हा कोणतरी राजा राजवाडेसारखा नवा लेखकु आहे की काय. बाकी तुमच्यासारख्या थोर लोकांनी सांगितलं म्हंजे ते खरेच असणार असा विचार केला होता. आम्हाला आपलं काय कळतंय! आम्ही विहिरीत उड्या मारणारे.

प्यारे१'s picture

16 May 2013 - 12:46 am | प्यारे१

चाळलं. आपल्याला नाय ब्वा आवडलं पुस्तक!

पैसा's picture

16 May 2013 - 12:51 am | पैसा

सगळी पुस्तकं वाचू ने.

प्यारे१'s picture

16 May 2013 - 12:58 am | प्यारे१

चाळ्ळं फक्त.
होतं काय ल्हिलंय तसं होतं. मान्य. फुडं????

'मागच्या जन्मीची पापं' म्हणून भारतासारख्या 'मागास' देशात काही लोकांना जन्म मिळतो.
काय करणार? सो सॅडच ना!

महाभारतातनं आम्ही काय टिपतो? तर हे!
भगवद्गीता, भीष्मगीता वगैरे झूठ हो सगळं. अस्लं काही विचारात तरी घ्यायचं का कधी? छे!

कृशिसानविवि.
आम्ही मागासच बरे!

सुबोध खरे's picture

17 May 2013 - 10:47 am | सुबोध खरे

मूळ धागा हा स्त्री च्या रजोनिवृत्ती च्या वेळच्या प्रश्नाबद्दल आहे. त्यात मला जे म्हणायचे होते ते असे कि चांगले असणे आणि दिसणे हे मूळ स्त्रीस्वभावाचा पैलू आहे किंवा स्त्रीची नैसर्गिक प्रेरणा आहे. ( तो पुरुष स्वभावाचा नाही असे माझे म्हणणे नाही) पण आपली मनोवृत्ती आजही साचे बद्ध असल्यामुळे स्त्री ने सुंदर दिसले तर लग्नाच्या बाजारात किंवा त्यानंतरही तिची किंमत जास्त असते.
रजोनिवृत्ती नंतर स्त्रीच्या शरीरात जसे बदल होतात तसेच तिच्या मानसिक स्थितीत बदल होतात हे सम्प्रेरकांचा मेंदूवर होणार्या परिणामामुळे होतो यात स्त्रीने काय करावे कि जे नैसर्गिक प्रेरणेच्या विरुद्ध जाणार नाही हा त्यात विचार होता.
नैसर्गिक प्रेरणा म्हणजे काय ? आपल्या लहान मुलाला तूप किंवा अमूल बटर का आवडते?त्याला काहीही न शिकवता. कारण चरबी युक्त पदार्थ आपल्याला अन्नाच्या दुर्भिक्ष्याच्या काळात तारून नेतील हे त्याच्या डी एन ए स्मृती वर छापलेले असते. लहान मुल तोंडात बोट किंवा स्तन दिल्यावर चोखु का लागते? हे पण त्याच्या डी एन ए स्मृती वर छापलेले असते.या नैसर्गिक प्रेरणा आहेत.
आपल्याला सध्या पदार्थांपेक्षा भाजलेले पदार्थ का आवडतात तंदूर मध्ये भाजलेले चिकन किंवा पनीर का जास्त आवडतात कारण भाजलेले पदार्थ हे पचायला हलके असतात आणि विषबाधेपासून मुक्त असतात हे आपल्या डी एन ए स्मृती वर छापलेले असते.म्हणूनच आपल्याला सातारी कंदी पेढा साध्या पेढ्या पेक्षा जास्त आवडतो कारण त्यात भाजलेल्या दुग्ध प्रथिनाची चव असते.
मानवाची नैसर्गिक प्रेरणा काय आहे तर आपला जीव वाचवणे. म्हणूनच मरण येण्याची शंभर टक्के शक्यता असूनही देश देव किन्वा धर्मासाठी लढाई करून बलिदान दिलेल्या सैनिकाला जगभरच्या इतिहासात फार मोठा मान दिला गेला आणि जातो.
या नैसार्गिक प्रेरणेचा विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. नैसर्गिक प्रेरणेचा विचार केल्यास हे लक्षात घेत येते कि ती व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत कशी वागते. त्यामुळे त्यावर इलाज करणे जास्त सोपे होते.
दुर्दैवाने मी थोडक्यात लिहिले होते त्याचा विपर्यास झाला आणि मला एका विशिष्ट वृत्तीचा म्हणून शिक्का मारला गेला. असो मला त्याचे दुखः नाही.
आपला धागा लोकांनी मानवी विचार शक्ती आणि इतर गोष्टी कडे नेल्याने मार्गावरून भरकटला हे टाळता आले असते असे वाटते .

