ओले अंजीर आणि बेळगावी कुंदा...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
28 Apr 2013 - 7:06 pm

एकदा सहजच अण्णांना भेटायला कलाश्रीमध्ये गेलो होतो. बाहेरच्या खोलीत अण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे पानाचा डबा होता.. इब्राहमी तंबाखूवाला..

"काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाण्याहून.." असे जुजबी प्रश्न अण्णा विचारत होते.

जरा वेळाने तेथे वत्सलाताई आल्या. वत्सलाताई जोशी. माहेरच्या वत्सला मुधोळकर. भाग्यश्री या कानडी नाटकांच्या तालमीदरम्यान त्यांचं आणि अण्णांचं जमलं. स्वतः वत्सलाताई चांगल्या गात असत. 'अत धूम' ही मियामल्हारातली, 'जाऊ मै तोपे बलिहारी ही वृंदावनी सारंगातली, किंवा मारव्यातली एक अशा काही बंदिशी त्यांनीच अण्णांना दिल्या होत्या असं अण्णा सांगत असत..

'काय केव्हा आलात..' असं म्हणून वत्सलाताईंनी हसून स्वागत केलं आणि माझ्या हातावर काही ओले अंजीर ठेवले. अंजीर अतिशय गोड आणि सुरेख होते.. मी ते पटापट मटकावले परंतु मला प्रश्न असा पडला की त्याची देठं टाकायची कुठे? मग बाहेर जाताना ती सोबत न्यायची आणि टाकून द्यायची असं मी ठरवलं आणि तसाच बसून राहिलो..

माझी चुळबुळ वत्सलाताईंच्या लक्षात आली..

'माझ्याजवळ द्या ती देठं इकडे.. मी टाकते.."

त्या इतक्या सहजतेने म्हणाल्या की मलाच ती देठं त्यांच्या हातात देतांना अवघडल्यासारखं वाटलं..

"यांना तो बेळगावी कुंदापण दे.." अण्णा म्हणाले..

"खास शहापुरी कुंदा आहे बर्र का.. " - अण्णांचा धीरगंभीर खर्ज.!

ताईंनी लगेच तत्परतेने आत जाऊन माझ्याकरता तो कुंदा आणला..अगदी सुरेख, साजूक कुंदा होता..

मग निरोप घेतला..

अण्णांनी विचारलं, "कसे जाणार?"

अण्णांना एकूणच रस्ते, गाड्या यात विलक्षण इंटरेस्ट.. :)

"साडेचारची कोयना आहे.. ती पकडणार.."

हां हां बरोबर.. कोयना आठ-साडेआठापर्यंत जाईल ठाण्याला.."

जगभर प्रवास केलेल्या अण्णांनी 'मी कोयना एक्सप्रेस पकडून ठाण्याला जाणार..' या प्रवासातदेखील इतकी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..! :)

असो..

कुणी म्हणेल या लेखाचं प्रयोजन काय? काय तर म्हणे अंजीर खाल्ले..!

खरं आहे.. आठवण तशी छोटीशी आणि साधीच आहे.. परंतु अशा अनेक लहानसहान आठवणीच कुठेतरी मर्मबंधातली ठेव होतात आणि तीनसांजा झाल्या की या खिडकीतनं, त्या खिडकीतनं घिरट्या घालायला लागतात, अस्वस्थ करतात..!

आणि आता फक्त आठवणीच तर आहेत..पटकन एखादा फोन करून किंवा कलाश्रीत जाऊन पायावर डोकं ठेवायला अण्णा कुठे आहेत..?!

-- तात्या.

संगीतवाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Apr 2013 - 7:11 pm | मुक्त विहारि

भावली..

बंडा मामा's picture

28 Apr 2013 - 8:21 pm | बंडा मामा

तात्या तुम्ही बर्‍याच दिवसांनी सक्रिय झालात हे पाहुन आनंदच आहे. पण असे फुटकळ लेख लिहिण्यापेक्षा रोशनी सारखे सकस लेख लिहा पाहू. तुमच्याकडुन आमच्या मोठ्या अपेक्षा आहेत. (काही द्वाड मिपाकर तुम्हाला डायरी घ्यायचा सल्ला द्यायच्या आत आम्हाला रोशनी सारखी मेजवानी द्या)

विसोबा खेचर's picture

28 Apr 2013 - 8:47 pm | विसोबा खेचर

ठीक आहे मामा. सदर लेख तुला फुटकळ वाटला. तुझ्या मताचा आदर आहे...

बंडा मामा's picture

28 Apr 2013 - 9:02 pm | बंडा मामा

तात्या कृपया राग मानून घेऊ नका. तुमचे इथले लेखन वाचले आहे आणि त्यातुनच वरील अपेक्षा लिहिली आहे. इथे दिलेली आठवण सुरेखच आहे पण एक स्वतंत्र लेख म्हणून तुम्ही सातत्याने असे किरकोळ स्फुट लिहिणे आवडले नाही. एका चाहत्याला तुम्ही नाराज करणार नाही ह्या अपेक्षेने लहान तोंडी मोठा घास घेते आहे. कळावे लोभ असावा.

बंडा मामा's picture

28 Apr 2013 - 9:04 pm | बंडा मामा

घेतो* आहे असे वाचावे--- प्रतिसाद संपादित करण्याची सोय नसल्याने टंकन दोष निवारण करणे जमले नाही -- उगाच गैरसमज नकोत म्हणून हा खुलासा

चित्रगुप्त's picture

29 Apr 2013 - 4:57 am | चित्रगुप्त

आठवण आवडली.
...(बंडा मामांप्रमाणेच 'रोशनी' सारख्या उत्कट लेखनाच्या अपेक्षेत आहे).

