"सामान्य वाचक" यांची "महाराज" या लेखावरील "कर्माच्या गती गहन असतात" अशी प्रतिक्रिया वाचून जालावर याविषयी काही लेख आहेत का याचा शोध घेतला. एक साईट सापडली. या साईटवरती लेख मिळाले. पैकी एका लेखातील खालील चपखल उपमा आवडली. ती शेअर करते आहे.
मला तरी ती पटते. पूर्वी लो. टिळकांच्या "गीतारहस्य" ग्रंथातील "कर्मविपाक" विवेचन वाचून मंत्रमुग्ध झाल्याचे पक्के स्मरते. कदाचित सतत या व अशा विषयांवरील लेख वाचून "कंडीशनींग" झाले असल्याने मला पटत असेल. पण निदान हिंदू धर्म व त्यातील "कर्मविपाक" सिद्धांत, "नशीब/नियती" या अतिशय गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरी करतो. जे निश्चितच कौतुकास्पद आहे.
खालील उतारा संपूर्णतः वरील साईटवरुन घेतलेला आहे.
एका मोठ्या पिंपामध्ये प्रथम गहू टाकले, मग त्यावरती तांदुळाचा थर ओतला, तांदूळावर डाळ घातली, पुढे त्यावर दगडाचा चुरा टाकून त्यावर लोखंडाचा चुरा टाकला, आणि सर्वात शेवटी उत्तमोत्तम मौल्यवान रत्ने टाकून ते पिंप भरुन टाकले. त्यानंतर पिंपाच्या खालच्या दिशेने एक छिद्र पाडले. छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.मनुष्याचे जीवन असेच आहे. अनेक जन्मांच्या संचयित कर्मांचा काही भाग प्रारब्धरुपाने, स्वत:बरोबर घेऊन मनुष्य जन्माला येतो. हे प्रारब्ध म्हणजे जणू भोगरुपी कर्मांनी भरलेले एक पिंप असते.जन्माला येताना या पिंपाला एक छिद्र पाडले जाते, आणि सांगीतले जाते यातून जे जे जसेजसे खाली पडेल त्याचा स्वीकार कर आणि जीवन जग.सुरवातीला छान बासमती तांदूळ, डाळ व गहू टाकले असतील तर मनुष्याला छान पुलाव आणि पुरनपोळीचा स्वाद घेता येईल. परंतु पुढे तो स्वाद घेत असतानाच दगड आणि लोखंडाचा चुरा पडावयास सुरुवात होईल. असे होताक्षणी मनुष्याचा आरडा ओरडा सुरु होइल की "काय हे! मला हा चुरा का खावा लागतो आहे? मूळात तो चुरा त्यानेच कधीतरी साठविला आहे याची आठवन त्याला होणार नाही ही कर्मरहस्याची अजून एक मेख आहे.
प्रतिक्रिया
3 May 2013 - 12:40 am | बॅटमॅन
नै ना, तसं नै म्हणत वसिष्ठ.
सिवाजी: पूर्वसुकृत कसे तयार होते याबद्दल वसिष्ठ काय म्हणाले ते आता लक्षात नाही, मला तूर्त मगाशी सांगितले इतकेच लक्षात आहे.
3 May 2013 - 12:11 am | अग्निकोल्हा
असं असेल तर पूर्वसुकृताचे साठलेले गाठोडे मुळात जमा कसे बरे झाले असेल ? यावर त्यांनी काय सांगितलयं ?
3 May 2013 - 12:42 am | ढालगज भवानी
हो ना कसे साठले ते गाठोडे ओ बॅट्स :????
3 May 2013 - 3:16 am | बॅटमॅन
ते पाहिले पाहिजे. मी आपला पूर्वसुकृताचे ओझे घ्यायचे कारण नाही हे वाचूनच खूश झालो, म्हटलं च्यायला काही का असेना, या जन्मात आपल्या हातात सर्व काही आहे ही तर लै भारी गोष्ट आहे.
3 May 2013 - 6:52 am | साऊ
हं! अध्यात्म!
शुची ताई तुअम्च नाव आव्डल.