पैसा's picture

17 May 2013 - 10:57 am | पैसा

डॉक्टरसाहेब, काही लोक अमूक एक समजूत घट्ट धरून धाग्याच्या मूळ विषयाकडे दुर्लक्ष करतात तर कधी कधी चांगला चाललेला धागा काही विशिष्ट उद्देशाने मुद्दाम भरकटवण्याचे प्रकारही इथे अनेकदा घडतात. मी त्या वादात आता पडत नाही. सर्वसामान्य वाचकही अशा वादात पडत नाहीत कारण त्यांना धाग्याशी मतलब असतो. पण तरीही कृपया नेहमीप्रमाणे लिहीत रहा ही विनंती. आम्ही सगळे वाचत आहोत!

प्यारे१'s picture

17 May 2013 - 2:09 pm | प्यारे१

>>>>काही लोक अमूक एक समजूत घट्ट धरून धाग्याच्या मूळ विषयाकडे दुर्लक्ष करतात तर कधी कधी चांगला चाललेला धागा काही विशिष्ट उद्देशाने मुद्दाम भरकटवण्याचे प्रकारही इथे अनेकदा घडतात.

'तीच त्यांची 'नैसर्गिक प्रेरणा' असते'
असं म्हणावंसं वाटत आहे तरीही म्हणणार नाही कारण मी सर्वसामान्य वाचक आहे. ;)

प्रकाश घाटपांडे's picture

17 May 2013 - 11:10 am | प्रकाश घाटपांडे

उत्तम प्रतिसाद.नैसर्गिक प्रेरणे विषयी भाष्य चांगले उलगडून सांगितले आहे.

प्रभाकर पेठकर's picture

17 May 2013 - 6:47 pm | प्रभाकर पेठकर

आपला धागा लोकांनी मानवी विचार शक्ती आणि इतर गोष्टी कडे नेल्याने....

हे माझ्या प्रतिसादांना उद्देशून असेल तर 'नैसर्गिक प्रेरणा' म्हणजे काय अभिप्रेत आहे हे जे धाग्याच्या शेवटास सांगितले आहे तेच धाग्याच्या पहिल्या परिच्छेदात समाविष्ट केले असते तर समजण्यास अधिक सोपे झाले असते.

मी एक सर्वसामान्य माणूस आहे. मला जे जाणवले ते मी लिहीले. धागा भरकटवणे हा उद्देश कधीच नव्हता.

मला एका विशिष्ट वृत्तीचा म्हणून शिक्का मारला गेला.

असे संदिग्ध लेखन करण्यापेक्षा उलगडून स्पष्ट शब्दांची वाक्य रचना केली तर आपला निर्देश कुठे आहे समजेल आणि प्रतिसाद लिहीणे सोपे जाईल.

वाचकाच्या मनांत गोंधळ निर्माण होणार नाही अशा विधानांची गरज आहे.

फार दु:खाने म्हणावे लागते आहे की हा ह्या धाग्यावरील माझा शेवटचा प्रतिसाद समजावा.

धन्यवाद.

पेठकर साहेब
मी माझ्याबद्दल बोलत होतो मला स्त्रीमुक्ती विरोधी किंवा MCP हा शिक्का बसला.
(तसा मी बर्यापैकी गेंड्याच्या कातडीचा आहे त्यामुळे मला फरक पडत नाही )
आपण गैरसमज करून घेऊ नये.