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 1:38 pm | विसोबा खेचर

सर्व रसिक आणि संवेदनशील मिपावाचकांचे आभार..!

मिपावरच्या जिलब्या!!

चौकटराजा's picture

29 Apr 2013 - 2:59 pm | चौकटराजा

तात्या हळू हळू स्लो लेफ्ट आर्म स्पिन टाकून पहाताहेत.. तीन चार महिन्यात अकरा पावलांचा स्टार्ट ते घेणार ! नक्की घेणार !

स्पा's picture

29 Apr 2013 - 3:28 pm | स्पा

सारखं आपलं अण्णा, मधुबाला, रफी, पंचम दा

उगा त्यातून लिहिलेली भावनिक मुक्तकं...
बॉर झालो राव.

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 3:33 pm | विसोबा खेचर

>>बॉर झालो राव.

आपल्या भावनेचा आदर करतो...परंतु माझ्याकडून या पुढेही असंच काहीसं लेखन होईल असंही नमूद करतो.. आणि यापुढे माझ्या लेखांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची आपल्याला सूचनावजा विनंती करतो.. :)

धन्यवाद..

परंतु माझ्याकडून या पुढेही असंच काहीसं लेखन होईल असंही नमूद करतो

आपल्याही भावनांचा आदर आहेच
या पुढे प्रतिसाद टाकण्याचे कष्ट घेणार नाही

-- धन्यवाद

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 4:08 pm | विसोबा खेचर

>>या पुढे प्रतिसाद टाकण्याचे कष्ट घेणार नाही

फारच छान.. अनेक आभार..

jaypal's picture

29 Apr 2013 - 3:34 pm | jaypal

सहमत. शिळ्या कढिला उत

सामान्य वाचक's picture

29 Apr 2013 - 4:10 pm | सामान्य वाचक

All animals are equal, but some animals are more equal than others, हे वाचले आहे का?
त्यामुळे प्रत्येकाला मिळ्णारी दाद वेगळी असते.

असे धागे तुम्ही काढून तर बघा, आम्ही सगळे तुम्हाला कसे बडवू ते...

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 4:25 pm | विसोबा खेचर

स्वागत आहे.. :)

सूड's picture

29 Apr 2013 - 6:04 pm | सूड

>>असे धागे तुम्ही काढून तर बघा, आम्ही सगळे तुम्हाला कसे बडवू ते...
अशा धाग्यांसाठी लोक डायर्‍या आणि जिलब्यांची ताटं घेऊन उभे असतात, ते आताशा कुठे दिसत नाहियेत.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Apr 2013 - 10:53 pm | परिकथेतील राजकुमार

अशा धाग्यांसाठी लोक डायर्‍या आणि जिलब्यांची ताटं घेऊन उभे असतात, ते आताशा कुठे दिसत नाहियेत.

सूड तुला आजकाल नको ते प्रश्न फार पडतात बरे. तू उपाशीपोटी अंजीर आणि भरल्या पोटी केळे खात जा.

अनुप ढेरे's picture

29 Apr 2013 - 5:53 pm | अनुप ढेरे

काही लोक म्हणतात की मोठ्या/प्रसिद्ध/कलाकार व्यक्तिंच्या खासगी आयुष्यात आपण फार उत्सुकता दाखवू नये. पण अशा काही आठवणी वाचल्या की तो कलाकार माणूस म्हणून कसा होता हे पण कळतं. म्हणून हा लेख आवडला.

आजानुकर्ण's picture

29 Apr 2013 - 10:10 pm | आजानुकर्ण

ओल्या आणि गोड, सुरेख वगैरे अंजिरांची देठंही कोवळी असतात. खाऊन टाकली तरी त्रास होत नाही. कधीकधी मलाही अंजीर खाताना राहिलेली देठं कचऱ्याच्या बादलीपर्यंत जाऊन टाकण्याचा कंटाळा येतो. तेव्हा मी ती गिळून टाकतो. :)

अत्रन्गि पाउस's picture

29 Apr 2013 - 11:18 pm | अत्रन्गि पाउस

तानपुर्याच्या ४ तारा काय वाजवता.सतत..त्यात अजून काही वाजवता येत तर नाही..असे विचारणारे लोक असतात....
अरे अण्णांचे गाणे सोड..नुसता हम्म म्हणत त्या खर्जाची पण आठवण येते ...
तू लिही बाबा!!

विसोबा खेचर's picture

30 Apr 2013 - 10:47 am | विसोबा खेचर

कौतुक करणा-या, टीका करणा-या, प्रोत्साहनपर, सकारात्मक, नकारात्मक, समिक्षणात्मक, अवांतर/विषयाला सोडून लिहिणा-या अशा सर्व प्रतिसादकर्त्यांचा मी आभारी आहे.. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Apr 2013 - 10:58 am | विश्वनाथ मेहेंदळे

...अवांतर/विषयाला सोडून..

धाग्याचा विषय काय होता ते एकदा सांगाल का प्लीज ????

सामान्य वाचक's picture

30 Apr 2013 - 12:29 pm | सामान्य वाचक

वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात येईल.

इनिगोय's picture

30 Apr 2013 - 10:45 pm | इनिगोय

चविष्ट धागा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 May 2013 - 10:58 pm | निनाद मुक्काम प...

@इनिगोय
तुम्हाला पौष्टिक सुद्धा म्हणायचे आहे का