3 May 2013 - 8:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न कुठपर्यंत आला आहे ?
-दिलीप बिरुटे
(गुढ गोष्टीं/घटनेचा नाद असलेला)
3 May 2013 - 8:51 am | अर्धवटराव
जीवंतपणा व स्वातंत्र्य. या दोन गोष्टी जर पटल्या (ते पटावच लागतं... त्याला पुराव्यानी शाबीत करता येत नाहि.) तर "कर्म" म्हणजे काय हे कळ्तं. एकदा कर्म कळलं कि कर्मविपाक देखील समजतो. मुळात कर्म आणि फळ हे वेगवेगळे नाहित. कर्माचं डीराईव्ह्ड फॉर्म म्हणजे विपाक. विपाकाचं इंटीग्रेटेड फॉर्म म्हणजे कर्म. ज्याच्याकडे डेरीव्हेशन आणि इंटीग्रेशनच्या समीकरणांनी बघितल्या जातं ते जीवन. या जीवनाची मूळ प्रॉपर्टी म्हणजे स्वातंत्र्य.
अर्धवटराव
3 May 2013 - 11:08 am | स्पा
मागच्या जन्मी काहीतरी भयंकर कर्म केलेलं असणार
त्याचं परिणाम स्वरूप असल्या वांझोट्या चर्चा मिपावर वाचाव्या लागतायेत..
कसले बोळे तुम्ब्लेत लोकांचे
अरारा
कहर...........
अवांतर : " शुची" हेच नाव चांगल होतं
3 May 2013 - 11:12 am | गवि
वांझोट्या चर्चा? आँ? लाडक्या पुतण्या, अरे मग तू सुचव ना गर्भार चर्चाविषय...
3 May 2013 - 11:20 am | स्पा
चालू द्या
आमचा पास
आमची तेवढी बौद्धिक कुवत नाही
3 May 2013 - 1:06 pm | बॅटमॅन
गर्भार अन गाभण चर्चाविषय सुरू कर्न्रर्यांच्या परतिक्शेत.
(बट्ट-मण्ण).
3 May 2013 - 1:10 pm | गवि
अर्र.. मला गंभीर असं म्हणायचं होतं.. ;) बादवे वांझोट्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय हो बट्टशास्त्री.. ?
सपुत्रिक, पुत्रवंत / पुत्रवती, अवांझोटी, गर्भवती, किंवा कसे?
3 May 2013 - 1:18 pm | बॅटमॅन
हे शब्द तसे बरोबरच आहेत, पण वांझोटीला जण्रल विरुद्धार्थी शब्द म्हंजे प्रसवक्षम, किंवा बहुप्रसव म्हटले तरी चालेल. अवांझोटीही चालायला हर्कत नसावी.
(षट्कॉमिकपारंगत, कार्टूनमूर्धन्य) बट्टमान्य शास्त्री.
3 May 2013 - 1:25 pm | बॅटमॅन
साला मला तर हे कर्मविपाक नाव ऐकल्यावर, एखाद्या तोंडात टाकताक्षणी विरघळणार्या म्हैसूरपाकाची आठवण होते अन सगळं गोविंद गोविंद होऊन जातं. :)
3 May 2013 - 1:37 pm | गवि
कर्मविपाक आणि मैसूरपाक यात बरंच साम्य आहे हो..
वरील वाक्य अवांतर टाळण्यासाठी. आता मुख्य प्रश्न. आपला आवडता मैसूरपाक कोणता?
अ. साजुक तुपातला मऊ असा मैसूरपाक जो प्रत्यक्ष मैसुरात जास्त ठिकाणी मिळतो:
आणि
ब. खुटखुटीत काहीसा कडक पिवळा मैसूरपाक, जो महाराष्ट्रात लोकल मिठाईदुकानांमधे खायची लहानपणापासून सवय झाली आहे:
पैकी कर्मविपाकाशी जास्त साम्य साधणारा कोणता?
3 May 2013 - 1:59 pm | बॅटमॅन
पहिला मैसूरपाक मी अजूनपर्यंत खाल्लाच नाही. (हाय कंबख्त वगैरे टोमणे ऐकायच्या तयारीनेच सांगतो आहे) दुसराच खाल्ला आहे. मिरजेत ष्ट्यांडकडून दर्ग्याकडे जाणार्या रोडवर एक टर्न घेतला की एका बोळात एक हलवाई आहे. त्याच्याकडचा मैसूरपाक आत्तापर्यंत खाल्लेला सर्वांत ब्येष्ट मैसूरपाक आहे. मैसूरपाक त्वांडात घाट्ल्याबरुबर पाक विरघळतंय एकदम.
तस्मात, दुसर्या प्रकारचा मैसूरपाक हाच आमच्यालेखी कर्मविपाकाशी सर्वांत जास्त साधर्म्य राखून आहे.
3 May 2013 - 2:00 pm | पैसा
तो पैलावाला आहे तो काय फक्त मैसुरात मिळतो असें नाही. फोंड्यात श्रीकृष्ण डेअरीच्या दुकानात मिळतो. कशाला आठवण करून दिलीत? आता एक तर मन मारायला पाहिजे नाहीतर डाएटचे तीनतेरा झालेले बघायला पाहिजेत. :(
3 May 2013 - 3:26 pm | मन१
आता एक तर मन मारायला पाहिजे
हापिसात साहेब नि बाहेर (भावी) आमची "ही" मारते तेवढं पुरे आहे की.
3 May 2013 - 3:33 pm | पैसा
असा झाला काय लफरा? तुझ्याबद्दल फार सहानुभूती वाटते रे! भावी ही ला एवढा घाबरतोस, तर पुढे कसं व्हायचं तुझं? असो. तर मनाला नाय मारीत. संध्याकाळी मैसूरपाक घेऊनच येते!
3 May 2013 - 4:03 pm | ढालगज भवानी
दक्षिण भारतातील साजूक तूपातील म्हैसूर पाक ... अरारारा खल्लास चविष्ट लागतो......नका आठवण काढू राव.
3 May 2013 - 4:18 pm | विटेकर
हा कोईमतूर् च्या " श्रीकृष्ण" चा ! तूप निथळत असते नुस्ते...
बंगलोर आणि चेन्ने मधे त्यांची साखली आहे. दोन्ही विमानतळावर मिळतो. एकदम झक्कास !
3 May 2013 - 4:12 pm | विटेकर
सुरुवात झाली एकोहम बहुस्याम पासून .. आणि शेवट होणार आहे तिथेच ..पुन्हा त्या परब्रह्मापाशी !
जिज्ञासूंनी ( केवळ वादासाठी वाद घालणारांनी नव्हे) दासबोधातील विश्वाची उभारणी आणि संहारणी हे प्रकरण समजून घ्यावे.
मग हे काय आहे ? तुमचा आमचा हा जन्म आणि मागचे -पुढचे, सारे ही त्या परमात्म्याची लीला आहे.
किंबहुना आपल्याला पुरुषार्थ गाजवण्याची संधी आहे . आपआपल्या वकुबाने तो करावा हे निश्चित आपल्या हाती आहे.
तो दयाळु नाही तर न्यायी आहे.. आपण आपल्याच सत्कर्माची आणि दुश्कर्माची फले भोगत असतो, व्रुथा वाद करण्यात अर्थ नाही. परमात्म्याने अवतार घेऊन पुरुषार्थाने प्रतिकूल परिस्थिती बदलता येते हे दाखवून दिले आहे.( वनवासी व्हावे लागले, बायको पळवून नेली, साह्य देखील माकडांचे !) आपण ती सगुण रुपे डोळयासमूर ठेऊन आपला पुरुषार्थ गाजवावा आणि समन्वय साधावा, नरदेह सार्थकी लावावा.
या जन्मात केलीली सारे कर्मे carry forword होतात, सत्कर्मे करित रहावे, मोक्श मिळणारच !
अधिक महितीसाठी " कर्माचा सिद्धांत" हे हिराभाई ठक्कर यांचे छोटेखानी पुस्तक वाचवे. अप्रतिम आहे.
I have complete clarity and no doubts on this topic !
3 May 2013 - 7:34 pm | यशोधरा
'कर्मविपाक' हा धागा पाहून मला साखरेचा पाक आठवतो आहे!
3 May 2013 - 10:05 pm | प्यारे१
नुसता पाक की माशी पडलेला? ;)
3 May 2013 - 7:36 pm | वेताळ
तुमचा मठ कुठे आहे?
3 May 2013 - 7:39 pm | ढालगज भवानी
वेताळ, खवीस, समंध यांना प्रवेश नाही बुवा आमच्या मठात.
3 May 2013 - 7:44 pm | वेताळ
नाहीतर तर कर्मविपाकात बुडुन मरायला वेळ कुणाला आहे?
पहिल्यादा मला वाचताना दारु बनवायची प्राचीन कृती वाटली नंतर पहिल्या धारेची पिल्यासारखी झिंग आली.डोळ्यासमोर अंधारी आली.
बाकी चालु दे
3 May 2013 - 8:26 pm | अत्रुप्त आत्मा
@पहिल्यादा मला वाचताना दारु बनवायची प्राचीन कृती वाटली>>> =))